रांगडी रात्र

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
28 Sep 2015 - 10:38 am

रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचा पण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रुममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापुर्वीच तिचे मिस्टर दुर कुठेतरी दोन दिवसांच्या अॉफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करुन ट्रॅव्हल भेटल्याची खात्री करुन घेतली. दिवस तसा धावपळीतच गेला होता. एक अनामिक हुरहुर तिला लागुन राहीलेली. घड्याळाकडे वारंवार नजर चालली. तसही करण्यासारखं काही काम नव्हतं. रोजचा छंद म्हणुन बेडटाईम स्टोरीज वाचत पडली होती.

तेवढ्यात बेल वाजली. दार उघडुन तिने त्याला लगबगीने आत घेतलं. आज त्यानं चक्क बियरचं आणलीये. गेल्यावेळीस म्हटला होता तसचं. तिनंही तशी ईच्छा दर्शविली होती. त्या चवीत आज तिलाही धुंद व्हायचं होतं.
"तुझा हजबंड गेलाय ना नक्की टुरवर, नाहीतर मधुनच परतायचा" टि.व्ही अॉन करुन बेडवर बसत त्यानं विचारलं.
" ट्रॅव्हल भेटलीये त्याला, आता दोन दिवस तरी नाहीये. फोन केला होता". त्यानं आणलेली बियर ग्लासमध्ये ओतत तिनं उत्तर दिलं.
"आणि तुझी ती मुलगी, छकुली?"
"तिलाही झोपवलयं" .
कधीही आला तर त्याचे हे सुरवातिचे प्रश्न ठरलेले. मुद्दाम विचारल्यासारखे. या प्रश्नांनीच त्याला चेव फुटायचा. हल्ली तो नेहमीच यायला लागलाय. त्याचे प्रश्नही नेहमीचेच झाले होते. हा व्याभिचारही ठरवुन केल्यासारखा वाटत होता. आता यातही निरसपणा आलाय का? तिनं स्वत:लाच विचारलं.
पण चेंज म्हणुन त्याने आज बियर आणली होती.
"ए आज तु घेतलीच पाहीजे, थोडीशीच, बघ ट्राय करुन" कमरेत हात घालत त्यानं तिला जवळ ओढलं. तिनंही लटकं नको नको करत थोडीशी घेतलीच. थोडी थोडी करत अर्धा ग्लास संपवला.
"मस्त आहे रे हे, पण चव नाही आवडली" छताकडं उत्तान बघत ती म्हणाली. ही नशा काही वेगळीच होती. राहीलेली त्यानं संपवली.
"मग आज काय ट्राय करायचं?" तिला असले प्रश्न आवडाचेच नाहीत. केवळ अबोल प्रणय. तिला हवाहवासा. शब्दांवाचुन सगळं त्याला कळलं पाहीजे. त्याच्या कुशीत ती तशीच झेपावली.
या रात्रीचा कैफ काही औरच होता. अंगभर रोमांच पसरलेले. उन्माद ठासुन भरलेला. आज त्याला ती वेगळीच वाटली. ज्वानीच्या आगीत बहरुन गेल्यासारखी. एखाद्या नववधुसारखी आज ती हुंकारत होती. तोही अगदी कसलेल्या कलाकारासारखा तिला सुखावत राहीला.
आसुससलेली ती, ऊत्तुंग तो, उधानलेला प्रणय आणि ही व्याभिच्यारी रात्र. या रात्रीचा क्षण नी क्षण ऊपभोगला गेला. धुंद प्रीतीचं गीत गातच ही रात्र सरली.

सकाळी तो ऊशीरापर्यंत बेडरुममध्येच पडुन राहिला. तिनंही लवकर ऊठुन सगळ आवरलेलं. छकुली ऊठायची वेळ झालीय, आता याला लवकर जायला सांगायला हवं. ती बेडरुममध्ये गेली. त्याला ऊठवायचा प्रयत्न केला. तोही डोळे चोळत चोळत जागा झाला. दरवाजा ऊघडाच होता.
आतली चाहुल लागुन छकुली पळत पळतच बेडरुममध्ये शिरली. त्याला बघुन ती गोंधळली. दोन हात पुढे करत त्याच्या पोटावर पडली. त्याचे गालगुच्चे घेत आश्चर्यानं म्हणाली
" अरे पप्पा, तु गेलाच नाही का टुरवर? मज्जा! आज आपण वॉटरपार्कला जाऊया, पिकनिक करायला"

(एका विनोदावर आधारित)

कथासमाजमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

दा विन्ची's picture

28 Sep 2015 - 10:46 am | दा विन्ची

मस्तच.

दा विन्ची's picture

28 Sep 2015 - 10:47 am | दा विन्ची

पण काय हो साहेब , गेली महिनाभरात फार जोरात दिसताय ?

जव्हेरगंज's picture

28 Sep 2015 - 10:58 am | जव्हेरगंज

मोबाईलवर मराठी टंकता येऊ शकते हा शोध गेल्याच महिन्यात लागला. मग काय झालो सुरु!!

