८ नोव्हें मिपा मिनी कट्टा (प्रकाशचित्राच्या आणि प्राजूच्या गाण्याच्या दुव्यासहित अद्ययावत) ...

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
12 Nov 2008 - 12:47 am

नमस्कार मंडळी,

मिपाच्या रेवती ताईंचा उत्साह दांडगा आहे हो! अहो दांडगा म्हणजे किती याचा अनुभव घेण्याची संधी आम्हाला मिळाली. झालं असं की, चोपराजच्या मातोश्री शितल मॅडम यांनी 'मी १५ नोव्हेंबर ला भारतात परत निघाले आहे' असा निर्वाणीचा फोन केला. आम्हाला वाटलं ती जाण्या आधी एखादा मिपाकट्टा करू. रेवती ताईंनी लगेच घरून सूत्र हलवायला सुरूवात केली. या सूत्र हलवण्याच्या नादांत खरड वह्यातून जवळ जवळ सगळ्याच मिपा मंडळींना समजले की, या भूमिगत (रेवती नावाखाली)असलेल्या मिसेस चतुरंग आहेत. असो.. तर या शितल मॅडम ना मिपाच सेंड ओफ करावा म्हणून २६ ऑक्टोबर तारिख ठरली. इतक्यात शितल बाईंनी स्फोट केला की, आम्ही इतक्यात परत जाणार नाही आहोत.. झालं ! त्यामुळे लांबता लांबता हा कट्टा ८ नोव्हेंबरला करायचे यावर आम्हा तिघिंचे (बिचार्‍या चतुरंगना कोणीच विचारत नव्हते.) नक्की झाले. लंबूटांगलाही ही तारिख सोयीची होती... दिवाळी झाली.. आणि हा दिवस उगवला एकदाचा.

सकाळीच ८.०० वाजता आम्ही आणि शितलचे कुटुंब विल्मिंग्टन ला पोहोचलो. यावेळी एक बरं होतं ते म्हणजे काहिही विशेष करून न्यायचं नव्हतं. रेवती ताईंनी सगळी तयारी केली होती. तरिही अगदीच हात हलवत जाण्यापेक्षा काहीतरी घेऊन जावं या विचारानं शितल बाईंनी ओल्या नारळाच्या करंज्या, दिवाळीतल्या चकल्या आणि बेसनलाडू आणले होते. आणि मी सुरळीच्या वड्या करून नेल्या होत्या.

suralichya vadya.." alt="" />

चतुरंग यांच्या घरी पोचल्या पासून जी खादाडीला सुरूवात झाली ती घरातून बाहेर पडे पर्यंत चालूच होती. गेल्या गेल्या रेवती ताईंनी स्वाती ताई स्पेश्शल केलेले छोले आणि पुर्‍या यावर ताव मारून झाला.
मग चहा.. एकिकडे गप्पांचा फड रंगात आला होता. अमर (मिस्टर शितल), जगदीश (मिस्टर प्राजु) हेही गप्पांमध्ये हिरिरिने सामिल होते.
मंडळी, अमर आणि जगदीश हे छुपे रूस्तम आहेत बरं का! म्हणजे मिपावरची सगळी मंडळी, त्यांची लेखनशैली, त्यांना ठेवलेली टोपण नावे... हे या दोघानाही अगदी निट माहिती आहे. म्हणजे आमच्या लॉगिन खाली ही दोघं वाचन मात्र असतात.

chhole" alt="" />

मंडळी, गप्पा हा विषय असा असतो की, खो घातल्यासारखा विषय बदलत असतो. गप्पा मुलांच्या खेळण्यावरून मग मोदकावर आल्या :)

