तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
1 Nov 2015 - 6:50 pm

आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले….
त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच…
उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते…

सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो.

ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल…

चला तर मग !

मुक्तकज्योतिषविचार

प्रतिक्रिया

रुस्तम's picture

10 Nov 2015 - 6:32 pm | रुस्तम

+1111111111

बॅटमॅन's picture

2 Nov 2015 - 12:07 am | बॅटमॅन

लय मिपाकर आवडतात.

वल्ली ऊर्फ प्रचेतस: फॉर ऑब्व्हिअस रीझन्स. लेणी-मंदिरे-शिल्पकला-रामायण-महाभारत-सातवाहन अशा नानाविध विषयांचा निव्वळ एन्सायक्लोपीडिया. माहितीचा महासागर आणि नवीन माहिती मिळवण्यास परमोत्सुक.

अत्रुप्तः हे ग्रुहस्थ वडण्याचेही कारण ब्व्हियस आहे. यांच्या पाचक कविता, रोचक स्मायल्या आणि खोचक इडंबने आणि प्रांजळपणा याकरिता.

पण सध्या यांचेवर दोन कारणांसाठी नाराज होत हेही सांगणे अवश्यमेव आहे. ती कारणे खालीलप्रमाणे:

१. यांनी त्यांच्या चाहत्यांच्या जगात म्हांला अजूण स्थाण दिलेले नाही.
२. "मी माझा तर माझा कुणाचा" या कवी सूर्यकांत खोकले लिखित प्रसिद्ध काव्यसंग्रहाची प्रत अजूनही म्हांला दिलेली नाही.

सतिश गावडे: सायकॉलॉजिकल अ‍ॅनॅलिसिस केल्यामुळे बहुतेक गोष्टींकडे पाहण्याचा एक ब्यालन्स्ड दृष्टिकोन असतो त्याकरिता.

सूड & प्रगो: तर्कशुद्ध मुद्दा नेटाने आणि कुणाची भीडभाड न बाळगता मांडणे याकरिता.

अभ्या: कलाकार तर आहेच, शिवाय व्यक्तिचित्रणाची हातोटीही विलक्षण आहे. एवढे सगळे असूनही पाय जमिनीवरच आहेत.

पन्नास फक्तः एकदम दिलखुलास व्यक्तिमत्त्व, शिवाय पट्टीचे खाद्यरसिक.

डॉ. सुहास म्हात्रे: उच्चविद्याविभूषित आणि उच्चपदस्थ असूनही "मी माझे मला" चा पाढा न वाचणारे. आणि जबराट प्रवासवर्णने लिहिणारे. (हीच मेन ओळख होती अगोदर)

खास साहित्यिक चर्चेकरिता आदूबाळ आणि नंदनला तोड नाही. ( गटण्याचे आत्मवृत्त नेमके नंदननेच लिहावे हा योगायोग नक्कीच नाही. आदूबाळही तसा अंमळ छुपा रुस्तुम आहे.

चित्रगुप्त आणि चौराकाका हे दोघे तरुणांपेक्षाही तरुण आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो: यंत्रोपवीत या लेखमालेकरिता आणि बाकी अनुभवांकरिता मान गये.

अन्या दातारः अस्सल कोल्लापुरी.

सोन्याबापू: त्यांची ती सैनिकी प्रशिक्षणवाली लेखमाला वाचून त्यांचे एकदम गरगरा फिरणारे फ्यान झालेलो आहोत.

आतिवासः यांना बाकी काही न बोलता एकदा भेटून नमस्कार करावयाचा आहे फक्त. कारण ऑब्व्हियस आहे.

प्रभाकर पेठकरः आखाती प्रदेशात गेली अनेक वर्षे मोठ्या हिंमतीने हॉटेल चालवणार्‍या या उद्योजकास आपला कडक सलाम.

मालोजीरावः मुख्यतः ऐतिहासिक चर्चेसाठी.

साती आणि अजया यांच्या अनुभवकथनाचाही मोठा फॅन क्लब आहे इथे.

यशोधरा यांचे हिमालयाख्यान विशेष आवडते. जेव्हा मी बोटीवर होतो जेव्हा काश्मीरला गेलो तेव्हा त्याच्याशी पूर्णपणे रिलेट होता आले.

बाकी जुन्या जाणत्यांमध्ये गवि, रामदास, पिवळे डांबिसकाका, विसोबा खेचर, परा, टार्झन, बिका, शरदिनी, भडकमकर मास्तर, इ.इ. अनेक लोक्स आहेत.

नावे घेऊ तरी कितीजणांची? काही नजरेतून सुटून गेली असतील तरी माफ करणे. नंतर लक्षात येतील तसतशी लिहीनच.

नाखुनकाकांचे नाव विसरलो कसे!!!! देवामलामाफकर.

नाखुकाका म्हणजे विनोदप्रेमी आणि अतिशय खंबीर व्यक्तिमत्त्व. त्यांच्यापासून कुणालाही बरेच काही शिकण्याजोगे आहे.

बॅटमॅन's picture

2 Nov 2015 - 12:15 am | बॅटमॅन

अद्द्या, श्रीरंगपंत जोशी, क्लिंटन ऊर्फ ग्यारी ट्रूमन, टक्या यांची नावे विसरलो.

कवितानागेश's picture

2 Nov 2015 - 12:45 am | कवितानागेश

प्रत्यक्ष न भेटलेले लिहायचे आहेत का?
एक्काकाका म्हणजे डॉ. सुहास म्हात्रे.
आणि अतिवास ताई.
...... आणि माईसाहेब!! ;-)

एस's picture

2 Nov 2015 - 5:58 am | एस

बादवे, या निमित्ताने मिपावरच्या नावडत्या आयडींचीही यादी करा.

