काल रामदासांच्या 'काही कविता' वाचल्यापासून अस्वस्थ होतो, दोन समजल्या नाहीत म्हणून आणि दोन समजल्या म्हणूनही! आज त्यांच्या कवितेवरची त्यांची स्वतःची टिप्पणी आणि मुक्तरावांचे विवेचन बघून कविता समजल्याचा हर्ष झाला. आनंद झाला की त्यानंतर विडंबन हे येतेच त्याप्रमाणे ते आले...
मुक्तछंदातला चतकोर
तुकडा कवितेचा.
हवीतशी कल्पना सुचल्यावर
मिजासखोर विडंबन झाला.
हक्काचे प्रतिसाद
मागायला मोकळा!
---------------
अल्लाद पहिली कविता विडंबणारा
दुसरीच्या उंबर्यात ठेचकाळून पुन्हा पुन्हा
गोंधळला कितीवेळा.
काल,
दिवसरात्र लंगडी तंगडी.
-------------------------
विचारांच्या बारीक किसणीतून
अडकलेल्या ओळींचं एकेक तूस कोरून
मी विचारलंच ,
कविताताई, कविताताई,
होणार काय गं
माझं विडंबन!
--------------------------------
एकेक ओळ प्रसवत गेली
मनापासून विडंबनाची
सोर्यातल्या शेवेसारखी.
रंगा, पुरे झाल्या का
भरजरी कवितेवरच्या रेघोट्या?
चतुरंग
प्रतिक्रिया
26 Nov 2008 - 9:07 pm | रामदास
दिवसभर एका मिटींगीत गप्प बसून समजल्याचा आव आणत होतो.त्यामुळे हसण्यावर बंदी होती.
आता पाहतो तर ही मजेदार विडंबनं.पोट धरून हसतो आहे.
धन्यवाद.
26 Nov 2008 - 9:15 pm | मुक्तसुनीत
दाद देण्याच्या पद्धती असतात. विडंबन ही त्यातलीच एक. चतुरंग या प्रकारच्या दाद देण्यातले दर्दी आहेत :-)
या निमित्ताने आलेली आठवण : केसु गुरुजी ! का धरिला परदेश ? :-)
26 Nov 2008 - 9:15 pm | मनीषा
खूप छान आहे विडंबन
विचारांच्या बारीक किसणीतून
अडकलेल्या ओळींचं एकेक तूस कोरून
मी विचारलंच ,
कविताताई, कविताताई,
होणार काय गं
माझं विडंबन! .......................मस्तच
26 Nov 2008 - 9:18 pm | अभिरत भिरभि-या
याचे शीर्षक काही कविता नव्हे काहीच्या काही कविता असे हवे होते ;)
( ह घ्या)
--- विडंबन नेहमीप्रमाणे उत्तम आहे हे सांगायला नकोच !
26 Nov 2008 - 9:23 pm | चतुरंग
ह्यापुढच्या 'काही कविता' अल्टर करताना हा नवीन भरजरी काठ लावला जाईल! ;)
चतुरंग
26 Nov 2008 - 9:24 pm | कोलबेर
रंगाशेठ विडंबनं आवडली.
26 Nov 2008 - 9:27 pm | सहज
रंगाशेठची सेंच्युरी!
26 Nov 2008 - 9:59 pm | लिखाळ
मस्त आहे विडंबन :)
मजा आली.
-- लिखाळ.
29 Nov 2008 - 4:28 pm | विसोबा खेचर
मुक्तछंदातला चतकोर
तुकडा कवितेचा.
हवीतशी कल्पना सुचल्यावर
मिजासखोर विडंबन झाला.
हक्काचे प्रतिसाद
मागायला मोकळा!
मस्त रे रंगा...! :)