नमस्कार,
आज सकाळपासून मिसळपावचा सेवादाता आलेल्या अतिथिंच्या मागणीचा पुरवठा करता करता त्रासून गेला होता. त्यामुळे सदस्यांना मिसळपाव बघता येत नव्हते. आता मिसळपाव व्यवस्थित आहे. मात्र सोबतच सेवादात्याची क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे.
आज किंवा उद्या मिसळपाव पुन्हा असेच चालु बंद असू शकते. त्यामुळे कृपया त्रास करून घेऊ नका. मिसळपाव उघडायला त्रास होतो म्हणून ज्यांनी ज्यांनी आज संपर्क साधला त्या सर्वांचे धन्यवाद.
मिसळपाव वर तुमचे प्रेम असेच कायम राहो. मिसळपाव अधीकाधीक सक्षम होत राहील.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
12 Nov 2008 - 5:17 pm | विनायक प्रभू
नको देवराया
अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा
जाउ पाहे
12 Nov 2008 - 5:31 pm | वेताळ
आज काय नवीन काम चालु होते की काय तात्या?
वेताळ
12 Nov 2008 - 5:35 pm | विसोबा खेचर
एकतर मिपावर येणार्या मंडळींचा ट्रॅफिक अलिकडे खूपच वाढला आहे, रोजच्या हिट्समध्ये सातत्याने वाढ होत आहे, शिवाय मिपावर जरा जास्तच (!) प्रेम करणारी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर मुद्दामून ताण आणून मिपाचा सर्व्हर बंद कसा राहील याची काळजी घेत आहेत..:)
तात्या.
12 Nov 2008 - 5:39 pm | जैनाचं कार्ट (not verified)
>>वाय मिपावर जरा जास्तच (!) प्रेम करणारी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर मुद्दामून ताण आणून मिपाचा सर्व्हर बंद कसा राहील याची काळजी घेत आहेत.
=))
अश्या लोकांना एकदा कट्टाला बोलवा !
वाळत घालू ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
12 Nov 2008 - 5:42 pm | विनायक प्रभू
ही ताण क्रिया थांबवली तर मी मरीन. २५% कमी करु शकतो. थांबवणे शक्य नाही.
रिहॅबिलिटेशन सेंटर चा पण उपयोग होणार नाही.
12 Nov 2008 - 6:18 pm | ऍडीजोशी (not verified)
तात्या आज ऑफीस मधे काहिही काम झालं नाही
12 Nov 2008 - 7:12 pm | रामदास
पडल्यावर जीभ सारखी सारखी तिथेच जाते असं आज दिवसभर चाललं होतं.
12 Nov 2008 - 7:15 pm | ऋषिकेश
लई भारी रामदासकाका!
अगदी अस्सेच म्हणतो :)
- ऋषिकेश
12 Nov 2008 - 7:18 pm | कपिल काळे
अहो तात्या, काल हापिसातून जाताना मिपावर जाउ म्हटलं तर मिपा उघडेचना. आत्ता सकाळी आल्यावर चालू आहे.
च्या,मायला, कोन ते भडवे? नाटक करतात साले. नांव सांगा हराम्यांची, बघून घेतो ( येकदम मिनसे चा मानूस हाय आपन हां)
ए टारया , गप्प काय बसलास लेका?
12 Nov 2008 - 7:22 pm | घाशीराम कोतवाल १.२
टार्या हाय का तु ईथ? आपल्या मिनसे चा दणका दाखवाया
पाहीजे बाबा नाय तर आपला पार पोपट व्हायाचा राव
संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
12 Nov 2008 - 11:44 pm | धोंडोपंत
एकतर मिपावर येणार्या मंडळींचा ट्रॅफिक अलिकडे खूपच वाढला आहे, रोजच्या हिट्समध्ये सातत्याने वाढ होत आहे, शिवाय मिपावर जरा जास्तच (!) प्रेम करणारी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर मुद्दामून ताण आणून मिपाचा सर्व्हर बंद कसा राहील याची काळजी घेत आहेत..
तात्या.
काल रात्रीपासून मिपाविना तळमळत होतो. कपिल काळे यांना जेवून आलो की छंदांबाबत लिहू असे सांगून जेवायला गेलो. येऊन पहातो तो मिपा बंद. सकाळी तात्यांना फोन केला तेव्हा कळलं की मिपावर प्रेम करणारी मंडळी मिपा बंद कसे राहील याबाबत दक्ष झाली आहेत. एकूण आजचा दिवस मिपाशिवाय गेला.
आता सुरू झाले हे चांगले आहे. जळणार्यांची संख्या अशीच वाढत राहो कारण त्यातच मिपाचे यश लपलेले आहे.
मिर्झा गालिबचा शेर आठवला
हम कहॉ के दाना थे? किस हुनर में यक्ता थे?
बेसबब हुवा 'गालिब' दुष्मन आसमॉ अपना
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
13 Nov 2008 - 12:09 am | बिपिन कार्यकर्ते
तात्या, मिपाचे ऍडिक्शन इतके झाले आहे की आज मिपा चालू होईपर्यंत 'विथड्रॉवल सिंप्टम्स' चालू झाले होते. :)
बिपिन कार्यकर्ते
13 Nov 2008 - 3:49 am | बन्ड्या
कालचा दिवस मिपाशिवाय गेला. कसं चुकल्या चुकल्या सारखं वाटलं.
....बन्ड्या
13 Nov 2008 - 9:22 pm | धम्मकलाडू
मला तर हे माऊ आणि एफबीआयचं कारस्थान वाटतं आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
13 Nov 2008 - 10:45 pm | झकासराव
३-४ दिवस झाले मिसळ पाव उघडतच नव्हत.
कधी एखाद पेज ओपन व्हायच ते देखील ५-७ मिनिटानंतर.
आज जरा बर ओपन होतय.
पण प्रतिसाद येइलच ह्याची खात्री नाहीये.
नंदा वैनीच्या लेखावरचा प्रतिसाद तात्याला मेल केलाय मी (जीमेल वर) कारण इथे आलाच नाही.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao