‘कॉकटेल लाउंज : ग्रीष्म लाउंजोत्सव' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मॅन्गो मार्गारीटा
पार्श्वभूमी:
आपले गवि यांनी एकदा गोव्याला फिशरमन व्हार्फ मध्ये मॅन्गो मार्गारीटा ट्राय केली होती. त्याने तसे सांगितल्यापासून ते कॉकटेल एकदम मनात भरले होते. आमरस हा माझा जीव की प्राण! माझ्यासाठी, खाण्यात आमरसाचे जे स्थान तेच दारुमध्ये टकीलाचे आहे. त्यामुळे ह्या दोन्ही आवडीच्या गोष्टींचा संगम असलेले कॉकटेल तितकेच कातिल असणार ह्याची खात्री होती.
ह्या मंगळवारी लग्नाचा वाढदिवस होता, तो आणि ग्रीष्म लाउंजोत्सव यांचे औचित्य साधून त्या मॅन्गो मार्गारीटाचा बार उडवायचे ठरवले. सगळे साहित्य घरात होतेच. त्यामुळे खरंच मॅन्गो मार्गारीटाचा बार 'उडाला'!
साहित्य:
टकीला
१ औस (३० मिली)
क्वाँत्रो (दुसरा पर्याय - ट्रिपल सेक)
१ औस (३० मिली)
अर्ध्या आंब्याचा गर
अर्ध्या मोसंबीचा रस
बर्फ
आंब्याची चकती सजावटीसाठी
ग्लास
कॉकटेल ग्लास किंवा मार्गारीटा ग्लास
कृती:
ब्लेंडरमध्ये सर्व साहित्य घालून घ्या. त्यानंतर ब्लेंडरमध्ये अर्धा ब्लेंडर भरेल एवढा बर्फ भरून घ्या.
सर्व मिश्रण एकजीव होइपर्यंत मध्यम गतीने ब्लेंड करा.
आता ते मिश्रण कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या आणि आंब्याची चकती ग्लासच्या रीमला खोचून घ्या.
झक्कास आणि बहारदार मॅन्गो मार्गारीटा तयार आहे :)
प्रतिक्रिया
19 Apr 2013 - 4:03 am | मुक्त विहारि
काय खत्री दिसत आहे...
19 Apr 2013 - 4:05 am | रेवती
सादरीकरण आवडले. या सिझनच्या आम्रफलाचे दर्शन झाले.
19 Apr 2013 - 5:32 am | स्पंदना
आम्र फलाय नमः।
सोत्री काका हे मिश्रण दाट नाही का होणार? म्हणजे नेहमीच्या पद्धतिने अगदी बोटे ग्लासच्या तळाला फिरवुन चाटायची शक्यता जास्त आमच्च्या बाबतीत.
मला आमरसात मिरपुड घालुन खायला फार आवडते.
बाकी भिंतीचा रंग, अन टेबलक्लॉथ या दोन्हीवर आंब्याचे शिंतोडे न उडवल्याबद्दल धन्यवाद.
हे कॉम्बीनेशन नेहमीसारख खतरा वगैरे काही दिसत नाही उलट तों. पा. सु.
19 Apr 2013 - 2:32 pm | मुक्त विहारि
त्यालाच "खत्री" म्हणतो.
19 Apr 2013 - 11:55 am | गवि
अरे वा. मनाने पुन्हा फिव्हामधे पोचलो... क्या बात.. क्या बात. क्या बात.
तुझी ही कॉकटेलकृती किंचित दाट दिसते आहे (आमरसासारखी किंवा मिल्कशेकसारखी). फिव्हामधे त्यांनी दिलेली किंचित पातळ (मँगोलाइतपत प्रवाही) होती.
अर्थात अशा दाट रसानेही वेगळीच मजा येत असेल.
आणखी एक गोष्ट. फिशरमन्स व्हार्फमधे ऐन मे महिन्यात हे मँगो मार्गरिटा ट्राय करुन बेहद्द आवडल्यावर तेव्हापासून मी इथेही एप्रिल मे महिन्यांत पॉपटेट्स आणि अन्य ठिकाणी बारटेंडरला विनंती करुन मँगो मार्गरिटा बनवायला लावतो. पॉप टेट्सच्या एका शाखेतला बारटेंडर तर या कल्पनेने खूष झाला होता. नॉर्मल मेन्यूत ते हा आयटेम ठेवत नाहीत.