आणि मग रेवती ताईंना मोदक शिकायचे आहेत अशी टूम निघाली. शितल ताई पुढे सरसावल्या, भराभर सारण केलं गेलं आणि उकड तयार केली गेली. मी तशी सुगरण या कॅटॅगिरीमध्ये मोडत नसल्याने मी फक्त मोदकांना आकार द्यायच्या कामात मदत केली. मोदक वळत असताना ,"प्राजु, मला माहिती नाही तुलाही इतके छान मोदक येतात ?" या रेवतीताईच्या वाक्याने अंगावर मूठभर मासच चढलं. काय पण गैरसमज असतात ना लोकांचे!!

menu" alt="" />

sambar" alt="" />

चतुरंग, जगदीश, अमर आणि लंबूटांग.. सगळे गप्पा ठोकत होते. मास्टर मुकुल, मास्टर अथर्व आणि मास्टर यशराज.. त्यांचा हक्क पुरेपूर बजावत होते. अधून मधून प्रत्येक आई आपापल्या मुलावर वसकन ओरडत होती. या सगळ्यांत लंबूटांग ला वैवाहीक आयुष्यासाठी सल्ले देणं अगदी जोरदार चालू होतं. ;)
विनोद सांगणं चालूच होतं.. हसून हसून पोट दुखायची वेळ आली. आणि मग इतके हसल्यामुळे सगळ्यांना पुन्हा भूका लागल्या.
रेवतीताई , मी आणि शितल यांनी एकिकडे इडल्यांचे घाणे काढले आणि वाफाळणार्‍या इडल्या, अप्रतिम सांबार, चटणी, पुलाव, रायता, आणि आम्ही तिघिंनी केलेल मोदक... असा असॉर्टेड मेनू.. जबरा!! हाणलाच हाणला!

मंडळी, एरवी घसा साफ करून घ्यायला चान्स नाही मिळत. पण आज ऐती लोकं मिळाली होती, गाणं सहन करायला. काय करणार?? तात्यांनी संपादकाची जबाबदारी दिल्यामुळे माझं गाणं ऐकणं सगळ्यांना भागच होतं. नाहीतर काय माहिती शितलचा एखादा कलादालन, रेवतीची एखादी रेसिपी, चतुरंग च एखादं विडंबन उडवलं जायचं!!!! त्यामुळे सहन केलं बिचार्‍यांनी.

(ऐका 'रुपेरि वाळूत')

एकदा संधी मिळाल्यावर सोडणारी मी थोडीच आहे.. आणखी एक गाणं फेकलं ;)..
मी या सगळ्यांची फार आभारी आहे.
सगळ्यांची यथेच्छ जेवणं झालेलीच होती... आता वेळ होती.. अप्रतिम केकची. रेवतीने जो काही केक केला होता, त्याला केवळ अप्रतिम इतकाच शब्द लागू पडतो. या केकची कासियत अशी की, यावरची सजावट मास्टर मुकुल यांनी केली होती. नाहीतरी माझं गाणं ऐकून आंबट्-तुरट झालेली तोडं गोड करण्यासाठी केक हवाच होता. तोही हादडला...

cake1" alt="" />

आता संध्याकाळ झाली होती. पोट भरलेलंच होतं. पण चहाची वेळ कशी चुकावी. चहाही झाला.. मुलं भांडून, पळापळी करून कंटाळली..
हूं कि चूं न करता एका जागी बसून विडियो बघत बसली आहेत मुलं, म्हणजे किती दमली असतील कल्पना करु शकता! #:S (डावीकडून यशराज, अथर्व आणि मुकुल)

आता सगळ्यांना घरचे वेध लागले. हळूहळू ६.३० च्या दरम्यान एकेक करत सगळेच बाहेर पडलो.. त्या या कट्ट्याच्या गोड्(अगदी त्या पायनापल केक सारख्या) आठवणी मनांत साठवत घरी आलो.
एक मात्र विशेष की, रेवती ताईनी.. उत्तर भारतापासून सुरूवात करून , मध्ये महारष्ट्राला घेत, दक्षिण भारतात आणून सोडलं. म्हणजे आधी छोले-पुर्‍या, मग उकडीचे मोदक आणी मग इडली सांबार.. :)
रेवती ताई आणि चतुरंग यांनी त्यांच्या घरी कट्ट्यासाठी आमंत्रीत केल्याबद्दल मी त्या दोघांचे मनापासून आभार मानते.

