मिसळ < आणि > पाव : शतशब्दकथा स्पर्धा

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
27 Jul 2015 - 2:29 pm

जवळजवळ दोन वर्षांपूर्वी आतिवास यांनी एक नवाच वाङ्मयप्रकार मिपावर आणला. (शीर्षक सोडून) शंभर शब्दांत कथा. मिपाकरांना हा प्रकार बेहद्द आवडला. इतकंच कशाला, "शतशब्दकथा" हे नावदेखील मिपाकर चिगो यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अनेक मिपाकरांनी उत्तमोत्तम शतशब्दकथा लिहिल्या, लिहीत आहेत.

मिपाकरांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करत आहोत शतशब्दकथा स्पर्धा - पण खास मिसळपाव पद्धतीने - खमंग तर्री मारून!

या स्पर्धेच्या दोन फेर्‍या असणार आहेत. आणि त्यात परीक्षकांबरोबर वाचकांचाही सहभाग असणार आहे!

पहिली फेरी:
- ता० १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या मिपाकरांनी शतशब्दकथा लिहून स्वतःच प्रसिद्ध करायची आहे.
- जर कथा आवडली असेल तर वाचक कथेला आपलं मत देऊ शकतात. वाचकांनी आपलं मत "+१" असं लिहून आपल्या प्रतिक्रियेमध्ये नोंदवायचं आहे. (प्रत्येक प्रतिसादकाचं एकच मत ग्राह्य धरलं जाईल.)
- ता० १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट मध्ये वाचकांच्या मतांची बेरीज घेतली जाईल आणि सर्वाधिक मतं प्राप्त करणार्‍या तीन शतशब्दकथा अंतिम फेरीत जातील.
- ता० १६ ते २० ऑगस्ट या दरम्यान परीक्षकही तीन इतर कथांची निवड अंतिम फेरीसाठी करतील.

अंतिम फेरी:
- अशा प्रकारे अंतिम फेरीत सहा लेखक आणि त्यांच्या सहा शतशब्दकथा दाखल होतील
- ता० २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट मध्ये या सहा लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) शतशब्दकथेच्या स्वरूपातच लिहायचा आहे!
- वाचक पहिल्या फेरीप्रमाणेच आपलं मत प्रतिसादात "+१" लिहून नोंदवू शकतात.
- ता० ३१ ऑगस्ट नंतर परीक्षक त्यांचं गुणांकन देतील.
- वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या गुणांकनाला समान महत्त्व देऊन तीन विजेते घोषित करण्यात येतील.

विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल.

सूचना:
प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. एकापेक्षा अधिक कथा प्रकाशित केल्यास पहिली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल.
- स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.
- पहिल्या फेरीत कथेचं सीक्वल प्रकाशित करू नये. फक्त सहा लेखकांना/कथांना स्पर्धेसाठी सीक्वल लिहायची संधी मिळेल.
- काही प्रश्न असल्यास कृ० साहित्य संपादक मंडळाशी संपर्क साधावा.

वाङ्मयकथाप्रकटन

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 2:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त कल्पना आहे !

सर्व इच्छुक स्पर्धकांना शुभेच्छा !

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jul 2015 - 2:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त उपक्रम
नवनव्या कथा वाचायला मिळतील

पैजारबुवा,

प्रसाद गोडबोले's picture

27 Jul 2015 - 2:55 pm | प्रसाद गोडबोले

आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!

हायला ! ही कल्पना भन्नाटच आहे !!

अभिनंदन आणि शुभेच्छा !!

आतिवास's picture

27 Jul 2015 - 3:01 pm | आतिवास

नव्या कथा वाचण्यास उत्सुक आहे.
शुभेच्छा.

अद्द्या's picture

27 Jul 2015 - 3:03 pm | अद्द्या

मस्तच कल्पना .
+1

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2015 - 3:06 pm | टवाळ कार्टा

+१ :)

अरुण मनोहर's picture

27 Jul 2015 - 3:07 pm | अरुण मनोहर

क्या बात है !
सर्वाना शुभेच्छा !

आयला
शशक मध्ये जसा एण्डला ट्विस्ट देतात, तसा तुम्ही दिला की!!

