थोडी प्रस्तावना-''मी माझा'' हा चंद्रशेखर गोखले यांचा चारोळी काव्य संग्रह,अंदाजे१२ वर्षांपुर्वी आला होता.तो त्यावेळी जसा आला तसाच भरपूर गाजला देखिल होता...''त्या काळी''त्याची पारायंणं करण्यात आंम्ही अग्रेसर होतो.म्हणजे एके काळी मी त्यांचा fan होतो,त्यानंतर पुला खालुन बरच पाणी वाहुन गेल्यानंतर त्याचा पंखा झाला.तोपर्यंत चंगुचे २/३पुढील भागही प्रसारित झालेले होते.पण नंतर त्यात चव राहिली नाही म्हणुन म्हणा,किंवा त्याचा कंटाळा आला म्हणुन असेल...पण ते वाचण्या अईवजी त्याचं विडंबनच सुचू लागलं.तीच विडंबनं आता मुळ कवितांसह इथे भागशः प्रसारित करत आहे. (आधी मुळकाव्य व नंतर विडंबन असा क्रम मुद्दामच सोय म्हणुन ठेवला आहे.)
१)नेहमीच डोक्यानं विचार करु नये....................नेहमीच बेसनाचा विचार करु नये
कधी भावनांनाही वाव द्यावा...........................बटाट्यांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना..................................भुकेलेल्या पोटांना
स्वप्नांचा गाव द्यावा.....................................'चांगला' वडापाव द्यावा
२)खराट्यानं झाडतात ते.................................. तांब्यानी टाकतात ते
प्राजक्ताचा सडा..............................................जिलबीचा वेढा
आणि मी हळहळलो,तर म्हणतात.....................आणी मी कळवळलो तर
हा खरा वेडा.............................................मला देतात पेढा
३)सगळं तुला देऊन पुन्हा..................................तुझ्यात कळशी ओतुनही
माझी ओंजळ भरलेली....................................माझी कळशी भरलेली
पाहिलं तर तू तुझी ओंजळ..............................पाहिलं तर,तू तुझी कळशी
माझ्या ओंजळीत धरलेली............................. माझ्या कळशीवर धरलेली
४)झाडावरुन प्राजक्त ओघळतो...................... चौरंगावरुन नारळ पडतो
त्याचा आवाज होत नाही...........................धप्प-कन आवाज होतो--नाही???
याचा अर्थ असा नाही.................................याचा अर्थ असा नाही
की त्याला इजा होत नाही..........................की पुजेत मजा येत नाही
५)मिठी या शब्दात.....................................मिठि नावाच्या नाटकात
केवढी मिठास आहे..................................केवढी मिठ्ठी - आस आहे
नुसता उच्चारला तरी..............................हस्तस्पर्श ही प्राथमिकता
क्रुतीचा भास आहे....................................तर''चुंबन''फुकट पास आहे
पराग दिवेकर
प्रतिक्रिया
9 Jul 2011 - 5:53 pm | जयंत कुलकर्णी
:-) :-)
9 Jul 2011 - 11:03 pm | विजुभाऊ
एक सपक विडंबन
10 Jul 2011 - 5:29 pm | अत्रुप्त आत्मा
आपलीही प्रतिक्रीया फारशी चवदार नाहिये.. बेचवचं आहे.
13 Apr 2016 - 7:49 pm | प्रचेतस
=))
11 Jul 2011 - 8:54 pm | गणेशा
अप्रतिम ...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
18 Oct 2014 - 1:00 pm | सतिश गावडे
बरेच दिवस हा काव्यसंग्रह शोधत होतो. मात्र तो छपाईच्या बाहेर आहे.
शेवटी एका सृहदाने त्याचा काही भाग मिपावर आहे असे सांगितले. लेखनाचा दूवाही दिला.
http://misalpav.com/user/14767/authored?page=12
विडंबन काव्यमाला-भाग-१ ,२,३ बघा.
18 Oct 2014 - 1:33 pm | यसवायजी
https://www.scribd.com/doc/171399479/Me-Maza
18 Oct 2014 - 1:08 pm | खटपट्या
चान्गलंय !!!
18 Oct 2014 - 1:41 pm | स्वामी संकेतानंद
हाहाहा !! बुव्वेश .... भन्नाट जमेश....
(व्यनि पाहावा)
18 Oct 2014 - 8:01 pm | विवेकपटाईत
मजा आली, तसे मला विडंबन नेहमीच आवडते.
19 Oct 2014 - 7:29 am | प्रचेतस
वा.....!!!!
एका पेक्षा एक सरस विडंबित चारोळ्या.
19 Oct 2014 - 11:34 am | किसन शिंदे
=))
20 Oct 2014 - 1:02 pm | बॅटमॅन
च्यायला. जिलबी अन भांडे यांचा इतिहास इतका जुना आहे होय???? नवीनच विदा मिळाला, बहुत धन्यवाद गुर्जी =))
20 Oct 2014 - 1:18 pm | वेल्लाभट
आम्ही कॉलेजात असताना मॅजेस्टिक मधे याची पुस्तकं चाळत (खिल्ली उडवणं हा उद्देश) खिदळत बसायचो. आणि मुलं-मुली कशी फिदा बिदा होतात या ओळींवर याचा आढावा घेत हसायचो.
20 Oct 2014 - 1:18 pm | वेल्लाभट
पण विडंबनं झकास !
क्लास जमलीयत ! वाह !
20 Oct 2014 - 1:22 pm | दिपक.कुवेत
मस्तच. छान जमल्य हो बुवा.
13 Apr 2016 - 11:37 am | टवाळ कार्टा
अर्रे हे आज वाच्ले...
13 Apr 2016 - 11:45 am | बोका-ए-आझम
म्हणजे १९९३-९४ पासून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चारोळ्या छान असायच्या. थोड्या उगाचच.काॅम असायच्या पण तेव्हा आवडायच्या एवढं नक्की. माझ्या एका मैत्रिणीला - घर हे दोघांचं, दोघांनी सावरायचं; एकाने पसरलं तर दुस-याने आवरायचं ही चारोळी खूप आवडायची - हे आठवतं.
13 Apr 2016 - 3:37 pm | सूड
अत्यंत घैरी नि घंबीर चारोळी, कोणी कशात काय ओतलं ते शेवटपर्यंत कळत नाही.
13 Apr 2016 - 3:44 pm | तर्राट जोकर
खरं आहे.
13 Apr 2016 - 6:02 pm | टवाळ कार्टा
फार छुपा अर्थ दडलेला है त्यात ;)
13 Apr 2016 - 6:39 pm | सूड
रसग्रहण लिवा टक्कोजीराव!!
14 Apr 2016 - 11:13 am | नाखु
टक्याने अता अनमान करू नये.
गुरुसेवेचा असा प्रसंग वारंवार येत नाही..
प्रेक्षक नाखु
14 Apr 2016 - 12:32 pm | टवाळ कार्टा
इथे नको...तिकडे या...तिकडे आयडी उडवत नाहीत :)
14 Apr 2016 - 1:34 pm | पैसा
"इथं नको तिथं जाऊ
आडोशाला उभं राहू"
"का?"
"बघत्यात!"
13 Apr 2016 - 7:49 pm | प्रचेतस
उच्च दर्जाची विडंबने.
ह्यातही तांब्या, जिलबी असे शब्द टाकून विडंबकाने बहार आणलीय.
13 Apr 2016 - 7:55 pm | कंजूस
धनु राशीला साडेसाती आहे काय?
14 Apr 2016 - 11:31 am | खटपट्या
धन्या माहीत आहे, धनू कोण ?
14 Apr 2016 - 11:58 am | रातराणी
मिठीबाई नावाच्या कॉलेजात
केवढी मिठी गंमत आहे
नुसता प्रवेश मिळाला तरी
मिठाया देण्याची पद्धत आहे ;)