नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?
प्रतिक्रिया
22 Sep 2014 - 10:26 pm | प्रचेतस
ऐतिहासिक साधनांत त्याचे उल्लेख नाहीत. संभाजीराजांना पकडून आणल्याचे उल्लेख समकालीन पुराव्यांत बहुत करून फारसी साधनांतले आहेत. मराठी साधनांतील उल्लेख हे तदनंतरच्या राजाराम महाराजांच्या कालखंडांतील बखरींमध्ये आले आहेत.
उल्लेख जास्ती नसल्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघलांची तेव्हा कोल्हापूरपर्यंत फौज असून तिथे छावणीच केली होती शिवाय पन्हाळा आणि खेळण्याला मोर्चे लावले होते. अडचणीची बाब होती ती कोल्हापूरपासून संगमेश्वरपर्यंत जाण्याची. ह्या वाटेत निबीड अरण्ये, दुर्गम घाटवाटा, खोल दर्या असे अडथळे होते. हा प्रदेश शिर्क्यांचा. इथेच गणोजी शिर्क्याने मुकर्रबखानास वाट दाखवली. खानाने राजांवर अचानक झडप घातली. यावेळी राजांजवळ फारसे सैन्य नव्हते. तशाही स्थितीत राजे संगमेश्वराजवळच्या नावडी गावात मुंडण करून व वेष पालटून लपून बसले. तिथेही लढाई होऊन राजांचे सेनापती म्हाळोजीराजे घोरपडे कामी आले. खानाने राजांच्या पायांतील सोन्याच्या तोड्यांवरून राजांस ओळखले व तसेच मळेघाट चढून कोल्हापूर गाठले. हा वघड टप्पा खानाने केवळ २/३ दिवसांत पार केला. पुढे कोल्हापूरला मुघलांची मोठी फौज असल्याने मराठा सैन्याला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करता आला नाही. ह्याच वेळी खुद्द रायगडालाही झुल्फिकारखानाने मोर्चे लावले होते.
कोल्हापूरला पोचल्यानंतरही खानाने फौजेला लगेच पुढची चाल देत बहादुरगड गाठला व पुढचा दुर्दैवी प्रकार घडला.
23 Sep 2014 - 9:01 am | खटपट्या
खूप छान माहीती वल्लीशेठ.
अजुन वाचायला आवडेल !
23 Sep 2014 - 9:40 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
घरच्याच भेद्यांचा मराठी माणसाला शाप आहे. अजिबात खोटे नाही.
9 Dec 2015 - 3:36 pm | मोगा
आणि महाराजांच्या मृत्युबद्दल बोंब मात्र औरंगजेबाच्या नावाने मारतात!
9 Dec 2015 - 10:17 pm | llपुण्याचे पेशवेll
तेच ना औरंगजेबाने प्रेमळ पित्याप्रमाणे संभाजीराजांचा सांभाळ केला. त्यांच्या दासीपुत्रांना मोठ्या मानाने इस्लाम मधे स्थान दिले. राजांच्या दासींपासून झालेल्या कन्यांचे निकाह मुसलमान मुलांबरोबर मोठ्या सन्मानाने आणि आजाच्या मायेने लावले. हो ना! मोगली मोगा.
10 Dec 2015 - 6:29 am | मोगा
नायतर ते पुण्याचे भंपक पेशवे ! इस्टेटीत वाटणी टाळायला मस्तानीच्या मुलाला हिंदू ब्राह्मण्मानले नाही... अगदी म्हाभारताचाच कित्ता गिरवला. हिडिंबापुत्राला क्षत्रिय राजकुमाराचा दर्जा दिला नाही. पण लढाईच्यावेळेला मात्र पानपतावर समशेरबहाद्दूर आणि कुरुक्षेत्रावर घटोत्कच लढायला आणि मरायला पुढे !
...
पेशव्याचा ब्राह्मण वंश खुंटला व फक्त मस्तानीचा मुसुलमान वंश आजही सुरु आहे , असे ऐकले , खरे आहे का ?
10 Dec 2015 - 7:30 am | अर्धवटराव
स्वतः औरंगजेब आणि त्याची मुलं आपापल्या भावंडांना इस्टेटीचा न्याय्य वाटा मिळावा म्हणुन उपोषणाला बसली होती हा इतीहास आहे.
10 Dec 2015 - 9:16 am | मोगा
इस्टेटीसाठी खुले आम द्वंद्व खेळ्णं हे तर सर्वच राजा / पुत्राना अलाउड होतं - सर्वच धर्माच्या !
पण कर्तव्य / धर्म असली भुतं उभी करून कुणाला बिनल्ग्नाचा ठे, कुणाला जंगलात पाठव , कुणाची मुंजच नाकार ... असे करणारे दांभिक तत्वद्नान आम्हाला तरी आवडत नाही.
....
ते काही का असेना , मस्तानी मुसलमान होती म्हणून आज बाजीरावाचा मूळ अंश शिल्लक आहे , हे वास्तव आहे. ती किंवा तिचा अंश हिंदू झाला असता तर कदाचित गृहकलहात त्याचाही नारायणराव झाला असता !
10 Dec 2015 - 10:03 am | pacificready
खुले आम द्वंद्व मध्ये विषप्रयोग,अटक 'अल्लोवेद' आहे हे ठाऊक नव्हते.
10 Dec 2015 - 10:19 am | मोगा
चाणक्यनीती , कणिकनीती , लाक्षागृह , वालीवध वगैरे वाचून मग सांगतो.
10 Dec 2015 - 11:18 am | pacificready
हे सगळे आता नाकारायचे असं ठरलंय ना तुमचं? तुम्ही तिकडे जाणार असं गेली साडेतीन युगं ऐकतोय. तिकडे काय better package आहे ते सांगा की.
10 Dec 2015 - 11:06 am | अर्धवटराव
सर्व जग एकाच रंगात रंगवावे, आणि कोणि ऐकत नसल्यास सरळ रक्ताचा लाल रंग फासावा... हे कर्तव्य कित्ती उदात्त आहे.
10 Dec 2015 - 12:15 pm | अत्रुप्त आत्मा
@तिचा अंश हिंदू झाला असता तर कदाचित गृहकलहात त्याचाही नारायणराव झाला असता !>> आणि आता कशावरूण अली...हस्सन्/हुस्सेन होणार नाही म्हणे!?
10 Dec 2015 - 5:47 pm | llपुण्याचे पेशवेll
हो का मोगा! मग सगळ्यांना इस्टेटीत वाटा मिळाला का त्या मुसलमान सरदारांच्या घरात का बेदखल केले गेले? तुमच्याकडे प्रेमळ औरंगजेबाने रेकॉर्ड दिले असेलच ना!
10 Dec 2015 - 6:53 pm | हेमंत लाटकर
मोगॅम्बो, पेशवे भंपक.
बाळाजी विश्वनाथांनी व पहिल्या बाजीरावांनी आपल्या पराक्रम व बुद्धिने शिवाजीराजांचे साम्राज्य दिल्लीपर्यंत वाढविले. मस्तानीला बाजीरावांच्या आई गोपिकाबाईचा जास्त विरोध होता. बाजीरावांनंतर नानासाहेबांनाच पेशवेपद मिळाले असते. समशेरबहाद्दरला पेशवेपद कसे काय मिळेल. जेष्ठ पुत्र नानासाहेब असतांना. पानिपतमध्ये झालेले मराठ्यांचे नुकसान माधवराव पेशवेंनी आपल्या 10 वर्षाच्या कारर्कीदित भरून काढले. माधवरावानंतर पेशव्यांमध्ये पराक्रमी व बुद्धिवान पेशवा नसल्यामुळे तसेच सरदारांच्या वतनाच्या हव्यासापायी मराठ्यांच्या साम्राज्याची अधोगती सुरू झाली.
23 Sep 2014 - 10:01 am | सर्वसाक्षी
नवीन माहिती मिळाली.
हे गणोजी शिर्के म्हणजे महाराणी येसुबाईंचे बंधु का?
23 Sep 2014 - 10:04 am | प्रचेतस
हो.
तेच ते.
शिवाजी राजांना यांना तुमच्या पुत्रास वतन देऊ असे म्हणून वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. शिवाजी राजेंच्या मृत्युनंतर ह्यांची वतनाची लालसा परत जागृत झाली.
23 Sep 2014 - 11:19 am | बबन ताम्बे
छान माहीती. एक मात्र खरे की अनेक गोष्टी इतिहासाला अजून अज्ञात आहेत.
23 Sep 2014 - 9:17 am | पिंपातला उंदीर
या विषयावर संजय सोनवणी यांची त्यांच्या फेबु खात्यावर एक मोठी अभ्यासपूर्ण पोस्ट आहे . त्याचा सार असा की महाराजांच्या सुटकेचे पुरेसे प्रयत्न झाले नाहीत आणि मंत्री मंडळाकडे तेवढी इच्छाशक्ती पण नवती . इच्छुकांनी ती पोस्ट शोधावी
23 Sep 2014 - 10:12 am | पिवळा डांबिस
अमोलजी, तुम्हाला या विषयात इंटरेस्ट दिसतोय.
आगे बढो...
तेंव्हा खूप वाचा, खूप विचार करा...
इतिहासाचे अभ्यासक कुरंदकर, शेजवलकर आणि इत्यादिंचे विचार वाचा...
केवळ इंटरनेटवर ब्लॉग उपलब्ध आहे म्हणुन सोनवणींसारख्यांचे लिखाण वाचून आपले मत बनवू नका हो!
हे कळकळीने सांगतोय!!
याउप्पर तुमची मर्जी....
23 Sep 2014 - 10:14 am | पिंपातला उंदीर
नक्कि साहेब .
23 Sep 2014 - 9:49 am | कवितानागेश
आपले मालोजीराजे कुठे गेले? त्यांचापण आभ्यास आहे ना?
9 Dec 2015 - 9:23 pm | मालोजीराव
थोर इतिहासकार सोनवणी म्हणतात "युद्ध झाले नाही. किरकोळ चकमक झाली. ती देखाव्यापुरती असु शकेल"...अर्थात हि त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे.
मोगलाकडील साकी मुस्तैद,खाफीखान,मनुची व शहाजीराजे कैफियत मात्र संगमेश्वरी लढाई झाली,ति देखिल संभाजीराजे याना खानाची बातमी कळताच पुढे येऊन खानास संभाजीराजे,कवी कलश,सरनौबत मालोजी घोरपडे,संताजी घोरपडे आदिनी चढाई केली व धुमश्चक्री सुरु झाली,,परंतु या धुमश्चक्रीत सरनौबत पडले,कवी कलश जखमी झाले व मोगल सैन्य संख्येने जास्त होते,आणी संभाजीराजे यानाच पकडण्याचे आदेश होते,त्यामुळे मोगल सैन्यानी महाराज व कलश हे हाती लागताच तेथुन निसटले,यातुन संताजी व इतर सैन्य माघे राहिले ते वरकड रायगडी गेले,परंतु पळुन गेले असा अस्सल साधनात कुठेच उल्लेख नाही, तसेच संभाजी महाराजासमवेत सरनौबत मालोजी,कवी कलश,संताजी,आदी सह फक्त थोडकेच सैन्यच होते,व मोगल मात्र संख्येने जास्त होते.त्यामुळे बळ कमी पडले,परंतु लढाई झाली असे समकालीन सर्व इतिहासकारानी नोंद करुन ठेवलेले आहे
संभाजीराजे अप्रिय असते तर त्यांची फौज औरंगजेबाला एवढी जड गेली असती का?
