कल्पना करा, संध्याकाळच्या वेळेस आपण आपल्या घरात असताना, अचानक सर्व शहरातली लाईट गेली, आणि आपल्याकडे एकदम बुक्क अंधार झाला तर, अंधाराला डोळे सरवयापर्यंत, मनावर कशी एकप्रकारची अनामिक भीती एकटेपणाची काळोखी पसरते. आता त्या काही क्षणांच्या अनुभवावर अंध व्यक्तींचा जीवनातील काळोखीवर खर्या अर्थाने विचार करून, अंध बांधवांच्या दु:क्खाची भयाणता, डोळस व्यक्ती कल्पना करू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच अंधांचा जगाशी संपर्क येतो. जगण्याचा जेवढा हक्क आपल्यासारख्या डोळस व्यक्तींना आहे तितकाच तो दृष्टिहिनांनासुद्धा आहे,अशी धारणा ऐका डॉक्टरला, त्याच्या एका गर्भवती अंध पेशंटने पोटात वाढणारा गर्भ कसा याची उत्सुकता, तिच्या अल्ट्रासाउन्ड सोनोग्राफीदरम्यान, तिने विचारलेल्या प्रश्नावरून, मनातून पुरेपूर चेतावून गेली. त्यावर त्याने फक्त सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी, तिला मदतीचा हात देण्याच्या निर्धाराने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले. त्याने अल्ट्रासाउन्ड सोनोग्राफीचा फीड ३-डी प्रिंटरला जोडला, आणि तिच्या गर्भातल्या जीवाचे त्रिमितीय प्रिंट तिच्या हाती ठेवले. हा तिच्यासाठी अतिशय भावूक क्षण ठरला, त्या त्रिमितीय रचनेवरून स्पर्शाद्वारे तीला, गर्भाच्या चेहेरेपट्टीचा अनुभव तिच्या मनात उमटवून घेता आला. अश्या डॉक्टरसाठी तिचे मन कृतज्ञतेने भरून पावले असणार, याबद्दल शंकाच नाही ……
प्रतिक्रिया
7 May 2015 - 1:42 pm | भिंगरी
किती आनंद झाला असेल तिला.
7 May 2015 - 2:04 pm | सुबोध खरे
(माझ्या दवाखान्यात केलेल्या) सोनोग्राफी मध्ये दिसणारे मूल (गरोदरपणाच्या ५ व्या महिन्यातील )
7 May 2015 - 2:17 pm | पगला गजोधर
एक्झाटली… हेच …
डोळस स्त्रीला सोनोग्राफीमधले आपले मुल पाहून जसा हर्ष होत असेल, तसाच हर्ष त्या अंध स्त्रीला, तिच्या गर्भाच्या त्रिमितीय रचनेला स्पर्शून झाला असेल.
7 May 2015 - 3:29 pm | स्वैर परी
त्या बाईला किती आनन्द झाला असेल याची कल्पना करु शकते!
7 May 2015 - 11:40 pm | रुपी
अगदी! सुरुवातीच्या काही आठवड्यांत जेव्हा गर्भाच्या हालचाली फार जाणवत नाहीत तेव्हा तर ही सोनोग्राफी अगदी वरदान असते.
पण आणखी थोडं खुलवून लिहिलं असतं तर नीट समजलं असतं. म्हणजे हे सगळं कल्पनातीत आहे, की खरोखर कुणी हा अनुभव घेतलाय? खरा असेल तर मग त्याचा फायदा इतरांनाही होऊ शकतो.
7 May 2015 - 8:00 pm | मार्मिक गोडसे
बाळाचे सोनोग्राफीतील दोन्ही फोटो एकदम झकास.
डॉक्टरने ३-डी प्रिंटरचा कल्पकतेने केलेला वापर मनाला भावून गेला.
धन्यवाद प.ग. ह्या माहितीबद्दल. माझा डॉक्टरांबद्दल असलेला आदर हजारपटीने वाढला.
7 May 2015 - 11:32 pm | बहुगुणी
8 May 2015 - 9:17 pm | संदीप चित्रे
ह्या यू ट्युब चित्रफितीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद!
फारच छान आहे.
8 May 2015 - 12:42 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर भावस्पर्शी कथा !
सद्या तंत्रज्ञान इतके पुढे चालले आहे की ते वापरून आपण काय करू शकतो याची सीमा केवळ आपल्या कल्प्नाशक्तीच्या ताकदीवर अवलंबून आहे !