(स्वगत : नारायण, नारायण..! ;-) )

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Nov 2015 - 6:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

Hya comment chi kadhipasun vaat pahatoy :P

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 1:50 pm | टवाळ कार्टा

मी विडंबन पाडणार होतो यावर =))

उपाशी बोका's picture

2 Nov 2015 - 7:16 am | उपाशी बोका

संपादकांचं काम कशाला वाढवताय? :P

उपाशी बोका's picture

2 Nov 2015 - 7:14 am | उपाशी बोका

पटकन लक्षात येणारे माझे आवडते आयडी म्हणजे क्लिंटन, टारझन, परा, रामदास, नगरीनिरंजन, चतुरंग, रेवती, प्रभाकर पेठकर, गवि, मुवि, बॅटमन, इस्पिकचा एक्का, डॉ. सुबोध खरे - आवडण्याचे एकमेव कारण म्हणजे हे सर्वजण अतिशय प्रामाणिकपणे लिहितात आणि स्पष्टपणे लिहितात, असे मला वाटते. कंपूबाजीत भाग घेत नाहीत. कधीही कमरेखाली वार करत नाहीत. (टार्‍याला जरा माफ करू या बाबतीत) :) गणपाच्या रेसिपीज आवडतात. तात्यानी लिहिलेली व्यक्तीचित्रे छान असत. स्वॅप्स यांची फोटोग्राफीची मालिका आणि इस्पिकचा एक्का यांचे प्रवासवर्णन म्हणजे अप्रतिम.

मी व्यक्तिश: एकाही मिपाकराला भेटलेलो नाही आणि भेटायची शक्यताही नाही. त्यामुळे माझे मत केवळ आंतरजालाच्या वाचनावर आधारित आहे आणि त्यामुळे अनबायस्ड आहे, असे माझे मत आहे, (जे अर्थातच चुकीचेही असू शकेल.) :)

स्टुपिड's picture

2 Nov 2015 - 8:51 am | स्टुपिड

बिहारमधे निवडणुका चालु आहेत तशा इथेही पण वाटते! परवा अरुणकाका म्हणलेच मिपा म्हनजे जंगलराज आहे म्हणून. काय योगायोग आहे!!

धागाकर्ते कोनच्या पार्टीत म्हणायचे? आणा लाल रंगाचे डब्बे. लावा फ्लेक्श. रंगारी कैक मिळतील इथे. पळवा मतपेट्या. बंदुकी घेऊन फिरा लेकाहो. चालु दे धमाल!!

स्टुपिड's picture

2 Nov 2015 - 8:53 am | स्टुपिड

कंपूने कंपूसाठी काढलेला धागा! मजा है!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Nov 2015 - 8:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नावाच्या मागं अल्ट्रासुपरएलिट असा शब्दं लाउन घ्या. त्यासाठी पैसा किंवा प्रचेतस ह्यांना संपर्क करु शकता.ठँज्क्यु!!

दिनेश सायगल's picture

2 Nov 2015 - 8:58 am | दिनेश सायगल

मी इथे चांगले लिहायला वाचायला येतो. कधीतरी चांगले वाचायला मिळते. नाही असे नाही. तेव्हा जे चांगले लिहितात ते आयडी मला आवडतात. लिखाण सोडून इतर गोष्टीत मला इंटरेस्ट नाही. आणि इतर हजारों वाचकांनाही नसेल.

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 9:02 am | चांदणे संदीप

+1

येग्झॅटली!!

पीके's picture

2 Nov 2015 - 9:29 am | पीके

असेच म्हणतो,

भेटलेले टाळायचेत ना? भेटलेले बरेच आवडते आय डी निघतील!
जनसंपर्क प्रमुख- पैसाताई मुवि
किस्से - डाॅ खरे कंजूस काकांचे ट्रेकचे किस्से रेवाक्का!
माहिती - नूलकर
ज्यांचे नाव दिसताच लेख प्रतिसाद वाचला जातो असे मिपाभूषण विद्वान - बॅट्या वल्ली डाॅ म्हात्रे गॅरी ट्रुमन
मानस शास्त्रीय लिखाण - प्रगो ,त्यातले सगाचे प्रतिसाद जेटमाउलीचे प्रतिसाद
कथा - जव्हेरगंज चुकलामाकला आदूबाळ बहुगुणी
कविता- विशाल प्राची अश्विनी मिसळलेला काव्यप्रेमी
सूडची तारा दगडवाल्या बाईंना टेम्पुत बसवलेली कविता
अत्रुप्त गुर्जींचे कुटुंब ;)
बोका ए आझम त्याच्या भाषाप्रभुत्वासाठी
सानिकास्वप्निल स्वातीताई सुगरणी
मधुरा देशपांडे भटकंतीसाठी, रसग्रहण करावं तर मितानने
टका तर लाडकाच!!

खरं तर अनेक निघतील.मिपा जनांचा प्रवाह आहे.सदस्य येत असतात.रागावून रूसून जात असतात.भांडणं होतात. कंपू होतात.मिपाला शिव्या घातल्या जातात.पण तरी मिपा वाचलं जातंच.कधीतरी काहीतरी मस्त प्रतिसाद येतो,सुरेख लेख येतो.आपल्याला नेहमी राग येणारा आय डी लिहिणारा असतो.त्या क्षणी त्याचं कौतुक करताना आपण खरे मिपाकर असतो.एका कुटुंबातले.चालायचंच घर घर की कहानी म्हणून सोडून देणारे !!

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 1:51 pm | टवाळ कार्टा

टका तर लाडकाच!!

कसच्च कसच्च
आणि तो दमामि र्हैला की वर्च्या लिश्टात ;)

तरीच मला उचक्या लागतायत.

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 3:40 pm | टवाळ कार्टा

उग्गीच्च

नाखु's picture

2 Nov 2015 - 9:41 am | नाखु

वसुबारसे पूर्वी यावा ह्यात काही "जोगा योग " आहे काय?

आता मूळ मुद्दा : बर्याच आय डींच्या लिखाणातून प्रतिसादातून एक प्रतिमा (स्वभाव विषेश ) मनात तयार होतात कधी कधी प्रत्यक्ष भेटून त्यातील स्वभाव कंगोरे आणि प्रावीण्य विषय समजतात पुढे भेटी गाठींंनी सूर आण़खी जुळतात.

मी मिपावर लिहिते होण्याचा मान वल्लींकडेच जातो आणि निर्भीड लेखणासाठी बुवांचा कायम स्नेह-पाठींबा आहेच.

कप्तानाने आणी बॅटोबा ने सांगीतलेले तंततोत सहमत (फक्त माझ्याबद्दलचा भाग सोडून).