(हिंट : पहिल्या फेरीत कथा अशी लिहावी की पुढे काय होईल हे कळून घेण्यासाठी लोकांनी तिला मते देऊन अंतिम फेरीत पोहचवावी)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2015 - 3:42 pm | अत्रुप्त आत्मा

@शशक मध्ये जसा एण्डला ट्विस्ट देतात, तसा तुम्ही दिला की!! >> +++१११

शब्दबम्बाळ's picture

29 Jul 2015 - 10:35 am | शब्दबम्बाळ

कटप्पा ने बाहुबली को.... ;)

पद्मावति's picture

27 Jul 2015 - 4:12 pm | पद्मावति

या स्पर्धेच्या निमित्ताने खूप छान शतशब्द कथा वाचायला मिळतील.
अतिवास यांचे हा एक अनोखा साहित्य प्रकार मिपा वर आणला या बदद्ल त्यांचे आभार.

पगला गजोधर's picture

27 Jul 2015 - 4:15 pm | पगला गजोधर

(चखना बिन पेग, कंपू बिन प.ग.)

खुद को कर बुलंद इतना...

मिपाकर चांगल्या लेखनाचे कंपूबिंपू न बघता स्वागत करतात. तेव्हा बिनधास्त लिहिणे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Aug 2015 - 1:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

चांगल्या लेखनाला मिपावर कंपूच्या कुबड्यांची गरज पडत नाही !

सदस्यनाम's picture

27 Jul 2015 - 4:29 pm | सदस्यनाम

मस्त. मी तर प्रिक्वल पण देऊ म्हणतो.
अब आयेगा मजा.

सामान्यनागरिक's picture

27 Jul 2015 - 4:45 pm | सामान्यनागरिक

विजेत्यांना आपापल्या शहरात मिसळ पाव ची दोन चार कुपन्स द्यायला पाहिजे .

रातराणी's picture

27 Jul 2015 - 7:52 pm | रातराणी

नै पण परीक्षक कोण आहे ते सांगितलच नाही : )

योगी९००'s picture

27 Jul 2015 - 9:12 pm | योगी९००

माझी आधी प्रकाशित झालेली कथा देऊ शकतो का स्पर्धेत...?

आदूबाळ's picture

27 Jul 2015 - 9:28 pm | आदूबाळ

क्षमस्व!

स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

अर्थात नवीन कथा लिहू शकताच!

उगा काहितरीच's picture

27 Jul 2015 - 9:22 pm | उगा काहितरीच

वा ! स्तुत्य उपक्रम .

नाव आडनाव's picture

28 Jul 2015 - 11:36 am | नाव आडनाव

आयडी नावामुळे आवडल्याचा प्रतिसाद भारी वाटतो -
वा ! स्तुत्य उपक्रम . - उगा काहितरीच - वा ! स्तुत्य उपक्रम . :)

ओसु's picture

28 Jul 2015 - 12:18 am | ओसु

मस्तच कल्पना आहे. संभाव्य स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा

चिगो's picture

28 Jul 2015 - 5:33 am | चिगो

भन्नाट आयडीया.. खास करुन 'सीक्वल'ची. एक कथा आहे मेंदूत, ती टाकावी म्हणतो. अर्थात नामकरण केल्यानंतर दोनेक वर्षांनी आणि तीपण मिपावर शतशब्दकथांचा पुर आलेला असतांना, ती कितपत टिकाव ढरेल, ह्याबद्दल शंकाच आहे..

चिगो's picture

28 Jul 2015 - 5:38 am | चिगो

ह्यानिमित्ताने आतिवासतैंची मिपावरची पहिली (पैला नंबर) शतशब्दकथा इथे डकवतोय..

योगी९००'s picture

28 Jul 2015 - 6:23 am | योगी९००

सिक्वेल हा प्र॑कार पटला नाही..!

शशक म्हणजे शंभर शब्दात संपणारी कथा...तेथे सिक्वेलला स्कोपच नसला पाहिजे. त्याऐवजी पुढच्या फेरीत नवीन शशक मागवावी.

चिगो's picture

28 Jul 2015 - 7:02 am | चिगो

थोडासा असहमत..

शशक म्हणजे शंभर शब्दात संपणारी कथा...तेथे सिक्वेलला स्कोपच नसला पाहिजे.

हे मान्य असलं तरी अशी शतशब्दकथा लिहीणं, जी स्वतंत्रपण असावी, आणि गरज पडल्यास जिच्यातून आणखी एक शशक फुलवता यावी, हेच चॅलेंज आहे..

नंदन's picture

28 Jul 2015 - 12:21 pm | नंदन

शशकवाचनोत्सुक!

तुडतुडी's picture

28 Jul 2015 - 5:32 pm | तुडतुडी

काही प्रश्न
१. विजेत्याला मिळणारी पुस्तकं हि त्याच्या आवडीची असतील कि संपादकांच्या ?
२. "आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!" हा काय प्रकार आहे ? शतशब्दकथा म्हणजे ती १०० शब्दांत लिहून पूर्ण व्हायला हवी ना .
३. "वाचकांना समजेल अशी " असा निकष आहे का ? कारण सध्या प्रकाशित होणार्या काही शतशब्दकथा आमच्या डोक्यावरून जाणार्या आहेत

१. विजेत्याला मिळणारी पुस्तकं हि त्याच्या आवडीची असतील कि संपादकांच्या ?

बजेट ठरलेलं असेल. विजेते बजेटमध्ये बसणारी आपल्या आवडीची पुस्तकं सुचवू शकतात.

२. "आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!" हा काय प्रकार आहे ? शतशब्दकथा म्हणजे ती १०० शब्दांत लिहून पूर्ण व्हायला हवी ना .

हेच तर आव्हान आहे. पहिल्या फेरीतली कथा १०० शब्दांत स्वयंपूर्ण तर असायला हवीच, पण त्या कथावस्तूत सीक्वल आणण्याएवढा जीव पाहिजे. तो सीक्वलही १०० शब्दांत बसवता आला पाहिजे.

३. "वाचकांना समजेल अशी " असा निकष आहे का ? कारण सध्या प्रकाशित होणार्या काही शतशब्दकथा आमच्या डोक्यावरून जाणार्या आहेत

वाचकांच्या मतांना ५०% महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हीच ठरवा ;)

पिलीयन रायडर's picture

28 Jul 2015 - 7:34 pm | पिलीयन रायडर

सिक्वलची आयडिया लय आवडलेली आहे..

थोडक्यात मुद्द्याचं बोलणं तसंही जमत नसल्याने वाचकाची भुमिका आनंदाने निभावण्यात येईल!

सर्वं स्पर्धकांना शुभेच्छा!

मितान's picture

28 Jul 2015 - 11:16 pm | मितान

वाचनोत्सुक !!

नाखु's picture

29 Jul 2015 - 10:10 am | नाखु

आणि स्पर्धेलाही शत्शत शुभेच्छा !!!

छटाक नाखु

शब्दबम्बाळ's picture

29 Jul 2015 - 10:40 am | शब्दबम्बाळ

नव्या उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!

नमस्कार! आजपासून शतशब्दकथा स्पर्धेला प्रारंभ होत आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Aug 2015 - 9:31 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आज लिहितो एक (बिरुटे सर लक्ष असु द्या :). )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2015 - 8:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा. :)

-दिलीप्ल बिरुटे

अरुण मनोहर's picture

1 Aug 2015 - 10:59 am | अरुण मनोहर

नमस्कार.
शतशब्दकथा स्पर्धा सुरू केल्यासाठी अभिनंदन !

१) स्पर्धे साठी एन्ट्री "जनातलं. मनातल" मध्येच टाकायची कां?
२) कथेसाठी मत देण्याला नेहमीचा प्रतिसादाचच मार्ग आहे की, व्य.नी. वगैरे?
३) पहिल्या सहाच्या निवडीचे निकष काय आहेत?
4) (जर पहिल्या सहात आली), तर सिक्वेल शंभर शब्दातच हवा, की एका वाक्यात, वगैरे अशा काही अटी आहेत का?

आदूबाळ's picture

3 Aug 2015 - 4:07 pm | आदूबाळ

१) स्पर्धे साठी एन्ट्री "जनातलं. मनातल" मध्येच टाकायची कां?

हो

२) कथेसाठी मत देण्याला नेहमीचा प्रतिसादाचच मार्ग आहे की, व्य.नी. वगैरे?

मत देण्यासाठी प्रतिसादात शक्यतो +१ लिहावे. छान, आवडले वगैरे लिहिलेली मतंही ग्राह्य धरली जातील, पण तरीही शक्यतोवर +१ लिहायची शिस्त पाळावी असे सुचवतो. ( - आदूगोपाल बजाज)

३) पहिल्या सहाच्या निवडीचे निकष काय आहेत?

पहिली फेरी: पहिल्या तीन कथा मतांच्या बेरजेवर ठरतील. उर्वरित कथांमधून परीक्षक तीन कथा निवडतील.
अंतिम फेरी: वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या निवडीला समान महत्त्व देऊन तीन विजेते निवडण्यात येतील.

4) (जर पहिल्या सहात आली), तर सिक्वेल शंभर शब्दातच हवा, की एका वाक्यात, वगैरे अशा काही अटी आहेत का?

हो. सीक्वेल शंभर शब्दांतच हवा.

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Aug 2015 - 12:04 pm | माम्लेदारचा पन्खा

शतशब्द २०- २० सुरू होतेय .......मात्र गोष्टींची जातकुळी ललित लेखासारखी नजाकतदार असणार ह्यात शंका नाही....

सगळ्या लेखकुंना शुभेच्छा !

तुडतुडी's picture

1 Aug 2015 - 2:28 pm | तुडतुडी

कुठली कथा स्पर्धेसाठी आहे कुठली नाही हे कसं कळणार ? कि १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत लि प्रत्येक कथा स्पर्धेसाठी ग्राह्य असतील ?

या कालावधीतली प्रत्येक कथा "बाय डिफॉल्ट" स्पर्धेत ग्राह्य धरली जाईल. लेखकाला कथा स्पर्धेत द्यायची नसेल तर तसे साहित्य संपादक मंडळापैकी कोणाला तरी कळवावे.

खेडूत's picture

3 Aug 2015 - 4:12 pm | खेडूत

शुभेच्छा !!
आणि शुद्धलेखन - ह्रस्वदीर्घ , विरामचिन्हे - साचा असे सगळे चारदा तपासून मगच प्रकाशित करावे असे सुचवतो!

पाटीलअमित's picture

7 Aug 2015 - 9:36 pm | पाटीलअमित

अनुमोदन
आणि ज्यांना शुद्ध लेखन हा मुद्दा गौण वाटतो त्यांनी सोडल्य दह्यात मिश्या जे मोकलाया दाहि दिश्या चे विडंबन आहे नक्की बघावे

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Aug 2015 - 4:42 pm | ज्ञानोबाचे पैजार

स्पर्धे साठी आलेल्या शाताशब्द कथा एकाच ठिकाणी दिसतील अशी व्यवस्था करता येइल का?

त्यामुळे कथा शोधून शोधून वाचाव्या लागणार नाहीत आणि मत द्यायला पण सोपे पडेल.

पैजारबुवा

पिलीयन रायडर's picture

3 Aug 2015 - 10:45 pm | पिलीयन रायडर

हेच लिहायला आले होते.

सगळ्या शतशब्दकथा एकत्र दिसतील असे करावे. तसंही आजकाल शशक इतक्या येत असतात की त्याचा कायमचा वेगळा टॅब असला तरी हरकत नसावी.

नीलमोहर's picture

4 Aug 2015 - 10:09 am | नीलमोहर

खरंच स्पर्धेसाठी आलेल्या शतशब्द कथा एकाच ठिकाणी दिसतील अशी व्यवस्था करावी.
एक शंका होती, प्रत्येक सदस्याला एकाच कथेला मत देता येईल की कितीही कथांना ?

कितीही कथांना मत देता येईल. पण एका कथेवरचं एकच मत ग्राह्य धरलं जाईल.

गौरी लेले's picture

3 Aug 2015 - 5:19 pm | गौरी लेले

खुपच अभिनव प्रयोग !

मराठी साहित्य क्षेत्रातील ह्या अभिनव प्रयोगाला शुभेच्छा :)

निमिष सोनार's picture

3 Aug 2015 - 5:28 pm | निमिष सोनार

..कोणताही चालेल का?की त्याबद्दल काही मर्यादा आहेत?

निमिष सोनार's picture

3 Aug 2015 - 5:38 pm | निमिष सोनार

.. सहजपणे शतशब्द्कथेच्या नावाखाली खपवला जाण्याची भीती वाटते आहे..

आदूबाळ's picture

3 Aug 2015 - 5:57 pm | आदूबाळ

विषय कोणताही चालेल.

खपवायला काय काहीही खपवता येईल. पण मत देणारे वाचक त्या खपाऊ मालाला कितपत आपलंसं करतील हा प्रश्नच आहे.

आदिजोशी's picture

3 Aug 2015 - 5:52 pm | आदिजोशी

नव्या उपक्रमाबद्दल मिपा व्यवस्थापनाचे अभिनंदन.
सिक्वल लिहायची कल्पना पटली नाही. कथा पूर्ण असली पाहिजे. दोन भाग झाले की एकच कथा दोन भागात लिहिल्यासारखे होते. कथा १०० भागात संपली पाहिजे असं माझं मत आहे.
असो. लेखकांना शुभेच्छा :)

प्यारे१'s picture

4 Aug 2015 - 1:30 am | प्यारे१

>>>>कथा १०० भागात संपली पाहिजे
हो ना!
आम्ही किती भाग झाले 'होणार सून मी या घरची' संपायची वाट बघतोय. ;)

मिपासाठी या निकषावर फ़क्त बुवांची सिरीज उतरते. १०० मध्ये संपवतील नक्की! (हलकं घ्या बुवा)

आता एक सुचवणी : स्पर्धेसाठीची कुठलीही कथा अथवा छायाचित्रं ही लेखकाच्या/ छायाचित्रकाराच्या नावाशिवाय यावीत. एका विश्वासू व्यक्तीला व्यनि मार्फ़त कथा किंवा छायाचित्रं पोचाव्यात आणि नंतर एका ठराविक क्रमानं गोष्टी प्रकाशित व्हाव्यात.

फ़क्त कथेसंबंधी अथवा छायाचित्रांसबंधी खरं मत त्यामुळे समजेल. आतादेखील बहुतांश तसंच होतं मात्र कुठेतरी 19 20 होतंच. लेखक कोण आहे? अमुक ढमुक म्हणजे कथा चांगलीच आहे असं होऊ नये असं वाटतं. यात गोपनीयतेमुळे नवीन लोकांचा फ़ायदा होऊ शकतो.

स्पर्धेला शुभेच्छा.एक सुचना-
विजेत्याला पुस्तकाऐवजी कुपन द्यावे.(उदा.bookganga वर सोय आहे) विजेते आवडची पुस्तकी घेतील.(एक कथा पुर्वी लिहीली होती पण वेळेअभावी प्रकाशीत नाही. केली.आता या format मधे perfect बसेल)

दिनु गवळी's picture

4 Aug 2015 - 6:11 am | दिनु गवळी

मस्त रे मस्त मजा येनार

आगाऊ म्हादया......'s picture

4 Aug 2015 - 12:01 pm | आगाऊ म्हादया......

जमलं तर उत्तमच आहे.

तुडतुडी's picture

4 Aug 2015 - 12:16 pm | तुडतुडी

वाचकांची मतं लक्षात घेताना केवळ +१ एवढच बघू नये . सगळ्यांचे प्रतिसाद लक्षात घ्यावेत . कृपया 'शीर्षकविहीन ( शतशब्दकथा-स्पर्धा-कथा)' ह्या कथेवरचा शब्दबम्बाळ ह्यांचा प्रतिसाद पहावा

आदूबाळ's picture

4 Aug 2015 - 1:15 pm | आदूबाळ

होय.

चिगो's picture

4 Aug 2015 - 2:09 pm | चिगो

वाचकांची मतं लक्षात घेताना केवळ +१ एवढच बघू नये . सगळ्यांचे प्रतिसाद लक्षात घ्यावेत . कृपया 'शीर्षकविहीन ( शतशब्दकथा-स्पर्धा-कथा)' ह्या कथेवरचा शब्दबम्बाळ ह्यांचा प्रतिसाद पहावा

अर्रे व्वा.. म्हणजे 'निगेटीव्ह मार्किंग' का? ;-) आयडीयाची कल्पना चांगली आहे.
('निगेटीव्ह मार्कींग'प्रेमी) चिगो

प्रसाद गोडबोले's picture

4 Aug 2015 - 8:17 pm | प्रसाद गोडबोले

बहुतेक सर्वच शशक दुसरा भाग लिहायचा असे मनात धरुन लिहिल्या जात आहे !

हे ही भारीच आहे कारण बहुतांश कथा उत्सुकता ताणण्यात यशस्वी ठरत आहेत . तेव्हा पहिल्या शशक वरुन इलिमिनेशन न करता +१ असा स्कोर ची बेरीज जाहीर करुन लीडर बोर्ड करावा अन मग दुसर्‍या भागातील +१ त्यात मिळवुन फायनल निर्णय घ्यावा ...

काय सांगता... सुरुवातीला बोरिंग वाटलेल्या कथेचा दुसरा भाग तुफ्फान असेल तर !

हम्म. पुढच्या टायमाला करू हा प्रकार. लीडरबोर्डची आयड्या भारी आहे.

सुरुवातीला बोरिंग वाटलेल्या कथेचा दुसरा भाग तुफ्फान असेल तर !

स्पर्धा संपल्यावर भाग २ लिहायचं स्वातंत्र्य अर्थातच लेखकांना आहे.

आदूबाळ's picture

6 Aug 2015 - 11:29 am | आदूबाळ

१०० शब्द-मर्यादा:

आतापर्यंत दोन कथा सोडता इतर कथांमध्ये कमी (८७ शब्दांची एक) वा आधिक शब्द (१०३-१२८) वापरले गेले आहेत. ज्यांच्या कथालेखनावरून स्फूर्ती घेऊन ही स्पर्धा सुरू झाली आहे त्या आतिवास यांच्या प्रत्येक कथेत १०० शब्दांचं बंधन काटेकोरपणे पाळलं गेलं आहे.

लेखकांनी शंभर शब्दांचे बंधन काटेकोरपणे पाळायचा प्रयत्न करावा.

तसेच, याचीही एक आठवण:
सूचना: प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. एकापेक्षा अधिक कथा प्रकाशित केल्यास पहिली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल.

सुधीर's picture

5 Aug 2015 - 10:20 am | सुधीर

आतिवास यांच्या प्रत्येक कथेत १०० शब्दांचं बंधन काटेकोरपणे पाळलं गेलं आहे.

ओह! हे माहीत नव्हते.

सर्वांना शुभेच्छा! विजेत्या कथांव्यतिरीक्त इतर वेचक कथांना उजवीकडच्या रकान्यात वेगळी प्रसिद्धी दिली तर आवडेल.

आंजी सारक्या नवीन पात्रांच्या प्रतिक्षेत.

नीलमोहर's picture

6 Aug 2015 - 1:14 pm | नीलमोहर

१०० शब्दांमध्ये फक्त शब्दच धरले जाणार की विराम चिन्हेही ?
इंग्लिश शब्देही चालणार ना?
धन्यवाद..

फक्त शब्दच. विरामचिह्ने शंभर शब्दांत धरली जाणार नाहीत.

श्रीगुरुजी's picture

5 Aug 2015 - 1:15 pm | श्रीगुरुजी

मिपाच्या पहिल्या पानावर फक्त शतशब्द्कथांच्या लिंक्स दिसत आहेत. इतर धागे शोधावे लागत आहेत. स्पर्धेतील सर्व शतशब्दकथा एका वेगळ्या ग्रुपमध्ये हलविता येतील का?

तुषार काळभोर's picture

6 Aug 2015 - 9:07 am | तुषार काळभोर

समथिंग लाईक 'दिवाळी अंक'

श्रीगुरुजी's picture

6 Aug 2015 - 1:13 pm | श्रीगुरुजी

वेगळा ग्रुप केलेला दिसतोय. पण स्पर्धेतील कथा त्या ग्रुपमध्ये आणि "नवीन लेखन" विभागात पण दिसत आहेत. त्यामुळे या कथा सोडून इतर धागे झाकोळले गेले आहेत. या कथा फक्त त्या ग्रुपमध्येच दिसाव्यात व "नवीन लेखन" मध्ये दिसू नयेत अशी सूचना आहे.

आदूबाळ's picture

6 Aug 2015 - 1:36 pm | आदूबाळ

अंतिम फेरीत गेलेल्या सहा लेखकांचीच सीक्वल्स स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील.

सर्वांनीच सीक्वल लिहिल्या तर स्वागत आहेच

पहिल्या सहा व्यतिरिक्त अन्य लेखकांनी मूळ कथेच्या प्रतिसादातच सिक्वल लिहीला तर?

(अन्यथा हे शंभर आणि ते शंभर असा धाग्यांचा गुंता होईल. शिवाय सिक्वल एकाच असावा असा नियम थोडाच आहे?)

तुडतुडी's picture

6 Aug 2015 - 2:31 pm | तुडतुडी

कृपया पुढच्या वेळेला अशी कथांची स्पर्धा घेताना 'पहिल्या भागाचा अर्थपूर्ण शेवट ' हा निकष पण लावावा .
दुसरी गोष्ट म्हणजे, पहिली कथा कैच्या कै . , दुसरी बरी , तिसरी चांगली , चौथी उत्कृष्ट असं होत असल्यामुळे लेखकाची शेवटची कथा लक्षात घेत येईल काय ?

कहर's picture

6 Aug 2015 - 4:25 pm | कहर

१००% सहमत. पहिली कथा अर्थपूर्ण असेल आणि शेवट कथेतच होत असेल तरच सिक्वेल बद्दल अंदाज बांधता येणार नाही. या गोष्टीचा विचार निकष साठी करावा.

माहितगार's picture

6 Aug 2015 - 4:02 pm | माहितगार

अबब! पूरच आला आहे, शतशब्द कथांचा पाहता पाहता महोत्सव झालाय. दिवाळी अंका प्रमाणे मिपाने स्वातंत्र्य दिवस अंकाची तयारी करण्यास हरकत नाही.

एखादि कथा अशा रीतीने संपली कि सिक्वेल शक्यच नाही असे वाचकाला वाटायला हवे. आणि त्यानंतर सिक्वल लिहिण्यात लेखकाची खरी कसोटी लागेल. नाहीतर "आमची गाडी बंद पडली आणि सुनसान वाड्याचे दार किरकिरत उघडले … " इथे पहिली कथा संपणार आणि to be continued… सारखी दुसरीकथा (सिक्वेल) "समोर कंदील घेऊन एक म्हातारा उभा होता" अशा काहीशा वाक्याने सुरु होणार अशा कथांमध्ये पुढच्या भागाची उत्सुकता असली तरी तिला पूर्ण कथा म्हणता येईल का ?

कृपया सिक्वेल आणि प्रीक्वेल मधला फरक स्पष्ट करा. कथेचा पहिला भाग रहस्यमय लिहून दुसऱ्या भागात तसे का घडले स्पष्टीकरण देणे याला सिक्वेल म्हणायचे का ?

सदस्यनाम's picture

6 Aug 2015 - 7:15 pm | सदस्यनाम

अहो बक्षीस प्रॉपर कथेलाच देतील हो.
प्रीक्वल सिक्वल समजणारे परीक्षक असणारच की. निदान ५० मार्क तरी त्यांच्या हातात असणारच.
तुम्ही लिहा बिनधास्त.

धर्मराजमुटके's picture

6 Aug 2015 - 8:30 pm | धर्मराजमुटके

कृपया ह्या शतशब्दकथांचे वेगळे पान बनविता येईल काय ? उदाहरणासाठी ऐसीवरचा भा.रा. भागवत विशेष अंक बघा. म्हणजे नेहमीचे इतर लेख व्यवस्थित वाचता येतील.

प्रसाद गोडबोले's picture

7 Aug 2015 - 11:47 am | प्रसाद गोडबोले

http://www.misalpav.com/comment/726016#comment-726016

ह्यावर संपादक मंडळाचे आणि साहित्य संपादकांचे आणि नीलकांत चे काय मत आहे ?

अन्य भाषातील साहित्य मिपावर चालेल का ?

