http://www.misalpav.com/node/1844 भाग १...
काही सिनेमे असतात त्यांवर अवांतर गप्पा ठोकता येतात.. त्यासाठी हा धागा काढला होता, आधीच्या धाग्याचे पान भरल्याने नवीन भाग २ काढला आहे....
______________________________
रब ने बना दी जोडी हा आदि चोप्राचा सिनेमा मी पाहिला ... नवरा मिशी काढून केस फेंदारून टाईट टी शर्टमध्ये आला म्हणून बायको त्याला ओळखत नाही असे एक गृहितक मान्य केले तर सिनेमा पाहता ये ईल.... त्या नव्या माणसाच्या भूमिकेची शाहरूखने अत्यंत ओव्हरऍक्टिंग करून वाट लावली आहे... पण आधीचा सुरिंदर साहनी त्याने अप्रतिम उभा केलाय.... पण त्या भूमिकेला पटसमय ( स्क्रीन टाईम ?) खूप कमी आहे .... दुसर्या भागात तर तो फार कमी दिसतो...
..... बाह्यरूपापेक्षा तुमच्यावर प्रेम करणार्या माणसाचे मन समजून घ्या आणि प्रेम करा वगैरे संदेश या सिनेमातून मला मिळाला..
धन्यवाद .. जय हिंद ..जय महाराष्ट्र
प्रतिक्रिया
16 Dec 2008 - 4:42 pm | अवलिया
घाई घाईत लिहिलेला लेख वाटत आहे. तसेच आपण अप्रकाशितच ठेवला आहे का ? कारण कोप-यात किल्ली दिसत आहे.
नवरा मिशी काढून केस फेंदारून टाईट टी शर्टमध्ये आला म्हणून बायको त्याला ओळखत नाही असे एक गृहितक मान्य केले तर सिनेमा पाहता ये ईल असे आपण म्हटले आहे. परंतु हिंदि सिनेमा पहातांना मी डोके नेतच नाही त्यामुळे काहिही गृहितक धरण्याची गरज नाही असे वाटते. कारण मी मनमोहन देसाई चा कट्टर चाहता आहे.
मनमोहन देसाई आणि अमिताभ बच्चनने अनेक पिक्चर काढले ते मी ब्लैकने पण पाहिले असले तरी कोणतेही गृहितक त्यात धरलेले नव्हते. जो मनुष्य मनमोहनचे पिक्चर पाहु शकतो तो कोणतेही पाहु शकतो असे मला वाटते
बाह्यरूपापेक्षा तुमच्यावर प्रेम करणार्या माणसाचे मन समजून घ्या आणि प्रेम करा वगैरे संदेश या सिनेमातून मला मिळाला असे आपण सांगितले. खरेतर आपल्या संतांनी पण हेच सांगितले आहे. का रे भुललासी वरलीया रंगा असे तुकाराम (चु भु दे घे) महाराजांनी सांगितले आहे. खरे तर आपण आपल्या रोजच्या जीवनात संतांनी सांगितले तसे वागलो तर समस्या येणार नाहीत. परंतु आपण जेव्हा सिनेमात सांगितले, मालिकेत पाहतो तेव्हाच ते आपल्याला पटते. ही चुकीची पद्धत आहे असे मला वाटते.
तुम्ही अवांतर गप्पा ठोकता येतात असे लिहिले असले तरी हा प्रतिसाद अवांतर नाही असे मी समजतो.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
16 Dec 2008 - 4:45 pm | घाटावरचे भट
मास्तर,
हे लेखन अपूर्ण/अप्रकाशित आहे की एवढंच आहे? नाही म्हणजे हे सध्या फॅशनमध्ये असलेल्या 'एक वाक्यात काथ्याकूट' सारखं काही आहे असं वाटलं (कृपया ह. घेणे :)). आजकाल मिपाच्या सर्व्हरवरील जागेची फारच चिंता पडलेली दिसत्ये लोकांना. तात्या यात लक्ष घालतील तर बरं होईल, कसें?
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
16 Dec 2008 - 4:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काही सिनेमे असतात त्यांवर अवांतर गप्पा ठोकता येतात..
जियो मास्तर!
रब ने बना दी जोडी हा आदि चोप्राचा सिनेमा मी पाहिला
मास्तर, का? का असं करावं तुम्ही??
.. असे एक गृहितक मान्य केले तर
याचा अर्थ तुम्ही हे गृहितक मान्य केले तर! (माझ्या दातांचं काय आता?)
..... बाह्यरूपापेक्षा तुमच्यावर प्रेम करणार्या माणसाचे मन समजून घ्या आणि प्रेम करा वगैरे संदेश या सिनेमातून मला मिळाला..
समजून घ्या आणि कोणावर प्रेम करा, ते अंमळ नीट सांगाल का मास्तर?
या असल्याच पठडीतला 'होगी प्यार की जीत' नावाचा शिनेमा मी आख्खा पाहिला होता. त्यात आयेशा झु़ल्का, काजोल, जॅकी श्रॉफ आणि अतुल अग्निहोत्री आहेत. प्रेम एकावर करा आणि घरच्यांच्या इच्छेखातर एकदाच भेटलेल्या माणसाशी लग्न करा. मग आत्या थोड्या काड्या करेल आणि मग आपल्या-आपल्या लग्नाच्या जोडीबरोबर सुखात रहा असा काहीसा संदेश त्यात होता.
असाच एक मराठी पिच्चर पन हाये. त्यात अल्का बुकल आहे. बाकी काही आठवत नाही.
बाकी यावेळच्या "परिक्षणात" फटाके नाही फुटले, मजा नाय. "अगो त्याचे पाळण्यातले नाव बेंबट्या नव्हे, त्याचे नाव धोंडू! परत घेच तू नाव!", या चालीवर मास्तर पुन्हा एकदा परीक्षण कराच!
16 Dec 2008 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार
>>या असल्याच पठडीतला 'होगी प्यार की जीत' नावाचा शिनेमा मी आख्खा पाहिला होता. त्यात आयेशा झु़ल्का, काजोल, जॅकी श्रॉफ आणि अतुल अग्निहोत्री आहेत.
== आमच्या माहिती प्रमाणे १९९९ साली आलेल्या ह्या शिनीमा मंधी अजय उर्फ महादेव देवगण , नेहा , अर्शद वारसी , मोहन जोशी हे कलाकार होते !
आपण ज्या शिनीमा विषयी बोलत आहात तो 'होते होते प्यार हो गया' हा आहे. आपण नाव विसरलात ह्यात काही आश्चर्य नाहि कारण आजकाल शिनीमाच लक्षात ठेवण्याच्या लायकीचा नसतो.
वरिल माहिती ही चुक दुरुस्त करण्यास दिली असुन ति अवांतर नाहिये तर समांतर आहे.
हुकुमावरुन
स्वतः हजार चुका करत लोकांच्या चुका शोधण्यात धन्यता मानणारा.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
16 Dec 2008 - 7:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा, प.रा., बरोबर. त्या पिच्चरचं नाव "होते होते प्यार हो गया" असंच होतं. त्यात अरुणा इराणीनी काय भारी काम केलं होतं ना? तसल्याच मराठी पिच्चरचं नाव कोणाला माहित आहे काय?
16 Dec 2008 - 8:37 pm | मनस्वी
त्यात बहुतेक अशोक सराफ वडिल आणि अजिंक्य देव - किशोरी शहाणे, प्रशांत दामले - निशिगंधा वाड अशा जोड्या आहेत.
16 Dec 2008 - 8:48 pm | परिकथेतील राजकुमार
>>त्यात बहुतेक अशोक सराफ वडिल आणि अजिंक्य देव - किशोरी शहाणे, प्रशांत दामले - निशिगंधा वाड अशा जोड्या आहेत.
== त्यो येगळा शिनीमा हाये ! त्यात पत्रिका , मंगळ, लग्नानंतर नवरा मरणार असली भानगड आहे ! तुम्ही म्हणताय तो शिनीमा म्हंजी 'वाजवा रे वाजवा' , त्याचे कथानक फार वेगळे आहे.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
16 Dec 2008 - 10:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी म्हणत्ये त्या पिच्चरमधे अशोक सराफ आहेच, हिंदीमधल्या अरूणा इराणीचं क्यार्याक्टर अशोक सराफने केलंय, काड्या घालण्याचं!
16 Dec 2008 - 11:30 pm | यशोधरा
>>परत घेच तू नाव!",
परत घेस तें नाव, खुळी की काय हीं, नवर्यास बेंबट्या म्हणते...
पुलंच्या पुस्तकातलं आठवलं म्हणून लिहिलं.. अवांतर आहेच, पण मास्तरांनीच परवानगी दिली ना अवांतर गप्पा ठोकायची... :)
17 Dec 2008 - 3:58 am | पिवळा डांबिस
"समोरच्या कोनाड्यात, उभे भडकमकर मास्तर,
बेकार पिच्चरला लावतात, परीक्षणाचं अस्तर"
:)
17 Dec 2008 - 7:00 am | मुक्तसुनीत
ठ्ठो !!! =))
जबरी !!!
17 Dec 2008 - 9:31 am | अवलिया
:?
डांबिसखान जोरात .... शिवास ?
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
17 Dec 2008 - 9:54 am | भडकमकर मास्तर
"समोरच्या कोनाड्यात, उभे भडकमकर मास्तर,
बेकार पिच्चरला लावतात, परीक्षणाचं अस्तर"
हाहाहाहा...... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Dec 2008 - 12:27 am | मेघना भुस्कुटे
जियो मास्तर!
मी जरा उशिरानंच 'दोस्ताना' पाहिला. त्यात आचरटपणाच इतका आहे, की या धाग्याच्या क्रायटेरियात तो बसेल की नाही इथूनच शंका आहे.
17 Dec 2008 - 2:27 am | भडकमकर मास्तर
दोस्तानाचा आचरटपणा पहायचा राहिलाय....
त्याबद्दल कोणीतरी लिहा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Dec 2008 - 9:23 am | अवलिया
नाही. कशावरही काहीही लिहायचा हक्क तुमचाच आहे.
तुम्हीच लिहा आम्ही +१ सहमती देतो
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
17 Dec 2008 - 3:01 am | मुक्तसुनीत
हल्ली पडद्यावर चालत असणार्या गोष्टीत काहीही बुल्शिट (पक्षी : फालतू) निघाले तर पहायचा धीर राहिलेला नाही. एकेकाळी काहीही पहायचो ! आता ठराविक वेळात जे पहायचे ते पहायला मिळते. त्यामुळे मित्र-मैत्रिणींच्या सल्ल्यावर खूपसा अवलंबून असतो. (अशावेळी "द वेनस्डे" (पक्षी : बुधवार!) सारख्या चित्रपटांमधेही , आपले मत आपल्या मित्रांप्रमाणे नसल्याचे प्रत्यंतर येतेच !) त्यामुळे लेटेस्ट (पक्षी: आधुनिकतम)चित्रपटातला गाळसाळ बिलकुल पहात नाही . अक्षयकुमार , रीतेश महाजन , गोविंदा (याचे गेल्या दहा बारा वर्षातले चित्रपट) , सलमान , हृतिक रोशन , रामगोपाल वर्मा (अपवाद : सरकार) , बच्चन (अपवाद : खाकी ) , करण जोहर , भन्साळी , सुभाष घई या सार्यांची ऍलर्जी (पक्षी : वावडे) आहे. बाकी हिंदी सेक्स कॉमेडीज (पक्षी : लैंगिक हास्यात्मिका) , किंवा नुसत्याच कॉमेडीज (पक्षी : हास्यात्मिका)किंवा नुसताच सेक्सवाला (पक्षी : लैंगिक)कचरा या सार्यापासून हजारो मैल दूरच. (जोधा और अकबर मी केवळ कोलबेर करता पाहिला ! लेख वाचला ...भयानक हसलो. मग चित्रपट आणला. आणि त्यात लेखाचे संदर्भ आठवल्यामुळे वाईट हसलो ! )
एवढे करूनही , आवडलेल्या चित्रपटांमधेही अनेकदा खाचाखोचा आढळतातच.