कप्तान , प्रगो यांचा जीवनाकडे पाहण्याचा तार्कीक आणि सुस्पष्ट दृष्टीकोण प्रचंड भारावून टाकतो. ( बरेचदा अगदी पन्नाशीत येईपर्यंत आपण हे काय (आणि का) करतो आणि पुढे काय करावचे तेच माहीत नसते.) त्याच्याबद्दल केवळ पंचवि शी- तीशीत फोक्स्ड असणे फार मोठी गोष्ट आहे.(प्राधीकरणात गेल्यावर कप्तानाला आणि पिंपरीत गेल्यावर वल्लीदांना न भेटता येणे झाले तर चुटपुट लागते इतका स्नेह त्यांनी दिला आहे)

बॅट्या खजिन्याचे भांडार आहे पण तो गूगल म्हणजे माहीतीचे सर्च इंजीन नसून कुठली माहीती कुठे वापरायची याचे तारतम्य असलेला कसलेला खेळाडू आहे आणि इतीहास धांडोळ्यासाठी "व्यासंग"(थोडा वेडच असलेला इसम आहे याची ) खात्री होती आणि ती प्रत्यक्ष भेटीत खरी ठरली.किंबहुना त्याचे भाषेवरचे प्रभुत्व "पांडीत्य" न राहता त्याने सगळ्यांना समजेल अश्या भाषेत (प्रतिसादातून) पोहोचवले आहेच, पण स्वतंत्र लिखाणाचा आळस असल्याने त्याचे धागे फारसे दिसत नाही.(इतीहासातील आम्हाला माहीत नसलेला भाग त्याने लेखमालेद्वारे लिहावा ही विनंती)

माझ्याही पेक्षा सम्रुद्ध अनुभव विश्व असलेले आणी खडतर परीस्थीतीशी सामना करून जिद्दीने भरारी यशस्वी व्यक्तीमत्वे मिपावर आहेत. त्या सर्व ज्ञात अज्ञात आयडींच्या लिखाणाचा,प्रतीसादांचा वैयक्तीक आयुष्यात नवी उमेद आणि मानसीक बळ देण्यास महत्वाचा भाग होता आणि असेलही.

कारण आय्डीची नावे काहीही असू देत, त्या नावामागची माणसे अस्सल आहेत आणि त्यांच्या (गुणदोषांसहीत) ती मिपाकर आहेत इतकेच माझ्यासाठी पुरेसे आहे.

काहींना आवर्जून भेटायचे आहे त्यात प्रा.डॉ,पैसा ताई आणि आदूबाळ ,सोन्या बापू,सुबोध खरे,बोका-ए-आझम,अभ्या..,जेपी, विशालदा,चुकलामाकला, पैजारबुवा ई प्रामुख्याने.

लिहिताना कुठे आणी कसं थांबाव हे रामदास काका,बोका-ए-आझम इ च्या लिखाणात कळते.

बाकी टक्या,खटपट्या आणि इरसाल यांच्याशीही भेटायचे आहेच.

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 1:51 pm | टवाळ कार्टा

माझे नाव ठळक लिश्टात नै....ज्जा तुमी माझे आवड्ते आयडी नै
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊउ

नाखु's picture

2 Nov 2015 - 2:16 pm | नाखु

फुरसतीत भेटायचेय म्हणून नाव अल्लग दिलेय. (बाकी चिमण आणि मुनीला सांगून फिल्डींग लावलीय)

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 3:12 pm | टवाळ कार्टा

खिक्क

कपिलमुनी's picture

2 Nov 2015 - 3:27 pm | कपिलमुनी

कारण सांगत बसू नकोस ! शनिवारी ये !
कुठ जायचा काय करायचा ते आल्यवर ठरवू

( आणि पाताळेश्वरला नेणार नाही, त्यामुळे नक्की ये )

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 3:37 pm | टवाळ कार्टा

रात्रीच्या मुक्कामाची सोय कुठे? तिकडे दुसरे घर (अथवा घरोबा ;)) अस्ते तर प्रश्नच नव्हता...या शन्वारीतरी नै जम्णार

आणि पाताळेश्वरला नेणार नाही, त्यामुळे नक्की ये

खी खी खी =)) =)) =))

नाखु's picture

2 Nov 2015 - 3:53 pm | नाखु

धमकी आहे का सूचना ? तेच नक्की कळेना !!!!

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 3:59 pm | टवाळ कार्टा

ग्यांगची मेंब्र काय बोल्तात त्ये ग्यांगच्या म्होरक्याला नै कळ्ळत? इतकेच कश्शे हो हे तुम्ही =))

नाखुन काका, तुम्च्यासाठी टी शर्ट घेतला होता की हो!

आता त्या टी चं काय क्रावं ब्रं? ;)

चित्रगुप्त's picture

2 Nov 2015 - 10:17 am | चित्रगुप्त

आधी मिपा-जनका वंदावे
तात्या अभंकरांसि स्मरावे
विसोबा खेचर नावे
'रोशनी' देती झमझम

पुढे स्तवन अनेकांचे
जुन्या-नव्या मिपावंतांचे
लेखकु-प्रतिसादकु-वाचकांचे
केले पाहिजे

बात्मन वल्ली चौरा
म्हणो नयेत ऐरा-गैरा
परि संक्षिंचा 'औरा'
भल्या-भल्यांसि हतप्रभ करी

एक्का पैसा आणि बोका
प्यारे प्रगो तोषविती लोका
ओक-नाडि र्‍हदय ठोका
चुकवी भल्या-भल्यांचा

राँर्बर्ट-जीवन नित्य स्मरावे
मोकलाया दिशेकडे दुरी जावे
कवि सुरेचचंद्रासि वंदावे
म्हणिजे बरें

आणखी असती बहुत
उल्लेखिले किंचित
हिमनगाचे टोक वर्ते दिसत
खालते पर्वत विशाळ

चिगो's picture

2 Nov 2015 - 1:21 pm | चिगो

चित्रगुप्त नावाच्या ह्या नवयुवकास आमचा साष्टांग नमस्कार..

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 1:52 pm | टवाळ कार्टा

खत्रा

बाळ सप्रे's picture

2 Nov 2015 - 11:12 am | बाळ सप्रे

बरेच आहेत..
लेखनप्रतिभेसाठी .. गवि रामदास विसोबाखेचर

संपन्न अनुभवविश्व शेअर करण्यासाठी.. पेठकरकाका डॉ सुबोध खरे अतिवास

विविधतापूर्ण पाककृतींसाठी .. सानिकास्वप्निल गणपा.. पुन्ह पेठकरकाका

विचारातील स्पष्टता, निर्भीडपणा, मोकळेपणा.. बॅटमॅन स्वॅप्स घासुगुर्जी आदिती बिका श्रीरंग जोशी सूड साती राही आनंदीगोपाळ पैसा मोदक विकास क्लिंटन उर्फ ट्रुमन

आणि हो.. वादग्रस्त संक्षीदेखिल..

बाळ सप्रे's picture

2 Nov 2015 - 11:18 am | बाळ सप्रे

काही आयडी राहून गेले.. वरचे काही प्रतिसाद वाचून आठवले.. आणखीही काही असतील..

अभ्या अत्रुप्त भडकमकरमास्तर पिडां तिमा परा

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2015 - 1:57 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद बाळसाहेब.

तिरशिंगरावांचे ऊर्फ तिमा यांचे नावही विसरलोच. त्यांच्या कमेंटी मस्त असतात.

पगला गजोधर's picture

2 Nov 2015 - 12:33 pm | पगला गजोधर

माझे आवडते आयड़ि (लेखन)

batman (प्रत्यक्ष भेटलोय) , पिलियन रायडर, डॉ म्हात्रे (इ. एक्का)(प्रत्यक्ष भेटलोय) , डॉ बिरुटे, अजया,
अतिवास, बोका ए आझम , गवि, पद्मावति
-----------------------------
माझे आवडते आयड़ि (प्रतिक्रिया)
batman, पिलियन रायडर, डॉ म्हात्रे (इ. एक्का), डॉ बिरुटे,
कन्फ़ुस्ड अकौ, स्वाप्स, सगा(प्रत्यक्ष भेटलोय) , कपिलमुनी

गुर्जी, दमामि (प्रत्यक्ष भेटायला आवडेल) , टका, वेल्लाभट, आदुबळ, अभ्या

पगला गजोधर's picture

2 Nov 2015 - 12:39 pm | पगला गजोधर

माहितगार

गजोधर. उत्तरपत्रिका जमा करा. वेळ संपलाय. पुरवणी मिळणार नाही आता. ;)
.
भय्या हळू अन हलके घ्यायचे बर्का.

प्यारे१'s picture

2 Nov 2015 - 12:48 pm | प्यारे१

एक एक नावाचं एक एक प्रतिसाद देणारे आमी.
काय म्हणणं हाय? काय पेश्शल धोरण आसलं तर कळवा.

@अभ्या (आम्हाला कमीतकमी २ -३ पुरवण्या लागायच्या, आजूबाजूचे खूप रागाने बघायचे … पण काय करणार … )

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Nov 2015 - 1:09 pm | बिपिन कार्यकर्ते

आयला! सध्या मिपावर येणे फारसे जमत नाहीये. दंगा वगैरे तर इतिहासजमा झालं आहे. लेखनही नाहीच सध्या फारसे. पण तरीही, माझे नाव आल्याचे वाचून अंमळ हळवा झालो आणि जुन्या स्मृती चाळवल्या. सर्वांना धन्यवाद _/\_

इथे बर्‍याच जुन्या आयडींचे उल्लेख आलेले आहेत. धागाकर्त्याला आयडीमागचा माणूस अपेक्षित आहे की आयडीचे नाव ते कळले नाही.

मिपावर आजवर अनेकानेक अप्रतिम आयडी नावे आलेली आहेत. सगळीच लक्षात नाहीत. पण मिपा गाजवणारे आणि आयडी अत्यंत कल्पक असणारे असे काही जे आहेत त्यात 'पिवळा डांबिस' ऊर्फ पिडांकाका हे एक अचाट व्यक्तिमत्त्व आहे. केवळ आयडीच नव्हे तर आयडीमागचा माणूसही माझा मित्र झाला याचा खरंच अभिमान वाटतो.

बाकी रोचक आयडीनावे म्हणाल तर आमचा धम्या ऊर्फ धमाल मुलगा आहे. भडकमकर मास्तर आहेत. बॅटमॅन आहे. आजानुकर्ण आहे. चतुरंग आहे. केसु ऊर्फ केशवसुमार आहे. ३_१४ विक्षिप्त अदिती आहे. ढब्बू पैसा आहे. टार्‍या ऊर्फ टारझन ऊर्फ कुबडा खवीस आहे. सर्किट हा असाच अजून एक. एके काळी मिसळभोक्ताने खळबळ उडवली होती. धम्मकलाडू हे एक प्रकरण होते (आहे. ;) ). चिंतातूर जंतू आहेच. परिकथेतील राजकुमार ऊर्फ़ परा हा एक पापग्रह आमच्या कुंडलीत आला तो मिपामुळेच. मकी ऊर्फ़ मस्त कलंदर आल्या आल्याच लोकप्रिय झाली. लीमाउजेट इथेच भेटली. स्पा ऊर्फ़ स्पावड्या इथे आला आणि सुधारला. सामान्यांपेक्षा दसपटीने बुद्धीमान असलेला अर्धवट ऊर्फ़ अर्ध्या इथे आहे. खर्‍या आयुष्यात पैसा नाही मिळाला पण पैसाताई इथे भेटली. ब्रिटिश असे नाव धारण केलेला पण अस्सल आगरी बाला इथे आहे. तसाच ब्रिटिश टिंग्याही आहे. बुद्धीमान नाना चेंगटने मिपा गाजवले. रमताराम इथेच भेटला. सखाराम गटणे ऊर्फ़ चार काड्यावाला विकास आता दिसत नाही. एक बाकरवडीही होती. टार्‍याशी पंगा घेतला आणि नाहीशी झाली. विनायक पाचलग ऊर्फ़ कोल्हापुरी दादा ऊर्फ़ कोदा अजूनही संपर्कात आहे, पण मिपावर नाही. उत्तम लेखन करणारी पुष्करिणी. कवितांचा वेडा मेघवेडा.

किती किती नावं घेऊ... विचित्र वाटणारे पण पटकन आठवतील असे अजूनही खूप आयडी आहेत.

(या निमित्ताने सर्व आयडींची लिस्ट कुठे मिळेल असा विचार मनात आला. :( )

बाकी, मिपावर डूआयडीची पिलावळ कधी सुरू झाली असे धाग्यात म्हणले आहे. याचे उत्तर सोपे आहे... ज्या दिवशी मिपा सुरू झाले त्याच दिवशी. रम्य होता तो काळ. पहिल्या पाच पन्नासातच ढीगभर डू आयडी असतील. ;) मिपावरील डुआयडी आणि त्यांचे चाळे यावर अनेकानेक प्रतिसाद लिहिता येतील. जरा विदा गोळा करावा लागेल.

