या वेळी सापडलीय मॅसेच्युसेट्सची एक बहुतेक कानडी सात-एक वर्षांची चिमुरडी, अनुषा (ती कदाचित तामीळही असू शकेल, इथली 'विकास' वगैरे मंडळी बहुतेक खात्री करू शकतील).
मला ती सापडली, ते लता मंगेशकरांचं मोगरा फुलला यू ट्यूब वर load होत नव्हतं म्हणून 'दुधाची तहान ताकावर' या न्यायाने समोर आलेल्या व्हिडिओवर क्लिक केल्यावर. आणि माझी विकेटच उडाली!
मग आणखी शोधत गेलो तर खालील गाणी सापडली, आणि हळू हळू कळत गेलं की ही कन्यका मराठी नाहिये, तिची तामीळ आणि कन्नड गाणी पण इथे देतोय. अर्थातच, मुलगी लहान आहे त्यामुळे आवाज कच्चा आहे, हिंदी उच्चारात (आणि उर्दूत तर विशेष) सुधारणा व्हायला वाव आहे, कधी कधी श्वासही कमी पडतोय, पण मुलीत नक्कीच promise आहे असं वाटलं, तिचं निर्भीड पणे गाणंही खास भावलं.
Enjoy!
दिखायी दिये युं के बेखुद किया
ये लडका हाये अल्ला कैसा है दीवाना
ये मेरा दिल, प्यार का दीवाना (डॉन)
My heart will go on and on (Titanic)
इलयाराजाचं तामीळ गाणं - कात्रिल एन्दम गीथम
कन्नड 'पूजीसालंदे हुगळ थंदे'
पुढचं गाणं तिने बंगरुळात म्हंटलं आहे:
बोल रे पपीहरा
प्रतिक्रिया
24 Aug 2009 - 12:36 am | अंतु बर्वा
छान गायलय...
ashland पासून चारेक मैलांवर राहत असुनही कधी हिच्याबद्दल ऐकलं नव्हतं.... ए़का छान टॅलेंट ची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...
24 Aug 2009 - 1:34 pm | अविनाशकुलकर्णी
हुषार आहे चिमुरडी