वाटतं असं... की
तुझ्या हातात मोगरा भरभरून ठेवावा..
आणि सुगंधाशी सुगंधाला स्पर्धा करू द्यावी..
नक्की मला वेडं करणारा त्यातला कोणता आहे? ते शोधण्यासाठी!
वाटतं असं... की
पावसाने शांत झालेल्या मऊशार हिरवळीत तुझ्यासवे एकरूप व्हावं..
खऱ्या मीलनाचा मृद्गंध
कळण्यासाठी!
वाटतं असं... की
तुझ्या हातांशी एकरूप झालेली मेहेंदी , मी नेहमी आठवावी..
हव्यास आणि सहजतेची ओढ यातला फरक..
मला समजण्यासाठी.
वाटतं असं... की
हरेक ठिकाणी तुझंच रूपक,तुझीच छटा,तुझा नाद...गंध!
यात मिसळून जावं
उरलेल्या सगळ्या आयुष्याचे
'जगणे' होण्यासाठी..
(फ़ोटो:- फेसबुक वरून, साभार! )
प्रतिक्रिया
19 Jun 2015 - 8:39 pm | खटपट्या
अतीसुंदर कविता.
चित्रही तेवढेच अप्रतीम.
19 Jun 2015 - 10:02 pm | श्रीरंग_जोशी
कवितेला चित्राची छान जोड मिळाली आहे.
बाकी इकारान्त शब्द जाणुन ह्रस्व लिहिले आहेत का?
19 Jun 2015 - 10:20 pm | अत्रुप्त आत्मा
नाही! बोंबल्या वरून लिहिल्यामुळे ज़रा मर्यादा आली.
आणि बय्रा पैकी घाईत लिहिली आहे.. अत्ता सांजच्याला.
19 Jun 2015 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा
आंssssssssssss फोटू कुटं ग्येला???????? :-/ दुत्त दुत्त दुत्त! :-/
19 Jun 2015 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा
लावला का परत...? वाह! थांकु!
19 Jun 2015 - 9:03 pm | अनुप ढेरे
व्वा!
19 Jun 2015 - 9:38 pm | दमामि
गुर्जी ,तुमची परवानगी असेल तर जिलबी पाडू का?
19 Jun 2015 - 9:56 pm | अत्रुप्त आत्मा
इचारतूस काय? जिलबी कर! ;-)
19 Jun 2015 - 9:59 pm | यशोधरा
सुरेख कविता.
19 Jun 2015 - 10:15 pm | सस्नेह
वाह, किती अलवार शब्द आणि हळुवार भाव !
19 Jun 2015 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर तरल कविता !
19 Jun 2015 - 11:02 pm | एक एकटा एकटाच
हे विशेष आवडलं
वाटतं असं... की
हरेक ठिकाणी तुझंच रूपक,तुझीच छटा,तुझा नाद...गंध!
यात मिसळून जावं
उरलेल्या सगळ्या आयुष्याचे
'जगणे' होण्यासाठी
मस्त मस्त मस्त.........
19 Jun 2015 - 11:07 pm | प्रचेतस
अतिशय तरल. सुरेखच एकदम.
19 Jun 2015 - 11:48 pm | बॅटमॅन
कविता आणि फोटो एकदमच जबराट ओ आत्मूस. लै म्हंजे लैच भारी.
19 Jun 2015 - 11:52 pm | रातराणी
मस्त!
20 Jun 2015 - 12:00 am | चैत्रबन
आवडली.
20 Jun 2015 - 12:03 am | पियुशा
वा वा वा ही जिल्बी आव्डली :)
20 Jun 2015 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा
@जिल्बी आव्डली :)>>> दुत्त जिल्बुचा!
20 Jun 2015 - 9:07 am | पैसा
खासच आहे!
20 Jun 2015 - 10:52 am | ज्ञानोबाचे पैजार
खासच,
आवडली,
पैजारबुवा,
20 Jun 2015 - 10:55 am | नाखु
पाउस आतला आणि बाहेरचाही
20 Jun 2015 - 12:02 pm | प्यारे१
फंटास्टिक् चित्र आणि आह! कविता.
बुवा स्प्लिट पर्सनालिटी चा माणूस आहे.
20 Jun 2015 - 12:08 pm | मुक्त विहारि
बुवा...
दंडवत
20 Jun 2015 - 2:07 pm | अजया
सुरेख कविता,बुवा!
20 Jun 2015 - 3:15 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बुवा.. लिहीत जा की जरा नियमित पणे...
20 Jun 2015 - 5:09 pm | अत्रुप्त आत्मा
आपका हुकुम सर आंखों पर जी!
21 Jun 2015 - 11:55 am | टवाळ कार्टा
बुवाजी ईन रोम्यानटीक कवीता :)
लय म्हंजे लयच रोम्यानटीक