डु आयडी वरून आठवले. निनादने गुंडोपंत हे एक व्यक्तिमत्त्व उभे केले होते आणि अनेक वर्षे अनेक संस्थळांवर यशस्वीरीत्या चालवलेही होते. शेवटी कंटाळा आला म्हणून त्यानेच जाहीर करून टाकले.

प्रीत-मोहर's picture

2 Nov 2015 - 3:59 pm | प्रीत-मोहर

बिकांच्या प्रतिसादाला मम म्हणते.
अनेक आयडी आवडले आणि त्यानंतर कट्ट्यांमधे भेटले, ओळखी झाल्या आणि आज हे सारे आमचे मित्रमंडळ आहे. मिपाने मला काय दिले असे कधी कुणी विचारले तर हे मिपावरच मित्रमंडळ असच उत्तर पहिल असेल.

वरच्या नावांमधे अ‍ॅडीशन्स
डॉन्या उर्फ छोटा डॉन फॉर बाकी शून्य आणि खूप सारा दंगा आणि मेगाबायटी खरडी!!!!

मितान , अर्धवट(अर्ध्या)- काव्यवाचन/प्रवासवर्णन्/बालकथा
मिसळलेला काव्यप्रेमी, विशाल(दा) कुल्कर्णी य दोघांच्या कवितांची मी पंखी आहे.
मिपाबल्लव गणपा, कोटीभास्कर नंदन, अजया, स्रुजा, पिरा, आणि सविता००१, भावना कल्लोळ, सानिकास्वप्नील, मृणालिनी, स्वाती दिनेश, स्वाती२ ताई आणि नॉट टु मेंशन बिका, विमो, श्रामो
असे अनेक आयडी माझे मित्र मैत्रिणी असल्याच भाग्य फक्त मिपामुळे लाभल. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Nov 2015 - 8:02 pm | बिपिन कार्यकर्ते

येस्स... हे सगळे आहेतच. नावं येऊ द्या एक एक.

डॉन्याच्या मेगाबायटी खरडी आणि प्रतिसाद. नंदन लिंकाळे. मितानचे अनुभव.

बाकी अर्ध्या बालकथा लिहित होता हे वाचून तो देखील सदेह स्वर्गाला जाईल गो! ;)

प्रीत-मोहर's picture

3 Nov 2015 - 8:07 am | प्रीत-मोहर

=))

अर्ध्याच बाकीबाब प्रेम आणि काव्यवाचन :) पण आता त्यालाही त्याच्या बालाला कथा सांगाव्या लागतातच की

प्रीत-मोहर's picture

3 Nov 2015 - 8:14 am | प्रीत-मोहर

पुपे, घाटपांडे काका, स्मिता.,(हीला हाळी घालावी लागतेय....) चैतन्य दिक्षीत, मनोबा, कितीतरी नाव आहेत. अपडेट करत राहित आठवतात तशी.
मनोबा आणि मी एकाच कुंप्णीत काम करत होतो. ४ महिने एकमेकांसमोर असुन ओळखलो नव्हतो =))
लपुन छपुन मिपा मिपा खेळयचो. एके दिवशी दिसल मिपा याच्या स्क्रीनवर. मग झाली ओळख.

प्रीत-मोहर's picture

3 Nov 2015 - 8:15 am | प्रीत-मोहर

आणि विठोबा!!!! हाव कुड आय फर्गेट द ग्रेट चेसुगु!!!!

चिंतामणी's picture

2 Nov 2015 - 11:41 pm | चिंतामणी

धागाकर्त्याला आयडीमागचा माणूस अपेक्षित आहे की आयडीचे नाव ते कळले नाही.

हे अगदी बरोबर लिहिले. मीसुद्धा कन्फ्युज्ड असल्याने लिहिले नाही.

प्रीत-मोहर's picture

3 Nov 2015 - 7:13 am | प्रीत-मोहर

माझा प्रतिसाद आयडी आणि माणुस दोन्ह्रीना चालतोय

चिगो's picture

2 Nov 2015 - 1:10 pm | चिगो

लैच रोचक विषय.. प्रचंड मोठी लिस्ट आहे.. आणि ही 'क्रमांकवार' लिस्ट नाहीये.. ;-)

१. धमाल मुलगा : नावाप्रमाणे धमाल करणारा आयडी.. दिलखुलास..
२. परीकथेतला राजकुमार : आणखी एक मस्त माणूस. जबरा लेखक आणि रोखठोक.
३. सुहास.. : हा खरोखरच 'इंट्रेस्टींग' आहे. थोडा तुसडा, पण दुनियादारी पाहीलेला वाटतो.
४. टारझन : एकच नंबर.. Pretty witty..
५. गवि : अष्टपैलू व्यक्तिमत्व जाणवतं त्यांच्या लिखाणातून.. दर्दी माणुस..
६. पैसाताई : अगदी ताई/ मावशी टायपातली मायाळू व्यक्ती वाटते.
७. रामदासकाका : क्या कहने.. अत्यंत 'गहीरं' व्यक्तिमत्व..
८. डॉ. सुहास म्हात्रे उर्फ इस्पिकचा एक्का : ह्यांच्या लिखाणातुन एक ज्ञानी आणि तरीही नम्र असा जीवनरसाने ओथंबून भरलेला माणूस नजरेसमोर येतो..
९. डॉ. सुबोध खरे : नावाप्रमाणेच सुबोध आणि खरे.. अत्यंत प्रामाणिक माणूस..
१०. बॅटमॅन : ह्याच्या भाषाप्रभुत्वाचे आम्ही फॅन आहोत..
११. वल्ली : ह्याच्याबरोबर भटकायची प्रचंड इच्छा आहे.
१२: बिका : अत्यंत जबाबदार आणि संतुलित माणूस..
१३. आतिवास : ह्यांच्या अष्टपैलुत्वाचे, स्थितप्रज्ञतेचे, संवेदनशीलतेचे आणि 'आन्जी'तून डोकावणार्‍या निरगसतेचे कौतूक करावे तित्के थोडे..
१४. आळश्यांचा राजा : प्रशासकीय अनुभवात बाप माणूस..
१५. विसोबा खेचर उर्फ तात्या : ह्यांचे अनुभवविश्व अत्यंत रोचक आणि लेखनशैली अत्यंत रोखठोक होती. कुठंसा तात्यांनु?

आळश्यांचा राजा आणि चिगो हे दोघे विसरलो. प्रशासकीय सेवेतल्या अनुभवांच्या कहाण्या एक नंबर जबराट असतात.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Nov 2015 - 1:16 pm | बिपिन कार्यकर्ते

आळश्यांचा राजाला कसा काय विसरलो राव मी! :(

अजूनही बरेच आयडी आहेत. सवडीने सविस्तर लिहितो.

१०० नंबरी सोन्याची माणसे. १००व्या प्रतिसादाला.
आमचे मालक नीलकांत अन प्रशांत.
खरे मित्र. जिवलग, अडीअडचणीला धावून येणारे, प्रत्येक गोष्ट समजून घेणारे. कीतीही बिझी असले तरी ऐकुन घेणारे,
दिलदार अन दिलखुलास दोन देखणे मित्र.
केवळ यांच्यासाठी मिपावर राहायचे. नाहीतर बाकी काही ठेवले नाही.

हेमंत लाटकर's picture

2 Nov 2015 - 1:36 pm | हेमंत लाटकर

मला कॅप्टन आयडी चांगला वाटतो.

कपिलमुनी's picture

2 Nov 2015 - 1:38 pm | कपिलमुनी

आमच्या लाडक्या चेसुगुंचे नाव कोणीही घेतले नाह्ही याच णिषेढ

डॉ सुबोध खरे, सोन्यबाप्पू, आतिवासतै, पेठकरकाका: (अत्यंत आदरणीय आय्डी) अनुभवसमृद्ध जीवनातून येणारे लेख व प्रतिसाद
गणपा व सानिकास्वप्निलः स्वर्गीय पाककृती व औटॉफधिसवर्ल्ड सादरीकरण
स्पा/स्वॅप्स्/ऊप्सः फोटोग्राफी
वल्ली: मिपाचे इंडियाना जोन्स: महाभारत/रामायण, लेणी, सातवाहन आणि तत्सम गोष्टींचा मिपाकोष
बॅटमॅन/मृत्युंजयः व्यासंग.. संदर्भग्रंथातले रेफरन्सेस मुखोद्गत असतात.
संदीप डांगे: अत्यंत पोटतिडकीने एखादा मुद्दा मांडणारे
पैतै: प्रतिसादातून कधी पुणेकरांना चिमटे(!) तर कधी वादग्रस्त धाग्यांवर ठाम पण संयमित भूमिका
चित्रपट परीक्षणः समीरसूर आणि फारएण्ड

तुषार काळभोर's picture

2 Nov 2015 - 1:47 pm | तुषार काळभोर

रामदासकाका
गवि
सोत्रि
प्रास

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2015 - 7:54 pm | प्रभाकर पेठकर

(अत्यंत आदरणीय आयडी)

छातीत सूक्ष्म कळ आली. ईसीजी, टू डी आणि स्ट्रेस टेस्ट नंतर तो हार्ट अ‍ॅटॅक नाही असे निदान झाले. पण, 'कोणाचेही अवाजवी कौतुक इतके मनावर घेऊ नका' असा सल्ला डॉक्टरसाहेबांनी दिला. असो.

धन्यवाद पैलवानसाहेब.

संदीप डांगे's picture

9 Nov 2015 - 7:23 pm | संदीप डांगे

शतशः धन्यवाद पैलवानदादा!

बाळ सप्रे's picture

2 Nov 2015 - 1:47 pm | बाळ सप्रे

तुमचा / आमचा / आपला अभ्या की अभिषेक असे काही कंफ़्युजिंग आयडीज आहेत .. त्यातला नक्की कुठला चांगला ते आठवत नाहीये :-)

बाकी मगाच्या कमेंटीत सगा उर्फ धन्या, नाना चेंगट आणि रामाताराम राह्यले त्याच्यासाठी पुरवणी .. :-)

जेपी's picture

2 Nov 2015 - 1:59 pm | जेपी

आवडता आयडी -
संपादक मंडळ.
one and only.

हा आयडी आवडतो कारण, जग फिरावं आणि त्या त्या जागांची माहिती असावी ते ह्यांच्या सारखे …

अवांतर : डाॅ. सुहास म्हात्रे आणि इस्पिकचा एक्का हे एकच ना ??

पिलीयन रायडर's picture

2 Nov 2015 - 2:55 pm | पिलीयन रायडर

मिपावर येण्याचे प्रमुख कारण चांगले वाचायला मिळणे हे असल्याने चांगले लेखकच आपसुक आवडते आयडी आहेत.

मी आले तेच गविंच्या लेखावर प्रतिक्रिया द्यायला. म्हणुन त्यांचा पयला नंबर!

एक्काकाका, पेठकर काका, क्लिंटन, विकास, चतुरंग ह्यांचे समतोल लिखाण आवडते. राजकारणावरचे लेख आवर्जुन वाचत नाही पण त्यावर काही मंडळी समोरच्याची अक्कल न काढताही उत्तम प्रतिवाद करतात म्हणुन आवडतात.

रामदास ह्यांची बातच और..! जयंत कुलकर्णी काकांच्या "नथ" सारख्या कथांनी वेड लावले होते!

पंत श्रीरंग जोशी ह्यांची सिन्सियरिटी आवडते. नेहमी व्यवस्थित लिंका वगैरे देणार, त्यापण नव्या टॅब मध्ये उघडणार्‍या!
अलीकडेच जव्हेरगंज ह्यांच्याही कथा आवडत आहेत.

अतिवास ताईंचे लिखाण आवर्जुन वाचले जातेच. शशक खास आवडतात.
आदुबाळ ह्यांचेही "अठरा पावलांचा स्टार्ट" आणि दुसर्‍या एका संस्थळावरील २६३ अशी काहिशी कथा होती, त्याही खुप आवडल्या होत्या.

वल्ली ह्यांचे लिखाण अभ्यासपुर्ण असते. ते ही शक्यतो नजरेतुन सुटत नाही.

सुरन्गीताईंच्या लेखमालिकेचीही खुप वाट पाहिली जाते.