तुडतुडी's picture

7 Aug 2015 - 12:07 pm | तुडतुडी

मला वाटतं एखाद दुसरं वाक्य हिंदी , इंग्लिश मध्ये चालू शकतं पण अर्धी किवा पूर्ण कथाच इतर भाषेत असावी हे पटलं नाही . हे मराठी संकेतस्थळ आहे आणि इथे मराठीचा आग्रह असलाच पाहिजे . अहो आपणच असं करायला लागलो तर आपल्या मराठीचं काय होणार ? आधीच पुढची पिढी इंग्लिशमय झालीये . :-(
आणि फक्त मी पा वरच नै तर इतर वेळी सुधा आपण हटकून मराठीतच बोललं पाहिजे .

प्रसाद गोडबोले's picture

7 Aug 2015 - 12:54 pm | प्रसाद गोडबोले

मला वाटतं एखाद दुसरं वाक्य हिंदी , इंग्लिश मध्ये चालू शकतं पण अर्धी किवा पूर्ण कथाच इतर भाषेत असावी हे पटलं नाही

हे आपल्याला वाटते हो !
पण इथे संपादक मंडळ आणि नीलकांतला काय वाटते हे महत्वाचे आहे !
काही माणसे उगाचच इथेही हिंडी रेट्ण्याचा प्रयत्न करतात , आपण त्यांच्याशी वाद घालु नये , आपण डायरेक्ट संपादकांकडे बोलावे , ते ठरवतील !
एक्गाद दुसरा ईम्ग्रजी हिंदी शब्द मराठीत आणणे निराळे अन हिंदी अख्खी भाषाच व्याकरणासकट मराठी संकेतस्थळावर रेटणे निराळे !

आपण वादात पडु नये ! संपादक ठरवतील काय ठरवायचे ते !
आता उद्या हिंदी किंव्वा इंग्रजी किंव्वा उर्दु लेखनाला मिपावर परवानगी मिळाली तर आम्हाला आनंदच आहे आम्ही अन्य भाषातही लिहितोच की :)

तुडतुडी's picture

7 Aug 2015 - 2:45 pm | तुडतुडी

पण इथे संपादक मंडळ आणि नीलकांतला काय वाटते हे महत्वाचे आहे !>>>

महाराज मी पा काय फक्त संपादक मंडळ आणि नीलकांत च्या जीवावर चालतं का ?
आणि मी त्यांच्याशीच बोलतेय तुम्हाला मी कुठं काय म्हणलाय का ? तुम्ही कशाला वादात पडताय ?

प्रसाद गोडबोले's picture

7 Aug 2015 - 4:33 pm | प्रसाद गोडबोले

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
तुम्ही कशाला वादात पडताय?

>>>

अभ्यास वाढवा =))

प्यारे१'s picture

7 Aug 2015 - 9:39 pm | प्यारे१

मी पा नाही मिपा. बाकी किती षटकं खेळणार आहात?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Aug 2015 - 9:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

१०० शब्दांपेक्षा कमी जास्तं शब्द असणार्‍या कथा स्पर्धेमधुन बाद केल्या जाव्यात. लेखकांना कुठल्याही प्रकारचा बदल संपादक अथवा साहित्य संपादक मंडळाने करुन देउ नये. अपवाद नावामधे [शतशब्दकथा स्पर्धा] असा फ्लॅग टाकणे. हि स्पर्धा आहे. नो सेकंड चान्स.

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Aug 2015 - 9:55 pm | माम्लेदारचा पन्खा

डु आयडीने बक्षिस मिळवल्यास त्याला ते कसे देणार ? ....की त्यालाच तडीपार करणार ?

आदूबाळ's picture

7 Aug 2015 - 9:59 pm | आदूबाळ

डु बक्षीस देणार

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Aug 2015 - 10:02 pm | माम्लेदारचा पन्खा

ह्या निमित्ताने डु डेटा उप्द्ते होइल !!

पाटीलअमित's picture

7 Aug 2015 - 10:02 pm | पाटीलअमित

डू आयडी वर आणिक शशका वर चर्चा चालू आहे म्हणून हे सुचले
मिसळपावातील भय http://www.misalpav.com/node/३२३४०

=====================

आजची साक्षरी बाहुबली भाग 2