- प्राजु

हे ठिकाणप्रकटनप्रतिक्रियाआस्वादबातमी

प्रतिक्रिया

नंदन's picture

12 Nov 2008 - 2:11 am | नंदन

सुरेख वृत्तांत. ८ नोव्हेंबर हा आता 'मिसळपाव कट्टा दिन' म्हणून घोषित करायला हरकत नसावी :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

भाग्यश्री's picture

12 Nov 2008 - 2:31 am | भाग्यश्री

वाह .. मस्त झाला म्हणायचा हा ही कट्टा!! सगळे पदार्थ मस्त दिसत आहेत! भुक लागली!
नंदनशी सहमत... मिपा कट्टा दिन करून टाकूया ८ नोव्ह..

http://bhagyashreee.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2008 - 6:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कट्टा वृत्तांत झकास !!!

अवांतर : डिसेंबर मधे ठाण्यात एका महाकट्ट्याचे आयोजन व्हावे असे वाटते ! कोण घेतं आयोजनाची जवाबदारी ?

-दिलीप बिरुटे

आनंदयात्री's picture

12 Nov 2008 - 6:07 pm | आनंदयात्री

अरे वा .. जोरदार झालेला दिसतोय की कट्टा !

संताजी धनाजी's picture

12 Nov 2008 - 6:36 pm | संताजी धनाजी

खालुन तिसरे छायाचित्र पाहुन कळवळलो :(
फारच उत्तम् :)

- संताजी धनाजी

लिखाळ's picture

12 Nov 2008 - 6:47 pm | लिखाळ

मस्त वृत्तांत.. कट्ट्याला खूपच मजा केलेली दिसते :)
खाण्यापिण्याची रेलचेलच ! झटपट मोदक केलेत हे पाहून नवलच वाटले..मोदक दिसताहेत सुद्धा एकदम सौष्ठवपूर्ण :)

आता ठाणे कट्टा सुद्धा होऊन जाऊ द्या जोरदार !
-- लिखाळ.

ऋषिकेश's picture

12 Nov 2008 - 7:01 pm | ऋषिकेश

मस्त .. भारी वृत्तांत.. :)
८ तारखेला एकदम दोन महासागरांकिनारी कट्टे झाले अगदी.. अगदी आसिंधु-सिंधु कट्टे .. वा!;)... :)

बाकी केकची सजावट आवडली.. प्राजूची केका ;) आय मीन गाणं रेकॉर्ड केर्लंय का? (ह. घेशीलच)

बाकी उपस्थित पुरुष आणि बच्चे मंडळी इतकी फोटो-फोबिक का बरे?

सगळे कट्टे करताहेत.. ठाणा / मुंबई कट्टा कधी?

-(मुंबईकर) ऋषिकेश

रेवती's picture

12 Nov 2008 - 7:48 pm | रेवती

प्राजूची केका आय मीन गाणं रेकॉर्ड केर्लंय का? (ह. घेशीलच)
गाणं रेकॉर्ड केलय पण काल पाठवू नाही शकले मी प्राजुला.
लवकरच चतुरंग (दुपारपर्यंत) व्यवस्था करतील.
प्राजुची दोन्ही गाणी मस्त झाली. लंबूटांगचंही गाणं रेकॉर्ड केलयं.

बाकी उपस्थित पुरुष आणि बच्चे मंडळी इतकी फोटो-फोबिक का बरे?
सगळे फोटो काल पाठवू शकले नाही; पण सगळ्यांचे फोटो आहेत.
आज चतुरंग दुपारी अर्धा दिवस घरातून काम करतेवेळी फोटो टाकतो म्हणाले.