मोदकच्या लेखाला अर्थातच विसरु शकत नाही. अत्यंत अभ्यासपुर्ण लेखन!

पाकॄ हा वेगळाच विषय आहे.. कुणीही पाकॄ देवो, धागा उघडल्या जातोच.. फोटोंसाठी!!
म्हणुन सानिका, मृणालिनी, स्वातीताई, दिपक, गणपा, पेठकर काका इ अनेक जण आवडतात.

काही जणी खुप जवळच्या मैत्रिणी आहेत.. त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे घरातलीच माणसे आवडतात असे सांगण्यासारखे होईल! पण पैसा ताई, रेवाक्का, स्रुजा, मधुरा, अजया अशा अनेक जणी लेखक आणि माणुस म्हणुनही खुप आवडतात.

इथे पुर्वी अनेक फार्फार फेमस आयडी होते ज्यांची फार आठवण काढली जाते. पण त्यांचे नाव सतत न पाहिल्याने पटकन नाव आठवत नाही. पण असे अनेक आयडी आहेत ज्यांचे लेख आवडले होते.

बाकी वरीलपैकी काहिही नसताना, केवळ बेअरिंग आणि मार्मिक बोलण्यासाठी "माईसाहेब" आयडी फार आवडतो!

(अनेकांची नावे राहिली असणारेत...पण ती माझ्या स्मरणशक्तीची मर्यादा समजा न एकडाव माफी द्या!)

माईसाहेबांचे नाव कसे विसरलो! माईसाहेब या मिपाची शान आहेत. बेअरिंग एकच नंबर असतं आणि कमेंटीपण.

मिपावरचा प्रत्येक आयडी या न त्या कारणाने चांगला आहे. लिस्ट करणं कठीण होईल!! आतापर्यंत इतके कट्टे झाले, या न त्या कारणाने काही ठराविक चेहरे प्रत्येक कट्ट्याला कॉमन झाले, ओळखीचे झाले.

खरं सांगायचं तर मिपाकरांमुळे पुण्यात रूळायला वेळ लागला नाही. पुण्यात आल्यानंतरचे सुरुवातीचे काही दिवस या ना त्याकारणाने कट्टे होत होते. त्यानिमित्ताने पुण्यातली वेगवेगळी ठिकाणं बघायला मिळाली, रस्ते ओळखीचे होत गेले. पुणं ओळखीचं होत गेलं.

मुंबईत इतकी वर्ष राहून अजिबात शक्य न झालेले ट्रेक करता आले. इथल्या लोकांनी मला अगदी बाईक शिकवण्यापासून ते बाईक मुंबईहून पुण्यात आणेपर्यंत सगळं केलेलं आहे. अगदी आताचं सांगायचं तर घर घेताना पण सल्लामसलत करायला इथल्या लोकांची डोकी मी खाल्ली आहेत आणि लोकांनी न कंटाळता आपापले अनुभव शेअर केले आहेत. लिहायला गेलं तर बरंच आहे.

असा अमुक एक आयडी सांगता येणार नाही. प्रत्येक आयडीवर वेगळा लेख मात्र होऊ शकेल.

असो, आणखी भावूक व्हायच्या आत इति अलम्!!

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 3:41 pm | टवाळ कार्टा

काल मला एका स्त्री आयडीने आयडीने "मज्याशी मयतरी कर्नार क?" असा व्यनी पाठवलाय....त्यामुळे तो आयडी सध्ध्या माझा सग्ग्ळ्यात आवडता आयडी आहे ;)

त्या ताईला म्हणावं, "मज्याशीच जर मय्तरि करयचि तर व्यनि मज्याला पाठव की. मला कायले पाठवू राह्यली?" =))

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 4:00 pm | टवाळ कार्टा

गप रे....वशाड मेलो

वशाड मेलो नाय रे, वशाड जगलो. =))

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 4:42 pm | टवाळ कार्टा

जगल्याक कित्या हाक मारतंस मरे =))

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 10:21 pm | सागरकदम

तिला तुम्ही माझा डू आयडी वाटला असणार

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 10:40 pm | टवाळ कार्टा

विचारतो हं

अवघे एक महिना वय असूनसुद्धा जाणतेपणी सर्व आयडींची वैशिष्ट्ये सांगणारा सालस हा एका ताईंचा डुआयडी माझा सर्वांत आवडता आहे.

काकासाहेब केंजळे's picture

2 Nov 2015 - 3:46 pm | काकासाहेब केंजळे

ग्रेटथिंकर ,नानासाहेब नेफळे , फुलथ्रॉटल जिनियस, हितेश, दादा दरेकर यांचा वावर अतिशय मुद्देसुद आणि नेमका होता, जागोमोहनप्यारे यांचे टायमिंग तर अफलातून असायचे ,कुठे गेली हि सर्व मंडळी?????
मिपावर सध्या माइसाहेबांचे प्रतिसाद उत्तम असतात,त्या माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत,त्यांचे पती माझे चांगले मित्र आहेत.

बॅटमॅन's picture

2 Nov 2015 - 3:48 pm | बॅटमॅन

अच्चा म्हणजे तुम्हीच का माईसाहेबांचा नवा अवतार? =))

रच्याकने, जागोमोहनप्यारे = हितेश = दादादरेकर = मोगा (फॉर द टाईम बीइंग).

प्रसाद प्रसाद's picture

2 Nov 2015 - 4:24 pm | प्रसाद प्रसाद

माझ्या आवडत्या आयडीचे नाव आहे चिगो

ह्याच आयडीचे लिखाण मी सुरुवातीला मिपावर वाचले, अत्यंत ओघवती आणि प्रांजळ निवेदन शैली आहे त्यांची. त्यानंतर बिका यांचे खोबार वाचले आणि खूप आवडले. नंतर ही इतर आयडीजचे बरेच लेखन आवडले. पण सुरुवात चिगो ह्यांच्या लेखवाचनामुळेच झाली.

जे पी. मोर्गन .
भन्नात उपमा.

