आम्ही काही काळापूर्वी http://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता.
तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले.
आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे.
सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे.
तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही.
त्याला बर्याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे.
सर्व मिपाकरांना विनंती आहे की गणपाला जरी निवडून आणलेलं असलं तरी पुढच्या पाकॄंसाठी त्याला सगळ्या मिपाकरांच्या समर्थनाची गरज आहे. तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा.
'अच्छी रेसिपीज आनेवाली है' :)
प्रतिक्रिया
16 May 2014 - 5:00 pm | जेपी
+1
मी पयला.
16 May 2014 - 8:42 pm | सूड
बरं मग??
17 May 2014 - 5:29 pm | जेपी
बरं मग???
मग नाय आमी जग वापरतो.
17 May 2014 - 6:06 pm | टवाळ कार्टा
किती ही उधळपट्टी...जरा आजुबाजुला बघा... काही लोक अजुनपण "चिंपाट" वापरतात =))
17 May 2014 - 8:56 pm | अत्रुप्त आत्मा
@अजुनपण "चिंपाट" वापरतात >>>
20 May 2014 - 7:04 pm | सूड
>>जरा आजुबाजुला बघा.
___/\___
16 May 2014 - 5:28 pm | अत्रुप्त आत्मा
16 May 2014 - 5:40 pm | चौकटराजा
शाकाहारी (जातीयवादी) व मांसाहारी (शेकूलर ) यांच्या समाधानासाठी रोज नवे काय हा प्रशन गणपा सोडवू शकतील काय ?
शिवाय पाककृती फसाव्या म्हणून गणपाविरोधकानी केलेले "षडयंत्र" याची ही त्याना काळजी घ्यावी लागेल. एफ डी आय
म्हणजे फूड ड्युर्याबिलीटी इन्डेक्स वर त्याना सर्वाना बरोबर घेउन जाण्याचे खादकरण करावे लागेल ते वेगळेच. गणपा भाई
त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !
16 May 2014 - 5:53 pm | आत्मशून्य
गणपाने तातडीने उरकून घ्यावी. बाकी खादाडी चालूच राहील.
16 May 2014 - 5:59 pm | बॅटमॅन
शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट कुणाकडे? हा प्रश्नही सोडवून घ्यावा.
16 May 2014 - 6:05 pm | आत्मशून्य
अनेक ठिकाणी तो आजकाल चायनीज गाड्यावर मिळायला लागल्यापासून तर डोके दुखी फारच वाढली आहे.
16 May 2014 - 6:30 pm | बॅटमॅन
तरी बरं फिल्टर काऽपी चा प्रश्न अगोदरच फिल्टर औट झालेला आहे.
16 May 2014 - 6:11 pm | अत्रुप्त आत्मा
@शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट कुणाकडे?हा प्रश्नही सोडवून घ्यावा.>>> +++१११
तिरंगी भाताच्या रेशिपीकडे जास्त लक्ष द्यावे!
त्याचबरोबर,विरोधी नॉन्व्हेज्यांसाठी पेटती भट्टी तयार ठेवावी!
अंतर्गत फाटा-फुट करणार्या अंड्यां"ची वेळीच खांडोळीउडवावी
तसेच..नाराजांना नीट-सुपा'त-घ्यावे! =))
एव्हढे केल्यानंतर खात्री बाळगावी-विजयआप'लाच होइल! =))
16 May 2014 - 8:25 pm | मुक्त विहारि
जबराट स्मायल्या...
16 May 2014 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
लै भारी ! स्मायलीसम्राटकी जय हो !!
17 May 2014 - 1:35 pm | सुधीर१३७
३७० नम्बराच्या रेसिपिसाठी फक्त 'मिपा'ची निवड पुरेशी नाही ...
17 May 2014 - 1:39 pm | आत्मशून्य
ठ्ठो... =)) एखिच मार्या पर सॉलीड मार्या.
16 May 2014 - 7:44 pm | जेनी...
काय आवळे काका वेळ जात नै वाट्टं ...!! *mail1*
18 May 2014 - 11:40 pm | बोबो
भन्नाट लेख. जबराट प्रतिक्रिया *ok*
18 May 2014 - 11:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा.
नायहो ! असे (चक्क "शेफ" बद्दलच्या धाग्यात) आवाहन करून ग्रेट (अ)विचारवंताच्या पोटावर पाय देउ नका हो ! =))
20 May 2014 - 7:05 pm | सूड
बर्मग्ठिव्का?? ;)
20 May 2014 - 9:41 pm | प्यारे१
आयला, अजून धरुन हुतासा? ठिवा ठिवा! ;)