कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं.

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
24 Jul 2009 - 10:29 am

खूप वर्षांपूर्वी माझ्या बरोबर लॉस एंजेलिस येथे एक चिनी स्त्री सहकारी काम करीत होती. पेली ली नाव तिचं. तिच्या सुरूवातीच्या काळात तिच्याशी इंग्लिश मध्ये संवाद साधणं म्हणजे एक कसरतच होती (आजही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.) मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की मला हवं असल्यास तिला कामावरून कमी करून व्यवस्थित इंग्लिश बोलणारा/री दुसरी कोणी व्यक्ती टेक्निशिअन म्हणून मला हवी असल्यास ते व्यवस्था करतील. पण तिचं काम टेक्निकल असल्याने, आणि तिच्या कामात ती निपूण असल्याने (आणि खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा दहा वर्षांनी ज्येष्ठ असूनही माझ्यापेक्षा ती खूपच चटपटीत असल्याने ) मी तिलाच कायम करण्याचा निर्णय घेतला. पुढे आमचं एकमेकांशी छान जमलं. हळूहळू तिला आवडते हे कळल्यावर माझ्या पत्नीने दिलेली दाल फ्राय, आणि तिने डब्यात खास माझ्यासाठी आणलेले शाकाहारी डंपलिंग्ज खाता खाता आम्ही एकमेकांच्या देशांविषयीच्या, चालीरीतीविषयीच्या माहितीची देवाणघेवाण करू लागलो. एक दिवशी तिने मला चांगलंच आश्चर्यचकित केलं. ती जेवणाच्यावेळी घेऊन आली नवर्‍याला, आणि म्हणाली की त्याला मला काही द्यायचं आहे. हा तिचा नवरा इलेक्ट्रिकल एंजिनिअरींगचा प्राध्यापक आणि हुषार माणूस, पण मितभाषी. त्याने मला एक-दोन वाक्यात 'काय, कसं काय' वगैरे विचारल्यावर एकदम म्हणाला: "You are Indian, so I want to give you something that I think you will like, I have kept it for 30 years." त्याने माझ्या हातात ठेवली एक घरी burn केलेली ऑडिओ सी. डी., मला म्हणाला "Take it home and see if you like it." माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना, मी त्याला म्हंटलं 'आताच ऐकतो की'. मी कंप्यूटरमध्ये टाकून गाणी ऐकायला लागलो आणि उडालोच. एकापाठोपाठ १६ गाणी, पूर्णपणे चिनी भाषेत, चिनी संगीतकारांनी संगीतबद्द केलेली, चिनी गायक-गायकांनी म्हंटलेली, पण सगळी राजकपूरच्या चित्रपटांची!! त्याने मला सांगितलं, की त्याच्या तरूणपणी ईशान्य चीनमधले लोक राजकपूर साठी वेडे झाले होते, त्याचे सर्व चित्रपट चिनी भाषेत गाण्यांसहित डब झालेले आहेत. राजकपूर रशियात लाडका होता हे मी ऐकून होतो, पण चीन मध्ये त्याची इतकी लोकप्रियता होती हे मला प्रथमच कळत होतं.

ही जुन्या भारतीय सिनेमांची क्रेझ चीनमध्ये आता राहिली नाही याचं त्याला वाईट वाटत होतं. तो म्हणाला "All these years, I have saved my audio cassette of these songs which are my bridge to my glorious past days in China. Last weekend, I burned them into a single CD to give you as a gift." मी म्हंटलं, " This is such a valuable memento for you, I really appreciate it very much. Let me copy the CD and return it to you." म्हणाला, "No, please keep it, my wife told me you have been very kind to her, this is my way of saying thanks!" आजही ती सी डी माझ्यासंग्रही आहे.

*************

या घटनेची आठवण होण्याचं कारण म्हणजे आज यू ट्युबवर जुनी गाणी शोधतांना सापडलेले एका चिनी वंशाच्या तरूणीचे हिंदी गाण्यांचे व्हिडीओज्. ही तरूणी आहे मेकी यांग, आणि ती ज्या Hmong या चिनी समाजातून आलीय त्या लोकांचं वसतीस्थान आहे तो भाग ईशान्य चीनमधला, पेली च्या नवर्‍याचा प्रांत होता त्याच्या जवळपासचा. आजकाल Hmong लोक देशोधडीला लागले आहेत, त्यांची बहुतांश वस्ती आहे ती थायलंड मध्ये, आणि बरेचसे Hmong अमेरिकेत स्थायिक झालेत.

************
मेकी यांग चे मी ६-७ व्हिडीओज् पाहिले, आणि तिचं जीव तोडून नाचणं आणि अप्रतिम lipsynch पहातांना मनात आलं "कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हेच खरं."

दुवा , , , वगैरे.

तिच्या नृत्याची मूळच्या चित्रपटांतील गाण्यांशी तुलना न करता, मोकळ्या मनाने पाहिलं तर तिची नृत्याविषयी किती निष्ठा आहे ते जाणवेल असं वाटतं. मेकी भरतनाट्यम शिकते असं काही ठिकाणी वाचलं. South East Asian Games शी संबंधित कार्यक्रमात (हा अमेरिकेत सॅक्रामेंटोमध्ये का झालेला दिसतो ते माहीत नाही) मेकी यांग आणि जोअ‍ॅना वँग या दोघींनी सादर केलेलं हे गाणंही पहा.

अशी आणखीही अनेक उदाहरणं डोळे उघडे ठेवले तर सापडतील, तुम्हालाही माहीत असतील. आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच, पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच.

नृत्यदेशांतरप्रकटनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

24 Jul 2009 - 10:40 am | विसोबा खेचर

आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच,

येस्स! संगीत-नृत्य कलेच्या बाबतीत वुई आर नंबर वनच आहोत!

पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच.

नक्कीच. आजा सोनियेचा दुवा पाहिला.. मस्त आहे! :)

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jul 2009 - 12:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नक्कीच. आजा सोनियेचा दुवा पाहिला.. मस्त आहे!

पुरूषी आवाज असताना तिच्या हालचालीही पुरूषी होतात आणि स्त्रीच्या आवाजाला लगेच नाजूकपणा येतो, हे मलाही जाणवलं.
गंमत वाटली ती तिच्या कपड्यांच्या बदलणार्‍या रंगांची! एकतर आपल्या चित्रपटांमधल्या गाण्यांमधे कपडे बदलतात, तिने फक्त संगणकावर कपड्यांचा आणि गवत, खिडक्यांचे ब्लाईंड्स इत्यादी रंग बदलून याचीही जाणीव दाखवली आहे.

माझी एक चिनी हाऊसमेट आणि मैत्रिण माझ्याकडे राज कपूरच्या गाण्यांची ऑडीओ कॅसेट तिच्या आजीसाठी मागत होती, तिची एकदम आठवण झाली.

अदिती

सहज's picture

24 Jul 2009 - 10:42 am | सहज

छान दुवे.

धन्यवाद.

सुनील's picture

24 Jul 2009 - 10:53 am | सुनील

उत्तम लेख.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अश्विनि३३७९'s picture

24 Jul 2009 - 11:08 am | अश्विनि३३७९

सगळे दुवे छान !!

स्वाती दिनेश's picture

24 Jul 2009 - 11:17 am | स्वाती दिनेश

उत्तम लेख,
स्वाती

नंदन's picture

24 Jul 2009 - 12:28 pm | नंदन

उत्तम लेख, आवडला. लेखासोबतचे दुवेही छान आहेत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

Nile's picture

25 Jul 2009 - 12:47 pm | Nile

मस्त लेख! भारी वाट्लं. :)

पंकज's picture

24 Jul 2009 - 2:05 pm | पंकज

असाच एक दुवा : http://www.youtube.com/watch?v=1HaImMwP134

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jul 2009 - 2:43 pm | बिपिन कार्यकर्ते

हाही दुवा छान आहे... आणि स्पॅनिशभाषिक असल्याने 'जय हो' चे 'ये हो' पण झाले आहे कुठे कुठे... ;)

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

25 Jul 2009 - 1:40 am | प्राजु

मस्त पर्फोम केलं आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2009 - 9:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त दुवा ! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jul 2009 - 2:39 pm | बिपिन कार्यकर्ते

तुम्ही सांगितलेली आठवण छानच आहे, जपून ठेवण्यासारखीच आहे. आणि ते दुवेही मस्त हो, बहुगुणी शेठ. साधारणपणे अभारतिय लोकांना काही हावभाव खूप रूळल्याशिवाय नीट जमत नाहीत. पण ही पोरगी तयार आहे एकदम. ग्रेट.

बिपिन कार्यकर्ते

अनामिक's picture

24 Jul 2009 - 11:34 pm | अनामिक

हापिसात असल्याने अजून व्हिडीओ पाहिले नाहीत...

