सनदी अधिकारी विश्वास नांगरे पाटिल पोलिस खात्यात काम करत असतात तसेच ग्रामीण भागातील विकासासाठी तेथिल युवकांचे संघटन, विदयार्थी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या एका हायस्कूल मधील भाषणाचा दुवा येथे आहे. जरुर वेळ द्या.......
CLICK HERE FOR VIDEO -
http://video.google.com/videoplay?docid=6023553283275749875
त्यांचीच आवड्ती कविता -
To dream ... the impossible dream ...
To fight ... the unbeatable foe ...
To bear ... with unbearable sorrow ...
To run ... where the brave dare not go ...
To right ... the unrightable wrong ...
To love ... pure and chaste from afar ...
To try ... when your arms are too weary ...
To reach ... the unreachable star ...
This is my quest, to follow that star ... No matter how hopeless, no matter how far ... To fight for the right, without question or pause ... To be willing to march into Hell, for a Heavenly cause ... And I know if I'll only be true, to this glorious quest, That my heart will lie will lie peaceful and calm, when I'm laid to my rest ... And the world will be better for this: That one man, scorned and covered with scars, Still strove, with his last ounce of courage, To reach ... the unreachable star ...
प्रतिक्रिया
17 Dec 2008 - 11:35 am | रम्या
हे विश्वास पाटील म्हणजे "संभाजी"कार विश्वास पाटील तर नव्हे?
आम्ही येथे पडीक असतो!
17 Dec 2008 - 6:25 pm | रामदास
ते वेगळे पाटील.ते पाटील सबर्बन टू चे कलेक्टर आहेत.
17 Dec 2008 - 7:43 pm | धम्मकलाडू
रेवपार्टींवर धाडी टाकून प्रसिद्ध झालेले हे विश्वास पाटील हे तसे तडफदार आयपीएस अधिकारी आहेत.
Senior cops publicity stunt angers Ratan Tata ही बातमीही नुकतीच वाचनात आली.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
17 Dec 2008 - 12:02 pm | पांथस्थ
मला वाटत हे पुर्वी पुणे ग्रामीण ला आणि आत्ता मुंबई मधे नार्को ला असणारे विश्वास पाटिल असावे.
बाकी कविता मस्तच आहे. ह्या काळात तर एकदम मार्गदर्शी.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
18 Dec 2008 - 4:49 pm | निखिलराव
पुर्वी पुणे ग्रामीण ला होते आणि त्याच्या आधी नगरला होते.
एकदम कडक माणुस....
17 Dec 2008 - 1:55 pm | मृगनयनी
सिंहगडला झालेले "रेव्ह पार्टी" प्रकरण याच विश्वास नांगरे-पाटलांमुळे प्रकाशात आले.
आजच्या तरुणांसाठी "विश्वास पाटील" हे खरोखर आदर्श आहेत.
:)
17 Dec 2008 - 10:00 pm | विकास
लोकसत्तेत त्यांच्याबद्दल आलेला व्यक्तिवेध सदरातील लेख येथे वाचा. त्यात त्यांच्या ताज मधील दहशतवाद्यांविरुद्धच्या लढ्याबद्दल वर्णन आहे.
18 Dec 2008 - 4:16 pm | रम्या
भारवलेली ५० मिनिटे!!
केवळ अप्रतिम भाषण!!! अगदी साधी भाषा, परखड विचार.
ज्यांचं आदर्श ठेवाव असं व्यक्तिमत्व.
हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याला दाखवावाच!
धन्यवाद रे नाम्या असा छान व्हिडिओ दिल्याबद्दल.
आम्ही येथे पडीक असतो!