त्रयस्थ व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया पहा १३ नोहेंबर १६८८ ला इंग्रज अधिकार्याने इंग्लंड ला हिंदुस्तान च्या अस्थिर स्थितीबद्दल कळवले तो म्हणतो "दक्खनेतील स्थिती अस्थिर झाली आहे सर्व मोगली ठाणी,किल्ले यांची व्यवस्था बिघडली आहे. मराठ्यांनी किल्ले मजबूत ठेवून परतीचे हल्ले केले आहेत. अनेक ठिकाणी आपल्या प्रदेशात त्यांनी मोगलांचा पराभव केला आहे. जंजिरा ते पोर्ट नोव्हा चा प्रदेश अजूनही संभाजीच्या सैन्याकडे आहे"
संभाजीराजे अप्रिय झाले होते म्हणून त्यांना मोगलाकडून सोडण्यास कोणी गेले नाही हे तुणतुणे पुनःपुन्हा वाजवणाय्रांनी शंभूराजे सतत नऊ वर्षे अहोरात्र औरंगजेबाच्या अफाट फौजेविरूढ लढले ते जनमानसाच्या आणि सैन्याच्या पाठिंब्याशिवाय काय ?
संभाजीराजांच्या हत्येनंतर चवताळून उठलेल्या मराठ्यांनी ठिकठिकाणी मोगली छाव्णायांवर हल्ले केले, रायगड पायथा,कराड, फलटण येथे मोगलांना पराभूत केले
23 Sep 2014 - 10:22 am | धन्या
डॉ. कमल गोखले यांनीं शंभूराजांवर "शिवपुत्र संभाजी" नावाचा अप्रतिम ग्रंथ लिहीला आहे.
23 Sep 2014 - 11:11 am | सुहास झेले
पुढच्या महिन्यात ५ तारखेला मुंबईत असला तर पार्ल्याला एक पूर्ण दिवसाचा अभ्यासवर्ग आहे.... सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील :)
23 Sep 2014 - 11:13 am | सुहास झेले
सभागृहातील आसन संख्या (केवळ १५०) मर्यादित असल्याने या परीपत्रकाद्वारे आपणास सुचित करण्यात येत आहे की आपण खालील व्यक्तींशी लवकरात लवकर संपर्क साधून आपली नावनोंदणी आणि जागा निश्चित करावी हे विनंती.
वि.सु. : कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि विषय सोबत जोडले आहेत.
पराग लिमये ...(अंधेरी/ विलेपारले) ९९८७५६५७३८
अमोल मांडके ...(कांजुरमार्ग आणि दादर) ९००४६५७६६३
संजय तळेकर ...(चारकोप आणि बोरीवली) ९८२०२३८१७७
23 Sep 2014 - 11:21 am | खटपट्या
अरेरे !! एवढ्या सुन्दर कार्यक्रमाला मुकणार !!
तुनळीवर चित्रिकरण पाह्ता येइल अशी आशा करतो !!
23 Sep 2014 - 11:29 am | सुहास झेले
तिथे ते अपलोड होत नाही, पण काही आठवड्यात कार्यक्रमाची डीव्हीडी विक्रीसाठी उपलब्ध होते (रुपये १५०)...
23 Sep 2014 - 11:34 am | खटपट्या
ओके. पण आता ही डीवीडी मिळवायची कशी ?? आमी हाव देशाबाहेर !!
23 Sep 2014 - 1:56 pm | काळा पहाड
आमाला पण डिवीडी विकत घेता येईल का? कुठे मिळेल?
23 Sep 2014 - 2:36 pm | सुहास झेले
जनसेवा समितीचुया कार्यक्रम असेल तेव्हा त्या विक्रीला ठेवल्या जातात... मी सांगेन उपलब्ध झाल्यावर. हव्या असतील तर एक कॉपी पाठवून पण देईन... काळजी नसावी :)
23 Sep 2014 - 11:22 am | बबन ताम्बे
छान उपक्रम आहे. पुण्याला असा कार्यक्रम झाला तर जरूर हजेरी लावू.
23 Sep 2014 - 2:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
23 Sep 2014 - 5:11 pm | दिपक.कुवेत
उपक्रमाला का कार्यक्रम पुण्याला झाला तर?? पळा आता....एक्का साहेब आले
23 Sep 2014 - 3:54 pm | दुश्यन्त
श्री संजय सोणवणी यांनी याआधीच ही शंका आणि त्याला पूरक असे लेखन करून ठेवले आहे. नेटवर शोधल्यास मिळू शकेल. सोयराबाई यांची महत्वाकांक्षा (आपला मुलगा राजाराम छत्रपती व्हावा) आणि त्याना इतर दरबारी /सरदार यांची साथ होती. अंतर्गत राजकारणामुळे संभाजी महाराजांची सुटका होऊ शकली नाही. संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न जाणेवपूर्वक झाले नाहीत यासाठी सोयराबाई-राजाराम यांच्या बाजूच्या सर्व सरदार/ दरबारी यांची मान्यता होती असे मानायला वाव आहे.
23 Sep 2014 - 4:01 pm | नानासाहेब नेफळे
सहमत,इतिहास अभ्यासक संजय सोनवणींचा हा तर्क योग्य वाटतो.
23 Sep 2014 - 4:34 pm | प्रचेतस
खिक्क्क...
विषप्रयोगानंतरच्या दुसऱ्या कटानंतर राजांनी सोयराबाईंना नजरकैदेत ठेवले होते. त्यातच त्यांच्या मृत्यु झाला. (१६८३/८४) मग सोयराबाईसाहेबांनी राजांना कैदेतून सोडवायला जाण्याचा प्रश्नच कुठे येतो?
23 Sep 2014 - 4:53 pm | मृत्युन्जय
:). असले इतिहास अभ्यासक असले की प्रश्नच मिटला.
एकुणात गण्याने फसवले, भावाने वार्यावर सोडले पण तरीही दोष मात्र इतरांचा असा काहिसा काही थोर इतिहास तोडफोड्यांचा दावा आहे आणि जो पुर्णपणे मुर्खपणाचा आहे.
23 Sep 2014 - 5:03 pm | नानासाहेब नेफळे
कुणीतरी स्वतःला शाहीर म्हणवायचे, भाटगिरी करणारे त्यांना इतिहासकार म्हणणार. त्यापेक्षा इतिहास अभ्यासक म्हणवुन घेणारे निदान तत्वाशी तरी प्रामाणिक आहेत.
23 Sep 2014 - 5:10 pm | प्रचेतस
बाकी तुम्ही मुद्द्यांचा प्रतिवाद न करता इतरांवर लांच्छन लावण्यात पटाईत आहात.
23 Sep 2014 - 5:34 pm | अर्धवटराव
तसंही महाराष्ट्रात निवडणुक तारीख जाहीर झाली आहे...
24 Sep 2014 - 10:52 am | मृत्युन्जय
आमच्या गल्लीतला दुसरीतला शेंबडीचा पोरगा सुद्धा इतिहासाचे पुस्तक वाचताना स्वत:ला इतिहास अभ्यासक म्हणवुन घेतो. हे नव इतिहासवादी आणि तो पोरगा यांमध्ये फारसा फरक नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छितो. बाकी सध्या भाटांची संख्या वाढली आहे हे मात्र खरे.
अवांतरः तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर सुद्धा होताच की. तत्व चुकीचे होते ही गोष्ट वेगळी.
24 Sep 2014 - 11:48 am | नानासाहेब नेफळे
शिवचरीत्र हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग मागच्या शंभर वर्षात जन्मले हे महाराष्ट्राचे दुर्देव. अशा लोकांपेक्षा नवइतिहासवादी परवडले, ते निदान जाहिर चर्चेची तयारी दाखवतात व ज्यांनी सो कॉल्ड इतिहासासाठी आयुष्य वेचलेले आहे ते जाहिर चर्चा आणि शासनाच्या समितीतूनही कसा पळ काढतात हे लोकांनी पाहीले आहे.
(आजकाल या दांभिक लोकांना त्यांचेच अनुयायी क्रिटीकली घ्यायला लागलेत हेहीनसेथोडके)
24 Sep 2014 - 12:21 pm | मृत्युन्जय
शिवचरित्राशी ज्यांचा काहिच संबंध नाही असे जातीय विद्वेष पसरवणारे लोक स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवुन घ्यायला लागले तेव्हापासुन महाराष्ट्राचा सांस्कृतिक दर्जा इतका घसरला आहे की त्यानंतर इतिहास संशोधन आणि अभ्यासाची व्याख्याच बदलली. सरस्वतीची मुर्ती फोडणारे, त्यांना ७२ बहाद्दर म्हणुन संबोधणारे आणि दंग्याधोप्यांना स्वतःची ओळख बनवणारे नतद्रष्ट लोक आणि त्यांनी पोसलेले सो कॉल्ड अभ्यासक आणि या सर्वांना पाठीशी घालणारे राजकारणी असल्यावर शासकीत समित्यांमध्ये राहुन माती खाण्यापेक्षा त्यापासुन ४ हात दूर राहिलेलेच बरे.
अवांतरः आईन्स्टाइन म्हणे सगळ्या जर्मन शासन पुरस्कृत शासकीय समित्यांपासुन नेहमीचे दूर राहिला. अण्वस्त्रे निर्बुद्ध लोकांच्या हाती लागण्याला त्याचा असलेला कडाडुन विरोध त्याने शासनाला सहकार्य न करुन जाहिर केला. थोडे वेगळे उदाहरण आहे. पण बघा त्यातुन काही बोध घेता आला तर,
24 Sep 2014 - 12:33 pm | काळा पहाड
अशा लोकांमुळं फारसं नुकसान होणार नाही असं बर्याच जणांना वाटतं. पण पहा नायजेरिया, सोमालिया इत्यादी देशांकडे. देश किती खाली जाऊ शकतो याची हे देश उदाहरणे आहेत. या लोकांचं असंच चालू दिलं तर हा देश सुद्धा तिथेच पोचेल. आणि त्याची या लोकांना ना खंत असेल ना खेद. वर आणि समतेसाठी सर्व समाजाला या पातळीवर आणणं गरजेचं होतं वगैरे जातीयवादी पोपटपंची पण बोबड्याकडून ऐकावी लागेल.
24 Sep 2014 - 12:35 pm | बबन ताम्बे
क्रुपया धाग्याचा विषय कोण इतिहास संशोधक आहे अथवा नाही हा नाहीय. आम्हा पामरांच्या ज्ञानात काही भर पडेल या हेतूने हा धागा लिहीला आहे. आपल्या जवळ धाग्यातील विषयाला धरून काही माहीती असेल तर क्रुपया आमच्या ज्ञानात भर घालणे.
24 Sep 2014 - 12:42 pm | टवाळ कार्टा
फारच अपेक्षा तुम्हाला :P
25 Sep 2014 - 12:04 pm | श्रीगुरुजी
>>> शिवचरित्राशी ज्यांचा काहिच संबंध नाही असे जातीय विद्वेष पसरवणारे लोक स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवुन घ्यायला लागले तेव्हापासुन महाराष्ट्राचा सांस्कृतिक दर्जा इतका घसरला आहे की त्यानंतर इतिहास संशोधन आणि अभ्यासाची व्याख्याच बदलली. सरस्वतीची मुर्ती फोडणारे, त्यांना ७२ बहाद्दर म्हणुन संबोधणारे आणि दंग्याधोप्यांना स्वतःची ओळख बनवणारे नतद्रष्ट लोक आणि त्यांनी पोसलेले सो कॉल्ड अभ्यासक आणि या सर्वांना पाठीशी घालणारे राजकारणी असल्यावर शासकीत समित्यांमध्ये राहुन माती खाण्यापेक्षा त्यापासुन ४ हात दूर राहिलेलेच बरे.
+ १
नानांनी पुन्हा एकदा माती खाल्ली.
