अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
19 Dec 2014 - 12:05 am

जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते.

तरीही अशी कृती केली जात नाही. ते का?

हे समजावून घेत असता प्रथम हे जाणणे आवश्यक आहे की अशी कारवाई एक सरळ सरळ क्ष विरुद्ध य असे युद्ध नसेल तर ते "राष्ट्रसंघ" विरुद्ध "खालील अनेक उघड आणि छुपे शत्रू / विरोध" असे असेलः

१. अतिरेकी, हे तर मुख्य लक्ष्य आहेत आणि त्यांच्यासाठी हे जीवनमरणाचे युद्ध असणार आहे. मुख्य म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीतही स्वतःच्या म्हणण्यासाठी कोणतीच नीतिमात्ता न पाळणारे हे लोक, कोणत्याही थराला जाउन नीचतम पातळी गाठतील हे सांगायची गरज नाही. असे असले तरी अंतरराष्ट्रिय सैन्यावर सर्व खर्‍या आणि मानलेल्या नितीमत्तेने वागण्याची नैतिक जबाबदारी असेल.

२. अतिरेक्यांच्या देशातील सरकार आणि सैन्यदले देशाच्या सौर्वभौमतेचा मुद्दा पुढे करून विरोध, छुपे/प्रत्यक्ष युद्ध (आताही पाकिस्तानचा अमेरिकेशी डबल गेम चालू आहेच) करण्याचीच दाट शक्यता आहे.

३. त्या देशातील अतिरेक्यांचे हितसंबंधी, जे मुलकी नागरिक असल्याने त्यांच्यावर सरळ कारवाई साधी गोष्ट नाही, ही एक मोठी आणि धोकादायक डोकेदुखी असेल.

४. परकिय सैन्य आपल्या देशात घुसल्याने रागावलेले मुलकी नागरिक गुप्त कारवाया करू शकतात किंवा सरळसरळ अतिरेक्यांच्या गटात जाउ शकतात.

५. इस्लामी देशात परकिय सैन्य नेण्यास इतर इस्लामी देशांचा विरोध असेल (लिबियामधिल कारवायांच्या वेळी एका बाजूने पाश्चिमात्य देश तेथे "नो फ्लाय झोन करण्यासाठी काहीच करत नाहीत" अशी तक्रार करतानाच त्याच श्वासात "बूट्स ऑन ग्राऊंड" ला झालेला प्रखर विरोध आणि नंतर नो फ्लाय झोन करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाँबिंग्मघ्ये काही नागरिकांचा मृत्यु झाला म्ह्णून निषेधही केला गेला, ते आठवा).

६. अतिरेक्यांवर कारवाई केली म्हणुन आणि त्या देशात परकिय सैन्य नेल्याची प्रतिक्रिया म्हणून जगातल्या सर्व अतिरेकी संघटना एकजूटीने / स्वतंत्रपणे जगभर अतिरेकी कारवाया करणार हे नक्की... यामुळे हा संघर्ष एका देशाच्या एका प्रांतापुरत्या न राहता सर्व जगच रणांगण बनेल आणि या बाबतीत जगभर युद्धपातळीवर खबरदारी न घेणे किती आत्मघातकी ठरेल हे नुकत्याच झालेल्या सिडनी प्रकरणासारख्या घटनांवरून समजणे सोपे होईल.

७. तालिबान असलेला भाग अत्यंत डोंगराळ आणि दुर्गम आहे, तो पाकिस्तान-अफगाण सीमेच्या दोन्ही बाजूस आहे, तेथे या दोन्हीही देशांच्या सरकारांचे नाही तर स्थानीक टोळ्यांचे आणि अतिरेकी संघटनांचे नियंत्रण आहे. या संघटनांचे सदस्य मनाला येईल तेव्हा कोणत्याही आडकाठीशिवाय तेथिल आंतरराष्ट्रिय सीमा ओलांडतात. एका देशात गुन्हा करून दुसर्‍या देशात पळून जाणे हा त्यांचा नेहमीच डावपेच आहे. तेव्हा युद्ध करणार्‍या आंतरराष्ट्रिय सैन्याला अतिरेक्यांचा पाठलाग (हॉट परस्युट) करताना पाकिस्तान-अफगाणीस्तानची सरहद्द ओलांडण्याची परवानगी असायला हवी. हे आधुनिक काळात केवळ महायुद्धांच्या वेळी शक्य झालेले आहे. म्हणजे ही कारवाई एका देशातील स्थानीक ऑपरेशन न राहता अनेक देश सामील असलेले आंतरराष्ट्रीय युद्ध होईल.

८. अतिरेक्यांच्या विभागाची भौगोलिक परिस्थिती सामान्य युद्ध (conventional warfare) नाही, ते डोंगराळ, दर्‍याखोर्‍यांनी भरलेल्या भागातले गनिमी काव्याचे युद्ध असणार आहे. अश्या युद्धात रणगाडे, तोफा, आर्मर असे ते वापरणार्‍या बाजूचे पारडे वर ठेवणारे मोठे युद्धसाहित्य (हेवी वेपन्स) निरुपयोगी ठरते (तेथे पोहोचू शकत नाही). इतकेच काय तर दर्‍याखोर्‍यांत आणि डोंगरांतील गुहांत लपून राहणार्‍या आणि कोणतेही उघडे मोठे तळ (कँप्स) नसलेल्या शत्रूवर हल्ला करण्यास वायुदल परिणामकारक ठरत नाही. कारण विमानुड्डाणाला बिकट भौगोलिक परिस्थिती बरोबरच एवढ्या मोठ्या भागावर कारपेट बाँबिंग करायला दशलक्ष टनांनी बाँब्ज लागतील. त्याची किंमत मोजणे कठीण तर आहेच पण या कृतीचा बेनेफिट-कॉस्ट रेशो ती कृती वेडेपणाची ठरावी इतका कमी असतो. म्हणूनच अश्या परिस्थितीत ड्रोन वापरून सर्जीकल ऑपरेशन्स केली जातात... परंतु अश्या कृतीचीही किंमत कोलॅटरल डॅमेजने मोजावी लागते, जी स्थानीक जनतेला विरोधी गटात ढकलते आणि काम अधिक कठीण करते.

९. वर सांगितलेली भौगोलिक परिस्थिती अतिरेक्यांना तळहाताच्या रेषांसारखी माहित आहे, पण आंतरराष्ट्रिय सैन्याकरिता अनोळखी जागा असेल. त्यामुळे, केवळ सैन्याची हालचालच नाही तर त्याला लागणारी वाहने, हत्यारे, दारूगोळा, अन्न, इत्यादींचा पुरवठा करणे हे किती कठीण असेल हे सांगायला नकोच... आणि हे अतिरेक्यांच्या सतत होणार्‍या गनिमी आणि आत्मघातकी हल्ल्यांच्या छायेखाली करायला लागेल हे पाहिल्यावर परिस्थितीचे गांभिर्य ध्यानात यावे. अनेक दशके चाललेली यमुनेच्या बिहडांतील दरवडेखोरी आणि मध्य भारतातील हस्तिदंताची तस्करी (त्या कुप्रसिद्ध तस्कराचे नाव आता पटकन आठवत नाही) आठवली तर किंsssचीत कल्पना यावी... मात्र या तुलनेत फार मोठे फरक असे की, (अ) येथे एका देशातील आंतरराज्य सीमेऐवजी आंतरराष्टिय सीमा ओलांडायची आहे, (आ) बिहड अथवा जंगलांऐवजी येथे हिमालयाच्या (किंवा त्याच्या उपरांगांच्या) दर्‍याखोरी आहेत, (इ) जुन्यापुराण्या बंदूक-रायफल वापरणार्‍या दरवडेखोरांच्या ऐवजी अत्याधुनिक शस्रास्त्रांनी (उखळी तोफा, रॉकेट्स, विमानवेधी तोफा, इ ने सज्ज आणि (ई) अनेक दशके त्याच परिसरात युद्ध करणारे, मरणाला न घाबरणारे माथेफिरू, आत्मघातकी, अतिरेकी आहेत, इ इ इ.

या सर्व आणि इतर अनेक गोष्टींमुळे या युद्धात होणारे फायदे व सोसायला लागणारे तोटे (आर्थिक, राजकिय, मानवहानीच्या स्वरुपातील, इ) यांचा "बेनेफिट-कॉस्ट रेशो" परवडणारा रहात नाही... निदान दर चार-पाच वर्षांनी येणार्‍या निवडणूकीतल्या हार-जीतीचा विचार करणार्‍या राजकारण्यांसाठी तर नव्हेच !

हुश्श्य ! आतापर्यंत आपण केवळ उघड दिसणारी शोरूम बघितली आहे... पडद्यामागचे स्थानिक-प्रादेशिक-आंतरराष्ट्रिय राजकारणाचे गोडाउन उघडले तर वरच्या विश्लेषणात झालेली दमछाक म्हणजे सकाळच्या गुलाबी थंडीत रमतगमत केलेला बागेतला फेरफटका ठरावा !

तंत्रराजकारणविचारसमीक्षाअनुभवमत

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

19 Dec 2014 - 12:17 am | श्रीरंग_जोशी

लेखात मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत.

बरेचदा एखाद्या देशातील हुकूमशहाला पदच्युत करण्यासाठी त्याच्या विरोधी गटाला शस्त्रास्त्रे, पैसा वगैरे पुरवला जातो अन मागाहून त्याची फळे भोगावी लागतात.

जसे २०१२-१३ मध्ये सिरियातील असाद राजवटीविरुद्ध तेथील बंडखोरांना मदत केली गेली. असाद पदच्युत होणे दूरच पण आयसिसचे भूत उरावर बसले.

त्या कुप्रसिद्ध तस्कराचे नाव आता पटकन आठवत नाही

- वीरप्पन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Dec 2014 - 12:27 am | डॉ सुहास म्हात्रे

होय तेच... विरप्पन.

एस's picture

19 Dec 2014 - 8:40 pm | एस

मध्य भारतातील हस्तिदंताची तस्करी

दक्षिण भारतातील साईमंगलम् च्या जंगलात त्याचा हा उद्योग चालायचा. त्याचबरोबर चंदनतस्करीही. कन्नड अभिनेते राजकुमार यांच्या सुटकेसाठी कर्नाटक सरकारने म्हणे तीस की पन्नास कोटींची खंडणी दिली होती वीरप्पनला. त्याचे त्याने काय केले, कुठे इतका पैसा लपवून ठेवला हे कधीच बाहेर आले नाही. त्याला मारायला तब्बल वीस वर्षे लागली.

एवढे अवांतर सांगत बसण्याचे कारण म्हणजे अशा गोष्टींमागे खूप खोलवर दडलेले राजकारण आणि अर्थकारण असते. त्यात वरवर परस्परविरोधी वाटणार्‍या पण आतून एकमेकांशी संधान बांधलेल्या अनेक हितसंबंधांचा गुंता असतो.

लेख छानच.

श्रीगुरुजी's picture

19 Dec 2014 - 8:59 pm | श्रीगुरुजी

>>> एवढे अवांतर सांगत बसण्याचे कारण म्हणजे अशा गोष्टींमागे खूप खोलवर दडलेले राजकारण आणि अर्थकारण असते. त्यात वरवर परस्परविरोधी वाटणार्‍या पण आतून एकमेकांशी संधान बांधलेल्या अनेक हितसंबंधांचा गुंता असतो.

बरोबर.

वीरप्पन मूळचा तामिळ होता पण तस्करी कर्नाटक व तामिळनाडूच्या सीमेवरील जंगलात करायचा. १९९० च्या दशकाच्या सुरवातीला कावेरी नदी पाणीवाटप वादामुळे कर्नाटक व तामिळनाडूतील संबंध विकोपाला गेले होते. त्यामुळे दोन्ही राज्यातील पोलिस कारवाईत सुसूत्रता नव्हती. त्याचा फायदा त्याने उठविला. राजकुमार या कन्नड नटाचे त्याने अपहरण केल्यावर कर्नाटकात संतापाची लाट उसळली होती परंतु तामिळ लोकांना त्यात फारसे काही वाईट वाटले नव्हते. द्रमुक व अद्रमुक अशा दोन्ही पक्षातील काही मंत्र्यांचे त्याला गुपचूप पाठबळ होते. तो काही काळ श्रीलंकेविरूद्ध लिट्टेच्या बाजूने बोलत होता. त्यामुळे काही तामिळींची त्याला सहानुभूती होती. जयललिता सरकारने शेवटी २००४ मध्ये त्याचा एन्काऊंटर केला तो सुद्धा २००६ मधील निवडणुक डोळ्यासमोर ठेवूनच.

मुक्त विहारि's picture

19 Dec 2014 - 1:43 am | मुक्त विहारि

ह्यात परत "तेलाचे राजकारण" पण असू शकेल का?

जेपी's picture

19 Dec 2014 - 1:02 pm | जेपी

तेलाचे राजकारण आहे.
अमेरिका सध्या युक्रेन वरुन रशियाची कोंडी करण्यासाठी तेलाचे उत्पादन वाढवत आहे.मदतीला भारत जाऊ नये म्हणुन अमेरिका पाक कडे दुर्लक्ष करतय.

काळा पहाड's picture

19 Dec 2014 - 6:04 pm | काळा पहाड

मदतीला भारत जाऊ नये म्हणुन अमेरिका पाक कडे दुर्लक्ष करतय.

हे सगळे मुद्दे असते तरी सुद्धा अमेरिकेने पाकवर अंकुश लावला असता असं नाही. एक लक्षात घ्या की अमेरिका हा फक्त त्याचा स्वतःचा मित्र आहे. तो फक्त स्वतःच्या फायद्याचं करतो. आणि पाकिस्तानला दुखावणं म्हणजे अफगाणिस्तानचा रस्ता बंद करणं. त्यामुळे जोपर्यंत एखादा अतिरेकी अमेरिकेला धोकादायक ठरत नाही तो पर्यंत अमेरिका तिकडे लक्ष देत नाही आणि देणार नाही.

अर्धवटराव's picture

19 Dec 2014 - 1:49 am | अर्धवटराव

मुख्य प्रॉब्लेम या शब्दातच आहे. संपूर्ण संयुक्त राष्ट्रसंघ कुणा एका व्यक्तीला/व्यक्तीसमुहाला "अतिरेकी" म्हणत असेल काय? नसल्यास अतिरेकी वि. उर्वरीत जग असा भेदच उरत नाहि, मग त्यावर अ‍ॅक्शन तर फार लांब राहिली. इबोला सारख्या व्हायरस कंट्रोल आणि जागतीक तापमान वाढीसारख्या मुद्द्यांवर जागतीक एकमत व्हायला युनोची दमछाक होते, तर असल्या सो कॉल्ड अतिरेकी कंट्रोल करता काय हालत होईल... आणि हे सगळं आवरायचं कोणि? कुणाला शस्त्र विकायची आहेत, कुणाला तेल. कोणि अणु तंत्रज्ञान घ्या म्हणुन मागे लागलाय तर कोणाला चक्क धान्य पिकणारी जमीन आणि पाणि हवय. शिवाय आपापले श्रेष्ठत्वाचे भावनीक मुद्दे आणि जुनी उणिदुणी. सगळे खंड एकमेकांच्या पायात पाय घालताहेत, एका खंडातले देश वर्चस्वाची लढाई लढताहेत, तर उपखंडात देखील पाय खेचणे सुरु आहे. मग त्याकरता कट-काटशह करायचे, एकमेकांचे शत्रु निर्माण करायचे, शत्रुंना पाठबळ द्यायचं या सगळ्या उपद्व्यापातच अतिरेकी बिजांना खतपाणि मिळते व ते फोफावतात... कसली आलिय आरपारकी लडाई ??

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Dec 2014 - 3:04 am | निनाद मुक्काम प...

जगभरातील प्रमुख देश अण्वस्त्र सज्ज झाले त्यामुळे निर्णायक पारंपारिक युद्धाची शक्यता फारच दुर्मीळ झाली . आज जग अण्वस्त्र विरहीत असते तर शीत युद्ध हा प्रकार जन्माला आला नसता
ह्यातून पुढे दोन्ही गटातून एखाद्या देशात सत्ताधारी व्यवस्थेला उत्तर देण्यासाठी विरोधी गटाला शस्त्रे , प्रशिक्षण , व पैसा देण्यात आला त्यांचा आपापल्या देशात स्वातंत्र्य सैनिक किंवा स्वतंत्रता चळवळ म्हणून हवा देण्यात आली ह्यातून जे काही त्रांगडे निर्माण झाले त्याचे एका वाक्यात उत्तर मुशरफ ह्यांचे जगप्रसिद्ध विधान करते
एका देशासाठी असलेला अतिरेकी दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो
ह्यामुळे प्रत्येक देश जगात घडणाऱ्या अतिरेकी कृत्यांवर त्या आपापल्या चष्म्यातून पाहतो व त्यानुसार त्या घटनेला कमी अधिक महत्व देतो , संयुक्त राष्ट्र संघ नावापुरता असून जगातील बडी धेंडे जी २० , नेटो अश्या संघटना उभारतात त्यांना उत्तर देण्यास ब्रिक निर्माण होते
आताच्या काळात दहशत वादाच्या पाठी मोठे अर्थकारण आहे
जगात जो पर्यंत धर्म अस्तित्वात असणार , शस्त्रास्त्रांचा बाजार आणि विक्रेते असणार तो पर्यंत दहशतवाद किंवा त्याच्या समानार्थी शब्द स्वातंत्र्य चळवळ जगभर चालू राहणार.
तो थांबविण्याची इच्छाशक्ती सध्यातरी कोण च्याही देशात नाही.

चौकटराजा's picture

19 Dec 2014 - 7:22 am | चौकटराजा

आपल्या सोसायटीत ज्याप्रमाणे खाली पटांगणात घाण पडली तर वरच्या मजल्यावर रहाणारा त्याचा "आपल्याला काय त्याचे ?" असा विचार करतो.तसेच दहशतवादाचे आहे. तो कोण तरी असा माणूस पोसतो जो कधीतरी त्याचा बळी ( ९/११) डिसें१४ होउ शकतो.अमेरिकेने फक्त ९/११ चा अपराधी मारला पण २६/११ च्या अपराध्याला काही करण्याची त्यांची तयारी नाही. हे लक्षात घ्यावे. टीव्ही वर मिळालेली माहिती अशी की, सौदी अरेबिया हा देश यातील शेटजी आहे. त्याची अमेरिकेला गरज आहे. ती गरज संपली की तिची अर्थव्यवस्था धोक्यात येईल व तिचे शेटजीपण संपेल. मग फंडिंग थांवेल. व याला काहीसा आळा बसेल.त्यात अमेरिकेचा तोटा असा होउ शकतो की तेथील शस्त्रास्त्र उत्पादकांचा सरकारवर असलेला दबाव याचे काय करायचे ? त्यामुळे अमेरिकेने आत्ता तरी बघ्याची भूमिका घेतली आहे.

विशाखा पाटील's picture

19 Dec 2014 - 11:16 am | विशाखा पाटील

चांगले विश्लेषण.
दहशतवादी कारवायांना पैसा मिळण्याचे अनेक स्त्रोत आहेत - छुप्या मार्गाने तेल विकून (जे सध्या ISIS करते आहे.), अमलीपदार्थांची तस्करी, नागरिकांना ओलीस ठेवून मिळवलेला पैसा (यात फ्रांसने आत्तापर्यंत सर्वात जास्त म्हणजे अंदाजे ४० दशलक्ष डॉलर्स एवढा पैसा दिला आहे.), विविध देशातील मुस्लीम नागरिकांकडून गोळा होणारा पैसा हे मुख्य काही.
ओबामा यांनी सत्तेवर आल्यावर दहशतवादा विरुध्द लढण्यासाठी चार मुद्दांवर आधारित एक कार्यक्रम तयार केला होता- हिलरी क्लिनटन यांच्या 'हार्ड चोईसिस' या पुस्तकात तो दिला आहे.
१.आंतरजालावरून प्रसारित होणाऱ्या ideology ला रोखणं
२.लेखात म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न करणं- यात मुस्लीम देशांना सहभागी करून घेणं.
३. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशातल्या सरकारांबरोबर प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम राबवणं.
४.दहशतवादाची मुळे असलेल्या देशांमध्ये विकासाची कामे हाती घेणं (अमेरिका आर्थिक मदत देत असलेल्या देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक सर्वात वर त्यासाठीच आहे. पण तिथली लष्करशाही आणि लोकशाही ह्यांच्या खेळात तो पैसा दुसरीकडेच वळला.)

हा कार्यक्रम आखल्यानंतर अरब क्रांती, अमेरिकेची त्यात झालेली अडचण, पाकिस्तानचं धोरण, आर्थिक कारण असे अनेक अडथळे त्यात आले. युरोपिअन देशांनी deradicalization हा त्यावरचा एक उपाय शोधला. पण ISIS च्या उगमाने तो ही अयशस्वीच ठरला.

राही's picture

19 Dec 2014 - 1:34 pm | राही

प्रतिसाद आवडला

अत्रन्गि पाउस's picture

19 Dec 2014 - 1:20 pm | अत्रन्गि पाउस

अतिशय सखोल विवेचन....म्हणजे इतके ..कि मग आपले काय होणार आपल्या पुढच्या पिढ्यांचे काय होणार ह्या विचाराने अस्वस्थ व्हयला होते..
त्यामुळे सर्व्ह्याव्ल ऑफ द फिटेस्ट ह्या न्यायाने प्रस्थापित नैतिकतेचे निकषच बाजूला पडतील कि काय आणि मग अश्मयुग नाही तरी ...जंगलराज हेच शेवटी टिकेल कि काय असे वाटते ...
.....फिलिंग लैच होपलेस ...

राही's picture

19 Dec 2014 - 1:45 pm | राही

समतोल आणि माहितीपूर्ण लेख आवडला. आपल्याकडे अतिरेक्यांच्या बीमोडावचा मुद्दा निघाला की अतिरेक्यांपेक्षा अतिरेकी भाषा वापरली जाते. 'यांना ठेचून काढले पाहिजे, पाकिस्तानला बेचिराग केले पाहिजे' वगैरे. अगदी उचलली जीभ, लावली टाळ्याला. या सर्वातले धोके, अडचणी, शक्याशक्यता, व्यवहार्यता यांचा कोणीच विचार करीत नाही.
एखादी विचारधारा काही काळ म्हणजे एखादे शतक पूर्ण व्यापून टाकते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून कडव्या इस्लामची विचारधारा जगभर अशीच प्रभावी राहिली आहे. अदाचित अरेबियामधली सत्ता बदलेल, तिथे समाजसुधारणा होईल, कदाचित धर्मसुधारणा होतील, या आशेवर एकविसाव्या शतकाची वाटचाल चालू आहे. इथे शॉर्टकट अजिबात नाहीत. आणखी एकदोन पिढ्या वाट पहावी लागेल असे दिसते.

श्रीगुरुजी's picture

19 Dec 2014 - 2:21 pm | श्रीगुरुजी

>>> तरीही अशी कृती केली जात नाही. ते का?

मी या लेखावर पूर्वीच खरडवहीतून प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यामुळे परत लिहीत नाही.

परंतु, थोडक्यात सांगायचं तर दहशतवाद संपविण्यासाठी सर्व देशांनी (निदान प्रमुख २५-३० देशांनी तरी) एकत्र येऊन लष्करी कारवाई करणे हाच एकमेव उपाय शिल्लक राहतो. तुमच्या वरील सविस्तर व सखोल विवेचनानुसार हा उपाय अंमलात आणणे अत्यंत अवघड असले तरी हाच एकमेव उपाय असू शकतो. दुसर्‍या कोणत्याही मार्गाने दहशतवाद नष्ट होऊ शकणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2014 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या वरील सविस्तर व सखोल विवेचनानुसार हा उपाय अंमलात आणणे अत्यंत अवघड असले तरी हाच एकमेव उपाय असू शकतो. दुसर्‍या कोणत्याही मार्गाने दहशतवाद नष्ट होऊ शकणार नाही. जेव्हा एखादी गोष्ट समोरासमोर (हेड ऑन) हल्ला करून ("एक घाव दोन तुकडे" अशी) नष्ट करणे शक्य नसते अथवा तसे करण्याची किंमत अवास्तवी जास्त असते; तेव्हा "कंटेनमेंट डॉक्ट्रीन" म्हणजे "त्या गोष्टीचा प्रभाव शक्य तेवढा ताब्यात ठेवत वेळकाढू धोरण स्विकारणे" हे वास्तविकतेला जास्त धरून असते. याचा अर्थ तिकडे दुर्लक्ष करणे असा नाही; याउलट सतत बारीक निरिक्षण चालू ठेवून जरूर तेव्हा व जरूर तेवढाच हस्तक्षेप करणे असा आहे. या डॉक्ट्रीनची परिणती दोनपैकी एकाने होणे अपेक्षित असते:

१. ताब्यात ठेवलेल्या अनेक गोष्टींचा प्रभाव वेळेबरोबर कमी होऊन त्या नष्ट पावतात अथवा अतिशय कमकुवत होतात.

२. सतत लक्ष ठेवून असल्याने योग्य मोक्याचा फायदा घेऊन मर्माघाती वार करून ती गोष्ट नष्ट अथवा अतिशय कमकुवत करता येते.

सरळ सरळ उत्तर देण्याच्या कृतीला खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर (बेनेफिट्/कॉस्ट रेशो) असल्यास "कंटेनमेंट डॉक्ट्रीन" वापरून केलेल्या कृती जास्त फायदेशीर असतात.

भारताशी सरळ सरळ युद्ध ही खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर असलेली कृती असल्यामुळेच पाकिस्तान अतिरेकी कारवायांचे छुपे युद्ध खेळण्याची कारवाई करीत आहे आणि उघडपणे "त्यांत आमचा काही हात नाही" अशी भूमिका घेत आहे. पाकिस्तानच्या कारवायांना गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे पाकिस्तानसाठी फायदा/व्यय गुणोत्तर अधिकाधिक गैरसोईचे होऊ लागले आहे. पाकिस्तानातील अंतर्गत अतिरेकी घटनांमुळे ते पारडे सद्यस्थितीत तरी काहीसे भारताच्या बाजूनेच झुकण्यासाठी मदत झाली आहे.