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2015 - 5:37 pm | प्रभाकर पेठकर

उत्तम लेखक, माहितीपूर्ण लेखन करणारे (टेक्निकल), पाकसिद्धी असणारे, संयमित प्रतिसाद देणारे, ग्रामिण बाजाचे, शेतकर्‍यांची कणव असणारे, जातीभेद न मानणारे, आगलावे प्रतिसाद न देणारे, नकारात्मकता न पसरविणारे सर्वच आयडी मला आवडतात. अशा सर्व आयडींनी माझे जीवन समृद्ध केले आहे. पूर्वी मी इथे नविन असताना अनेक आयडींना अडखळलो आहे पण आता अनुभवातून आणि निवडक वाचनातून न अडखळता चालू शकतो आहे. त्यामुळे आता नावडता असा आयडी उरला नाही.

विजुभाऊ's picture

2 Nov 2015 - 6:21 pm | विजुभाऊ

बरोब्बर बोललात पेठकर काका

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Nov 2015 - 6:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या आवडत्या आयडी...

१. ज्या माहितीपूर्ण, मुद्देसूद आणि परखड लिहितात... मग विषय कोणताही असो.

२. ज्यांचे लेखन वाचून "वाह!" असे म्हणावेसे वाटते... मग विषय कोणताही असो.

३. ज्या लेखात अथवा प्रतिसादात काही विनोदी लिहून नकळत पटकन विकेट काढतात... ज्यात व्यक्तीगत टीकेपेक्षा जास्त लेखनातली विसंगती दाखविण्याचा प्रयत्न किंवा केवळ मजाही असून शकते... मग त्यामागे थोडासा टारगटपणा असला तरी हरकत नाही. (इतर अनेक कारणे असतील पण या "सौम्य गुदगुल्या करणार्‍या ते खदखदा हसवणार्‍या" एकमेव मिपागुणविशेषामुळे मी मिपावर स्थिरावलो असे म्हणायला हरकत नाही!)

४. ज्या पूर्वग्रहदुषित असलेले व एकांगी लेख अथवा प्रतिसाद लिहित नाहीत... मुद्दे मला बरोबर वाटणारे अथवा पटणारे असलेच पाहिजे अशी अट अजिबात नाही. पण, मुद्दा भरकटवायचा हेतुपुर्रसर प्रयत्न नसावा हे नक्की.

आणि बरेच काही... पण वरची कारणे महत्वाची... वरचे एक किंवा अनेक गुण असलेल्या अनेक आयडीज मिपावर वावरत आहेत आणि दिवसेंदिवस माझे मिपाशी नाते घट्ट करत आहेत... इतकी नावे आहेत की नक्कीच काही विसरली जातील... काहींची नावे लिहावी तर इतरांना विसरल्याचा दोष लागण्याची भिती आहे.

शिवाय, मानवी स्वभावाप्रमाणे बरेच जण आज या तर उद्या त्या कारणाखाली बसणारे लेखन करतात... पण कोणी का लिहीना, जेव्हा-केव्हा ते वरच्या कारणांत बसते तेव्हा-तेव्हा ती ती आयडी आवडतेच आवडते!

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 8:11 pm | टवाळ कार्टा

या प्रतिसादासाठी एक्काकाकांना मिपाचे मिपाचे पॉवरकाका असा किताब द्यावा असा मी इथे प्रस्ताव मांडतो ;)

दिवाकर कुलकर्णी's picture

2 Nov 2015 - 6:59 pm | दिवाकर कुलकर्णी

कमीजास्त फरकान सर्व
कारण म्हणाल तर बस लुभाते है,

दमामि's picture

2 Nov 2015 - 7:45 pm | दमामि

सर्वच मिपा आयडी आवडतात.
बऱ्याच जणांकधून काही गोष्टी शिकाव्याशा वाटतात. त्यातले आत्ता आठवतायत ते
१ मुवि -दिलखुलासपणा
२ पैताई- स्पष्टवक्तेपणा
३ जयंतराव- अभ्यासपूर्ण लिखाण
४ हितेश/ दादा दरेकर- चिकाटी(मान लिया उस्ताद!)
५ मारवा- कुठेही आक्रामक न होता, वा पातळी न सोडता आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडणे
६माई- तर्कसंगत
७ नाखु- अत्यंत सकारात्मक दृष्टिकोण
8अतिवास , मार्गी, अभ्या, पेठकर काका-वेगळा मार्ग चोखाळायचे धैर्य
९ तात्या, रामदास- लिहावे कसे याचे उत्तम उदाहरण
१० बुवा, टक्या - समोरच्याचा अपमान न होऊ देता चेष्टामस्करी करणे
११ मांत्रिक, बिंगाण्णा - भाबडेपणा

बाकी ज्यांचे लेखन आवडते असे अनेक जण.

याॅर्कर's picture

2 Nov 2015 - 8:09 pm | याॅर्कर

विशेष म्हणजे 'अत्रुप्त' यांच्या विनोदी स्मायलीज
.
.
.
मी तसा नवा सदस्य आहे त्यामुळे मला ज्या आयडी लक्षात येतील तसे खाली टंकतो आहे
.
.
.
नीलकांत,डाॅ बिरूटे,पैसा,डाॅ म्हात्रे,सुबोध खरे, मुवि,मृत्युंजय,बॅटमॅन,प्रचेतस,कॅप्टन जॅक स्पॅरो,
तर्राट जोकर,वेल्लाभट,चित्रगुप्त,नाद खुळा,प्रगो,
दत्ता जोशी,तुडतुडी,दादादरेकर,फुलथ्राॅटल जिनिअस,
श्रीगुरूजी,टवाळ कार्टा,अन्या दातार,पिलियन रायडर,
स्नेहांकिता,अजया,माईसाहेब,आणि इतर बरेच.
.
.
.आणि आणि स्वतः मी

स्वप्नज's picture

2 Nov 2015 - 9:09 pm | स्वप्नज

ज्याक ड्यानियल्स या आयडीमागचा माणूस गळ्यात दोन चार धामण, डोक्यावर एक नाग, कमरेला एक घोणस अशा अवतारातच डोळ्यासमोर येतो...

मांत्रिक's picture

2 Nov 2015 - 9:23 pm | मांत्रिक

अगागागा मेलो रे देवा!!!

जॅक डनियल्स's picture

3 Nov 2015 - 6:50 am | जॅक डनियल्स

धन्यवाद ! लवकरच लिहायला आणि सापांवर संशोधनाला परत सुरवात करायची आहे , ती केली की तुम्ही म्हणता तो अवतारच धारण करीन .
खरे म्हणजे ,मी कधी गळ्यात साप घालून फोटोच काढला नाही, त्यात काही शौर्य आहे असे वाटले नाही.