25 Sep 2014 - 12:02 pm | श्रीगुरुजी
>>> शिवचरीत्र हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग मागच्या शंभर वर्षात जन्मले हे महाराष्ट्राचे दुर्देव. अशा लोकांपेक्षा नवइतिहासवादी परवडले, ते निदान जाहिर चर्चेची तयारी दाखवतात व ज्यांनी सो कॉल्ड इतिहासासाठी आयुष्य वेचलेले आहे ते जाहिर चर्चा आणि शासनाच्या समितीतूनही कसा पळ काढतात हे लोकांनी पाहीले आहे.
खंडणी, दांडगाई, दंगेधोपे, जातीय विद्वेष पसरवून समाजात दुफळी माजविणे हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या किळसवाण्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग २०-२५ वर्षात जन्मले हे निव्वळ महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्व महान ऐतिहासिक व्यक्तींचे दुर्देव. आपल्याच पक्षाचे सत्ताधारी असल्याने व सर्व सत्तास्थानावर आपलेच जातभाई असल्याने हे नवइतिहासकार शासकीय मान्यताप्राप्त कसे होतात व त्यांच्या गलिच्छ व असत्य बरळण्याला शासन कशी मान्यता देते हे लोकांनी पाहीले आहे.
बादवे, खंडणी, भ्रष्टाचार, दांडगाई इ. व्यवसायांवर आपले पोट भरण्यापेक्षा जनतेला शिवचरीत्र सांगून पोट भरणे कितीतरी चांगले.
25 Sep 2014 - 12:28 pm | नानासाहेब नेफळे
शिवरायांच्या नावे पक्ष चालवणारे दांडगाई दंगेधोपे खंडण्या उकळत नाहीत असा समज झाला आहे काय?
शिवचरित्र सांगुन पोट भरणे गैर नसावे, पण खोटे शिवचरित्र सांगून फसवणे गैर आहे.
25 Sep 2014 - 12:32 pm | श्रीगुरुजी
>>> शिवरायांच्या नावे पक्ष चालवणारे दांडगाई दंगेधोपे खंडण्या उकळत नाहीत असा समज झाला आहे काय?
शिवचरित्र सांगुन पोट भरणे गैर नसावे, पण खोटे शिवचरित्र सांगून फसवणे गैर आहे.
ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे हे कोणी ठरविले? ब्रिगेडींनी की काँ-राकाँच्या पुढार्यांनी?
25 Sep 2014 - 12:56 pm | नानासाहेब नेफळे
त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले. शिवराज्याभिषेकाच्या वेळी रामदास स्वामी अचानक प्रकट होतात आणि राजांना आशिर्वाद देतात हा प्रसंग एका नाटकात एका पोटार्थीने दाखवला होता,अशी कोणतीच घटना इतिहासात घडली नसताना दाखवण्याचे प्रयोजन काय हे पोटार्थी सांगत नाहीत. अर्थात महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला मुस्लिमविरोधी बनवण्याचा हा खटाटोप होता व त्याचा सोशिओपॉलिटीकल लाभ उठवायचा यांचा प्रयत्न नेहमीच चालू असतो .अशा पोटार्थींच्या भाकडकथांना इतिहास मानणारे खरे मुर्ख.
25 Sep 2014 - 4:38 pm | मृत्युन्जय
एका नाटकात
नाटक म्हणजे काय असते ते माहिती आहे ना तुम्हाला नेफळे? नसेल तर आधी ते माहिती करुन घ्या.
काही पोटार्थी तर सध्या पिसाळा आणि गण्या हरामी नव्हते हे सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत. त्यांच्याइतके दुर्दैवी पोटार्थी तेच.
25 Sep 2014 - 5:32 pm | नानासाहेब नेफळे
ऐतिहासिक विषयातले नाटक आणि काल्पनिक विषयावरचे नाटक यातला फरक समजतो का मृत्युंजय?
उद्या मी समर्थांवर नाटक लिहिले आणि त्यात समर्थांना मुस्लिम साधू म्हणुन दाखवले तर 'आर्टीस्ट लिबर्टीच्या' नावाखाली मला सूट देणार का?
25 Sep 2014 - 6:08 pm | मृत्युन्जय
घाशीराम कोतवला नाटक आठवतं का नेफळे साहेब? सिनेमॅटिक लिबर्टी हा प्रकार कळतो का आपल्याला? जवळ जवळ सग्ळ्या ऐतिहासिक / पौराणिक नाटकात / चित्रपटात ती घेतली जातेच. बाकी भवानी तलवारीबद्दल आपले काय मत आहे?
25 Sep 2014 - 6:17 pm | नानासाहेब नेफळे
सिनेमॅटीक लिबर्टी घ्यायला प्रत्येकालाच सूट आहे, परंतु ऐतिहासिक विषयात जास्त लिबर्टी नको.
उदा:- अफजलखानाचा वध या प्रसंगात खानाचे शिवाजींशी झालेले संभाषणाचा पुरावा नाही ,परंतु प्रसंगानुरुप संवाद घातले तर ठीक आहे. शिवराज्याभिषेकात रामदास स्वामी उपस्थीत असल्याचा एकही पुरावा नाही. त्यामुळे ती घटना घुसडणे ही इतिहासाची मोडतोड आहे व अशी मोडतोड करण्यासाठी काही धार्मिक संघटनाही तथाकथीत इतिहासकारांना(?) फूस लावत असतात.
25 Sep 2014 - 6:26 pm | नानासाहेब नेफळे
हा गैरसमज हिंदुत्ववाद्यांनी पसरवलेला आहे. अशा कुठल्याही घटनेची नोंद नाही. नैतिकता निर्भयता निती या तत्वाने सामान्य माणुसही सर्वाच्च पदी पोचतो याचे शिवाजी उदाहरण आहे, परंतु सगळे समर्थकृपेने आणि देवांच्या कृपेने घडले , त्यामुळेच राजे स्वराज्य निर्मिती करु शकले ,असा समज पसरवून राजांच्या अंगभुत गुणांचे महत्व कमी करण्याचा व पर्यायाने प्रयत्नवादा वर विश्वास असणार्याचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न पोटार्थींकडून केला गेला असण्याची शक्यता आहे.
26 Sep 2014 - 11:04 am | मृत्युन्जय
आजचे पोटार्थी स्वतःच्या मतानुसार नसती लिबर्टी घेउन प्रसंगांचे निराळेच अर्थ लावुन नविन इतिहास लिहुन पिसाळ आणी गण्यासारख्या हराम्यांना निर्दोष ठरवण्याच्या भानगडीत आहेत हे तुम्हाल खुपत नाहिसे दिसते. ज्याने स्वतःच्या बहिणीला आणी मेव्हण्याला विकले तो कसला आलाय निर्दोष म्हणा. त्याची लायकी दिसतेच, अश्या लोकांना काय म्हणतात ते ही सगळ्यांना माहिती आहेच. असो.
समर्थ रामदास महाराजांचे गुरु असल्याने त्यांचे आशिर्वाद नेहमीच महाराजांच्या पाठीशी होते. ते राज्यरोहणाप्रसंगी उपस्थित होते की नव्हते ते गौण आहे.
26 Sep 2014 - 12:21 pm | नानासाहेब नेफळे
इतिहासात याला कोणताही भक्कम आधार नाही, शिव समर्थ भेट 1673ला झाल्याचा एक पुरावा आहे, परंतु तो समकालीन नाही ,पेशवेकालीन आहे. त्यामुळे समर्थ शिवाजींचे गुरु नव्हते असा निष्कर्ष काढता येतो.
26 Sep 2014 - 12:27 pm | मृत्युन्जय
चूक, मुळात शिवकालीन पुरावेच कमी आहेत. त्यामुळे निष्कर्ष आणि संदर्भ केवळ नंतर उपलब्ध झालेल्या बखरीतुन आणि दस्तावेजातुनच मिळु शकतात. जर तत्कालीन दस्तावेजच फक्त मान्य करायचे झाले तर बर्याच हिंदु राजांचे अस्तित्वच नाकारायला लागेल आणि खुद्द महाराजांबद्दल फार कमी माहिती मिळते. आणि मग त्या प्रवाहात तुम्हाला बर्याच सरदारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या कर्तुत्वाकडे डोळेझाक करावी लागेल. तथाकथित इतिहास मोडतोडक तसे करताना दिसत नाहित. स्वतःला पाहिजे तेवढेच निष्कर्ष काढणे याला सिलेक्टिव्ह रीडिंग म्हणतात.
9 Dec 2015 - 4:12 pm | आबा
http://misalpav.com/comment/778384#comment-778384
25 Sep 2014 - 4:43 pm | पैसा
जल्लां काय कल्लां नाय. रामदासस्वामींना नमस्कार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी कसे ठरतात? खर्र सांगा. तुम्ही आयुष्यात कधीच कोणत्या देवळात गेला नाहीत का एखाद्या देवाला नमस्कार केला नाही. बरोबर ना!
25 Sep 2014 - 5:39 pm | पिंपातला उंदीर
काथ्याकुटात एका पार्टी ने दुसऱ्या पार्टी चे विरुद्ध मत मेगा बायटि चर्चे नंतर सपशेल मान्य केले असा दाखला मिपा च्या इतिहासात आहे का यावर कोणि इतिहास संशोधक संशोधन करेल काय ?
25 Sep 2014 - 5:42 pm | नानासाहेब नेफळे
हेच की महाराज फक्त हिंदू संतांचे आशिर्वाद घ्यायचे असे दाखवणे, वास्तवात रामदासांच्या धार्मिक भूमिकेशी शिवाजींना काही देणं घेणं नव्हतं. शिवाजी हे राजकीय व्यक्तीमत्व होते.
26 Sep 2014 - 12:34 pm | पैसा
कोण म्हणतोय असं की महाराज फक्त हिंदूना नमस्कार करत म्हणून? महाराजांनी कित्येक मशिदी दर्ग्यांना नेमणुका दिल्याचे पुरावे आहेत. अफझल्याच्या दर्ग्याला सुद्धा सगळी व्यवस्था लावून दिली होती. ते कोण नाकारतोय का? मग तुम्हीच असे एकांगी का विचार करताय?
बादवे, मोगलाई हा शब्द वाचून अगदी काळजात कालवाकालव झाली हो! ते एक असोच.
निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो!
26 Sep 2014 - 12:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो!
महान लोकांच्याबद्दल गदारोळ करूनच महान फायदे उपटता येतात ना ?! फुसक्या लोकांबद्दल केलेल्या गदारोळाला कोण काय महत्व देणार, आणि मग फायदा कसा होणार ?! :) :(26 Sep 2014 - 12:39 pm | मृत्युन्जय
महाराजांनी समर्थ रामदासांना नमस्कार केला म्हणजे ते मुस्लिम्द्वेष्टे कसे झाले ब्वॉ. म्हणजे उद्या आम्ही देहु ला जाउन डोके टेकवुन आलो की धर्मांध झालो की काय?
26 Sep 2014 - 1:37 pm | नानासाहेब नेफळे
राजे मुस्लिम राजवटी विरुद्ध लढले, म्हणुन ते मुस्लिम विरोधक कसे ठरतात?
स्वराज्य संस्थापक राजे होते, हिंदवी स्वराज्य हा कल्पनाविलास कुणाचा ब्वॉ?
मुंबईतल्या परप्रांतियांना विरोध बहुतांशी मराठी माणसे करतात, बहुसंख्य परप्रांतिय हिंदु आहेत, याचा अर्थ मराठी माणुस हिंदूद्वेष्टा ठरतो काय?
26 Sep 2014 - 1:39 pm | मृत्युन्जय
तुम्ही तुमचीच वाक्ये प्रश्नरुपात का टाकता आहात? नाही म्हणजे असे मी तरी कुठे लिहिलेले दिसत नाही म्हणुन विचारले.
26 Sep 2014 - 2:40 pm | इरसाल
अस हेकलिंग करुन मी घाबरणार नाही.
