भाजे लेणी

झकासराव's picture
झकासराव in कलादालन
23 Oct 2008 - 10:53 pm

मध्यतंरी भाजे येथे जाण झाल.
भाजे लेणी हे बौद्ध लेणी आहेत. अख्ख्या डोंगर पोखरुन ही लेणी बनवली आहेत.
अशी अनेक लेणी सापडतात. कार्ला , शिवनेरी परिसरात अशी लेणी आहेत.
ही लेणी तेव्हाच्या बौद्ध भिक्षुंच्या रहिवासासाठी असायचीत. (म्हणे)
भाजे हे ठिकाण पुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर आहे.
जर पुण्याहुन लोकलने जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनटाच्या अंतरावर आहेत.
स्टेशनवर उतरल की लोहगड आणि विसापुरच दर्शन होतच. तिथेच जवळच ही लेणी आहेत. विसापुर आणि लोहगड हे मात्र जास्त अंतरावर आहेत.
जर जुन्या मुंबई पुणे रोड ने गेल की कार्ला (एकवीरा माता) इकडे जाण्यासाठी एक चौक लागतो. तिथुन कार्ल्याच्या विरुद्ध दिशेने जायच. साधारण ३-४ किमी वर मळवली स्टेशन येत.
तिथे काढलेले हे काहि फोटो.

हा आहे त्या लेण्याचा फोटो.

DSC02874

हा लेण्यांचा डावीकडील भाग.

DSC02875

हा उजवीकडील भाग

DSC02876

हे तिथुन दिसणार एक सुंदर दृष्य
DSC02887

तिथे सध्या अशी रानफुलं आहेत भरपुर......

DSC02900

अजुन काहि फोटो आहेत ते खालील लिन्क वर पहायला मिळतील.

http://www.flickr.com/photos/22679212@N08/sets/72157608308033367/

वरच्या फोटोंची एक्जिफ इन्फॉर्मेशन फ्लिकरच्या वरच्या लिन्क वर गेल्यावर पहायला मिळेल.
फुलांचे फोटो मॅन्युअल सेटिन्ग आणि मॅन्युअल फोकसिन्ग (हे करणं माझ्या कॅमेर्‍यात खरच वेळखाउ आणि कठीण आहे) करुन काढला आहे.

कलासंस्कृतीप्रवासछायाचित्रण

प्रतिक्रिया

पक्या's picture

23 Oct 2008 - 11:01 pm | पक्या

सुरेख चित्रे. फुलांचा फोटो तर अफलातून. त्यातही पुढचे फूल अप्रतिम दिसतेय.

भाग्यश्री's picture

23 Oct 2008 - 11:13 pm | भाग्यश्री

सुंदर फोटो!! तुझ्यामुळे बरीच माहीती कळते..

लिखाळ's picture

23 Oct 2008 - 11:17 pm | लिखाळ

भाज्याची लेणी छानच आहेत.. मला ती जागा फार आवडली आहे.
पहिला फोटो एकदम छान आहे..आणि ढगांच्या मागच्या सूर्याचा फोटो पण छान आहे..तो सुद्धा इथे टाका ..:)
--लिखाळ.

शितल's picture

23 Oct 2008 - 11:28 pm | शितल

झकासराव,
मस्त फोटो काढले आहेस रे. :)
कोठे कोठे भटकंती असते रे तुझी :?

विसोबा खेचर's picture

24 Oct 2008 - 12:05 am | विसोबा खेचर

अरिशय सुंदर फोटू रे झकासा.. जियो..!

आठवीत की नववीत आमच्या शाळेची तिथे सहल गेली होती त्याची आठवण झाली... :)

तात्या.

चित्रा's picture

24 Oct 2008 - 8:55 am | चित्रा

चित्रे छान आणि स्पष्ट आली आहेत. एखादे पॅनोरमिक असते तर अजून बहार आली असती, पण एकंदरीत मस्त चित्रे. धन्यवाद.