"रॉक ऑन" मी मिपाकरांच्या सल्ल्यावरून पाहिला. एकूण संकल्पना आवडली . पण वुइक पॉईंट्स (पक्षी : कच्चे दुवे )म्हणजे : दिल चाहता है मधल्या रियुनियनच्या थीमची (पक्षी : पुनर्मीलनाच्या केंद्रवर्ती प्रतिकाची )छाया, फरहान अख्तरचा आवाज. मुख्य म्हणजे , चित्रपट ज्या "रॉक संगीत"(पक्षी : दगड-धोंडे सदृष संगीत) या संकल्पनेवर आधारलेला आहे , नेमकी तीच बाजू लंगडी ! शहाना गोस्वामी ची डायलॉग डेलिव्हरी (पक्षी : संवादफेक), डिक्शन (पक्षी : शब्दोच्चारशैली)या करता पैसा वसूल. प्राची देसाई आणि ऍक्टींगचा (पक्षी : अभिनयाचा) संबंध फार दूरचा आहे.
ओम शांती ओम : तीन तास खाल्लेले पॉप कॉर्न (पक्षी : गरम लाह्या). अंगी लागण्याचे काही कारणच नाही. मधुमतीची थीम आयडीया (पक्षी : मध्यवर्ती प्रतीक संकल्पना) शेवटी चोरलेली. बाकी थोडा टाईम्पास (पक्षी : कालव्यय).
"चक दे इंडिया" आणि "तारे जमीं पर.." हे दोनच चित्रपट अलिकडच्या काळात मला आठवतात जे मी १००% एन्जॉय केले (पक्षी : आनंद घेतला). एकही क्षण वावगा , कंटाळवाणा , बुल्शिट (पक्षी : फालतू) वाटला नाही. आणि केवळ हे चित्रपट गंभीर होते म्हणून मी म्हणत नाही. जवळजवळ हेच विधान मी "खोसला का घोसला"च्या बाबतीत करेन. एकदाही मी तो फॉरवर्ड (पक्षी : अग्रतः ) केला नाही.
ताजा कलम : सॉरी (पक्षी : क्षमा याचितो), वरील दोन चित्रपटांबरोबर अजून एक चित्रपटाचे नाव घ्यायलाच हवे : "मक्बूल" . शंभर नंबरी सोने.
17 Dec 2008 - 3:28 am | स्वप्निल..
>>अक्षयकुमार , रीतेश महाजन , गोविंदा (याचे गेल्या दहा बारा वर्षातले चित्रपट)
तुम्हाला रीतेश देशमुख म्हणायचे का?
>>एकेकाळी काहीही पहायचो !
माझं पण असच..पण मी आत्तापण बघतो..हिंदी असेल तर फॉरवर्ड करुन १० मिनिटे..जर भागामध्ये असेल तर पहिला आणि शेवटचा पाहिला तरी काम होते..
बाकी मला कुठली पण भाषा चालते .. त्याचे बंधन नाही..त्यामुळे तेलुगुला पण सोडला नाही..सर्वच कॉमेडी मध्ये मोडतात..स्पेशली ढीशुम ढीशुम वाले...
मास्तर चे परिक्षण वाचुन सिनेमा पराडिसो हा इटालिअन चित्रपट बघितला..मस्त आहे..आवडला..अजुन असे काही माहीती असतिल तर सांगा.
स्वप्निल..
अवांतर असेल तर प्रतिसाद उडउ शकता
17 Dec 2008 - 9:26 am | अवलिया
आपल्या प्रतिसादात अनेक इंग्रजी शब्द आले आहेत ज्यांचे पर्यायी मराठी शब्द आपण रोजच्या वापरात वापरतो.
आपणच जर असे केले तर आम्ही कुणाकडे पहायचे...
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
17 Dec 2008 - 9:58 am | मुक्तसुनीत
माझ्या टिपणात अपेक्षित ग्लॉसरी (पक्षी:शब्दसूची) टाकून बदल केला आहे. कळावे.
17 Dec 2008 - 11:00 am | अवलिया
पक्षी चांगले उडाले आहेत.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
18 Dec 2008 - 2:15 am | संदीप चित्रे
मुक्तसुनीत .. नो - नॉन्सेन्स सिनेमा पहायला आवडत असेल (उदा. तुम्ही लिहिल्याप्रमाणे .. तारे, चक दे आणि मकबूल) तर 'हजारो ख्वाईशें ऐसी...' जरूर बघा.
(ह्या आधी जर कुणी तुम्हाला सांगितले असेल की तो सिनेमा जरूर बघा तर मला आश्चर्यच वाटेल :) !)