18 Dec 2008 - 4:34 pm | सखाराम_गटणे™
वाह वाह, छानच आहे,
आवडले
पुले शु
----
सखाराम गटणे
23 Dec 2008 - 9:25 am | सुचेल तसं
नांगरे साहेब आधी नगरला होते. तेव्हाचा त्यांच्याबद्दल ऐकलेला एक किस्सा:
रात्री ११ वाजता होटेल बंद असा नियम असतानाही काहीजण उशीरापर्यंत होटेल चालू ठेवायचे. त्यावर नांगरेंनी एक उपाय केला होता. ११:३०-१२ वाजता ते अशा होटेल्समधे जायचे आणि जे कोण गिर्हाईकं बसले असतील त्यांना सांगायचे की आज कोणी बिल भरायच नाही. असं दोन-चारदा केल्यावर होटेल मालक आपसूकच ११ वाजता होटेल बंद करू लागले.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
23 Dec 2008 - 9:32 am | पिवळा डांबिस
नगरला ते चालत असेल!!
पण इथे मुंबईत ११.०० वाजता सेकंड शिफ्ट सुटते....
होटेलमालकांनी जर ११ वाजता होटेले बंद केली तर मग त्या लोकांनी कुठं जेवायचं?
नांगरे पाटील काय त्या लोकांना त्यांच्या घरी जेवायला वाढणार आहेत काय?
उगाच काहितरी स्टंट....
(एकेकाळी ३ शिफ्टा केलेला)
पिवळा डांबिस
23 Dec 2008 - 9:36 am | सुचेल तसं
बरोबर आहे तुमचं... ११ वाजता होटेल बंद का करायला लावतात ते मलाही अजुन कळलेलं नाही...
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
23 Dec 2008 - 10:19 am | पिवळा डांबिस
११ वाजता होटेल बंद का करायला लावतात ते मलाही अजुन कळलेलं नाही...
हप्ते कलेक्ट करायला ते सोपं जातं......
काही ना काही अवास्तव रूल्स काढायचे आणि मग त्यांची पूर्तता झाली नाही की लोकांना धमकावून प्राप्ति करायची.....
मला सांगा, आजवर ११ च्या नंतर हॉटेले उघडी ठेवली म्हणून किती होटेलचालकांवर गुन्हे नोंदवून पोलिसांनी सनदशीर मार्गाने त्यांना न्यायालयात उभे केलेयत?
तुमच्या पाहण्यात आहेत काही केसेस?
:)
23 Dec 2008 - 11:39 am | मृदुला
पोलीस अधिकारी म्हणून पाटील असेल त्या कायद्याप्रमाणे जे वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करू शकतात. लोकांना जर ११ नंतर जेवायला हवे असेल तर अश्या लोकांनी कायदा बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पोलीसाचे काम कायद्याची अंमलबजावणी बरोबर होते की नाही हे पहाणे हे आहे, कायदा योग्य आहे की नाही हे पहाणे नाही.
23 Dec 2008 - 12:56 pm | पिवळा डांबिस
लोकांना जर ११ नंतर जेवायला हवे असेल तर अश्या लोकांनी कायदा बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.
म्हणजे नक्की काय करायला पाहिजे? जरा स्पष्ट करून सांगाल का?
23 Dec 2008 - 12:00 pm | वेताळ
पण नांगरे पाटिल साहेब हे खुप प्रामाणिक पोलिसाधिकारी आहेत. मुबंई व पुणे शहर सोडुन उर्वरित महाराष्ट्रात रात्री ११ नंतर हॉटेल चालु ठेवायला कायद्याची परवानगी नाही आहे.त्यामुळे त्यानी अहमदनगर मध्ये त्यानी ११ ला हॉटेल बंद हा उपक्रम राबवला असेल.पण त्याचे कित्येक उपक्रमाची दखल अगदी देशपातळीवर घेतली आहे.पुणे ग्रामिणमध्ये त्यानी खुप चांगले काम केले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यानी जवळ जवळ ४ ते ५ तास ताज मधल्या हल्लेखोराना ३र्या मजल्यावर रोखुन धरले व एकाला जायबंदी केले.त्याच्या त्या धाडशी कृत्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले आहेत.
वेताळ
23 Dec 2008 - 12:54 pm | पिवळा डांबिस
पण नांगरे पाटिल साहेब हे खुप प्रामाणिक पोलिसाधिकारी आहेत. पण त्याचे कित्येक उपक्रमाची दखल अगदी देशपातळीवर घेतली आहे.पुणे ग्रामिणमध्ये त्यानी खुप चांगले काम केले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यानी जवळ जवळ ४ ते ५ तास ताज मधल्या हल्लेखोराना ३र्या मजल्यावर रोखुन धरले व एकाला जायबंदी केले.त्याच्या त्या धाडशी कृत्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले आहेत.
जरूर! आणि त्याबद्दल आम्ही मनापासून आदर व्यक्त करतो....
आम्ही फक्त ११ वाजता होटेले बंद करण्यावर बोललो....
ज्या देशांत ३ शिफ्ट्स मध्ये काम चालते तिथे ११ वाजता जेवणाची सुविधा देणार्या सोई बंद करणे कितपत व्यवहार्य आहे हा आम्हाला प्रश्न पडला होता.....
सेकंड शिफ्ट करून झाल्यानंतर अनेकदा (खिशात पैसे असूनही) भुकेल्या पोटी घरापर्यंत जावे लागणे फारसे आनंददायक नसते इतकेच आमचे म्हणणे....
काही चुकलं का?
23 Dec 2008 - 8:33 pm | नाम्या झंगाट
तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे पण काळ्जी करु नका ...मूंबई मधे हे होणार नाही...... मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत आणी नगर चे वेगळे आहेत्...खाली सवीस्तर लिहिले आहेच.....
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
23 Dec 2008 - 12:01 pm | केदार केसकर
झंगाटा,
झक्कास! परवाच मी त्यांची मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी या कवितेचा उल्लेख केला होता. याचे lyrics लिहीले आहेत Joe Darion नी आणि music दिलय Mitch Leigh नी.
हे सुद्धा नक्की पहा.
http://www.youtube.com/watch?v=RfHnzYEHAow
धन्यवाद!
लो.अ.
केदार
23 Dec 2008 - 4:06 pm | नाम्या झंगाट
११ वाजता होटेल बंद का करायला लावतात ते मलाही अजुन कळलेलं नाही...
ह्याच्या मागे नक्की कारण काय आहे ते समजुन घेऊ....
नगरला त्यांनी केले हे एकदम २०० % बरोबर..नगर मध्ये हॉटेल च्या धंद्यामधे जवळ्पास ९५% सर्व मगरुर, फुगिर, कायदा पायद्ळी तुडिवणारे असतात....... कुणी भय्या चा असतो तर कुणी दादा तर कुणी भाऊ चा असतो आणी यांच्या जिवावर सर्वांची मस्ती चालू असते. कायद्याची जरब या फालतु लोंकाना साहेंबानी बसविली. जर तुम्हि भाऊ च्या एरिया मद्ये जागा घेतली आणी पाया खणला तर दुसरया दिवशी तुमच्या साईट वर स्टील, वाळू, सिंमेट, विटा साहित्य आपोआप येणार आणी तिस-या दिवशी बिल येते....इतकि दादागिरी चालते..... साहेंबानी ह्या भाऊला त्याच्या हाटेला मधी फार फार धुतला होता..........
साहेबांना तिसरी शीफ्ट करुन येणा-यांचा प्रॉब्लेम नाही ..... प्रॉब्लेम होता बांडगूळांचा.. तो त्यांनी सोडिवला होता........ (आता परिस्थीती काय माहिती नाही)
(नांगरे पाटिल चा पंखा)नाम्या झंगाट
23 Dec 2008 - 4:55 pm | निखिलराव
नांगरे पाटिल यांचा पंखा नाम्या झंगाट यांच्या वरील मताशी ४००% सहमत.
नगला ३-४ वरीस राहिलो होतो, लय मित्र आहेत आपले तिथ.
११ नंतर उघडे असणारे होटेल पण मोजकेच, पण आम्ही डेली मेंबर असल्यामुळे मागच्या दारानी घुसायचो.
नगरी (निखिल)