ऑक्टोबर २०१४ ची गोष्ट आहे, माझ्या कंपनीमधे ज्युनिअर इंजिनिअर (१ ते ३ वर्षं अनुभवी लोकांसाठी) लेव्हल साठी इंटर्व्यु होते. माझ्याही विभागासाठी ही भरती असल्यामुळे मी, माझे बॉस आणि एच.आर. असे इंटर्व्ह्यु घ्यायला बसलो होतो. ज्युनिअर लेव्हलची भरती असल्यानी पगाराची रेंज ठरलेली होती (१२,५०० ते १७,५०० रुपये). ६ उमेदवार आलेले होते. एकेकाची टेक्निकल मुलाखत वगैरे घेउन मग एच.आर. पगाराचा आकडा त्यांच्या आधीच्या सॅलरी स्लीप पाहुन आणि एकुण मुलाखतीवरुन "निगोशिएट" करत होती. ज्यांना जमत होतं त्यांना बाहेर बसायला सांगीतलेलं होतं.
३ र्या किंवा ४थ्या उमेदवाराच्या मुलाखतीचा हा एक लक्षात रहाणारा अनुभव.
उमेदवार टेक्निकल प्रश्णांना अगदी चांगल्या प्रकारे उत्तरं देत होता. २ वर्षं ८ महिन्यांचा एका मध्यम पातळी वर्कशॉपमधल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर इथे मुलाखत द्यायला आलेला होता. आणि त्यानी स्वतः हात काळे केलेले आहेत शॉप फ्लोअर वर हे अगदी स्पष्ट दिसुन येत होतं. शिवाय डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग दोन्हीकडे मार्क्सही चांगले होते. एकुण मला आणि माझ्या बॉसला हा उमेदवार अगदी पसंत होता.
आधीच्या वर्कशॉपमधे त्याला १४-१५ हजार पगार असेल. आमच्या एच.आर. नी काय करावं? ह्या लायक उमेदवाराला १२,५०० रुपयाची ऑफर दिली. त्या उमेदवारानी अगदी शांतपणे एच.आर. शी निगोशिएट करायला सुरुवात केली. त्याची अपेक्षा १८,००० रुपये होती. एच.आर. नी त्याला चक्क नाही म्हणुन उत्तर दिलं. आता ही गोष्ट आमच्या अधिकार क्षेत्रात येतं नसल्यानी आम्ही तेव्हा काहीही बोलु शकलो नाही.
त्या उमेदवारानी दोन मिनिट बोलायची परवानगी मागीतली. तो जे दोन मिनिटात बोल्लाय ना ते शब्द आजही माझ्या डोक्यात अगदी व्यवस्थित आहेत.
"सर आणि मॅडम, मी जवळजवळ तीन वर्षांच्या अनुभव असुनही फक्त १८,००० रुपये मागतोय. हे का? कारण मला ह्या नोकरीची आत्यंतिक गरज आहे. एवढ्या अनुभवावर मी योग्य संधीची वाट पाहिली तर मला कोणीही हसत हसत ३०,००० पगार देईल (खरी गोष्ट आहे). तुम्ही जो पगाराचा आकडा सांगताय ना, त्यापेक्षा १२ वी नंतर कॉल सेंटरला काम करणारी मुलं सुद्धा जास्त पैसे कमवतात. रिक्षा चालवली ना महिनाभर तरी जास्तं पैसे मिळतात. मुंबईमधे काही भिकारीसुद्धा भिक मागुन ह्यापेक्षा जास्त पैसे कमवतात. मी एक इंजिनिअर असुनही तुम्हाला मला द्यायला ५०० रुपये जड वाटतायतं.
मी ओपन क्लास्मधुन वर्षाला ९५,००० रुपये एवढी फी भरुन इंजिनिअर झालोय, ते पण शैक्षणिक कर्ज काढुन, त्याचे हफ्ते जाउन तुम्ही देताय त्या पगारात घरी काय देउ? ४ वर्षाची जवळ जवळ ४ लाख रुपये फीचं तुमच्या तुटपुंज्या पगारामधे कधी ब्रेक-इव्हन होईल? मला ह्या कंपनीमधे आता दिलीत तरी नोकरी नको" बस्स एवढं बोलुन सरळ बाहेर निघुन गेला.
तसं पहायला गेलं तर त्या मुलाची काहीचं चुक नाहिये ह्यात. भरम्साठ फिया भरुन इंजिनिअर होऊन सुद्धा किरकोळ पगाराच्या नोकर्या आणि रोज १२-१२, १४-१४ तास राबवुन घेणं हेचं माझ्या क्षेत्राचं आर्थिक गणित झालयं. स्वस्त ते मस्त अशीचं बहुतेक कंपन्यांची कॉस्ट कटिंगच्या नावाखाली पॉलिसी झालीये. ह्या भोसडीच्यांना दर वर्षीच्या ऑडीटमधे आम्ही ह्यावर्षी अमुक अमुक एवढे लाख वाचवले हे बोंबलुन सांगायला फार आनंद होतो. स्वतः ७-७ आकडी पगार ज्यांच्या जीवावर मिळतात ना त्यांचचं शोषणं होतय हे तर. बर एवढी कॉस्ट कटींग करुन सुद्धा त्यांना मिळायचं तेवढचं इन्क्रीमेंट कंपनी देते. ह्यात लायक उमेदवार मात्र भरडले जातायत. मला सांगायला खरचं मनापासुन वाईट वाटतय की माझ्या उमेदवारीच्या दिवसांमधे मीही ह्याला तोंड दिलयं. त्यावेळी मी उपेक्षित होतो आणि कदाचित आता जाणते-अजाणतेपणी उपेक्षा करणारा.
*unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz:
आज असाचं एक अनुभव ऐकला आणि एकदम ही गोष्ट आठवली आणि इथे लिहाविशी वाटली. विस्कळीत आहे, पण घ्या चालवुन.
प्रतिक्रिया
9 Feb 2015 - 11:47 pm | पिनुराव
हिच ती हुशारी HR लोकांची पण काय कामाची
??????
10 Feb 2015 - 12:04 am | लंबूटांग
मला स्वतःला ह्या कलेत सुधारणेला बराच वाव आहे पण २ वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगावासा वाटतो.
एका कंपनीत इंटरव्ह्यूला गेलो. २ भारतीयांनीच सुरू केलेली कंपनी. पहिल्यांदाच कंपनीच्या रिक्रूटरला सांगितले होते की मला क्ष डॉलर्स पगाराची अपेक्षा आहे. इंटरव्ह्यूचे चांगले ३-४ राऊंड झाले. स्टार्टअप सारखे कल्चर वगैरे वगैरे. मला कंपनी आणि काम आवडले होते. ऑफर आली माझ्या तेव्हाच्या पगाराच्या ६ हजार डॉलर जास्ती. मी सरळ नाही म्हणून सांगितले. मग संध्याकाळी सीटीओकडून इमेल. की काय झाले नाही का म्हणालास. लेट्स वर्क इट आउट. आणि बाकीचा नेहमीचाच सेल्स पिच की आमच्या कंपनीत काम करणे कसे छान आहे वगैरे वगैरे. मी परत सांगितले की बाबारे तुमच्या कंपनीचा महिन्याचा इंशुरन्सचा प्रिमीयम, घरापासून दूर असल्याने बाकीचे खर्च (बायकोला गाडी पार्क करायला लागणे इ. इ.) वगैरे विचारात घेता माझा तोटा होणार आहे आणि सद्ध्याच्या घटकेला तरी मला ते परवडणार नाही. त्याने मग मला सांगितले की I respect your line of thinking (even though I don't agree with it). इतकेच नाही तर मला एक excel sheetबनवायला सांगितली की कसा लॉस होणार आहे. मग मात्र माझी सटकली. मी त्याला उत्तर दिले की
I don't really agree with your offer being based competetively with my current salary either. पण ही घे excel sheet.
मग ती बघितल्यावर गाडी बोनस कसा जास्ती आहे आणि तो विचारात घेतला तर मग तुझी क्ष डॉलर्सची मागणी कशी पुरी होते आहे वगैरे वर घसरली. त्याला सांगितले की बाबारे तुझा बोनस आहे प्रॉफिट शेअरिंग. कंपनीचे सेल्स घसरले तर मला काहीच मिळणार नाहीये आणि दुसरे त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझी बिले आणि हफ्ते महिन्याला भरावे लागतात, वर्ष झाले की नाही. त्यामुळे परवडणारच नाही. असे बरेच back and forth email झाले पण एक छदामही वाढवायचे नाव नाही.
त्याला शेवटी सांगितले की बाबारे मी पहिलेच नाही म्हणालो होतो पण मला नोकरी आवडली होती आणि तू वर्क इट आउट म्हणालास म्हणून excel sheet ची आचरट मागणी entertain केली आणि email exchange मधे वेळ घालवला. आता तर नक्कीच नाही येणार तिथे काम करायला.
अर्थात तेव्हा मला स्थिर नोकरी होती म्हणून रुबाब दाखवता आला.
10 Feb 2015 - 12:50 am | उपास
सद्द्ध्या स्वतःच्या कंपनीसाठी रिकृट करताना उलट अनुभव येत आहेत..
एकाच वेळी तीन चार ऑफर्स घेउन निगोशिएट करण्याचा शुद्ध हावरटपणा.. कमी स्किल्स पण पगाराची अवास्तव मागणी आणि बरंच काही...
'गरजवंताला अक्कल नसते' हे अंतिम सत्य!
10 Feb 2015 - 6:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हो असेही अनुभव येतात. पण तो मुलगा खरचं गरजु होता आणि मुख्य म्हणजे त्याला कामाचं कुठलही प्रशिक्षण त्याला द्यायला लागणार नव्हतं. जवळपास ३ वर्ष अनुभव असणार्या प्रोडक्शन इंजिनिअरला १२,५०० रुपये पगार ऑफर करणं हा नुसत्या त्या व्यक्तीचाच नाही तर त्या डीग्रीचा आणि जागेचाही अपमान आहे.
10 Feb 2015 - 8:36 am | अगम्य
जर त्या जागेसाठी १७५०० पर्यंत रेंज होती तर तुम्ही HR ला तितके तरी द्यायला सांगू शकत नव्हता का ? कदाचित त्या उमेदवाराने ५०० रुपयांची adjustment केली असती. घेतल्यावर त्याला लगेच बढती देऊन पगार आणखी वाढवता आला असता. तसा हि त्याला अनुभव होताच. HR च्या आडमुठे पणामुळे चांगला उमेदवार जात असेल तर upper management level वर HR शी बोलायची सोय तुमच्या कंपनीत नाही का ? हा प्रकार तर फारच दुर्दैवी वाटतो.
10 Feb 2015 - 11:06 am | सुबोध खरे
मलाही जर आश्चर्य वाटते कि तुमच्या बॉसने तोंडही उघडले नाही. सरळ वरपर्यंत जायचे. याचा एक मोठा फायदा होतो कि तुमच्या हाताखालचे लोक तुमच्यावर पूर्ण भरवसा टाकतात आणि तुम्हाला अतिशय निष्ठावान साथीदार मिळतात.
कारण मी विभाग प्रमुख असताना एच आर ला फाट्यावर मारत असे.एकदा उमेदवार( एक्स रे टेक्निशियन) चांगला असताना एच आर पगारावर अडकला असताना सरळ उपाध्यक्ष( व्हाईस चेअरमन) कडे जाऊन पगार वाढवून घेतला होता. दुसर्यांदा एका मुलीला( मामोग्राफी) साठी घेताना एच आर वाली नखरे करीत होती. तिला मी शांतपणे सी इ ओ समोर सांगितले तुम्हाला हि उमेदवार नको असेल तर दुसरी उमेदवार तुम्ही आणायची. तोवर विभागातील काम बंद झाले तर होणार्या नुकसानाची जबाबदारी तुमची. अर्थात येथे स्त्री क्षकिरण तंत्रज्ञा मिळणे मुळात कठीण आहे हे सर्वाना माहितही होते. यानंतर मी असे पर्यंत एच आर विभागाकडून कोणताही त्रास झाला नाही. आणि मी असेपर्यंत २ वर्षे एकही तंत्रज्ञ सोडून गेला नव्हता.
10 Feb 2015 - 3:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही हो. उत्पादन क्षेत्रामधलं वातावरणं बरचं वेगळं असतं. आधीचं एच.आर.च्या हातामधे बरेचं अधिकार असतात. वरपर्यंत जरी गेलं तरं एच.आर. कंपनीचे पैसे वाचवायचा प्रयत्न करत होती असं निगरगट्ट उत्तर मि़ळालं असतं. :(
10 Feb 2015 - 5:23 pm | जिन्क्स
एकाच वेळी तीन चार ऑफर्स घेउन निगोशिएट करण्याचा शुद्ध हावरटपणा
ह्यात हावरटपणा कसला?
10 Feb 2015 - 5:44 pm | रुस्तम
ह्यात हावरटपणा कसला? +१
10 Feb 2015 - 7:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तीन-किंवा चार कंपन्या तुम्ही जॉईन व्हाल हे गृहित धरुन त्या पदाच्या मुलाखती बंद करतात. आणि तुम्ही त्यांना चांगल्या ऑफरच्या अपेक्षेने झुलवत ठेवता. पर्यायानी तुमच्या पेक्षा काही गुणांनी मागे असणार्या प्रत्येक कंपनीमधल्या दोन नंबरच्या उमेदवाराची संधी तुम्ही घालवताय. हे मला तरी चुकीचं वाटतं. बाकी हा प्रत्येकाचा दृष्टीकोन झाला.
10 Feb 2015 - 10:38 pm | हाडक्या
हा व्यवसाय आहे (its just business!). तुम्ही १७५०० च्या वर द्यायला तयार नाही आहात, एकाची अपेक्षा १८००० आहे पण कामपण हवय. मग एखादा उगीच बाणेदारपणा वगैरे करायच्या भानगडीत न पडता तुमची ऑफर घेतो आणि इतर ठिकाणी १८०००+ मिळवायचा प्रयत्न करतो. तुम्ही पण ४ जणांची मुलाखत घेवून, निगोशिएट करूनच ठरवलेत ना मग दुसर्या बाजूलापण तो अधिकार (निदान सध्याच्या परिस्थितीत तरी) आहे हे मान्य करा ना. दुसर्या उमेदवाराची संधी वगैरे तकलादू मुद्दे आहेत, तेव्हा जास्त उहापोह करत नाही (तसेही तो उमेदवार पण काही याच संधीवर थांबला नाहीये).
म्हणून तुमच्या दृष्टीकोनाबद्दल तुम्ही पुनर्विचार करुच नये असे काही नाही. दृष्टीकोन सुधारत राहिले तरच त्यांना अर्थ.
11 Feb 2015 - 5:35 am | नगरीनिरंजन
ऑफर हातात असताना दुसरी चांगली ऑफर शोधणे वाईट नाही; पण एक ऑफर स्विकारुन (मराठीत ॲक्सेप्ट करुन) मग भलतीकडेच जाणे हे अनैतिक आहे.
11 Feb 2015 - 11:25 am | शेखर काळे
ऑफर दिली याचा अर्थ कुठेही बांधले गेलो असा नाही. ऑफर याचा अर्थ् असा की तुम्ही मला आवडलात आणि पुढे आपण बोलू.
जोपर्यंत स्वीकारपत्रावर सही होत नाही - दोन्हीकडून - तोपर्यंत दुसरीकडे शोधणे चांगलेच. जिथे तुम्ही जाणार तिथे, त्या पगारावर २-३ वर्षे तरी काम करणारच ना ? मग कमी पगार का स्वीकारायचा ?
शिवाय, कंपनीही ऑफर परत घेऊ शकते - माझ्या माहितीत असे झालेले आहे.
स्वीकारपत्रावर सही केली तरीही नोकरीच्या पहिल्या दिवसापर्यंत तेही तुम्हाला नाकारू शकतात अन् तुम्हीही.
11 Feb 2015 - 5:00 pm | हाडक्या
अर्थात.
10 Feb 2015 - 6:32 am | मुक्त विहारि
ह्या एच.आर. लोकांच्या अनुभवा बद्दल न बोलणेच उत्तम.
मग ते कुठल्याही प्रांताचे का असेनात.
12 Feb 2015 - 10:04 am | काळा पहाड
+१
एच आर वाले 'शुद्ध हरामखोर' या कॅटेगेरीत येतात.
10 Feb 2015 - 6:38 am | खटपट्या
अगदी खरंय !! एच आर कधी कधी नको तेवढा हस्तक्षेप करते. मी आणि माझा सहकारी एका प्रोजेक्ट्साठी एकदा मुलाखती घेत होतो. सपोर्ट प्रोजेक्ट होता. यात संभाषण चातुर्य आणी टेक्नीकल ज्ञान दोन्हीही आवश्यक होते. एक मुलगी संभाषणात खूप चांगली होती. तीला शिकायची तयारी आहे का विचारले आणी ज्युनीअर म्हणून सीलेक्ट केले. दुसरा एक मुलगा होता तो टेक्नीकली खूप स्ट्रोन्ग होता पण संभाषणकलेचे प्रशीक्षण द्यावे लागणार होते. त्याला टेक्नीकल लीड म्हणून सीलेक्ट केला.सीलेक्ट करताना मुलीला जुनीअर ईंजीनीअर म्हणून ठेवावे असा शेरा दीला पण एच आर ने त्या मुलीला सीनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली व जो मुलगा होता त्याला जुनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली.
10 Feb 2015 - 6:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आमच्याकडे एच.आर. म्हणजे बेक्कार डोकेदुखी आहे. मी नुकतचं रिझाईन केलयं. साधी एक्झिट प्रोसिजर सुरु करायला आठवडा घालवला तिनी. २८ फेब्रुवारी=वाढदिवस कम स्वातंत्र्यदिन.. \m/
10 Feb 2015 - 8:46 am | अगम्य
अभिनंदन. तुम्ही जे वर्णन करत आहात त्यावरून career करण्यालायक कंपनी दिसत नाही ती.
10 Feb 2015 - 3:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
असहमत.
मेकॅनिकल पॉवर ट्रान्स्मिशनमधे आशियामधे पहिली आणि ग्लोबल मार्केटमधे पहिल्या तीनमधे आहे. बाकी एच.आर. आणि सप्लाय चेन वाले छपरी आहेत हे खरं.
10 Feb 2015 - 4:16 pm | सौंदाळा
ग्रीव्ह्ज, प्रिमीयम एनर्जी ट्रान्स्मिशन ?
10 Feb 2015 - 4:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
व्यनि करतो...
11 Feb 2015 - 8:46 am | अगम्य
माझा रोख overall कंपनीकडे नव्हता. जिथे HR एवढा आडमुठेपणा करत असेल तिथे career growth ला (बढती, पगारवाढ वगैरे) अनेक अडचणी येऊ शकतात.एवढेच म्हणायचे होते.
10 Feb 2015 - 6:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
एक्झिट प्रोसिजर साठी कंपनी एम्प्लॉयमेंट फॉर्म पाठवला तिनी =))
10 Feb 2015 - 7:24 am | मुक्त विहारि
एच.आर. वाले आणि दुसरे सेफ्टी वाले आणि तिसरे सिक्युरिटी वाले.
बादवे,
एका कंपनीतला माझा एक्सिट इंटरव्ह्यु मी बियर पिता-पिता दिला होता.रम्य त्या आठवणी...
10 Feb 2015 - 5:52 pm | लॉरी टांगटूंगकर
कुठं हो ?? सी व्ही पाठवावा म्हणतो... एक्सिट इंटरव्ह्यु हे उशिरा वाचलं. :(
18 Oct 2015 - 10:35 am | पाटीलअमित
आयटी वाल्यांचे एवढे नशीब कुठे
10 Feb 2015 - 8:43 am | अगम्य
हे असे कसे होऊ शकते? ज्या department मध्ये नोकरी आहे, त्या department च्या management च्या संमतीशिवाय HR कसे काय ग्रेड देऊ शकतात? की असे झले की HR आपण सांगू त्या ग्रेड वर अडून बसले आणि technical management ने हाती आलेल्या उमेदवारांना घालवण्यापेक्षा HR देईल त्या ग्रेडला संमती दिली ?
10 Feb 2015 - 10:18 am | खटपट्या
एचार चे काही सान्गु शकत नाही. काहीही कारणे देतात. डीग्रीचे मार्क्स, दहावीचे मार्क्स अशी शुल्लक कारणे देतात. मार्कान्चा आणि टेक्निकल ज्ञानाचा आय्टीमधे तरी काही सबंध असतो असे मला वाटत नाही.
10 Feb 2015 - 11:43 am | अत्रन्गि पाउस
नसतोच !!
10 Feb 2015 - 10:03 am | जेपी
चांगलय...
10 Feb 2015 - 10:10 am | शित्रेउमेश
माझा अनुभव पण जवळपास असाच आहे.
काही दिवसांपूर्वी मी एका प्रतिष्ठीत कंपनी मध्ये इंटरव्ह्यु दिला होता.. टेक्निकल राऊंड (आता त्याला 'टेक्निकल' म्हणायचे की आणखी काही हा मोठा प्रश्न आहे. कारण मी अकाउंटंट आहे) पास झालो. ज्या व्यक्तीने इंटरव्ह्यु घेतला, त्याने सांगितलं होता, एच. आर. ऑफर पाठवतील म्हणुन... तब्बल ३ आठवडे वाट बघितली.. एकच उत्तर मिळायचे.... एच. आर. प्रोसिजर चालु आहे....
मधल्या काळात मी दुसरा इंटरव्ह्यु पास झालो आणि नोकरी वर रुजू पण झालो.... एच. आर. ऑफर अजुन मिळतीये.. (महत्त्वाची गोष्ट... नोकरी कनफर्म झाल्याची बातमी मला दिली होती.. फक्त एच. आर. कडुन ऑफर यायला प्रोब्लेम झाला...)
10 Feb 2015 - 11:12 am | मृत्युन्जय
मला इंटरव्ह्यु या प्रकाराचा फारसा अनुभव नाही. मोजुन ४ इंटर्व्ह्युअ दिले ११ वर्षाच्या करियर मध्ये. त्यातले २च एच आर ने घेतले. सध्याच्या कंपनीत १० वर्षे झाली पण इथे मुलाखत फक्त माझ्या बॉसने घेतली होती. एच आर चा इंटर्व्ह्यु वगैरे असला काही फालतु प्रकार नव्हता. मात्र त्याच्या आधी एका कंपनीत गेलो होतो मुलाखतील. आम्हाला दोघांना सिलेक्ट केल्यावर एच आर च्या माणसाने भाजीवाल्याशी बार्गेनिंग करावे तसे बार्गेनिंग केले आमच्या दोघांशी. मी आधी एका ठिकाणी आर्टिकलशीप करत होतो तिथेच तात्पुरता जॉइन झालो होतो. ते मला ५००० रुपये द्यायचे कारण ती माझी तात्पुरती गरज भागवण्यासाठी त्यांनी केलेली व्यवस्था होती. त्यात मला सांभाळुन घ्यायचाच भाग जास्त होता. या एच आर ने ते बघुन सी एस च्या पोस्टसाठी मला ७५०० ची ऑफर दिली. माझे टाळकेच सटकले. पण मला त्यावेळेस नौकरीची गरज होती. म्हणुन मी गुर्हाळ चालु ठेवले. १५००० वर अडुन बसलो. शेवटी १२५०० वर तोडपाणी केले. सिलेक्ट झालेल्या दुसर्याला १८००० पगार हवा होता. तो १५००० वर अडुन बसला (त्याला एक वर्षाचा अनुभव होता. मल अगदीच ३-४ महिन्याचा ते सुद्धा फर्म मध्ये). त्या एका कारणासाठी तो रिजेक्ट झाला. त्याने १२००० मान्य केले असते तर कदाचित त्याला घेतले असते. गुणवत्ता वगैरे गेली तेल लावत. मी ती कंपनी जॉईन केल्यावर चौथ्या दिवशी सोडली. एच आर आणि एम डी नी माझी लय तासली. शेवटी त्या दुसर्या उमेदवाराला १५००० पेक्षा जास्त देउन जॉईन करुन घेतले त्यांनी.
एच आर चा रोल कुठल्याही कंपनीत लिमिटेड च हवा. त्यांनी वेगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावे. कुणाला पोस्ट कुठली द्यावी आणि पगार कितपत द्यायला पाहिजे याचे थोडेफार तरी स्वातंत्र्य टीमलाच हवे. एच आर ने वर्किंग टीम चे मत लक्षात घेउन गरज पडल्यास मॅनेजमेंटशी चर्चा करुन पगाराबाबत अंतिम निर्णय घ्यावा पण टीम हेड ला पुर्ण डावलुन त्याने परस्पर निर्णय घेणे योग्य नाही.
10 Feb 2015 - 3:22 pm | विशाल कुलकर्णी
माझा पण एच आरचा अनुभव असाच. पण कधी-कधी एच.आर वाल्यांचा आडमुठेपणा सुद्धा आपल्या पथ्यावर पडतो...
२०११ मध्ये आमची जुनी कंपनी सद्ध्याच्या कंपनीने टेक ओव्हर केली. त्यावेळी ती जुनी कंपनी मेंबर असलेल्या फुग्रो गृपच्या दुसर्या एका कंपनीने मला चांगली ऑफर दिली म्हणुन तिथे जॉइन झालो. खरे तर पोर्टफोलिओ चेंज होत होता, पण मिळणारा पैसा चांगला होता, जुन्या कंपनीपेक्षा ३०% हाईक मिळत होती म्हणून स्वीकारला जॉब. त्यानंतर एक महिन्याने ज्या अमेरिकन कंपनीने आमची कंपनी टेक ओव्हर केली होती त्यांच्या एच.आर. कडून फोन आला, आहे तेच काम, तीच पोस्ट फक्त कामाचा एरीया वाढला होता. म्हणजे आधी फक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश होते माझ्याकडे. त्याच्याऐवजी पूर्ण भारत करावा लागणार होता. खरेतर आधीची पाच वर्षे मी तेच काम करत होतो. तरीसुद्धा टेक्नीकल इंटर्व्ह्यु घेतला गेला. त्यानंतर पुढच्या राऊंडला एच. आर. समोर बसलो. तर तो म्हणे तुम्हाला आधी जेवढा पगार मिळत होता तेवढाच मिळेल, होते त्याच स्केलवर पुढे कंटिन्यु केले जाईल. मी त्याला सांगितले की ," बाबारे, मला सद्ध्या ऑलरेडी त्यापेक्षा जास्त पगार मिळतोय. सद्ध्या या सर्व्हेीसेसची (ओम्नीस्टार डिफरेन्शिअल करेक्शनस) इन डेप्थ माहिती असलेला भारतात मी एकुलता एक इंजीनीअर आहे. मी फार काही मागत नाही पण सद्ध्या माझ्या नव्या कंपनीत जेवढे मिळतात तेवढेतरी (३०% हाईक) मिळायलाच हवी. अन्यथा मला स्वारस्य नाही."
"ते शक्य नाही" असे उत्तर एच.आर. कडून आले. मी धन्यवाद म्हणून बाहेर पडलो. त्यानंतर चार दिवसांनी नव्या कंपनीच्या भारतातील कंट्री मॅनेजरचा थेट फोन आला की तू ऑफर का नाकारलीस? मी स्पेशली एच.आर. ला तुझी शिफारस केली होती वगैरे... ही नवी कंपनी आणि आमची जुनी कंपनी प्रतिस्पर्धी असल्याने तो मला ओळखत होता बहुतेक. मी त्याला सांगितले की माझ्या अपेक्षा तुमच्या एच.आर. ला मान्य नाहीयेत.
त्यानंतर दुसर्या दिवशी मला परत एच. आर. चा फोन , इमेल पाठवलीय एक्सेलशीट चेक करा आणि कळवा. यावेळच्या एक्सेलशीट नुसार ४३% ची हाईक मिळाली होती. मी अजून थोडा आडमुटपणा करून ती ४५% पर्यंत वाढवून घेतली. :)
एक वर्षात भारतापुरते मर्यादित असलेले कार्यक्षेत्र नेपाळ, श्रीलंका, भुतान, बांग्लादेश असे विस्तारत जात आता त्यात मिडल एस्ट आणि युरोपचा काही भागही सामाविष्ट झालेला आहे. सुदैवाने आता रिपोर्टींग थेट कंपनीच्या ऑस्ट्रेलिया ऑफीसला असल्याने भारतीय मनोवृत्तीची झळ बसत नाही. वेळच्या वेळी योग्य प्रमाणात योग्य ते पर्क्स, इन्क्रीमेंट्स मिळत राहतात. एकंदरीत मज्जाय :)
10 Feb 2015 - 3:27 pm | सविता००१
हे तर मस्तच
10 Feb 2015 - 3:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत. एच.आर. ची ताकद थेट परफॉर्मन्स रिव्ह्युशी निगडीत असल्यानी एच.आर. ला थेट नडता येतं नाही.
एच आर चा रोल फक्त आणि फक्त एंट्री आणि एक्झिट पुरताच रहायला पाहिजे. बाकीचं काम त्या त्या डिपार्टमेंटच्या मॅनेजर्सनी हाताळलं तर योग्य उमेदवाराला न्याय मिळायची टक्केवारी नक्की वाढेल.
10 Feb 2015 - 11:19 am | अद्द्या
२ किस्से आहेत असे लक्षात
. . पहिल्या वेळी इंटरव्यू देत होतो . २ राउंड क्लियर केले होते . टेक्निकल आणि एच आर एकत्र घेतील असं सांगितलं कंपनीने . म्हटलं ठीक आहे . . टेक्निकल घेणारा मला ओळखत होता . पण इतक्या डिटेल मध्ये प्रश्न होते कि उत्तर देई पर्यंत वाट लागत होती . . १०-१२ प्रश्न झाल्यावर त्याने एच आर ला सांगितलं . " He's is good enough for my requirement . we can hire him . . "
इंटरव्यू च्या आधी मला समजलं होतं कि पगार १२-१५ हजार या रेंज मध्ये असेल .
एच आर ने जो आकडा सांगितल्या त्यावरून डोकं फोडून घ्यायचं बाकी राहिलं होतं . . " we can offer you 6K for a start . and then raise it by 500 after 6 months.. "
नाही म्हणून बाहेर पडलो . .
दुसरे वेळेस . . मी इंटरव्यू घेत होतो . . समोर बसलेली व्यक्ती ३-४ वर्ष अनुभव घेऊन आली होती . . लिनक्स मध्ये बरीच पोचलेली होती बाई . मला असंच कोणी तरी हव होतं . . तास भर इंटरव्यू आणि मग पगार आणि Batch टायमिंग वर बोलून झाल्या नंतर एक आकडा फिक्स झाला . आणि तेवढ्यात डायरेक्टरच्या बायकोचा इंटरकॉम वर फोन . . "Send her to my cabin" . पाठवून दिलं . . मला वाटलं जनरल काही तरी चौकशी करेल . कारण जवळपास सगळं मी आणि एच आर नि बोलून घेतलं होतं . . फक्त ऑफर लेटर द्यायचं राहिलं होतं . .
पाच मिनिटांनी आलेली मुलगी बाहेर पडली . आणि आमच्या मेडम सांगत आल्या . . तिला नका घेऊ नोकरी वर . . तिने मला ओळखलं पण नाही . .
10 Feb 2015 - 11:30 am | सविता००१
मीही अकाउंटंट च आहे. इंटर्व्ह्यू मस्त झाला. मग नेहमीप्रमाणे एच आर च्या ऑफर ची नाटकं. काही कळेना तेव्हा मी दुसर्या कंपनीला हो म्हणाले. आणि त्याच दिवशी दुपारी या एच आर चा फोन. मी सांगितलं की आता मी येउ शकत्त नाही, तर म्हणाला की तिकडे बाँड साईन केला नाहीये ना? मग आम्हाला उशीर झाला वगैरे काय म्हणताय? इतकी चांगली कंपनी तुम्हाला बोलावतेय वगैरे मग्रुरी. मग सरळच सांगितलं की तुमची कंपनी छान आहे म्हणूनच आले होते इन्टर्व्हू ला. आणि सिलेक्ट झाले ते मला येतय म्हणून. कं छान आहे म्हणून नाही. आणि आता तुम्हाला शब्दाची किंमत नसेल तरी मला आहे. मी त्या दुसर्या कं ला सांगितलं आहे हो म्हणून.मी येणार नाही. तरी त्याला काही वाटत नव्हतं आपलं चुकलंय. आपल्याकडून उशीर झालाय म्हणून.
10 Feb 2015 - 11:33 am | विजुभाऊ
एच आर सगळीकडे असेच.
एका कम्पनीने बॅग्राउंड चेकिंग च्या नावाखाली माझ्या वडिलाना फोन करुन मी त्यांचाच मुलगा आहे का याची चौकशी केली होती. माझे वय चाळिशीच्या पलिकडचे माझ्या वडिलांचे वय सत्तरीपलिकडले आहे.
हे कसले ब्याग्राउम्ड चेकिंग विचारत त्या कम्पनीच्या एच आर कडे तक्रार केल्या नंतर ती त्यांची रेग्यूलर प्रोसेस आहे असे सांगितले गेले.
कप्पाळावर हात मारणे इतकेच बाकी होते
17 Oct 2015 - 11:10 pm | पाटीलअमित
Capgemini असणार
10 Feb 2015 - 11:47 am | टिनटिन
कोणाला फायरिन्गचा अनुभव आहे का ? करण्याचा अथवा होण्याचा. अनुभव ऐकायला आवडेल.
10 Feb 2015 - 11:51 am | अत्रन्गि पाउस
स्वतंत्र धागा टाकतो लौकरच ...
10 Feb 2015 - 11:50 am | अत्रन्गि पाउस
हे शरू रांगणेकरांचे पुस्तक (वाचले नसल्यास किमान एकदा / असल्यास पुन्हा एकदा): वाचा *LOL*
10 Feb 2015 - 12:34 pm | कैलासवासी सोन्याबापु
आमच्या "कंपनी" ने असले काही बारगेनिंग ठेवलेच नाही हो!!! "क" तुमचा बेसिक अन "क्ष" तुमचा ग्रेड पे! ऑल इंडिया ट्रान्सफर ची तयारी हवी!! पटले तर बोला नाही तर रामराम!! सरळ सोट मामला!!!
10 Feb 2015 - 12:50 pm | बाबा पाटील
मी एका नामंकित मल्टीपल आयुर्वेद क्लिनिक चालवणार्या कंपनीत मुलाखत दिली होती,बाबाने मला २२००० पगार ऑफर केला होता.त्यावेळी माझ्या गाडीचाच खर्च महिन्याकाठी ३० ते ३५००० च्या आसपास होता,त्यावेळी त्या बाबाला विचारले महाराज,एव्हडया कमी पगारात मी काय करु त्यावरुन महाराजांनी उत्तर दिले तुमची स्वतंत्र प्रॅक्टीस असली तरी,तुम्हाला कंपनी लेव्हलहा काम करण्याचा अनुभव नाही. मला खरच हसु आवरल नाही,आणी तेथेच वेड्यासारखा हसायला सुरुवात केली, आणी काही क्षणातच मुख्य मुलाखतकर्ता माझ्या हसण्यात सामिल झाला,ऑफर देणारा मात्र उठुन तेथुन निघुन गेला. परत काही असल्या फंदात पडलो नाही.
10 Feb 2015 - 1:28 pm | कपिलमुनी
कोनती गाडी किती किमी चालवता ?
10 Feb 2015 - 8:21 pm | बाबा पाटील
एव्हड वैयक्तिक घुसु नये. तुमच्या माहितीकरिता मी फक्त वैद्य नाही. बरेच रिकामे धंदे करतो,भेटायची इच्छा असेल तर येवुन भेटा,सत्कार करु की तुमचा.
10 Feb 2015 - 9:01 pm | मृत्युन्जय
तेच म्हणतो मी. पेट्रोलचा माझा खर्चही महिन्याला दहा एक लाख तर होतच असेल. मी तर फारसे धंदे सुद्धा करत नाही.
10 Feb 2015 - 9:20 pm | बाबा पाटील
त्यात गाडीचा हप्ता आणी डिझेल व मेंटेनन्स पण येतो.
10 Feb 2015 - 10:08 pm | टवाळ कार्टा
पाटीलसायेब ... तुम्ही दंबूक घेउन शांतपणे सत्कार कर्ता??? =))
12 Feb 2015 - 11:20 am | काळा पहाड
ते दंबूक घेवून 'शांत' करतात. सत्कार मग चित्रगुप्त साहेब (मिपा वरले नव्हे, वरचे) करतात.
12 Feb 2015 - 3:13 pm | हाडक्या
टका.. तुझा सत्कार करुन पायजे काय रे ? ;)
12 Feb 2015 - 4:14 pm | टवाळ कार्टा
नक्को....दंबूकवाल्यांपासून लांबच रहातो मी :)
12 Feb 2015 - 6:14 pm | काळा पहाड
त्यांची दंबूक लांब आहे. ते लांबूनच "सत्कार" करू शकतात. सांगावं काय?
12 Feb 2015 - 7:32 pm | टवाळ कार्टा
_/|\_
12 Feb 2015 - 7:33 pm | टवाळ कार्टा
तुम्ही बघितली काय? :)
12 Feb 2015 - 7:49 pm | काळा पहाड
नाही. ते फक्त असे प्रश्न त्यांना विचारणार्यांचाच "सत्कार" करतात
ता.क. समजा तुम्ही कधी तशी चूक केलीच आणि त्यांनी दंबूक काढायला हात लांब केला, की मग गडबडीने त्यांना आयुर्वेदावरचे प्रश्न विचारा. मग ते दंबूक ठेवून देतात आणि कडू काढा देतात.
13 Feb 2015 - 4:50 pm | हाडक्या
टकाच्या निरागस प्रश्नात फारच गहन अर्थ लपलाय असे नमूद करतो.. ;)
(बादवे, सगळेच डॉक दंबूक घेउन "शांतपणे" सत्कार करतात की काय अशी शंका आलीय मनात. )
13 Feb 2015 - 5:24 pm | टवाळ कार्टा
नाय ब्बॉ...माझ्या निरागस मनाने विचारलेल्या निरागस प्रश्नात फक्त निरागसच अर्थ दडलेला होता...त्यात गहनपणा आणण्याचे सारे श्रेय तुम्हालाच :)
11 Feb 2015 - 11:32 am | कपिलमुनी
तुमी खर्च साम्गितला म्हणून आश्चर्याने इचारला ..
बाकी वैयक्तिक घुसण्यात असा काय इम्टरेस्ट नाय ..
10 Feb 2015 - 1:11 pm | राजे साहेब
सध्या इंजिनिअरला वाईत्ट दिवस आले अहेत, १०००००*४ =४००००० इत्की फी भरुन पन काय मिल्ते ६०००/- महिना देतात का तर म्हने मन्दी आहे हे स्व्था मात्र गलेलट्ट पगार घेतात कॅप्टन जॅक स्पॅरो यान्च्या कंपनीमधे उमेदवार जे बोल्ला ते तो सग्ल्या इंजिनिअरच्या वती ने बोल्ला, मी स्व्था पन खुप खस्ता खल्ल्या अजुन खातोच आहे, बर्याच थिकानी तर ओलख मागतात नसेल तर तुम्ह्ही लायक नही असेल तर तुम्ही;लायक ज्यानी मेह्नत घेत्ली इंजिनिअरिन्ग्ला त्य्नाचे पैसे आनी मेह्नत वाया, ज्या कूतुम्बाची परिस्तिथि नस्ते तरी पन ते मुलाला इंजिनिअर कर्तात का तर आप्ले दिवस बदल्तील पन त्याना कुथे माहीत अहे परिस्थिती, ३ मुर्ख मध्ये काय दाख्व्ले ते पन अपन बघ्तो वाच्तो आत्म्यहत्या केली मान्सिक खच्चिकरन झाल्यवर वेगले काय होनार, इंजिनिअरिन्ग होत होत नाकिनाऊ येतात सगल्यना वात्त इंजिनिअरिन्ग झाले आता चान्ग्ले दिवस्स येनार पन मग खरी रेस सुरु होते , जोब हवा CONSULTANCY ला भ्ररा पैसे ,काय हवा mnc की pvt ltd. दोघान्चे भाव वेग्ले नोकरी हव्वी ना अनि गरज्वन्त इंजिनिअरला अक्क्ल नस्ते.
