छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
15 Oct 2015 - 9:44 am

नमस्कार मंडळी,

आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे.

स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील.

तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा. लॅण्डस्केप प्रकारचे छायाचित्र असल्यास कमाल रुंदी ६४० असेल याची कृपया काळजी घ्या.

या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे.



टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.

छायाचित्रणप्रकटन

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

23 Oct 2015 - 9:57 pm | तर्राट जोकर

सुंदर अनुभूती.... सगळे फोटो छान...!

सोंड्या's picture

25 Oct 2015 - 11:02 am | सोंड्या

१) 1
सर्व फोटो आमच्या गावला पाणीपुरवठा करणार्या मातीच्या धरणाचे आहेत ज्याचे भूमीपुजन 1977 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या panorama फोटोत ज्या रांगेच प्रतिबिंब ठळक उमटलय तीच्या मध्यभागी गणेश लेणी (गरदलेणी) आहे (पळू). तिसर्या फोटोत डाव्या अंगाला नाणेघाट दिसतोय. सर्व फोटोज मोबाईल कॅपचर्ड आहेत.

सोंड्या's picture

25 Oct 2015 - 11:08 am | सोंड्या

१)(स्पर्धेसाठी नाही) 1
२)2)
३)3
सर्व फोटो आमच्या गावला पाणीपुरवठा करणार्या मातीच्या धरणाचे आहेत ज्याचे भूमीपुजन 1977 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या panorama फोटोत ज्या रांगेच प्रतिबिंब ठळक उमटलय तीच्या मध्यभागी गणेश लेणी (गरदलेणी) आहे (पळू). तिसर्या फोटोत डाव्या अंगाला नाणेघाट दिसतोय. सर्व फोटोज मोबाईल कॅपचर्ड आहेत.

सर्वसाक्षी's picture

25 Oct 2015 - 11:51 am | सर्वसाक्षी

जेव्हा मोठं धरण बांधलं जातं, तेव्हा साहजिकच वरचा भाग आणि खालचा भाग असे पाण्याच्या पातळीनुसार दोन भाग अलग होतात. वरुन खाली रस्त्याने उतरणे सोपे असते. पण ज्या नदीवर प्रचंड धरण बांधायचे ती नदी जलवाहतूकीसाठी वापरली असेल तर? रस्त्याला घाट बांधुन उतार नियंत्रित करता येतो पण पाण्याच्या पातळीत ४०-५० फूट फरक असेल तर? मग नाईल नदीवर धरण बांधताना एस्ना येथे वरच्या पातळीवर पाणी अडवुन एक कृत्रिम असा अवाढव्य जलाशय बांधला गेला व त्या जलाशयाचे पाणी एक निरुंद गोदी बांधुन आड्वले गेले. गोदीत जहाज आले की फाटक बंद करुन गोदित जहाज स्थिर करुन धक्क्याला बांधायचे. जहाज स्थिर व अचल झाल्यावर जहाजाच्या शेपटाकड्चे गोदीचे फाट्क बंद करायचे म्हणजे जलाशयातुन गोदीत येणारे पाणी थांबते. मग पुढचे फाटक उघडायचे म्हणजे वरच्या पातळीचे पाणी साहजिकच वेगाने पुढे कमी पातळीकडे वाहू लागते व जहाज बंदिस्त गोदीत अलगद जागच्या जागी खाली उतरते. गोदीत भरलेले सगळे पाणी उतरले म्हणजे जहाज आता खालच्या पातळीवर आले. जहाज पुढे निघुन जाताच पुन्हा हा दरवाजा बंद करण्यात येतो आणि अलिकडचा दरवाजा उघडला जातो ज्यायोगे गोदीत पुन्हा वरच्या पातळीसमान पाणी भरेल व पुढचे जहाज तिथे घेता येईल. याला एस्ना जलबंध (वॉटर लॉक) असे नाव आहे, हे ठिकाण नाईल किनारी आस्वान ते लक्झर दरम्यान आहे.

गोदी यायच्या अलिकडे प्रचंड जलाशय पार करताना बंधार्‍यावर दोन विषम पातळीवरचे आगगाडीचे डबे सूचक म्हणुन ठेवले आहेत, जे सर्व पर्यटकांचे लक्ष वेधुन घेतात.
esna

कॅमेरा निकॉन डी ६०/ निकॉर १८-५५
एफ ७.१/ एक्स्पोजर १/२००, आयेसओ १०० फोकल लेंग्थ १८ एमेम

शब्दबम्बाळ's picture

26 Oct 2015 - 12:09 am | शब्दबम्बाळ

स्पर्धेसाठी खूप छान फोटो आलेले आहेत, मी फक्त काही जलाशयांचे फोटो इथे चिटकवतो (स्पर्धेकरिता नाही)

१. गोठलेला Eiisee Lake (जर्मनी) - जर्मनीच्या सगळ्यात उंच पर्वत शिखराच्या पायथ्याशी हा तलाव आहे.
eibsee

२. जर्मनीच्या एका उद्यानामध्ये काढलेला फोटो
park

३. कास तलाव
kaas

नन्दादीप's picture

26 Oct 2015 - 11:37 am | नन्दादीप

स्पर्धेसाठी
a
रत्नागिरी - आडिवरे मार्ग...कशेळी बांध (कनकादित्य मंदीर)
.
.
.
.
स्पर्धेसाठी नाही...
१. b
गावखडी...