नाखु's picture

19 Dec 2014 - 3:35 pm | नाखु

महोदयांनी एका धाग्यावर मागीतलेल्या म्हणींची प्रकर्षाने आठवण झाली.
१.ज्याचे जळते त्यालाच कळते
२.पाळलेला नाग तुम्हाला डसणारच नाही असे नाही
३.कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे (पाकडे)

मूळ अवांतर :धागा विषय विस्तार विचारप्रवर्तक आणि माहीतीपूर्ण आहे पण प्रतिसादात एकदाही "एखादी योजना" विनाविलंब अमलात आणावी असे कोणीही म्हटले नाही *SCRATCH*
विलंबीत न्याय म्हणजे अन्याय असे कुठेसे वाचलेले आठ्वते.

माहितगार's picture

19 Dec 2014 - 7:26 pm | माहितगार

आतापर्यंत आपण केवळ उघड दिसणारी शोरूम बघितली आहे...

धागा लेखातील काही मुद्दे कळाले, पण बर्‍याच शंका शिल्लक राहील्या असे वाटते. संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वात बलाढ्य असलेला नाटो गट जेथे प्रचंड पैसा आणि सैन्यबळ वापरून परिस्थिती सुधारणा करण्यात यशस्वी झाला नाही तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने संयुक्त कार्यवाही कितपत यशस्वी ठरेल हा एक प्रश्न झाला. माझ्या अल्प माहितीनुसार संयुक्त राष्ट्रसंघाच कार्य शांतता प्रस्थापनेच आहे युद्धाचं नव्हे. जिथे स्थानिक समाजाची इच्छाशक्ती नाही सुंदोपसुंदी आहे तेथे बहुदेशीय सेनांच्या बाबतीतील यापुर्वीचे अनुभव कितपत यशस्वी झाले आहेत हे कदाचित तपासून पहाणे रोचक ठरू शकेल. इथे महत्वाचा प्रश्न वेगळाच उपस्थित होतो भारताची आता पर्यंतची अधिकृत भूमीका, स्थानिक सत्तांनी आपापसातील प्रश्न आपापसात सोडवले पाहिजेत, स्थानिक प्रश्नांचे भान आणि जाण नसताना महासत्तांनी असो वा संयूक्तराष्ट्रांनी असो उंटावरून शेळ्या हाकण्याचे हस्तक्षेप करण्याचे टाळावे अशी राहिलेली आहे. पण गेल्या काही वर्षात भारतीयांची मनोभूमीका या विषयावर बदलत आहे का ? काश्मिर प्रश्नात आपण बाहेरच्या देशांची अथवा संयुक्तराष्ट्रांची भूमीका स्विकारणार आहोत का ?

अतिरेकी जेव्हा सिव्हिलीयन्स मध्ये मिसळलेले असतात आणि स्थानिक समाज मदत करतो अथवा दहशतीने मौनबाळगतो अशा ठिकाणी कोणत्याही सैनिकी कार्यवाहीत काहीना काही सिव्हिलीयन्स कॅज्युअल्टी अटळपणे होतात अशा कॅज्युअल्टी झाल्या की समाजाचे सहानुभूती अतिरेक्यांच्याच बाजूने वळण्याची शक्यता असते. सैन्यदले पोलीसदलांना आत्मविश्वास देऊ शकतात पोलीसदलांची जागा घेऊ शकत नाहीत हे बर्‍याचदा अनुभवले जाते. उलटपक्षी अतिरेक्यां घटनांविरुद्ध ट्रासंपरंट कार्यवाही, पोलीसदलांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि अगदी अशांत परिस्थितीतही संबंधीत राज्यात लोकशाही निवडणूका घेत राहण्याच्या भारतीय स्ट्रॅटेजीला फळे उशीरा लागत असतील पण चांगली फळे आल्याचे अनुभव आहेत ते या मिपाचर्चां प्रतिसादामधून दुर्लक्षीले तर जात नाहीएत अशी शंका वाटते.

बादवे वरील धागा आणि प्रतिसाद लक्षात घेता हे आणि हे वृत्त चर्चेत सहभागी होत असलेल्यांना रोचक वाटू शकेल असे वाटते.

रोचक लेख व चर्चा.

वाचतोय.

बोका-ए-आझम's picture

19 Dec 2014 - 9:52 pm | बोका-ए-आझम

कुठलाही अतिरेकी गट किंवा संघटना यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात -
१. नवनवीन उमेदवार सहज भरती करता येतील असा स्त्रोत
२. हे लोक क्रूरतेच्या कुठल्याही थराला जाऊ शकतात असा लोकांमध्ये विश्वास किंवा भीती.
३. पैसे.

आत्ता सध्यातरी तालिबान (अफगाणी आणि पाकिस्तानी) कडे या तीनही गोष्टी आहेत. यांच्यातल्या क्रमांक १ आणि ३ च्या गोष्टींवर नियंत्रण मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यापूर्वी लिबरेशन टायगर्स आॅफ तामिळ इलम (LTTE) आणि IRA (Irish Republican Army) या दोन दहशतवादी संघटनांचा असाच दरारा होता. पण आता त्यांचा प्रभाव ओसरला आहे. तालिबानची आर्थिक उलाढाल ही मुख्यतः अफू आणि त्यापासून बनणा-या इतर अंमली पदार्थांच्या व्यापारातून चालते. शिवाय ते इतर दहशतवादी गटांना शस्त्रं आणि प्रशिक्षणही पुरवतात. दुर्दैवाने जो समन्वय या दहशतवादी संघटनांमध्ये आहे तो जगभरच्या पोलिसांमध्ये नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Dec 2014 - 10:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोलॅटरलची काळजी नं करता ह्या भि.चो. अतिरेकी राष्ट्रांवर २-४ अणुबाँब टाकुन द्यायला हवेत. तसही त्यांच्याविरुद्ध थेट कारवाई नं करतासुद्ध हे दुसर्‍या देशात अतिरेकी कारवाया करतचं आहेत की. सामान्य नागरीक मरतील वगैरे प्रश्ण कशाला हवेत? आमचे सामान्य नागरीक मरतात तेव्हा कोणं काळजी करतं का? तसही त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देणारे सो कॉल्ड सामान्य नागरिकचं आहेत बहुतांश प्रमाणात. ते अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश चं नामोनिशाण मिटलं ना जगाच्या नकाशावरुन तर सर्व जगाच्या डोकेदुखी कमी होतील.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

19 Dec 2014 - 10:39 pm | फुलथ्रॉटल जिनियस

तुमाला गुडघेदुखी सुरु झाली तर आख्खा पाय काढणारा डॉक्टर चालेल काय? तसेचय ते ,कोलॅटरल डॅमेज नकोच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Dec 2014 - 1:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठलातरी बादरायण संबध जोडु नका. आणि गुढगेदुखी जर काही कारणानी जीवावर बेतणारी असेल तर डॉक्टर तोच सल्ला देईल बहुदा. सो असल्या दहशतवादरुपी कॅन्सरचा नायनाट करण्यासाठी अणुथेरपी हवीचं. मग ते *^&@^#& पाकिस्तानी आणि तालिबानी मेले तर मरु देत की त्यांच्याबद्दल तुम्हाला येवढा कळवळा का?

यसवायजी's picture

19 Dec 2014 - 11:11 pm | यसवायजी

तसही त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देणारे सो कॉल्ड सामान्य नागरिकचं आहेत बहुतांश प्रमाणात.
परवाच प्रकाश आमटेंवरचा चित्रपट पाहिला. नक्षलवाद्यांच्या बाबतीत पण अगदी असंच चाल्लंय. सामान्य नागरिकाच्या कानाजवळ एके-४७ धरल्यावर त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देण्यावाचून पर्याय काय राहतो बॉस्स?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Dec 2014 - 1:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ऩक्षलवाद्यांना कानापाशी एके४७ धरावी लागते तेव्हा आश्रय मिळतं असेल.....पाकिस्तान काय आणि तालिबानच्या प्रभावक्षेत्राखालील "सामान्य" शांतीवादी नागरिक काय, हिंदु/काफिर/ भारत विरोधी बोललं की लगेचं आश्रय मिळत असेल. ड्रोन कारवायांमधे "सामान्य" नागरिक मरायचं हेचं तर कारणं आहे. कारण आंतरराष्ट्रिय युद्धनियमावली प्रमाणे कुठल्याही देशाच्या सैन्याला रहिवासी विभागांवर थेट हल्ला करता येत नाही. ह्या नियमाचा फायदा घेऊन दबावानी म्हणा किंवा सहानभुतीनी म्हणा रहिवासी विभागात दहशतवाद्यांचे अड्डे तयार होतात.
तालिबान/ अल कायदा प्रणित दहशतवाद कॅन्सर सारखा आहे. मुळासकट नष्ट केल्याशिवाय जगात शांतता नांदु शकणार नाही. तस्मात, २-४ अणुबाँब टाकुन दयावे ह्या उपायापर्यंत कारवाई केली पाहिजे किंवा कमीत कमी त्याची भिती दाखवुन दहशतवाद्यांना गप बसवलं पाहिजे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2014 - 4:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

तस्मात, २-४ अणुबाँब टाकुन दयावे ह्या उपायापर्यंत कारवाई केली पाहिजे किंवा कमीत कमी त्याची भिती दाखवुन दहशतवाद्यांना गप बसवलं पाहिजे. :)

अणुबाँबचे परिणाम स्थानिक न राहता ते किती प्रमाणात जागतिक धोका निर्माण करू शकतात हे चेर्नोबिल अपघाताच्या अनुभवावरून लक्षात यावे. विशेषतः भारत या कारवाईतल्या महत्वाच्या भूभागाच्या अतिजवळ आहे हे लक्षात घेता अश्या कारवाईचे फायदा/व्यय गुणोत्तर भारताच्या दृष्टीने अत्यंत घाटयाचे आहे.

अणुबाँबचे परिणाम स्थानिक न राहता ते किती प्रमाणात जागतिक धोका निर्माण करू शकतात हे चेर्नोबिल अपघाताच्या अनुभवावरून लक्षात यावे. विशेषतः भारत या कारवाईतल्या महत्वाच्या भूभागाच्या अतिजवळ आहे हे लक्षात घेता अश्या कारवाईचे फायदा/व्यय गुणोत्तर भारताच्या दृष्टीने अत्यंत घाटयाचे आहे.
अहो एक्का काका आपल्या देशातले लोक काटक आहेत ! ते काहीही पचवु शकतात...
Bitter butter

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

काळा पहाड's picture

22 Dec 2014 - 5:13 pm | काळा पहाड

टॅक्टिकल न्युक्लीयर वेपन्स (उदा: सब किलोटन रेंज ची वेपन्स: http://en.wikipedia.org/wiki/Tactical_nuclear_weapon) हा प्रॉब्लेम सोडवू शकतात. त्यांचं यील्ड आणि परिणाम कमी असतो. पण एकदा न्युक्लीयर वेपन टाकलं की त्याचा मानसिक आणि आंतरराष्ट्रीय परिणाम खूप जास्त आहे. एक खून केला काय किंवा दहा खून केले काय, ते खूनच. म्हणून टॅक्टीकल न्युक्लीयर वेपन्सचा उपयोग फारसा नाही. न्यूक्लीयर वेपन्सचा उपयोग शत्रूची राखरांगोळी करण्यासाठीच होतो आणि त्यासाठी स्ट्रॅटेजीक न्युक्लीयर वेपन्स (http://en.wikipedia.org/wiki/Strategic_nuclear_weapon) हीच परिणामकारक आहेत आणि त्यांचा उपयोग हा दुर्मिळातील दुर्मिळ वेळी करायची गोष्ट आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Dec 2014 - 5:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही म्हणताय त्याच्यात तत्थ्य आहे. पण एक विचार करा. पाकिस्तानमधली स्थिती दिवसेंदिवस अस्थिर होतीये. त्यांचं लष्कर आणि आय.एस.आय. उघडपणे दहशतवादाला पाठिंबा देतायत. जर का एखादा अतिरेकी मुशर्र्फ प्रमाणे लष्करी हुकुमशहा बनला तर अण्वस्त्रांचा वापर कुठे पहिला होईल हे सांगायला तज्ञाची गरज नाही. भारत, इस्त्राईल आणि अमेरिका ही मह्त्तवाची टारगेट्स्स ठरतील. अमेरिकेच्या सुदैवानी पाकिस्तानकडे आय.सी.बी.एम्स आजमितीला नाहीत पण चीन त्यांना ही टेक्नॉलॉजी देउ शकतो. आपण मात्र अगदी शेजारी असल्यानी घौरी वगैरे क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात बहुतेक सगळी महत्त्वाची शहरे आहेत. अश्या परिस्थितीमधे "फास्टेस्ट फिंगर ऑन ट्रिगर विन्स" अशीच परिस्थिती असेल. आता फक्त प्रश्ण एवढाच आहे की रोग झाल्यानंतर औषध द्यायचं का रोगप्रतिकारक लस टोचायची.