18 Dec 2008 - 2:40 am | मुक्तसुनीत
माझ्या खालील प्रतिसादामधे या चित्रपटाबद्दल आलेले आहे :-)
http://www.misalpav.com/node/5082#comment-74207
17 Dec 2008 - 3:09 am | भडकमकर मास्तर
गेल्या वर्षात आलेले अजून काही चांगले...
जॉनी गद्दार , मनोरमा सिक्स फीट अंडर आणि मिथ्या हे सिनेमे चांगले होते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Dec 2008 - 3:14 am | मुक्तसुनीत
जॉनी गद्दार मधले गाणे ऐकायला चांगले होते , पण चित्रपटात असायचे कारण नव्हते. दुसरे म्हणजे , "रॉबरी गॉन राँग" अशी थीम असणर्या या चित्रपटात लक्षात राहील असा पर्फॉर्मन्स केवळ नील मुकेश चा. ( या पार्श्वभूमीवर , "रॉबरी गॉन राँग" च्या थीमवरचा "फार्गो" पहावा !)
मिथ्या मी पाहिला होता. शोरीचे काम भन्नाट झाले होते. दुर्दैवाने , चित्रपट चालला नाही. कदाचित पुरेसा उत्कंठावर्धक झाला नसावा.
17 Dec 2008 - 3:27 am | घाटावरचे भट
मध्यंतरी 'द लास्ट लियर' नावाचा अत्यंत रटाळ सिनेमा पाहाण्यात आला. त्याची या निमित्ताने आठवण झाली.
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
17 Dec 2008 - 3:29 am | कोलबेर
गेल्या काही वर्षात मला आवडलेले सिनेमे: लगे रहो मुन्नाभाई, मकबुल, खोसला का घोसला, सी कंपनी (घीसापीटा आहे पण राजपाल यादवची भुमिका ह ह पु वा) आणि गेल्याच आठवड्यात बघीतलेला दस विदानिया.जावेद जाफरीच्या धमाल भुमिकेसाठी 'सलाम नमस्ते' फक्त तेवढाच यूट्यूब वर बघीतला. रॉक ऑन ठीक वाटला. तारे जमीन पर अप्रतिम झाला असता अमीर खानने स्वतःला थोडा आवर घातला असता तर. त्यातले विदुषक नृत्य वगैरे फारसे आवडले नाही. 'ओम शांती ओम' आणि 'जाने तू या ने जाने ना' बघायचे नसुन देखिल बघीतले आणि पश्चात्ताप झाला.. राम गोपाल वर्माकी आग बघायची इच्छा होती पण एकंदरीत लोकांनी केलेली वर्णने बघुन कधी धाडस केले नाही.
17 Dec 2008 - 3:35 am | स्वप्निल..
>>राम गोपाल वर्माकी आग बघायची इच्छा होती पण एकंदरीत लोकांनी केलेली वर्णने बघुन कधी धाडस केले नाही.
मी पहिल्या दिवशी कॅलीफोर्निया मध्ये एका मित्रामुळे गेलो .. पहील्या २ मिनटातच आम्ही सगळे बाहेर होतो गाडीमध्ये .. घरी जाण्यासाठी ~X(
स्वप्निल
17 Dec 2008 - 5:57 am | टारझन
अर्रे काय लेका .. त्या निषा कोठारी साठी तरी पहायचा ना राव ... आम्ही "टारझन-द वंडर कार" गाडीचं कौतूक म्हणून पहायला गेलेलो .. आणि आयेषा टाकीयाच्या गोड गोड आठवणी घेऊन आलो .. त्या अजुन अंमळ पुरत आहेत. आयेषा टाकिया झेंडू रे झेंडू एकदम ... बाकी हॉस्टेल वर गाजलेले मलिना(मोनिका बेलूची) हा तर के व ळ अ प्र ति म आहे . अमेरिकन पाय फक्त आपल्यासारख्यांना आवडू शकतो ... अजुन काय अवांतर लिहू बरं ? वर सुनितरावांना रितेश महाजन ऐवजी प्रमोद महाजन म्हणायचं असेल ... परवाच जेम्स बाँडचा लेटेष्ट पिक्चर पाहिला ,,,, लै बेष्ट .. टिपीकल बौंड पट ...
अवांतर : मास्तरांनी या वेळी जाम निराषा केली आहे ... फुसका लवंगी फटाका फोडला ,,,, छी बाबा !!
