वर्जिनल(टवाळ कार्टा) आनिक वर्जिनली वर्जिनल(सार्थबोध) कवी आश्या दोघाचिय्बी स्वारी मागूनसनी
एक नमुना सादर क्येलेला हये.......
घेता जरा 'धुवायला', घंगाळातले पाणी इथे
साबु लावण्या अंगाला काय सांगू जाते माझे ।।१।।
अट्टल पारोसे लाजतील,ओतता (शाम्पू) माझ्या डोईवरी
अंगावरल्या समस्त रंध्रांत,घासणे जाऊ दे टोक तुझे ।।२।।
या ऊरा-पोटावरील दिसती, जरी सार्या वळ्या
ती तनु गबदुल असता,पाठीवरती मळ साचे ।।३।।
पाठी ग धूऊ जाता तुला,पडतो लोटा भुईवरी
पुन्हा करेल यत्न तोवरी,मळ राहिल (तैसाच) काय होते।।४।।
प्रतिक्रिया
26 Dec 2014 - 5:52 pm | टवाळ कार्टा
आवो स्वारी कस्ले...चालुध्ये ;)
26 Dec 2014 - 6:08 pm | प्रचेतस
=))))
तुम्ही सुद्धा लोटा आणि मळ संप्रदायातले का?
27 Dec 2014 - 6:44 am | अत्रुप्त आत्मा
हे ही त्यातलेच आहेत बरं!!! म्हणुन तर एव्हढे काळजिने प्रत्येक ठिकाणी विचारायला येतात! :P
27 Dec 2014 - 10:57 am | भीडस्त
ते 'पाषाण'संप्रदायातले आहेत ना???
27 Dec 2014 - 11:28 am | अत्रुप्त आत्मा
होय! ते उघड झाल!
पण आत... त्यांचा आमचा संप्रदाय एकच!
27 Dec 2014 - 11:34 am | सतिश गावडे
मागे आम्ही एका अज्ञात कवीची कविता म्हणून जी कविता आमच्या हाती लागली होती ती यांचीच का हो?
27 Dec 2014 - 1:22 pm | अत्रुप्त आत्मा
खिक्क! सत्य उघडलं! :-D
27 Dec 2014 - 1:07 pm | प्रचेतस
आम्ही त्यातल्या भक्त संप्रदायातले. गुर्जी सांप्रदायिक कविता टाकणार आम्ही त्या भक्तिभावाने वाचणार.
27 Dec 2014 - 1:24 pm | अत्रुप्त आत्मा
आणि पडद्यामागे करणार!
हे ही तसच पडद्यामागे ठेवलं! :P
27 Dec 2014 - 1:30 pm | प्रचेतस
हो. पडद्यामागेच.
जाहीरपणे करण्याइतकी आमची कुवतही नाही.
पण मला तुमच्या कविता खूप खूप अवडतात. तुम्ही करा ना एखादी कविता प्लीज.
27 Dec 2014 - 2:09 pm | नाखु
"शिष्य व्हावा ऐसा गुंडा जो बांधी (का घाली)गुरूलाच गंडा !! *db*
शीघ्र कवीतांचा झेंडा फडकवी धाग्या धाग्यात !
प्रेमळ विनंती त्याच कवीतेच गद्यात वा पद्यात !!
30 Dec 2014 - 1:01 am | अत्रुप्त आत्मा
@जाहीरपणे करण्याइतकी आमची कुवतही नाही.>> खिक्क!
26 Dec 2014 - 6:50 pm | नि३सोलपुरकर
वाह वाह ,
संप्रदाय* चांगलाच बहरतोय ,आणी राजे "आय डी " बदलाच आता.
(*कुठला म्हणुन विचारु नये ... उत्तर दिले जाणार नाही)
26 Dec 2014 - 7:28 pm | अजया
हे लौटिक काव्य म्हणता येईल.सांप्रदायिक म्हणायला परसदाराचे विभ्रम दिसत नाहीत.
रच्याकने- युटु हात धुविंग इन वाहतं पाणी!!नावाला शोभली नाही हो कविता.
26 Dec 2014 - 7:45 pm | भीडस्त
परसदारीय विभ्रमांची गाथा गवसणीतच राहिलेली बरी.
आणि हात धुता ठेवणे हे तर आपले प्राक्तनच आहे... म्या तुम्हास काय सांगावे!
उर्मी दाबता येत नाही..निके काय नि फोलपट काय!!