नीरज कुलकर्णी यांची 'मदार' कशावर आहे हे बघून मला माझी मदार विडंबनावरच कशी आहे त्याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि....
नवटाक ह्या कवींची, भाषा सुमार आहे...
आता विडंबने ही, माझी मदार आहे...
आश्वासने मिळाली, त्यांना जरी कुणाची;
निश्चीत आज त्यांची, कविता शिकार आहे...
मी हासलो तुलाही, वाचून ओळि सार्या;
असतील दोन जमल्या, तिसरी चुकार आहे...
का भाव मोल केला, ही शायरी अशी का?
मारुन सर्व बाता, होतो फरार आहे!
'हे काव्य आज त्याचे, उसवून काढले मी!!'
हा कोणता निराळा, शिंपी टुकार आहे?
गझला किती कवींच्या, मी फाडल्या प्रभावी;
'रंग्यास' कल्पनेचा, चढला बुखार आहे...
चतुरंग
प्रतिक्रिया
20 Oct 2008 - 10:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विडंबन मस्तच आहे. :)
20 Oct 2008 - 11:44 pm | प्राजु
एकदम सह्ही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Oct 2008 - 12:55 am | बिपिन कार्यकर्ते
मी तर हेच म्हणेन, कवि फार भेदक सत्य लिहून गेला आहे :)
गझला किती कवींच्या, मी फाडल्या प्रभावी;
रंगाशेठ, चालु द्या.
बिपिन कार्यकर्ते
21 Oct 2008 - 3:17 pm | दत्ता काळे
मी हासलो तुलाही, वाचून ओळि सार्या;
असतील दोन जमल्या, तिसरी चुकार आहे...
अगागागा . . . . हे ल ई भारीये दादा . .