Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 01:20
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
नमस्कार मंडळी! बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप. हे "जिओ मिपा" पुढे चालू रहिलं तर 'जियो मिपा' म्हणुयात! मी केवळ सुरूवात करून देतो आहे, यात प्रत्येक मिपाकराने आणि मिपाकरणीने आपापल्या परीने भर घालावी ही अपेक्षा आणि विनंती! उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः Mipa1 युरोपातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः mipa2 अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः Mipa3 मिपाकरांनी आपापले सद्य-स्थान या नकाशात आपल्या आय-डी सह दर्शवले की ते नकाशावर असे पोपटी रंगातल्या झेंड्यात दिसेलः Mipa4 या झेंड्यावर 'क्लिक' केले असता एक बॉक्स उघडेल ज्यात त्या मिपाकराच्या मिपावरील लेखनाचे दुवे असतीलः Mipa5 Mipa6 तुम्हाला तुमच्या भटकंतीच्या लेखाविषयी वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रकाशचित्रांपैकी एखाद्या खास चित्राचा दुवा द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकाल; त्यासाठी 'website' अशी बॉक्स असेल त्यात आपल्या प्रकाशचित्राचा असा दुवा द्या: Mipa7 म्हणजे ते प्रकाशचित्र असं दिसेलः Mipa8 आता हे करणं अगदी सोपं आहे, त्यासाठीच्या सूचना पुढे देतो आहे:
  • सुरूवातीला आपल्याला हवा तो लेख निवडून त्याचं शीर्षक आणि मिपावरील दुवा हे जमा करून ठेवावेत. मग खालीलप्रमाणे नकाशावर जाऊन हे दुवे add करावेतः Mipa11 Mipa12
  • यातील Marker या pull-down box मध्ये झेंड्याचा योग्य रंग निवडा: म्हणजे मिपाकरांच्या स्थानासाठी green, मिपाकरांच्या कट्ट्यासाठी Teal तर मिपाकरांच्या भटकंतीसाठी Blue हे रंग निवडा.
वर लिहिल्याप्रमाणे मी केवळ सुरूवात करून देतो आहे. मला सहज सापडले असे कट्टे आणि भटकंतींचे लेख सध्या या नकाशावर समाविष्ट आहेत. वाचकांनी आणि मिपा लेखकांनी आपापल्या आणि इतरांच्या आवडलेल्या भटकंतींची आणि कट्ट्यांची इथे नोंद करावी. हा नकाशा open access असा आहे, त्यामुळे नोंदी करण्यासाठी सभासदत्व लागत नाही. कधी कधी दोन भटकंती एकाच गावी झाल्याने असे लेख एकाच झेंड्याने नकाशावर दाखवले जातील, उदाहरणार्थ 'किल्ले हरिहर' आणि 'हरिहर - एक ट्रेक कथा' हे दोन्ही लेख 'त्रिंबक' या एकाच झेंड्याखाली लपलेले असतील. Mipa9 अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः Mipa10 म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल. मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-) आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!
  • Log in or register to post comments
  • 58168 views

प्रतिक्रिया

Submitted by आदूबाळ on Tue, 10/07/2014 - 01:34

Permalink

जबरदस्त! नंबरी.

जबरदस्त! नंबरी.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 10/07/2014 - 07:08

In reply to जबरदस्त! नंबरी. by आदूबाळ

Permalink

+१

हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 10/07/2014 - 01:34

Permalink

रोचक उपक्रम

मी माझ्या ठिकाणावर पोपटी मार्कर रोवला आहे :-) . या उपक्रमाकरीता धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 03:13

In reply to रोचक उपक्रम by श्रीरंग_जोशी

Permalink

थोडीशी दुरुस्ती

सामील झाल्याबद्दल धन्यवाद! एकसंधपणासाठी मी तुमचं लेखन 'Description' या दुव्यात टाकलंय. आणि (हे स्थळ globally open असं असल्याने) सुरक्षिततेच्या कारणासाठी तुमच्या घराचा पत्ता वगळला आहे (त्याचा काही दुरूपयोग होऊ नये अशी सदिच्छा आहे म्हणून), ज्यांना तुमच्याशी संपर्क करायचा आहे त्यांना इतर मार्ग आहेतच, 'आणखी नसतं दार कशाला उघडा' असा विचार यामागे आहे, पण याउपर तुम्हाला योग्य वाटल़ं तर तुम्ही पत्ता अर्थातच टाकू शकता. (मार्करचा रंग light green ऐवजी green असा दुरुस्त केला आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 10/07/2014 - 04:47