मी या आधी एका मोट्ह्या ****** ग्रोउप मधे होतो contract १ वर्श काध्ला एच आर सगळीकडे असेच आहो इंजिनिअरला आनी नोनइंजिनिअरला एकाच पार्द्यात मोजत् आहात अस्स अस्त तर मग इंजिनिअरिन्ग का ???? जिथे नोनइंजिनिअर ३०,००० काम्व्तो अनि इंजिनिअरला ८०००/- :(
ज्यान्ची ओलक अहे ते ४००००/- घेत अहेत त्याना किती येते विचारा बर इंजिनिअरिन्ग कशी पास केली जाते सगल्या इंजिनिअरला महित आहे.
अजुन बोललो तर जागा पुरनार नही आवरतो घेतो जाता जाता एकाच सान्गाव वाट्त आहे दुस्रे काही व्हा पन इंजिनिअर होउ नका
काय व्हाय्चे ते वर्च्या थ्रेअद मधे अहेच: ;)
खुप चुका आहेत पन साभालुन घ्यावे
10 Feb 2015 - 1:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
आतापर्यंत "मोकलाया... " पद्धत विडंबन कवितांमध्ये दिसत होती. आता ती प्रतिसादांमध्ये रुजू लागताना दिसत आहे ;) +D
10 Feb 2015 - 1:38 pm | असंका
:-))
10 Feb 2015 - 2:15 pm | टवाळ कार्टा
सग्ल्य एन्जिनीर लोकन्च्य मनत्ले बोल्लत...अज खुप दिवसन्ने मझ्यच मनतले कोनि बोलुन मन मोक्ले मोक्ले केल्यसर्खे वत्ले...एक एन्जिनीर एन्गिनीरिन्ग कस पुर्न कर्तो ते त्यलच महित...हि दुनिय गेलि तेल लवत
10 Feb 2015 - 2:52 pm | सविता००१
:))
इतकं असं टायपायला त्रास नाही होत?????????????
10 Feb 2015 - 3:00 pm | टवाळ कार्टा
रजे सहेबन्सथि अज्पन उद्यपन पर्वपन कय्पन =))
10 Feb 2015 - 4:12 pm | राजे साहेब
काय करता टवाळ कार्टा दुस्रा पनिपत आहे बाकी आप्ला लोभ बघुन भरुन आल :)
10 Feb 2015 - 4:28 pm | टवाळ कार्टा
थन्क योउ :)
11 Feb 2015 - 5:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्रास तर होतोच म्हणा ! पण दुसर्याला हसवायचा परोपकारी स्वभाव गप्प बसू देत नाही त्याला काय करणार ? ;) :)
12 Feb 2015 - 10:03 am | सविता००१
तसा टका आहेच परोपकारी...
णो डाउट्ट ;)
12 Feb 2015 - 11:07 am | टवाळ कार्टा
:)
तसे नै हो...मिपा माझा स्ट्रेस बस्टर आहे :)
10 Feb 2015 - 4:23 pm | बॅटमॅन
मलहि असच वत्ल....मिपकरन्कदे लक्श देउ नक हो, जर तवलखोर अहेत लोकं. पन बकि कहि म्हन, मल पन असे तन्कुन लै म्हन्जे लै म्हन्जे लय्च मज्य अलि.
18 Oct 2015 - 9:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मित्रा वाक्या वाक्याशी सहमत. फक्त लिहित रहा, हळुहळु लेखन सुधारेल. दिवस बदलतात. नेटाने प्रयत्न कर.
10 Feb 2015 - 2:34 pm | विटेकर
तुमचे दुखणे योग्य आहे , लाखो रुपायची फी भरुन इन्जिनीयर व्हायचे आणि नोकरी नाही ही भयावह परिस्थिती आहे हे मान्यच करायला हवे. त्याचाच परिणाम म्हणून निदान महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालये आता ओस पडू लागली आहेत. या सगळ्यात मुख्य मुद्दा आहे तो गुणवत्तेचा ! भारंभार लोक इन्जिनीयर होतात पण त्यापैकी किती लोक "खरे" इन्जिनीयर असतात ? मी एका प्रतिथयश महाविद्यालयात आटो मध्ये बी ई केलेल्या पोरा-पोरीच्या मुलाखती घेत होतो ... भयाण परिस्थिती होती ...एकाला विचारले की गाडीतल्या कोणत्या भागासंदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारु ?
त्याने सांगितलेल्या विषयातील अगदी प्राथमिक जुजबी माहीती देखील त्याला नव्हती !! एच आर वाला इतका कंटाळला की त्याने शेवटी विचारले की सायकल चा पंक्चर कस काढतात हे साम्गता येईल का ?
तेव्हा गुणव्त्तेची वानवा हे खरे दुखणे आहे ... एकदा आय टी हमालांची सद्दी संपली की इम्जिनीयर लोकांची अवस्था वकिलांसारखी होईल .. पैशाला पासरीभर !
अस्तु , तरीही अनुभवाच्या जोरावर हे नक्की म्हणू शकतो की Educational career has nothing to do with professional career ! जगात / नोकरीत यशस्वी होण्याची सूत्रे इंन्जिनीयरिन्गच काय आपल्या कोणत्याच अभ्यासक्रमात नाहीत ! ती आहेत आपल्या विजिगिषु वृत्तीमध्ये ! इन्जिनीयर चे शिक्षण घेतले म्हणजे त्याच व्यवसायात राहीले पाहीजे असे नव्हे !
सो डोन्ट लूज योउर हार्ट ! प्रयत्न करत राहा ....मार्ग सापडेल , उत्तम दिवस येतील. सर्वात महत्वाचे चांगुलपणावरची श्रद्धा सोडू नका ! कोणतेच दिवस कायम रहात नाहीत.
10 Feb 2015 - 2:46 pm | असंका
:-))
इंग्लिश मधून विचारलं का मराठीतून?
10 Feb 2015 - 3:03 pm | विटेकर
विन्ग्रजीत
10 Feb 2015 - 4:32 pm | राजे साहेब
विटेकर साहेब १००% अग्री मार्ग सापडेल,उत्तम दिवस येतील मन्हुन तर जगतो आहे :)
लोभ असावा.
10 Feb 2015 - 5:46 pm | रुस्तम
कोणतेच दिवस कायम रहात नाहीत. बाडीस...
10 Feb 2015 - 2:43 pm | ज्ञानोबाचे पैजार
http://mynoticeperiod.com/
या प्रकारा बद्दल काय वाटते?
Looking for better job? In your notice period? Perfect!
याच ओळींनी तुमचे साईटवर स्वागत होते.
पैजारबुवा,
10 Feb 2015 - 4:03 pm | कपिलमुनी
एका टॉप ३ कंपनी,अधे जॉइन होताना १० वेळा हो मोजून १० वेळा कॉलवर घासाघीस केली आहे.
फॅशन स्ट्रीट सारखा जमत नाही म्हणून सोडून दिल्यावर २ दिवसांनी पुन्हा एच आर ने कॉल केला होता .
10 Feb 2015 - 11:32 pm | पिलीयन रायडर
का कोण जाणे.. मला माझ्या कंपनीने मला दिलेली ऑफर नेहमीच अपेक्षेपेक्षा मोठी वाटली आहे!! एकदा ऑन बोर्डिंग मध्ये एकांनी प्रश्न विचारला, "तुमच्यापैकी कुणाला आहे तो पगार चांगला वाटतोय?".. कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे?
मुळात मी कामच इतकं निवांत करते की जे देतात तेच मला उपकार वाटत आहेत!!!
बाकी एच.आरवाले काहिही कामाचे नाहीत हे सार्वत्रिक मत आणि त्रिकालाबाधित सत्य आहे..
11 Feb 2015 - 3:43 am | निशदे
"" कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे?
""
*LOL*
माफ करा पण सगळ्या प्रतिसादात एकदम भाबडेपणा, समाधानी वृत्ती आणि झालेला पचका एकत्र आला त्यामुळे हसू आवरले नाही.
"" आता समाधानी असण्यात काय चुक आहे? ""
काहीही नाही.
11 Feb 2015 - 10:06 am | मित्रहो
हा लेख वाचून मला माझ्या पहील्या नोकरीचा किस्सा आठवला
स्थळ खाजगी डिप्लोमा कॉलेज
पगार १९२० रुपये प्रति महीना
खरी गोम पुढे.
ओरीजनल डॉक्यमेंटस कॉलेजात जमा करायचे का तर तुम्ही वर्षभर नोकरी सोडू नये म्हणून. वेठबिगारी.
11 Feb 2015 - 11:33 am | कपिलमुनी
ओरीजनल डॉक्यमेंटस जमा करायला बर्याच ठिकाणी सांगायचे पूर्वी !
पण नोकरी सोडताना फार त्रास होतो !
11 Feb 2015 - 5:03 pm | हाडक्या
ते बेकायदेशीर आहे. तक्रार केलीत तर कंपनी आयुष्यातून (तिच्या) उठू शकते.. :)
11 Feb 2015 - 5:10 pm | कपिलमुनी
डॉक्युमेंट जमा केले आहेत या विषयी कुठेही लेखी उल्लेख नसतो !
त्यामुळे तक्रार करता येत नाही.
ते डोक्युमेंट 'वसूल' करायला लागतात.
11 Feb 2015 - 5:44 pm | टवाळ कार्टा
बर्याच कंपन्या करतात हे...तक्रार कुठे करायची?
11 Feb 2015 - 6:06 pm | अनुप ढेरे
मोदींकडे किंवा केजरीवालकडे.
11 Feb 2015 - 8:05 pm | मित्रहो
कल्पना होती म्हणूनच मी जमा केले नाही. दीड महीना काम केले. पंधरा दिवसांचा पगार मिळाला पण नंतरच्या महीन्याचा नाही दिला. शेवटी नोकरी सोडून दिली. त्यानंतर कोणी डॉक्युमेंटस मागितले नाही की मी दिले नाही.
12 Feb 2015 - 9:36 am | विटेकर
काळ - नोव्हे १९८८
स्थळ - आमच्या कोलेजची केमिस्ट्री ल्याब
वेळ - सकाळी १०
मुलाखत घेणारे - एका प्रसिद्ध दुचाकी बनविणार्या कंपनीचे विभाग प्रमुख आणि एच आर प्रमुख , दोघेच !
मुलाखत देणारे - १६ मुले - २ मुली
मेरिट प्रमाणे अस्मादिकांचा पहिला नंबर !
पूर्ण मराठीत संभाषण :
प्रश्न : नांव काय ?
मी : पूर्ण नाव सांगितले
विभाग प्रमुख : (माझे गुण पत्रक न्याहाळीत ) तुला मार्क चांगले आहेत.. वर्गात पाचवा नंबर .. तुला सगळे येत असणारच !
मी : .. हो ( मनात .. च्यायला रात्रभर फुकट्च तयारी केली )
विभाग प्रमुख : क्क्ष्क्ष्क्ष्क् .. येथे नोकरी आहे .. येणार का ? की सहा महिन्यात पळून जाणार ?
मी : नाही सर
एच आर : आवाज मोठ्ठा आहे का तुमचा ? ओरडता येते का ?
मी : नाही म्हणजे आहे तसा मोठ्ठा ... येईल ओरडता..
एच आर : ओरडा बघू अमुक अमुक( त्यांचे स्वतः चे नाव ) म्हणून
मी: (मोठ्ठ्यांदा ) श्री अमुक अमुक
एच आर : शिव्या देता येतात का ?
मी : ... बावळटासारखे त्यांच्या तोंडाकडे पाहीले ..
एच आर : घाबरू नका .. शिव्या द्यायला सांगणार नाही ...!
मी : येतात शिव्या द्यायला !
एच आर : ठीक आहे ... निकाल कधी आहे ? निकाल लागला की कंपनीत येऊन अपोईन्ट्मेन्ट लेटर घेऊन जा .
मी तसाच बावळटासारखा खुर्चीवर बसलो होतो !!
ते दोघेही खुर्चीतून उभे राहीले... मी त्यानंतर उभा राहीलो , हात मिळवला ..थान्कु असे पुटपुटलो आणि बाहेर पडलो..
त्यानन्तर १५ दिवसांनी निकाल लागला , क्म्पनीत जाऊन पतर घेऊन आलो आणि पुढच्या एक तारखेला जोइन झालो ..
या कंपनीत मी साडे सहा वर्षे यशस्वी नोकरी केली.. दोन प्रमोशन्स झाली माझी इथे ! कामगारांचे प्रचंड प्रोब्लेम होते .
दोनवेळा कामगारांनी माझी प्रतिकात्मक अंतयात्रा काढली . एकदा तर आठदिवस ऐन दिवाळीत मला कंपनी सुरक्षा कर्मचार्याचे संरक्षण होते ...