रेवती

ऋषिकेश's picture

13 Nov 2008 - 9:18 am | ऋषिकेश

अरे वा! धन्यु! :) गाणं घरी जाऊन ऐकेनच (आता ऑफिसात आहे)
तिघाही छोट्यांचा मस्ती करून फुल टु दमेश झालेला दिसतोय :)

अजूनहि रंगरावांना मात्र लपवून ठेवलंय हे लक्षात येतंय आमच्या ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग's picture

13 Nov 2008 - 5:52 pm | चतुरंग

लेखाच्या शेवटी दुवा दिलाय ना चित्रांचा तिथे आहेत सगळे त्यात मी सुद्धा आहे!

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Nov 2008 - 7:12 pm | बिपिन कार्यकर्ते

करा करा, कट्टे करा, मज्जा करा. आम्ही पण लवकरच करू कट्टा आणि अस्सेच टाकू फोटो ;)

मोदकाचा फोटो बघून खरंच खूप कळवळलो. मस्तच दिसताहेत. आणि सुरळीच्या वड्या खाऊन बहुतेक य वर्ष झाली असतील. केक पण सुंदर दिसतोय.

पण एक मात्र कळले नाही? 'मोदक प्रशिक्षण वर्गात' गुरू आणि असिस्टंट गुरू मोदक बनवत आहेत आणि शिष्य मात्र आरामात फोटो काढत आहेत, असे कसे? चांगली प्रॅक्टिस नाही का करून घेतली? ;)

बिपिन कार्यकर्ते

रेवती's picture

12 Nov 2008 - 7:54 pm | रेवती

प्राजुनी अगदी लुसलुशीत सुरळीच्या वड्या करून आणल्या होत्या.
शितल व प्राजु दोघी सुगरणी खासच!
आणि मोदक करताना प्रत्येक स्टेपचे फोटो काढले. नंतरही कामी येतील.
तो फोटो लंबूटांगने काढलाय. तो कधी कुठे जाऊन हळूच फोटो काढायचा ते समजायचच नाही.
बरं हा खाली बसल्याशिवाय आम्हाला दिसायचाही नाही.;)

रेवती

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Nov 2008 - 1:51 pm | बिपिन कार्यकर्ते

बरं हा खाली बसल्याशिवाय आम्हाला दिसायचाही नाही.

=)) =)) =))

आणि प्राजुचा आवाज खरंच मस्त आहे. उगाच सांगत होती की तुमच्या स्वतःच्या रिस्क वर ऐका.... :( आणि ते लॅपटॉपचं काय लफडं आहे? म्हणजे 'काराओके' पुरतंच की पूर्ण गाणंच वाजलं तिथे आणि प्राजुने फक्त ओठ हलवले? ;)

प्रत्येक गाण्याची एक खासियत असते. 'रुपेरी वाळूत' आणि 'बुगडी माझी सांडली गं' या गाण्यात 'हाऽऽय' ही खासियत आहे, माझ्या मते. ते अगदी बरोब्बर जमलंय. जियो...

बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश's picture

13 Nov 2008 - 12:55 pm | स्वाती दिनेश

मज्जा केलेली दिसते.. खाण्यापिण्याची रेलचेल आणि झटपट मोदक ह्या लिखाळच्या बोलण्याशी सहमत!
सगळे पदार्थ मस्त झालेले दिसत आहेत हे फोटोंवरून कळते आहेच..
स्वाती
ता.क. - आत्ताच प्राजुचे गाणे ऐकले,मस्त... !

कलंत्री's picture

12 Nov 2008 - 7:25 pm | कलंत्री

मिपाचा कट्टा म्हणजे खाद्य पदार्थाची रेलचेल असे समजायला हरकत नाही. सध्या मिपाचे इतके सदस्य वाढत आहे की गावोगावी कट्टा व्हायला हरकत नाही.