In reply to थोडीशी दुरुस्ती by बहुगुणी

Permalink

हरकत नाही

मार्कर सेट करताना माझ्याही मनात हा विचार डोकावला होता. पण माझ्यातल्या बिनधास्तपणाने तो उडवून लावला. जून महिन्यातील शनिवारवाडा कट्ट्याचाही मार्कर सेट केला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Tue, 10/07/2014 - 02:08

Permalink

छान उपक्रम ! सर्वांना कामाला लावताय!

छान उपक्रम ! सर्वांना कामाला लावताय! पण हरकत नाही. मी माझ्या ठिकाणावर पोपटी (Pl. Select Green while seleting colour) मार्कर रोवला आहे. या उपक्रमाकरीता धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 03:16

In reply to छान उपक्रम ! सर्वांना कामाला लावताय! by आयुर्हित

Permalink

सामील झाल्याबद्दल धन्यवाद!

तुमचंही लेखन description या दुव्यात जोडलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Tue, 10/07/2014 - 11:06

In reply to सामील झाल्याबद्दल धन्यवाद! by बहुगुणी

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by अमित खोजे on Tue, 10/07/2014 - 02:29

Permalink

एक नंबर

आता सर्व जवळपासची भटकंतीची ठिकाणे लगेच सापडायला हरकत नाही. तसेच आसपास कोणी मिपाकर आहेत का ते हि कळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 10/07/2014 - 02:49

Permalink

मी माझ्या ठिकाणावर पोपटी

मी माझ्या ठिकाणावर पोपटी मार्कर रोवला आहे Smile . या उपक्रमाकरीता धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 03:17

In reply to मी माझ्या ठिकाणावर पोपटी by खटपट्या

Permalink

किरकोळ दुरुस्ती

किरकोळ दुरुस्ती करून तुमच्या लेखनाचा दुवा जोडला आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 10/07/2014 - 04:51

In reply to किरकोळ दुरुस्ती by बहुगुणी

Permalink

अरे वा !! धन्यवाद !

अरे वा !! धन्यवाद ! अजुन आफ्रिकेवरुन कोणीच दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by टपरी on Tue, 10/07/2014 - 03:37

Permalink

छान उपक्रम

मी माझ्या ठिकाणावर पोपटी मार्कर रोवला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निशदे on Tue, 10/07/2014 - 03:40

Permalink

मार्कर रोवला आहे.........

मार्कर रोवला आहे......... उत्तम उपक्रम.... :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 10/07/2014 - 04:51

Permalink

एकदम छान! मजा वाटली.

एकदम छान! मजा वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 05:17

Permalink

निशदे

निशदे: तुमच्या लेखनाचा दुवा 'Description' मध्ये दिला आहे. रेवतीताई: तुमचीही "नोंद" घेतली आहे!:-) हरकत नसावी अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 10/07/2014 - 17:16

In reply to निशदे by बहुगुणी

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by जुइ on Tue, 10/07/2014 - 05:17

Permalink

स्तुत्य उपक्रम

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 10/07/2014 - 05:20

Permalink

अंहं!!

हे अस काही करणारे तुम्ही "पयले" बहुगुणी. वेल डन!! मी ट्राय करते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नेत्रेश on Tue, 10/07/2014 - 05:47

Permalink

चांगली कल्पना आहे.

हीरवा मार्कर रोवण्यात आले आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 10/07/2014 - 06:04

Permalink

या निमित्ताने झाले सिमोल्लंघन

या निमित्ताने झाले सिमोल्लंघन !
  • Log in or register to post comments

Submitted by पहाटवारा on Tue, 10/07/2014 - 06:18

Permalink

ऊत्तम कल्पना ..

