स्नेहसंमेलने.

कलंत्री's picture
कलंत्री in जनातलं, मनातलं
16 Dec 2008 - 7:58 pm

लहानपण दे रे देवा असे काहीसे आपण नेहमीच म्हणतो. अशा लहानपणाच्या आनंदाचा उत्कर्ष आपापल्या स्नेहसंमेलनात होत असतो. लहानपणी याला विविधगुणदर्शन असेही म्हणत असत.

आज माझ्या मुलीच्या स्नेहसंमेलनात जाण्याचा योग आला. पूर्वी कार्यक्रमाला सूत्र असे नसायचे. आजचा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्र या कल्पनेभोवती विणला होता.

गणेशवंदना, कोळी नृत्य, ज्ञानेश्वर-चांगदेव संवादाचे नाट्यकरण, गणपती मिरवणूक, वासुदेव, जात्यावरच्या ओव्या आणि शिवराज्याभिषेक असा सर्वांग सुंदर कार्यक्रम होता.

सर्वसाधारण नाताळाच्या १ ते १ १/२ महिने अगोदर स्नेहसंमेलनाची तयारी सुरु होते.

पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवृंद तयारीसाठी कामाला लागतो. खेळ, कविता, अभिनयकौशल्य, सादरीकरण इत्यादीसाठी गुणवंताचा शोध सुरु होतो. तालमी सुरु होतात. ( कधी तालीम चालु असताना शिवाजीच्या पाठीत धपाटाही बसतो, शिवाजी आणि औरंगजेबाची मैत्रीही होऊ शकते). शेवटी स्नेहसंमेलनाचा दिवस ठरतो. अगोदर पारितोषिक वितरण आणि नंतर गुणदर्शन असा कार्यक्रम होतो. लहानपणी शाळेच्या मैदानावर संध्याकाळी हा कार्यक्रम होत असे, आता चांगल्या नाट्यमंदिरात हा कार्यक्रम होतो.

त्यानंतर एक दिवस अल्पोपहाराचा कार्यक्रम होतो आणि या उत्सवाची सांगता होते.

मलाही माझे लहानपण आठवले. चैतन्याचा आणि स्नेहाचा खरोखर एक वाहता झरा म्हणून मला माझी सर्व स्नेहसंमेलने डोळ्यासमोर तरळून गेली.

ज्या कोणी या कल्पनेचा शोध लावला आणि या कल्पनेचा विकास केला त्याला खरोखर दंडवतच घातला पाहिजे.

(वृतांत लेखक) द्वारकानाथ कलंत्री.

संस्कृतीशिक्षणमौजमजासद्भावनाआस्वाद

प्रतिक्रिया

सुनील's picture

16 Dec 2008 - 8:09 pm | सुनील

चैतन्याचा आणि स्नेहाचा खरोखर एक वाहता झरा म्हणून मला माझी सर्व स्नेहसंमेलने डोळ्यासमोर तरळून गेली.

मी चौथीत असताना शाळेच्या स्नेहसंमेलनात मावळ्याची भूमिका केली होती. आजोबांनी झकास पुठ्ठ्याची तलवार बनवून दिली होती. संवाद बोलता बोलता म्यानातून ती काढायची असा काहीसा प्रसंग होता.

आवेशात तलवार काढली आणि तिचे पुढचे टोक किंचित वाकले. मी आणि माझा मावळा वर्गमित्र कसेबसे हसू दाबत उभे राहिलो. नशिबाने आमच्या चिकटवलेल्या मिशा सुटल्या नाहीत!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विदेश's picture

16 Dec 2008 - 9:32 pm | विदेश

त्यानंतर एक दिवस अल्पोपहाराचा कार्यक्रम होतो आणि या उत्सवाची सांगता होते.

स्नेहसंमेलनाचा एकमेव नावडता कार्यक्रम !

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Dec 2008 - 3:35 am | llपुण्याचे पेशवेll

अल्पोपहार एक मजेदार कार्यक्रम असे . कारण अल्पोपहारात आमच्या भावे प्राथमिक शाळेत तरी अगदी पोटभर जिलब्या आणि मसालेभात असे. आमचे एक सर आग्रहाने वाढताना मुलाना म्हणत "सगळ्यानी पोटभर खा". त्यावर कोण म्हणले सर पोट भरले आहे सर तर त्यावर म्हणत "खालती बोट लावून खा". :)
पुण्याचे पेशवे

मसालेभात / साखरभात आणि जिलब्या अजून आठवत आहेत.

