तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
1 Nov 2015 - 6:50 pm

आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले….
त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच…
उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते…

सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो.

ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल…

चला तर मग !

मुक्तकज्योतिषविचार

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Nov 2015 - 7:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

किती करायचे?

अमचा आयडी कोणाला अवडत असेल असं वाटत नाही तस्मात पास.

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Nov 2015 - 7:03 pm | माम्लेदारचा पन्खा

तुम्हाला कोणता आयडी आवडतो ते सांगा....

अभ्या..'s picture

1 Nov 2015 - 7:06 pm | अभ्या..

पंखेराव

व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा

ही अट टाळली असती तर खूप आयडीविषयी अगदी भरभरुन बोललो असतो.

मग ते एकमेकांचे कौतुकवर्णनसोहळे होतात म्हणून ती सूचना होती... पण हरकत नाही... तेही लिहू शकता !!

लालगरूड's picture

1 Nov 2015 - 10:40 pm | लालगरूड

मला आवडतो

मांत्रिक's picture

1 Nov 2015 - 10:42 pm | मांत्रिक

पण काय??????

लालगरूड's picture

1 Nov 2015 - 10:54 pm | लालगरूड

चिमण्याचा आयडी

साहेबांना अमित पाटील हा आयडी आवडतो

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Nov 2015 - 7:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. त्यांची आणि आमची मैत्री एवढी घट्ट होती की मैत्रीचा विळखा त्यांच्या नाजुन तब्बेतीला झेपला नाही. ते हेवनवासी झाले. असो. आपण त्यांचे भाईबंद दिसता. तुमची आमची मैत्री तेवढी जवळची नं होवो हि इश्वरचरणी प्रार्थना.

कळावे. लोभ असावा.

सागरकदम's picture

9 Nov 2015 - 10:52 pm | सागरकदम

भगवान श्रीराम अमर नव्हते
रावण अमर होता

असो

सूड's picture

9 Nov 2015 - 10:55 pm | सूड

ओह आय सी!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Nov 2015 - 6:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुला

"आँ, अच्चं जालं तलं" असं म्हणायचय का?

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 9:11 am | टवाळ कार्टा

असा सगळा प्रकार आहे तर =))

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 11:16 am | सागरकदम

पुरवणी:-
त्यामुळे चांगले लोक अनेक अवतार घेऊन फिरत असत्तात

वॉव मस्त धागा मापं. (माझे नाव आले म्हणून नै बर्का ;) )
मला प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ह्या आयडीविषयी अगदी वाचनमात्र होतो तेंव्हापासून कुतुहल होते. मस्त फॉर्मल लाईट पिंक ऑर लाईट ब्ल्यु शर्ट. प्रॉपरली हर्शा भोगले स्टाईल इन केलेला, पॉलिश्ड फॉर्मल शूज घातलेला, अगदी क्लीन शेव्ह अन बॉक्स टाईप मिशा ठेवणारा दिलखुलास माणूस असावा असे वाटायचे. (प्रत्यक्षात तसेच आहेत असे कळलेय, मी पाहिले नाही)
सग्ग्ग्ग्ळ्या गोष्टींची माहीती असणारा, नर्म विनोद करणारा, अगदी गरज पडेल तेव्हाच खुलासे देणारा आणि प्रत्येक शब्दात अनुभव दिसणारा माणूस ह्या आयडीचा धनी असावा असे वाटायचे.
आता बघू कसे आहेत अ‍ॅक्चुअली सर. औरंगाबादला जावे लागेल पण. ;)

माईसाहेब कुरसूंदीकर हा आयडी म्हणून आवडतो.
मस्त पैकी बेयरिंग पकडून प्रतिसाद देत असतात. फार क्वचित् व्यक्तिगत हल्ले किंवा बिलो बेल्ट हल्ले हे वैशिष्ट्य.
भन्नाट. लौ यु माईआज्जी!

खटपट्या's picture

1 Nov 2015 - 7:27 pm | खटपट्या

अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे अत्रुप्त आत्मा) ही माझी आवडती आयडी आहे.
या आयडीचा शब्दशः अर्थ राहुद्या पण या आयडीच्या लीखाणावरुन ही आयडी धारण करणारा माणूस साधा, सरळ, पापभीरू, प्रामाणिक(शब्दाचीही आतिशयोक्ती नाही) वाटतो. जसजसे त्यांचे लेखन वाचत गेलो तसतसा त्यांचा फॅन होत गेलो. आपली मते निर्भिडपणे आणि परखडपणे मांडणारा, कीतीही विरोधी मते मांडली तरी आपली पातळी न सोडणारा असा हा लेखक.
त्यांची भेट होता होता राहीली. कधीना कधी भेट होइलच. मी कर्मकांडामधे अजीबात न रमणारा असून केवळ आणि केवळ त्यांच्या फुलांच्या रांगोळ्यांसाठी मला घरात त्यांच्याकडून एकतरी कार्य करून घ्यायचं आहे.

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2015 - 10:30 pm | टवाळ कार्टा

अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे अत्रुप्त आत्मा) ही माझी आवडती आयडी आहे.
या आयडीचा शब्दशः अर्थ राहुद्या पण या आयडीच्या लीखाणावरुन ही आयडी धारण करणारा माणूस साधा, सरळ, पापभीरू, प्रामाणिक(शब्दाचीही आतिशयोक्ती नाही) वाटतो. जसजसे त्यांचे लेखन वाचत गेलो तसतसा त्यांचा फॅन होत गेलो.

तुम्हीसुधा बुवावताराचे फ्यॅण का? =))

अत्रुप्त आत्मा's picture

10 Nov 2015 - 10:05 am | अत्रुप्त आत्मा

खटपट्या >>> मनःपूर्वक धन्यवाद..

समांतरः- ट्क्या..http://www.sherv.net/cm/emoticons/guns/flamethrower.gifह्ल्कटा .. का रे जळतोस येव्हढा??? दू दू दू

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 10:40 am | टवाळ कार्टा

ता मी काय केलं

खटपट्या's picture

10 Nov 2015 - 11:14 am | खटपट्या

थांब तुला फॅन ग्रुप मधुन काढून टकतो..

सूड's picture

10 Nov 2015 - 2:10 pm | सूड

वारा घालायला वेगळा ग्रूप आहे?

बॅटमॅन ,भाषांतला चौफेरपणासाठी.भेटलो नाहीये.
आणि
दुत्तदुत्त.( लिहिपर्यंत नाव बदलतील तरी हे चालूच राहणार।)याना भेटलो आहे परंतू लेखनात दिसणाय्रा निरीक्षणशक्तीसाठी.

खटपट्या's picture

1 Nov 2015 - 7:31 pm | खटपट्या

+१ बॅटमन हा आयडी मला त्यांच्या चौफेर व्यासंगासाठी आवडतो

स्वप्नज's picture

2 Nov 2015 - 8:48 pm | स्वप्नज

बॅटमन हा फार व्यासंगी आयडी आहे.

- बॅटमनचा फ्यान
स्वप्नज

गणपा हा आयडी पण टीशर्ट आणि थ्री फोर्थ घालून मस्त सोफ्यावर मांडी घालून लॅपटोप घेऊन बसलाय असे वाटायचे. एका हाताशी फुल्ल चिकनने भरलेली डिश अन स्वतःशीच हसत मिपावर टायपणारा एकदम गट्टू अन गोंडस आयडी दिसायचा. गंपाव.... असे हाक मारली की आव.. असे प्रत्युत्तर येईल असे वाटायचे.
ठाकूरसाब शायद वैसेच है. ;)

सतिश गावडे's picture

1 Nov 2015 - 7:53 pm | सतिश गावडे

सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते ….

धन्यवाद. :)

व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो.

आपण प्रत्यक्ष भेटलोय, इतकेच नव्हे तर तुझ्या आवडत्या मामलेदारमध्ये एकाच टेबलावर समोरासमोर बसून मिसळ खाल्ली आहे. आता ओळख पाहू. ;)

मिपावर मला पावणे आठ वर्ष झाली आता. अगदी सुरुवातीला मला दोन आयडींबद्दल खुप कुतुहल असायचे. दोन्हीही मिपावरील दिग्गज. बिपीन कार्यकर्ते आणि प्रा. डॉ. दिलीप बिरुटे. दोघांचेही मोजकेच आणि नेमके नर्मविनोदी पण तरीही रोखठोक प्रतिसाद आवडायचे.

बिका मुंबईला असताना गोरेगांवला राहायचे. माझ्या कोकणातील रायगड जिल्ह्यातील गावाचे नाव गोरेगांव. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी मुंबईला करियरची सुरुवात केली तेव्हा गोरेगावलाच (अर्थात मुंबईच्या) राहत होतो. हा धागा पकडून आमच्या व्यनितून गप्पा सुरु झाल्या. पुढे प्रत्यक्ष भेटीचाही योग आला. माझ्या मनात बिपीनदाची जी प्रतिमा तयार झाली होती तसाच आहे तो.

दुसरा आयडी म्हणजे प्रा. डॉ. मी एका अध्यात्मिक धाग्याचा दुसरा एक स्वतंत्र धागा लिहून प्रतिवाद केला. (सरडयाची धाव कुंपणापर्यंत. ;)). धाग्याच्या शेवटी भली मोठी संदर्भ ग्रंथांची यादी दिली होती, त्याने सर प्रभावित झाले आणि आमच्या व्यनि-गप्पा सुरु झाल्या. अर्थात या गप्पा एक अंतर ठेवूण होत्या. पुढे वल्लीच्या कृपेने औरंगाबादला वेरुळला जायचा योग आला. तिथे सरांची भेट झाली आणि माझा भ्रमनिरास झाला.