(हापूसप्रमाणेच पायरीचीही मार्गरिटा करुन पहावी काय?)
19 Apr 2013 - 1:24 pm | सोत्रि
ते बहुदा आंब्याचा रस वापरत असावेत किंवा जास्त बर्फ वापरत असावेत त्याने ते कॉकटेल प्रवाही होत असावे.
मी हे व्हेरिएशन जाणूनबबुजुन दाट ठेवले होते. एकदम झक्कास झाले होते, आऊट ऑफ द वर्ल्ड. :)
- (साकिया) सोकाजी
21 Apr 2013 - 9:03 pm | माझीही शॅम्पेन
अगदी हेच वाटल ,
मात्र टकीला बेस काहीही अप्रतिम , मॅन्गो मार्गारीटा म्हणजे तर धोनीचा शेवटच्या चेंडू वर विश्व-चषक जबरदस्त फेव-रेट :)
19 Apr 2013 - 12:54 pm | कपिलमुनी
अर्ध्या मोसंबीचा रस ?
जालावर २-३ ठिकाणी लिंबू वापरले आहे..
दोन्ही व्हॅरीएशन करून पहावे म्हणतो !!
कॉकटेल जबरदस्त ! उन्हाळा सार्थकी लावलात ...
या ग्रीष्मोत्सवात कलिंगडाचे एखादे कॉकटेल येउ द्या !!
19 Apr 2013 - 1:13 pm | गवि
लिहीलंय की सोकाजीनानांनी वॉटरमेलन मोहितो.. गतसमरातः
http://misalpav.com/node/22186
हो यंदाच्या समरासाठी कलिंगडाची नवी पाकृ यावी हेही उत्तमच.. पण माझी कोकमं आणि काजू आधी लायनीत उभे आहेत. कृपया प्रतीक्षा करावी.
19 Apr 2013 - 1:21 pm | सोत्रि
हुकुम सराआँखोंपर! :)
- (साकिया) सोकाजी
22 Apr 2013 - 3:16 am | धमाल मुलगा
आयला! आजवर कोकमाच्या आगळात सोडा घालुन प्यायचं ठाऊक होतं, पण कोकमाचंही कॉकटेल? क्या बात है!!! आतुरतेनं वाट पाहतोय मी ह्या कॉकटेलची. :)
19 Apr 2013 - 2:41 pm | सुहास झेले
प्रचंड भारी .... आता आंबा शोधणे आलं ;-)
20 Apr 2013 - 12:28 am | निनाद मुक्काम प...
ताज्या आंब्यांच्या रसाची चव ही हवाबंद डब्यातील रस किंवा ज्यूस पेक्षा कैकपटीने सरस असते. व मार्ग रिटा मध्ये शक्यतो ताज्या फळांचा रस भन्नाट चव देतो.
सोकाजी ह्यांनी दाट केलेले हे कॉकटेल गोव्याच्या वातावरणात प्यायला मजा येईल.
21 Apr 2013 - 11:52 pm | मुक्त विहारि
ह्या जर्मनीत राहणार्या लोकांना पण गोव्याचेच वेड...
...खरे हिंदुस्थानी आहात...
22 Apr 2013 - 3:03 am | निनाद मुक्काम प...
आम्हा लोकांना आहेच गोव्याचे आकर्षण
22 Apr 2013 - 1:43 am | प्रभाकर पेठकर
लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!
हे भारीच म्हणायचे. आमच्या लग्नाच्या वाढदिवसालाही पुण्यात बार 'उडवावा' म्हणतो. हो आमचे सर्व 'साहित्य' पुण्यातच आहे.
22 Apr 2013 - 3:14 am | धमाल मुलगा
गुरुदेव...दंडवत स्विकारा! :)
24 Apr 2013 - 12:46 am | प्यारे१
हा हा हा हा!
तुम्हालाही सोत्रिंबरोबर शुभेच्छा!
22 Apr 2013 - 7:40 am | चंबु गबाळे
जबरदस्त.. करुन पाहिन नक्की..