जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
7 Oct 2014 - 1:20 am

नमस्कार मंडळी!

बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप. हे "जिओ मिपा" पुढे चालू रहिलं तर 'जियो मिपा' म्हणुयात!

मी केवळ सुरूवात करून देतो आहे, यात प्रत्येक मिपाकराने आणि मिपाकरणीने आपापल्या परीने भर घालावी ही अपेक्षा आणि विनंती!

उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः

Mipa1

युरोपातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः

mipa2

अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
Mipa3

मिपाकरांनी आपापले सद्य-स्थान या नकाशात आपल्या आय-डी सह दर्शवले की ते नकाशावर असे पोपटी रंगातल्या झेंड्यात दिसेलः

Mipa4

या झेंड्यावर 'क्लिक' केले असता एक बॉक्स उघडेल ज्यात त्या मिपाकराच्या मिपावरील लेखनाचे दुवे असतीलः

Mipa5
Mipa6

तुम्हाला तुमच्या भटकंतीच्या लेखाविषयी वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रकाशचित्रांपैकी एखाद्या खास चित्राचा दुवा द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकाल; त्यासाठी 'website' अशी बॉक्स असेल त्यात आपल्या प्रकाशचित्राचा असा दुवा द्या:

Mipa7

म्हणजे ते प्रकाशचित्र असं दिसेलः

Mipa8

आता हे करणं अगदी सोपं आहे, त्यासाठीच्या सूचना पुढे देतो आहे:

  • सुरूवातीला आपल्याला हवा तो लेख निवडून त्याचं शीर्षक आणि मिपावरील दुवा हे जमा करून ठेवावेत. मग खालीलप्रमाणे नकाशावर जाऊन हे दुवे add करावेतः
    Mipa11

    Mipa12

  • यातील Marker या pull-down box मध्ये झेंड्याचा योग्य रंग निवडा: म्हणजे मिपाकरांच्या स्थानासाठी green, मिपाकरांच्या कट्ट्यासाठी Teal तर मिपाकरांच्या भटकंतीसाठी Blue हे रंग निवडा.

वर लिहिल्याप्रमाणे मी केवळ सुरूवात करून देतो आहे. मला सहज सापडले असे कट्टे आणि भटकंतींचे लेख सध्या या नकाशावर समाविष्ट आहेत. वाचकांनी आणि मिपा लेखकांनी आपापल्या आणि इतरांच्या आवडलेल्या भटकंतींची आणि कट्ट्यांची इथे नोंद करावी. हा नकाशा open access असा आहे, त्यामुळे नोंदी करण्यासाठी सभासदत्व लागत नाही.

कधी कधी दोन भटकंती एकाच गावी झाल्याने असे लेख एकाच झेंड्याने नकाशावर दाखवले जातील, उदाहरणार्थ 'किल्ले हरिहर' आणि 'हरिहर - एक ट्रेक कथा' हे दोन्ही लेख 'त्रिंबक' या एकाच झेंड्याखाली लपलेले असतील.

Mipa9

अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः

Mipa10

म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल.

मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-)

आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Oct 2014 - 12:21 am | मुक्त विहारि

बहुगुणींनी मदत केली आणि नकाशावर आमचे पण निशाण लागले.

वैभव जाधव's picture

8 Oct 2014 - 9:57 am | वैभव जाधव

मि आलो पण झेंडा अलग कलरचा दिसतोय. :(
पोपट टी करा की :)

बहुगुणी's picture

8 Oct 2014 - 9:07 pm | बहुगुणी

ज्या कोणाला हीच माहिती हवी असेलः Pull-down menu मधून green निवडायचं.

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2014 - 10:40 am | पिलीयन रायडर

मी पण केलं...!!!
कान्हा नॅशनल पार्क, भोरमदेव आणि रामटेक...!

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2014 - 12:00 pm | पिलीयन रायडर

मी स्वतःला टॅग केलय तर पत्ता - Mukki, Madhya Pradesh, India 481111 असा दिस्तोय.. टॅग तर पुण्यावर केलय...

बहुगुणी's picture

8 Oct 2014 - 9:16 pm | बहुगुणी

प्रवासवर्णनं टॅग केल्याबद्दल धन्यवाद! आणखी असतीलच, तीही टाका.

खेडूत's picture

8 Oct 2014 - 1:58 pm | खेडूत

जमलं !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2014 - 6:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगापूर आणि औरंगाबाद.

