साहित्य संपादक - नवीन रचना

Primary tabs

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
10 Jun 2015 - 7:25 am

नमस्कार,

उत्तम साहित्य हा मिसळपावचा प्राण आहे. मिपावर नवनवीन सदस्यं येत असतात. त्यांना लिहायला सुरूवातीच्या काळात खुप अडचणी येतात असे एकंदरीत अभिप्रायांवरून दिसते. त्यामुळे त्यांना लेखन करण्याच्या प्रयत्नात काही अडचण आल्यास ती सोडविण्याकरीता नवीन साहित्य संपादक नावाची रचना मिसळपाव व्यवस्थापन सुरू करतंय.

कुठल्याही प्रकारचे लेखन करताना तुम्हाला काहीही अडचण आल्यास तुम्ही या साहित्य संपादकांना मदत मागू शकता. तसेच एकदा प्रकाशित झालेल्या लेखनात काही बदल करायचे असतील किंवा फोटो, व्हिडीओ जोडण्याबाबत काही अडचण असेल तरी हे साहित्य संपादक मदत करतील.

तुम्ही लिहीते व्हावे आणि तुमचा लिहीण्याचा अनुभव सुखद व्हावा यासाठी आपल्यातीलच काही लोक स्वतःहून तुम्हाला मदत करताहेत हे आनंददायक आहे. त्यांच्या मदतीचा लाभ घ्यावा.

मिसळपावच्या साहित्याची रचना, नवीन प्रकार आदी बाबत साहित्यसंपादकांना वेगवेगळे अधिकार आहेत. वेळोवेळी निघणारे मिसळपाव विशेषांक आदीच्या निर्मीती मध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असेल. अश्या साहित्य संपादकांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. सोबत खाली त्यांची नावे देत आहे.

मधुरा देशपांडे
स्रुजा
वेल्लाभट
कॅप्टन जॅक स्पॅरो
मिसळलेला काव्यप्रेमी
सतिश गावडे
अन्या दातार
आदूबाळ
विशाखा पाटील

प्रतिक्रिया

सर्व नविन साहित्य संपादकांचे अभिनंदन अाणि शुभेच्छा !!!

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

26 Jun 2015 - 7:41 pm | अरवीन्द नरहर जोशि.

आबारी आहे.

हा नविन उपक्रम सुरु केल्याबद्द्ल मालकांचे आभार.

यशोधरा's picture

10 Jun 2015 - 7:38 am | यशोधरा

अभिनंदन अाणि शुभेच्छा!

अजया's picture

10 Jun 2015 - 7:46 am | अजया

अभिनंदन आणि शुभेच्छा!

स्पंदना's picture

10 Jun 2015 - 7:48 am | स्पंदना

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

दमामि's picture

10 Jun 2015 - 7:53 am | दमामि

+1111

मितान's picture

10 Jun 2015 - 7:53 am | मितान

अभिनंदन आणि शुभेच्छा !

जेपी's picture

10 Jun 2015 - 8:07 am | जेपी

अभिनंदन आणी शुभेच्छा.

नाखु's picture

10 Jun 2015 - 8:15 am | नाखु

अभिनंदन आणि शुभेच्छा.

सगा,मिका,अन्या,रंगा आणि कप्तान प्य्रार्टी एक्त्र दिलेली चालणार नाही.

किमान साहीत्य टाकून आमचे कमाल सहकार्य राहील.

नाखु भड्भुंजे पाटील

पुणेकर भामटा's picture

10 Jun 2015 - 8:21 am | पुणेकर भामटा

माझ्याहि अभिनंदन आणी शुभेच्छा.

फारएन्ड's picture

10 Jun 2015 - 8:28 am | फारएन्ड

सर्व संपादकांचे अभिनंदन व शुभेच्छा!

एस's picture

10 Jun 2015 - 8:29 am | एस

अतिशय छान उपक्रम आहे. सर्व साहित्य संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

संपादक आणि साहित्य संपादक यांच्या अधिकारांमधील फरकही इथे स्पष्ट करा जेणेकरून प्रतिसाद उडवण्यासारख्या विनंत्या सासंना केल्या जाणार नाहीत. (की असे अधिकार सासंनाही आहेत?)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Jun 2015 - 8:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रतिसाद संपादिक करायचे अधिकार सासंना नाहित.

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 12:02 pm | कपिलमुनी

बिनाकात्रीचा संपादक म्हणजे दाताविना वाघ !
:)
हबिणंदन !

अगदी असेच म्हणतो. प्रतिसाद उडवाउडवीचे अधिकार जर पूर्वीच्याच संमंकडे असतील तर...असोच.

पण तरी काही का होईना चेंज आला हे पाहून बरे वाटले. सर्वांचे अभिनंदन!

स्नेहांकिता's picture

10 Jun 2015 - 12:41 pm | स्नेहांकिता

प्रतिसाद उडवाउडवीचे अधिकार जर पूर्वीच्याच संमंकडे असतील तर...असोच.

म्हणजे ? पूर्वीचे संमं अधिकारात आहे ? ;)

धमाल मुलगा's picture

10 Jun 2015 - 10:44 pm | धमाल मुलगा

म्हणजे ह्या संपादकांना पिडता येणार नाही होय? अर्रर्र.... ;)

श्रीरंग_जोशी's picture

10 Jun 2015 - 10:46 pm | श्रीरंग_जोशी

सासं को पिडने के लिए सही मिपा पर लिख्खो धमालमियाँ.

धमाल मुलगा's picture

10 Jun 2015 - 11:16 pm | धमाल मुलगा

एक जरा काय अन् कसं लिहायचं तेव्हढं सुचलं की लग्गेच लिख्खतोच की जी. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2015 - 10:01 am | बिपिन कार्यकर्ते

जसं काय पूर्वी तुम्ही पार विचार करून आणि सुचलं तरच लिहित होतात! ;)

किसन शिंदे's picture

11 Jun 2015 - 10:04 am | किसन शिंदे

खिक्क..

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2015 - 10:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

किमान शब्दात कमाल गोष्ट ;)

-दिलीप बिरुटे

इनोबा म्हणे's picture

14 Jun 2015 - 10:46 pm | इनोबा म्हणे

धम्या, येत्या जुम्म्याचा मुहूर्त पकडून लिहून टाक रे!

किसन शिंदे's picture

14 Jun 2015 - 11:00 pm | किसन शिंदे

हायला!

चक्क इनोबा!!

इनूभाव, तुला इतक्या दिवसांनी बघून खूप बरं वाटलं!

(प्रतिसाद उडवण्याची) आम्हाला पावर नाय ! ज्यंना माहिती नही त्यांनी म्हैस ऐकावे ;)

श्रीरंग_जोशी's picture

10 Jun 2015 - 11:46 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या मित्राची ही चित्रफीत बघा.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 8:34 am | अत्रुप्त आत्मा

नविन रचनात्मक निर्णय आवडला.
सर्व पदाधिकाय्रांचे अभिनंदन!

पाटील हो's picture

10 Jun 2015 - 8:38 am | पाटील हो

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

कंजूस's picture

10 Jun 2015 - 8:43 am | कंजूस

छान.
नवीन क्रॅास लिंक्स वाढवल्याने मिपा एक सुघड( structured )साइट होत आहे.हे मंडळ तांत्रिक मदत देणारे आहे बहुतेक.या अगोदर मी वल्ली यांची मदत घेत असे.बहुगुणी यांनाही चांगलीच माहिती आहे.

या निमित्ताने -लेखात "वरती जा" ;"शेवटी जा" ;"सुरुवातीला जा" याची किमान दोन तयार बटन्स लेखाच्या नेव्हिगेशन चौकटीवर आणता आली तर मोठ्या लेखास ती विनासायास टाकता येतील.