मिपावरील सन्मान्य धुरंदर हे मान्य करतील की शिवरायांनी ज्याची बोटे तोडली तो कोन होता, ज्याचा कोथळा काढला तो कोण होता, ज्याच्या मागे हात धुवुन लागले तो कोण होता,मग ते त्यांच्या विरुध्ध नव्हते असे कसे म्हणता तुम्ही ;)
26 Sep 2014 - 3:24 pm | नानासाहेब नेफळे
शिवाजी राजे एक धर्मनिरपेक्ष व्यक्तीमत्व होते ,ते फक्त दुजर्नांच्या विरोधात होते, कुठल्या धर्माच्या नाही. महाराजांना सर्वधर्मसमभाव असलेले स्वराज्य अपेक्षीत होते ,ते त्यांनी स्थापन केले, परंतु काही इतिहासकार(?) त्यांनी फक्त हिंदवी स्वराज्य स्थापन केले असा दावा करतात, जो अर्थात चूक आहे.
राजेंनी मुस्लिम राज्यकर्त्यांना पराजीत केले, म्हणुन ते मुस्लीम धर्माच्या विरोधात होते असा दावा करणारे लोक चंद्रराव मोरे खंडोजी खोपडे आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इत्यादी हिंदूंची राजेँनी केलेली खांडोळी पद्धतशीरपणे लपवून ठेवतात, या न्यायाने राजे हिंदुविरोधी ठरतात काय!
26 Sep 2014 - 3:35 pm | अनुप ढेरे
जर बाबासाहेब पुरंदर्यांबद्दल म्हणत असाल तर त्यांनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये व्यवस्थित उल्लेख केलेला आहे या लोकांचा. त्यांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते हेही लिहिलं आहे. शिवाजींनी कधीही कुठल्याही इतरधर्मिय प्रार्थना स्थळाला धक्का पोचवला नाही हेही स्वच्छ लिहिलं आहे. केवळ जात बघून एखाद्या इतिहास अभ्यासकाला शिव्या घालणार्या बिर्गेडी लोकांना हे समजणार कसं?
26 Sep 2014 - 6:02 pm | पैसा
गई भैंस पानी में! इरसालभौ, सन्माणणीय णेफळे यांणी डोळ्यावर चष्मा लावल्याणे तुमचा उपहास त्यांच्या डोक्यावरूण णिघूण गेला आहे हे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! =))
26 Sep 2014 - 7:55 pm | बबन ताम्बे
यात काय सापडते का बघा.
http://www.scribd.com/doc/24975847/Letter-to-King-Jai-Singh-by-Shivaji-M...
25 Sep 2014 - 9:03 pm | विनोद१८
हे सांगशील का ?? ते तसे दाखविणारा तो पोटार्थी कोण ?? त्याने (पोटार्थी) ते तसे दाखविण्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्ण तुला पडला, म्हणजेच तु त्या नाटकावर इतक्या बारकाइने सांगोपांग विचार करू शकतोस याचे मला आश्चर्य नाही वाटले पण चकीत मात्र झालो. बरे तो प्रसंग दाखविल्यामुळे महाराजांच्या सेकुलर प्रतिमेला धक्का बसला, अगदी तुलासुद्धा बसला असे तुझ्या प्रतिक्रियेवरुन जाणवले. तर अशा पोटार्थ्याने लिहीलेल्या व भाकडकथांनी सजविलेल्या नाटकांना तु मात्र न चुकता हजेरी का लावतोस हे सांग आधी.
25 Sep 2014 - 10:33 pm | नानासाहेब नेफळे
देशात घटनेचं राज्य आहे, कुण्याही फडतुस पोटभरुने सुपार्या घेऊन इतिहासाची मोडतोड करावी वा तसे आपल्या कलाकृतीतून दाखवायला ही मोगलाई नाही, त्यामुळे मी नाटक का बघितले हा प्रश्न गौण आहे.
25 Sep 2014 - 10:50 pm | नानासाहेब नेफळे
ता .क .-ब्रिगेडींनी इतिहासाची केलेली मोडतोड हा ही पोटार्थी व राजकीय हेतुन प्रेरित प्रकार आहे, त्याचाही निषेध केला पाहीजे .परंतु या देशात इतिहासाचा वापर करुन धार्मिक वा जातीय सलोखा बिघडवण्याचे काम ज्या लोकांनी इमानेइतबारे केले, त्यांनीच पेरलेले काटे आज त्यांच्या पायात रुतत आहेत. ब्रिगेडींचा विखार हे त्यांना प्रत्युत्तर आहे, अर्थात त्यांचा मार्ग हा योग्य मार्ग नाही.
26 Sep 2014 - 11:10 am | मृत्युन्जय
महाराष्ट्रात इतिहासाचा वापर करुन या देशात धार्म्मिक अथवा जातीय सलोखा बिघडवला फक्त बीग्रेडींनी. इतर कोणीही कधीही इतिहासाचा वापर इतर लोकांच्या द्वेषाखातर केलेला नाही. शिवाय इतर कोणीही इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी देवांच्या मुर्ती फोडण्याची कामे केलेली नाहित. स्वातंत्र्यपुर्व काळात मुस्लिम धर्मांधांनी हिंदुंची देवळे फोडली त्याबद्द्ल मी काही बोलत नाही. अफजलखान आणि शाइस्तेखानाने ते पवित्र काम भोसले, मोरे इत्यादी मराठी सरदारांच्या साक्षीनेच केले. मराठी माणूसच जिथे गद्दार झाला होता तिथे त्या धर्मांधांना काय शिव्या घालायच्या म्हणा.
26 Sep 2014 - 7:05 am | विनोद१८
..म्हंजे नेमके काय रे नान्या ?? मी हे नवीनच काहीतरी प्रकरण वाचतोय आज, तु मिपाकरांचे याविषयीचे कुतुहल वाढ्विलेस हे नक्की. केवळ तुझ्यामुळेच आज आम्हा मिपाकरांना या विषयीची अधिक ज्ञानप्राप्ती होइल म्हणजेच आमचे याविषयीचे अज्ञान दूर होइल असे मी छातीठोकपणे समजु शकतो काय, नान्या. ?? तेव्हा याविषयी अधिक सविस्तर टंकण्याचे कष्ट यापुढच्या तुझ्या प्रतिसादात घे.
आता आपण आपल्या मुळ मुद्द्यावर येउया. त्या कुणा एका फडतूस पोट्भरु व सुपार्या घेणार्या व इतिहासाची मोड्तोड करणार्या माणसाने लिहीलेल्या व तु ते तुझ्या घटनादत्त अधिकारात पाहिलेल्या नाटकाचे नाव रे काय ?? तुझ्यासारखेच मीसुद्धा ते माझ्या घटनादत्त अधिकारात पुन्हा पुन्हा पाहीन म्हणतो, ते तु मला सांगशील काय रे नान्या ?? बरे तुझ्या प्रतिसादातल्या १९वा शब्द नक्की 'मोगलाई' असा वाचावा कि 'मोदीशाही' ???
नान्या, तुझ्यासारख्या विद्वानाने एक भाकड नाटक वारंवार पाहणे हा प्रश्न गौण कसा काय ??
मला वाटते मी विचारलेल्या प्रश्णांना मुद्द्यापासुन न भरकटता उत्तरे द्यावीस.
25 Sep 2014 - 1:22 pm | काळा पहाड
थोडक्यात, मुसलमानांच्या पाटाचं पाणी नानेखानांच्या आडात आलंय.
25 Sep 2014 - 4:13 pm | मृत्युन्जय
:) . अल्लाह मार डाला
25 Sep 2014 - 11:26 am | विजुभाऊ
त्याच्या तत्वात चूक काय होते. तो प्रखर राष्ट्रवादी होता.
25 Sep 2014 - 11:46 am | अनुप ढेरे
वरील प्रतिसाद काडी आहे असं वाटतय. लोकहो, फसू नका!
25 Sep 2014 - 12:10 pm | सुनील
जसे सर्व मराठे १ मर्दच असतात तसेच सर्व राष्टवादी प्रखरच असतात काय?
१ हा जातीवाचक शब्द नाही.
25 Sep 2014 - 4:14 pm | मृत्युन्जय
म्हणजे हिटलर राष्ट्रवादीचा होता की काय? तरीच...
23 Sep 2014 - 4:49 pm | दुश्यन्त
गफलत झाली माफ करा मात्र नजरकैदेत असल्या तरी ते आणि त्यांचे समर्थक संभाजी राजाविरुद्ध कारस्थाने करत होतेच. सोयराबाई संभाजी हयात असतानाच गेल्या तेव्हा त्यांचा प्रश्न येत नाही हे मान्य मात्र त्यांचा म्हणजे राजारामांचा गट अस्तित्वात होताच. संभाजी राजांना अटक झाल्यावर लगेच राजाराम यांचे मंचकारोहण झाले. संभाजी राजे यांना अटक झाली फेब्रुवारी मध्ये (१ फेब १६८९ ) आणि मुघल त्यांना कोकणातून घेवून पुण्याजवळ तुळापुर येथे त्यांची निर्घृण हत्या झाली ११ मार्च १६८९ मध्ये एवढ्या काळात मराठ्यान्नी त्यांना सोडवण्याचा एकही मोठा प्रयत्न केला नाही याचे समाधानकारक कारण मिळत नाही.
23 Sep 2014 - 5:09 pm | प्रचेतस
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी हत्येनंतर स्वत: येसूबाईंनी राजाराम महाराजांस नजरकैदेतून मुक्त करून मराठी साम्राज्याचा छत्रपती म्हणून अभिषेक करवला. इतकेच नव्हे तर रायगड मुघलांच्या ताब्यात जात असताना राजारामांस वाघदरवाजातून पळून जाण्यास मदत केली व् स्वत: युवराज शाहूंसह मुघलांच्या स्वाधीन झाल्या.
औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द राजधानी रायगडला पडलेले वेढे अशी कठीण अवस्था असल्यानेच संभाजी राजांना कुणी सोडवू शकले नाही।
23 Sep 2014 - 6:10 pm | मंदार दिलीप जोशी
औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द राजधानी रायगडला पडलेले वेढे अशी कठीण अवस्था असल्यानेच संभाजी राजांना कुणी सोडवू शकले नाही।
अनुमोदन.
23 Sep 2014 - 10:43 pm | सुहास झेले
नशीब कोणी अजून असे बोलले नाही, की राजाराम महाराजांनी घडवून आणले वगैरे वगैरे....
हल्ली इतिहास रचणारे चिक्कार इतिहासकर आहेत रे वल्ली.... ;-)
५० पानांचे शिवचरित्र आल्याचे वाचले होते, ज्यास पुरस्कारही (?) मिळाला होता... आता बोल =))
24 Sep 2014 - 10:53 am | मृत्युन्जय
रायगडाला मुघलांच्या स्वाधीन करणारा सुर्याजी पिसाळच ना? त्याच्यावरुनच देशद्रोह्याला सुर्याजी पिसाळ म्हणण्याची पद्धत पडली ना?
25 Sep 2014 - 5:15 pm | मनीषा
हो बरोबर
सूर्याजी पिसाळ ... रायगडाचा किल्लेदार होता तो .
25 Sep 2014 - 5:13 pm | मनीषा
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी हत्येनंतर स्वत: येसूबाईंनी राजाराम महाराजांस नजरकैदेतून मुक्त करून मराठी साम्राज्याचा छत्रपती म्हणून अभिषेक करवला ??
पण मी तर वाचले आहे की संभाजी राजांबरोबर येसुबाई आणि शाहु पण औरंगजेबाच्या कैदेत होते . कारण त्यांच्या ( येसुबाईंच्या) माहेरी काही कार्यानिमित्त गेले असताना त्यांच्या (येसुबाईंच्या) सख्ख्या भावानेच दगा केला होता .