भाजे येथील लेण्यांवर थोडी अधिक माहिती माझ्याकडे हल्लीच आली आहे. ती इथे टंकून देते..

हे लेणे शैलगृह या संज्ञेने ओळखले जावे असे समजते. चैत्यगृह म्हणजे इमारतीच्या आत स्तूप असे. असे स्तूप हे जेव्हा दगडात कोरलेल्या गुहांमध्ये असत तेव्हा त्याची शैलगृह अशी संज्ञा आहे. सम्राट अशोकाच्या काळात स्तूप अनेक ठिकाणी उभारले गेले. असे सांगितले जाते की स्तूप म्हणजे बुद्धाच्या किंवा मोठ्या बौद्ध भिक्षूंच्या शरीराच्या अस्थी किंवा इतर अवशेषांना सन्मानाने करंडकात ठेवून त्यावर दगडाचे बांधकाम होई आणि एक छोटी छत्री उभारली जाई (आदर दर्शवण्यासाठी).

भाज्याच्या लेण्यांना दगडात कोरले असले तरी त्यावरील नक्षी लाकडातील नक्षीकामाप्रमाणे आहे. या जागेला दर्शनी भागावर त्या काळी लाकडी मोठा दरवाजा असावा असे सांगितले जाते. अष्टकोनी दगडी खांबांवर लाकडी वाकवलेल्या तुळया बसवल्या आहेत. त्यातील लाकडावर ही अर्पणपत्रिकेप्रमाणे छोटी माहिती खोदलेली मिळाली आहे, त्यारून हे लाकूड जवळजवळ २२०० वर्षे जुने आहे हे समजते. दगडी खांबही जवळ जवळ दिसतात.

ही लेणी अनेक वर्षे वापरात राहिली असे समजले जाते.

ध्रुव's picture

24 Oct 2008 - 11:30 am | ध्रुव

चित्रे व त्याबरोबरची माहिती छानच. अजूनही माहिती वाचायला आवडेल.
भाजे या परिसरातच बेडसे व कार्ला ही लेणी बघायला मिळतात. या दोन्ही व भाजे लेण्यांमध्ये काही साम्य आहे का? म्हणजे बांधकाम, काळ यात काही साम्य आहे का ही माहितीही वाचायला आवडेल.

--
ध्रुव

चित्रा's picture

25 Oct 2008 - 8:58 am | चित्रा

क्रमशः जमेल तशी माहिती टंकून देते - आजच्या दिवसात कधीतरी.

कार्ल्याची लेणी झकासरावांनी कॅमेर्‍यात टिपली दिसत नाहीत अजून, पण लवकरच ते तिकडे मोहरा वळवतील अशी आशा आहे!

कार्ल्याची लेणी ही खास समजली जातात - कारागिरी आणि लोकांचे योगदान अशा दोन्ही अर्थाने. इ. स. च्या पहिल्या शतकात यांचे बांधकाम सुरू झाले असावे. येथील खांब प्रेक्षणीय आहेत, अष्टकोनी खांबांवर वरच्या भागात कोरलेली शिल्पे आहेत. शिल्पांमध्ये हत्ती, पुरूष आणि स्त्रिया आहेत. जोडप्यांची कोरीव शिल्पे बाह्य भागात आहेत, आणि एक खास असा सिंहांचा स्तंभही आहे. आणि रचना ही एकाच मोठ्या योजनेचा भाग असल्याप्रमाणे आहे (नंतर आधीच्या बांधकामाला न शोभणारी अशी भर घातलेली नाही). सर्व थरातील लोकांनी दान देऊन ही लेणी बनवली आहेत असे आढळून आले आहे. पण लेण्यांचे काम हे भूतपाल नावाच्या व्यापार्‍याने करवून आणवले. कार्ल्याचे जुने नाव वेळूरक असे असावे. धेनूककट आणि सोपारा, तसेच वेजमती या गावांमधील लोकांनी, (धेनूककट येथील "यवनांनी") या कामाला पैशाचे पाठबळ (दान) दिले असेही दगडांवर कोरलेले मिळते. ऋशभदत्त (उसवदत्त) आणि वशिष्ठीपुत्र पुळुमवी ( सातवाहन राजा, उच्चार माहिती नाही) ही जमीन वेळूरक संघाला दिली असे उल्लेख आहेत.

या लेण्यांची आतली स्थिती अधिक चांगली आहे. आतील भागात इतर लेण्यांत जसे पावसाने नुकसान झाले आहे तसे इथे दिसत नाही याचे कारण थोडा आडोसा व्हरांड्यासारख्या भागाने तयार झाला आहे. आतील लाकडी छतही जवळजवळ २००० वर्षांनंतरही बर्‍यापैकी सुस्थितीत आहे.

लेण्यांच्या बाहेरील बाजूस एकविरा देवीचे देऊळ आहे. हे देऊळ लेण्यांइतके प्राचीन वहिवाटीचे आहे किंवा नाही याची माहिती मिळाली नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2008 - 8:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर चित्रे, त्यावर अधिक माहिती वाचायला आवडेल.

सहज's picture

24 Oct 2008 - 11:41 am | सहज

लेणी छान आहेत. इथे जाण्यासाठी वरपर्यंत पायर्‍या आहेत तीच लेणी ना?

इथेच का अश्या दुसर्‍या लेण्यात एकवीरा देवी का अश्याच कुण्या देवाला बळी अजुन दिला जातो का? काही वर्षापुर्वीपर्यंत तरी कधी तरी यात्रा भरते व तो लेण्याच्या समोरचा परिसर कत्तलखाना होतो. इतक्या चांगल्या जागी रक्त, कत्तल नको वाटते.

इथे पुरातत्व खाते संवर्धनासाठी काय करते काही कल्पना आहे का? खरे तर इथे उत्तम नियोजन करुन एक पर्यटन स्थळ केले पाहीजे.

प्रमोद देव's picture

24 Oct 2008 - 11:41 am | प्रमोद देव

तुझ्या नावाप्रमाणे छायाचित्रंही झकास आहेत रे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Oct 2008 - 12:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झर्‍या!

अनिल हटेला's picture

24 Oct 2008 - 12:28 pm | अनिल हटेला

झकास फोटो बरं का झकासराव !!!!

पुण्यात होतो तेव्हा आला मूड की निघालो मावळात!!!

भाजे लेणी ,कार्ला लेणी इथे ब-याचदा गेलोये !!!

आठवणी ताज्या झाल्या !!

(भटकती आत्मा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

झकासराव's picture

24 Oct 2008 - 6:51 pm | झकासराव

धन्यवाद दोस्तहो कौतुकाबद्दल. :)
चित्रा तुम्ही दिलेली माहिती मस्त. कार्ला येथे अशीच आहेत लेणी. फक्त त्यातील कोणती अधिक जुनी हे नाही माहीत. बेडसे येथील लेणी अजुन नाही पाहिलेली.
इथेच का अश्या दुसर्‍या लेण्यात एकवीरा देवी का अश्याच कुण्या देवाला बळी अजुन दिला जातो का>>>> तुम्ही म्हणताय ती कार्ला येथील लेणी. तेथे एकवीरा मातेच मंदिर आहे. बळी देण्याविषयीच काहि माहीत नाही. पण वर्षातुन एकदा ठाकरे साहेब तिथे भेट देत असत बहुद्धा. त्यांच कुलदैवत आहे अस ऐकल होत मी. एकदा तिकडे गेल्यावर अस लक्षात आल की कोळी लोकांची जास्त गर्दी होती. कोळी लोकांच दैवत आहे एकवीरा आई हे तव्हाच माहित झाल.
पुरातत्व खाते संवर्धनासाठी काय करते काही कल्पना आहे का?>>>>>>
ह्या बाबतीत जरा ठणठण आहे आपल्याकडे. नाही म्हणायला एक वेगवेगळी कलम दाखवणारी रंगीबेरंगी पाटी असते तिथे. ज्यात नुकसान केल्यास काय कलम लावल जाइल एवढीच माहिती असते.
त्याउप्पर माहिती दाखवणारा एकही फलक नाहिये. तरी नशीब की हे पहायला तिकिट आहे आणि ते विकणारा माणुस असतो ज्याच्यामुळे लोक फारस नुकसान करत नसतात. मायतर लोकानी काय काय केल असत ते नाही सांगता येत.
मी ह्या आधी इकडे गेलो होतो २००३ मध्ये बहुद्धा. त्यावेळी तरी लोहगड ,विसापुर आणि ही लेणी हा भाग हौसे,नवसे,गवसे ह्यांच्यापासुन दुर्लक्षीतच होता.
आता बर्‍यापैकी लोक येतात बघायला. पण गुफेत जावुन मोबाइल वर रेडिओ मिर्ची नावाच्या पुचाट चॅनेल वर "टच मी टच मी , जरा जरा किस मी किस मी" अशी गाणी ऐकत असतात. सोबत खाउ घेवुन येतात आणि त्याच्या पिशव्या तिकडे फेकुन जातात. :(
(ह्या वेळी तिकिट चेक करणार्‍या इसमाला मी चक्क तिकडे फेकलेला कचरा उचलुन एकत्र करताना पाहिल. खरच ही वृत्ती दुर्मिळ आहे. )
ह्यावेळी तिथे एक मुलगा होता वय १८-२१ जो गाइड पाहिजे का किंवा ह्या लेण्यांची माहिती देणार पुस्तक हव का हे विचारायला आला. हा बदल सुखावह आहे.
(आमच्याकडे सध्या वाढत्या महागाइमुळे खर्चाच रेशनिन्ग सुरु असल्याने त्याला नाही मदत करु शकलो. पुढच्या वेळी नक्की)

पुण्यात होतो तेव्हा आला मूड की निघालो मावळात!!!>>>> खर आहे रे बैलोबा. मावळ खुपच समृद्ध आहे. काहि लोक येतात आणि फक्त लोणावळा खंडाळा इकडेच जातात. (त्यात बरेचसे अ:))अस्तात ज्याना ही माहिती नाही हेच बर अस वाटत. :))
त्याना माहीत नाही अजुन मावळात काय काय लपलेल आहे.
हल्ली मावळात सेकंड होम घेण्याची लोकांची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे सध्या तरी रोड टच रिकाम्या जागा जावुन बिल्डरांच्या बिल्डिन्गी दिसत आहेत. पण हे लोण फारसं आतवर मावळाला पोखरणार नाही हीच इच्छा आहे.
मध्ये खोडद आणि जुन्नर परिसरात थोडस फिरलो होतो. त्या परिसराबद्दल देखील आकर्षण निर्माण झाल आहे जोरदार. विशेषत: शिवनेरी आणि परिसरात असलेले शेकडो लेणी.
तो हि परिसर मस्त आहे फिरण्याजोगा.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विनायक प्रभू's picture

24 Oct 2008 - 7:46 pm | विनायक प्रभू
धनंजय's picture

24 Oct 2008 - 9:05 pm | धनंजय

आणि माहितीसुद्धा.

मला एकदा त्या लेण्यांची सफर कोण्या स्थापत्य/बौद्ध इतिहासाचा गाईड घेऊन करायची आहे.

चित्रा, झकास यांनी दिलेली माहिती आवडली. क्रमशः येणार्‍या माहितीची वाट बघत आहे.

प्राजु's picture

24 Oct 2008 - 9:14 pm | प्राजु

झकासराव,
तुझ्या फोटोग्राफीला मानलं रे!!
चित्रानी माहितीही छान दिली आहे. तुझ्यामुळे पुण्याच्या आसपासची बरिच माहिती मिळते...
धन्यवाद.

आवांतर : ते पिवळ्या फुलाचं चित्र मी माझ्याकडे कॉपीकरून घेऊ का??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

24 Oct 2008 - 9:54 pm | मदनबाण

झ्कास फोटो..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda