जवळजवळ दोन वर्षांपूर्वी आतिवास यांनी एक नवाच वाङ्मयप्रकार मिपावर आणला. (शीर्षक सोडून) शंभर शब्दांत कथा. मिपाकरांना हा प्रकार बेहद्द आवडला. इतकंच कशाला, "शतशब्दकथा" हे नावदेखील मिपाकर चिगो यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अनेक मिपाकरांनी उत्तमोत्तम शतशब्दकथा लिहिल्या, लिहीत आहेत.
मिपाकरांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करत आहोत शतशब्दकथा स्पर्धा - पण खास मिसळपाव पद्धतीने - खमंग तर्री मारून!
या स्पर्धेच्या दोन फेर्या असणार आहेत. आणि त्यात परीक्षकांबरोबर वाचकांचाही सहभाग असणार आहे!
पहिली फेरी:
- ता० १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या मिपाकरांनी शतशब्दकथा लिहून स्वतःच प्रसिद्ध करायची आहे.
- जर कथा आवडली असेल तर वाचक कथेला आपलं मत देऊ शकतात. वाचकांनी आपलं मत "+१" असं लिहून आपल्या प्रतिक्रियेमध्ये नोंदवायचं आहे. (प्रत्येक प्रतिसादकाचं एकच मत ग्राह्य धरलं जाईल.)
- ता० १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट मध्ये वाचकांच्या मतांची बेरीज घेतली जाईल आणि सर्वाधिक मतं प्राप्त करणार्या तीन शतशब्दकथा अंतिम फेरीत जातील.
- ता० १६ ते २० ऑगस्ट या दरम्यान परीक्षकही तीन इतर कथांची निवड अंतिम फेरीसाठी करतील.
अंतिम फेरी:
- अशा प्रकारे अंतिम फेरीत सहा लेखक आणि त्यांच्या सहा शतशब्दकथा दाखल होतील
- ता० २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट मध्ये या सहा लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) शतशब्दकथेच्या स्वरूपातच लिहायचा आहे!
- वाचक पहिल्या फेरीप्रमाणेच आपलं मत प्रतिसादात "+१" लिहून नोंदवू शकतात.
- ता० ३१ ऑगस्ट नंतर परीक्षक त्यांचं गुणांकन देतील.
- वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या गुणांकनाला समान महत्त्व देऊन तीन विजेते घोषित करण्यात येतील.
विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल.
सूचना:
प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. एकापेक्षा अधिक कथा प्रकाशित केल्यास पहिली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल.
- स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.
- पहिल्या फेरीत कथेचं सीक्वल प्रकाशित करू नये. फक्त सहा लेखकांना/कथांना स्पर्धेसाठी सीक्वल लिहायची संधी मिळेल.
- काही प्रश्न असल्यास कृ० साहित्य संपादक मंडळाशी संपर्क साधावा.
प्रतिक्रिया
8 Aug 2015 - 2:22 pm | शब्दबम्बाळ
आजची साक्षरी
वरती शुद्धलेखनाला अनुमोदन देणारे तुम्हीच ना हो?! पूर्वपरीक्षण वापरा कि राव!
8 Aug 2015 - 2:18 pm | शब्दबम्बाळ
मिपावर या स्पर्धेमुळे बरेच वाचक लिहिते झालेले दिसत आहेत!
त्यामुळे संपादक मंडळाचे अभिनंदन! :)
12 Aug 2015 - 8:21 pm | आदूबाळ
पहिल्या फेरीचे शेवटचे तीन दिवस! त्वरा करा!
12 Aug 2015 - 8:52 pm | जेपी
आदुदादु आता तुमीच राहिलात.लिवा लिवा!!
अठरा च्या जागी साडेतीन पावलाचा स्टार्ट अशी..
लिवा!!!!
14 Aug 2015 - 10:49 pm | मधुरा देशपांडे
कथा प्रकाशित करण्यासाठी उजवीकडे 'लेखन करा' असे दिसत असेल, तेथुन 'स्पर्धा' हा विभाग निवडा आणि ही कथा प्रकाशित करा. म्हणजे ती स्वतंत्र लेखाच्या स्वरुपात दिसेल आणि त्यावर प्रतिसादक मतं देऊ शकतील.
14 Aug 2015 - 10:51 pm | नीलांबरी
धन्यवाद. पण आता हे इथले लिखाण कसे नाहीसे करू?:)
14 Aug 2015 - 11:06 pm | श्रीरंग_जोशी
[शतशब्दकथा स्पर्धा] दोष कुणाचा? - ही शशकथा वरच्या प्रतिसादात राहू दिल्याने काही बिघडणार नाहीये. संपादक मंडळाला वाटले तर ते उडवू शकतात.
14 Aug 2015 - 11:07 pm | किसन शिंदे
अप्रकाशित केलाय प्रतिसाद.
14 Aug 2015 - 11:08 pm | नीलांबरी
धन्यवाद.
15 Aug 2015 - 11:15 am | आदूबाळ
नमस्कार.
शशक स्पर्धेच्या पहिल्या फेरीचा आज शेवटचा दिवस. आज मध्यरात्री १२ वाजता (भाप्रवे) मतदान बंद होईल. पहिल्या फेरीचे निकाल लवकरात लवकर (जास्तीत जास्त ता० २० पर्यन्त) जाहीर केले जातील.
ही योग्य जागा नव्हे, पण स्पर्धेला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादासाठी सगळ्यांचे मनापासून आभार!
31 Aug 2015 - 12:48 pm | आदूबाळ
अंतिम फेरीतील मतदानाचा आज शेवटचा दिवस!