नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?
प्रतिक्रिया
9 Dec 2015 - 7:50 pm | प्रचेतस
ओके.
9 Dec 2015 - 9:43 pm | मालोजीराव
हे कुठल्या तत्कालीन पुराव्याच्या आधारे तुम्ही सांगत आहात, राजारामांना संभाजीराजांच्या विरोधकांनी नव्हे तर छत्रपतींच्या नंतर मुख्याधिकारी असणार्या शंभूपत्नी येसूबाई यांनी सिंहासनावर बसवले तेही अगदी संभाजीराजे यांना मोगलांनी पकडल्यावर ८ दिवसात म्हणजे ९ फेब १६६९ ला.
गोवा ,म्हैसूर,जंजिरा सह मोगलांच्या विरुध्द झालेल्या सर्व स्वर्यात आणि युद्धात सर्व सरदारांनी संभाजीराजांना पूर्ण साथ दिली.
10 Dec 2015 - 2:03 am | धनावडे
संदर्भ आठवत नाही पण पंतप्रतिनिधी हे पद त्यावेळी नव्हत कदाचित
10 Dec 2015 - 2:27 am | धडपड्या
जिजाई प्रकाशनची पुस्तके वापरता का काय, संदर्भासाठी?
10 Dec 2015 - 4:08 am | धनावडे
नाही हो। अस कोणत प्रकाशन आहे हेच आता कळल २००९-१०साली बाजीरावाच एक दोन खंड असणार चरित्र वाचला होत त्यात होता हा उल्लेख लेखक आठवत नाही
आणि तुमच्या माहिती साठी मी कोणतही ब्रिगेडी साहित्य वाचत नाही तुम्ही वाचत असाल
10 Dec 2015 - 4:13 am | धनावडे
आणि ते पुस्तक फार जुने होत कधी वाईला गेलात तर टिळक वाचनालयात जाउन शोध घ्या
10 Dec 2015 - 4:18 am | धनावडे
आणि त्यात काय कुणावर चिखलफेक केली नव्हती
माझ वाचन काही तुमच्या इतक नाही पण बाजीरावावर आजवर मी वाचलेल सुंदर पुस्तक होत ते
लेखक लक्षात नसल्यामुळे संदर्भ आठवत नाही म्हणटलेल
10 Dec 2015 - 4:41 am | धनावडे
पंतप्रतिनिधी हे पद राजाराम महाराजानी जिंजीला असताना निर्माण केल
10 Dec 2015 - 7:40 am | धडपड्या
अहो, माझा प्रतिसाद तुम्श्हाला नव्हता. तो फक्त तुमच्या नंतर दिला, म्हणून तुमच्या प्रतिसादाखाली आलाय. थंड घ्या. तुम्हाला दिलेला प्रतिसाद, असा दिसतो..
11 Dec 2015 - 12:49 pm | तुडतुडी
खूप छान . नास्तिकतेच ढोंग करणार्यांना मारलेली चपराक आवडली .
नवते झाले . आणि ह्याला फितुरी कारणीभूत नाही .