नमस्कार मंडळी!
बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप. हे "जिओ मिपा" पुढे चालू रहिलं तर 'जियो मिपा' म्हणुयात!
मी केवळ सुरूवात करून देतो आहे, यात प्रत्येक मिपाकराने आणि मिपाकरणीने आपापल्या परीने भर घालावी ही अपेक्षा आणि विनंती!
उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
युरोपातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
मिपाकरांनी आपापले सद्य-स्थान या नकाशात आपल्या आय-डी सह दर्शवले की ते नकाशावर असे पोपटी रंगातल्या झेंड्यात दिसेलः
या झेंड्यावर 'क्लिक' केले असता एक बॉक्स उघडेल ज्यात त्या मिपाकराच्या मिपावरील लेखनाचे दुवे असतीलः
तुम्हाला तुमच्या भटकंतीच्या लेखाविषयी वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रकाशचित्रांपैकी एखाद्या खास चित्राचा दुवा द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकाल; त्यासाठी 'website' अशी बॉक्स असेल त्यात आपल्या प्रकाशचित्राचा असा दुवा द्या:
म्हणजे ते प्रकाशचित्र असं दिसेलः
आता हे करणं अगदी सोपं आहे, त्यासाठीच्या सूचना पुढे देतो आहे:
- सुरूवातीला आपल्याला हवा तो लेख निवडून त्याचं शीर्षक आणि मिपावरील दुवा हे जमा करून ठेवावेत. मग खालीलप्रमाणे नकाशावर जाऊन हे दुवे add करावेतः
- यातील Marker या pull-down box मध्ये झेंड्याचा योग्य रंग निवडा: म्हणजे मिपाकरांच्या स्थानासाठी green, मिपाकरांच्या कट्ट्यासाठी Teal तर मिपाकरांच्या भटकंतीसाठी Blue हे रंग निवडा.
वर लिहिल्याप्रमाणे मी केवळ सुरूवात करून देतो आहे. मला सहज सापडले असे कट्टे आणि भटकंतींचे लेख सध्या या नकाशावर समाविष्ट आहेत. वाचकांनी आणि मिपा लेखकांनी आपापल्या आणि इतरांच्या आवडलेल्या भटकंतींची आणि कट्ट्यांची इथे नोंद करावी. हा नकाशा open access असा आहे, त्यामुळे नोंदी करण्यासाठी सभासदत्व लागत नाही.
कधी कधी दोन भटकंती एकाच गावी झाल्याने असे लेख एकाच झेंड्याने नकाशावर दाखवले जातील, उदाहरणार्थ 'किल्ले हरिहर' आणि 'हरिहर - एक ट्रेक कथा' हे दोन्ही लेख 'त्रिंबक' या एकाच झेंड्याखाली लपलेले असतील.
अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः
म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल.
मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-)
आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!
प्रतिक्रिया
7 Oct 2014 - 1:34 am | आदूबाळ
जबरदस्त! नंबरी.
7 Oct 2014 - 7:08 am | अनुप ढेरे
हेच म्हणतो.
7 Oct 2014 - 1:34 am | श्रीरंग_जोशी
मी माझ्या ठिकाणावर पोपटी मार्कर रोवला आहे :-) .
या उपक्रमाकरीता धन्यवाद.
7 Oct 2014 - 3:13 am | बहुगुणी
सामील झाल्याबद्दल धन्यवाद! एकसंधपणासाठी मी तुमचं लेखन 'Description' या दुव्यात टाकलंय. आणि (हे स्थळ globally open असं असल्याने) सुरक्षिततेच्या कारणासाठी तुमच्या घराचा पत्ता वगळला आहे (त्याचा काही दुरूपयोग होऊ नये अशी सदिच्छा आहे म्हणून), ज्यांना तुमच्याशी संपर्क करायचा आहे त्यांना इतर मार्ग आहेतच, 'आणखी नसतं दार कशाला उघडा' असा विचार यामागे आहे, पण याउपर तुम्हाला योग्य वाटल़ं तर तुम्ही पत्ता अर्थातच टाकू शकता. (मार्करचा रंग light green ऐवजी green असा दुरुस्त केला आहे.)
7 Oct 2014 - 4:47 am | श्रीरंग_जोशी
मार्कर सेट करताना माझ्याही मनात हा विचार डोकावला होता. पण माझ्यातल्या बिनधास्तपणाने तो उडवून लावला.
जून महिन्यातील शनिवारवाडा कट्ट्याचाही मार्कर सेट केला आहे.