नाहीतर मिपा म्हणजे अनिवासी भारतीय आणि पुणे / मुंबई इतकेच स्वरुप राहु नये. मिपाआता जेथे मराठी तेथे मिपा असे व्हायला हवे.

वाटाड्या...'s picture

12 Nov 2008 - 7:51 pm | वाटाड्या...

आम दुनियेत 'मुकुल' नावाचं अजुन कोणी आहे हे बघुन मला बरं वाटलं. इतके दिवस वाटायचं 'मुकुल' नाव कदाचीत परग्रहावरचं वगैरे असणार... ;)

बाकी व्रत्तांत छान...सुरळीच्या वड्या खाउन किती दिवस झाले...साला आपलं खाणं ते आपलं खाणं काहीही म्हणा...

अजुन एक 'मुकुल'....

रेवती's picture

12 Nov 2008 - 7:58 pm | रेवती

आम दुनियेत 'मुकुल' नावाचं अजुन कोणी आहे हे बघुन मला बरं वाटलं.
होय. हा मुकुल ७ वर्षाचा होऊ घातलाय.
माझ्या मुलाने यशराजला दंगा व नस्ते उद्योग करण्यात मागे टाकलय.

रेवती

टारझन's picture

12 Nov 2008 - 8:56 pm | टारझन

इतके दिवस वाटायचं 'मुकुल' नाव कदाचीत परग्रहावरचं वगैरे असणार...

होय .. मुकूल देव नावाचा एक टिव्ही कलाकार आठवतोय .. तो परग्रहवासीच वाटतो..

- (नेपच्युन वासी)
टारच्युन

शाल्मली's picture

12 Nov 2008 - 8:30 pm | शाल्मली

प्राजु,
कट्ट्याचा वृत्तांत मस्त लिहीला आहेस. जाम मजा केलेली दिसत्ये तुम्ही ...
एका दिवसात नक्की किती पदार्थ खाल्लेत? ;)
मोदक फारच छान दिसताहेत :) आणि केकची कृती पण लवकरच येऊदे..

--शाल्मली.

रेवती's picture

12 Nov 2008 - 8:46 pm | रेवती

सगळ्यांना विचार.
मी केलेला रगडा पॅटीस न खाता पोट भरलं म्हणत सगळेजण गेले गं! याचा संबंध सरळ सरळ चवीशी आहे.;)
प्राजु आणि शितलने केलेले मोदक छान दिसतायत.शितल तर मोदकांच्या बाबतीत जादूगारच आहे.
मी केलेले मोदक बघून लंबूटांग क्षणभर गांगरून गेला, आता ह्या असल्या प्रकाराचे फोटो काढायचे म्हणजे....
नंतर त्याला सुबक मोदक दिसले शितल आणि प्राजुनं केलेले.:)

रेवती

प्राजु's picture

12 Nov 2008 - 8:53 pm | प्राजु

इडल्या आणि छोलेच इतके हादडले होते की, त्यावर रगडा पॅटिस खाल्लं असतं तर पुढचे ३ दिवस जेवलो नसतो. :)
म्हणून नाही जमलं खायला. नाहीतर असं आयतं रगडा पॅटीस मिळाल्यावर कोण सोडणार गं?? रेवतीच्या हाताला चवच इतकी छान आहे की काय सांगू?? एकदम मस्त!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शाल्मली's picture

12 Nov 2008 - 8:59 pm | शाल्मली

मग असं करा-
रगडा पॅटीस साठी अजून एक कट्टा ठरवून टाका लगेच.. :)
म्हणजे मग काय काय राहीलं असेल ते तेव्हा करा..;)

--शाल्मली.

शाल्मली's picture

13 Nov 2008 - 4:38 pm | शाल्मली

वा.. आता वृत्तांत अजून सजला आहे..
नवीन फोटो मस्त आहेत.
आणि आपल्या मिपाच्या गानसदस्येचे गाणे ऐकून मजा आली.. :)
प्रा़जुचा आवाज मस्त आहे.