शेवटच्या (वर्षी बहुतेक) प्लॅस्टिकच्या पुड्यातून अल्पोपहार दिला होता तेव्हा खूप वाईट वाटलं (एकाला एकच पिशवी मिळत होती ना.. :''( )

आजानुकर्ण's picture

18 Dec 2008 - 1:06 am | आजानुकर्ण

अच्छा म्हणजे नंतर पिशवीचीही सोय केली होती तर. बोट लावायची गरज नाही. ;)

आपला
(स्वच्छ) आजानुकर्ण

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2008 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत ! अजुन ही त्या जुन्या आठवणी ताज्या आहेत :)
सेंट भावेचा अजुन एक इद्यार्थी (१ली ते १२ वी )
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

मुक्तसुनीत's picture

17 Dec 2008 - 3:41 am | मुक्तसुनीत

हे मिपा आहे, व्याकरणाच्या चुका काढू नयेत हे मला मान्य आहे.
पण इतक्यांदा हा शब्द वापरला गेला आहे म्हणून नमूद करतो : अल्पोपहार नव्हे , अल्पोपाहार. :-)
सर्वानी ह. घ्या. !

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Dec 2008 - 4:07 am | llपुण्याचे पेशवेll

अल्पोपाहारच बरोबर आहे. पण शाळेत असताना आम्ही पण तसं म्हणत नव्हतो आम्ही त्याला अल्पोप्रहार पासून अल्पोपोहार पर्यंत काहीही म्हणत असू. आमच्या ताडफळे बाईंनी एकदा अल्पोपाहारच कसे बरोबर आहे हे समजावूनही सांगितले होते. :) पण काय आहे वाईट सवई(सवयीच लिहायचे आहे पण काय करणार? सवय) लवकर सुटत नाही.

पुण्याचे पेशवे

पोटेटो - पोटाटो.. काय फरक पडतो? खाण्याशी मतलब! :)

आमच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन जोरदार गाजायचं. तीन अंकी नाटकं तर कार्यक्रमाचा हायलाईट! दिवा जळू दे सारी रात, वाहतो ही दुर्वांची जुडी, संगीत मानापमान वगैरे नाटकं व्हायची. अख्खा सांस्कृतिक कार्यक्रम दोनदा व्हायचा. आदल्या दिवशी फक्त विद्यार्थिनींसाठी आणि दुसर्‍या दिवशी पालकांसाठी तिकिट लावून.
समाजात मान्यता मिळालेल्या , फेमस माजी विद्यार्थिनींना आमंत्रण करायला शिक्षकांबरोबर जायची चढाओढ लागायची. (तेव्हडंच शाळेतून राजरोस बाहेर पडायला मिळायचं.) स्पर्धा, बक्षिसं, रोज खाणीपिणी, मग मोठ्ठं भोजन हे आनंदाचे दिवस. उद्घाटनाचे पाहुणे मात्र बोर करायचे. लांबलचक भाषणं द्यायचे. एकदा ऍड. मनोहरांना (सिनियर) आमंत्रित केलं होतं . काही कारणानं त्यांना यायला जमलं नाही. बरं वाटलं २ मिनिटं. पण कसलं काय, त्यांच्या पत्नीनं त्यांचं अख्खं भाषण वाचून दाखवलं. :(

भरपूर गमती लिहायला आवडतील. विस्तारभयानं आवरतं घेते. :)

एक आठवण : एका गॅदरिंगच्या वेळी आंध्रात चक्रीवादळानं बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. त्यावर्षी सगळ्यांनी ठरवून संमेलनाची सगळी रक्कम मदत म्हणून पाठवली होती.

विसोबा खेचर's picture

17 Dec 2008 - 1:03 pm | विसोबा खेचर

शाळेतल्या स्नेहसंमेलनात अल्पोपाहार समितीवर माझी नेहमी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक व्हायची! :)

ह. घ्या हं तात्या

माझी वर्स्ट केस एस्टिमेशन साठी निवड झाली होती इंजिनियरींग ला.. शेवटी मलाच फुड डिपार्टमेंट सेक्रेटरी केलं..