खटपट्या's picture

10 Jun 2015 - 8:51 am | खटपट्या

नसासं चे हार्दीक हाबिणंदन...

नूतन सावंत's picture

10 Jun 2015 - 8:54 am | नूतन सावंत

अभिनन्दन आणि शुभेच्छा.

संदीप डांगे's picture

10 Jun 2015 - 9:07 am | संदीप डांगे

अगदी आवश्यक व योग्य निर्णय. साहित्यसंपादकांना शुभेच्छा!

सर्व साहित्य संपादकांचे अभिनंदन...

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jun 2015 - 9:38 am | ज्ञानोबाचे पैजार

नवनिर्वाचीत साहित्य संपादकांचे हार्दीक अभिनंदन.

त्यांच्या कडून मिपा साठी येणार्‍या काळात चांगले योगदान मिळावे आणि मिपाची अजून भरभराट व्हावी ही सदिच्छा.

पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2015 - 9:41 am | टवाळ कार्टा

हायला चिमण....भारी...

विशाल कुलकर्णी's picture

10 Jun 2015 - 9:57 am | विशाल कुलकर्णी

व्वा, चांगला निर्णय ! संबंधितांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!

सुहास झेले's picture

10 Jun 2015 - 10:04 am | सुहास झेले

अभिनंदन आणि शुभेच्छा :) :)

स्नेहांकिता's picture

10 Jun 2015 - 11:06 am | स्नेहांकिता

नवीन साहित्य संपादक चमूचे अभिनंदन आणि स्वागत.
या मंडळामुळे मिपाचे रूप आणखी आकर्षक, रोचक, बहारदार होईलच यात शंका नाही.
शुभेच्छा तर आहेतच, शिवाय अपेक्षाही आहेत.

नवीन साहित्य संपादक चमूचे अभिनंदन आणि शुभेच्छा

नीलमोहर's picture

10 Jun 2015 - 11:15 am | नीलमोहर

नविन साहित्य संपादकांचे अभिनंदन अाणि शुभेच्छा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2015 - 11:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवीन साहित्य संपादकांचे अभिनंदन. मिपावर काथ्याकुटाइतकेच ललित साहित्य यावं असं एक मिपा सदस्य आणि साहित्याची आवड असलेला एक रसिक म्हणुन नेहमीच वाटले आहे. उत्तम कविता, ललित लेखन, स्फुट, लघुकथा, अनुभव, प्रवास वर्णन, आणि इतर सर्व अशा प्रकारचे लेखन करणा-या सदस्यांना नवसंपादक सतत प्रोत्साहित करतील, नव परिचित सदस्यांचा मिपावर वावर दिसेल, तो वाढवतील असं आणि बरंच काही वाटतं.

नव संपादकांच्या काही नवीन कल्पना असतील त्या कल्पना मिपावर उतरतांना पाहतांना एक मिपाकर म्हणून मला खुप आनंद वाटेल.

मन:पूर्वक शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

10 Jun 2015 - 12:02 pm | पिलीयन रायडर

अभिनंदन!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2015 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

नवनिर्वाचीत साहित्य संपादकांचे हार्दीक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा !!!

या नविन गटामुळे नविन-जुन्या सर्वच मिपालेखाकांना आपले लेख प्रसिद्ध करण्याअगोदर आणि केल्यावरही मैत्रीपूर्ण मदतीचे हात सतत उपलब्ध राहतील. त्यामुळे नविन लेखकांना प्रोत्साहन मिळेलच पण नव्या-जुन्या दोन्ही प्रकारच्या लेखकांना त्यांच्या लेखनाच्या मसुद्याची आणि त्यातील चित्रांची जास्त व्यावसाईक पद्धतीने मांडणी करता येईल.

