पाणवठ्यावर अनेक हरिणे, झेब्रे वगैरे शाकाहारी पाणी पीत होते. अचानक पाण्यातून येऊन मगरींनी अनेकांचा घास घेतला. त्यानंतर हत्ती, कोल्हे, माकडे, जिराफ वगैरे सर्व आपापल्या स्वभावधर्मानुसारच वागले. हरिणे परत मुकाटपणे चरू लागली.
एक सत्ताधारी सर्व प्राणीय सभा पार पडली. त्यांत एकमुखाने एक ठराव पास झाला. शाकाहारी प्राण्यांची , विशेषतः , हरिणांची लोकसंख्या वाढवायची.
एका जिराफाने एका हत्तीला खाजगीत विचारले, "हा ठराव का केला ?" हत्ती हळुच म्हणाला, " हरिणे आहेत तोवर आपल्याला कोणी हात लावणार नाही." या उत्तरावर खुष होऊन माकडाने हत्तिणीला टाळी दिली.
प्रतिक्रिया
30 Nov 2008 - 11:11 am | बिपिन कार्यकर्ते
घ्या टाळी... :)
बिपिन कार्यकर्ते
30 Nov 2008 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार
बिपिन साहेबांशी सहमत .... घ्या टाळी
झक्कास मित्रा !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
30 Nov 2008 - 12:29 pm | ऋषिकेश
मग या उत्तरावर खुष होऊन माकडाने हत्तिणीला टाळी का दिली?
फारच कुटकथा आहे ही
-(गोंधळलेला) ऋषिकेश
30 Nov 2008 - 1:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-|
(हरिणी) अदिती
30 Nov 2008 - 1:11 pm | स्वाती दिनेश
बोचरं, कटू सत्य.
अदितीशी सहमत.
स्वाती