कॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
14 Mar 2014 - 5:20 pm

बर्‍याच दिवसात कॉकटेल बनवले नव्हते. बार मध्ये काय काय साहित्य आहे ते बघितले, पण घरात ज्युसेस अजिबातच नव्हते. अ‍ॅप्पी फिज़ची बाटली फ्रीझमध्ये मागच्या कोपर्‍यात पहुडलेली दिसली. लगेच तिला सत्कारणी लावायचे ठरविले आणि एक कॉकटेल आठवले. तेच हे, कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल

पार्श्वभूमी:

हे कॉकटेल मालिबूच्या साईटवर एकदा बघितले होते. 'अ‍ॅप्पल स्ट्रुडेल' ह्या नावाचे एका वोडकापासून बनणारे एक वेगळे कॉकटेल आहे. त्याचे साहित्य जरा जास्त आहे. पण मलिबूने त्यांचे एक व्हेरिएशन मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल बनवले, अतिशय मर्यादित साहित्याने. मग मीही त्याला एक रमचा ट्वीस्ट देऊन माझे व्हेरिएशन बनवले. रम अशासाठी की कॉकटेल जरा 'कडक' व्हावे. :)

अ‍ॅप्पी फीझच्या कार्बोनेटेड इफ्फेक्टमुळे आणि त्याच्या रंगामुळे हे व्हेरिएशन मस्त शॅँपेनसारखे दिसते आणि मालिबूच्या मखमली चवीमुळे लागते देखिल. त्यामुळे ह्यासाठी लागणारा ग्लास मी वाइन ग्लास वापरला! (खरेतर शॅँपेनफ्लुट वापरायला हवा, पण सध्या कलेक्शनमध्ये नाहीयेय)

प्रकार
मालिबू बेस्ड कॉकटेल

साहित्य

व्हाइट रम
१ औस (३० मिली)

मालिबू
१ औस (३० मिली)

अ‍ॅप्पल फीझ
३ औस (९० मिली)

बारीक तुकडे केलेला बर्फ

ग्लास
वाईन ग्लास

कृती:

ग्लासमध्ये 2/3 बर्फ (क्रश्ड आइस) भरून घ्या.

आता त्यात अनुक्रमे मालिबू, व्हाइट रम, आणि अप्पी फिझ ओतून घ्या.

आता सफरचंदाचा काप सजावटीसाठी ग्लासाच्या कडेला लावून घ्या.

अतिशय मादक आणि चित्ताकर्षक 'मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल' तयार आहे :)

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

14 Mar 2014 - 5:42 pm | सुहास झेले

व्वा व्वा... जबरदस्त दिसतंय :)

(गारेगार) सुझे :-)

आत्मशून्य's picture

14 Mar 2014 - 5:56 pm | आत्मशून्य

बाकी म्या निस्त एप्पी फ़िझच पसंत करतो. दुर्दैव माझे आणखी काय:(

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 11:13 pm | मुक्त विहारि

मुक्काम २/३ दिवस आहे....

एखादा वीक-एंड तुमच्याकडे साजरा करणार.

(तुम्ही आता हवे तितके कॉकटेल टाका.सगळे साजरे करू.)

स्पंदना's picture

15 Mar 2014 - 4:17 pm | स्पंदना

भिंतीच टेक्स्चर बदलल्य का? बाकी रंग तोच!
टेबलक्लॉथपण सुंदर ;)

गणपा's picture

15 Mar 2014 - 4:34 pm | गणपा

बाकी आमचा एक मित्र तुमच्या घरी येऊनही तुम्ही त्याला कोरडाच पाठवल्याची त्रक्रार करत होता. ;)

मुक्त विहारि's picture

15 Mar 2014 - 5:10 pm | मुक्त विहारि

कुणाला दारूचा आस्वाद द्यावा आणि कुणाला नाही, हे सोत्रिंना चांगलेच ठावूक आहे.

त्या सदग्रुहस्थाने कोनॅकला ब्रँडी म्हटले असणार आणि चिरूट इन केला असणार...

(सोत्रि भाऊ जरा हलकेच घ्या.)

तो 'ओलाचिंबं' होऊनच आला असावा असे मला वाटले, त्यामुळे तसा प्रमाद घडला खरा!

- (ओला) सोकाजी

विजुभाऊ's picture

15 Mar 2014 - 5:39 pm | विजुभाऊ

सोत्री एक शंका विचारु का?
कॉकटेल केल्याने लत्ताप्रहारात किती फरक पडतो

विजुभौ, खरे सांगु कं? प्रश्न कळलाच नाही!

- (प्रश्नांकित) सोकाजी

सुबोध खरे's picture

31 Mar 2014 - 1:48 pm | सुबोध खरे

लत्ता प्रहार = किक

माझीही शॅम्पेन's picture

17 Mar 2014 - 11:40 pm | माझीही शॅम्पेन

एकदम छान ... जबरदस्त .. असल काही मिळत हेच माहिती नव्हत !!!!

अर्धवटराव's picture

18 Mar 2014 - 1:23 am | अर्धवटराव

आयला ढगात गेलं ते राजकारण नि काय काय... असे धागे हेच मिपाचं वैभव :)

पैसा's picture

28 Mar 2014 - 7:30 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच मस्त फटु! मात्र तू अख्ख्या सफरचंदाला सफरचंदाचा काप का म्हणतोयस ते कळलं नाही! ;)

सोत्रि's picture

28 Mar 2014 - 8:55 pm | सोत्रि

तो काप बायकोने केलाय, त्यामुळे त्याला काप न म्ह्णून माझा पत्ता 'काप'ला जावा अशी माझी इच्छा नाही! :D

- (अख्खा राहयची इच्छा असलेला) सोकाजी

ब़जरबट्टू's picture

4 Apr 2014 - 11:34 am | ब़जरबट्टू

एव्हढ्या नाजुक प्रकाराला तो असला अगडबंब "काप" का ? ह्या प्रश्न पडला होता खरा, पण आता .. आहाहा.. काय ती सजावट असेच म्हणेल... :)

चुकुन माकुन भेट झालीच तर कोरडी बोळवण नको असलेला.. बजरु.. :)

मदनबाण's picture

30 Mar 2014 - 11:51 am | मदनबाण

सोनरे पाणी खुणावते आहे ! ;)

{शहाळ्याच्या पाण्यावरच तहान भागवणारा} ;)

सुहास..'s picture

31 Mar 2014 - 11:00 am | सुहास..

कल्ला आहे कॉकटेल !!