- टारझन.. (हे दोन डॉट्स स्वप्निल.. कडून साभार)
चला मुलांनो... अवांतर आहे .. पटकन वाचा कधी कात्री लागेल सांगता येत नाही ...
17 Dec 2008 - 6:15 am | स्वप्निल..
सुचत नाहि आहे ना आता...जिथे नको तिथे कसं बरोबर सुचते. नाही?
बाकी निशा कोठारी साठी बघायला हरकत नवती पण बाकीच्यांनी जाम पकवलं रे..म्हणुन
>>बाकी हॉस्टेल वर गाजलेले मलिना(मोनिका बेलूची) हा तर के व ळ अ प्र ति म आहे . अमेरिकन पाय फक्त आपल्यासारख्यांना आवडू शकतो
हाहाहा.. हे अगदी बरोबर..
स्वप्निल
17 Dec 2008 - 9:56 am | मैत्र
मास्तर... तुम्ही सावरिया (नीला नीला ओ नीला नीला) वर एक सुतळी किंवा तत्सम ऍटम बाँब परीक्षण लिहाच! हे आत्ताचं साधारण चित्रं (फटाक्याची), पानपट्टी इतकंच होतं.
त्या महान सावरिया वर मिपावर एक अवांतराचा परिसंवाद घेता येइल...
टारोबा काही हातभार लावा !
17 Dec 2008 - 3:28 am | मुक्तसुनीत
हिंदी चित्रपटातल्या गाण्याचे "लिप सिंकिंग" मला आता फार अपरिपक्व वाटते. (गाणी असू नयेत असे मी येथे म्हण्टलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी .)
माझ्याव्यतिरिक्त असे कुणाला वाटते काय ?
17 Dec 2008 - 8:37 am | भडकमकर मास्तर
गाण्याचे "लिप सिंकिंग" मला आता फार अपरिपक्व वाटते
खरंय ... त्यामुळे व्यक्ती स्वत: गाणं म्हणत आहे असं फार क्वचित वाटतं....
मी आधी लिप किसिंग वाचले... तेही अपरिपक्व आणि घाबरत घाबरत केलेले वाटतेच...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Dec 2008 - 9:27 am | अवलिया
मी आधी लिप किसिंग वाचले... तेही अपरिपक्व आणि घाबरत घाबरत केलेले वाटतेच...
हो पण तेच जेव्हा भरगच्च कार्यक्रमात करतात तेव्हा मात्र घाबरत नाहीत बरका...
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
17 Dec 2008 - 9:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
गाण्याचे "लिप सिंकिंग" मला आता फार अपरिपक्व वाटते
खरं आहे. त्यापेक्षा "इमान का असर" (पिक्चरः डोर) अशी गाणी फार जास्त आवडतात.
मी आधी लिप किसिंग वाचले... तेही अपरिपक्व आणि घाबरत घाबरत केलेले वाटतेच...
मास्तर, आपण मल्लिकाताई शेरावत यांचा पिच्चर "ख्वाईश" (नायकः हिमांशू मलिक) बघावा अशी आपल्याला अंमळ आदरमिश्रीत आज्ञा ("आज्ञा" फक्त अनुप्रास साधण्यासाठी. तो शब्द विनंती असा वाचावा).
गेल्या काही वर्षांत मला आवडलेल्या चित्रपटांमधे "डोर" पण आहेच. फारच थोडे चित्रपटांच्या बाबतीत मी डाउनलोड करुन पाहिल्यावर मग डी.व्ही.डी. विकत घेतली आहे. (एक "डोर" आणि दुसरा विंग्रजी आहे आणि जुना आहे, पण संपूर्ण माहितीसाठी, "शॉशँक रिडम्पशन".)
17 Dec 2008 - 10:00 am | भडकमकर मास्तर
ख्वाईश .... एरिक सीगलच्या लवस्टोरी या कादंबरीचे जमेल तसे केलेले चित्ररूप होते....मी ख्वाईश पाहिला आहे..