पण एक गोष्टं आठवली... चिनमधेच नव्हे तर टर्कीमधेही राज कपूरचे चित्रपट डब करून पाहिल्या जायचे, पण गाणी मात्र हिंदीत असायची (म्हणे). माझा लॅबमेट जो टर्कीमधून आलेला त्याने तिथे राजकपूर फार फेमस होता असे सांगीतले. त्याला तर 'आवारा हूं...'ची धूनही व्यवस्थीत येत होती.

-अनामिक

भाग्यश्री's picture

25 Jul 2009 - 12:59 am | भाग्यश्री

सही आहे लेख! दुवेही मस्त!
खूप वेळा लिहीले आहे मी हे खरं तर! पण लिहीते परत..
लास वेगासला व्हेनेशिअन कॅसिनो मधे एका आजोबांनी अ‍ॅकॉर्डीअन वर आवारा हू, इचक दाना बिचक दाना गाऊन, वाजवून दाखवले होते! मस्त वाटलं होतं!!
राज कपूर भलताच फेमस होता ना!

http://www.bhagyashree.co.cc/

प्राजु's picture

25 Jul 2009 - 1:33 am | प्राजु

खूपच सुंदर. लेख आणि दुवेही!
तिचं स्वतःला झोकून देऊन नाचणं खूप आवडलं.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रियाली's picture

25 Jul 2009 - 3:25 am | प्रियाली

लेख, अनुभव आवडला. मुलींचे भारी कौतुक वाटले.

लवंगी's picture

25 Jul 2009 - 7:14 am | लवंगी

"मिशा" माझा एक रशियन सहकारी राजकपुरचा अस्सल चाहता होता. आम्ही काम करता करता तासन तास "आवारा हू ", "मेरा जुता है जपानी" गुणगुणत बसायचो. तर टिम नावाचा अमेरीकन सहकारी भीमसेन जोशींच्या गाण्याचा दिवाणा आहे. कलेला सीमा-भाषेच बंधन नसते हेच खरं.

नीधप's picture

26 Jul 2009 - 9:40 am | नीधप

ह्म्म मी आमच्या कॉश्च्युम शॉपमधे सगळ्यांना गुलाम अलीच्या गझलांपासून त्यावेळेला लेटेस्ट असलेल्या दिलसे, ताल च्या गाण्यांपर्यंत, फड सांभाळ पासून प्रीतरंगमधल्या कोहिकडे गेली मया कुक्काची टिकली पर्यंत सगळं ऐकायला लावलं होतं तीन वर्षात.

सगळ्यांना छैय्या छैय्या जरा जास्तंच आवडलं होतं. अनेकांना तेव्हा गाणी कॉपी करून दिली होती.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सुनील's picture

27 Sep 2009 - 5:49 am | सुनील

जालावर भटकंती करीत असताना ही चित्रफीत मिळाली. ही म्हणे श्रीलंकेतील पहिली कराओके संगीताची चित्रफीत. पण गाण्याचे शब्द ऐका - आपल्या कोंकणी भाषेतील!!

कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हे खरंय!

" alt="" />

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बहुगुणी's picture

19 Jul 2011 - 3:30 am | बहुगुणी

माझा स्वतःचाच धागा वरती आणल्याबद्दल थोडं चोरटं वाटतंय, पण तासभर मोकळा वेळ मिळाला आणि या धाग्याची आठवण करून देणारे काही व्हिडिओज एकापाठोपाठ एक मिळाले, म्हणून ते इथे देतोय.

या आधी मी भारतीय वंशाच्या पण अमराठी मुलांनी गायलेली मराठी गाणी शोधतांना सापडलेली अनुषा आणि पियानो/कीबोर्ड वाजवणारे वा गाणारे इतर बालकलाकार यांच्या विषयी लिहिलं होतं.

आज ओळख करून देतोय ती 'कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं' हे पुन्हा एकदा सिद्ध करणार्‍या काही अ-भारतीय कलाकारांची. इथे तुम्हाला ते दिसतील ते भारतीय गाणी गातांना (एका अपवादांत नाचतांना).

आवारा हूं

एक लडकी की तुम्हें क्या सुनाऊं दासतां

पुढची बरीचशी गाणी गाणारी चिनी 'एमी' ही गायिका बरीच वर्षे भारताच्या प्रेमात आहे, आणि तिची लतादीदींवर बरीच भक्ती आहे.

आओ ना, आओ ना

देख लो आवाज़ देकर

चुरा लिया है तुम ने

लूटे कोई मन का नगर

ओ यारा रब रुस जाने दे

थोडा रेशम लगता है

कभी कभी मेरे दिल में

हम तो भई जैसे हैं वैसे रहेंगे

मैं ता यारा दीवाना तेरा जाट यमला (कोरियन कलाकार पंजाबी गीतावर नाचतांना)
mai ta yaara deewana tera jat yamla (Koreans dancing to a Punjabi song)

छिन्न छिन्न आसय (हे गाणं अर्थातच 'दिल है छोटासा' याचं मूळ रूप आहे)

वंदे मातरम (खरं तर त्याचं तामीळ रूप) गातांना एक चिनी कलाकार खुद्द ए आर रेहेमानच्या उपस्थितीत

शेवटी, याच लेखात म्हंटलं होतं ते पुन्हा उद्धृत करतो:

अशी आणखीही अनेक उदाहरणं डोळे उघडे ठेवले तर सापडतील, तुम्हालाही माहीत असतील. आपला देश इतरांनी अनुकरण करावं अशा काही अजरामर कलाकृती प्रसवतो हे खरं आहेच, पण त्या कलाकृती अंगिकारण्याची वृत्ती इतर देशीय ठेवतात हेही कौतुकास्पदच!

मस्त धागा....
वाचायचा राहूनच गेलेला.

रेवती's picture

20 Jul 2011 - 1:05 am | रेवती

धागा आवडला.

बहुगुणी's picture

20 Jul 2011 - 1:55 am | बहुगुणी

मुबारका मुबारका

मेघवेडा's picture

20 Jul 2011 - 3:42 am | मेघवेडा

छान लेख! एक एक दुवेही अप्रतिम! एमीची गाणीही आवडली!

माझ्या ओळखीतलेही काही अभारतीय लोक उत्तम भांगडा करतात आणि मला भांगडा नीट येत नाही म्हणून हसतात देखील माझ्यावर!

यशोधरा's picture

25 Jul 2011 - 12:13 pm | यशोधरा

मस्त.

नंदन's picture

19 Aug 2011 - 2:48 pm | नंदन

नवीन दिलेली गाणीही आवडली. त्याचबरोबर Hmong लोकांच्या परिस्थितीबद्दल दिलेली माहितीही. तिला तमिळ गाणं म्हणताना पाहून एका जालस्नेह्याने सांगितलेलं - दुसर्‍या महायुद्धात जपानी सैन्यापासून वाचवण्यासाठी तमिळ कुटुंबांच्या घरी आश्रय घेतल्यामुळे अस्खलित तमिळ बोलता येणार्‍या चिनी आजीबाईंचं उदाहरण आठवलं.

बहुगुणी's picture

9 Aug 2015 - 4:30 am | बहुगुणी

स्वतःचाच धागा बर्‍याच वर्षांनी वरती काढायचा प्रमाद करतो आहे, कारण खटपट्या यांनी खरडफळ्यावर दिलेला हा अप्रतिम दुवा पाहिला आणि या धाग्याची आठवण झाली:

आता या फारीनच्या कोळणी पहा

https://www.facebook.com/manish.patil.1042/videos/869140219845209/

(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));

Posted by Manish Patil on Friday, August 7, 2015

कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं हेच पुन्हा जाणवलं!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2015 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुवा चालत नाही.

तुम्ही लेखात ज्या चिनी प्रांताचा उल्लेख केला आहे त्याचे नाव युन्नान (Yunnan) आहे. हिमालय नेपाळ व भारतातून उत्तर मियानमार मार्गे चीनमध्ये शिरतो... तोच हा युन्नान. माझ्या मते हा चीनचा सर्वात जास्त निसर्गसुंदर प्रांत आहे. त्याची उत्तर-पश्चिम सीमा भारताच्या उत्तर-पूर्व सीमेपासून केवळ १२५ किमी दूर आहे ! हा भाग सांस्कृतीकरित्या तिबेटशी खूप जवळ आहे. आजही तेथे हिंदी चित्रपट बघितले जातात, हिंदी गाणी आवडीने ऐकली जातात आणि लोकांना भारतियांबद्दल आपुलकी आहे. तिथल्या अनेक लोकांनी भारतात शिक्षण घेतलेले आहे. चीनच्या भटकंतीत याच एका प्रांतात मला हिंदीत बोलून चकीत करणारे लोक भेटले होते ! माझे तिथले अनुभव इथे (भाग ८ ते १२) वाचता/बघता येतील.