आणि सोयराबाई नजरकैदेत होत्या पण राजाराम नसावेत बहुदा
25 Sep 2014 - 6:53 pm | पैसा
महाराणी येसूबाईंनी संभाजी राजांच्या हत्येच्या आधीच राजारामाला मंचकारोहण करून सुखरूप रायगडाबाहेर काढला होता. आणि स्वतः मात्र शाहूसह रायगडावरच राहिल्या होत्या.
26 Sep 2014 - 11:13 am | मनीषा
नक्की?
मग त्या रायगडावर का राहील्या असतील?
आणि संभाजीच्या मृत्यु आधीच राजारामाला राज्याभिषेक ?
26 Sep 2014 - 11:32 am | पैसा
इथेच कुठेतरी जेधे शकावलीचा उल्लेख आहे. त्याप्रमाणे संभाजीराजे सुटून येऊ शक्त नाहीत हे स्पष्ट झाल्यावरच राजारामाला संभाजीराजे हयात असतानाच मंचकारोहण केले. मंचकारोहण हे बहुतेक पूर्ण राज्याभिषेक नसावा, युवराज म्हणून नियुक्ती असे काहीसे असावे असे वाटते. येसूबाई गडावरच राहण्याचे सयुक्तिक कारण असे दिसते की जवळपासच्या इतर सर्व गडांनाच वेढे पडले होते, त्यामुळे रायगड हाच त्यातल्या त्यात सुरक्षित होता. आणि जर फितुरी झाली नसती तर गड आणखी कित्येक दिवस, महिने लढवता आला असता. राजाराम जिंजीकडे जाणार हे ठरले होते. त्यामुळे कोणीतरी जबाबदार माणसाने मराठी प्रदेशात रहाणे आवश्यक होते. तो निर्णय येसूबाईंचाच होता. त्यांना स्वतंत्र शिक्का सुरुवातीपासून होता आणि त्या अनेकदा कारभारही पहात होत्या असे उल्लेख आहेत.
27 Sep 2014 - 3:08 am | मनो
शकावलीतला उल्लेख असा आहे
फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किलेदार चांगोजी काटकर व येसजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काडून बाहेर आणून मंचकी बैसावले
याचा अर्थ असा कि कैदेतून सुटका करून आदराने एका आसनावर बसवले. तो काही राज्याभिषेक नव्हे, फक्त एक मान्यता अथवा आदराने मुक्तता अश्या अर्थाने ते घेतले पाहिजे.
27 Sep 2014 - 6:43 am | प्रचेतस
मंचकारोहण म्हणजे विधिवत राज्याभिषेक न करता सिंहासनी बसवणे.
23 Sep 2014 - 5:10 pm | पैसा
राजाराम सुद्धा रायगडावर होते. त्याना येसूबाईंनी शिताफीने बाहेर काढले आणि मग ते जीव वाचवण्यासाठी दक्षिणेकडे गेले. मंचकारोहण हे येसूबाईंच्या धोरणीपणामुळेच घडल. एवढेच नव्हे तर राजारामाला पळायला अवधी मिळावा म्हणून येसूबाई रायगडावरच राहिल्या. जेणेकरून मोगलांचे लक्ष तिकडेच राहिले.
आता संभाजीराजांना सोडवायचे प्रयत्न झाले नाहीत असे हे सगळे बोलणारी मंडळी अप्रत्यक्षरीत्या येसूबाईंना जबाबदार धरत आहेत आणि राजारामावर आरोप ठेवत आहेत असे तुम्हाला वाटत नाही?
हंबीरराव मोहिते संभाजीराजांच्या आधीच गेले. त्यांच्यासारखा पराक्रमी सरदार त्यावेळेस कोणीच नव्हता. शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. त्यामुळे इतर कोणालाही काही हालचाल करायला उसंत मिळाली नसावी. शिवाय औरंगझेबाचे सरदार महत्त्वाच्या किल्ल्यांना वेढे घालून बसले होतेच. त्यामुळे हल्ले करण्यासाठी जास्तीचे खडे सैन्यही उपलब्ध नसावे अशी शक्यता दिसते.
23 Sep 2014 - 5:18 pm | कवितानागेश
शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. >>
हे अगदी पटतंय.
बातमी पोचली तरी, ती बातमी खरी आहे की नाही, खरंच राजे पकडले गेले आहेत, की नुसतीच आवई उठवली आहे, याची खतरजमा होईपर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असेल.
23 Sep 2014 - 11:20 pm | खटपट्या
विश्वास पाटीलांच्या पुस्तकात असेही लिहिलेय कि धूर्त औरंगजेबाला मराठे उठाव करतील हे माहित होते. म्हणून त्याने बाकीच्या किल्ल्यांचा बंदोबस्त केलाच पण संभाजी महाराजांना जेथे कैदेत ठेवले होते त्याच्या आजूबाजूच्या गावामधील सर्व पुरुष मंडळीना हग्या मार दिला. बैल, घोडे जप्त केले. आणि जनता उठाव करणार नाही याचा पक्का बंदोबस्त केला.
संगमेश्वरहून कैद केल्यानंतर संभाजी महाराजांना नेहमी बुरखा घालून झाकूनच नेले गेले. जेणे करून कैदी कोण आहे याचा वाटेतल्या लोकांना थांगपत्ता लागू नये.
23 Sep 2014 - 11:34 pm | काळा पहाड
असं खोटंनाटं सर्वधर्मसमभावाविरूद्द लिहिल्याबद्दल निषेध!
23 Sep 2014 - 11:41 pm | नानासाहेब नेफळे
इतिहास या विषयावर कथाकादंबरीकार त्यांच्या साहीत्यात कल्पनाविलास करत असतात, त्याला खरा इतिहास समजणे हे बालिशपणाचे लक्षण आहे. राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या राजसंन्यास या नाटकात वाघ्या कुत्र्याचं काल्पनिक पात्र घुसडले, पूढे तोच इतिहास लोक खरे मानायला लागले.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत एका प्रसिद्ध नाटकात अनेक कल्पनाविलास केले गेले आहेत ,परंतु बरेच लोक त्याला खरा इतिहास मानतात हे दुर्दैव आहे आणि या असल्या मुर्खपणावर आक्षेप घेणार्यांना मुर्खात काढण्याचा महामुर्खपणाही सुप्त धार्मिक अस्मितेच्या नावाखाली चालू असतो.
23 Sep 2014 - 11:48 pm | प्रचेतस
नेफ़ळ्यांशी अशतः सहमत.
गडकर्यांनी राजसंन्यासमध्ये वाघ्या घुसडलं का नाही ते माहीत नाही पण इंदूरच्या होळकरांनी शिवाजी राजेंच्या समाधीचा जीर्णोद्धार करायला मदत केली तेव्हा त्यांच्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक पण उभारले गेले असे काहीसे गोनीदांनी दुर्गभ्रमणगाथेत लिहिल्याचे आठवते.
बाकी विश्वास पाटलांनी 'संभाजी' कादंबरीत बरेच लेखनस्वातंत्र्य घेतले आहे. मात्र औरंगजेबाने तेव्हा भौतेक किल्ल्यांना मोर्चे लावले होते हे नक्कीच खरे आहे. मात्र लोकांना हग्या दम दिला हे कल्पित असावे.
24 Sep 2014 - 12:03 am | पैसा
http://www.misalpav.com/node/22418 या धाग्यावर वाघ्याबद्दल भरपूर चर्चा झाली आहे आणि त्यात नाना आणि जागोमोहनप्यारे यांचा भरपूर सहभाग होता. आता या धाग्यावर वाघ्याबद्दल लिहू नये. एकतर तो धागा वर काढा नायतर दुसरा धागा लिहा!
24 Sep 2014 - 10:56 am | मृत्युन्जय
त्या लेखातील खालील वाक्य वाचुन खुप मौज वाटली:
य द वे, राष्ट्रवादीचे दोन पराक्रमी पुरुष -आदरणीय भुजबळसाहेब व तटकरेसाहेब यांच्याभोवती तूर्तास त्यांनी केलेल्या काही घोटाळ्याचा फास अडकू पहात आहे. त्यामुळे साहजिकच
24 Sep 2014 - 1:11 pm | एस
वाचनमात्र झालेला धागा 'वर' कसा हो काढायचा पैअक्का? आम्ही काय सम्पाद्क हाय व्हयं?
24 Sep 2014 - 1:13 pm | प्यारे१
संपादकीय मनमानीचा जाहीर निषेध ;)
(माझा रात्रीचा प्रतिसाद पण उडालाय बहुतेक)
24 Sep 2014 - 3:19 pm | पैसा
मग दुसरा धागा काढा! हाकानाका!
आणि प्यारेकाकांसारख्या जुन्या जाणत्या मिपाकराने इतके अवांतर केलेले पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वगैरे.. ओ प्यारेकाका अवांतर करण्यासाठी दुसरे पेश्शल धागे आहेत की हो!
24 Sep 2014 - 3:43 pm | अतुल झोड
४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. त्यामुळे इतर कोणालाही काही हालचाल करायला उसंत मिळाली नसावी. शिवाय औरंगझेबाचे सरदार महत्त्वाच्या किल्ल्यांना वेढे घालून बसले होतेच. त्यामुळे हल्ले करण्यासाठी जास्तीचे खडे सैन्यही उपलब्ध नसावे अशी शक्यता दिसते.
हे उत्तर संयुक्तिक वाटते........
23 Sep 2014 - 5:37 pm | नानासाहेब नेफळे
शिवाय ४० दिवस
आता आपल्याला खूप
वाटतात. पण
त्या काळाचा विचार
करता बातमी सगळ्या
लोकांपर्यंत पोचेपर्यंतच
संभाजीराजांना
औरंगजेबाच्या ताब्यात
दिले गेले. >>
संयुक्तीक वाटते.
24 Sep 2014 - 11:32 am | बबन ताम्बे
माझे मत असे आहे. कदाचित त्यावेळी निर्नायकी अवस्थेमुळे मराठे काही काळ भांबावले असतील. संभाजी राजे पकडले गेल्यानंतर शिवाजी राजांच्या तोडीचा कुणीही धुरंधर, मुत्सद्दी मराठमंडळात नव्हता. शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर अशा संकट काळी त्यांनी शांत चित्ताने, मुत्सद्दीपणे आणि विचार् पुर्वक पावले उचलून शत्रूचा मुकाबला केला आणि राज्य राखले. अफजलखानासारख्या ताकदवार शत्रूचा खात्मा, पन्हाळ्यावरून सिद्धी जौहरच्या वेढ्यातून यशस्वी पलायन, आग्र्याहून औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका या घटना शिवाजी राजांच्या अंगी असलेले अलौकीक गुण दर्शवितात. औरंगजेबाच्या अफाट फौजेची भिती मराठ्यांना नव्ह्ती. गनिमी काव्याने त्यांनी सतत मोगली फौजेला हैराण केले होते. त्यामुळे असे वाटते की शिवाजीराजां सारखा विचार करणारा एखादा धोरणी, मुत्सद्दी त्यावेळी कुणी असता, तर संभाजी राजांची कदाचित सुटका होऊ शकली असती.
कदाचित प्रयत्न झालेही असतील. पण इतिहासाला ते अज्ञात आहेत.
24 Sep 2014 - 3:46 pm | अतुल झोड
शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर अशा संकट काळी त्यांनी शांत चित्ताने, मुत्सद्दीपणे आणि विचार् पुर्वक पावले उचलून शत्रूचा मुकाबला केला आणि राज्य राखले. अफजलखानासारख्या ताकदवार शत्रूचा खात्मा, पन्हाळ्यावरून सिद्धी जौहरच्या वेढ्यातून यशस्वी पलायन, आग्र्याहून औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका या घटना शिवाजी राजांच्या अंगी असलेले अलौकीक गुण दर्शवितात.
तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व (राजे नसतांना) पण होतेच ना.......
24 Sep 2014 - 3:56 pm | बबन ताम्बे
तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व (राजे नसतांना) पण होतेच ना !
