आज शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है|
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ब्लु मंडे”
पार्श्वभूमी:
ब्लु कुरासो (blue curacao, pronounced as "blue cure-a-sow") हे निळ्या रंगाचे एक मस्त ऑरेंज बेस्ड लिक्युअर आहे, माझ्या आवडीचे. अतिशय भन्नाट चव असते ह्या लिक्युअरची. ब्लु कुरासो च्या भन्नाट चवीमुळे अतिशय मस्त कॉकटेल्स बनतात. ह्याचा नॉन अल्कोहोलिक सिरपही मिळतो जो मॉकटेल्स बनवण्यासाठी वापरला जातो.
प्रकार: वोडका आणि ब्लु कुरासो बेस्ड कॉकटेल
साहित्य:
वोडका (ऑरेंज फ्लेवर्ड असल्यास उत्तम)
1.5 औस (45 मिली)
क्वांत्रो (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक)
0.5 औस (15 मिली)
ब्लु कुरासो
0.5 औस (15 मिली)
लिंबाचा काप सजावटीसाठी
बर्फ
कॉकटेल शेकर
ग्लास: – कॉकटेल
कृती:
सर्वप्रथम कॉकटेल ग्लासमधे बर्फ आणि पाणी टाकून ग्लास फ्रॉस्टी होण्यासाठी फ्रीझमधे ठेवा. शेकर मध्ये बर्फ टाकून त्यात अनुक्रमे वोडका, क्वांत्रो (pronounced as "qwan-tro") आणि ब्लु कुरासो ओतून घ्या. शेकर व्यवस्थित शेक करून घ्या. शेकर खालच्या फोटोप्रमाणे दिसला पाहिजे.
लिंबाचा काप ग्लासच्या कडेला सजावटीसाठी लावा.
आकर्षक ब्लु मंडे तयार आहे. :)
नोट: नविन घेतलेल्या कॉकटेल नाइफने काहीतरी प्रयोग करायचा प्रयत्न केला लिंबाच्या कापावर पण तो जरा ग़ंडला, त्यामुळे तो काप जरा 'टाईट' झाल्यासारखा दिसतो आहे. ;)
प्रतिक्रिया
25 Apr 2014 - 7:19 pm | यसवायजी
चांगभलं!!
25 Apr 2014 - 7:22 pm | कवितानागेश
काय सुंदर रंग आहे. :)
25 Apr 2014 - 7:25 pm | सौंदाळा
वीकांताची सुरुवात होता होता अचुक टायमिंग साधलं सोत्रिने
मस्तच.
25 Apr 2014 - 7:27 pm | रेवती
सुरेख रंग!
25 Apr 2014 - 7:28 pm | सुबोध खरे
वा सोत्री साहेब,
पाहूनच गार वाटले.
विक्रांत वर आमच्या साकी (बार टेंडर) ने हे क्युरासाओ संत्र्याच्या रसाबरोबर( क्वैन्त्रो आणि व्होडका ऐवजी) अशाच ग्लासात आणून दिले होते. यावर आमच्या बर्याच मित्रांना वाटले कि मी पण "सुरु" केली आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर "डॉक्टर तुम्ही सुद्धा" असे कौतुक मिश्रित आश्चर्य पाहून करमणूक झाली त्याची आठवण झाली.
25 Apr 2014 - 7:45 pm | सोत्रि
:)
- ('डॉक्टर तुम्हीसुद्धा?' हा डायलॉक आठवलेला) सोकाजी
25 Apr 2014 - 7:50 pm | सानिकास्वप्निल
सुंदर रंग !!
25 Apr 2014 - 7:52 pm | सूड
रंग बघून त्यात उडी मारावीशी वाटली. ;)
28 Apr 2014 - 2:51 pm | गणपा
अगदी असेच मनात आले.
25 Apr 2014 - 8:16 pm | किसन शिंदे
शिनुमातल्या समुद्राच्या पाण्यासारखी निळाई उतरलीये त्या ग्लासातल्या काॅकटेलात. :-)
25 Apr 2014 - 8:27 pm | जोशी 'ले'
सो (ब्युटिफुल) त्रिलिक्युअर काॅकटेल :-)
26 Apr 2014 - 12:16 am | आत्मशून्य
अभी उन्हाळेमे तो हर सप्ताअखेर एक - दो कॉकटेल मंगता...!
आजच एके ठिकाणी ब्लु ओशन म्हणून सोडायुक्त मॉकटेल पिले. त्याचा आणी या कॉकटेलचा रंग मात्र शेम टु शेम आहे. नुस्त बघत र्हावे असा. मजा आली.
26 Apr 2014 - 9:58 am | स्पंदना
काय रंग जमलाय या ड्रिंकचा !! व्वाह!
26 Apr 2014 - 10:26 am | डॉ सुहास म्हात्रे
क्लास् ! भूमध्य समुद्रात क्रूझ बोटीच्या डेकवर समोरच्या टेबलावर पाय टाकून आरामात रेलून एक एक सिप् घेत आहे असं चित्र डोळ्यासमोर तरळलं !
26 Apr 2014 - 10:44 am | भाते
काय छान दिसतंय. झक्कास.
26 Apr 2014 - 10:59 am | झकासराव
सुंदर दिसतय. :)
टेस्ट मे बेस्ट असेलच.
26 Apr 2014 - 11:28 am | माझीही शॅम्पेन
सोत्रि कडून अजुन एक जबरदस्त कॉकटेल ..... टाइट झालेल लिंबू बघून मजा वाटली :)
खराखुरा कॉकटेल रसिक असलेली (माझीही शॅम्पेन)
28 Apr 2014 - 1:17 pm | सुहास..
लय भारी रे !!
(सोकाजीचा फॅन )
झोकाजी
28 Apr 2014 - 2:15 pm | प्रभो
हे मिळणार कधी आम्हाला प्यायला?
28 Apr 2014 - 2:25 pm | सुहास..
कधीच नाही ;)
( त्यो फक्त स्वतः पुरत बनवितो, हे फोटो मधील ग्लास बघुन देखील समजले नाही का तुला )
28 Apr 2014 - 4:41 pm | ब़जरबट्टू
चियर्स सोत्रि,
निव्वळ अप्रतिम, और आने दो !!
2 May 2014 - 9:54 pm | मुक्त विहारि
इथे आम्ही सौदी शँपेन पिवून आली रात्र साजरी करत आहोत, आणि तुम्ही मात्र असे भन्नाट आणि अचाट कॉकटेल सादर करता.
असो,
कॉकटेलची दखल घेतल्या गेली आहे.
जाता जाता, एक सुचना कम विनंती.
ह्या कॉकटेल बरोबर योग्य चखना काय?
4 Jun 2014 - 9:40 pm | बे-वडे
कॉकटेल वाचुनच झिंगलो...पण या बे-वड्याची विचारणा - हे सगळं भुसावळ्च्या ( जि. जळगाव ) नजिक कुठे प्राप्त होईल ?
कृपया ही सोय करुन द्यावी... पार्टी आभारी आहे !!!
16 Jun 2014 - 5:58 pm | सामान्यनागरिक
क्वांत्रो आणि क्युरासाओ, ट्रिपल सेक असल्या गोष्टी कोठे मिळतात हो? आमच्या नेहेमीच्या मधुशालेत किंवा दुकानांत कधी दिसल्या नाहीत? या बाबत जरासे मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल !
17 Jun 2014 - 5:04 pm | एस
नीलकुहर उर्फ Grotta Azzurra ची आठवण झाली.