व्यनितील गप्पांमधून सरांची जी एक भारदस्त, इतरांपासून एक ठराविक अंतर राखून उभी राहणारी प्रतिमा होती ती खोटी ठरली. मराठीतून पिएचडी केलेला, महाविद्यालयात मराठी शिकवणारा हा माणूस माझ्यासारख्या तुलनेने कालच्या पोरासोबत अगदी जीवाभावाच्या मित्रासारखा गप्पा मारू लागला, खुप जवळच्या नातेवाईकांची जशी उठबस करावी अगदी तसाच पाहूणचार सरांनी त्या दोन दिवसांत केला. त्या औरंगाबादवारीनंतर मी लेण्यांमध्ये विशेष रस नसताना पुढची दोन वर्षेही वल्लीसोबत औरंगाबादला गेलो, सरांना भेटायला.

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Nov 2015 - 8:48 pm | माम्लेदारचा पन्खा

ते एक उदाहरण होतं.....

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Nov 2015 - 1:11 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्या लेका आवर्जून आठवण ठेवली आहेस रे!

<घट्ट मिठीची स्मायली> :)

लाल टोपी's picture

1 Nov 2015 - 7:59 pm | लाल टोपी

दोन आय.डी. दोघेही आपल्या ख-या नांवानेच मिपावर वावरतात.
पेठकर काका नेहमीच त्यांनी मांडलेली स्पष्ट, परखड मते आवडली आहेत, पटली आहेत, आपले अनुभव काहीही शिकवण्याचा आव न आणता सहजपणे येथे मांडतात कळत न कळतपणे त्याचा अनेकांना फायदा होतो.
श्रीरंग जोशी अगदी नव्या सदस्याला देखील अश्वासक प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देणारे, हवा तो रेफरन्स तात्काळ देणारे हे प्रसन्न व्यक्तिमत्व प्रत्यक्षातही अगदी तसेच असेल असे वाटते.

पंखासाहेब, या धाग्याची कल्पना अतिशय आवडली यात अधिकाधिक प्रतिसाद आले तर नक्कीच नव्या जुन्या सदस्यांना एकमेकांची ओळख करुन देण्यासाठी उत्तम धागा ठरावा ही अपेक्षा.

लाल टोपी's picture

1 Nov 2015 - 8:41 pm | लाल टोपी

या देखील आवडत्या आय.डी.
नेहमीच प्रोत्साहक प्रतिसाद, संपादक म्हणून कधीहही मदतीला तत्पर प्रसंगी क्वचीत प्रसंगी गरज पडल्यास काही प्रतिसादात आक्रमकताही पाहिली आहे.

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2015 - 4:59 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद, लालटोपी.

मी आहेच तसा..

एस's picture

1 Nov 2015 - 8:07 pm | एस

आतिवास. बाकी कुठल्याच आयडीमागील व्यक्तींना प्रत्यक्ष भेटायची तीव्र अशी ओढ कधी जाणवली नाही पण ह्या ताई जर कधी या भेटायला असं म्हणाल्या, तर त्या ओरिसा-छत्तीसगढ, अफगाणिस्तान वा मोझाम्बिक, कुठेही असोत, मी आवर्जून जाऊन त्यांना भेटेन आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांना बोलतं करेन. इतके संयमी, ग्रासरूट्स लेव्हलचं व्यक्तिमत्त्व फार क्वचितच दिसलंय.

चांदणे संदीप's picture

1 Nov 2015 - 8:44 pm | चांदणे संदीप

या प्रतिसादाला माझ्याकडून ५१ रु रोख!
(कोणीही लगेच मागायला येऊ नये! कधी भेटलो तर देईनच आठवणीने!)
Sandy

मित्रहो's picture

2 Nov 2015 - 7:49 am | मित्रहो

+१
भेटायच एकदा तरी. अनुभव आणि त्यावरील भाष्य बरेच काही शिकवून जाते.

माझे आवडते आयडी पैसाताई(अगदी साॅफ्ट स्वभाव), कॅप्टन जॅक स्पॅरो(ये दोस्ती हम नही तोडेंगे), टक्या (महाडांबरट), सूड (गूढ-गहन-गुप्त), श्रीरंग जोशी(अगदी गोड स्वभाव), सगा (बेस्ट काव्य), तुडतुडी-दत्ता जोशी-बाहुबली (अगदी कट्टर आस्तिक माझ्यासारखे), प्रगो-प्यारेअण्णा (माझ्यासारखे सातारकर, लैच भांडखोर)
अजून किती बोलू? हे मिपाच सारं अवलियांनी भरलेलं!!!

मांत्रिक's picture

1 Nov 2015 - 8:23 pm | मांत्रिक

गंमतीत घ्या ही विनंती!!!
अजून एक: बिका (माझ्याशी वाद होऊन पण डोक्यात राग न ठेवणारे), अ.कु.(टैमपासची किती भारी संधी देतात खरंच सांगा..), पिवशी( निरागस निष्पाप), मापं (वजनदार व खाद्यप्रेमी माझ्यासारखे), बॅटमॅन ( हा बाबा अक्षरशः शब्दांची कत्तल करतो!!!), पैजार माऊली (ज्ञानोबाचे भक्त माझ्यासारखे), नाखु (नर्म विनोदी शैली, यांनी चेष्टा केली तर कुणाला राग येईल?)

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2015 - 10:30 pm | टवाळ कार्टा

पिवशी( निरागस निष्पाप)

त्ता कळ्ळे टोमणे ;)

पियुशा's picture

2 Nov 2015 - 9:48 am | पियुशा

@ माप, टवाळ कार्टा ब्बरोबर नावा प्रमाणे तस्साच आहे बर्र का ;)

@ ट्क्या ईनो घे ईनो..........
पिवशी( निरागस निष्पाप ) =))

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 1:49 pm | टवाळ कार्टा

@ ट्क्या ईनो घे ईनो..........
पिवशी( निरागस निष्पाप ) =))

असे असेल तर मी मर्यादापुरुषोत्तम राम + न भूतो न भविष्याती असा कृष्ण या दोघांचे गुण असणारा सज्जन =))

सागरकदम's picture

12 Nov 2015 - 6:45 pm | सागरकदम

कृष्ण तर मी आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Nov 2015 - 1:14 pm | बिपिन कार्यकर्ते

कसला राग अन कसलं काय? चार घटका या, बसा, दंगा करा, काय ज्ञान वगैरे वाटायचं ते वाटा आणि निघा... कुठे काय डोक्यात ठेवायचं? :)

मांत्रिक's picture

1 Nov 2015 - 8:28 pm | मांत्रिक

लास्ट & द बेस्ट: डाॅ. सुहास म्हात्रे (अगदी सज्जन, मुद्देसूद, जबर ज्ञान मेडिकलचं)

अरे जेपी राहिला (निरागस गिफ्ट देणारा), आणि बोकोबा (इंग्लिशप्रभू, भाषांतर सम्राट!!!)

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2015 - 10:30 pm | टवाळ कार्टा

टक्या (महाडांबरट)

दू दू दू

अत्रुप्त आत्मा's picture

2 Nov 2015 - 12:04 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gifhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gifhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 1:28 am | टवाळ कार्टा

दूत्त दूत्त

परीकथेतला राजकुमार हा आयडी त्यांच्या विनोदाच्या टायमिंग साठी आवडायचा(तो) हल्ली कधी दिसत नाही

चिंतामणी's picture

2 Nov 2015 - 11:26 pm | चिंतामणी

वो चला आया.

चांदणे संदीप's picture

1 Nov 2015 - 8:42 pm | चांदणे संदीप

मागे अभ्यादादाच्या टीशर्टाच्या धाग्यात काही खास आयडीचे स्वभाव जरासे दिसलेले आता इथे काय दिसतंय पाहू!

मला स्वत:ला "उगा काहीतरीच" यांचा आयडी आवडतो. कारण विनोदी वाटतो फारच!
त्यांच्या काही प्रतिसादांचा आशय मला त्यांच्या आयडीसारखाच वाटायचा!
त्यांनी प्रतिसाद न देता कुठल्याही धाग्यावर नुसती उपस्थिती जरी दर्शवली तरी काम होईल असे वाटते!
(उ.का. कृ.ह.घ्या.!)
Sandy

उगा काहितरीच's picture

2 Nov 2015 - 5:38 pm | उगा काहितरीच

धन्यवाद ! म्हणजे आम्ही पण आहोत तर थोडेफार प्रसिद्ध . (रच्याकने त्याच काय आहे ना मी जेव्हा नवीन नवीन आलो होतो मिपावर एकापेक्षा एक नावाजलेले आयडी होते इथे, सो डायरेक्ट 'तुमचा लेख आवडला नाही' असे लिहायची छाती व्हायची नाही. सो 'लेख आमच्या आयडीप्रमाणे वाटला' असे लिहीण्यासाठी हा आयडीप्रपंच ! )
रच्याकने ,
मिपावरील चांगले आयडी म्हणजे चांगले २-३ पानाची लिस्ट होईल ;-)

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 6:33 pm | चांदणे संदीप

धन्यवाद उ.का. हलके घेतल्याबद्दल!

मिपावरील चांगले आयडी म्हणजे चांगले २-३ पानाची लिस्ट होईल ;-)

ह्याच्याशी दणकून सहमत!

Sandy

यकु...
का ते विचारू नका.

बोका-ए-आझम's picture

1 Nov 2015 - 9:08 pm | बोका-ए-आझम

मामलेदारचा पंखा - मी स्वतःच मामलेदार मिसळीचा फुलस्पीड पंखा आहे, पण तिला आयडीत स्थान देऊन कट्ट्याचा मसालेदार पंचनामा लिहिणाऱ्या मापंचा पण मी फ्यान आहे.

रामदास - बस्, नामही काफी है!काटेकोरांटीच्या फुलांसारखं लेखन होणे नाही!

मुक्त विहारी - उर्फ नंदी पॅलेसचे अर्धे मालक उर्फ कट्टा डाॅन.

सोन्याबापू - रगडोत्तम भारती बापूसाहेब!

गवि - वातावरण निर्मिती - मग ती गव्हाणी घुबडांच्या घराची असो, MH370 च्या लेखाची असो, ब्राऊ आणि वाड्याची असो, टोलनाक्याची असो किंवा पुरेपूर कोल्हापूर आणि पाॅप टेट्सच्या कट्ट्याची असो - गविभाऊ दोन ओळीत एखाद्या दिग्दर्शकासारखं वातावरण उभं करतात. स्क्रीनप्ले लिहा गविभाऊ. कल्ला कराल!

स्वॅप्स (आता एस)- मी जर नेट धरून एखादी लेखमालिका पूर्ण केली असेल, तर त्याचं श्रेय हे स्वॅप्सभाऊंनाच.

क्लिंटन (आता गॅरी ट्रूमन) - राजकारण, अर्थकारण, इतिहास म्हणजे क्लिंटन. Peerless.

बॅटमॅन - वाल्गुदस्वामी, लिहा हो काहीतरी.

अभ्या - व्यक्तिचित्रं काढावीत तर अभ्याभाऊंनीच. माझीच एक आधी दिलेली प्रतिक्रिया इथे देतो - लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी!

नाद खुळा - सत्कारबहाद्दर, स्पेसबारकर्दनकाळ नाखु!

चांदणे संदीप's picture

1 Nov 2015 - 9:19 pm | चांदणे संदीप

हा वरचा श्री बोका-ए-आझम यांचा प्रतिसाद पाहून माझ्याकडून काहीतरी राहून गेल्यासारख वाटतय, म्हणून यापुढे या धाग्यावर जे काही चांगले प्रतिसाद येतील (आयडी संदर्भात) त्याला माझा डिट्टो/कॉपी अस समाजाव!

बोका-ए-आझम यांच्याबद्दल काय बोलाव? आफताब-ए-मिपा आहेत ते!

धन्यवाद!
Sandy

सुहास झेले's picture

1 Nov 2015 - 9:23 pm | सुहास झेले

आतिवास, रामदास, बॅटमन, गवि, वल्लीशेठ, गणपा... खूप मोठी लिस्ट आहे राव :)

सगळे शरदिनीला विसरले का ? माझ्या अत्यंत आवडीचा आय डी आणि व्यवसाय बंधु/ भगिनी. ;) असले आय डी मला हल्ली भलतेच आवडायला लागले आहेत.
( कंपूची कृपा. दुसरे काय !!)

रामदास का ते सांगायला नकोच. त्यांनी लिहलेल काही वाचलं की आपण लिहायच्या फंदात नाही पडलं पाहिजे याची जाणीव होते. :)
कथांमधे जव्हेरगंज,अभ्या.., कवितांमध्ये शिव कन्या,विशालदा,चुकलामाकला, 3ए,गणेशा, पैजारबुवा, मिसळलेला काव्यप्रेमी.
खुसखुशीत लेखनात स्नेहांकिता, संदीप चांदणे.

सुबोध खरे's picture

1 Nov 2015 - 9:46 pm | सुबोध खरे

माझ्या आवडत्या आयडी म्हणजे
फुलथ्रोटल जीनियस, हितेश, दादा दरेकर, आणी आणि ….
जशा आठवतील तशा टंकतो.
यांच्या शिवाय बरेचसे धागे शंभरी सुद्धा गाठू शकले नसते आणी
यांच्या हातभाराशिवाय अनेक धागे वाचनमात्र सुद्धा झाले नसते.
काय एक एक विद्वत्तापूर्ण विवेचन असे . गेले ते दिन गेले

मांत्रिक's picture

1 Nov 2015 - 10:17 pm | मांत्रिक

दादूस आणि माई हल्ली का दिसत नाहीत? काय झालंय नक्की?

सालस's picture

1 Nov 2015 - 10:07 pm | सालस

माझे आवडते आय डी
नम्र भाषा- प्रगो
नम्र स्वभाव-अभ्या
अत्यंत विश्वासू वाटणारे -प्रचेतस किसन शिंदे ही संपादक द्वयी
उगाच सुंदर वाटणार्‍या -गौरी लेले
अत्यंत प्रेमळ -प्यारे
विडंबन जात शृंगार यांच्या लेखणीला काही वर्ज्य नाहीच अशा स्त्री नाही.. महान स्त्री -कोमल
आवड्ते आय डी नाव-अग्यावेताळ
सगळ्यात आवडता डु आयडी -संपादक मंडळ! हु एल्स ! दहा बारा जण तरी वापरत असतील एक आय डी ;)
कृ ह घे.