टारझन's picture

12 Nov 2008 - 8:53 pm | टारझन

अरेरे .. अंमळ दु:ख झालं.... आजुन एक कट्टा चुकला ... टारझन ऐवजी शक्तिमान असतो तर प्रत्येक कट्ट्याला हजर रहाता आले असते ... लंबुटांग ... चापून खा रे राजा, तुला गरज आहे ताकदीची .. ;)

- (कट्टा(मिस्)करू)
मिस्स्टर टारझन

मुक्तसुनीत's picture

12 Nov 2008 - 9:04 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. कनेटीकट मधे पुन्हा एकदा शिजलेला जंगी "कट" ! मजा आली पाहून. ट्राय स्टेट मिपावालो , लगे रहो ! :-)

रेवती's picture

12 Nov 2008 - 9:06 pm | रेवती

लंबुटांग ... चापून खा रे राजा, तुला गरज आहे ताकदीची

होय रे टारू. लंबूटांग सकाळी आला तेंव्हा फ्रेश दिसत होता. त्याच्या डोळ्यात संसाराची स्वप्नं दिसत होती.
आमचा दंगा पाहून त्यानं आमच्या समोरच त्याच्या घरी फोन लावून एक्स्ट्रा लाँग भगवी कफनी, दंड, कमंडलू पाठवून द्यायला सांगितले.
शिक्षण संपल्यावर तो हिमालयात जायचयं असं काहिसं बोलतोय असं वाटलं. आमच्या बद्दल त्याचं मत झाल ते असं,"मुली व बायका दंगा करण्यात काही कमी नसतात".
चैतन्य, हलकेच घे रे बाबा!
रेवती

प्रभाकर पेठकर's picture

12 Nov 2008 - 10:35 pm | प्रभाकर पेठकर

हा कट्टा आहे की कट्ट्याला हजर राहू न शकलेल्या 'खवय्या' सदस्यांची जीवघेणी थट्टा?
काय दणदणीत मेन्यू आहे....!
चतुरंग, जगदीश, अमर आणि लंबूटांग.. सगळे (नुसते) गप्पा ठोकत होते.
ह्या सोवळ्या 'थापे'वर बाकी विश्वास नाही बसला......

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

रेवती's picture

13 Nov 2008 - 12:38 am | रेवती

खरं तेच लिहिलयं.
आमच्या (आणि आपल्याही) डोळ्यासमोर असं चित्र येइल तरी का, हे सगळेजण बल्लवाचार्य झालेले.
मुलांना सांभाळण्याचं अवघड काम मात्र त्या चौघांनी (हो हो अगदी लंबूटांगनेही) मनापासून केलं.
आपण इथे असता तर बरं झालं असतं. आमच्या पदार्थांमध्ये सुधारणा सुचवल्या असत्या.

रेवती

पर्नल नेने मराठे's picture

12 Nov 2008 - 11:30 pm | पर्नल नेने मराठे

सुरळीच्या वड्या :P छान दिसत आहेत

विसोबा खेचर's picture

13 Nov 2008 - 12:09 am | विसोबा खेचर

प्राजू,

सुंदर कट्टावृत्तान्त आणि फोटो..

सर्वांनी मस्तच खादाडी केलेली दिसते आहे...! :)

जगभरात असेच वरचेवर मिपाकट्टे होवोत...

मिसळधर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याकरता संत तात्याबांनी जो अवतार घेतला होता त्याचे आता सार्थक झालेले दिसते आहे.. :)

आता ठिकठिकाणी मिपाकट्टे होऊ लागले आहेत. नुकताच पिडांच्या घरचाही मिपा कट्टावृत्तान्त वाचला...

मिपाधर्माची ही कट्टापताका सदैव फडकत राहो...! :)

असो, सर्व कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन...

मिपाधर्म जागवावा
मिपाधर्म वाढवावा...!