7 Oct 2014 - 2:08 am | आयुर्हित
छान उपक्रम ! सर्वांना कामाला लावताय! पण हरकत नाही.
मी माझ्या ठिकाणावर पोपटी (Pl. Select Green while seleting colour) मार्कर रोवला आहे.
या उपक्रमाकरीता धन्यवाद.
7 Oct 2014 - 3:16 am | बहुगुणी
तुमचंही लेखन description या दुव्यात जोडलं आहे.
7 Oct 2014 - 11:06 am | आयुर्हित
धन्यवाद.
7 Oct 2014 - 2:29 am | अमित खोजे
आता सर्व जवळपासची भटकंतीची ठिकाणे लगेच सापडायला हरकत नाही.
तसेच आसपास कोणी मिपाकर आहेत का ते हि कळेल.
7 Oct 2014 - 2:49 am | खटपट्या
मी माझ्या ठिकाणावर पोपटी मार्कर रोवला आहे Smile .
या उपक्रमाकरीता धन्यवाद.
7 Oct 2014 - 3:17 am | बहुगुणी
किरकोळ दुरुस्ती करून तुमच्या लेखनाचा दुवा जोडला आहे. धन्यवाद!
7 Oct 2014 - 4:51 am | खटपट्या
अरे वा !! धन्यवाद !
अजुन आफ्रिकेवरुन कोणीच दिसत नाही.
7 Oct 2014 - 3:37 am | टपरी
मी माझ्या ठिकाणावर पोपटी मार्कर रोवला आहे.
7 Oct 2014 - 3:40 am | निशदे
मार्कर रोवला आहे......... उत्तम उपक्रम.... :)
7 Oct 2014 - 4:51 am | रेवती
एकदम छान! मजा वाटली.
7 Oct 2014 - 5:17 am | बहुगुणी
निशदे: तुमच्या लेखनाचा दुवा 'Description' मध्ये दिला आहे.
रेवतीताई: तुमचीही "नोंद" घेतली आहे!:-) हरकत नसावी अशी अपेक्षा.
7 Oct 2014 - 5:16 pm | रेवती
धन्यवाद.
7 Oct 2014 - 5:17 am | जुइ
7 Oct 2014 - 5:20 am | स्पंदना
हे अस काही करणारे तुम्ही "पयले" बहुगुणी.
वेल डन!!
मी ट्राय करते आहे.
7 Oct 2014 - 5:47 am | नेत्रेश
हीरवा मार्कर रोवण्यात आले आहे!
7 Oct 2014 - 6:04 am | कंजूस
या निमित्ताने झाले सिमोल्लंघन !
7 Oct 2014 - 6:18 am | पहाटवारा
मार्कर टाकला आहे ..
-पहाटवारा
7 Oct 2014 - 6:54 am | बहुगुणी
तुमच्या लेखनाची 'Discussion' या क्षेत्रात नोंद केली आहे.
7 Oct 2014 - 6:38 am | पहाटवारा
चला ..आता या निमित्तने आता निवासि-अनिवासी खेळ जास्त चांगला खेळता येइल :)
7 Oct 2014 - 6:52 am | बहुगुणी
यामागे असाही उद्देश होता की गावो-गावी आणि देशो-देशी प्रवास करणार्यांना त्या त्या ठिकाणी कोण कोण मिपाकर आधीच स्थित आहेत हे नकाशावर जाणून घेऊन आगावू माहिती घेता यावी (आणि जमल्यास डेराही टाकता यावा ;-) !)
7 Oct 2014 - 6:57 am | पहाटवारा
चला .. या डिसेंबरात मायामिलाच डेरा टाकावा काय ? :)
7 Oct 2014 - 7:07 am | बहुगुणी
जरूर या हो!
(बाकी ते डिसेंबरात आम्ही मायामीलाच असू हे कशावरून ;-) ?)
7 Oct 2014 - 7:17 am | चतुरंग
मस्तच आहे हे. हा प्रकार हुडकल्याबद्दल धन्यवाद बहुगुणी!
7 Oct 2014 - 7:37 am | विलासराव
चला आता आम्ही पण आलो नकाशावर .
7 Oct 2014 - 7:41 am | मुक्त विहारि
तुम्हाला "बहुगुणी" नांव एकदम सार्थ आहे.
7 Oct 2014 - 7:50 am | आशिष काळे
जगभरातील मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम तुम्ही करत आहात
जियो बहुगुणी जियो
7 Oct 2014 - 7:59 am | बहुगुणी
तुम्हा दोघांच्या लेखनाचे दुवे 'Description' मध्ये जोडले आहेत.
एक सूचना: 'Description' मध्ये आपल्या लेखनाचे दुवे देतांना
http://www.misalpav.com/mycontent.html हा फॉर्मॅट न वापरता
http://www.misalpav.com/user/आपला सभासद क्रमांक/authored हा. फॉर्मॅट वापरावा, अन्यथा जी व्यक्ति लॉग इन करून वाचन करीत आहे त्या व्यक्तिस (तुमचे लेखन न दिसता) स्वतःचे लेखन दिसेल.7 Oct 2014 - 8:28 am | किसन शिंदे
एकदम भारी उपक्रम!!
7 Oct 2014 - 8:31 am | जयंत कुलकर्णी
मी माझा मार्कर टाकला आहे "सूर्यफूल'' पण माझ्या लेखनाचा दूवा कोठे टाकायचा ते काही सापडले नाही....दूवा खाली दिला आहे...बहुगुणी तेवढा टाकून दिलात तर बरे होईल
http://www.misalpav.com/user/9199/authored
आणि धन्यवाद !
7 Oct 2014 - 8:51 am | बहुगुणी
जयंतराव, तुम्ही लेखनाचा दुवा योग्य ठिकाणी ('Description' मध्ये) दिला आहे, तुमच्या फेसबुकाच्या माहितीबद्दलही धन्यवाद!
तुम्हाला 'सूर्यफूल' आवडतं हे खरं आहे, पण मिपाकरांचे एकसारखे स्थान-निर्देशक म्हणून सर्व नकाशावर एकाच प्रकारच्या रंगाचे (पोपटी) झेंडे लावावेत असं वाटतं. तुमची हरकत नसेल तेवढा बदल करा.
7 Oct 2014 - 8:53 am | जयंत कुलकर्णी
ओ.के.
7 Oct 2014 - 8:42 am | प्रभाकर पेठकर
माझी खूण साठविली आहे. धन्यवाद, बहुगुणी साहेब.
7 Oct 2014 - 8:55 am | बहुगुणी
पेठकर साहेब, तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे, तसंच झेंड्याचा रंग पोपटी केला आहे. धन्यवाद!
7 Oct 2014 - 9:03 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद बहुगुणी साहेब.
7 Oct 2014 - 8:52 am | प्रचेतस
जबरी.
माझ्या ठिकाणावर मार्कर टाकलाय तसेच अजिंठा लेणीतही निळा मार्कर रोवला आहे.
7 Oct 2014 - 9:00 am | बहुगुणी
परफेक्ट, वल्ली शेठ! तुमच्याकडून मात्र तुमच्या भटकंतींचे खूप दुवे अपेक्षित आहेत, वेळ मिळेल तसे ते अपलोड करत रहा.
7 Oct 2014 - 9:01 am | प्रचेतस
हो.
नक्कीच करतो.
7 Oct 2014 - 9:10 am | इनिगोय
आहात खरे बहुगुणी! झेंडा रोवला आहे.
असंच संकलन कार्यक्षेत्राच्या संदर्भात करता येईल काय?
7 Oct 2014 - 9:21 am | बहुगुणी
असं नकाशा-आधारित संकलन कार्यक्षेत्राच्या संदर्भात कसं करता येईल ते जरा स्पष्ट करून सांगता का? शक्य असेल तर नक्कीच प्रयत्न करायला आवडेल.
(तुमच्या झेंड्यावर तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे.)
7 Oct 2014 - 9:39 am | प्रमोद देर्देकर
@ बहुगुणी साहेब:- नावा प्रामाणे बहुगुणी आहात. आम्हीही आमचा झेंडा रोवला आहे. तसेच डिस्क्रिप्शनवर क्लिकवल्यास आमचे लेखान दिसु लागले आहे.
या शोधकार्याबद्दल धन्यावाद.
@ इनिगोयः-
होय करता येईल.
तुम्ही https://www.zeemaps.com/ या मुळ साईडवर जावुन नविन पान उघडा तुमच्या कं. च्या नावाने सुरुवात करा. जिथे शाखा असतील तिथे असेच झेंडा रोवा. हाकानाका.
7 Oct 2014 - 9:26 am | माम्लेदारचा पन्खा
ह्यामागचे दूरदर्शी विचार आणि अथक परिश्रम अतिशय स्तुत्य आहेत....
7 Oct 2014 - 9:30 am | चौकटराजा
मी " चौकटराजा" असल्याने मला तीन चार वेळा वाचूनच कळेल काय भानगड आहे ही ते ! प्रथमदर्शनी मात्र हे अनेकाना जवळ आणणारे उपयुक्त प्रोजेक्ट वाटतेय ! बहुगुणी रावाना, दंडवत . अक्षरास हसू नये !
7 Oct 2014 - 9:48 am | बहुगुणी
मी खालील काही स्थान-विशिष्ट पाककृती नवीन (बर्गंडी) रंगातील झेंड्यांनी दर्शवल्या आहेतः
तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश वांग्याचे भरीत)...इस्तंबूल
झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा !!...कोल्हापूर
स्टर-फ्राईड चायनिज चिकन .... चायना
सोराक....गोवा
स्पॅनिश ऑमलेट....स्पेन
आणखी असे पदार्थ मिपाकर जोडतीलच. आधीच धन्यवाद!
7 Oct 2014 - 10:01 am | जेपी
माझा मार्कर टाकला आहे. ३०० किमी परिघात एकटाच आहे.
7 Oct 2014 - 10:02 am | जेपी
बेश्ट ऊपक्रम
7 Oct 2014 - 10:25 am | सुहास झेले
सुपर्ब ... आवडली कल्पना :)
7 Oct 2014 - 10:41 am | दिपक.कुवेत
निव्वळ स्तुत्य. आता ते कसं करायचं हे जरा सावकाश वाचुन मग मी माझा हि झेंडा रोवतो....
7 Oct 2014 - 11:07 am | किसन शिंदे
माझ्या ठिकाणाचा झेंडा रोवलाय पण मला माझ्या लेखनाचे दुवे देता येत नाहीयेत, त्याचबरोबर राजगड, देवगिरी आणि कर्नाळा किल्ल्यांची ठिकाणं दाखवायची आहेत.
7 Oct 2014 - 4:44 pm | बहुगुणी
किल्ल्यांची नेमकी (किंवा नकाशावर जवळपासच्या गावांची)लोकेशन्स मिळाली की तीही टाकेन. धन्यवाद!
7 Oct 2014 - 11:25 pm | किसन शिंदे
धन्यवाद जी!
7 Oct 2014 - 11:29 am | मार्मिक गोडसे
मार्कर टाकलाय. लोकेशन दाखवत नाही. (ठाणे)
7 Oct 2014 - 4:48 pm | बहुगुणी
तुम्ही हरवले नाही आहात :-)
झेंडा आहे, वेस्ट ठाणे या भागात, ढोकली आणि कैलाश नगर यांच्या मध्ये झूम केल्यावर दिसतो. तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे.
8 Oct 2014 - 9:35 am | मार्मिक गोडसे
धन्यवाद.
7 Oct 2014 - 11:45 am | अजया
झेंडा रोवला! मस्तच उपक्रम!!
7 Oct 2014 - 11:52 am | आतिवास
कल्पना आणि उपक्रम एकदम मस्त आहे.
पण तंत्रज्ञानातलं कळायला जरासा वेळ लागतो, त्यामुळे सावकाश बघते प्रत्यक्ष काय करता येईल ते.
7 Oct 2014 - 4:46 pm | आतिवास
नकाशात झेंडा लावला आहे. बाकी ते लेखाचे दुवे वगैरे जमले नाहीत अजून - बघू कधी जमतंय ते!
7 Oct 2014 - 5:08 pm | बहुगुणी
आफ्रिकेत पहिला झेंडा रोवल्याबद्दल धन्यवाद!
(ते गणपाशेठ अजून उमटले ना।हीयेत नकाशावर!)
लेखनाचा दुवा देण्यास अडचण येत असेल अशा सर्वांच्याच माहितीसाठी:
झेंड्यावर क्लिक केल्यावर Change Entry चा बॉक्स उघडेल, त्यातील Details या टॅबवर क्लिक केल्यास Description ही बॉक्स उघडते. त्यात आपल्या लेखनाचा दुवा http://misalpav.com/user/इंग्लिशमधून सभासद क्रमांक/authored असा द्यावा, आणि Submit हे बटन दाबावे.
7 Oct 2014 - 11:54 am | सविता००१
मस्तच आहे आयडिया
7 Oct 2014 - 12:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट आयडिया आहे !
7 Oct 2014 - 12:40 pm | जागु
खरच उल्लेखनिय उपक्रम आहे तुमचा.
7 Oct 2014 - 2:34 pm | पैसा
मार्कर लावला आहे. तसे आमचे अनाहिता कट्टे पण होतात. मात्र ते या नकाशात मार्क करायचे का यावर आधी चर्चा करू आणि मग सांगू! ;)
7 Oct 2014 - 2:36 pm | आदूबाळ
अपडेट केलेलं आहे!
