देश कसा बुडवावा

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
2 Feb 2015 - 4:19 pm

देश कसा बुडवावा, तुला ऐकायचं होतं ना
ऐक, फार काही करावं लागत नाही मित्रा
देशनिंदा अतिशय सोपी गोष्ट आहे
देशभक्ती आचरटपणा
आ़णि द्रोह करणं फ्याशन आहे

तत्परतेने शत्रूची बोट उडवली रे उडवली
की सैन्यदलांना नावे ठेव
जाब विचार, साधे स्मगलर हो ते
दहशतवादी नाहीच्चेत मुळी, अशी कशी उडवली?
बघ, देश बुडतो की नाही

आपल्याच देशात आपल्याच घरातून हाकललेल्या
मारलेल्या, बलात्कारलेल्या, विस्थापित काश्मीरी पंडितांची व्यथा दाबून टाक,
दुर्लक्ष कर, मग जोरात कांगावा करुन विचार,
काय घंट्याचा त्रास होतो आहे त्यांना?
बघ, देश बुडतो की नाही

एकदा कुणीतरी सिनेमा काढेल
देवळात जाणार्यांना मूर्खात काढेल
पण तू मात्र त्याचा उदो उदो कर
त्याचंच कसं बरोबर म्हणत सिनेमा हिट कर
बघ, देश बुडतो की नाही

गीतेला राष्ट्रीय ग्रंथ करा म्हटल्यावर
तू लगेच माइकचं बोंडकं घेऊन जा
मिळतील तितक्या शिव्या गोळा कर
आपल्याच धर्माला उच्चारवाने त्या घाल
बघ, देश बुडतो की नाही

पण दुसरं एखादं पुस्तक राज्यघटनेपेक्षा उच्च आहे म्हटल्यावर
शांत बसून रहा, काहीही करु नको
बातमी बाहेर पडणार नाही असं बघ, मुस्कटदाबी कर
कारण कुणाच्या तरी भावना दुखावतील
बघ, देश बुडतो की नाही

देशाला जे जे भूषणावह, जो जो महान
त्याला त्याला पदोपदी हिणवायला विसरू नको
अपमानास्पद बोल, तेजोभंग कर
समाधान नाही झालं, तर शेलक्या विशेषणांनी विद्ध कर
बघ, देश बुडतो की नाही

भ्रष्टाचाराला पाठिंबा दे, पोलीसांना दोष दे
सगळे सगळे कसे हरामखोर
याची लांबलचक यादी दे
तू मात्र काहीही करु नकोस
स्वतःला काहीही तोशीस पडू देऊ नकोस
बघ, देश बुडतो की नाही

मग विरंगुळा म्हणून एक जोक मार
त्यात आठवणीने, खुबीने, शब्दांच्या कसरती करत
धार्मिक भावना दुखवायला विसरू नकोस
समोरचा रागावला तर तुम्हीच कसे हिंसक,
असा कांगावा करता येईलच
बघ, देश बुडतो की नाही

हे सगळं करताना, तुला विरोध करणार्याला जातीयवादी म्हणायला विसरू नको
समोरचा अवाक् होईल
नाईलाजाने, तोंड दाबून गप्प बसेल
मग तू विजयोन्मादात उत्सव साजरा कर
बघ, देश बुडतो की नाही

इतिहासमुक्तकसमाजजीवनमानराजकारण

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2015 - 4:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडली. पण सरकार बदललयं परिस्थिती बर्‍याच प्रमाणात सुधारायला लागलीये.

मंदार दिलीप जोशी's picture

2 Feb 2015 - 4:30 pm | मंदार दिलीप जोशी

मान्य आहे.

पण डीप अ‍ॅसेट नामक प्रकार असतो. गुगल केलंत तर बरीच माहिती सापडेल. त्या संदर्भात जास्तकरुन ही कविता लागू आहे.

hitesh's picture

3 Feb 2015 - 1:23 pm | hitesh

लाहोरला आणि ढाक्क्याला शाखा काढुन संघानेही अ‍ॅसेट करावी . कओण नाय म्हणतय का ?

विवेकपटाईत's picture

2 Feb 2015 - 7:23 pm | विवेकपटाईत

सध्या तरी दिल्ली बुडणार आहे.......*crazy* *CRAZY* :crazy:

अनुप ढेरे's picture

2 Feb 2015 - 9:53 pm | अनुप ढेरे

टुकार...

आजानुकर्ण's picture

2 Feb 2015 - 10:57 pm | आजानुकर्ण

अत्यंत टुकार!

गीतेला राष्ट्रीय ग्रंथ करा म्हटल्यावर
तू लगेच माइकचं बोंडकं घेऊन जा
मिळतील तितक्या शिव्या गोळा कर
आपल्याच धर्माला उच्चारवाने त्या घाल
बघ, देश बुडतो की नाही

गीतेला राष्ट्रीय ग्रंथ करायचा म्हणजे नक्की काय करायचंय. आणि धर्माला घातलेल्या शिव्यांंमुळे देश कसाकाय बुडणार बॉ?

पिंपातला उंदीर's picture

3 Feb 2015 - 3:46 pm | पिंपातला उंदीर

*lol* *LOL* :-))

अनुप ढेरे's picture

6 Feb 2015 - 9:03 pm | अनुप ढेरे

जोशीबुवा, उत्तर द्या की!!

अनुप ढेरे's picture

2 Feb 2015 - 9:59 pm | अनुप ढेरे

आपल्याच धर्माला उच्चारवाने त्या घाल
बघ, देश बुडतो की नाही

बाकी स्वत:च्या धर्माला श्या घातल्यावर देश कसा काय बुडतो?

मुक्त विहारि's picture

2 Feb 2015 - 10:52 pm | मुक्त विहारि

आवडली...

hitesh's picture

3 Feb 2015 - 1:19 pm | hitesh

४०० वर्षे मुस्लिम , ३५० वर्षे ख्रिस्चन आणि साठ वर्षे हिंदुत्वविरोधी काँग्रेस ... दॅशाचा विकास यानी केला. मग आता गीता कशाला डोक्यावर घ्यायची ? आजवरचा विकास हिंदुत्वाशिवायच झालाय ना ?

टवाळ कार्टा's picture

3 Feb 2015 - 1:29 pm | टवाळ कार्टा

३५० वर्षे ख्रिस्चन ... दॅशाचा विकास यानी केला

ड्वाळे पाणावळे =))

hitesh's picture

3 Feb 2015 - 1:32 pm | hitesh

जास्त रडु नका. पाणबुडी वर येईल

टवाळ कार्टा's picture

3 Feb 2015 - 3:46 pm | टवाळ कार्टा

पाणबुडी वर येईल>>>>>>>>> ?????

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2015 - 1:39 pm | अत्रुप्त आत्मा

४०० वर्षे मुस्लिम , ३५० वर्षे ख्रिस्चन आणि साठ वर्षे हिंदुत्वविरोधी काँग्रेस ... दॅशाचा विकास यानी केला. मग आता गीता कशाला डोक्यावर घ्यायची ? आजवरचा विकास हिंदुत्वाशिवायच झालाय ना ?

अहो असं काय ते??? यांनी(पण...) मूर्खपणा करायला नको का थोडा...???
.
.
.
.
.
.
.
.
राहिलेला!

hitesh's picture

3 Feb 2015 - 2:01 pm | hitesh

:)

होकाका's picture

4 Feb 2015 - 7:56 pm | होकाका

काव्व्याचं मूल्य, कविची देशाबद्द्लची आच आणि सद्यपरिस्थितीचं चित्रण समजू शकतं. एक चांगली कविता.

hitesh's picture

5 Feb 2015 - 3:54 am | hitesh

कवितेच आशय आवडला, शब्दरचना थोडी विस्कळित वाटत आहे.
बाकी लिहित रहा.. वाचत आहे

मुक्त विहारि's picture

5 Feb 2015 - 6:23 pm | मुक्त विहारि

सहमत....

विवेकपटाईत's picture

5 Feb 2015 - 7:22 pm | विवेकपटाईत

च्यायला दिल्ली बुडणार आहे वाटते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Feb 2015 - 8:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

*दत्तोबा मोड़ ऑन*

ह्या फ़ुडं अनुयुद्ध टाळायचा एकच इलाज बरंका जोसी सेठ!!, मागच्या टाइमाला बी माझे अन फेपराचे समदे घोड़े विन मदी...

*दत्तोबा मोड़ ऑफ़*

उद्धृत करावयाचा हेतु एकच!! "रे बेंबट्या जगात दत्तोबा कमी अन जोसी सेठ जास्त ! त्यामुळे दत्तोबा हो! "

इति पुलं ड्वायलाक मॉडिफाइड सफ़ळ संपूर्ण!!!!

ज्योति अळवणी's picture

7 Feb 2015 - 12:11 am | ज्योति अळवणी

धर्माचा मान राखावा यात प्रश्नच नाशी. देश बुडतो की नाही ते माहीत नाही; पण दुखावला आहे आजवर हे नक्की. आता मात्र एक वेगळा विश्वास वाटतो आहे...

ज्योति अळवणी's picture

7 Feb 2015 - 12:12 am | ज्योति अळवणी

धर्माचा मान राखावा यात प्रश्नच नाशी. देश बुडतो की नाही ते माहीत नाही; पण दुखावला आहे आजवर हे नक्की. आता मात्र एक वेगळा विश्वास वाटतो आहे...