-दिलीप बिरुटे

बहुगुणी's picture

9 Oct 2014 - 9:26 am | बहुगुणी

तुमच्या वैयक्तिक झेंड्याचा दुरूस्त केलाय (पोपटी), बिबी का मकबर्‍याच्या भटकंतीचा दुवा टाकल्याबद्दल धन्यवाद.

धमाल मुलगा's picture

8 Oct 2014 - 7:44 pm | धमाल मुलगा

लय भारी आयडिया हो बहुगुणी. :)

किलमाऊस्की's picture

9 Oct 2014 - 6:38 am | किलमाऊस्की

माझ्या नावाचा झेंडा रोवलाय. वॉशिंग्टनात अजून कुणी दिसत नाहिये.

बहुगुणी's picture

15 Oct 2014 - 1:12 am | बहुगुणी

अनन्त अवधुत यांनी तुमच्या आसपास झेंडा रोवलाय....

बहुगुणी's picture

9 Oct 2014 - 9:16 am | बहुगुणी

या निमित्ताने तुमच्या 'मोनार्क' लेखमालेत (पुन्हा) डोकावून आलो, आणि तुमच्या पैसाताईंना बरोबर वर्षापूर्वी दिलेल्या वचनाची आठवण करून द्यावीशी वाटली! पुढची मालिका पुढच्या वर्षी.... आता संपत आलं वर्ष, वचनपूर्ती करा!

(आणि सिअ‍ॅटलला किंवा जवळपास आहे कुणीतरी मिपाकर, करतील झेंडालावणी लवकरच अशी आशा ठेवायला हरकत नाही, तसं अजून पिडा, नंदन, नाटक्या, वगैरे दिग्गजही यायचे बाकी आहेत पश्चिम किनार्‍यावरून.)

किलमाऊस्की's picture

9 Oct 2014 - 10:10 pm | किलमाऊस्की

नक्कीच, सध्या वैयक्तिक कारणांमुळे वेळ मिळत नाही आहे नविन काही लिहायला.

अनन्त अवधुत's picture

9 Oct 2014 - 11:21 pm | अनन्त अवधुत

झेंडा लावला आहे

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2014 - 11:00 am | अत्रुप्त आत्मा

जिओचा गजर आत्मुनामाचा झेंडा रोविला! http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif

नेत्रेश's picture

10 Oct 2014 - 5:38 am | नेत्रेश

एवढ्या मोठ्या Los Angeles मध्ये अवघे २ मिपाकर?
असो,कधी तरी निशदे ना भेटायचा योग येईल.

हे कट्टा-वर्णन वाचा, घाटावरचे भट, भाग्यश्री आणि पिवळा डांबिस हे तिघे अद्यापही आसपासच आहेत असं वाटतं.

नेत्रेश's picture

10 Oct 2014 - 9:55 am | नेत्रेश

६ वर्ष जुने आहे ते कट्टा वर्णन. आमेरीकेत लोकस ईतकी वर्षे एका जागी क्वचितच थांबतात

घाटावरचे भट, भाग्यश्री आणि पिवळा डांबिस यांनी झेंडे गाडले की त्यांची ठीकाणे समजतील

पिवळा डांबिस's picture

12 Oct 2014 - 10:55 am | पिवळा डांबिस

आमच्या झेंडे गाडण्याची उठाठेव तुम्ही करायची गरज नाही.
आम्ही इथे झेंडे गाडले काय, न गाडले काय, जे महत्वपूर्ण (मराठीतः सिग्निफिकन्ट) मिपाकर आहेत त्यांना आम्ही कुठे आहोत ते नक्की ठाऊक आहे...
तेंव्हा फक्त तुम्ही तुमचे काय ते झेंडे गाडा...

वा! याला म्हणतात मराठी बाणा !! मराठा तीतुका लोळवावा !!!

पिवळा डांबिस's picture

12 Oct 2014 - 11:31 am | पिवळा डांबिस

व्हॉटेव्हर!!!

बहुगुणी's picture

12 Oct 2014 - 6:29 pm | बहुगुणी

माझ्या विनंतीला मान देऊन पिवळा डांबिस यांनी सँटा मोनिका येथे झेंडा रोवला आहे, त्यावरून ते आपल्या किती जवळ आहेत ते लक्षात आलंच असेल.(त्यांच्या प्रतिक्रियेवरून हे एक जहाल रसायन वाटेल, पण ते एक अत्यंत resourceful असं व्यक्तिमत्व आहे असं ऐकून आहे :-) , बाकी ते 'आमेरीकेत लोकस ईतकी वर्षे एका जागी क्वचितच थांबतात' वगैरे सरसकट profiling विधानं करू नका, अगदी मी स्वतः देखील तुम्ही आहात त्या शहरात एका दशकाहून आधिक काल राहिलेलो आहे :-) )

नेत्रेश's picture

12 Oct 2014 - 8:14 pm | नेत्रेश

सरसकटीकरणा बाबत सहमत आहे. थोडे चुकलेच. गेल्या काही वर्षांत बरेचसे जवळचे मित्र नोकरी निमीत्त दूर गेले आहेत, त्यामुळे असे विधान केले गेले. कुणाला व्यक्तीशः दुखवायचा अजीबात उद्येश नव्हता. बाकी पिवळा डांबिस यांच्या बाबतीत माझाही 'एक उमदे व्यक्तीमत्व' असाच ग्रह होता, त्यामुळॅ त्यांचा अनपेक्षीत असा प्रतिसाद पाहुन थोडे आश्चर्यच वाटले. असो.

धन्यवाद.

या प्रतिसादावरची माझी प्रतिक्रिया चुकून खाली पडली आहे.

पिवळा डांबिस's picture

13 Oct 2014 - 10:06 am | पिवळा डांबिस

नेत्रेश, तुमचा व्यनि मिळाला. त्याला उत्तरही पाठवले आहे...
एकूण सगळा गैरसमजाचा खेळ दिसतो आहे, तेंव्हा सोडून द्या..
तुम्ही एल ए मध्ये कुठे असतां?

बाकी आपला 'झेंडा गाडणे' हा शब्द प्रयोग, हींदीतील 'झंडा गाड दीया' चा मराठी अनुवाद होता. श्री घाटावरचे भट व भाग्यश्री यांचा ही
गैरसमज व्हायला नको म्हणुन येथे खुलासा करत आहे.

सध्या एल ए मध्ये सॅन फर्नांडो व्हॅली मध्ये वास्तव्य आहे.

पिवळा डांबिस's picture

13 Oct 2014 - 10:11 am | पिवळा डांबिस

....... असं व्यक्तिमत्व आहे असं ऐकून आहे

नुसतं "ऐकून आहे" कशाला?
एकदा या आणि खात्री करा!
मिपाकरांचा संतोष, हेच आमचं समाधान!!!!
:)

त्या भागात येणं ठरलं तर आधी नक्की कळवेन.

स्वामी संकेतानंद's picture

10 Oct 2014 - 9:31 am | स्वामी संकेतानंद

दिल्लीवर मराठी झेंडा रोविला आहे! ;)

पैसा's picture

12 Oct 2014 - 5:34 pm | पैसा

स्वामीजी आले का मिपावर!

स्वामी संकेतानंद's picture

12 Oct 2014 - 6:21 pm | स्वामी संकेतानंद

धावतपळत आलो...

चौथा कोनाडा's picture

10 Oct 2014 - 11:49 pm | चौथा कोनाडा

बहुगुणी, एक नंबर काम केलेत ! तुम्हाला त्रिवार सलाम ! -------------------------- तुम्हाला आमच्या तर्फे मिपारत्न सन्मान ! खुप इंटरेस्टींग करून ठेवलत !

क्लिंटन's picture

12 Oct 2014 - 5:41 pm | क्लिंटन

खूपच चांगला उपक्रम. आवडला. अशा कल्पना याव्यात त्या बहुगुणींकडूनच.

वाशीवर माझा झेंडा रोवला आहे :)

बहुगुणी's picture

12 Oct 2014 - 6:33 pm | बहुगुणी

क्लिंटन: तुमच्या लेखनाचा दुवा दुरूस्त केला आहे, झेंडा लावल्याबद्दल धन्यवाद!

चौथा कोनाडा: झेंडा लावल्याबद्दल धन्यवाद! पण आता (तुमचं लेखन, भटकंती, कट्टे वगैरे) आणखी माहिती येऊ द्यात नकाशावर.

चौथा कोनाडा's picture

13 Oct 2014 - 9:42 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, बहुगुणी ! नक्की टाकेन.

चौथा कोनाडा's picture

13 Oct 2014 - 9:42 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, बहुगुणी ! नक्की टाकेन.

चौथा कोनाडा's picture

14 Oct 2014 - 7:15 am | चौथा कोनाडा

धन्यवाद बहुगुणी !

आता शब्दच्छल सोडून टंकनफळ्यावरचे मिनी-वादळ मागे राहू द्या, जवळपासचे इतर मिपाकर शोधून एक मस्त कट्टा घडवा, आणि येऊ द्या कट्टा-वर्णन मिपावर, आणि झेंडा जियो मिपावर!

बहुगुणी's picture

12 Oct 2014 - 9:36 pm | बहुगुणी

ही वरची प्रतिक्रिया नेत्रेश यांच्या प्रतिसादास उद्देशून होती, भलत्याच ठिकाणी पडली! एक डाव माफी!

माझाही झेंडा रोवला आहे. परंतु रंग बदलायचा चुकून राहिला. तेवढे जरा पहाता का?

बहुगुणी's picture

14 Oct 2014 - 9:14 pm | बहुगुणी

शिवाय तुमच्या लेखनाचा दुवाही दिलाय (त्यानिमित्ताने तुमचं लिखाण वाचायला मिळालं, आणखी लिहा.)

मोहनराव's picture

15 Oct 2014 - 12:18 pm | मोहनराव

धन्यवाद!!

लंबूटांग's picture

16 Oct 2014 - 7:27 pm | लंबूटांग

बॉस्टनजवळ.

बहुगुणी's picture

16 Oct 2014 - 8:39 pm | बहुगुणी

यानिमित्ताने तुमचा अँड्रॉईड बद्दलचा लेख वाचला आणि सुहास झेले यांच्या धाग्याचीही आठवण झाली. (अवांतर: आता लॉलीपॉप प्रणाली येऊ घातली आहे, त्यासंबंधी आणि त्याचा अ‍ॅप्स-विश्वावर काय परिणाम होईल याविषयीही वाचायला आवडेल.)

लंबूटांग's picture

16 Oct 2014 - 9:17 pm | लंबूटांग

पुढे लिहायचे होते पण कामाच्या व्यापात राहूनच गेले.

खरं तर अँड्रॉईडने त्यानंतर प्रचंड मोठी झेप घेतली आहे.

धमाल मुलाने वर विचारल्याप्रमाणे मी कस्टम रॉम्स वगैरेही इन्स्टॉल करून बघितले. स्वतःसाठी नवीन अँड्रॉईड फोन घेतला एल जी ने गूगलसाठी बनवलेला Nexus 5. Vanilla अँड्रॉईडची चव चाखली. असो लिहीण्यासारखे बरेच आहे. वेळ मिळाला की टंकेन.

जियो मिपावर तुमच्या झेंड्यावर क्लिक करून तो बंद केलात आणि मग पुन्हा तिथल्या पोपटी झेंड्यावर क्लिक केलंत की तिथले इतर सदस्य दिसतात. हेच क्रमाक्रमाने केलं तर एकाच गावी किती मिपाकर आहेत तेही कळतं.

अहो मी जॅक डनियल्सचा झेंडा गाडला आहे पण तो हिरवा करायचा विसरलो. कृ करता का?

बहुगुणी's picture

17 Oct 2014 - 6:00 am | बहुगुणी

केला पोपटी झेंडा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2014 - 8:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सालं रशियात कसं कै नै गेले आपले मिपाकर.

-दिलीप बिरुटे

तसे मिपाकर रशिया आणि त्याआसपासच्या देशांप्रमाणे पुढील कोणत्याच देशात पोचले नसावेत हे पचवायला कठीण वाटतंय:

चीन, जपान, फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, ब्रम्हदेश, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण अमेरिकेतले ब्राझील, चिले वगैरे सर्वच देश...

बरेच मिपाकर अजून यायचे असणार नकाशावर.

मिपाचे बल्लवाचार्य गणपाशेठ तरी कुठे आले आहेत नायजेरियातून?

श्रीरंग_जोशी's picture

17 Oct 2014 - 10:04 pm | श्रीरंग_जोशी

श्री लालटोपी रशियात वास्तव्यास होते. अजूनही असावेत असा अंदाज आहे.

लाल टोपी's picture

18 Oct 2014 - 3:30 am | लाल टोपी

मी तेथील कार्यकाल पूर्ण करुन जानेवारी १४ लाच भारतात परतलो सध्या अनेक व्यापात अडकल्यामुळे मिपावर नियमीत येणे होत नाही.
रशियात फारशी मराठी माणसे नाहीत; पण २००७ ते २०१० दरम्यान कुआलालम्पूर, मलेशियामध्ये वास्तव्य केले आहे तेथे भरपूर मराठी मंडळी आहेत, महाराष्ट्र मंडळही त्यावेळेस होते ते नक्कीच मिपाकर असतील.
बहुगुणी साहेब उत्तम धागा आहे. आवडला उद्या सवडीने मला स्वतःलाही टॅग करेन.

बहुगुणी's picture

18 Oct 2014 - 3:46 am | बहुगुणी

तुमची मॉस्कोची प्रवासवर्णनंही टॅग करा योग्य रंगाच्या झेंड्यात.