मार्कर टाकला आहे .. -पहाटवारा
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 06:54

In reply to ऊत्तम कल्पना .. by पहाटवारा

Permalink

तुमच्या लेखनाची नोंद केली आहे

तुमच्या लेखनाची 'Discussion' या क्षेत्रात नोंद केली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पहाटवारा on Tue, 10/07/2014 - 06:38

Permalink

या निमित्तने आता निवासि-अनिवासी खेळ

चला ..आता या निमित्तने आता निवासि-अनिवासी खेळ जास्त चांगला खेळता येइल :)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 06:52

Permalink

यामागे असाही उद्देश होता की

यामागे असाही उद्देश होता की गावो-गावी आणि देशो-देशी प्रवास करणार्‍यांना त्या त्या ठिकाणी कोण कोण मिपाकर आधीच स्थित आहेत हे नकाशावर जाणून घेऊन आगावू माहिती घेता यावी (आणि जमल्यास डेराही टाकता यावा ;-) !)
  • Log in or register to post comments

Submitted by पहाटवारा on Tue, 10/07/2014 - 06:57

In reply to यामागे असाही उद्देश होता की by बहुगुणी

Permalink

ह्म्म...

चला .. या डिसेंबरात मायामिलाच डेरा टाकावा काय ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 07:07

In reply to ह्म्म... by पहाटवारा

Permalink

नेकी, और पूछ पूछ?

जरूर या हो! (बाकी ते डिसेंबरात आम्ही मायामीलाच असू हे कशावरून ;-) ?)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 10/07/2014 - 07:17

Permalink

झेंडा रोविला!!

मस्तच आहे हे. हा प्रकार हुडकल्याबद्दल धन्यवाद बहुगुणी!
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 10/07/2014 - 07:37

Permalink

चला आता आम्ही पण आलो नकाशावर

चला आता आम्ही पण आलो नकाशावर .
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 10/07/2014 - 07:41

Permalink

मस्तच आहे.....

तुम्हाला "बहुगुणी" नांव एकदम सार्थ आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष काळे on Tue, 10/07/2014 - 07:50

Permalink

मस्तच

जगभरातील मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम तुम्ही करत आहात जियो बहुगुणी जियो
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 07:59

Permalink

चतुरंग, विलासराव

तुम्हा दोघांच्या लेखनाचे दुवे 'Description' मध्ये जोडले आहेत. एक सूचना: 'Description' मध्ये आपल्या लेखनाचे दुवे देतांना http://www.misalpav.com/mycontent.html हा फॉर्मॅट न वापरता http://www.misalpav.com/user/आपला सभासद क्रमांक/authored हा. फॉर्मॅट वापरावा, अन्यथा जी व्यक्ति लॉग इन करून वाचन करीत आहे त्या व्यक्तिस (तुमचे लेखन न दिसता) स्वतःचे लेखन दिसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Tue, 10/07/2014 - 08:28

Permalink

एकदम भारी उपक्रम!!

एकदम भारी उपक्रम!!
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 10/07/2014 - 08:31

Permalink

मी माझा मार्कर टाकला आहे

मी माझा मार्कर टाकला आहे "सूर्यफूल'' पण माझ्या लेखनाचा दूवा कोठे टाकायचा ते काही सापडले नाही....दूवा खाली दिला आहे...बहुगुणी तेवढा टाकून दिलात तर बरे होईल http://www.misalpav.com/user/9199/authored आणि धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 08:51

In reply to मी माझा मार्कर टाकला आहे by जयंत कुलकर्णी

Permalink

जयंतराव, तुम्ही लेखनाचा दुवा योग्य ठिकाणी दिला आहे

जयंतराव, तुम्ही लेखनाचा दुवा योग्य ठिकाणी ('Description' मध्ये) दिला आहे, तुमच्या फेसबुकाच्या माहितीबद्दलही धन्यवाद! तुम्हाला 'सूर्यफूल' आवडतं हे खरं आहे, पण मिपाकरांचे एकसारखे स्थान-निर्देशक म्हणून सर्व नकाशावर एकाच प्रकारच्या रंगाचे (पोपटी) झेंडे लावावेत असं वाटतं. तुमची हरकत नसेल तेवढा बदल करा.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 10/07/2014 - 08:53

In reply to जयंतराव, तुम्ही लेखनाचा दुवा योग्य ठिकाणी दिला आहे by बहुगुणी

Permalink

ओ.के.

ओ.के.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 10/07/2014 - 08:42

Permalink

धन्यवाद.