हा प्रयोग मिपालेखकांचा अनुभव जास्त सुखकारक बनवण्यासाठी जेवढा उपयोगी आहे तेवढाच तो आपले मिपा जास्त आकर्षक करण्यासही उपयोगी पडेल असेच वाटते.

पैसा's picture

10 Jun 2015 - 12:41 pm | पैसा

सर्व साहित्य संपादकांना हार्दिक शुभेच्छा! प्रतिक्रिया संपादन किंवा लेख अप्रकाशित करणे अशी अप्रिय कामे नसल्याने तुम्ही लोक पब्लिकच्या शिव्यांचे टार्गेट होणार नाहीत. तेव्हा मोकळेपणाने काम करू शकता. मिपाचा आलेख दिवसेंदिवस अधिक उंच जाण्यासाठी जे काय करता येईल ते जरूर करा. सर्वांचे सहकार्य असेलच.

आता सुरुवातीला साहित्य संपादक हे संपादकांच्या मदतीसाठी आहेत असं चित्र आहे. मात्र इतकं चांगलं काम करा की संपादक तुमच्या मदतीसाठी आहेत असं चित्र तयार झालं पाहिजे!

काही सदस्यांना संपादक मंडळ व साहित्य संपादक मंडळाच्या रचनेतील फरक लक्षात आलेला दिसत नाही. त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण.

सध्याचे संपादक मंडळ आपले काम उत्तम करते आहे. त्यांच्या कामात किंवा रचनेत काहीही बदल नाही.
नवीन साहित्य संपादकांकडून मिपावरील लेखन उत्तम कसे होईल याकडे लक्ष देणे अपेक्षीत आहे. त्यामुळे त्यांची ऊर्जा प्रतिसाद संपादन करण्यात गुंतवण्याचा प्रश्नच येत नाही. संपादकांना त्यांचे काम करून येणारे लेखन उत्तम कसे होईल याकडे लक्ष देणे हे खुप व्यस्ततेचे होत होते, त्यामुळे ह्या नवीन रचनेचा विचार पुढे आला.
मिसळपाववर जश्या चर्चा व प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत तेवढ्याच प्रमाणात उत्तम लेख, कविता, पाककृती, भटकंती आणि अन्य लेखन येणे सुध्दा महत्वाचे आहे. नवीन लोकांना सुरूवातीला जरा अडखळल्यासारखे होते. तेव्हा त्यांना थोडं सावरून घेतलं की मराठी आंतरजालाला एक नवीन लेखक मिळतो आणि तेव्हा जर दुर्लक्ष केलं तर मल नवीन लोक लिहीने टाळतात. यावर सकारात्मक उपाय म्हणजे साहित्य संपादक आहेत असे वाटते.
तसेच नवीन लोकांना पुरेसा ब्रिदींग पिरीएड न देता त्यांचे वर कुणी उगाच टारगटपणा केला तर संपादक अधिक सक्रियतेने लक्ष देतील. सर्वच सदस्यांकडून नवीन सदस्यांना स्थिरस्थावर होण्यास थोडा वेळ द्यावा अशी अपेक्षा आहे. आपण सर्वच कधीतरी मराठी आणि एकूनच आंतरजालावर नवीन होतोच ना? तेव्हा वाचून किंवा इतरांच्या मदतीने इथवर आलोय हे न विसरता. नवीन लोकांना प्रोत्साहित करण्याचा विचार करावा. ही विनंती.

सदस्यनाम's picture

10 Jun 2015 - 1:50 pm | सदस्यनाम

चांगलेच आहे.
सर्व नव्या संपादकांना शुभेच्छा. नीलकांतसाहेबांच्या अपेक्षा पूर्ण होवोत.
नवीन रचनेचा सर्वांनाच फायदा होइल. धन्यवाद.

मृत्युन्जय's picture

10 Jun 2015 - 2:20 pm | मृत्युन्जय

सर्व साहित्य संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

पदम's picture

10 Jun 2015 - 2:25 pm | पदम

अभिनंदन सर्वांचे!