कॉकटेल लाउंज : गाथा कॉफीची (भाग १)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
2 May 2012 - 7:10 pm

हजारों वर्षांपूर्वीची एक दुपार, इथियोपियाच्या वाळवंटी प्रदेशातील एका झुडपाळ भागात एक मेंढपाळ त्याच्या शेळ्या-मेंढ्या चरायला घेऊन गेला होता. त्या दुपारी त्याच्या असे लक्षात आले की १-२ शेळ्या नेहमीपेक्षा जरा जास्तच 'लाडात' येऊन उड्या मारत आहेत. त्याने सुरुवातीला तिकडे दुर्लक्ष केले. पण काही वेळाने त्याच्या असे लक्षात आले की आणखीन बर्‍याच शेळ्या लाडात येऊन उड्या मारू लागल्या आहेत. तो जरा चकितच झाला आणि त्या ज्या झुडुपांमध्ये चरत होत्या तिकडे गेला. त्या शेळ्या त्या झुडुपाची लाल बोरं किंवा बोरांसारखी छोटी छोटी फळे खात आहेत असे त्याला दिसले. इतके दिवस तो, ती फळे बघत होता, पण त्याने ती फळे खायचा कधी विचार केला नव्हता. त्याच्या लगेच लक्षात आले की ही फळे खाल्ल्यामुळेच बहुदा ह्या शेळ्या लाडात आल्या आहेत. त्यानेही लगेच ती फळे खाउन बघितली आणि अहो आश्चर्यम! त्यालाही एकदम उत्तेजित झाल्यासारखे वाटून 'लाडात' यावेसे वाटले. पण त्याचे घर दूर असल्यामुळे त्याने त्या उर्जितावस्थेत फक्त नाच करण्यावरच समाधान मानून घेतले. ;)

संध्याकाळी गावात परत गेल्यावर त्याने त्या गावातल्या मुल्लाला हा प्रकार सांगीतला. मुल्ला जरा चौकस होता; त्याने त्या फळांवर जरा संशोधन केले. शेवटी त्या फळाला उकळवून बनलेले पेय प्यायल्यावर येणार्‍या उत्तेजित अवस्थेमुळे, भल्या पहाटेच्या प्रार्थनेला नेहमी येणारी झोपेची पेंग येत नाही आणि प्रार्थना मनःपूर्वक करता येते हे त्याच्या लक्षात आले. लगेच त्याने त्या भागातल्या मौलवींना ते पेय प्यायला दिले. सर्वांनी त्याचा परिणाम बघून त्या पेयाला प्यायची मान्यता दिली, हो... हो, तुमच्या मनात आले तसेच, 'फतवा' काढला. :)

मग हळूहळू ह्या मौलवींकडून ह्या पेयाचा प्रवास सुरू झाला. ते सर्वात आधी येमेन आणि इजिप्त ह्या अरबस्तानच्या बाजूच्या देशांमध्ये थडकले. तिथे मान्यता पावल्यावर ते हळूहळू मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रांमध्ये परिचीत होऊन लोकप्रिय झाले. तो पर्यंत वेगवेगळ्या देशात ह्याला वेगवेगळ्या नावानी संबोधले जायचे. अरब राष्ट्रांमध्ये, अरबीमध्ये, ह्या पेयाला काहवा, 'बीयांची वाइन', असे म्हटले जाउ लागले. अरब देशांतुन तुर्कस्तानात पोहोचल्यावर त्या काहवाचे काहवे नामकरण झाले. तुर्कस्तानातून ह्याचा प्रवास झाला इटलीमध्ये आणि मग इटलीतून पूर्ण युरोपभर झाला. पुढे डचांनी काहवेचे नामकरण कोफी असे (koffie) केले. त्यानंतर इंग्रजांनी त्या कोफीचे कॉफी (Coffee) असे केलेले नामकरण आजतागायत टिकून आहे. डचांनी ह्या कोफीला दक्षिण अमरिकेत नेऊन रूजवले तर ब्रिटीशांनी त्यांच्या वसाहतींमध्ये. असा हा कॉफीचा अद्भुतरम्य प्रवास इथियोपियापासून सुरू होऊन, आता माझ्या हातातल्या वाफाळत्या कॉफीच्या कपात येऊन पोहोचला आहे. :)

मला खरंतर कॉफीची एवढी चाहत नव्हती. कॉफीच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे (इन्स्टंट, फिल्टर, लाटे, मोका, जावा, कप्युचिनो ई.) बावचळून जायला व्हायचे. त्यात स्टारबक्स किंवा सीसीडी सारख्या उच्चभ्रू ठिकाणच्या त्या कॉफीच्या किमतीमुळे म्हणा किंवा तिथे जाउन काय ऑर्डर करायचे हे न कळल्यामुळे म्हणा, कधी कॉफीच्या वाटेला गेलो नाही. पण आता चेन्नैला यायच्या आधि पुण्याला, विवेक मोडक (विमो) यांच्याबरोबर एक 'बैठक' झाली होती. त्यांनी चेन्नैमध्ये मिळणार्‍या फिल्टर कॉफीसारखी फिल्टर कॉफी पूर्ण भारतात कुठेही मिळत नाही तेव्हा आवर्जून टेस्ट कर असे बजावले होते. नवनविन काहीतरी टेस्ट करायला आणि रसग्रंथींना वेगवेगळ्या चवींनी समृद्ध करण्यावर माझा भर असल्यामुळे इथे फिल्टर कॉफी ट्राय केली. त्यानंतर माझा एक तमिळ मित्र, आनंद वेंकटेश्वरन, ह्याने त्याच्या घरी गेल्यावर 'इंस्टन्ट' कॉफी पाजली. तीही फिल्टर कॉफी इतकीच चवदार होती. त्यानंतर मी कॉफीच्या प्रेमात पडलो आणि वेगवेगळ्या तमिळ हॉटेलातली कॉफी ट्राय करण्याचा छंदच जडला. इंस्टन्ट कॉफी आणि फिल्टर कॉफी मधला फरक कळण्या इतपत रसग्रंथी तयार झाल्या. पण मग चौकस बुद्धीला (?) प्रश्न पडू लागले की नेमके हे कