तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
1 Nov 2015 - 6:50 pm

आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले….
त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच…
उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते…

सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो.

ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल…

चला तर मग !

मुक्तकज्योतिषविचार

प्रतिक्रिया

नाखु's picture

3 Nov 2015 - 8:34 am | नाखु

"साप गळ्यात घालून फोटो ज काढायला तू काही मिलींदांचा सोमण सोमण थोडीच आहेस तू तर त्यांचा मित्र-मदतनीस आहेस, तू नको लक्ष्य देऊ या पोरांकडे!,पुण्यात आलास की येताना तेव्ह्ढे घोरपडीचे तेल आण यांच्यासाठी (घुडगे दुखतात ना फार),

मामो ऑफ....

अरेच्चा मला जॅक डॅनियल कोण हा संदर्भ माहीत नव्हता. मला मिलिंद सोमण सारखाच प्रकार वाटला होता. आता कळले की हा मिपा आयडी आहे. त्यांचे धागेही पाहिले. कृपया गैरसमज नकोत.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2015 - 1:47 pm | बिपिन कार्यकर्ते

भौ जॅक डॅनियल्स हा मिपावरचा अत्यंत मस्त आयडी आहे!

जॅक डनियल्स's picture

4 Nov 2015 - 5:34 am | जॅक डनियल्स

मिलिंद सोमण ने गळ्यात किंग कोब्रा घातला असता तरी लोकांनी लक्ष दिले नसते …त्या बाईपाई ती स्टोरी फ़ेमॉस झाली.
घोरपड काय मिपाकरांसाठी कमोडो सरड्याचे पण तेल आणून घरपोच पोहचवले जाईल.

बाब्बौ लय प्रेम उतू चाललय इथं. :)
आता धागा उघडला की कभी खुशी कभी ग़मचं हैप्पीवाला म्यूजिक वाजल अशी सोय करा संपादक दादा ताई लोकहो :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Nov 2015 - 10:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अतापासुन रारा आयडीपण आमच्या लाडक्या आयड्यांमधे सामिल करण्यात आलेला आहे =))

तसा मी तुमचा फॅन ऐलवणी विचारपुस धाग्यापासुनचं आहे.

रातराणी's picture

2 Nov 2015 - 11:04 pm | रातराणी

ती मी नव्हेच कॅप्टन!
आतापर्यंत दोन आयडी म्हणले रारा आयडी आवडतो म्हणून. आता मेरे दो अनमोल रतन वाजवा! :)

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 1:11 am | टवाळ कार्टा

अश्लिल अश्लिल =))

अच्र्त कुठला. चांगला धागा आहे हा. स्वच्छ मनाने वाच रे.

प्यारे१'s picture

3 Nov 2015 - 2:24 am | प्यारे१

मनास स्वच्छ करण्यासाठी ......
निरमा निरमा वॉशिंग पावडर निरमा.

रातराणी's picture

3 Nov 2015 - 2:41 am | रातराणी

कराचे का २००?

प्यारे१'s picture

3 Nov 2015 - 2:53 am | प्यारे१

होणारेत आपसुक.
कल्जि क्रू न्ये.

रातराणी's picture

3 Nov 2015 - 3:02 am | रातराणी

ब्रोबरं आहे तुमचं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Nov 2015 - 7:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरारारारारारारा!! त्या स्वप्नांच्या राणी नै का? बरं जौंदे तुम्हाला डिफेव्हरेट करुन टाकतो लगेचं =))

रातराणी's picture

4 Nov 2015 - 5:53 am | रातराणी

दुत्त दुत्त :/

का हो मडमवा? कोनो तकलीफ है का?

ना प्यारेजी कौनो तकलीफ नाही. वो राणी अलग ये राणी अलग! जो हम नही वो है केहनेकी गलती ना होगी हमसे :)

प्यारे१'s picture

3 Nov 2015 - 12:14 am | प्यारे१

हम वो बारे में नहीं पूछे.
किसी का मुँह खोलकर कोई तारीफ़ करे तो कुछ दिक्कत हो जायगा का? गाना बजाना का सुझाव दिए आप?

हाणतो बघ आता लै हिंदी फाडायला तर.
म्हैते आम्हाला तुला अवधी, भोजपुरी, व्रज, हरयानवी, पंजाबी, खडी, बिहारी सगळ्या हिंद्या येतेत म्हणून.
बास अता.

प्यारे१'s picture

3 Nov 2015 - 12:23 am | प्यारे१

ऱ्हायलं.
त्या सोन्याबापुला आन हिकडं त्यानं सवय लावल्या मला.

बाप्पूसाहेब आर्मीमन हायेत. आमचे फेवरेट आयडी आहेत. त्यांना काय बोलायचं काम नै. त्यांची हिंदीच असते रोज वापरात.
तू तुझी सातारी बोल.

प्यारे१'s picture

3 Nov 2015 - 12:31 am | प्यारे१

काढ़ गायछाप.

अभ्या..'s picture

3 Nov 2015 - 12:33 am | अभ्या..

घे डब्बल.

रातराणी's picture

3 Nov 2015 - 12:31 am | रातराणी

आदत से मजबूर प्यारेअंकल :) खुशी के मारे हम गाना गुणगुना बैठे तो आपको लगा हमको इन लोगोके मिलीभगत अच्छी ना लागी.
आयडी एक डूआयडी अनेक
मिलजुलकर सब आये मिपापर
हम सभी एक है!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Nov 2015 - 12:49 am | अत्रुप्त आत्मा

इथे जेंव्हा नविन नविन आलेलो,तेंव्हा मला पहिल्यांदा भुरळ घातली ती इथल्या काहि विशिष्ट नावं धारण केलेल्या आय.डींनीच..म्हणूनच तर मी इथे रमलो..लहानपणी चांदोबा-मधे जसा रमलेलो होतो तसा! त्यामुळे आवडते आय.डी म्हणजे प्राथमिकरित्या माझ्यासाठी ते आय.डींच्या नावांच्यापासूनच सुरु होतात. पैकी काहि :-

पं.गा.,काळा पहाड्,विसोबा खेचर,पाषाणभेद,टारझन,नर्मदेतला गोटा,परिकथेतील राजकुमार.. :- ही सारी नावं वाचताच असं वाटायचं की मिपा हे एक वेगळच जग आहे. रोजच्या धावपळी दगदगीपासून काहि अंतरावर दूर नेणारं..कधी पिकनिक स्पॉट वाटणारं..कधी शांत देवालयासारखं भासणारं.

नंतर नंतर यांच्यासह सगळ्यांचे प्रतिसाद वाचू लागल्यावर काहिसं वेगळेपणही जाणवू लागलं..आणि मग खराखुरा चॉइस तयार झाला.. मग ह्यातले काहि लोक्स आवडते मधे आणि काहि अर्थातच नावडते मधे सिलेक्ट झाले.

आवडते आय डी(पहिल्या टोळीतले... ;) आपलं ते हे ..फळीतले :D :- परिकथेतील राजकुमार.. ,विसोबा खेचर, घासूगुर्जी,आमचा पां डुब्बा =)) उर्फ स्पा, नंतर आद्य खाद्य साहित्तिक गंपू पैलवान उर्फ गणपा..,यक्कू, Nile

ता ;) आवडतेच परंतू काहि दुत्त दुत्त आय.डी. :- सगळ्यात पहिली बालिका उर्फ जेनी,मग जिल्बुचा उर्फ पियुषा, मग पैसा तै, मग दुत्त दुत्त आ..नंन्दिता, खाटुकम्यान उर्फ बॅटमॅन, दू दू चिमण,आणि सगळ्यात शेवटी (हो! शेवटीच.. =)) दू दू आगोबा,उर्फ वल्ली उर्फ प्रचेतस उर्फ ..... (म्हैत्ये सगळ्यांना =)) असो! )

आणि जसे वाटले..तसेच भेटल्यानंतर निघालेले..असे :- चौकटराजा,प्रभाकर पेठकर

गुर्जी मला तुमच्या आवडत्या/नावडत्या आयडीत स्थाण देणार ना?

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 1:10 am | टवाळ कार्टा

असा अर्धवट प्रश्न विचारु नये =))

तू त्यांच्या कुठल्याच यादीत नाही टक्या! गप राव तू :)

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 1:19 am | टवाळ कार्टा

आपणांस मुद्दा समजलेला नाही

सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात आलेली आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Nov 2015 - 8:48 am | अत्रुप्त आत्मा

@सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात आलेली आहे>>> =))

नाखु's picture

3 Nov 2015 - 9:39 am | नाखु

घेतली आहे..म्हणतो, नोंंद हो !!!

नाखु सराफ

रातराणी's picture

3 Nov 2015 - 1:22 am | रातराणी

हा तुमचा भ्रम आहे.

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 1:24 am | टवाळ कार्टा

चालूदे तुम्चे निरर्थक अत्मरंजंन

रातराणी's picture

3 Nov 2015 - 1:29 am | रातराणी

ल्ल्ललल्लऊऊउ
रुसू नको टका झोपेतून उठून प्रतिसाद दिलाय त्यांनी. विसरले असतील तुला. चालायचंचं.

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 1:38 am | टवाळ कार्टा

=))

सर्पमित्र ज्याक डॅन्यल्स यांनाही यादीत णमूद करणे आवश्यमेव आहे. मोबल्यात स्नेक गेम खेळणार्‍या आमची, हे लेख वाचून पार झोपच उडाली म्हटले तरी चालेल. _/\_

आणि सतिश व सुरेश्चन्द्रा जोशि यांचेही नाव घेतल्याशिवय हि यदि पुर्न होने अशक्य अहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Nov 2015 - 7:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कित्ती कित्ती असूद्दलेकण ते ब्याट्या!!

यावरून बालगंधर्व आठवला. :-)

जॅक डनियल्स's picture

4 Nov 2015 - 5:35 am | जॅक डनियल्स

धन्यवाद !

श्रीरंग_जोशी's picture

3 Nov 2015 - 4:14 am | श्रीरंग_जोशी

एखाद्या लेखकाचे लेखन आवडणे अन आयडी आवडणे यात माझ्या मते फरक आहे. आयडी आवडण्यासाठी त्या आयडीचे इतर मिपाकरांबरोबरचे वर्तन पटायला हवे.

मला पटणारे वर्तन म्हणजे इतरांना प्रोत्साहन देत राहणे, सुधारणा सुचवत राहणे अन मुख्य म्हणजे हातचं न राखता दिलखुलासपणे दाद देणे. तसेच लेख असो वा प्रतिसाद शब्दच्छल किंवा बुद्धिभ्रम न करता आशयावर लक्ष केंद्रीत करणे.

वर सर्वांनी लिहिलेले बहुतांश आयडींचे वर्तन याप्रमाणे कमी अधिक प्रमाणात होतच असते.

वर ज्यांचा उल्लेख आला आहे त्यांच्यामध्ये माझ्यातर्फे थोडीशी भर

अजूनही आहेत लक्षात येतील तसे लिहिनच.

नितिन थत्ते - वर्षानुवर्षे मिपावर राजकीय चर्चांमध्ये प्रवाहाविरोधातले मुद्दे वस्तुनिष्ठपणे मांडत राहण्यामध्ये यांचा हात कुणी धरू शकणार नाही. त्यांच्याबद्दल सरसकटीकरण करून शेरेबाजी होत राहूनही त्यांनी फारसा त्रागा केल्याचे आढळले नाही.

श्रीरंग_जोशी's picture

3 Nov 2015 - 4:17 am | श्रीरंग_जोशी

वर काही जणांनी माझेही नाव आवडता आयडी म्हणून लिहिले आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
मला चांगलेच ठाऊक आहे की माझी तेवढी योग्यता नाही. आपणा सर्वांच्या मनाच्या मोठेपणाला सलाम.

योगी९००'s picture

3 Nov 2015 - 9:06 am | योगी९००

मोजींचे नाव कोणीच घेतले नाही...हा माझा सगळ्यात आवडता आयडी.....

मोजींवरूनच इमोजी आले असावे का?

बाकी पुढील सर्व आयडी माझे अत्यंत नावडते आहेत..
बॅटमन
गवि
क्लिंटन्(गॅरी)
मदनबाण
प्रास
डॉ. खरे
डॉ. म्हात्रे
परा
बिका
नाखू
प्रा.डॉ बिरूटे
भडकमकर मास्तर (हे कोठे आहेत सध्या?)
मोदक
प्रभाकर पेठकर
विजूभाऊ
निनाद
पैसा
मांत्रिक
चित्रगुप्त
रामदास
रेवती
कॅप्टन जॅक स्पॅरो
स्न्हेहांकिता
टका
आणखी बरेच जण....

मांत्रिक's picture

3 Nov 2015 - 9:10 am | मांत्रिक

बाकी पुढील सर्व आयडी माझे अत्यंत नावडते आहेत नावडते? का हो? ;)

योगी९००'s picture

3 Nov 2015 - 12:08 pm | योगी९००

नावडते? का हो? ;)

मोजीं सारखा इमोजी आयडी असताना दुसरे आयडी मला आवडतील असे वाटलेच कसे काय तुम्हाला..?

मांत्रिक's picture

3 Nov 2015 - 1:18 pm | मांत्रिक

खरं आहे, मो़जी ते मोजीच!!!
बाकी हल्ली स्टाईल बदलली त्यांनी लिखाणाची फार. :(

झाले २०० एकदाचे. जेपीना बोलवा. सत्कार झालाच पायजे.

जेपीना बोलवा. सत्कार झालाच पायजे
हम्म..आता राहिलो सत्कारापुरता.. =))

मांत्रिक's picture

3 Nov 2015 - 10:12 am | मांत्रिक

अजिबात नाही. जेपी एक चांगला वाचक आहे हे मला माहित आहे.

रातराणी's picture

3 Nov 2015 - 1:09 pm | रातराणी

अस्स नाय जेपीदादा केवढा हातभार लावलाय मी २०० करण्यात. केवळ तुमची सत्काराची कमेंट वाचायला मिळावी म्हणून! ( याला म्हणतात बेगानी शादीमें अब्दुल्ला दीवाना :) )

रारा, तुमची एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे हल्ली! :-)

रातराणी's picture

4 Nov 2015 - 5:56 am | रातराणी

लागला बघा ब्रेक. ही आजची दूसरी आणि शेवटची कमेंट :( हापिसात बघवत नाही हो माझं सुख कुणाला. दुत्त दुत्त आहे सगळे.

बिन्नी's picture

3 Nov 2015 - 9:19 am | बिन्नी

हा धागा कॉमेडीचे राव !
हे सगळे समजून घ्यायला किती दिवस लागतील!

छोटा डॉन's picture

3 Nov 2015 - 9:39 am | छोटा डॉन

उत्तम धागा.
ह्या निमित्ताने मिपावरच्या आयडींची ओळख होत आहे, एकेक प्रतिसाद सावकाशीने वाचुन आयडींचे अंतरंग समजुन घेण्याचा प्रयत्न करत आहे.
मी नविन आहे इथे, संभाळुन घ्या.

- छोटा डॉन

प्रीत-मोहर's picture

3 Nov 2015 - 9:41 am | प्रीत-मोहर

=)) =)) =))

उदाहरणार्थ एखाद दोन मेगाबाईटी खरडींची अपेक्षा होती डानराव.

विवेक मोडक's picture

3 Nov 2015 - 1:17 pm | विवेक मोडक

ते मेगाबायटी खरडींचे दिवस वेगळे होते.

विशाल कुलकर्णी's picture

3 Nov 2015 - 1:27 pm | विशाल कुलकर्णी

हायल्ला, हे म्हतारं पण हाये काय अजून? (म्हंजी मिपावर बर्का, उगाच गैरसमज व्हायचे)
दंडवत स्वीकारा हो विमो ....

नंदन's picture

3 Nov 2015 - 1:37 pm | नंदन

>>> मी नविन आहे इथे, संभाळुन घ्या.
खुद्द डाण्रावांचा प्रतिसाद वाचून ड्वाले पाणाव्ले आणि अंमळ हळवा झालो! ;)

छोटा डॉन's picture

3 Nov 2015 - 1:41 pm | छोटा डॉन

ह्यात कोटी नसल्याने हा 'फाऊल*' धरण्यात आला आहे.
कळावे.

* फाऊल - मैदानाबाहेर जाण्याची गरज नाही, बोलुन सेटल करता येईल, बोलणे मेगाबाईटी असावे असेही नाही.

- छोटा डॉन

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2015 - 1:51 pm | बिपिन कार्यकर्ते

नंदन भला मनुक्ष आहे. त्याने तुमच्यासारकह्या हि आणि ही इसमालाही राव असे म्हणले आहे. त्यामुळे कोटी नसली तरी उपरोध आहे व त्यामुळेच कोट नसली तरी चालेल असे वाटते.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2015 - 1:52 pm | बिपिन कार्यकर्ते

नंदूशेट, बर्‍याच काळानंतर अं ह झालात. सवय मोडली असेल. त्रास वैग्रे नाही ना झाला?

नंदूशेट, बर्‍याच काळानंतर अं ह झालात. सवय मोडली असेल. त्रास वैग्रे नाही ना झाला?

हाहाहा, नै! मातीला अंकुर फुटायला त्रास कसला? ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2015 - 2:47 pm | बिपिन कार्यकर्ते

अश्लील अश्लील अश्लील (सौ. टिंग्या)

प्रीत-मोहर's picture

3 Nov 2015 - 4:35 pm | प्रीत-मोहर

(सौ. टिंग्या)

त्या कधी आल्या इकडे?

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2015 - 11:02 pm | बिपिन कार्यकर्ते

ओ काकू.... तुम्ही तरी जुन्या आहात ना? सौ. माहित नाही!!!???

प्रीत-मोहर's picture

3 Nov 2015 - 11:26 pm | प्रीत-मोहर

:p

आपापली शिंगं मोडुन वासरांत रमणारे गाईज् पाहुन माैज वाटली. :p

प्रीत-मोहर's picture

3 Nov 2015 - 4:34 pm | प्रीत-मोहर

दुष्ट!!!!

बाळ सप्रे's picture

3 Nov 2015 - 10:24 am | बाळ सप्रे

जसजसे प्रतिसाद येतायत तसे आवडते आयडीज आणखी आठवतायत .. :-)
विजुभाऊ सर्पमित्र जॅक डॅनियल इस्पिक एक्का
परीचा बाबा तुमचा अभिषेक
आणि या सगळ्यांची आठवण काढायचे निमित्त दिल्याबद्दल धागाकर्ते मापं

नंदन's picture

3 Nov 2015 - 2:04 pm | नंदन

ज्यांचे लेखन-प्रतिसाद आवडतात, अशा बहुसंख्य आयडींची नावं वरील प्रतिसादांत आलीच आहेत. त्याशिवाय प्रदीप, राही, एकलव्य, बेसनलाडू, लिखाळ, चित्रा या मोजकंच, पण नेमकं आणि संदर्भपूर्ण लेखन करणार्‍या सदस्यांचा येथे उल्लेख करावासा वाटतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Nov 2015 - 1:29 pm | बिपिन कार्यकर्ते

श्रावणचं नाव कोणी घेतलं की नाही माहित नाही. माझ्या प्रतिसादात मी रोचक नावं असणार्‍या आयडींचाच उल्लेख करत होतो. पण श्रावणचं नाव आल्याशिवाय हा धागा संपू नये म्हणून हा प्रतिसाद.

स्पा's picture

3 Nov 2015 - 2:08 pm | स्पा

कुठले आयडी आवडतात हे सांगणे मला तरी लई अवघड आहे
गेल्या पाच वर्षात अनेक जणांनी लागेल तेंव्हा मदत केलेली आहे .

लगेच आठवणारे म्हणजे सूड, द बुव्या (ह.),परा, बिका,किसन शिंदे , , अप्पा जोगळेकर, टारु, पिव्डी , अपर्णा अक्षय, लीमौजेट, पैसा ताय,वल्ली, ब्याटम्यान , सुबोध खरे , सुहास झेले ,मृत्युंजय , प्यारे १ , जोशिले , अभ्या (सोलपुरत जौन पण मस्त टांग दिलेला ), क्लिंटन, ... तूर्तास इतके आठवतायेत , बाकी अजून आठवले कि सांगेनच :)

बॅटमॅन's picture

3 Nov 2015 - 5:39 pm | बॅटमॅन

ऑ: अच्चं जालं तल =)) =)) =))

रच्याकने हा आमचा अजूनेक अवडता अयडी.

तरीही स्पा अणि बुव्या यांच्यातील गहिरे नाते केवळ अवर्णनीयच.

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 5:55 pm | टवाळ कार्टा

बास्स्स...नैतर नात्याला गहिरा अर्थ देशील =))

अहो मूळ नातेच इतके गहिरे आहे की आमची लेखणी अजून काय गहिरे करणार? हे म्हणजे राजा रविवर्मा किंवा पिकासोचे चित्र फोटोशॉप वापरून सुधारतो म्हणण्यापैकी आहे.

बुस्पा ही कंसेप्टच गहरी आहे. सिंक्रोनायझेशन चा उत्तुंग नमूना. बुवानी मिसळ मागवली तर स्पा लिम्बु पिळल. स्पावड्या ला ठसका लागला तर बुवा भांडे तोंडाला लावतील.

स्पावड्या ला ठसका लागला तर बुवा भांडे तोंडाला लावतील.

आणि अचानक भांडे तोंडाला लावले तर लाजून भांडे लपवतील.

मगः

१. मी असा हसेन- "हीह्ही, हीह्ही, हीह्ही!!!!"

२. मी असे विचारेन- "(तोंडाला लावून) भांडे का लपविता???????????????????????????"

प्रचेतस's picture

3 Nov 2015 - 6:28 pm | प्रचेतस

मेलो रे.

बुवाचा लाजून भांडे लपविणारा चेहरा डोळ्यांसमोर आला ना.

दू दू दू =)) =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2015 - 8:51 am | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/leisures-and-sports/leisures-and-sports-024.gif
http://freesmileyface.net/smiley/battle/fight-2.gif

सूड's picture

3 Nov 2015 - 6:19 pm | सूड

+१

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 6:45 pm | टवाळ कार्टा

बुस्पा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2015 - 8:54 am | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/battle/gunfight8.gif

स्पावड्याला टांग देणे या एकाच कामगिरीसाठी माझे नाव मिपावर सुवर्णाक्षरात कोरण्यात यावे ही नम्र विनंती.
बाकी कोरणार मीच त्यामुळे सोने फ़क्त द्यावे.

तुझं नाव कोरायला फार तर मी शेंगदाणा चटणी देईन, बघ त्यानं जमतंय तर!! =))

अभ्या..'s picture

3 Nov 2015 - 11:50 pm | अभ्या..

ती हितंबी मिळती किलोने.
बघतो माझं मी कसं कोरायचं ते.

इरसाल's picture

3 Nov 2015 - 2:57 pm | इरसाल

image/jpeg;base64,/9j/4AAQSkZJRgABAQAAAQABAAD/2wCEAAkGBxQSEBQUEhQWFRQXFRUYGRQVFBYUGBYXFxgYFhUXGxcYHiggGBolHRYVITMiJSkrLi4uFx8zRDMsNygtLisBCgoKDg0OGxAQGiwkICYtLC8sLSwsLCwsLCwsLCwsLC4sLCwsLCwsMCwsLCwtMCwtLCwsLSwsLDQsLDQsLCwsLP/AABEIAPIA0AMBEQACEQEDEQH/xAAcAAEAAgMBAQEAAAAAAAAAAAAAAQYEBQcDAgj/xABJEAACAQMCAwQGBwUFAw0AAAABAgADBBESIQUxQQYTUWEHIjJxgZEUI0JSYnKhM4KxssFDU5KToiREsxUWFyU0NVRjc4Ph8PH/xAAbAQEAAgMBAQAAAAAAAAAAAAAAAgQBAwUGB//EADgRAQACAQIDBQgAAwgDAQAAAAABAgMEERIhMQVBUXGhEzJhgZGx0fAiweEUI0JSYnKSohUkQwb/2gAMAwEAAhEDEQA/AO38oH1AQEBAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQECIEwIECYCAgICAgICAgICAgICAgICAgICAgIEGBIgIEEQAgTAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQIJgAIEwEBAgiABgTAQEBAQEBAQEBAQEBAQIJgUftj6RadrU+jWqG6vMgd0h9WmT99hnf8A390he8VjeUq0m3RTuN3/E8ar/iS2WQCLe2QGoB4kjdR+ZxNN881+HrP0j8t9MMW+PpHqqdPiVfWTQ4letjq1Y9fFMsMc+Rle2qyV6x+/WW6NLSe/8AfovXo07cXdS9FldstcNTZ0rBQjrpydLhdiCOvPlzzLeHL7Su+yrmxezttu62BNzUmAgICAgQRAAwJgICAgICAgICAgYt/wASo0F1VqtOkv3qjqg+bEQJsb+lXTXRqLUXJGpGDDI5jI6+UDIZsQOecY7QXHEne24Y5p0Bla1+NtuTJQb5jvOm+M4zNF8208NOc+kebdTFvHFflHrPk1L/AEfhCl+H01rOFIqu4Jx41Fb2mP3lzuMHOVwacamlZ4Ynit493l+/VcnTXtXimOGvh3+c/vyUPidZriuK1XTUYuXZXDFHJG2RTdDgbYwek1UzcNptaN907Yt6xFZ22a/iXFFXUQEB66KaU0UDkAqADI5AfEknJO2KXzW3sjNq4q8nWvQ72Oe3Rry5Ui4rrhUbnSpHBwfB2wCR0AUbbidGlYrG0Oda02neXTJJEgICAgICBBEADAmAgICAgICBou0Hau3tCEdmes3sW9Je8rP7kHIfibA85iZiOorrcTvrosKjixprjNKkVqXBRvZZqpBRAcEeoCRpb1siK2i0bwxbes7M3hPCLekxZaYNXbVVcmrVYdCatQlyDv18ZlHc4mj29Q3dupZgB39Bf94pDqB/fIMlT1GVPMFTMS0XHe0I4l9Wjslh9tlBWpd/gUHBSj0JONX5faoanV1pPBE8+/8Ap8fs6Gm0lrxxzHl/X4fd5V78mmKVNRSoqMCkmw/eP2jOTkz2vHDHKPD8+LrY9PWk8U858fxHc1VxeonM5PgN/wD8mmIlv2UCpa161y1taU3q75VKQ1aVb7LNyQA5G5G2J28GL2lYvMc/3m42oyRitNInl+8nVfR/6KxQZLi+0vWU5p0R61Okejsft1B06L5nBl6tYrChe82l1OSQICAgICAgICBBgBAmAgICBgcW4xQtk1V6q0wdhk7sfBVG7HyAMxMxEbynjx3yW4aRMz4RzUK/7Y3PEGNPh2aFtqKteun1lTGzLb0mHw1tgDJ5Eb675YqRjnfaWdwDgdK1VtAJqP8AtKzsalWofF6h3Y/IeUpXyTaebdFYhlcRptgVKYzUTJC7fWKfbp7+OAQejBemQZ4snBb4I5KcUPO2uwyo1M5BGpOmV+1TOeRHQHlj8JnRU920o3AIBB2O4mNjdzjtLRNhdEIube5JemBk93X51aYA6NnWAOpcTma7Szf+Osc+91+z9VFY4Lzy7i14JxG6/Z0GRSPbrn6On+Eg1T/gx5zRj7OvPvcvVZydo46+5G/p+/RZeF+ixOd5Xet/5VLNCl7iQTUb/EB5ToYtLjx9I383Py63Lk5b7R8F64Xwyjb0xToUkpIPsU1Cj37cz5yyqMzEBAQEBAQEBAQEBAiBIgICBpO2HHxY2rVtOt8qlNM411HOEGeg6k+AMxa0VjeWzDitlvGOvWXI+J8QU6y5FzdVBipcuMpTH91bpyVRkjV7yOeZz8uXi/enl+Xt+zuz7YdpieGvh32+N58PCvSO/v3tPZnC2lAt9qmhAGSWyNSjxOx2UbCa5nnyeY1U757z/qt95bdapJ3OnHQHf4kcvcPnI7q+z7pXWo+qMr97kvw+97xt5zI1VdO6r6RtTrsWU/3dwMsfg4Bb8wb78vaXJvHDKpnpt/FDKo34TJb1VbO33ag9tfPO7Dx9Y9RLeyurPam5e5QlCUemQ9EjmlRDqRveSMe4zPDyItzdO7KcZW8sqFyu3eUwSPusNnX4MGHwmtvbYQJgICAgICAgICAgICAgRAmAgUL0z2Rfhwqrk/R6yVWA+4Q1Jz8BUz8JDJXirMLehzxg1FMk9Inn5dJcnpPkTlPo9Z3ha+B8UdaCKLevUZVCBqSa9SrsvrkgU1AAyOec+87OHi5x/N43V6DJTPaOW2885tWOU+cxPpz7kVHrMc3t1Ss6Wdra3xcVj+cjIyfFgMeGZOIrXr+Z+kdGcXZtre7Wb/8AWn/K0RNvlEebb8DuAK9RKVy9zQFKk6vUxrR3LhkJwCdlBweUhk4f8KtqdPOLaLV4Z57xvv5THWdp5+PRsr9Uq0mViQDjDDmrA6kdc9QwBHukKWmtomFO0RMbSqN9evVPr4U5CsByWquNNTHg22M9Cg8Z26TFqxMOZaOGdmBc8UYtToW6Grd1fVSiN9J5Mzn7KKQdz4eGSMzOxWm7sHYjs+bCxpW5fWy6md+QZ3Yu+B0XLED3TU3t/AQEBAQEBAQEBAQEBAQED55QPqB43lstWm9OooZHUqynkysMMPkYH504vwd+H3T2tTJVfWpuf7SiT6je9fYb3CUNTj2tvHe9n2Hrva4vZ2nnX7d306fR8tKr0G7zJxDHVcOAUxQtwWO7/WH4gYH4sLpB+yDk85mec7PDa7Ue3z2v3d3lHT8/NnLcs+5zjoP6+cztEKM81X4ldVLu5+jcOTvq7DFR/wCyo4O1Rn5ZGT8lG5GJ0NNxVrO6tliJl1XsN2JpcPQtnvbmp+1uG9pz1Vfup5eU3orZAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQPkQPqBVPSH2VF/beoALillqLHkSfbpMfuuBjyOk9JG9YtG0t+m1FtPljJXu9Y74cOoVCMqwIIyMMMMCDpZSOjKQQR5Tl2rNZ2l9C0+euWkWrPKY5fvjHR6B8EEdCD48vLrIt1ucbNxZ3lFkctWqUKiIWRW01qLlAMUxqGtfIZbG5zNtZrPVwNX2ZXiiYrExM85jeJj47c67R38o+Ed6eBcOvuN4FIG1seVS4O71cbMqfe3yNthg5P2Zbx6etec83k7335Q7L2X7NW9hQFG2p6V5sx3d2+87dT+g6YEsNbdQEBAQEBAQEBAQEBAQEBAQEBAGBAgSYHGvTFwMUa6XVMYFbOsD+9QD1v3l5+aZ6ypqqdLfJ6TsHUT/Fhnu/ij0ifry9VHOcgAEltlUAksTyCgbsfdKcVmZ2h6bLmx468d5iIdF7HejQvirxBcLsVts7nqDVI6fg+fVZew4OHnbq8l2n2xOeJxYeVe+e+fxHr9nVKVIKoVQFUAAAAAKBsAANgPKWXCegEBAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQEDjnpguzW4hQtgcBaaH9+s5BPwFNPmZU1U9Iej7ArFYyZZ7tvTeZ+0LR6PuHUhdcQcKNVK4FujYBK06VNMKvhkk5xzwJuxRERO3i5evyXvavFP+GJ/5c5XubVAgICAgICAgICAgICAgICAgIGNdXehkGM620+6BkwEDyua4RCzch4fKB8VrsJT7w5xgHHv5D9YHspyIHCfTPQejxIVWytOrSp6Kh9nXT1K6Z6HBU/GVtRjm20w7vY+rpii1L2iN9pjfp4St3oORza3FVs6atfKMc+vpRVdwTzBbIz+EzZhrNabSo9p5qZtRNqdOUfSHSptUHheXQprqO/TA8TA94CAgYt/d90obGcsBzxzgZUBAQEBAQEBAQEBApnaDtVQt6zpcV2RwRpo0xqYqc4Y42UHHNiBI2tFerbhwZM07Y43fNn2lo3Ro00eotQMD9amhipI9dTurAeRMVvW3RPPpM2Dacldt/KfsybztNa2lVFqXtLDZDK9ZCy8sHGc9ZJXYvDvSFZfWDvnq4qMB3VC4rDAxtlEIHOBqq/b+3ag4P0piHPK2rYI9UYOV255xAi77bW4pnP004C7Na1dPTrjzgZf/SBbJTYK9zqyBl7S49XxwQhEA/bPhxKg3tKoCwD06/qj36agGnECw2V5Tu3YUa6mmgXT3DqwOeuVOMQPSvV1VnWpVang+qAdII8c/L5wHF6X1CnWWwefRs8j8IHrfBqVMAVGJeoBqO5AI6fKBl29PugddQtkjBc4+A3gYgRq1WoC7KqEABTjx3PygefE6bLQAdtWKgwfLfGfOBkW1Q1n15IpqcAA41HxPl5QNnAQEBAQEBAQEDT9reNCzs6tc4yowoPIuxCpn8OSCfIGYtO0btmHFOW8Ujv9PGflHNwpLipUZnZGrOxZyzFGNQgFizAjbYZ0jYAY6YnPtM2tvu9tgpXDg4IptHz35+Pxn0fXFOMvc0relcFKy066uSVTZScleWCmOmJOuWZtG6hqezsVMN5pG29fHw5xPmtdLhVOm1PuqSIAzFtCqgOy4JC4zylreXkN32EKM31esFywIK7Z6HMD4p0T3TIcAsWPPOM6SM48xA+Kmp6TK+FbAAOoEHGDnbly/WBj3SmpTIcKHyOoIOP4Z3mR5d6c70kQDmcqSPyaRtMm7WXPDaTVHdqaZJQhxgPkDc619cHON8gzO5vLZ8M4te0nCUKjVgThaFzUWvTfoFV3+tpE9PWIyeg5ZhKLOhdlL0X3DEqICrFmyh+w6MQyZ6jIO/nCSzWjOy/WKFbPLOc+f8YGDdUqtVgrIFUPnVqB2HlAk06lKo7ImtXIPPBB/wDpgRd29WpSAYAtrBwOi77E9YHqbZqdXVTGUbZkGBj8QgbGAgICAgICAgIHNPTpXItban0a51N5rTpVGwfIzVm9yXR7Krxaqsee/lEbz9Yjbylznhd21GolRcakOdxkHoQR1BBIPvnNidp3h7vJijLjnHbpMfvq2F1wmyuDro1TZuTk0aqs9HPM6aijKr+YCbotSefT98XLyYNVSs1mOOJ767b8/GszHP8A2z5thcDiLEmkLequdjbVqVQ/J2znyxN3tJnp+f36OFTsvT05Zptv5TX71mP+zW1qfEft0b0e6kmPgaY/rIzbJ+xP4XcWj7MnlMT871/lZiVaVx9tbwe9bj+gkJvlW66Hsrur62n7TLEeoR9quPe1f+pkfaZPH7N//juz4jf2fpZFIV3YLS70sxwM1HBJPgMk/MCSjJbx/m1ZOzNLtNowxER32max/OfSHtZ2t3UyKbh8EjIq023U4ONW5GRjIm2Pazzj12cvNg7Lx2mmSNpjrtN5mPrG34nk39h2Yv39oDHgUIb4FtCH/FN9OP8AxbOPqa6P/wCPHv8AHbb8rPw7sgaeXqVNGkE6l3cADfTkaaTYzv65HQqdxsU1n9GloKXCbQKNIan3mN9u9Jq4Od8+vCazwEBAQEBAQEBAQEBAQEDj3p3ufrrOn0FO4cjoSTSQH4et8zK+p9z5ux2JH/sTP+mfvCi02nPe4hmPQdQC6Mob2SysobzBI3+EbSUyUtvFZiduu0xO3n4PgqDzEw2RMwgIPAfKNjilOjPSDeYehONh8T/T3TKEc+ctxZWpSyaqu1W5qpaUDjOnvCFqvjzyE+LeM34qbx58vl3uR2jquG8xHTHXjn426Uj6zv8ATwdYtLdaVNKaDCIqqo8FUYE6DwczMzvL1xDDSdt7g0+G3bL7Roui/mqDu1HzYQQtdjbClSRByRFX4KAB/CZTZMBAQEBAQEBAQEBAQEBA4p6dx/tlr4G3rD5OhMr6j3fm6/Ys/wB/b/bP3hR7O9CsrYyVIbBGR6pBwR1BO2POUYrO/J6+ctOCeKdo2nefCNuq7cV4teNR/wBrcVKdTmmhQaL4JplSAMEEe47jrmW81L1pvad/5OB2XqNJl1HBhpwWj3Z3meKI6xbzjn8PlzrcovWED7O23X+HlMo9fJ8GYSXtrfTd8Gth/Z0aldx5ujtn394q/OX8ddrVjwj7vFdoZpthzZP8+SK/KkTP4XDjF+KFB6h+yNgerEhVHuyRLLzzS2nAaLU9dwHe4qrqaquvvKer2dDJvTI6YxuD0GAGFxq6erYWdOvkV6txw+nVTBU6+9R6h0nGAe7c+EyzHV02EkQJgICAgICAgICAgICAgc09N3BXq29C4pqzmg7hwoJIpVlAZsDmAy0z5DJ8Zry14qTEL3Z2eMOora3TpPz/AHdzjsbwvvX70/s6bbZGNdReQwdwq89+Zx4GQ0+GYnisudrdpVvX2GGd4758fhHwW3jyZtqvkur/AAEN/Sb80b458nK7OyTj1eK0f5o+kztPo0XA7UVSFGGquypSpnOnJBZqrkfYRQdupPgCDysdeKdu97/XamcGPjn3YjeZ7/CKx8Znv7o+PTYdqezTWSLUD94CdJOnTpY8sDzO3xljJp4rXir3ON2f25k1Gf2WWsRE9Nt+vhO89/y5q+rZGRKb1ETvzfSJqIXxIHzOJmGJnaN3RS4btI6j+xsWH+qhj/iGdKnv2+UPn2r3jR4Ynvm9vWI/k2Pbu3apZMqY1alIzsMr6wBPQEgD4zdEbuVM7K+vaC5uqKW6WtWhcsq06lwzIKdIcnqUyjFnYesVGAATnOBu2Z3hZOJ06K1banUILmpqtjULMVrUlzjWckhlzz8/EYwzC3WVwKiBhtnOQeakbMp8wQRMpMiB88oH1AQEBAQEBAQEBAQECDA4f2fGmvxFPucRucDyLAj+slVqv1bHia5oVR403/lMzMbxsxS01tFo7pa70bAfTUz/AHVTHv8AVH8C05um9+fL8Pb/AP6K0/2WIjpxR9rL124s+9saqjnj1fJuSn5kS/Eb8njaZJx3i9esTE/RxexuQRtyIDD3Nv8A1nItEx1fTMGWLxvHSeceU82wt6gDqfBlPyIMxHVuvHFWYjwld+yF0LjjXEK67r3aKD5PUbHzWkpnRwzE72jvl4LtalsXssNutaRv5zMzK916IdSrDIPOb3HayztFpXOlc4NInfc51b/pMzO8MRG0tX2goCrxjhVM+zpv2P8AkqgPkRqJzMJwsvDKxp1irfaOhug71VyreWumAfgohmG/hkgRygTAQEBAQEBAQEBAQEDizL3fGeKUsYzUo1R595TBY/Mj5yVWvIzb79lU/I/8pkmtWuwtcrdUKmdhVCN/7oqIv64+U5WDld7/ALbrFtHaPCd4+UxE+ky69xVNVGoPwk/Lf+k6MdXhJ6Pz1xBDRuKifcqOAPwk60/0OvylDPXa8vadlanj01J74/h+nT0lP00nYbec0cLr+3meUcnUfRBZEWta5IwbirlfOlSHdofn3h+M6WOvDSIeC7R1P9o1N8kdN+XlHKF9k1JrOINpuKDdDqQ/Hl/GSjojPVrrv/v3h/lb3h/4YmGyG97Q0SHDLjU64XP97SPe0f4Pn8oglurS4FSmjr7LqrD3MAR/GGXtAgiAECYCAgICAgICAgICByDtlS7rtCG5LcWY/eemxH8qiZr1Qv0Tft9VU/I/8pk2pUezDkUbkjnTpLXHjmjcUm2+DGcnHynfyn1h9D7QjixxHjNq/WttvWIdv1Bh5EfoZ0ngHGO3nZ+p33eU0LkDRURd29UnRUA67HB8tPnIZsXHG8dXR7M18aa01v7s+k+LUcB7KXF3UVCjUqZ9p3GlivUKvMbfaM1YtPMTvZd13a9bUnHg359Znw+DvNjbJRpJSpgKiKqqB0CjAlhwXvqhlrO0KZo5HNWB/p/WZqjZpFvA/G+GN963ux+8ApI/SYmNk6yuPaVsLSPUVlx8VcH9CYZt0e3Zz/stMeAKj3KxVf0AhmGygIEEQAgTAQEBAQEBAQECCYHLPTVR7urw276U7hqTH8NYDf8A0t85mGJjeGDfH6qp+R/5TNiurPYL1jcp96yuh/oV/wCk4+PrMfCX0PVz/d0t4ZK/vq6r2auS9lbMeZoUiffoGZ045xu8JlrwXtXwmYe15w+nVOWBz4g4JkonZrYdzxK0ssCo60y3TDO5GcZIUEhc9eUja8R70t2DTZc0zGKs228I3bWhcK6qyMGVgCGU5BB3BBHMTLVPLlL71Rsw+KyhlKnkQR84HNKtZ6PG+GHSXIa6TQGC5ZqWjm2wGSCeuBsCcCZszRaE7SVrqmr1KITQx0Ijs3e1XGhEGoDlqZSeRLZ20mYjxZtO/KF84TadzQp0s5KIqlvvED1m+JyfjMJsuAgIEEQAMCYCAgICAgIEEwAECn+lvhP0ng9yoGWRRVXHPNI6zjz0hh8YHPuCXv0i0pvnd6eD+bGlv1Bm2OcK9uUqTwS/al6ynSWplT7qlPQw9+/zE41omtp2+L6Np5rlxVm3fw2+fKfu7L2Kqf8AV9t/6Y/icfpOnj92PKHg9XMTqMkx/mn7y29xchEZ25KpY+4DJ/hJq7ivCe1bLdC9qAO5YuVY7BWUhU8lVWwPdOdktacu/g9vo9PijQeymduKImZ+k/0dR7Dhl4db6uZVnwdsCo7VFGOmFYDHlL9K7ViHjtTkjJmveOk2mfrO7e65JpNcCh9v1FG84bdbAC8poxOwAfZmz+Vf9MxKVVl7P8KZuIivRJa0XvGDEsFNSoCGWmvJxklu8Gw9kZyZhKIX+EiAgICBBEADAmAgICAgQTAAQJgfFWmGUqRkEEEeIOxED899naJtLm8sH50KzFM9abeyfkUP78nSWnJHewLvs5V79tAGhmJDlhhQxzgrzJBJwBsQBuJWvpZtfffk7um7ari08UmszeOUeHw38nWuDW3c29KmNgiAY8JZcHffnL3uqetGQ8mUj5jEMOdcO9GYFUd7UY0VIIpnTggclLDdh78fGQ9lSJ4u9btr9RbH7Kbfw/vzdJU4AA2A2A8pNVTqgNUCoelWkW4ZUdfapVKVVT4FXC5+TGYlKnV1Thd2tahSqr7NSmjjHgyhh/GRbWXAQEBAQECCIAGBMBAQECBAmAgIHF/TTw82l9a8SQHQ31FfHxKt5krq/wAtZmJ2lG0bw9uF1wKqNsQTz5jfYH9QZtlXWvVIpGqA1QGqA1QGqBoO3XE6FGxriu2BUpuiqPadmUgBR13xv0mJSr1Wz0XJUXg9mKwIcUhsc5CZPd5zy9TTINy1QEBAQEBAQIIgAYEwECBAmAgICBq+0vAqV9a1LasDoqDGRsykHKuvmCAYHDeIdl+LcK9UUvptsvsvTBLKOgKjLpt5Mo8ZKLTCE0iWdw70qWpAWulWk42bKhhkbHkdWfhM8SHs5bmh6QOHPyuVH5kqL+rLiN4Y4JZH/PSw/wDFUvn/APEbwcMsWv6QuHL/ALwCfw06rfqFxG8HBLVXfpWtFOKdOtVPTCqoJ8Nzn9JjiSjHJQ4nxu/2tLH6Mh272sMYz9oGoACPcrRxJRjhZeyvokVKwueJ1jeXGxCHJpKeY9rd8HOBsPKRT22dQAgTAQEBAQEBAQIMCYEQJgICAgICBGIGFxHg9vcDFehSrDwq00qfzAwNFc+jjhb+1ZUR+UFP5CIGEPRJwjOfoY/z7gj5d5iBsLf0ecMTlZUD+ZNf8+cwN3w/hNvQGKFClSHhSppT58/ZAgZmIEwGYDMCMwJgMwEBAQEBAiBMBAQEBAgwK/X4rdBqoW3zoOFOGxUy4VcHoMMpJ/C0D6s+L3DVEDW5Wmy6yxV8orDUqkffAVgR0LJtvA824ndesy0sgaxpNNxqwfUIJ38Pf4dYH29/cNrZV0rhdIahUJ2uHR2IyD+yCNpxk6siBLcUuc1MUcBGqAEpUOoLnTjT7WfVOR4kY23CDxK4GT3ZOXp4XunyFaiGIJBIz3mpc8l652gfVpxKuayh6RFMjBIp1Bob1vV3HrdBrHq7D72wef8Ayvc7Yo7lSf2dUYbS50kn7pVF/FryORgbHh1zVbWKqAY9khSob1nX7R5+oG9zj3kPq+rstSgAG0s5DgU2fbQ2CWAOgatO5xzgaqjeXOpchypracd0UJQ9zgnNP1QNVbnpzp2Y8yGRTuLhe5BR3V6j6mKoCibimGUacbYYnG2COogYNO/utKgK5cBzlqRCOQgIH7NSvrkgA45E6jsCGTRu6+un+0ZC7DLUijMv1frMO7wgGanPRkAYzAsMBAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQEBAQEBA//2Q==

सूड's picture

3 Nov 2015 - 3:12 pm | सूड

tamrel

सूड's picture

3 Nov 2015 - 3:13 pm | सूड

एक नाही पुरणार!!