२. c

स्नेहल महेश's picture

26 Oct 2015 - 2:26 pm | स्नेहल महेश

सगळ्यांचे फोटो एक सो एक आहेत.

चांदणे संदीप's picture

27 Oct 2015 - 11:26 am | चांदणे संदीप

(माझ्या दुर्दैवाने) हे फोटो स्पर्धेसाठी नाहीत! कारण हे नदीपात्रातील जलाशयाचे फोटो आहेत!
केवळ जलाशयाशी संबंधीत असल्याने इथे पाहण्यासाठी देत आहे.

2

3

4

5

5

1

हे सर्व फोटो मोटो-जी(पहिला) या मोबाईलने काढलेले आहेत!
ठिकाण: दांडेली, कर्नाटक

फुडल्या स्पर्धेसाठी सरसावून बसलेला :)
Sandy

चांदणे संदीप's picture

27 Oct 2015 - 11:30 am | चांदणे संदीप

हुर्रे…. आले रे आले माझे फोटो मला टाकता आले! :))

\o/ \o/ \o/

Snandy! (कायका लिहिलं जाईना आता!)

विशाल कुलकर्णी's picture

27 Oct 2015 - 11:49 am | विशाल कुलकर्णी

पाबेघाट ओलांडल्यावर पुढे केळदच्या दिशेने जाताना मध्येच कुठेतरी हा जलाशय आहे. नक्की स्थान सांगता नाही येणार. (Latitude - 18.299167° N , Longitude - 73.630556° E)

Madheghat

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Oct 2015 - 6:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो.

चित्रे टाकण्याच्या डायलॉग बॉक्समध्ये "लँडस्केपसाठी फक्त लांबी" आणि "पोर्ट्रेट्साठी फक्त रूंदी" चे आकडे टाका. मिपा योग्य ते इतर आकडे वापरून चित्र मूळ आकाराच्या प्रमाणात ठेवेल.

विशाल कुलकर्णी's picture

28 Oct 2015 - 11:43 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद डॉक्टरसाहेब.
तेच केले होते, पण आधी मोजमापाचा अंदाज चुकला होता. संपादक मंडळाचेही आभार _/\_

विशाल कुलकर्णी's picture

28 Oct 2015 - 11:44 am | विशाल कुलकर्णी

"लँडस्केपसाठी फक्त लांबी" आणि "पोर्ट्रेट्साठी फक्त रूंदी" चे आकडे टाका

अरे हो, हे लक्षातच आले नाही. यापुढे लक्षात ठेवेन. धन्यवाद.

चिगो's picture

28 Oct 2015 - 12:47 pm | चिगो

'गुगल फोटो' वरुन देत असलेल्या लिंक्स गंडताहेत.. कुणी मदत करु शकेल का?

श्रीरंग_जोशी's picture

28 Oct 2015 - 8:35 pm | श्रीरंग_जोशी

क्रोम ब्राउझर वापरत असाल तर गुगल फोटोजमधल्या इमेजवर राइट क्लिक करून Copy image URL पर्याय निवडावा. असे करून जो दुवा मिळेल तो मिपावर फोटो प्रकाशित करण्यास वापरावा.

चिगो's picture

29 Oct 2015 - 3:46 pm | चिगो

धन्यवाद.. खाली फोटो दिले आहेत, पण ते प्रमाणाबाहेर पसरले आहेत.. कृपया मदत करावी, ही विनंती..

जुइ's picture

29 Oct 2015 - 9:56 am | जुइ

ग्रॅन्ड मरे, मिनेसोटा येथील लेक सुपिरिअरचा किनारा.

Camera: Sony Nex 5N; Lens: 18-35;
ƒ/13.0; Exposure: 1/400; ISO: 100

आज प्रवेशिका द्यायला शेवटचा दिवस! अजून कोणाला प्रवेशिका द्यायची आहे का? रात्री १२ पर्यंत जरूर द्या.

चिगो's picture

29 Oct 2015 - 3:44 pm | चिगो

a

b

उमियाम लेक, बडापानी, मेघालय..

c

d

मेघालयातील असेच एक तळे..

स्पर्धेत आलेल्या इतर छायाचित्रांच्या तुलतेन ह्यातील एकही लायक न वाटल्याने, स्पर्धेसाठी नाही..

श्रीरंग_जोशी's picture

29 Oct 2015 - 8:47 pm | श्रीरंग_जोशी

क्र. ३ चा फोटो स्पर्धेसाठी योग्य वाटत आहे. 'स्पर्धेसाठी नाही' या गोष्टीचा पुनर्विचार करावा.

पॉइंट ब्लँक's picture

29 Oct 2015 - 10:45 pm | पॉइंट ब्लँक

तुमकुरजवळील एक तळे!

Tumkur