बहुगुणीश्री,
लावलयं निशाण ! तेव्हडे अप्रूव करा .
आणि दंडवत स्वीकारा.

व्ह्यू--सर्च केल्यावर 'नेम' मध्ये 'विटेकर' असं शोधून तुमचा झेंडा दिसत नाहीये नकाशावर. कुठल्या गावी लावलंय ते सांगता?

व्ह्यू--सर्च केल्यावर 'नेम' मध्ये 'विटेकर' असं शोधून तुमचा झेंडा दिसत नाहीये नकाशावर. कुठल्या गावी लावलंय ते सांगता?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Oct 2014 - 5:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्राधिकरणामधे हिरवा मार्कर रोवलेला आहे.

दोघांचेही लेखनाचे दुवे दुरूस्त केले आहेत. झेंडे गाडल्याबद्दल धन्यवाद.

सही. जिओ मिपाचा चांगलाच उपयोग होइल.

मी-सौरभ's picture

22 Oct 2014 - 7:37 pm | मी-सौरभ

बहुगुणी: बघता का जरा..

बहुगुणी's picture

22 Oct 2014 - 10:27 pm | बहुगुणी

मी तुमच्या लेखनाचा दुवा Description मध्ये दिला आहे.

बहुगुणी's picture

10 Nov 2014 - 9:37 am | बहुगुणी

काही वाचकांनी व्य नि मध्ये 'झेंडे लावतांना चुकीचा रंग वा इतर चुका झाल्या तर त्या दुरूस्त कशा करता येतील' अशी विचारणा केली आहे.

उजवीकडे वर Map Access म्हणून बटन आहे, ते मी सध्या 'लॉक' करून ठेवले आहे पासवर्ड टाकून, कुणी चुकून [किंवा चेष्टेत] दुसर्‍यांचे झेंडे 'एडिट / डिलीट' करू नये म्हणून. तेंव्हा ज्या सभासदांना काही बदल करायचे असतील त्यांनी मला इथे धाग्यात किंवा व्यनि ने कळवावे, म्हणजे मी ते बदल करीन.

गेल्या पंधरवड्यात काही नवीन प्रवासवर्णने तसेच कट्टे-वृत्तांत आले आहेत. यांपैकी बरेच जियो मिपावर आलेले दिसत नाहीत, तेंव्हा त्या लेखकांना सहभागाची विनंती.आणि अर्थातच सर्वच मिपाकरांनी आपापल्या स्थानांचे झेंडे वर लेखात लिहिल्याप्रमाणे लावावेत असं आवाहन पुन्हा एकदा.

समर्पक's picture

4 May 2016 - 10:40 pm | समर्पक

जवळपास राहणारे मिपाकर व विविध प्रदेशांची माहिती मिळविण्यासाठी फारच उपयोगी

पिलीयन रायडर's picture

1 Sep 2016 - 9:14 pm | पिलीयन रायडर

लोकांनी आपापली भटकंती आणि कट्टे अपडेट करा!!

त्या नकाशाची लींक द्या ना परत. लोकेशन अपडेट करतो...

बहुगुणी's picture

1 Sep 2016 - 9:28 pm | बहुगुणी
खटपट्या's picture

1 Sep 2016 - 9:58 pm | खटपट्या

लोकेशन बदलायचे कसे?

विसरलो आता

वरती लिहिल्याप्रमाणे उजवीकडे वर Map Access म्हणून बटन आहे, ते मी सध्या 'लॉक' करून ठेवले आहे पासवर्ड टाकून, कुणी चुकून [किंवा चेष्टेत] दुसर्‍यांचे झेंडे 'एडिट / डिलीट' करू नये म्हणून. तेंव्हा ज्या सभासदांना काही बदल करायचे असतील त्यांनी मला इथे धाग्यात किंवा व्यनि ने कळवावे, म्हणजे मी ते बदल करीन. धन्यवाद!

खटपट्या's picture

1 Sep 2016 - 11:25 pm | खटपट्या

प्लीज माझ्यासाठी करा एकदा...

व्य नि ने कळवा काय बदल हवाय तो

पद्मावति's picture

2 Sep 2016 - 12:21 am | पद्मावति

खूपच सुंदर सोय आहे ही. मी आधी मार्कर टाकला होताच. आता अपडेट पण केलंय. धन्यवाद बहुगुणी.

मिपा अकाउंटमध्ये राहाण्याचे ठिकाण - gps data वाढवता येईल.

ए ए वाघमारे's picture

2 Sep 2016 - 9:01 am | ए ए वाघमारे

मार्कर टाकला आहे !