कविता१९७८'s picture

28 Sep 2015 - 12:20 pm | कविता१९७८

मस्त

ज्योति अळवणी's picture

28 Sep 2015 - 12:39 pm | ज्योति अळवणी

आवडली

कुठेतरी वाचली आहे असे वाटतेय. नवीन निश्चितच नाहीये, तुमचीच असल्यास क्षमस्व

जव्हेरगंज's picture

28 Sep 2015 - 5:17 pm | जव्हेरगंज

मी एक विनोद वाचला होता अशाच कल्पनेचा काही वर्षापुर्वी. त्याचीच फुलवुन कथा केलीय. विनोदावर आधारीत असल्यानं टिप टाकली नव्हती. आता टाकतो.

द-बाहुबली's picture

28 Sep 2015 - 5:14 pm | द-बाहुबली

वा वा वा छकुलीची तर लॉटरीच लागली म्हणायची की आज...

द-बाहुबली's picture

28 Sep 2015 - 5:15 pm | द-बाहुबली

किम्बहुना छकुली बरीच सराइत भासतेय की...

जव्हेरगंज's picture

28 Sep 2015 - 6:17 pm | जव्हेरगंज

बहुतेक क्लायमँक्स चुकला बघा तुमचा! छकुलीचं वाक्य नीट वाचा. अंदाज येईल काय होतं हे प्रकरणं :)

अभ्या..'s picture

28 Sep 2015 - 6:22 pm | अभ्या..

चंद्रबिंदीची फॅशन जोरात दिसतेय आंजावर. फरक कळत नाही की कीबोर्डाची मर्यादा?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Sep 2015 - 6:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

"जव्हेरजंग आणि मोजि यांचा काही संबंध असावा का?" हा अभ्या..साचा विषय होऊ शकतो ;)

प्यारे१'s picture

28 Sep 2015 - 6:29 pm | प्यारे१

चंद्रबिंदी म्हणजे काय पटकन समजलंच नव्हतं. म्हटलं 'रोलप्ले'मध्ये कोठुन आली ब्वा चंद्रबिंदी???
नंतर आमची टूप पेटली.

-राँर्बट प्यारे

कपिलमुनी's picture

28 Sep 2015 - 6:34 pm | कपिलमुनी

कथा फालतू वाटली.

तुमची लेखन शैली चांगली आहे पण तुम्ही सातत्याने एकाच विषयावर लेखन करताय. काही तरी वैविध्य आणा, ते वाचायला जास्त आवडेल.

चांदणे संदीप's picture

28 Sep 2015 - 7:07 pm | चांदणे संदीप

येग्झॅट्ली!

जव्हेरगंज's picture

28 Sep 2015 - 7:45 pm | जव्हेरगंज

पॉईंट नोटेड!
मी मुद्दामच कथेत जास्त मसाला टाकला होता.
कपिलमुनींसारखी एखादी प्रतिक्रिया अपेक्षित होती. यानिम्मीत्ताने येथे केवळ चमचमीतच खाल्ले जाते हा गैरसमज दुर झाला.
आभार!

शिलेदार's picture

6 Oct 2015 - 5:49 pm | शिलेदार

कमाल रंगवलाय ओ भारी शेवटच्या २-३ ओळीं पर्यंत काळात नाही
कमाल रंगवलाय शुभेच्छा

प्रसाद गोडबोले's picture

6 Oct 2015 - 6:17 pm | प्रसाद गोडबोले

छकुलीने एका अनोळखी माणसाला पप्पा म्हणुन स्विकारले ह्यात तिचे आणि त्याचे अफलातुन कौशल्य आहे ! लफडं करावं तर असं !!

जव्हेरगंज's picture

6 Oct 2015 - 6:29 pm | जव्हेरगंज

नै नै तसं नै ते.
इस्कटा रे कुणीतरी !

प्रसाद गोडबोले's picture

6 Oct 2015 - 7:48 pm | प्रसाद गोडबोले

कळ्ळं होतं हो आम्हाला ...पण सारखंच काय नुसतं गोग्गोड लेखन वाचायचं ? जरा तरी तडका मारा राव लेखनाला नाविन्याचा !

आम्ही वाढवु का कथा पुढे बोला !

जव्हेरगंज's picture

6 Oct 2015 - 8:00 pm | जव्हेरगंज

आवं, हा जुनाच माल हाय! कुणीतरी वर काढलाय. बाकी तडका वगैरे म्हणाल तर... हे हे हे... काय असतं त्ये?

आम्ही वाढवु का कथा पुढे बोला !>>> चांगलं आणि शेपूट शेपूट!!
येऊ द्या!!!

आधी वेगळा 'पुरुषविभाग' काढा.

नंतर काय ते कथा वाढवा आणि (कथेची) लांबी पण!

प्यारे१'s picture

6 Oct 2015 - 6:43 pm | प्यारे१

@ प्रगो, द बाहुबलि

____/\____

लैच्च अवघड आहे.

dadadarekar's picture

6 Oct 2015 - 7:02 pm | dadadarekar

.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2015 - 7:43 pm | बिपिन कार्यकर्ते

काहीही कळले नाही!

रातराणी's picture

6 Oct 2015 - 8:12 pm | रातराणी

नाही कळली.

लालगरूड's picture

6 Oct 2015 - 8:21 pm | लालगरूड

घंटा कळलं नाही.....

मराठी_माणूस's picture

6 Oct 2015 - 8:27 pm | मराठी_माणूस

?????

प्यारे१'s picture

6 Oct 2015 - 8:45 pm | प्यारे१

एक जोडपं. त्यांची एक मुलगी. नवरा टुरला दोन दिवसासाठी म्हणून जायला निघतो.
काही कारणानं टूरला न जाता परत येतो. येताना बीअर आणतो नि आपल्याच बायकोला नाटक म्हणून विचारतो की नवरा घरी नाही ना? बायको पण हुशार असल्यानं तिलाही समजून ती याला 'नाही' असं उत्तर देते.

रात्रभर फुलाला फुल, दोन राजहंस वगैरे कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी मुलीला जाग आल्यावर मुलगी विचारते.....
" अरे पप्पा, तु गेलाच नाही का टुरवर? मज्जा! आज आपण वॉटरपार्कला जाऊया, पिकनिक करायला"

प्यारे१'s picture

6 Oct 2015 - 8:50 pm | प्यारे१

>>>>>कधीही आला तर त्याचे हे सुरवातिचे प्रश्न ठरलेले. मुद्दाम विचारल्यासारखे. या प्रश्नांनीच त्याला चेव फुटायचा. हल्ली तो नेहमीच यायला लागलाय. त्याचे प्रश्नही नेहमीचेच झाले होते. हा व्याभिचारही ठरवुन केल्यासारखा वाटत होता. आता यातही निरसपणा आलाय का? तिनं स्वत:लाच विचारलं.

जव्हेरगंज's picture

6 Oct 2015 - 9:14 pm | जव्हेरगंज

शेवटी इस्कुट झालाच तर!!!!

चांदणे संदीप's picture

6 Oct 2015 - 9:42 pm | चांदणे संदीप

कस काय सुचतं जव्हेरगंजभौंना? आणि
कस काय जमतं प्यारेदादांना?

(सॅन्डीसिंग : तुम्हारा कमाल तुम जानो, मुझे तो सब कमाल लगता है! ब्र्रर्र्हा!!)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Oct 2015 - 8:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पप्पांना जुळा भाऊ असावा असे वाटले.पण आता कळले.

जव्हेरगंज's picture

6 Oct 2015 - 9:16 pm | जव्हेरगंज

ख्याक!!!!!
हे ही अगदी कहर बसतयं!!!!

नाव आडनाव's picture

7 Oct 2015 - 9:40 am | नाव आडनाव

बाँबंच फोडलाय ना!

कपिलमुनी's picture

7 Oct 2015 - 1:32 pm | कपिलमुनी

माईंनी सिक्सर हाणलाय !

शलभ's picture

6 Oct 2015 - 9:41 pm | शलभ

छान आहे.

(एका विनोदावर आधारित)

विनोद नाही. अशीच कथा वाचलीय आधी. कुठे, कुणाची नाही आठवत. पण त्यात पुण्याची फॅमिली आहे आणि नवरा कामानिमीत्त मुंबईला जाणार असतो. शेवटचा ट्विस्ट तर सेम आहे.

जव्हेरगंज's picture

6 Oct 2015 - 9:58 pm | जव्हेरगंज

पेपरमध्ये विनोद वाचला होता. कधी कुठे आठवत नाही.

शेवटचा ट्विस्ट तर सेम आहे.>>>> हेच मी सांगतो शेवटचा ट्विस्ट जवळपास असाच काहीतरी होता. तेव्हढचं आठवत होतं. बाकीचं बांधकाम माझं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2015 - 10:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच भारी. आवडली कथा.
गुड नाईट. ;)

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2015 - 11:08 pm | बिपिन कार्यकर्ते

नै जम्या.

कितीही झालं तरी गोष्टीतली पात्रं स्वतःच्या मनाशी विचार करतील तर तो वास्तववादीच असायला पाहिजे. तो खरोखरच तिचा नवरा असेल तर "छकुली ऊठायची वेळ झालीय, आता याला लवकर जायला सांगायला हवं." हे वाक्य प्रचंड गैरलागू आहे. असो.

समीर_happy go lucky's picture

6 Oct 2015 - 11:12 pm | समीर_happy go lucky

नेक्स्ट पार्ट प्लीज देअर मस्ट बी अ नेक्स्ट पार्ट

ही कथा वाचुन "मिर्च" चित्रपट आठवला ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jyothi Lakshmi... :- Jyothi Lakshmi