काहीही झाले तरी त्याला भारतच जबाबदार अशी पाकीस्तानी जनतेची मानसिकता बनलेली दिसतेय. आपण त्यांच्यासाठी मेणबत्ती मोर्चे आणि मौन वगैरे पाळतोय आणी चेपू आणि ट्वीटरवर मात्र पाकड्यांची अत्यंत हीन पातळीवर शेरेबाजी चालू आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Dec 2014 - 1:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. आणि आमचं ** मिडीया त्यांच्या नावानी गळे काढतयं. आणि मेणबत्त्या लावुन फिरतयं.

पाकिस्तान हा जागतिक सुरक्षेला झालेला मोठा धोका आहे... त्यापेक्षाही आपल्या टाळक्याला तो अधिक ताप देणारा ठरला आहे आणि त्यात भर पडेल हे निश्चित !
बाकी Cold Start (military doctrine) बद्धल काही अधिक माहिती / बातम्या असतील तर वाचायला आवडेल...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

माहितगार's picture

22 Dec 2014 - 1:23 pm | माहितगार

काही अधिक माहिती / बातम्या असतील तर वाचायला आवडेल...

आपण दिलेला इंग्रजी विकिपीडिया दुवा वाचला. भारताची जी काही सामरीक व्यूहरचना असेल ती गोपनीय असावयास नको का ? मनमोहनसिंग काळात आमेरीकेच्या गुप्तचर यंत्रणांनी भारताची माहिती नेली असावी त्यांच्या पर्यंत पोहोचू नये पोहोचलीच तर ती पाकीस्तान पर्यंत पोहोचू नये आणि समजा तसेही झाले तर मिडीयात एवढ्या उघडपणे चर्चीत होऊ नये. आमेरीकेच्या गुप्तचर यंत्रणांना गोपनीय कारवाया मित्रराष्ट्रातही करणे जमते पण अशा कारवाया आणि त्यातून येणारी माहिती गोपनीय राखणे जमत नाही असे दिसते. किमान एवढ्यासाठी तरी भारतीयांनी सामरीक व्यूहरचने बाबत अधिक गोपनीयता पाळावयास हवी. अर्थात जे आधीच आंतरजालावर चर्चेत आहे त्या बद्दल चर्चा करणे ठिक आहे. पण नवी गोपनीय माहिती उघड होणे ठिक नाही.

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 1:31 pm | मदनबाण

.भारताची जी काही सामरीक व्यूहरचना असेल ती गोपनीय असावयास नको का ?
अगदी योग्य प्रश्न विचारलात ! ती गोपनियच असायला हवी मग कोल्डस्टार्ट बाहेर कसं आल ? लष्कराच्या कुठल्याही महत्वाच्या गोष्टी बाहेत उघडकीस येणे धोकादायकच, पण आपला दुबळेपणा वारंवार उघडा पडुनही आहे त्या परिस्थीतीत बदल होताना दिसत नाही. एकदाच काही तरी परिणामकारक "सर्जरी" करा की रोग समूळ नष्ट करणे जरी लगेच शक्य नसेल तरी त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

माहितगार's picture

22 Dec 2014 - 1:53 pm | माहितगार

एकदाच काही तरी परिणामकारक "सर्जरी" करा की रोग समूळ नष्ट करणे जरी लगेच शक्य नसेल तरी त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाईल

आता मोदी आणि पर्रीकर आहेत ना, सोबतीस राजनाथ सिंग आणि सुषमाबाईंची टिम आहे ते योग्य काय ते ठरवतील.

अर्थात मिपावर बर्‍याच जणांचे मत काही तरी आश्चर्यचकीत करणारे लष्करी काम करून पाकीस्तानला धूळ चाटावी असे असावे असे दिसते. एनी वे तुम्ही (म्हणजे अशी मते असलेले मिपाकर) स्वतहा सुरक्षा सल्लागार असते तर नेमकी काय निती त्यांना सुचवली असती आणि वास्तवाचे भान ठेऊन फूलप्रूफ कशी केली असती हे भारताच्या खर्‍या संरक्षण निती पेक्षा अधिक समजून घेण्यास आवडेल.

मिपावर बर्‍याच जणांचे मत काही तरी आश्चर्यचकीत करणारे लष्करी काम करून पाकीस्तानला धूळ चाटावी असे असावे असे दिसते.
युद्ध कोणाला हवे असते ? जे अघोषीत युद्ध आपण लढत आहोत, ते अजुन किती वर्ष लढायचे ? किती जवान आणि सिव्हीलियन्सा बळी यात देण्याचे ठरवले आहे ?

एनी वे तुम्ही (म्हणजे अशी मते असलेले मिपाकर) स्वतहा सुरक्षा सल्लागार असते तर नेमकी काय निती त्यांना सुचवली असती आणि वास्तवाचे भान ठेऊन फूलप्रूफ कशी केली असती हे भारताच्या खर्‍या संरक्षण निती पेक्षा अधिक समजून घेण्यास आवडेल.
कारगिल युद्ध आणि संददेवरील हल्ला या दोन्ही घटनांचा { त्या-त्या वेळी} आधार घेत आपण लष्करी कारवाई करण्याची वेळ घालवुन बसलो आहोत असे माझे स्पष्ट मत आहे.
सर्व प्रथम लष्करातील सर्व प्रमुखांना तुम्हाला पाकित्सानची गचांडी आवळायला किती वेळ लागेल ? हा प्रश्न विचारला असता, त्यासाठी ऑपरेशला लागणारा खर्च / दारुगोळा / ड्रील / आणि संपूर्ण कारवाई करण्यासाठी लागणारा वेळ विचारला असता. हे सर्व होउ पर्यंत वेळ घ्या पण रिझल्ट द्या असे निक्षुन सांगितले असते.
लष्करातली युद्धाचा अनुभव असलेली, सध्या कार्यरत असलेली आणि रिटायर्ड झालेली मंडळी. तसेच डिफेन्स एक्स्पर्ट यांची एक टीम बनवली असती. मुखत्वे पायदळाचे निर्णय या मंडळीनीच घ्यावेत... नेव्ही आणि वायु सेना यांची टीम या एकाच वेळी कोऑरडिनेट होवुन नेव्हीला कराची आणि ग्वादार बंदर उध्वस्त करायला सांगुन पाकिस्तानला समुद्र मार्गाने येणारी तेल आणि इतर आवश्यक रसद बंद पाडली असती.
वायु सेनेला पाकिस्तानले महत्वाचे मिलेटरी एअर बेस तसेच धरणे आणि महत्वाचे पूल उडवुन टाकण्याचे आदेश दिले असते.
पाकिस्तान कडुन पहिल्या आण्विक हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेउन त्यांच्या स्टॉकपील आणि अणूभट्या उडवुन देण्याचा आणि धरणे उडवण्याचा सल्ला सुद्धा दिला असता... एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावुन परत या... जगाच्या नकाशातुन पाकिस्तान हे नाव पुसले गेले तरी हरकत नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Dec 2014 - 3:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

+५०००००

क्लिंटन's picture

22 Dec 2014 - 3:40 pm | क्लिंटन

आपण हे सगळे करेपर्यंत पाकिस्तान हातावर हात ठेऊन स्वस्थ बसणार आहे असे तुम्हाला वाटते का? डिसेंबर २००१ मध्ये संसदभवनावर हल्ला झाला आणि त्यानंतर युध्दाचे ढग जमू लागले.तात्पुरते ते विरले पण मे २००२ मध्ये कालूचक येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परत एकदा युध्द होणार अशी चिन्हे दिसू लागली.त्यावेळी इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री जॅक स्ट्रॉ आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल पहिल्यांदा पाकिस्तान आणि नंतर भारत भेटीवर आले होते.दोघांनाही मुशर्रफने असे स्पष्ट संकेत दिले की भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान मागेपुढे न पाहता भारतावर अणूबॉम्ब टाकेल.दोघांनाही मुशर्रफने काय सांगितले हे दिल्लीमध्ये येऊन वाजपेयी-जसवंत सिंगांच्या कानावर घातलेच.त्यानंतर वाजपेयींसारख्या नेत्यानेही पाकिस्तानवर हल्ला करायचे टाळले यातच सगळे काही आले.

पाकिस्तानातून भारतावर दहशतवादी हल्ले होतात, त्यात अनेक निरपराध भारतीयांचा बळी जातो ही सत्य परिस्थिती आहेच.दरवर्षी काश्मीरात आणि देशात इतर ठिकाणी मिळून २००० बळी जातात असे समजले तरी २००० लोकांना वाचवायला म्हणून नी-जर्क रिअ‍ॅक्शन म्हणून पाकिस्तानवर हल्ला करायचा आणि त्यातून अणुयुध्द झाल्यास २ कोटी लोकांचा बळी घालवायचा का?

आपल्याकडे अणुबॉम्ब आहे पण आपणच "नो फर्स्ट युज" चे लोढणे आपल्याच पायात अडकवले आहे.ते लोढणे पाकिस्तानच्या पायात नाही.वास्तविकपणे पाकिस्तानसारख्या शेजार्‍याचा अगदी पूर्ण विध्वंस होऊन पाकिस्तान हे नामोनिशाण नष्ट होईल आणि त्याचा आपल्याला त्रास कमीतकमी होईल इतक्या क्षमतेचे लागतील तितके अणुबॉम्ब पाकिस्तानवर टाकावेत असे मलाही वाटते.पण आपणच आपल्या पायात ते नो फर्स्ट युजचे लोढणे अडकवले आहे त्यामुळे आपण तसे करू शकू का? आणि असा हल्ला पाकिस्तानवर केल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्की काय प्रतिक्रिया होईल (कदाचित चीनचा भारतावर हल्ला, गल्फमधून आयात होणारे तेल बंद होणे इत्यादी इत्यादी अनेक) हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे.त्या सगळ्या परिणामांना तोंड देऊ इतपत आपली तयारी आहे का? नाहीतर घाईघाईने काहीतरी करून बसले आणि नंतर पश्चात्तापाची वेळ आली असे झाल्यास काय?

मला वाटते असले काहीही होणे केवळ अशक्य आहे.काश्मीरात सार्वमत घ्यावे ही मागणी करणारे लोक मोठी पदे भूषवत असलेल्या पक्षाला लोक मते देतात, पूर्ण भारतीय कायद्याला अनुसरून पध्दतीने अफझलला फाशी दिल्यानंतरही त्याविरूध्द आरडाओरडा करणार्‍या मानवाधिकारवाल्यांच्या तोंडावर आपण थुंकत नाही, पकडलेल्या दहशतवाद्यांना आपण वर्षानुवर्षे जिवंत सोडतो आणि मग त्यांना सोडा ही मागणी करायला विमान अपहरण होते तरीही त्यांना आपण ताबडतोब फासावर लटकवत नाही अशी परिस्थिती असताना पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकणे वगैरे खूपच दुरच्या गोष्टी आहेत.

क्लिंटनराव... अहो अणू युद्ध करायची उर्मी हिंदूस्थानला नाही, पण पाकिस्तान त्याचा वापर पहिल्यांदी करेल याची खात्री आहे ना ?

मे २००२ मध्ये कालूचक येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परत एकदा युध्द होणार अशी चिन्हे दिसू लागली.त्यावेळी इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री जॅक स्ट्रॉ आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल पहिल्यांदा पाकिस्तान आणि नंतर भारत भेटीवर आले होते.दोघांनाही मुशर्रफने असे स्पष्ट संकेत दिले की भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान मागेपुढे न पाहता भारतावर अणूबॉम्ब टाकेल.दोघांनाही मुशर्रफने काय सांगितले हे दिल्लीमध्ये येऊन वाजपेयी-जसवंत सिंगांच्या कानावर घातलेच.त्यानंतर वाजपेयींसारख्या नेत्यानेही पाकिस्तानवर हल्ला करायचे टाळले यातच सगळे काही आले.

आपल्याकडे अणवस्त्र असताना आपण अश्या दबावाला का बळी पडतो ? आपण जे नो फोस्ट युज चे लोढणे अडकवुन घेतले त्याचाच परिणाम आहे ना हा ? जी काही पॄथ्वी,अग्नी आणि इतर मिसाइल्स डेव्हलप केली गेली आहेत ती फक्त टेस्टींग साठीच का ?

पाकिस्तानातून भारतावर दहशतवादी हल्ले होतात, त्यात अनेक निरपराध भारतीयांचा बळी जातो ही सत्य परिस्थिती आहेच.दरवर्षी काश्मीरात आणि देशात इतर ठिकाणी मिळून २००० बळी जातात असे समजले तरी २००० लोकांना वाचवायला म्हणून नी-जर्क रिअ‍ॅक्शन म्हणून पाकिस्तानवर हल्ला करायचा आणि त्यातून अणुयुध्द झाल्यास २ कोटी लोकांचा बळी घालवायचा का?
आपल्याशी युद्ध करण्याची खाज पाकड्यांना आहे की नाही ? आत्ता पर्यंत त्यांनीच आपल्याशी युद्ध केले आहे की नाही ?
या दोन्ही प्रश्नांची उत्तर जर हो असतील तर त्यांची ही खुमखुमी युद्ध करुन काढली तर त्यात काय चूक ? २ कोटींचा बळी देण्याची आमची इच्छा कुठे आहे, पण मस्ती त्यांनाच आहे ना ? { आजच्या घडीला सुद्धा तालिबान सारख्या अतिरेकी संघटने पेक्षा त्यांना हिदूस्थान हाच शत्रु क्रमांक १ वाटतो ना ?} मग त्यांचा बळी लष्करी कारवाईत बळी जाणारच ! तसेही अमेरिका जर इराक / अफागाणिस्तान सारखी राष्ट्र त्यांच्या नागरिकां सकट बेचिराख करु शकते तर पाकिस्तान तर आपल्याला वारंवार आघात करतो आहे तर त्याचा निप्पात केला तर काय बिघडले ? बरं उध्या अश्या काही युद्धाला सुरुवात झाली आणि पाकिस्तानने मुंबईवर आण्विक हल्ला केला तर आपण त्यातुन सावरुन पाकिस्तान /चीन ला तोंड देण्यास सक्षम राहु ?

मला वाटते असले काहीही होणे केवळ अशक्य आहे.काश्मीरात सार्वमत घ्यावे ही मागणी करणारे लोक मोठी पदे भूषवत असलेल्या पक्षाला लोक मते देतात, पूर्ण भारतीय कायद्याला अनुसरून पध्दतीने अफझलला फाशी दिल्यानंतरही त्याविरूध्द आरडाओरडा करणार्‍या मानवाधिकारवाल्यांच्या तोंडावर आपण थुंकत नाही, पकडलेल्या दहशतवाद्यांना आपण वर्षानुवर्षे जिवंत सोडतो आणि मग त्यांना सोडा ही मागणी करायला विमान अपहरण होते तरीही त्यांना आपण ताबडतोब फासावर लटकवत नाही अशी परिस्थिती असताना पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकणे वगैरे खूपच दुरच्या गोष्टी आहेत.
पूर्णपणे सहमत... परंतु मिपाकर म्हणुन "मी" काय निर्णय घेइन त्यावर मी माझे मत प्रदर्शन केले आहे.आजच्या काळातल्या युद्धात तोच विजयी होइल जो पहिल्यांदाच घाणाघाती हल्ला करुन शत्रु राष्ट्राचे कंबरडे मोडेल...आपण ही संधी पाकिस्तानला देउ नये एव्हढच !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

माहितगार's picture

22 Dec 2014 - 5:08 pm | माहितगार

आपण म्हणता तसे फिजीबल व्हावयाचे असेल तर पाकीस्तानला जवळपास हतबल केल्या शिवाय अणूयुद्धाचा धोका टळणार नाही. पहिला हवाई हल्ला केला तरीही दोन्ही साईडचा हवाई आणि आण्विक रिस्पॉन्स टाईममध्ये ८ १० मिनीटांपेक्षा अधीक फरक पडेल असे मला वाटत नाही. पाकीस्तानची पूर्ण एअरस्पेस आणि मिसाईल स्पेस एकाच घटकेत ऑकुपाय करणे आणि शस्त्र उपयोगापासून अशक्य करणे एवढी क्षमता भारतापाशी आहे असे वाटते का ? त्यांचे एकही मिसाईल भारतीय भूमी पर्यंत पोहोचणार नाही हवेतल्या हवेत भारतात येण्या आधीच उडवली जावयास हवी. आणि त्या वेळी आमेरीका अथवा चीनलाही हस्तक्षेप करता यावयास नको. या साठी भारत किती सक्षम आहे असे वाटते ? ( मला तौलनीक सामरीक आकडेवारीची कल्पना नाही.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2014 - 5:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यांचे एकही मिसाईल भारतीय भूमी पर्यंत पोहोचणार नाही हवेतल्या हवेत भारतात येण्या आधीच उडवली जावयास हवी. असे विधान करण्याअगोदर उघड्या अणुस्फोटामुळे होणारा घातक किरणोत्सर्ग किती दूरवर पोहोचतो याची माहिती असणे आवश्यक आहे. ही माहिती चेर्नोबिलच्या घटनेवरून येउ शकेल.

क्लिंटन's picture

22 Dec 2014 - 5:23 pm | क्लिंटन

उघड्या अणुस्फोटामुळे होणारा घातक किरणोत्सर्ग किती दूरवर पोहोचतो याची माहिती असणे आवश्यक आहे.

हो बरोबर आहे. पण पाकिस्तानने आपल्यावर अणुबॉम्ब टाकून त्यातून प्रायमरी नुकसान होण्यापेक्षा आपण पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून किरणोत्सर्गामुळे झालेले सेकंडरी नुकसान झालेले परवडले. दगडापेक्षा वीट मऊ की काहीतरी म्हणतात ना त्याप्रमाणे.

काळा पहाड's picture

22 Dec 2014 - 5:37 pm | काळा पहाड

अजिबात चूक. पाकिस्तान वर अणुबॉम्ब चा हल्ला हा भारताच्या विकासात्मक हितांना बाधा पोचवेल आणि भारताला एकही व्यापारिक पार्टनर रहाणार नाही. भारतावर त्वरित आर्थिक निर्बंध लादले जातील. भारताशी असलेले संबंध सगळे देश खटकन तोडून टाकतील. देश आर्थिक पारतंत्र्यात लोटला जाईल. जसा इराण किंवा उत्तर कोरिया आहे तसा. त्यात आपल्याकडे तेल किंवा चीन सारखा मित्र देखील नाहिये.

पाकिस्तानचा प्रश्न हा अतिशय नाजूक पणे सोडवायला हवा. पाकिस्तान बरोबर मैत्रीचं नाटक करत त्याला आर्थिक दृष्टया खिळखिळा करायला हवा. शॉर्ट टर्म गोल म्हणून पाकिस्तान मधली अस्थिरता कशी वाढेल, पाकिस्तान ची आंतरराष्ट्रीय पत कशी कमी होईल इत्यादी गोष्टी कराव्यात. लाँग टर्म गोल म्हणून पाकिस्तान चे चार (किंवा जास्त) तुकडे उदा: पंजाब, बलुचिस्तान, सिंध, एन.डब्ल्यू.एफ.पी. कसे करता येतील हे पहावं.

बाकी पाकिस्तानातल्या अणूबॉम्ब वर अमेरिकेचं लक्ष आहेच. जर ते अतिरेक्यांच्या हाती लागायची वेळ आली तर अमेरिका त्याना कुचकामी करायची मोहीम राबवू शकते.

क्लिंटन's picture

22 Dec 2014 - 5:49 pm | क्लिंटन

अर्थातच जर अशा प्रकारच्या हल्ल्याचा फॉल-आऊट आपण सांभाळू शकू ही १००% खात्री नसेल तर असा हल्ला आत्मघातकी ठरेल हे वरील प्रतिसादातच म्हटले आहे.तरीही अणुयुध्दापर्यंत गोष्ट गेली तर ते आपल्यावर अणुबॉम्ब टाकणार आणि मग आपण प्रत्युत्तर द्यायचे या प्रकारात आपले प्रचंड प्रमाणावर प्रायमरी नुकसान होईल.तसा अणुबॉम्ब टाकायची संधीच शत्रूला द्यायची नाही आणि त्याआधीच कंबरडे मोडायचे असे करायचे असल्यास त्यातूनही आपल्यावर किरणोत्सर्गाचे परिणाम होतीलच.पण त्यातून होणारे सेकंडरी नुकसान प्रायमरी नुकसानापेक्षा कमी असेल एवढाच सांगायचा हेतू आहे.

लाँग टर्म गोल म्हणून पाकिस्तान चे चार (किंवा जास्त) तुकडे उदा: पंजाब, बलुचिस्तान, सिंध, एन.डब्ल्यू.एफ.पी. कसे करता येतील हे पहावं.

छे हो त्यातून आपली डोकेदुखी चौपट वाढेल.जगातील दोन-तृतीयांश देशांच्या विरोधाला न जुमानता आपण बांगलादेश वेगळा केला.सध्या तिथे शेख हसीना सत्तेत आहेत म्हणून ठिक.अन्यथा तिथेही भारतविरोधी प्रवृत्तीच डोके वर काढतात हे अनेकवेळा आपण बघितले आहे. पॅलेस्टाईनच्या लढ्याला आपण इतकी वर्षे पाठिंबा दिला.तरीही १९९८ मध्ये पाकिस्तानने अणुचाचण्या केल्यानंतर एका मुस्लिम देशाकडे अणुबॉम्ब आला याचा अराफात यांना आनंद झाला होता.तेव्हा आपण त्यांच्यावर कितीही उपकार केले तरी नंतर त्यांना धर्म अधिक महत्वाचा वाटून ते आपल्याच विरोधात जाणार ही शक्यता सगळ्यात मोठी.

बाकी पाकिस्तानातल्या अणूबॉम्ब वर अमेरिकेचं लक्ष आहेच. जर ते अतिरेक्यांच्या हाती लागायची वेळ आली तर अमेरिका त्याना कुचकामी करायची मोहीम राबवू शकते.

असेच व्हावे ही सदिच्छा.

श्रीगुरुजी's picture

22 Dec 2014 - 8:20 pm | श्रीगुरुजी

>>> बाकी पाकिस्तानातल्या अणूबॉम्ब वर अमेरिकेचं लक्ष आहेच. जर ते अतिरेक्यांच्या हाती लागायची वेळ आली तर अमेरिका त्याना कुचकामी करायची मोहीम राबवू शकते.

पेशावरमधील शाळेवरील हल्ल्यावरच्या धाग्यात मी हेच लिहिले होते. आपल्याला धोका निर्माण होत आहे असे दिसले तरच अमेरिका पाकड्या अतिरेक्यांचा बंदोबस्त करायच्या मागे लागेल. जोपर्यंत आपल्याला धोका नाही तोपर्यंत अमेरिका लांबून मजा बघेल. पाकिस्तान अतिरेकी संघटनांच्या ताब्यात जावा असे मला वाटते. त्यामुळे अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या हातात पडण्याचा धोका ओळखून अमेरिका स्वतःहून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागे लागेल हे नक्की, कारण ही अण्वस्त्रे भारताप्रमाणे इस्राईल, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका या देशांविरूद्ध सुद्धा वापरली जातील.

सर्वात प्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवे की अणूयुद्धाचा धोका पाकिस्तानकडुन आपल्याला आहे, आपल्याकडुन पाकिस्तानला नाही !
अणू युद्ध आणि आफ्टर इपॅक्टससाठी आपली कुठलीच तयारी नाही !

पहिला हवाई हल्ला केला तरीही दोन्ही साईडचा हवाई आणि आण्विक रिस्पॉन्स टाईममध्ये ८ १० मिनीटांपेक्षा अधीक फरक पडेल असे मला वाटत नाही. पाकीस्तानची पूर्ण एअरस्पेस आणि मिसाईल स्पेस एकाच घटकेत ऑकुपाय करणे आणि शस्त्र उपयोगापासून अशक्य करणे एवढी क्षमता भारतापाशी आहे असे वाटते का ? त्यांचे एकही मिसाईल भारतीय भूमी पर्यंत पोहोचणार नाही हवेतल्या हवेत भारतात येण्या आधीच उडवली जावयास हवी. आणि त्या वेळी आमेरीका अथवा चीनलाही हस्तक्षेप करता यावयास नको.
यासाठीच मी माझ्या प्रतिसादात लिहले :-
सर्व प्रथम लष्करातील सर्व प्रमुखांना तुम्हाला पाकित्सानची गचांडी आवळायला किती वेळ लागेल ? हा प्रश्न विचारला असता, त्यासाठी ऑपरेशला लागणारा खर्च / दारुगोळा / ड्रील / आणि संपूर्ण कारवाई करण्यासाठी लागणारा वेळ विचारला असता. हे सर्व होउ पर्यंत वेळ घ्या पण रिझल्ट द्या असे निक्षुन सांगितले असते.

यासाठी भारत किती सक्षम आहे असे वाटते ?
निदान पाकिस्तानचे कंबरडे मोडुन काढण्या इतपत आपली क्षमता नक्कीच आहे ! आपल्या देशातल्या तिन्ही दलांवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर माझा विश्वास आहे. फक्त गरज आहे, ती "योग्य वेळी" त्यांना फ्री-हँड देण्याची.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your
Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

माहितगार's picture

23 Dec 2014 - 2:02 pm | माहितगार

यासाठी भारत किती सक्षम आहे असे वाटते ?
निदान पाकिस्तानचे कंबरडे मोडुन काढण्या इतपत आपली क्षमता नक्कीच आहे ! आपल्या देशातल्या तिन्ही दलांवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर माझा विश्वास आहे. फक्त गरज आहे, ती "योग्य वेळी" त्यांना फ्री-हँड देण्याची.