आपल्या या मताशी सहमत.
25 Sep 2014 - 11:22 am | मना सज्जना
नविन महिती मीलाली.
25 Sep 2014 - 5:23 pm | मनीषा
असा धोरणी, मुत्सुदी असता तरी सुटका होऊ शकली नस्तीच बहुदा
औरंगजेब चांगलाच धूर्तं होता . आग्र्याला गमावलेली संधी त्याने कदापीही हातची जाऊ दिली नसती.
25 Sep 2014 - 5:33 pm | बबन ताम्बे
ना. स. ईनामदारांच्या कादंबरीत, (शहेनशहा) त्यांनी असे दाखवीलेय की शिवाजी महाराजांची सुटका पडद्यामागे राहून औरंगजेबानेच केली. त्यात त्याचे राजकारण होते. शिवाजी राजां सारख्या शूर योद्ध्याचा वापर (त्यांना मुघलांची सरदारकी देऊन) त्याला दक्षिणेत अदीलशाही, कुतुबशाही नष्ट करण्यासाठी करायचा होता.
अर्थात कादंबरी प्रकाशित झाल्या नंतर ना. स. इनामदारांवर (या मताबाबत) टीका पण खूप झाली.
25 Sep 2014 - 5:51 pm | मनीषा
हे नाविनच आहे .
पण कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे.
आणि इनामदार इतिहास संशोधक नव्हतेच.
25 Sep 2014 - 6:04 pm | बबन ताम्बे
ना.स.ईनामदारांनी महामहोपाध्याय द.वा.पोतदारांचा दाखला दिला होता असे वृत्तपत्रात वाचल्याचे आठवतेय.
25 Sep 2014 - 5:50 pm | प्यारे१
माझ्या मते शिवाजी महाराजांनंतर (कदाचित आधी सुद्धा) आपल्याला त्यांच्या तोडीचा धूर्त नेता मिळालेला नाही.
त्यांच्या बरोबर काम करणारांमध्ये सुद्धा असं कुणी पासंगाला पुरणारं देखील नव्हतं.
अन्यथा एक सेनापती महाराज रागावल्यानंतर एक सेनापती अवघ्या सहा शिलेदारांबरोबर शत्रूवर तुटून पडला नसता.
दुसरा सेनापती महाराज रागावले म्हणून सोडून गेला नसता. संभाजी राजांनी महाराजांकडून नुसता रागच घेतला होता का काय असं वाटतं.
(वैयक्तिक मत आहे. कुणाच्याही कसल्याही भावना दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही)
25 Sep 2014 - 6:27 pm | प्रसाद१९७१
औरंगजेबाचा हा इतका धुर्त पणा आणि संभाजीला पकडल्यावर लगेच मारुन टाकण्याची राजकीय समज्/स्वार्थ, आग्र्यात शिवाजी महाराज पकडले गेले तेंव्हा कुठे गेला होता हा प्रश्न मला नेहमीच पडत आलेला आहे.
25 Sep 2014 - 6:54 pm | शिद
मागच्या अनुभवांवरुन औंरगजेबानं धडा घेतला असेल व त्याची पुनरावॄत्ती टाळण्यासाठी लगेच शिक्षा केली असेल असं मला वाटतं.
जाणकार काय तो प्रकाश टाकतीलच.
26 Sep 2014 - 10:49 am | थॉर माणूस
सहमत... तोवर औरंगजेबाला मांडलिक करून किंवा इतर मार्गाने येऊन मिळालेल्या राजांकडून असे अनुभव नव्हते. ते आपले येउन मिळाले की उगाच प्राण जाय पर वचन ना जाय वगैरे मुर्खपणा उगाळत बसायचे. त्यामुळे आता शिवाजी आपल्या हाताखाली आलाय तर त्याला दक्षिणेत पाय रोवायला वापरून घेऊ असा विचार त्याच्या डोक्यात आला असावा. पण ऐन दरबारात शिवाजी महाराजांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना नजरकैदेत टाकण्यात आले असावे (तेव्हाही महाराजांच्या कर्तुत्वावर त्याचा विश्वास असावा आणि आपण यांना आपल्या बाजूने वळवू अशी आशाही; नाहीतर राजांना तिथल्या तिथे शिक्षा होऊ शकली असती.)
तसेच निव्वळ जयसिंगाने दिलेले वचन पाळण्यासाठी राजेंना मारण्यात आले नाही असेही म्हटले जाते. (स्थानबद्ध करून बरेच दिवस झाल्यावरही राजे बधत नाहीत म्हटल्यावर त्यांना ठार करण्यासाठी मारेकरी धाडण्याची योजना रचली जात आहे ही बातमी राजांना कळली आणि मग त्यांनी पळून जाण्याचे ठरवले असे कुठेतरी वाचले आहे.)
अर्थात याविषयीचे संदर्भ माझ्यकडे नाहीत त्यामुळे जाणकारांनी खरे खोटे सांगेपर्यंत हे कयास आहेत असेच म्हणावे लागेल.
24 Sep 2014 - 11:35 am | चौथा कोनाडा
माहितीपुर्ण धागा ! आमच्या सारख्या साधारण माणसाना विचारात येणार नाही असा मुद्दा बबन ताम्बे यानी मांडला आहे. प्रतिसाद ही माहितीपुर्ण आहेत. या विषयावर अजून चर्चा वाचायला आवडेल.तुळापुर बद्दल अजून काही माहिती उपलब्ध आहे ?
24 Sep 2014 - 12:58 pm | बबन ताम्बे
चौथा कोनाडा साहेब,
तुळापूर अतिशय रम्य ठिकाण आहे. संभाजी महाराजांची समाधी, तसेच तीन नद्यांचा संगम, अदिलशहाचा सरदार मुरार जगदेवने बांधलेले शिवमंदिर प्रेक्षणीय आहेत. पुणे-नगर हाय वे पासून अगदी जवळ आहे.
जाऊन या एकदा.
24 Sep 2014 - 8:15 pm | प्रचेतस
तुळापूरला समाधी नसून स्मारक आहे. समाधी वढू बुद्रूक येथे आहे.
हे वढू बुद्रूक नदीचा पलीकडे. होडीने गेल्यास झटकन जाता येते मात्र गाडीरस्त्याने १५/२० किमी अंतर आहे.
राजाचे डोळे मात्र पेडगावच्या बहादूरगडावर काढले. मात्र तेथून त्यांना कोरेगावी नेण्यत आले.
राजांना तुळापूरलाच ठार मारले याचा पक्का पुरावा मिळत नाही. कदाचित तुळापूर अथवा वढू बुद्रूक ह्यापैकी कुठल्याही ठिकाणी ठार मारीले असावे मात्र वढू बुद्रूक येथे समाधी असल्याचे पुरावे आहेत.
धनकवडीच्या कुळकर्णीच्या १७१९ सालच्या कागदपत्रांत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.
पातशहा वढू कोरेगावी येथे येऊन मुक्काम केला. तेथून लष्कर पाठवून सिवाजी राजे पहिलेच गेले होते, त्याचा लेक संभाजी राजे आणिला आणि वढू कोरेगावात मारिला. मग त्याचा लेक शाहू राजा आणि बाईका आपल्या जालीत ठेविली.
औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याचा वारसदार मुअज्जम अर्थात आझमशहाने शाहू राजांची कैदेतून सुटका केली. सुटून आल्यावर वढू बुद्रूक येथे त्यांनी संभाजी राजांचे वृंदावन बांधले. या संदर्भात पेशवे दफ्तरात पुढीलप्रमाणे मजकूर आहे.
राजमंडळ वृंदावने: महाराज राजश्री कैलासवासी संभाजी राजे स्वामी. दर जागा मौजे वढू ता| पाबळ प्र| जुन्नर भिकाराम गोसावी व वासुदेवभट बिन शामभट धर्माधिकाररीणो वृंदावनाचे शुषृषेबद्दल देविले आहेत. नैवेद्य व नंदादीप व धूप बाग करावयास व तुलसी लावावयास व अन्नछत्राबद्दल इनाम जमीन छ २२ मोहरम सन समस अशर मौजे मजकूरपैकी इनाम कमीन नूतन ५ बागाईत जमीन १० बहीत जमीन सेत चौसुक वृंदावनानजिक आहे. त्यापैकी .|||. पड जमीन - तीन प्रतीची १| असामी इनाम जमिनी घातली आहे.
या वृंदावनासमीप गोविंद मंगोजी हा झाडलोट करून निगा राखत असे म्हणून त्यासही राजश्री शाहूंनी जमीन दान दिली होती.
गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी हे तीर्थरूप राजश्री कैलासवासींचे वृंदावन मौजे वढू तर्फ पाबळ राणांत आहे तेथे हे राहून वृंदावनाची सेवा करिताती.....
24 Sep 2014 - 8:37 pm | हाडक्या
या नावावरून एक शंका, आपल्याकडे पूर्वीच्याकाळी naming system कशी असावी असा प्रश्न पडतो. इथे नाव हे दक्षिण भारतीय (तामिळी?) लोकांसारखे वाटतेय.. म्हणजे 'तुमचे नाव, वडिलांचे नाव, आजोबांचे नाव, पणजोबांचे नाव' हे असेच होते का ?
24 Sep 2014 - 8:50 pm | प्रचेतस
नक्की माहीत नाही ब्वा.
पण बहुधा शिवकाळात तरी नाव आडनाव अशीच होती.
येथे दोन तीन पिढ्यांची नावे देण्यामागचे कारण बहुधा नामसाधर्म्यामुळे इनाम जमिनीत पुढे मागे वारसदारांची अडचण होऊ नये हाच असावा.
24 Sep 2014 - 9:38 pm | हाडक्या
वोक्के.. नहि म्हणजे.. भोसले, जाधव, हे लोक मात्र आडनाव लावतायत. तर काही लोक जसे की 'अनाजी दत्तो' असे दोनच शब्द असेलेली नावे वापरतायत तर काही आपण वर उल्लेखल्याप्रमाणे लांब्लचक अगदी पणजोबांपर्यंत नावे लावतायत..
हे पाहून थोडी उत्सुकता वाटली.
24 Sep 2014 - 10:34 pm | पैसा
साधारण महानुभावी लोकांसारखा ढगो मेघो संप्रदाय अस्तित्त्वात होता. हे त्या संप्रदायावरून दिलेले नाव असू शकेल.
25 Sep 2014 - 11:35 am | आदूबाळ
ढगो मेघो संप्रदाय म्हणजे तांत्रिक ना?
25 Sep 2014 - 12:08 pm | पैसा
रा चिं ढेरे यांनी सविस्तर लिहिलंय. हा निसर्गातल्या शक्तींना देव मानणारा संप्रदाय. धरणी आणि पाणदेव. आता 'लज्जागौरी' हे पुस्तक काढून पाहिले तर वर वल्लीने दिलेला उतारा त्यात समाविष्ट आहे. द.वा. पोतदारांनीही ते "ढगो मेघो" असल्याची पुष्टी केली आहे. ढगो मेघो हे त्या संप्रदायाचे गुरूचे पद आहे. हे "ढगो मेघो" पौरोहित्य, लग्ने लावणे इ. कामे करत असत. सध्याची स्थिती माहित नाही. पण मराठेशाही आणि पेशवाईत हा संप्रदाय मुख्यतः महार आणि मांग यांच्यात चालत आलेला होता. हे मातंगी देवीचे उपासक. तांत्रिक संप्रदायात गेल्यामुळे ब्राह्मणातून बहिष्कृत झालेला कृष्णंभट आणि त्याच्या ५ मुलांनी ढगो मेघो संप्रदायाचा स्वीकार केला असा उल्लेख आहे. त्यामुळे तंत्रपूजा काही प्रमाणात या संप्रदायात आली असावी.
25 Sep 2014 - 12:43 pm | बबन ताम्बे
लहाणपणी (७०- ७१ साली) आम्ही पोरेटोरे पाऊस लांबणी वर पडला की लाकडी पाटावर चिखलाचा गोळा थापायचो आणि त्यावर हळद कूंकू टाकून , उदबत्त्या खोचून तो पाट डोक्यावर घेऊन गावात "ढेगुजी मेघूजी पाऊस पडू द्या, आमच्या गावाला पीक येऊ दया" अश्या घोषणा देत फिरत असू त्याची आठवण झाली.
ढगो मेघोचा इथे काही संबंध आहे की नाही माहीत नाही. जाणकार प्रकाश पाडू शकतील.
26 Sep 2014 - 12:57 pm | चौथा कोनाडा
ऐकीव माहिती नुसार, तुळापुरच्या ग्रामस्थांनी शंभुराजेंच्या विटंबित मृतदेह शिवून, त्यावर वढू येथे शास्त्रोक्त अंत्यसंस्कार केले होते, त्या मुळे एका समुहाचे आडनांव "शिवले" असे लावतात. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
(चुक-भूल देणे घेणे)
26 Sep 2014 - 1:03 pm | बबन ताम्बे
आमच्या ऑफीसमधे एक "शिवले" आडनावाचा गृहस्थ आहे. त्याला विचारुन बघतो.
26 Sep 2014 - 1:34 pm | काळा पहाड
मराठ्यांच्या राजाला अशा प्रकारे मरण यावं हे महाराष्ट्राचं दुर्दैव. आपल्या राजावर या प्रकारे अंत्यसंस्कार कराव्या लागणार्या समाजाच्या दु:ख्खी मनःस्थितीची कल्पनाच करवत नाही.
26 Sep 2014 - 8:22 pm | प्रचेतस
'शिवले' आडनाव त्या घटनेनंतर पडले ही एक दंतकथा आहे. शिवपूर्वकाळापासून सिवले पाटील आडनावाचे संदर्भ सापडतात.
24 Sep 2014 - 11:42 am | विलासराव
हायला!!!!
मी त्या तुळापुरला जाउन साष्टांग नमस्कार करुन आलो होतो. एवधा मोठा इतिहासप्रपंच आहे होय त्या तुळापुरच्या घटनेमागे?
ईतिहासाची आवड नसलेला आनी ईतिहासातुन काहीच धडा न घेतलेला विलासराव....
24 Sep 2014 - 1:17 pm | माहितगार
मला वाटते भोसले घराण्याचा प्रमुख विरोधकांच्या हाती लागण्याचा संभाजी राजांच्या बाबतीतला प्रसंग तसा तीसरा प्रसंग. छ. (शिवाजी महाराजांचे थोरले बंधूही रणांगणावर धारातीर्थी पडले ते मोजले तर चौथा) पहिला प्रसंग शहाजी महाराजांना आदिलशाहीतील अटक मला वाटते हा प्रसंग मुत्सद्देगिरीने सुटला, दुसरा खुद्द छ. शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलेला आग्र्याचा प्रसंग चातुर्याने सुटला. पण या दोन्ही प्रसंगी हाती पुरेसा कालावधी होता. संभाजी महाराजांच्या बाबतीत आधीच्या प्रसंगांएवढा कालावधी आणि मोकळीक मिळाली नसावी.
दुसरे तर मराठ्यांच्या चातुर्य आणि गनिमी काव्यांशी तो पर्यंत औरंगजेब आणि त्याचे सरदार अगदीच परिचीत असल्यामुळे गाफील न राहण्याबद्दल मोगल अधिक दक्ष राहीले असतील शिवाय संभाजी महाराजांच्या रुपाने मराठ्यांना पुन्हा संधी देण्यास औरंगजेब तयार राहीला नसेल असे होऊ शकते.
मोगलांनी असलच कौर्य शीख धर्मांच्या काही प्रमुखांबद्दल दाखवल. शीख धर्मीयांवरच्या प्रसंगांचा पुर्ण इतिहास माहित नाही पण एका प्रसंगात बादशाही करता रस्सी खेच चालू असताना एका मोगल भावाला सुटून जाण्यात शीख समुदायाने मदत केल्याचा मोगल सम्राटास संशय आला असावा. गुरू गोबींद सिंगांची हत्या औरंगजेबाच्या मृत्यू नंतर झाली तरी त्यांचा पाठलाग औरंगजेब असतानाच चालू झालेला असावा. गुरू गोबींद सिंगांच्या बाबतीत त्यांनी स्वतः औरंगजेबास पत्र पाठवले होते आणि औरंगजेबाशी मुत्सद्देगिरीची अथवा तडजोडीची बोलणी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राकडे निघाले होते. पण पंजाबातील मोगल सुभेदाराने गुरू गोबिंदसिंगांच्या मागावर तेथूनच मारेकरी पाठवले होते. एकुण औरंगजेब किंवा त्या पेक्षा त्याच्या सुभेदार आणि सरदारांच्या भूमिका स्वार्थ अथवा वतनांच्या लालसेपोटी अधिक ताठ झाल्या असतील का हे अभ्यासकांनी अभ्यासावयास हवे असे वाटते.
मागील आंतरजालीय वाचनाच्या आठवणीवरून संदर्भ न देता लिहितोय या बद्दल क्षमस्व आणि चु.भू. दे.घे.
24 Sep 2014 - 1:34 pm | माहितगार
बेरार आणि मराठवाड्यातील काही गावांची ब्रिटीशकालीन गॅझेटीयर्स मध्ये त्या त्या परिसराचा इतिहासकारांनी इतिहास लिहिताना औरंगजेब महाराष्ट्रात असताना मराठा सरदारांनी मराठवाडा आणि बेरार प्रांतास काही स्वार्या केल्याची वर्णने आहेत अर्थात त्या स्वार्यांचे कालावधींची मला कल्पना नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुर आणि रायगडावर दबाव वाढलेला असताना काही मराठा सरदार औरंगजेबाच्या ताब्यातील कमी लक्ष असलेल्या प्रदेशात स्वार्या करून औरंगजेबाचे लक्ष दुसरी कडे वळवणे वगैरे अशी काही शक्कल लढवली असण्याची आणि संभाजीराजांवर प्रसंग गुदरला तेव्हा पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर असतील असे काही झाले असू शकते का ?
हि केवळ एक सहज सुचलेली पृच्छा/ शंका आहे कोणताही निष्कर्ष नव्हे .
24 Sep 2014 - 8:20 pm | प्रचेतस
बेरार प्रांती मराठ्यांनी धुमाकूळ घातला होता. खुद्द औरंगजेबाचे अत्यंत महत्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या बर्हाणपूरावर स्वतः संभाजीराजांनी धाड घालून भलीमोठी लूट गोळा केली होती. अर्थत हे प्रकार राजांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत घडले.
मात्र १६८६ साली विजापूरची आदिलशाही आणि १६८७ साली गोळकोंड्याची कुतुबशाही ह्या संपवयावर औंरंगजेब पूर्णांशाने महाराष्ट्रात वळला व राजांचे मराठवाड्यावरील हल्ले आक्रसत गेले. अर्थात लहानसहान चकमकी चालूच होत्या. पण मोठे युद्ध असे कधीच झाले नाही.
25 Sep 2014 - 4:23 am | मनो
या प्रसंगाविषयीच्या मराठ्यांकडील अस्सल आणि विश्वसनीय नोंदी खालीलप्रमाणे आहेत.
जेधे शकावली (निवडक नोंदी)
शके १६१० विभव सवछरे
कार्तिक मासी कवी कलश याजवरी सिरके पारखे जाले
कलश पळोन खिलणियावर गेला तेच मासी संभाजी राजे रायेगडाहून कलशाचे मदतीस आले समगे स्वारी सिरकियांसी युध्य करून त्यास पलउन खलणियास आले
मार्गासीर्ष मासी संभाजी राजे याणी कलशाच्या बोले प्रह्लादपंत व सर कारकून व कितेक लोकास धरिले तेच मासी औरंगजेब विजापुरीहून तुलापुर नजीक भीमातीर येथे आले
माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजी राजे व काविकलश रायेगडास जावयास संगमेस्वरास अले असता सेक निजाम दौड करून येउन उभायेतास जीवतच धरून नेले वरकड लोक रायेगडास गेले
फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किलेदार चांगोजी काटकर व येसजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काडून बाहेर आणून मंचकी बैसावले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचे कायेभाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले येसजी व सिदोजी फर्जद यास कडेलोट केले
फालगुण वद्य १३ त्रायोदसी हारजी माहडिक याणी केसो त्रीमाल यांस संभाजी राजे याचे विपरीत वर्तमान यैकोन त्रिणामली धरिले
फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी संभाजी राजे व कविकलश यास जीवे मारून सिरछेद केले
बाकीच्या गोष्टीबद्दल मराठ्यांकडील अस्सल माहिती उपलग्ध नाही कारण
१) या प्रसंगात प्रत्यक्ष हजर असणारी सर्व महत्वाची माणसे (स्वतः राजे, मुख्य कारभारी कवी कलश, सेनापती म्हलोजी घोरपडे) एक तर कैद झाली किंवा मारली गेली
२) वरकड माणसे ( यात म्हलोजीचा मुलगा संताजी घोरपडे हाही होता कि नाही याची कल्पना नाही) रायगडाकडे गेली आणि त्यांनी ही बातमी येसूबाईस दिली. पण यानंतर रायगडच शत्रूच्या ताब्यात गेला आणि मूळ सरकारी दफ्तरखाना नष्ट झाला.
३) फारसी साधने औरंगझेबाच्या दरबारात म्हणजे ३०० किलोमीटर दूर अर्थातच ऐकीव माहितीवर आधारित लिहिली गेली आणि शत्रुपक्षाकडील असल्यामुळे मोगलांना कमीपणा आणणारी माहिती अर्थातच त्यात नसणार
त्यामुळे कादंबरीकारांनी जे तपशील भरले आहेत ते तर्क आणि कल्पना वापरूनच ठरवले आहेत.
आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माझे काही तर्क. (यांना कोणताही आधार नाही)
१) तो काळच अराजकाचा आणि अनिश्चिततेने भरलेला होता. विजापूर आणि गोलकोंड्याची राज्ये दोन वर्षापूर्वीच नष्ट झाली होती. त्यांचे सरदार मोगलांना जाऊन मिळाले होते. मुकर्रबखान शेख निजाम पूर्वी विजापुरी मनसबदार होता आणि त्याला शिर्के अथवा विजापुरी मुलुखाची चांगली माहिती असणे अशक्य नव्हते. तसेच त्याला संभाजी राजांची बातमी मिळणेहि अवघड नव्हते कारण संभाजीराजे पूर्वी विजापूरच्या मदतीनेच मोगलांशी लढत होते. मुकर्रबखानच्या दृष्टीने त्याची स्वतःची उपयुक्तता मोगलांना सिद्ध करण्यासाठी हि उत्तम संधी होती. संभाजी राजांनी कित्येक लोक कैदेत ठेवले होते वातावरण एकंदरीत भीतीदायक आणि गोंधळाचे असले पाहिजे.
२) नुसते सैन्य असून अशा गोष्टी करणे शक्य नसते, त्याला नेतृत्व लागते. संभाजी राजांना सोडवू शकणारी आणि त्यांच्या पाठीशी उभी राहणारी माणसे खालीलप्रमाणे होती.
हंबीरराव मोहिते १६८७ साली साली वाईच्या लढाईत मारले गेले.
कवी कलश मुख्य कारभारी (पकडले गेले)
सेनापती म्हलोजी घोरपडे (मारले गेले)
येसाजी कंक (रायगडावर होते म्हणून त्यांच्यावर शाहू, राजाराम आणि येसूबाई यांच्या रक्षणाची जबादारी होती)
येसूबाई (बखरीत रायगडचा खजिना रिकामा आहे, पुरेसे सैन्यही जवळ नाही अशी वाक्ये आहेत.) त्यामुळे त्यांना फार काही करणे शक्य नव्हते असे वाटते
राजाराम नजरकैदेत असल्याकारणाने त्याच्याकडे सैन्य नव्हते, त्याचे समर्थकही अटकेत होते.
३) इतिहासात जसे शत्रूच्या मुलुखातून औरंगझेबाच्या कैदेतून सुटून जाणे जमते तसेच अचानक छाप्यात पकडले जाणेही होते. शिवाजीराजांच्या काळी त्यांच्याकडे मोगल विरुद्ध विजापूर असे राजकारण करण्याची संधी होती आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला (जसे मिर्झा राजा जयसिंगाच्या वेळी). पण एकदा विजापूरचे राज्य नष्ट झाल्यावर आणि पकडले गेल्यावर संभाजी राजांकडे असा काही पर्यायच उरला नाही.
४) जेधे शकावलीनुसार राजारामाचे मंचकारोहण संभाजी राजांच्या वधापुर्वी झाले. त्यावरून असे वाटते की मराठ्यांनी संभाजी राजे जिवंत परत येण्याची आशा आधीच सोडली होती.
५) संभाजी राजांचे सैन्य शिर्क्यांच्या मोहिमेसाठी पुरेसे असावे पण खानाच्या सैन्याचा पराभव करण्याइतपत जास्त नसावे. त्यामुळे लगेच सुटकेचे काही प्रयत्न शक्य झाले नसावे.
25 Sep 2014 - 7:49 am | एस
तत्कालीन परिस्थितीत आहे ती दौलत समूळ नष्ट होण्यापासून वाचवणे जास्त महत्त्वाचे होते.
25 Sep 2014 - 11:17 am | बबन ताम्बे
तसेच वल्ली यांनाही धन्यवाद. त्यांनी पण बरीच माहीती दिली.
26 Sep 2014 - 11:13 am | सौंदाळा
शहेनशहा मधे एक वाक्य आहे, औरंगजेब दानिष्मंद्खान (का शहजादी झेबुन्निसाला) म्हणतो.
माझ्या हातात मराठ्यांच्या तिन्ही पिढ्या लागल्या पण मी प्रत्येकाबरोबर वेगळा व्यवहार केला.
१. शिवाजीला मी जाऊ दिले
शिवाजी मुघलांच्या बाजुने वळेल किंवा जयसिंगाला दिलेले वचन मोडेल हे कारण असावे.असे माझे मत)
२. संभाजीला मी ठार केले
(आदिलशाह, कुतुबशाह ताब्यात होतेच मात्र संभाजीने प्रखर विरोध केल्यामुळे दृष्टीपथात आलेला आणि आयुष्यभर उराशी बाळगलेला दक्षिण विजयाचा क्षण निसटेल की काय असे त्याला वाटत असावे.असे माझे मत)
३. शाहुला मी आश्रय दिला पण मोकळे सोडले नाही. (म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी लहानग्या शाहुला आपल्या ताटाखालचे मांजर बनवले तर दक्षिण मुघलांच्या ताब्यात असल्यासारखीच राहील असा त्याचा विचार असावा.असे माझे मत)
26 Sep 2014 - 1:30 pm | माहितगार
८९ वर्षे जगलेल्या कोणत्याही व्यक्तीला साधारणतः तीन पिढ्यांच दर्शन सहाजिकच घडत औरंगजेबाने तीन पिढ्या पाहिल्या हे नोंदवण्यासाठी कपोलकल्पित कादंबरीच्या आधाराची गरज रिव्हिजिट करून पहाण्याची गरज वाटते.
यात कादंबरीकाराच्या कपोल कल्पनेपलिकडे हाती काय लागते ? मिर्झाराजे जयसिंगा मार्फत दबाव देऊन शिवाजीराजे मांडलीक होतात का ते पहाणे हा सामान्य मुत्सद्देगिरीचा भाग समजा की औरंगजेबाने केला, औरंगजेबाच्या जागी कोणताही बादशहा असता तरीही त्यानेही ते केलेच असते या मुत्सद्देगिरीला जाऊदिले असे स्वतः औरंगजेबसुद्धा म्हणेल की नाही हा प्रश्नच वाटतो. आग्र्यातून सुटकेच्या वेळी शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली याला जाऊ दिले म्हणणार का ? म्हणजे की आग्र्यातील कैदेतून पळून जाणार आहे हे औरंगजेबाला बादशहा माहित होते पण औरंगजेबाने मनोरंजन म्हणून शिवाजी महाराजांना जाऊ दिले ?
औरंगजेबाने शिवाजीला जाऊ दिले म्हणजे नेमके काय ? :)
सत्तेच्या संघर्षात जो स्वतःच्या वडील आणि भावंडाशी क्रौर्य दाखवताना मागे पुढे पहाणार नाही. तसेही भारतातील तो काळ मानवाधिकारांचा विचार करणार्यांचा नव्हता, जनता आणि शत्रुच्या अनुयायांवर जरब बसवण्यासाठी हाती आलेल्या शत्रु प्रमुखाला मारणे हि काही अपवाद वगळता त्या काळी सर्वसामान्य बाब नसेल काय ? समजा औरंगजेबाला दक्षिण विजयाच स्वप्न नसतं तरी सुद्धा त्याने संभाजी महाराज म्हणून नव्हे इतरही त्याच तोला मोलाच्या शत्रूशी काही वेगळा व्यवहार केला असता का ?
समजा शाहीस्तेखान स्टाईल मध्ये औरंगजेब शिवाजी महाराजांच्या हाती आला असता तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सोडला असता काय ? या बाबीचे शिवाजी महाराजांच्या उत्तर अथवा दक्षिण विजयाच्या स्वप्नाशी एकुण किती नाते राहिले असते. भारताचे पहाडी उत्तरांचल आणि आसाम हे प्रांत मोगलांना कधीच घेता अथवा टिकवता आले नाहीत म्हणून त्यांचा बाकीचा दक्षिण विजय थांबला का ? संभाजी महाराजांच्या काळात निश्चितपणे मराठवाडा आणि बेरार भागात जाऊनही औरंगजेबास नाकी नऊ आणले तरी सुद्धा दिल्लीचा बादशहा दक्षिणेत अधिक खोलवर संभाजी महाराजांच्या नंतर पोहोचला आधी नाही असे असेल तर त्याचे ललितेतर इतिहास संशोधनाच्या साधनातून संदर्भ देऊन लेखन करावयास हवे त्यास कादंबरीचे आधार देऊन तर्क साधणे कितपत योग्य आहे या बद्दल मी साशंक आहे.
ज्या औरंगजेब स्वतःच्या बापाच्या ताटाखाली श्वास घेऊ शकला नाही तो शाहू महाराज हत्या केलेल्या शत्रूचा मुलगा ताटाखालचे मांजर बनतील असा खरेच विचार करेल का या बद्दल साशंकता वाटते, नेमकंकारण औरंगजेबच सांगू शकेल तरीही काही कारणच असेल तर १) पडद्यामागून मराठा सरदारांनी अथवा शाहू महाराजांच्या आजोळून रदबदली २) औरंगजेबाच्याच कुटूंबातन झालेली भावनीक रदबदली ३) औरंगजेब म्हातारपणामुळे दयाळू झाला होता (तसे असते तर संभाजी महाराजांवरही गंभीर प्रसंग गुदरला नसता) ४) कोवळ्या वयातील भोसले घराण्याच्या वंशाच्या दिव्यास हात न लावणे म्हणजे संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी अधिक हल्ले होणार नाहीत ५) किंवा महाराष्ट्रातील जनतेची आणि भोसले घराण्याच्या स्वामी भक्तांची अधिक नाराजी न घेणे ६) मराठा सरदारांशी भविष्यकाळात तडजोडीचा प्रसंग आलाच तर मुत्साद्दी वाटाघाटीं साठी ओलीस ठेवणे यापैकी सुद्धा एखादे कारण असू शकेल किंवा एकही नसेल.
तरीही >>म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी<< हा तर्कही पुरेसा पटत नाही. ज्या स्थितीत संभाजी महाराज आणि कुटूंबीय मोगलांच्या हाती लागले तेव्हा >>गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा <<खरेच चालू होता का ? माझ्या हाती संदर्भ साधने नाहीत पण याच धाग्यावर झालेली आधीची चर्चा पाहता औरंगजेबाचा दबाव ढिला पडत नव्हता वाढलेला होता असे प्रथम दर्शनी वाटते त्यामुळे आपल्या या तर्का बाबत साशंकता वाटते.
26 Sep 2014 - 1:43 pm | माहितगार
माझ्याकडे इतिहासाची संदर्भ साधने उपलब्ध नाहीत पण संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटूबींयांना अटक करण्याच्या नेमक्या वेळी औरंगजेबाचे सैन्य स्ट्रॅटेजीकली यशस्वी होताना दिसते असे या धाग्यावरील आधीच्या प्रतिसादातील चर्चांवरून वाटते.
संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर काही वर्षे लोटूनही मराठे पूर्ण नियंत्रणात राहीले नाहीत तर नंतर औरंगजेब उद्वीगन झाला असेल नाही असे नाही परंतु ज्या काळात संभाजी महाराज आणि त्यांचे कुटूंबीय हाती पडले तेव्हा औरंगजेब अथवा त्याचे सरदार उन्मादात असण्याची शक्यता अधिक उद्वीग्नतेची नव्हे. संभाजी महाराजांची हत्या करातानाच्या क्रौर्यात जेवढा जनतेवर जरब बसवणे हा हेतु असू शकेल तेवढाच शत्रूच्या प्रमुखास जेरबंद करण्याचा उन्माद हेही कारण असू शकेल.
26 Sep 2014 - 1:58 pm | सौंदाळा
हे माझे मत आहे. मी इतिहास अभ्यासक / संशोधक नाही.
26 Sep 2014 - 2:26 pm | माहितगार
मनातले विचार मनात ठेवण्यापेक्षा चर्चा करून कसोटीवर लावून पाहिलेले बरे, मीही आपल्या प्रमाणेच इतिहात रुची तेवढीच ठेवतो, अभ्यासक / संशोधक वगैरे नाही. २१व्या शतकात सर्व दस्तएवज केवळ अभ्यासक अथवा संशोधकांची मक्तेदारी होऊन काही मोजक्याच जणांना उपलब्ध होतात ते ऑनलाईन याची डोळा पाहण्या साठी आणि युनिकोडात सहज शोधणेबल याची हाते शोधण्यासाठी उपलब्ध व्हावयास हवेत.
अभ्यासकांची मत विचारात घेतली पाहिजेत पण तर्क हि कुणाची मक्तेदारी नाहीत तुम्ही तुमच तर्क आणि मत बनवू आणि मांडू शकता त्या बद्दल आदरच आहे. अर्थात मला जिथे साशंकता वाटली ती नोंदवली एवढेच.
धन्यवाद
26 Sep 2014 - 2:31 pm | सौंदाळा
पटले
म्हणुन तर मिपावर येत असतो
9 Dec 2015 - 7:23 pm | हेमंत लाटकर
सोयराबाई व अष्टप्रधान मंडळाच्या मनात राजारामाला गादीवर आणायचे होते. हंबीरराव मोहित्यांनी संभाजीराजांना साथ दिल्यामुळे कोणाचे चालले नाही व संभाजीराजे सत्तेवर आले. संभाजीराजांनी सोयराबाईंना कैदेत टाकले. जेव्हा संभाजीराजांना अटक झाली तेव्हा विरोधकांना राजारामाला सत्तेवर आणण्याची संधी मिळाली. म्हणून सरदार व पंतप्रतिनिधीनी संभाजीराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला नाही.