दोन वर्षांखाली कोकणात गेलो होतो. तेव्हा काढलेले काही फोटो इथे डकवत आहे.
तेव्हा काही फोटोग्राफीमधली फार अक्कल नव्हती (आताही आहे अशातला भाग नाही), पण आता तांत्रिक बाबी जरा अधिक समजतात (त्यामुळे मी अजून वाईट फोटो काढतो ;)). आपणा सर्वांना फोटू कसे वाटले ते सांगा.
प्रतिक्रिया
17 Dec 2008 - 7:52 am | मदनबाण
मस्त्,,कमळाचे फोटो लय आवडले... :)
कोल्हापुरला अंबाबाईच्या देवळात अशीच सुंदर कमळांची वेणी देवीला अर्पण करण्यासाठी मिळते त्याची आठवण झाली.
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
17 Dec 2008 - 4:36 am | शितल
सुंदर..
फोटो.
निळे कमळ .. म्हणजे स्वामी स्वरूपानंद यांच्या मठात गेला होता का. :)
सह्याद्रीच्या रांगा पावसाळ्यात खुपच सुंदर दिसतात. :)
>>>>>>दोन वर्षांखाली कोकणात गेलो होतो.
अवांतर - दोन वर्षा पुर्वी कसे वाटेल. :)
18 Dec 2008 - 1:48 am | घाटावरचे भट
>>म्हणजे स्वामी स्वरूपानंद यांच्या मठात गेला होता का.
नाय हो, मी ज्या हाटिलात उतरलो होतो तिथे होती कमळं.
>>दोन वर्षा पुर्वी कसे वाटेल.
आणि दोन वर्षा'खाली' लिहिण्याबद्दल असं, की सारखं पुणेरी मराठी लिहून कंटाळा येतो. मी हे 'खाली' कुठेतरी ऐकलं होतं ते इथे वापरलं. बाकी प्रतिक्रियेबद्दल आभार.
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
17 Dec 2008 - 5:34 am | नंदन
आलेत फोटो. पहिला, चौथा आणि सहावा विशेष आवडला.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Dec 2008 - 7:38 am | झकासराव
मस्त रे भटो :)
सगळे आवडले.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
17 Dec 2008 - 7:49 am | कोलबेर
मस्त फोटो भटोबा!
कमळाचे फोटो खूप सुंदर आलेत. रंग मस्त पकडलेत! चौथ्या क्रमांकाचा निळाईत मिसळलेल्या हिरवाईचा फोटो पण आवडला.
(रंगप्रेमी) कोलबेर
17 Dec 2008 - 10:00 am | राघव
असेच म्हणतो.
खूप सुंदर फोटू!! :)
कमळ ब्येश्ट!!!
मुमुक्षु
17 Dec 2008 - 11:29 am | अभिरत भिरभि-या
>> चौथ्या क्रमांकाचा निळाईत मिसळलेल्या हिरवाईचा फोटो पण आवडला.
हेच म्हणतो; आमच्या हपिसात ब्याकग्राऊण्ड लावायची परवानगी नाही तर कमळच लावले असते.
(बीजेपी वाला) अभिरत
17 Dec 2008 - 9:07 am | पांथस्थ
मस्त फोटो आहे. सकाळी सकाळी कोकण दर्शन म्हणजे क्या बात है!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
17 Dec 2008 - 11:48 am | परिकथेतील राजकुमार
सहमत ! असेच म्हणतो ...
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
17 Dec 2008 - 9:09 am | सहज
सगळेच फोटो आवडले. दरीतील नागमोडी प्रवाह एकदम खास.
18 Dec 2008 - 1:51 am | घाटावरचे भट
त्यो कशेडीचा घाट हाय....आमी उगाच घाटावंचे भट न्हाय...
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
17 Dec 2008 - 11:37 am | वेताळ
मला तो कमळ आणि त्या वरचा लहान निळे फुल असलेला फोटो आवडला. कोणते फुल आहे ते?
वेताळ
17 Dec 2008 - 11:47 am | धमाल मुलगा
सह्ही रे भटो :)
मस्त फोटो! आणि तुला चक्क कोलबेरसारख्या निष्णात माणसाची शाबासकी मिळाली म्हणजे फोटो नि:संशय मस्तच!!!!!
कमळांवरच्या फोटोतलं ते फुल कोणतं आहे बॉ?
18 Dec 2008 - 1:52 am | घाटावरचे भट
म्हायत नाय....गवतात उगवलं होतं. चांगलं वाटलं म्हनून फोटू काढला...
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
17 Dec 2008 - 11:48 am | मनस्वी
भटोबा
सगळे फोटो अफाट आलेत.
पहिले पाच तर भन्नाट!
दुसर्या फोटोत फक्त ते वीजेचे खांब नको होते.
17 Dec 2008 - 11:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
भटोबा, मस्तच!
17 Dec 2008 - 6:09 pm | बेसनलाडू
(पुष्पप्रेमी)बेसनलाडू
17 Dec 2008 - 6:20 pm | लिखाळ
मस्त फोटो..
नीळे कमळा फार सुंदर.
नीळे-कमळ अशी युती कशी झाली?
-- लिखाळ.
17 Dec 2008 - 7:11 pm | टारझन
फोटू के व ळ अ प्र ति म !!
अवांतर : खरंच सगळे फोटू चांगले आहेत यार ... कोकण संमृद्ध आहे एकदम !! कधी घेउन जातोस मला तिकडे बोल ?
- घाटावरचा बाटा
(आम्ही पण अंमळ मठ्ठच आहोत)
17 Dec 2008 - 7:15 pm | बापु देवकर
छान आहेत....
18 Dec 2008 - 1:54 am | घाटावरचे भट
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
18 Dec 2008 - 3:51 am | रेवती
फोटू सुंदरच आलेत.
रेवती