सैन्यदलांबाबत विश्वास आणि अभिमान असणे चांगली गोष्ट आहे. पण तांत्रिक क्षमतांच्या बाबतीत वास्तवाचे भानही महत्वाचे असावे असे वाटते. हि डेक्कन क्रॉनीकलची संसदीय समिती बद्दलची बातमी काय सांगते आहे ते अभ्यासणे सयुक्तीक ठरू शकेल असे वाटते.

धन्यवाद. आपण दिलेला दुवा इकडे हापिसात उघडत नाहीये... घरी गेल्यावर नक्की वाचीन.
बाकी इथे सुद्धा पहा :- http://www.tejas.gov.in/

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 2:07 pm | क्लिंटन

निदान पाकिस्तानचे कंबरडे मोडुन काढण्या इतपत आपली क्षमता नक्कीच आहे !

मग कारगीलमध्ये आत घुसलेल्या पाकड्यांना मारायला/हकलवायला दोन महिने का लागले हो आपल्याला? आपले सैन्य प्रचंड शक्तीशाली आहे असा माझाही त्यापूर्वी समज होता पण त्यानंतर मात्र मी अशा दाव्यांवर विश्वास ठेऊ शकत नाही.

मग कारगीलमध्ये आत घुसलेल्या पाकड्यांना मारायला/हकलवायला दोन महिने का लागले हो आपल्याला?
इथे काही उत्तरे सापडतात का ? ते पहा.
Kargil: Ex-air marshal returns army fire
Kargil: Lessons to be learnt

जाता जाता :-
Pakistan Is Building Smaller Nukes, But They Just Might Be More Dangerous
Pakistan Could Soon Have More Nukes Than the U.K. and France And smaller and more destabilizing ones, too

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

काळा पहाड's picture

23 Dec 2014 - 5:43 pm | काळा पहाड

कारण पाकिस्तानी सैन्य हे चांगल्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं. कारगिल हा सैन्य मोहिमेच्या दृष्टीनं अतिशय अवघड प्रदेश आहे. वर असलेल्याला फक्त प्रचंडच नव्हे तर संपूर्ण अ‍ॅडव्हान्टेज आहे. वरच्या बंकरमध्ये बसलेला पाकिस्तानी हा अतिशय सुरक्षीत अशा दगडी कवचात होता आणि खालून वर चढाई करताना झाडांचा किंवा दगडाचा आडोसा नव्हता. खालून वर मोहीम ही जवळ जवळ आत्महत्या या सदरात येते. चिलखती गाड्या वापरता येत नाहीत. अशा ठिकाणी माणसं तर सोडाच, यंत्रं सुद्धा दमतात. त्यातून पाकड्यांजवळ अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पण होती. कारगिलचा विजय हा खरोखरच मानवी बळापलिकडे जावून मिळवलेला विजय होता. बाकी जाणकार सांगतीलच.

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2014 - 8:18 pm | श्रीगुरुजी

+१११

आणि मुख्य म्हणजे वाजपेयींनी पायदळाला व हवाई दलाला सीमारेषा न ओलांडण्याची सक्त ताकीद दिली होती. त्यामुळेही भारतीय मोहिमेला मर्यादा आल्या होत्या.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 8:38 pm | क्लिंटन

कारण पाकिस्तानी सैन्य हे चांगल्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं.

आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानी सैन्य वाईट ठिकाणी तैनात केले जाईल असे मानायचे काही कारण नाही. आणि कारगीलमध्ये अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पाकड्यांकडे होती ती आर्टीलरी आपण हल्ला केल्यास पाकडे वापरणार नाहीत असे मानायचेही काही कारण नाही.

बाकी आपल्या हवाईदलाकडील नक्की किती विमाने शत्रूने पाडली आहेत आणि किती विमाने अपघाताने पडली याविषयी काही आकडेवारी आहे का?त्यात आपले किती शे वैमानिक मारले गेलेत? इतकी वर्षे नुसती मीग विमाने पडत होती.मध्यंतरी सुखोई विमानही पडले म्हणून सुखोई विमानांची फ्लिट ग्राऊंड केली.आपल्या नक्की किती पाणबुड्या आग लागून बुडल्या आहेत आणि नक्की किती शत्रूने बुडविल्या आहेत? मध्यंतरी आपल्याकडे १५ दिवस (की महिनाभर) पुरेल इतकाच दारूगोळा आहे असे सैन्यप्रमुखांनी म्हटले होते असे वाचल्याचे आठवते. सैन्याचा अभिमान आणि कृतज्ञता वाटणे वगैरे सगळे ठिक आहे पण अशा प्रकारच्या बेभरवशाच्या शस्त्रांनिशी आपण सहजासहजी कसे काय जिंकणार आहोत? जरा तरी रिअ‍ॅलिस्टिक अपेक्षा असू द्या.

काळा पहाड's picture

23 Dec 2014 - 10:19 pm | काळा पहाड

आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानी सैन्य वाईट ठिकाणी तैनात केले जाईल असे मानायचे काही कारण नाही.

युद्धाचा एक महत्वाचा नियम हा कि शत्रूला सोयिस्कर नव्हे, तर आपल्याला सोयिस्कर जागी युद्ध करण्यासाठी शत्रूला भाग पाडा. इथे भारतीय सैन्याचे हात दगडाखाली होते. दुसरी कुठलीच आघाडी उघडण्यासारखी नव्हती. आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडण्याची दक्षता घ्यायची होती आणि सैन्याच्या तुकड्या शत्रूच्या टप्प्यात होत्या. लक्षात ठेवा की बरचसं सैन्य हे शत्रू च्या लेह हायवे माराच्या टप्प्यात असल्यानं मारलं गेलं (वरची मदनबाण यांची दुसरी लिंक पहा). परिस्थीती किती गंभीर आहे याची कल्पना राजकीय नेतृत्वाला दिली गेली नव्हती आणि हा एक स्थानिक प्रश्न आहे असं गृहीत धरलं गेलं आणि त्याप्रमाणं निर्णय घेतले गेले, त्याप्रमाणं सैन्याला आज्ञा दिल्या गेल्या. या चुका मुख्यतः राजकीय आणि स्ट्रॅटेजिक होत्या आणि सैन्याच्या कार्यक्षमतेचा त्यात काही संबंध नव्हता.

आणि कारगीलमध्ये अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पाकड्यांकडे होती ती आर्टीलरी आपण हल्ला केल्यास पाकडे वापरणार नाहीत असे मानायचेही काही कारण नाही.

मला असं म्हणायचंय की त्यामुळे एअरफोर्स च्या हालचालींवर बंधनं आली. ही शिखरं ज्या उंचीवर आहेत तिथे मुळातच मर्यादित हालचाली होवू शकतात. शिवाय एअरफोर्स सुद्धा सीमा पार करू शकत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या अ‍ॅप्रोच रूटवर पण बंधनं असणार. आपण अशा युद्धाबद्दल बोलतोय जिथे आपला एक हात पाठिमागे बांधलेला होता.

जरा तरी रिअ‍ॅलिस्टिक अपेक्षा असू द्या.

तुम्ही जे सांगताय त्यातल्या बर्याच (बहुतांश) घटना या सुट्ट्या भागांच्या कमतरतेमुळे, मनमोहन सरकारच्या नवीन शस्त्रे व टेक्नॉलोजी घेण्याबद्दलच्या धरसोड धोरणामुळे आणि राजकीय निर्णयक्षमतेच्या अभावामुळे घडलेल्या आहेत. त्या आपलं सैन्य कमी शिक्षित आहे म्हणून घडलेल्या नाहीत.

क्लिंटन's picture

23 Dec 2014 - 10:26 pm | क्लिंटन

त्या आपलं सैन्य कमी शिक्षित आहे म्हणून घडलेल्या नाहीत.

अहो वैयक्तिक शौर्याच्या जोरावर युध्द जिंकायचे दिवस मागे पडून कित्येक दशके झाली. सैन्याचे शौर्य हवेच त्यात शंकाच नाही.पण नुसते तितके पुरेसे नाही.त्याबरोबरच शस्त्रास्त्रे गरजेची असतात.जर आपली विमाने इतक्या मोठ्या प्रमाणावर शांततेच्या काळात पडत असतील तर युध्दाच्या वेळी नुसत्या सैन्याच्या शौर्याचा काहीच उपयोग होणार नाही त्याचे काय?

मदनबाण's picture

24 Dec 2014 - 12:09 am | मदनबाण

क्लिंटनराव मिलेटरी मॉर्डनायझेशनची अत्यंत गरज आहे या बद्धल काही वादच नाही ! सध्याचं सरकार काय निर्णय घेतय त्या बद्धल उत्सुकता आहेच... काही घेतले गेले आहेत, काही लवकरच घेतले जातील ही अपेक्षा !

बाकी काही व्हिडीयो देण्याची इच्छा तीव्र झाल्याने इथे देत आहे :-
१}कारगिल मधील भारतीय सैन्याची मुव्हमेंट आणि बोफोर्सची फायरिंग

२} मध्यंतरी पाकिस्तानने सातत्याने फायरिंग केल्यावर आपल्या मिलेटरी ने दिलेले घाणाघाती प्रतिउत्तर !

३} पाकिस्तानच्या नूक्लिअर ब्लॅकमेलिंगवर चाललेली चर्चा

४} माझ्या मते ही India's Multi-Barrel Rocket Launchers - BM-21 / 30 आहेत. कारगिल युद्धात टायगर हिल वर यांचा मारा करण्यात आला होता.

५}Indian Army - Artillery of India

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

मदनबाण's picture

9 May 2015 - 11:09 pm | मदनबाण

इथे जे जनरल व्ही के सिंह म्हणाले होते, त्याच बद्धल आता CAG रिपोर्ट सांगत आहे !
संदर्भ :- Army ammo reserves may last just 20 days of intense fighting: CAG
India faces severe ammunition shortage, can fight war for only 20 days: CAG
India faces acute shortage of ammunition: CAG tells Defence Ministry in report
आपल्या देशाची अशी लष्करी दुरावस्था का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आई शपऽऽथ्थ साडी मधे दिसते झकाऽऽऽस्स्स तू ;)

काळा पहाड's picture

9 May 2015 - 11:14 pm | काळा पहाड

आपल्या देशाची अशी लष्करी दुरावस्था का ?

मां-बेटा-पिता-नानी--नानी के पिता-सरदार-इत्यादी इत्यादी

नितिन थत्ते's picture

22 Dec 2014 - 4:08 pm | नितिन थत्ते

ऐला, एवढं सगळं कॉम्प्लिकेशन आहे होय ?

मला वाटायचं की आधीच्या पंप्रच्या छातीचा साइझ कमी असल्याने कृती केली जात नव्हती.

केम छो चच्चा ! ;)
मला वाटायचं की आधीच्या पंप्रच्या छातीचा साइझ कमी असल्याने कृती केली जात नव्हती.
तमारो टेलरिंग नो साईड बिझनेस छे के ? ;)
मने तो खात्रीच हती, की तमे आ धागाना प्रतिसाद देवा माटे जरुर आवशे...

[ मदन शहा ] ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

पिंपातला उंदीर's picture

22 Dec 2014 - 4:22 pm | पिंपातला उंदीर

@थत्ते- :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2014 - 5:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

अंध राजकारण बाजूला ठेऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आले तर, माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी लिहिलेल्या...

भारताशी सरळ सरळ युद्ध ही खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर असलेली कृती असल्यामुळेच पाकिस्तान अतिरेकी कारवायांचे छुपे युद्ध खेळण्याची कारवाई करीत आहे आणि उघडपणे "त्यांत आमचा काही हात नाही" अशी भूमिका घेत आहे. पाकिस्तानच्या कारवायांना गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे पाकिस्तानसाठी फायदा/व्यय गुणोत्तर अधिकाधिक गैरसोईचे होऊ लागले आहे. शिवाय, पाकिस्तानातील अंतर्गत अतिरेकी घटनांमुळे ते पारडे सद्यस्थितीत तरी काहीसे भारताच्या बाजूनेच झुकण्यासाठी मदत झाली आहे.

(सर्व प्रकारच्या नजरांना दिसायला सोपे जावे म्हणून महत्वाचा भाग येथे उठावदार केलेला आहे :) )

...या वाक्यांचा अर्थ कळेल. नाहीतर "सर्वात पहिले स्वार्थी राजकारण, देशकारण गेले चुलीत" या मंत्राचा जप करणे काही जण चालू ठेवतीलच म्हणा !

क्लिंटन's picture

22 Dec 2014 - 5:25 pm | क्लिंटन

अंध राजकारण बाजूला ठेऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आले तर, माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी लिहिलेल्या...या वाक्यांचा अर्थ कळेल.

छे बुवा भलत्याच अपेक्षा तुमच्या.

नितिन थत्ते's picture

22 Dec 2014 - 5:36 pm | नितिन थत्ते

चिल् ....

प्रतिसाद हा धागालेखकाच्या धाग्यातल्या मुद्द्यांसाठी नव्हता. तो ज्यांच्यासाठी होता त्यांना कळला असेल.