7 Oct 2014 - 2:36 pm | सुहास..
खरोखरच बहुगुणी आहात !
7 Oct 2014 - 2:51 pm | ज्ञानोबाचे पैजार
झेंडा रोवला आहे
पैजारबुवा,
7 Oct 2014 - 4:12 pm | यसवायजी
भारीच.
माझ्या या भटकंतीची ज्यायरात केल्या गेली आहे. :)
7 Oct 2014 - 5:19 pm | मधुरा देशपांडे
मस्त उपक्रम. आवडला. भटकंतीचे दुवे अॅड केलेत. :)
7 Oct 2014 - 6:07 pm | सखी
चांगला उपक्रम, बहुगुणी अनेक धन्यवाद तुम्हाला.
7 Oct 2014 - 5:45 pm | सौंदाळा
सहीच.
वल्लीबुवांच्या शेजारीच झेंडा रोवला आहे.
7 Oct 2014 - 6:10 pm | अर्धवटराव
एकदम अभिनव उपक्रम.
7 Oct 2014 - 6:33 pm | संदीप चित्रे
ही आयडिया खूपच आवडली..
7 Oct 2014 - 6:51 pm | दिपक.कुवेत
हिरवा झेंडा मार्क केला आहे. जरा बघता का बहुगुणी साहेब?
7 Oct 2014 - 7:55 pm | कंजूस
अपंगांसाठीही मदत करा आणि माझा झेंडा कुणीतरी लावून टाका ही विनंती.
बाकी महाराष्ट्रात पश्चिम आणि पूर्व, विदर्भावर अन्याय इत्यादी निवडणुकीच्या भाषणबाजीत ऐकायला मिळत आहे ते झेंड्यांची याबाजुची गर्दी पाहून खरे वाटते आहे. तरुण आणि होतकरू मिपाकरांनी तिकडे कमीतकमी ताडोबा, नागझिरा, पवनार, हेमलकलसा इथे जाऊन झेंडे लावावेत आणि महाराष्ट्राला शोधून १४ ऑक्टोबरपर्यँत योग्य जागी आणून ठेवावा.
7 Oct 2014 - 11:29 pm | बहुगुणी
तुम्हाला पश्चिम डोंबिवलीत बसवलंय :-)
तुमच्या लेखनाचा दुवाही अॅड केलाय, आता तुमच्या भटकंतींचे दुवे त्या-त्या ठिकाणी योग्य त्या रंगात (blue) जोडून टाका म्हणजे झालं.
8 Oct 2014 - 9:23 am | कंजूस
धन्यवाद!
7 Oct 2014 - 8:50 pm | प्यारे१
आमचा लाल तारा लागला. चुकला का बरोबर आहे?
7 Oct 2014 - 10:13 pm | बहुगुणी
धन्यवाद!, तुमच्या लेखनाचा दुवा Description मध्ये जोडला आहे.
तसंच तुमचा झेंड्याचा रंग ठीकठाक केलाय (व्हेन इन रोम, बी अ रोमन!) :-)
8 Oct 2014 - 1:53 pm | प्यारे१
रोमलो रोमलो.
आभारी आहोत.
7 Oct 2014 - 9:04 pm | मेघवेडा
मस्त!
7 Oct 2014 - 11:35 pm | बहुगुणी
लावून टाका!
7 Oct 2014 - 10:29 pm | दशानन
मी आलो आहे, योग्य प्रकारे आलो आहे का तेवढे पहा प्लीज :)
7 Oct 2014 - 11:03 pm | बहुगुणी
धन्यवाद!
आता आणखी ते 'भटकंतीं'चे झेंडे लावून टाका ('तिकोना' आणि 'राजमाची' मला वाटतं मी टाकले आहेत, श्रवणबेळगोळ, बेल्लुर वगैरे झेंडे योग्य रंगात लावा.)
7 Oct 2014 - 11:09 pm | अंतु बर्वा
एकदम तोडू आयडिया!!
मार्कर टाकण्यात आलेला आहे!
7 Oct 2014 - 11:19 pm | बहुगुणी
आणि झेंड्याच्या रंगात किंचित करेक्शन केलंय.
तुमच्या भटकंती (The Windy City...) चा देखील दुवा नकाशावर दिला आहे.
9 Oct 2014 - 10:56 pm | अंतु बर्वा
बहुत धन्यवाद बहुगुणी सर!
2 Sep 2016 - 12:06 am | सही रे सई
माझापण मार्कर टाकला आहे.