मांत्रिक's picture

1 Nov 2015 - 10:23 pm | मांत्रिक

नम्र भाषा- प्रगो
अत्यंत प्रेमळ -प्यारे
हं!!! धन्यवाद!!! हे तर आम्हां सातारकरांचं वैशिष्ट्य आहे. समजलं नसेल तर जाऊ देत!!!

बॅटमॅन's picture

1 Nov 2015 - 11:41 pm | बॅटमॅन

अत्यंत प्रेमळ -प्यारे हं!!! धन्यवाद!!!

ओक्के प्यारेकाका आपलं मांत्रिककाका!

अरे मी मांत्रिक नाही. गैरसमज झालेला दिसतो. माझा मिपावर फ़क्त प्यारे१ हा एकच आयडी आहे. pacificready वाचनमात्र होण्यासाठी घेतला होता दीड वर्षापूर्वी. तो वापरत नाही. भगवान कसम.

का एवढे मनाला लावून घेतोयस बाबा.
डूआयडी असणं म्हणजे एवढा काही गंभीर अपराध नाही. चालू दे. त्यासाठी भगवानाला कशाला ओढतोस.

प्यारे१'s picture

2 Nov 2015 - 12:14 am | प्यारे१

अरे पण मांत्रिक माझा आयडी नसताना मी का स्वीकारु? कोण आहे मला माहिती नाही पण अतिशय हुशार व्यक्ति आहे. मांत्रिक इज मांत्रिक.
परवा खफ वर गाण्यातली नावं मी पहिल्यांदा वाचली. ज्या गाण्याचे रागाचे रेफरंसेस त्यांनी दिले ते माझ्यासाठी अतिशय नवीन आहेत. अनेक इंग्रजी आणि हिन्दुस्तानी नावं सुद्धा पहिल्यांदा वाचली. he must get his due credit boss....

बॅटमॅन's picture

2 Nov 2015 - 12:16 am | बॅटमॅन

हो ना. त्यातही डुआयडी जर कंपूतला असला तर त्याला डुआयडी म्हणणे हेच पाप होते जणू.

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 1:29 am | टवाळ कार्टा

अग्दी अग्दी

प्यारे१'s picture

1 Nov 2015 - 10:52 pm | प्यारे१

अगो बाई सालस का?
तू ये तुला फुकट देईन.

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2015 - 10:54 pm | टवाळ कार्टा

नक्की काय विकता आपण? =))

प्यारे१'s picture

1 Nov 2015 - 11:15 pm | प्यारे१

सगळं आहे. ;)

अभ्या..'s picture

1 Nov 2015 - 11:48 pm | अभ्या..

नम्र स्वभाव-अभ्या

हाय मै मर जावा.
हि नम्रता कायम माझ्यासोबत राहो.
आणि खरे तरः ____त हाय बे कोण आसंल ती आसंल. काय खाऊ घालून दमलीय का?

बॅटमॅन's picture

2 Nov 2015 - 12:59 am | बॅटमॅन

अय्या!!!!

एक महिने वय असूनपण बरेच स्वभाव पकडलेत तुम्ही! तुमची बोलवती धनीण कोण बरे? =))

गौरी लेले's picture

9 Nov 2015 - 6:51 pm | गौरी लेले

उगाच सुंदर वाटणार्‍या -गौरी लेले

इश्श , काहीही हां सालस !

आठवण ठेवल्याबद्दल धन्यवाद :)

बर्‍याच दिवसांनी दिसलात लेलीण का़कू, कशा आहात?

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2015 - 10:30 pm | टवाळ कार्टा

कहर....दंगा होणार इथे =))

मांत्रिक's picture

1 Nov 2015 - 10:32 pm | मांत्रिक

मग शंका है का?

मला काही बोल्लात का ?

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2015 - 10:35 pm | टवाळ कार्टा

मला सग्ळेच आयडी आवडतात

प्यारे१'s picture

2 Nov 2015 - 12:26 am | प्यारे१

+११११११
हे बरीक मान्य करावंच लागेल. सगळे आयडी मिपा चालवतात. जगन्नाथाचा गाड़ा आहे हा प्रत्येकाचा हात लागला आहे.

जीवन भाऊ त्यांच्या जीवनविषयक कथांमुळे

आदूबाळ's picture

1 Nov 2015 - 10:42 pm | आदूबाळ

आज्ञाधारक आणि हुशार! लोल! धन्यवाद!

आवडणारे आयडी - व्यक्तिमत्त्व या अर्थाने - अनेक आहेत. पण चित्रविचित्र आयडीनामं हा एक लय आवडणारा प्रकार आहे.

केशवसुमार हा आयडी वाचून फिस्कन् हसलो होतो. सूड वाचून काहीतरी भयानक चित्र उभं राहिलं होतं, पण प्रत्यक्षातला माणूस एकदम माइल्ड आहे. परवा नाना स्कॉच आयडी वाचून अशीच करमणूक झाली.

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2015 - 10:53 pm | टवाळ कार्टा

सूड आणि माईल्ड??? =))

सूड's picture

2 Nov 2015 - 3:28 pm | सूड

सूड आणि माईल्ड??? =))

टवाळ लोकांसमोर हातात छडी घेऊनच उभं राहावं लागतं!!

टका बिका कॅजॅस्पा सोन्याबापू...... आणि नाखु त्यांच्या प्रतिसादातील शब्दामुळे। eg गृहसंसारी नाखु(स ) ..... अत्रुप्त-स्मायलीरत्न...... पिलीयन रायडर... नाना स्काॅच... पाटील हो ... बोका ए आझम...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Nov 2015 - 12:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझे आवडते आयडी: ह्यांच्या क्रमाचा कमीजास्तं मैत्री वगैरेशी कुठलाही संबंध नाही.

१. कॅप्टन जॅक स्पॅरो: स्वतःच्या आयडीवर लैचं जास्तं प्रेम असल्याने.

२. टवाळ कार्टा: हे कार्ट प्रत्यक्षात भेटल्यानंतर भयानकचं शांत आणि सज्जन असल्याचं लक्षात आलं.

३. मोदकः भयानक उत्साही माणुस आहे हा. सायकलिंग काय, ट्रिपा काय, बुलेटप्रेम काय.

४. कपिलमुनी: मिपावर जी काही जेन्युईन लोकं भेटली त्यातला हा एक नग. खादाडी हा म्युचुअल गुण असल्याने आणि बोंबलत भटकणे हा छंद असल्याने खुप चांगला मित्रं झाला.

५. बॅट्या: हा मणुष्य मणुष्य णसुन पुस्तकं खाणारा राक्षस आहे. असंख्य रेफरन्सेस ह्याच्याकडे असे तयार असतात. शिवाय ह्याचा आयडी आमच्या आवडत्या बॅटम्यानाशी संबंधित असल्याने मैत्री फ्याक्टर चांगला जमलायं.

६. वल्ली: मिपावर मैत्री झालेल्या लोकांपैकी अजुन एक जेन्युइन व्यक्ती. सुरुवातीला मला वल्लीबुवा भयानक आखडु आणि खडुस वाटायचे पण ते तसे नाहित हे परिचय वाढत गेल्यावर लक्षात आलं. ह्यांचा आणि माझा म्युच्युअल बकरा म्हणुन बुवा असल्याने आमचं चांगलं जमतं. ते लेण्याबिण्यांमधलं काही शष्प कळत नसल्याने त्याला पास.

७.नाखुनःह्यांच्यासमहेचंहोचुकुन्कधीदोन्शब्दांमधेअंतर्सोडतीलतर्शपथ्काकाभयानकविनोदीआहेत्समोरच्याचीखेचणंआणिशालजोडीतलेदेणंहेह्यांचेआणिमाझेम्युचुअलछंदअसल्यानेहेभयानकवडतातशिवायामच्याशीअमच्यावयाएवढंलहानहोउनसुद्धाबोलतात.

८. अत्रुप्तः हे आमचे मित्र जेवढं छान लिहितात तेवढेचं एक व्यक्ती म्हणुनही चांगले आहेत. ह्यांना कितीही त्रास दिला तरी फार फार तर दोन बुक्क्या हाणुन गप्पं बसतील आणि लगेचं पुढचे उपद्व्याप करायला पुढे सरकतील.

९. सूडः हा मनुष्य लिहायच्या बाबतीत भयानक आळशी आहे. पण जेव्हा कधी लिहितो ना तेव्हा "कट्यार काळजात घुसली" चा फिल येतो. शिवाय ह्यांनी रिसेंटली बाजीरावाचे ट्रेलर बघुन कानामधे भिकबाळी घातलेली असल्याने अमचा अवडता अयडीआहे.

१०. डॉक्टर सुबोध खरे: Doctors Job is assumed to be limited well within room ह्या माझ्या समजाला तडा घालवणारे पहिले गृहस्थ. नौदलामधे डॉक्टर असल्याने ह्यांचे अनुभव वाचणं हि मेजवानी असते. एक-दोनदा त्यांच्याशी फोनवर बोलणंही झालयं. युनिकॉर्नप्रेमी असल्याने आमच्या दोघांमधे किमान एक मुद्दा तरी कॉमन निघाला शेवटी =))

११. एक्काकाका उर्फ डॉ. सुहास म्हात्रे: अतिशय डाउन टु अर्थ व्यक्तीमत्व. कधीही बोलत असतील तेव्हा अगदी अगत्याने बोलतील. त्यांचे प्रवासाचे लेखं भयानक आवडतात. लेफ्ट हँड मर्सिडिझ स्वप्न्सुंदरी जब्बर आहे त्यांची :)

१२. सोन्याबापु: सॅल्युट सोल्जर...बॉस!! माझ्याकडे शब्द नाहित. एकदा भेटायचं आहे बस्सं.

१३. रंगाण्णा बिंगफोडे जोशी: =)) माणुस किती नम्र असावा (का नसावा) ह्याचं उत्तम उदाहरण. मिपावर वाचनमात्रं होतो तेव्हापासुन रंगाण्णांनी कोणाशीही वाद घातल्याचं आठवतं नाही. एक मिपासंवादांमधलं माझं आणि त्यांची एक असहमती सोडली तर बाकी कसलाही वाद नाहित. मिपावरची विकीपेडिया असा पुरस्कार ह्यांना द्यावा अशी मागणी मी येथे करतो.

१४. यशोधरा/ हिमोधरा: ह्या तै सखाराम गटण्याच्या सख्ख्या तै आहेत म्हणे. दिलं पुस्तकं की खा...दिलं पुस्तकं की खा. वाचन, वेगवेगळ्या पुस्तकांची मेलामेली वगैरे उद्योगांमुळे अवडता आयडी आहे. शिवाय प्रवास आणि ट्रेक्स हा हि म्युचुअल लैक्स चा भाग असल्याने सुद्धा असावं. हौडी यशोतै?

१५. स्रुजा: सेम अ‍ॅज यशोधरा...पुस्तक आवड आणि इन जनरल खफ वरती गडबडगंमत करण्यामधे आघाडीवर असल्याने अवडता आयडी असु शकेल. शिवाय व्यनिय गप्पांमधुन अधुन मधुन प्रोफेशनल डिस्कशनही होत असतं तिच्याशी. =))

१४. सानिकास्वप्निल आणि स्वातीदिनेश: त्यांच्या रेसिपीज, पदार्थ सजवायची पद्धत, पदार्थाचं कलात्मक सादरीकरणं कसं करावं ह्याचं उत्तम उदाहरण (चुकुन उदरभरण लिहिणार होतो :P)

१५. रेवाक्का: चिंग्याच्या गोष्टी भयानक आवडतात हो तुमच्या. अगदी मी लहानपणी माझ्या आयशीला कसं पिडत असेन ह्याचं अगदी चित्रं डोळ्यासमोर उभं रहातं तुमच्याशी गप्पा मारताना. बाकी आय सपोर्ट चिंग्या बरं का. =))

१६. आदूबाळः झॅक माणुस है ह्यो. कंदी बी गफ्फा हाणा चार नव्या गोष्टी शिकिवणार बगा तुमान्सी. मागे मला काही रेफरन्सेस दिलेले त्याचा मला भरपुर फायदा झालेला.

१७. अद्द्या: हे आमचे कानडीअप्पा त्यांच्या लेखांमुळे आणि इतर गप्पांमुळे आमचे मित्रं बनलेत.

१८. पैसातै: :) :) :) :)!!! ह्यांच्या घरी झेंडु बाम, अम्रुतांजन, अ‍ॅस्परिन वगैरेंचा खप वाढवायला मी कारणीभुत ठरलो आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे =)). ह्यांना संपादन असु द्या, वादग्रस्तं मुद्द्यांवर घातलेल्या वादावर त्यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर घातलेला वाद असु द्या. त्या कायमपणे समजुतदार भुमिका घेत आलेल्या आहेत. बाकी त्यांनी काजुबिजुची पाकिटं वगैरे आणायचं प्रॉमिस दिलेलं आहे बरं का रे होतकरु पुणेकरांनो. तेवढं चहाचं बघा. =))

बाकी मामलेदार, खटपट्या, पेठकर काका, मंद्या, प्यारे१, वेल्लाभट, सूड्क्या, सगा ह्या आयडींचा नामोल्लेख एका वेगळ्या प्रतिसादामधुन देइनचं. आत्ता एवढचं सांगतो. थँक्स मित्रांनो...यु आर बेस्ट अ‍ॅट व्हॉट यु डु.
!!!!

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 1:30 am | टवाळ कार्टा

+११११११११११

+१०००००० अक्ख्या प्रतिसादाशी सहमत..

भिकबाळीची झायरात केल्याने पुढल्या भेटीत एक मस्तानी (शीतपेय) देण्यात येईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Nov 2015 - 7:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपण नुसती अश्वासनं देता. प्रतेक्ष भेटीमधे चुना आणि बायप्रोडक्ट्स फासुन मिस्टर इंडिया होता असा आण्भव आहे.