आपले म्हणणे मान्य आहे...मल्लिकाबाई माझ्या वाक्याला अपवाद आहेत
अवांतर : त्यातल्या २५ की सत्तावीस सर्व चुंबनदृष्यात सहभागी होऊनही हिमांशूचे तिच्याइतके कौतुक झाले नाही हे मला त्याच्यावरील अन्यायाचे लक्षण वाटते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Dec 2008 - 10:03 am | चतुरंग
हिमांशू म्हणायचा की चुम्मांशू?!! ;)
चतुरंग
17 Dec 2008 - 10:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतर : त्यातल्या २५ की सत्तावीस सर्व चुंबनदृष्यात सहभागी होऊनही हिमांशूचे तिच्याइतके कौतुक झाले नाही हे मला त्याच्यावरील अन्यायाचे लक्षण वाटते...
मग तुम्हीच त्या बिचार्याच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक लेख पाडाच! ;-)
हिमांशू म्हणायचा की चुम्मांशू?!!
आणि मल्लिका म्हणावं का चुम्म्मालिका? (ते तीन "म" लक्षात घ्यावेत) ;-)
18 Dec 2008 - 2:08 am | घाटावरचे भट
२६ आहेत असे एका मित्राकडून खात्रीलायकरीत्या समजले. शिणुमा पाह्यचा योग आला नाही.
च्यामारी, तेच बघायचं असेल तर बाकी गोष्टी हायेत की....
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
17 Dec 2008 - 10:05 am | मुक्तसुनीत
"शॉशँक रिडम्पशन" = कल्ट क्लासिक (पक्षी : पंथसदृश-भक्तिपरंपरेतील एक अभिजातकृती)
इतर काही कल्ट क्लासिक्स : "राऊंडर्स" (पहा : कोलबेर यांची खरडवही) , "पल्प फिक्शन" , "रेझर्रव्हायर डॉग्ज", "फाईट क्लब" , "टॅक्सी ड्रायव्हर"
17 Dec 2008 - 10:09 am | चतुरंग
पक्षी : पंथसदृश-भक्तिपरंपरेतील एक अभिजातकृती
खल्लास!! =)) =))
चतुरंग
17 Dec 2008 - 10:11 am | मुक्तसुनीत
अहो हे "अवलिया रिडेम्प्शन" आहे . ;-)
17 Dec 2008 - 10:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो हे "अवलिया रिडेम्प्शन" आहे .
ठ्यॉ! =))
सुनीतराव, आपण एवढ्या श्या असलेले शिनुमे बघता हे वाचून आपल्याबद्दल अंमळ आदर उद्भवला!
17 Dec 2008 - 11:03 am | अवलिया
अहो हे "अवलिया रिडेम्प्शन" आहे .
हम्म. चांगलेच मनावर घेतले की हो तुम्ही आमचे म्हणणे.... :?
चालु द्या. :P
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
18 Dec 2008 - 2:10 am | घाटावरचे भट
'फोन बूथ' पण चांगला शिणुमा हाय. 'बकेट लिश्ट' पन बरा हाय (जरा गूडी गूडी वाटला, 'आनंद'ची भ्रष्ट नक्कल ;)).....
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
18 Dec 2008 - 2:40 am | आजानुकर्ण
काय राव मॉर्गन फ्रीमन आणि ज्याक असले लोकं घेऊन बकेट लिष्ट काढायचा म्हणजे म्हणजे जास्वंदाबाई जैसिंगपूरकरीणीला घेऊन 'एका लग्नाची गोष्ट' करण्यासारखं आहे.
आपला
(तौलनिक) आजानुकर्ण
बाकी फोनबूथ जबराच होता बरंका...
आपला
(फोनबूथप्रेमी) आजानुकर्ण फॅरेल
18 Dec 2008 - 3:45 am | स्वप्निल..
" द युजवल सस्पेक्ट्स " मस्त आहे...मुक्तसुनीत म्हणताहेत तसा (पक्षी : पंथसदृश-भक्तिपरंपरेतील एक अभिजातकृती)
आपल्या हिंदी "चॉकलेट" सिनेमा याचीच नक्कल आहे..
स्वप्निल
17 Dec 2008 - 11:29 am | खालिद
मनीषा कोईराला, संजय कपूर आणि अतुल परचुरे यांच्या "ऑस्कर" तोडीच्या अभिनयाने ओतप्रोत भरलेला "अंजाने -द अननोन्स(२००५/०६)" हा सिनेमा कुणी पूर्ण पाहिला आहे का?
या मध्ये अतुल परचुरे चे डायलॉग्स हे कान, ह्रदय आणि मेंदू भरून आणतात.
हा सिनेमा आपल्याला एक अत्यंत कायमचा लक्षात राहिल असा धडा देतो की "आपल्या जीवनात वेळेचे स्थान काय आहे"
अवांतरः -
हा सिनेमा आम्ही पहाटे ४ ते ६:३० या वेळेत पाहिला होता त्यावरुन याचे स्थान किती महान आहे त्याची कल्पना यावी.
कुणी हा सिनेमा पाहिला असल्यास या समदु:खी मित्राशी अनुभव शेअर करण्यास हरकत नाही.
(महेश कोठारेंचा "जबरदस्त" आणि "धडाकेबाज" फॅन) खालिद
आमच्या येथे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील.
17 Dec 2008 - 9:54 pm | आजानुकर्ण
क्लिंट इस्टवूडने दिग्दर्शित केलेल्या सिनेमांचा मी सध्या खूप चाहता झालो आहे. विशेषतः मिस्टिक रिवर, मिलियन डॉलर बेबी, लेटर्स वगैरे. त्याचा कालपरवा आलेला (की येणारा) चित्रपट कोणी पाहिला आहे का?
शॉशॅंकबरोबरच बिफोर सनराई़ज, बिफोर सनसेट, हे अलीकडे (पुन्हा) बघितलेले आणि फार आवडलेले चित्रपट.
आपला,
(चित्रपटप्रेमी) आजानुकर्ण
17 Dec 2008 - 10:10 pm | कोलबेर
तुमचा शॉशँकवरील लेख शोधायचा प्रयत्न केला पण सापडला नाही. इथे शाशँकप्रेमी पाहुन त्यांच्यासाठी तो दुवा पुन्हा द्यावा ही विनंती.
(रेड) कोलबेर
18 Dec 2008 - 2:12 am | आजानुकर्ण
हा घ्या कोलबेरपंत
आपला
(प्रसिद्धीलोलुप) आजानुकर्ण
18 Dec 2008 - 1:30 am | मुक्तसुनीत
मिस्टीक रिव्हर : नैतिक , पाप-पुण्यादि संकल्पना , मानवी नातेसंबंध यांचे बहुस्तरीय चित्रण : उत्तम चित्रपट.
मिलियन डॉलर बेबी : टिअरजर्कर (पक्षी : मुद्दाम अश्रूपात घडवून आणल्यासारखा ) :-(
बिफोर सनराई़ज, बिफोर सनसेट : सुरेख !!
20 Dec 2008 - 9:10 pm | स्वाती राजेश
CHANGELING ह त्याचा नविन मुव्ही फारच सुंदर आहे, अंजलीना जोली चे काम अप्रतिम....:)
बाकीचे अब्सल्युट पॉवर, द फरफेक्ट वर्ल्ड आणि अन्फॉर्गिव्हन तर फारच छान आहे.....
मी सर्व त्याचे मुव्ही पाहते, द गुड द बॅड द अग्ली पासून......
20 Dec 2008 - 2:04 pm | अमोल नागपूरकर
मला रब ने बना दी जोडी मध्ये सर्वात जास्त आवडली ती शेवटची श्रेयनामावली. दोन कारण १) आता हा रटाळ सिनम सम्पला हे आणि २) श्रेयनामावली (आणि तत्यातले फोटोज, शाह रूखचे निवेदन खरच सुन्दर होते !)
2 Feb 2009 - 1:58 am | trendi.pravin
अलिकडेच "दोस्ताना" बघितला...बरा आहे.. म्ह्ण्जे वात्रट्पणा आवड्त असेल तर ठीक्...पण प्रियन्का चोप्रा साठी बघू शकता...she looks just 'HOT".. आणि अभिनयही चान्गला करते .....बाकी चित्रपटातले दोन्हि खन्दे पुरुष (जॉन आणि अभी ) ...बरे आहेत्...दिग्दर्श्काने सर्वन्च्या 'assets'चा चान्गला 'USE'करुन घेतला असे दिसून येते...बाकी बॉबी देओल सुध्दा सुसह्य ......बोमन इराणी मात्र बेस्ट (as usual)....गाणी सुध्धा बरी आहेत....
trendi.pravin
***************
style मे रहने का......... always!