धाग्यातल्या प्रतिपादनाशी सहमतच आहे.

गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे

एक्का साहेब, गेल्या सहा सात महिन्यांत काय काय वेगळं झालय याचा काही संदर्भ मिळेल काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Dec 2014 - 12:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या छापील आणि एलेक्ट्रॉनिक स्रोतांवर यासंबंधात असंख्य संदर्भ उपलब्ध आहेत... यात रोजची वर्तमानपत्रे आणि टी व्ही आहेतच. त्यांचा प्रामाणिक विचार पुरेसा आहे. कोणताही राजकारणी चष्मा न वापरता ते वाचले/ऐकले तर मग मी काही न सांगताही सर्व समजेल. त्याविना इथे किती वादविवाद केले तर केवळ बँड्विड्थ खर्च होण्यापलिकडे काहिही होणार नाही.

अनुप ढेरे's picture

23 Dec 2014 - 1:44 pm | अनुप ढेरे

उगीच का वैतागताय एक्का साहेब. मी फक्त एवढं विचारलं की नव्या सरकारमुळे काश्मिर आणि इतर ठीकाणी ताबारेषेवरील धोरणात झालेल्या बदलांचा आणि त्याच्या परिणामांचा कोणी अभ्यास केलाय का आणि उत्सुकता म्हणून संदर्भ मागितले. ते न देता उगाच राजकीय चष्मा, प्रामाणिक विचार, बँडविड्थ वगैरे मध्येच का आणताय?

अनुप ढेरे's picture

23 Dec 2014 - 1:59 pm | अनुप ढेरे

हे एक आर्टिकल मिळालं.

http://indiatoday.intoday.in/story/loc-firing-ceasefire-violations-pakis...

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Dec 2014 - 2:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

बघा एक लेख मिळाला ना पटकन ! थोडेसे अजून उत्खनन केले तर अजून बरेच "विश्वासू" धागेदोरे मिळतिल :) . शिवाय माझे निरिक्षण एकाच लेखावरून अथवा एका बातमीवर केलेले नसून; गेल्या काही महिन्यांत पाकिस्तान बरोबरच्या व्यवहारात सद्याच्या सरकारने केलेल्या "नो नॉनसेन्स" कारवाया आणि त्यामुळे आंतरराष्ट्रिय राजकारणात मोदी आणि भारताला मिळणारी वागणूक खालील गोष्टींवरून स्पष्ट होईल :

१. पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत झालेली फजिती,

२. त्यानंतर एकामागोमाग एक सर्व महत्वाच्या देशांनी पाकिस्तानच्या काश्मीर बद्दलच्या तक्रारीं/रडगाण्यांकडे केलेली डोळेझाक,

३. मोठा अडसर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानाने भारतात येऊन अणुकरावर सह्या करणे,

४. WTO मध्ये भारताने हट्ट धरलेली (आणि भारताच्या सद्यस्थितीत महत्वाची सबसिडीबद्दलची सुधारणा, जी न करण्याचे पूर्वीच्या सरकारने मान्य केले होते) अमेरिकेने प्रथम प्रखर विरोध करून नंतर भारताच्या आग्रहाखातर मान्य करणे,

५. याशिवाय आंतरराष्ट्रिय राजकारणात सहसा न दिले जाणारे / आतापर्यंत न दिले गेलेले जवळिकेचे / मानाचे संदेश; उदा. कार्यक्रमपत्रिकेत नसताना प्रे ओबामाने मोदींना स्वतः बरोबर मार्टिन ल्युथर किंगचे स्मारक पहायला नेणे; अमेरिकेच्या प्रेसिडेंटने २६ जानेवारीच्या समारंभाला मुख्य आतिथीचे आमंत्रण स्विकारणे, भारताच्या पंतप्रधानाचे जपानच्या पंतप्रधानाने (हे जपानच्या इतिहासात प्रथमतः झाले आहे) आणि इतर प्रेसिडँट्स/पंतप्रधानांनी (हे अगोदर झाले असलेच तर अत्यंत विरळा असेल) आलिंगन देऊन स्वागत करणे, इ. वरवर या गोष्टी साध्यासरळ वाटल्या तरी सर्वसाधारण आंतरराष्ट्रिय सभ्यतेच्या फार पुढे जाऊन जवळीक साधण्याचे संकेत आहेत आणि ते उगाचच / उथळपणे दिले जात नाहीत.

या आणि इतर गोष्टी (अ) मुळातून, (आ) त्यांचे स्वतःचे आकलन आणि (इ) त्यांचे "विश्वासू" स्त्रोतांतून मिळणारे विश्लेषण; या सर्वांच्या समन्वयाने मी माझे मत बनवले आहे.

अनुप ढेरे's picture

23 Dec 2014 - 8:53 pm | अनुप ढेरे

इतर परराष्ट्रीय धोरणाबद्दल सहमत आहे. मला उत्सुकता सीमारेषेवरच्या बदलांबद्दल होती. त्याचा एकच संदर्भ मिळाला आहे अजुन.

श्रीगुरुजी's picture

22 Dec 2014 - 8:25 pm | श्रीगुरुजी

>>> मला वाटायचं की आधीच्या पंप्रच्या छातीचा साइझ कमी असल्याने कृती केली जात नव्हती.

छातीचा साईझ नाही हो, 'वरून' आदेश नसल्याने कृती केली जात नव्हती. आणि 'साधनसंपत्ती'वर पहिला हक्क ज्यांचा आहे त्यांच्याविरूद्ध कृती करण्याचा आदेश 'वरून' कसा येणार?

नितिन थत्ते's picture

22 Dec 2014 - 9:57 pm | नितिन थत्ते

बॉर्र.....
वरून आदेश देणार्‍यांच्या* छातीचा साईझ कमी असल्याने असं म्हणू !!!

*हा प्रतिसाद अश्लील नाही याची नोंद घ्यावी.

सगळ्याची मुळे पाकिस्तानात आहे.लादेनलाही जाणुन बुजून सहारा दिला होता.

माहितगार's picture

23 Dec 2014 - 11:50 am | माहितगार

* From Jinping to Obama: Here's how the world still hyphenates India with Pakistan

* Pakistan faces risks if economic reforms slip: IMF

* Barack Obama signs massive defence budget; $1 billion to Pakistan

* China-Pakistan Economic Corridor — A new vista of development in South Asia (पाकीस्तान टुडे डॉट्कॉमवर)

* Socio-economic impact of terrorism on Pakistan डेली टाईम्स डॉट्कॉम डॉत पीके ऑनलाईन पाकीस्तानी वृत्तपत्र

पैसा's picture

23 Dec 2014 - 10:37 pm | पैसा

उत्तम लेख आणि चर्चा

मुक्त विहारि's picture

24 Dec 2014 - 12:51 am | मुक्त विहारि

सहमत आहे..

सैन्य शक्तीने पाकिस्तान प्रॉब्लेम निर्णायकरित्या सोडवणं भारताला प्रॅक्टीकली शक्य असतं तर मला वाटतं भारताने ते एव्हाना केलं असतं. पण भारत तसं करत नाहि याचं कारण आपण फार सहिष्णु आहोत किंवा आपल्या नेत्यांमधे तेव्हढी धमक नाहि असं काहि नाहि (आपण थोडेफार सहिष्णु नक्कीच आहोत, व आपले बरेचसे नेते संसदेत बसायच्या लायकीचे नाहित हे खरे आहे). पण आपण तसं करत नाहि याचं कारण तसलं काहि करण्याची गरज नाहि, आणि करतो म्हटलं तरी ते शक्य नाहि. लमहोंने खता कि और सदियोंने भुगतान किया हे आपल्याला परवडणारं नाहि.

शलभ's picture

24 Dec 2014 - 6:37 pm | शलभ

हे पटतयं..

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Dec 2014 - 3:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत.

मात्र आतापर्यंतचा पाकिस्तानचा विरोध फक्त "हातावर हात ठेऊन फक्त निषेध नोंदवणे" या जगभर हास्यास्पद समजल्या गेलेल्या पद्धतीने होत होता. सिमेवरच्या गोळीबाराचे सोडा, पाकिस्तानने आयोजित केलेल्या कोणत्याही भारत-पाकिस्तान व्दिपक्षीय चर्चेच्या स्थानी भारताचा ध्वज उलटा लावला नाही तर आश्चर्य व्यक्त केले जात होते; आणि भारताची त्याप्रसंगी "अश्या चुका होत असतात, त्यांना फार महत्व देउ नये" अश्या प्रतिक्रिया गृहित होत्या. अश्या मुळमुळीत भारताला मित्र मानणे म्हणजे आपले हसे करून घेणे असे जागतिक मत झाले याचे आश्चर्य ते काय ?

१. घट्ट आणि विश्वासू राजकारणी संबंध
(अ) तो असल्याने स्वतःच्या हितसंबंद्धांना फायदा होणार असला तर किंवा
(आ) तो नसल्याने स्वतःच्या हितसंबंद्धांना धोका होणार असला तर किंवा
(इ) वरच्या दोन्ही शक्यता असल्या तर
आणि तरच प्रस्थापित होतात.

२. मुळमुळीत धोरण असलेल्या आणि केवळ नीतिमत्तेच्या गप्पा मारणार्‍या देशांना फारसे महत्व मिळ्त नाही. याचे कारण जेवढा वरचा १ क्रमांकाचा मुद्दा असतो तेवढाच असे देश बेभरवश्याचे असतात (वेळप्रसंगी कच खाऊन पाठीराख्या देशाला अडचणीत आणतात) हे ही असते. आंतरराष्ट्रिय राजकारणात भित्र्याचा कोणीच मित्र होऊ इच्छित नाही आणि जो घाबरवू शकतो त्याची मैत्री सगळ्यांना हवी असते किंवा कमीत कमी त्याला उघड विरोध तरी केला जात नाही, हे एक नग्न सत्य आहे.

म्हणूनच गेल्या काही महिन्यांपूर्वी भारताच्या अणूकार्यक्रमाला असलेला अमेरिकेचा पायओढा कारभार आणि ऑस्ट्रेलियाचा (ज्यांच्याकडे जगातला विक्रीसाठी उपलब्ध असलेला सर्वात मोठा युरेनियमचा साठा आहे) सबळ विरोध लक्षणियरित्या बदलून त्यांत कृतिशीलता आलेली दिसत आहे.

यामागे गेल्या काही महिन्यात "भारतामध्ये पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची राजकिय इच्छाशक्ती असल्याची" आंतरराष्ट्रिय समुदायात झालेली जाणीव आहे. याची मुख्य कारणे :
अ) पाकिस्तानला सीमेवरच्या गोळाबरी व इतर कुरापतींची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा कृतिशील संदेश
आ) तसे करण्याबरोबरच राजकिय भेटींत पडद्यामागे करण्यात आलेल्या अनेक विश्वासदर्शक खलबते... ज्याची परिणती अशी झाली की, पाकिस्तानने केलेल्या कांगाव्यांचा उपयोग आतापर्यंत भारताला दाबून ठेवण्यात कसा वापरता येईल हे पाहिले जात होते त्याऐवजी त्या कांगाव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आणि पाकिस्तान एकाकी पडण्यात झाली.

दुसरी राजकिय खेळी राष्ट्रिय सुरक्षा सल्लागार म्हणून श्री अजित दोवाल यांच्या निवडणूकीने खेळली गेली आहे. या पूर्व आयबी संचालकाचे जागतिक व प्रादेशिक गुप्तहेर कारवायांचे ज्ञान आणि पूर्वकर्तृत्व वादातीत आहे... या एकाच घटनेने आयएसआयची झोप बर्‍यापैकी उडाली आहे असे म्हटले जाते. नुकतेच ISIS ने इराकमधे बंदी केलेले भारतिय नागरिक सुखरूप परत आले त्यामध्ये दोवाल यांचे बरेच योगदान होते.

आजपर्यंत भारताच्या कोणत्याही निषेधाकडे हास्यास्पद कारणे देत दुर्लक्ष करणार्‍या पाकिस्तानाला तोंडदेखला मान देत का होईना पण मुंबई हल्ल्याचा आरोपी लष्करे तोयबाच्या झाकी उर रहमानला परत नजरकैदेत ठेवावे लागले.

या झाल्या उघड कृती. पडद्यामागे याच्या अनेक पटींनी हालचाली सुरू नसल्या तर आश्चर्य असेल. त्या जरी वर दिसत नसल्या तरी उघड कृतींपेक्षा जास्त परिणामकारक असतात.

युद्धतंत्राचे सर्वात मोठे तत्व असे आहे की,

गोळीबार/रक्तपात न करता युद्धाची ल़क्ष्ये पदरात पाडणारे डावपेच खेळून मिळवलेला विजय सर्वोत्तम असतो.

कारण थोड्या कालावधित पूर्ण विजय मिळविण्याच्या भरात जेत्यालाही पराभवाचा धोका अथवा अश्या युद्धाची तात्कालिक व/किंवा दीर्घकालीन न परवडणारी किंमत चुकवावी लागते. उदा :
१. मराठे आणि अबदाल्ली यांच्यातल्या पानिपतच्या तिसर्‍या युद्धात मराठ्यांचा पराभव होऊन मराठी साम्राज्याला उतरती कळा लागली असली तरी अबदाल्लीचेही इतके नुकसान झाले की त्याला सैन्याच्या विरोधामुळे आणि बंडाळीमुळे अफगाणीस्तानात परतणे भाग पडले.
२. इराक आणि अफगाणिस्तानमधल्या युद्धांत झालेला खर्च हे सुद्धा अमेरिकेच्या १८ ट्रिलियन डॉलर इतक्या महाप्रचंड राष्ट्रिय कर्जाचे कारण आहे; आणि त्यामुळे अमेरिकेच्या जागतिक राकारणातल्या वजनात लक्षणिय घट झालेली आहे.
३. दुसरे महायुद्ध जिंकूनही आर्थिक आणि सामरिक रित्या खिळखिळे झालेल्या ब्रिटनला पुढ्च्या पाच-दहा वर्षांत त्याच्या सर्व महत्वाच्या वसाहतींना स्वातंत्र्य देणे भाग पडले आणि जागतिक महासत्तेचा मुकुट अमेरिकेकडे गेला.

असो. ही केवळ सुरुवात आहे. (अ) सद्या योग्य दिशेने चाललेल्या भारताच्या आंतरराष्ट्रिय पटलावरच्या वाटचालीने भविष्यात वेग पकडला, (आ) तिला देशांतर्गत सबळ विकासाचे पाठबळ मिळाले आणि (इ) "भारताशी दुष्मनी फारच महागात पडते" हे भारत पाकिस्तानला ठोस कृतीने दाखवत राहिला तरच भारतात खरे अच्छे दिन येतील. असे झाल्यास पाकिस्तानमध्ये भारतव्देषाचे राजकारण सोडायला भाग पाडणारा दबावगट तयार होईल. असे नक्की होईल का ? आणि कधी होईल ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे केवळ भविष्यकाळच देईल.

इतके सर्व असले तरी पाकिस्तानच्या संबंधात (अ) हातावर हात ठेऊन बसणे किंवा (आ) सर्वशक्तीनिशी हल्ला हे दोनही पर्याय सद्यकाळात व्यवहार्य नाहीत. मात्र पाकिस्तानला त्याच्या दु:साहसांची सामरिक, आर्थिक आणि राजकिय किंमत चुकवावी लागेल आणि ती अधिकाधीक असह्य होईल अशी कृती करणे भारताच्या हातात आहे... आणि सुदैवाने या दिशेने भारताची वाटचाल चालू आहे अशी लक्षणे दिसत आहेत.

विनोद१८'s picture

26 Dec 2014 - 1:14 pm | विनोद१८

१००% सहमत, अप्रतिम विवेचन.

शलभ's picture

26 Dec 2014 - 4:05 pm | शलभ

सुंदर विश्लेषण..

सुबोध खरे's picture

25 Dec 2014 - 12:25 pm | सुबोध खरे

अणु शक्ती हे दुधारी शास्त्र आहे आणी अणुयुद्ध आतापर्यंत न होण्याचे कारण म्हणजे MAD (mutually assuared destruction) म्हणजे उभयपक्षी विनाश हा ठरलेला असल्याने सहसा कोणी अणु युद्धास धजावलेले नाही.
राहिली गोष्ट प्रथम हल्ला करणार नाही (NO FIRST USE) हे लोढणे सुद्धा कागदी आहे. एकदा तुम्ही ठरवले कि अणुशस्त्रे वापरायची कि पहिल्यांदा एक लहानसा अणु बॉम्ब (१-१० किलोटन) निर्मनुष्य जागी( राजस्थानच्या वाळवंटात/ कछ्च्ह च्या रणात स्फोट करायचा आणी पाकिस्तानने अणुहल्ला केला हि अवी उठवून पुढच्या पाच मिनिटात समूळ विनाश करायच्या इराद्याने पाकिस्तानवर अणू हल्ला( आणू आणी हायड्रोजन बॉम्ब ने करायचा). यात पाकिस्तानचा संपूर्ण खात्मा होईल परंतु जवळ जवळ एक तृतीयांश ते अर्ध्या भारताला किरणोत्साराचा प्रादुर्भाव पुढची वीस वर्षे पर्यंत होत राहण्याचा धोका आहे.यात काही कोटी भारतीय लोक मृत्यू मुखी पडतील. त्या तुलनेत सध्या तरी काही शे लोक गमावणे हे परवडण्या सारखे आहे.
जर यदाकदाचित पाकिस्तानचा समूळ नाश झाला नाही तर वाचलेल्या अणु शस्त्रानी त्यांनी प्रतिहल्ला केला तर दोन तृतीयांश भारत नष्ट होईल.
वरील भीती मुळेच पाकिस्तान काही शे अणुशस्त्रे निर्माण करण्याच्या मागे आहे. भारत अणु पाणबुडीतून( चक्र आणी अरिहंत ) डागण्याची आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी याच साठी करीत आहे कि जर जमिनीवरील सर्व शस्त्रे अणूहल्ल्यात नष्ट झाली तरी पाणबुडीतील वाचलेल्या शस्त्रास्त्रांनी पाकिस्तान किंवा चीनचा संपूर्ण विध्वंस करता यावा.
http://en.wikipedia.org/wiki/Second_strike
http://en.wikipedia.org/wiki/Sagarika_(missile)
http://en.wikipedia.org/wiki/K-4_%28SLBM%29

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Dec 2014 - 3:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत.

पारंपारिक युद्ध आणि अगदी सुक्ष्म (लो की) अणूयुद्ध यांच्यातही जमीन-अस्मानाचा फरक आहे. अणूयुद्ध म्हणजे एकाच बाँबने एक शहर उद्ध्वस्त करून युद्ध जिंकणे असा समज दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा-नागासाकीवर टाकलेल्या अणूबॉंब्जमुळे आणि त्यामुळे दुसर्‍या महायुद्धाचे पारडे दोस्तराष्ट्रांच्या बाजूने झुकण्यात झाल्याने झाला आहे. सद्याच्या बदललेल्या राजकिय आणि सामरिक वस्तुस्थितीत हे शक्य नाही.

मदनबाण's picture

26 Dec 2014 - 12:06 am | मदनबाण

@ एक्का काका
आपले घटनांचे विश्लेषण आवडले !
गोळीबार/रक्तपात न करता युद्धाची ल़क्ष्ये पदरात पाडणारे डावपेच खेळूण मिळवलेला विजय सर्वोत्तम असतो.
हा विचार अत्यंत महत्वपूर्ण आहे.

भारत पाकिस्तानला ठोस कृतीने दाखवत राहिला तरच भारतात खरे अच्छे दिन येतील. असे झाल्यास पाकिस्तानमध्ये भारतव्देषाचे राजकारण सोडायला भाग पाडणारा दबावगट तयार होईल. असे नक्की होईल का ? आणि कधी होईल ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे केवळ भविष्यकाळच देईल.

पाकिस्तानचे अस्तित्व हे फक्त आपल्या द्वेषावर अवलंबुन आहे...इथे राज्य करणार्‍याला / नियंत्रण ठेवणार्‍याला हिंदूस्थान्द्वेषाचा एक कलमी कार्यक्रम राबवण्या शिवाय पर्याय नाही,हा त्यांचा इतिहास सुद्धा सांगतो आणि वर्तमान सुद्धा.
त्यांची आपल्याशी सरळ युद्ध करण्याची क्षमता नाही हे ते स्वतः जाणुन आहेत त्यामुळेच त्यांनी आपल्या विरुद्ध thousand cuts निती अवलंबली. ते आपल्याशी शांततेने राहु शकत नाहीत कारण प्रचंड हिंसाचार होउनच त्यांच्या या राष्ट्राची निर्मीती झाली आहे.त्यामुळे Pakistan isn't ready for peace with India हेच सत्य आहे आणि आपण हे सत्य कायम ध्यानात ठेवले पाहिजे.

राजकिय किंमत चुकवावी लागेल आणि ती अधिकाधीक असह्य होईल अशी कृती करणे भारताच्या हातात आहे... आणि सुदैवाने या दिशेने भारताची वाटचाल चालू अशी लक्षणे दिसत आहेत.
+१

@ डॉक

एकदा तुम्ही ठरवले कि अणुशस्त्रे वापरायची कि पहिल्यांदा एक लहानसा अणु बॉम्ब (१-१० किलोटन) निर्मनुष्य जागी( राजस्थानच्या वाळवंटात/ कछ्च्ह च्या रणात स्फोट करायचा आणी पाकिस्तानने अणुहल्ला केला हि अवी उठवून पुढच्या पाच मिनिटात समूळ विनाश करायच्या इराद्याने पाकिस्तानवर अणू हल्ला( आणू आणी हायड्रोजन बॉम्ब ने करायचा).
हा दॄष्टीकोन लक्षात आला...

यात पाकिस्तानचा संपूर्ण खात्मा होईल परंतु जवळ जवळ एक तृतीयांश ते अर्ध्या भारताला किरणोत्साराचा प्रादुर्भाव पुढची वीस वर्षे पर्यंत होत राहण्याचा धोका आहे.यात काही कोटी भारतीय लोक मृत्यू मुखी पडतील. त्या तुलनेत सध्या तरी काही शे लोक गमावणे हे परवडण्या सारखे आहे.
होय... याचे सध्याचे उदाहरण आपल्या नजरे समोर येत आहे { अर्थात अणूबॉम्बच्या जागी रिअ‍ॅक्टर आहेत.} ११ मार्च २०११ साली जपानच्या फुकुशिमा दायची रिअ‍ॅक्टर अपघात झाला आणि सुनामी बरोबरच जगाने नूक्लिअर रिअ‍ॅक्टर ब्लास्ट सुद्धा पाहिला. या घटनेचे परिणाम आता युएस च्या वेस्ट कोस्ट मधे दिसायला लागले आहेत...
Fukushima radation
त्यामुळे तुमचे प्रतिपादन योग्यच आहे आणि पाकिस्तानवर असा हल्ला करणं आपल्या हिताच नाही हेच खरं आहे...पण मग सतत न्यूक्लिअर वेपन्स /मटेरिअल जिहादींच्या हाती लागण्याची भिती आहे त्याच काय करायच ? आता अफगाणिस्तान मधुन अमेरिकेचे सैन्य माघारी जायला सुरु होइल आणि या जिहादींना काही काम उरणार नाही,पाकिस्तान आता त्यांच्या विरुद्ध कारवाई केल्या सारखे भासवेल नंतर याच मंडळींना आपल्या विरुद्ध जुंपतील त्याचे काय ? कारण जे नवाझ शरिफ आज आतंकवादाच्या विरोधात सुर आळवत आहेत त्यांनीच काही दिवसां पूर्वीच हाफिद सईदच्या सभेला जनसागर पाठवण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली होती.त्यामुळे ह्यांच्याकडुन आपल्याला त्रास आहेच !
येत्या वर्षात काय घडामोडी होतात ते पहायला हवे...

जाता जाता :-
हे दुवे हिंदूस्थान-पाकिस्तानशी संबंधीत नसुन रेडियेशनशी संबंधीत मुद्धाशी असल्याने माहितीसाठी देउन ठेवत आहे.
http://www.netc.com/
Tiny amounts of Fukushima radiation found in California
Fukushima Radioactivity Detected Off West Coast
Sickened by service: More US sailors claim cancer from helping at Fukushima

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyz

एक्का कांकाचा चेर्नोबिल वरचा प्रतिसाद आणि डॉक यांचा किरणोत्साराचा प्रादुर्भावाचे थोडक्यात विष्लेषण मला या विषयावर अधिक विचार आणि वाचन करण्यास प्रवॄत्त करणारे ठरले.., यातील चेर्नोबिल घटना मला माहित होती आणि त्याबद्धल थोडी फार माहिती होती आणि त्यामुळेच पटकन Bitter butter चा दुवा मला देता आला... यावर अजुन विचार करतोय कारण आपली एनर्जीची गरज आहे आणि न्यूक्लिअर पावरची गरज आणि सेटअप वाढणार आहे.
खालील दोन्ही व्हिडीयो नीट ऐकण्या सारखे आहेत...कारण फुकुशिमाचा परिणाम हा चेर्नोबिल पेक्षा जवळपास ८५% जास्त आहेत म्हणतात... आणि ही कधीही न-संपणारी दुर्घटना आहे. ! न्यूक्लिअर वेपनचा वापर करणे हे किती भयानक आहे याचा अंदाजा आला !

Fukushima Forever

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नायक नही, खलनायक हुं मै :- खलनायक

सुबोध खरे's picture

25 Dec 2014 - 12:29 pm | सुबोध खरे
विनोद१८'s picture

25 Dec 2014 - 12:38 pm | विनोद१८

उत्तम व अभ्यासपूर्ण प्रतिसाद.

आमचा एक्स (सर्वार्थानं) मित्र परा म्हणतो तसं खरंच भारतीय च नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची सगळी सूत्रं मिपावरुनच हलतात असा भास होत आहे. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Dec 2014 - 3:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोई शक ? हाँ... :)