माझी खूण साठविली आहे. धन्यवाद, बहुगुणी साहेब.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 08:55

In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर

Permalink

पेठकर साहेब,

पेठकर साहेब, तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे, तसंच झेंड्याचा रंग पोपटी केला आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 10/07/2014 - 09:03

In reply to पेठकर साहेब, by बहुगुणी

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद बहुगुणी साहेब.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 10/07/2014 - 08:52

Permalink

जबरी.

जबरी. माझ्या ठिकाणावर मार्कर टाकलाय तसेच अजिंठा लेणीतही निळा मार्कर रोवला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 09:00

In reply to जबरी. by प्रचेतस

Permalink

परफेक्ट, वल्ली शेठ!

परफेक्ट, वल्ली शेठ! तुमच्याकडून मात्र तुमच्या भटकंतींचे खूप दुवे अपेक्षित आहेत, वेळ मिळेल तसे ते अपलोड करत रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 10/07/2014 - 09:01

In reply to परफेक्ट, वल्ली शेठ! by बहुगुणी

Permalink

हो. नक्कीच करतो.

हो. नक्कीच करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Tue, 10/07/2014 - 09:10

Permalink

आहात खरे बहुगुणी! झेंडा रोवला

आहात खरे बहुगुणी! झेंडा रोवला आहे. असंच संकलन कार्यक्षेत्राच्या संदर्भात करता येईल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 09:21

In reply to आहात खरे बहुगुणी! झेंडा रोवला by इनिगोय

Permalink

म्हणजे कसं?

असं नकाशा-आधारित संकलन कार्यक्षेत्राच्या संदर्भात कसं करता येईल ते जरा स्पष्ट करून सांगता का? शक्य असेल तर नक्कीच प्रयत्न करायला आवडेल. (तुमच्या झेंड्यावर तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Tue, 10/07/2014 - 09:39

In reply to म्हणजे कसं? by बहुगुणी

Permalink

वाह मस्तच

@ बहुगुणी साहेब:- नावा प्रामाणे बहुगुणी आहात. आम्हीही आमचा झेंडा रोवला आहे. तसेच डिस्क्रिप्शनवर क्लिकवल्यास आमचे लेखान दिसु लागले आहे. या शोधकार्याबद्दल धन्यावाद. @ इनिगोयः- होय करता येईल. तुम्ही https://www.zeemaps.com/ या मुळ साईडवर जावुन नविन पान उघडा तुमच्या कं. च्या नावाने सुरुवात करा. जिथे शाखा असतील तिथे असेच झेंडा रोवा. हाकानाका.
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Tue, 10/07/2014 - 09:26

Permalink

आधुनिक बिरबल म्हणूया का तुम्हाला ?

ह्यामागचे दूरदर्शी विचार आणि अथक परिश्रम अतिशय स्तुत्य आहेत....
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 10/07/2014 - 09:30

Permalink

एक उपयुक्त प्रोजेक्ट...

मी " चौकटराजा" असल्याने मला तीन चार वेळा वाचूनच कळेल काय भानगड आहे ही ते ! प्रथमदर्शनी मात्र हे अनेकाना जवळ आणणारे उपयुक्त प्रोजेक्ट वाटतेय ! बहुगुणी रावाना, दंडवत . अक्षरास हसू नये !
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 10/07/2014 - 09:48

Permalink

ठिक-ठिकाणच्या खाद्य-खासियतीही दाखवता येतील.

मी खालील काही स्थान-विशिष्ट पाककृती नवीन (बर्गंडी) रंगातील झेंड्यांनी दर्शवल्या आहेतः तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश वांग्याचे भरीत)...इस्तंबूल झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा !!...कोल्हापूर स्टर-फ्राईड चायनिज चिकन .... चायना सोराक....गोवा स्पॅनिश ऑमलेट....स्पेन आणखी असे पदार्थ मिपाकर जोडतीलच. आधीच धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 10/07/2014 - 10:01

Permalink

माझा मार्कर टाकला आहे. ३००

माझा मार्कर टाकला आहे. ३०० किमी परिघात एकटाच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 10/07/2014 - 10:02

Permalink

बेश्ट ऊपक्रम

बेश्ट ऊपक्रम
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com