श्री श्री संत तात्याबा महाराज,
संस्थापक,
मिसळपाव धर्म!

यशोधरा's picture

13 Nov 2008 - 12:45 am | यशोधरा

काय मस्त खादाडी केली आहेत! सहीच आहे!!
मोदक तर कसले देखणे दिसताहेत! करंज्या, सुरळीच्या वड्या, छोले, पुर्‍या, इडल्या, सांबार, पुलाव, केक!! किती हे पदार्थ! :)
बरं, ते लाडू आणि चकल्यांचा फोटू का नाही म्हणे? का ते संपवले आधीच?? ;)

ऍडीजोशी's picture

13 Nov 2008 - 3:16 pm | ऍडीजोशी (not verified)

येत्या रविवारी आम्ही येतोय तुझ्या घरी. तेव्हा पुरण पोळ्या, अनरसे, मोदक, पाकातल्या पुर्‍या, मसाले-भात, कोशिंबीर, पापड, पन्ह आणि जेवण झालं की कस्टर्ड असा मेनू बनवून टाक. आपण पण फोटो टाकू :)

मदनबाण's picture

13 Nov 2008 - 5:21 am | मदनबाण

अरे व्वा... कट्टा एकदम झकास माडी झालेली दिसतोय... :)
मेनु एकदम झकास आहे हे काही वेगळ सांगायची गरज नाही!!

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

प्राजु's picture

13 Nov 2008 - 7:55 am | प्राजु

आता सगळ्या मिपाकरांच्या कानांवरही अत्याचार होणार. हे देवा, सगळ्या मिपाकरांना उत्तम श्रवण शक्ती दे!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रा's picture

13 Nov 2008 - 8:58 am | चित्रा

छानच म्हटले आहे की गाणे!

मस्त वृत्तांत.

नंदन's picture

13 Nov 2008 - 11:00 am | नंदन

>>> छानच म्हटले आहे की गाणे!
-- असेच म्हणतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2008 - 5:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>छानच म्हटले आहे की गाणे!

मुक्तसुनीत's picture

13 Nov 2008 - 8:47 am | मुक्तसुनीत

आताच प्राजू यांचे गाणे ऐकले. त्यांचा आवाज खरोखरच सुरेल आहे. गाणे ऐकताना कुठेही सुरात इकडेतिकडे झाले नव्हते. छानच गातात त्या. मात्र एकूण थोडे ज्याला "सबड्यूड्" असे म्हणतात तसे वाटले. अजून थोड्या मोकळ्या गळ्याने गायले असते तर आणखी मझा आला असता. गळ्याकडून बाजू मजबूत आहे , पण बाई थोड्या बुजल्याशा वाटल्या :-)

आम्हाला अशीच गाणी ऐकायला मिळोत. मिपा आणि मिपा कट्ट्यांच्या निमित्ताने असेच नवनवे गुणीजन आम्हाला भेटोत.

विसोबा खेचर's picture

13 Nov 2008 - 9:39 am | विसोबा खेचर

प्राजूने खरंच छान गाणं गायलं आहे. सुरेल आहे, ताला-लयीलाही चांगली आहे..

मुळात आडात असल्यामुळे, कुणा गुणी गुरुकडे काही वर्ष प्रामाणिकपणे तालीम घेतल्यास अजून चांगलं होईल..

आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.

ता क - रुपेरी वाळूतच्या दोन कडव्यांमधलं ते 'हाए..' फारच छान गायलं गेलं आहे. बहुधा, जग्गूभौजी तिथेच असल्यामुळे ते 'हाए..' अधिकच छान गायलं गेलं असेल..! :)

आपला,
(गाण्यातले बारकावे टिपणारा!) कानसेन तात्या.

बाय द वे, प्राजू आणि जग्गूभैय्या दोघे आमच्या देवगडातल्या रुपेरी वाळूतल्या माडांच्या बनात विहार करताना खूप छान दिसतील.. :)

अथर्वला तोवर वाटल्यास मी सांभाळीन.. :)

आपला,
(माडापोफळीतला, आंब्या-फणसातला, सापाविंचवातला कोकणी) तात्या देवगडकर.

चन्द्रशेखर गोखले's picture

13 Nov 2008 - 9:45 am | चन्द्रशेखर गोखले

आंतर राष्ट्रीय मिपाखादाडी साहित्य संमेलन संपन्न झाले. उत्तम संयोजना बद्दल आपले अभिनंदन. मात्र यापुढे आमच्या नावाने घास ठेवला नाहित तर मात्र आपल्याला हे पचविणे कठिण जाईल. सुरवातिला तिघिंच्या ताटातले मोदक पांढर्‍या कांद्या सारखे वाटले. झूम करुन फोटो बघितल्या वर नीट दिसले . हा माझा द्रुष्टी दोष. मुलांनी खाल्लेच नाही वाटत?..... त्यांचे खातानाचे फोटो कुठे आहेत.... हे बर नाही केलत...!!!!!!!!!

प्रमोद देव's picture

13 Nov 2008 - 9:55 am | प्रमोद देव

झकास झालेला दिसतोच आहे.
प्राजुचे गाणेही मस्त झालंय.
तिच्या एकूण गाण्याला मी 'प' दिलाय आणि खास करून 'हाय' ला 'नी' दिलाय.
मुळात आडात असल्यामुळे, कुणा गुणी गुरुकडे काही वर्ष प्रामाणिकपणे तालीम घेतल्यास अजून चांगलं होईल..

तात्याच्या ह्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.

मनस्वी's picture

13 Nov 2008 - 4:47 pm | मनस्वी

जोरदारच झालेलाय कट्टा!
ट्रे मधल्या इडल्या, मोदक, सुरळीच्या वड्या सुरेख दिसताएत. किती मन लावून मोदक बनवताय..
त्रिदेवही गोड आहेत. सगळे फोटो नंबर १.
हेऽऽ येवढे पदार्थ!!! मिपा 'मिनी' कट्टा नाव अजिबात शोभत नाहीये! :)
>यावरची सजावट मास्टर मुकुल यांनी केली होती
एकदम rocking झालीये :)

राघव's picture

13 Nov 2008 - 12:44 pm | राघव

झक्कास.. चांगलं चाललंय एकुणात कट्ट्यांचे!! :)
तो मेन्यू बघून मात्र आता काय करू अन् काय नको असं झालंय.. त्यातही सुरळीच्या वड्या अन् उकडीचे मोदक म्हणजे आपला वीक प्वाईंट..!! आता बायकोची मनधरणी करावी लागणार त्यासाठी... =P~
हा बायको नावाचा प्रकार असाच असतो का हो.. आता कसली भाव खाणार माहितीये काय?? ;)
(खादाड) मुमुक्षु

सकाळ पासुन तीनवेळा लिहिले पण काहीतरी घोळ होत आहे.सर्वप्रथम कट्टा एकदम छान जमला होता असे दिसते. खाद्यपदार्थ एकदम झक्कास जमले आहेत्.सुरळीच्या वड्या..काहि लिहायलाच नको.दोन वेळा गाणे एकले....खुपच गोड आवाज आहे. गाण्याला १००% मार्क .......
कट्ट्यावर बालगोपालाचा वावर बघुन वाटते की मिपाचे भविष्य उज्ज्वल आहे.
वेताळ

विसोबा खेचर's picture

13 Nov 2008 - 3:51 pm | विसोबा खेचर

कट्ट्यावर बालगोपालाचा वावर बघुन वाटते की मिपाचे भविष्य उज्ज्वल आहे.

हे वाक्य खूप आवडले..! :)

मुलांनो, सांभाळा रे आपलं मिपा..! :)

आपला,
(निवृत्तीकडे झुकलेला मिपाकर) तात्यामामा. :)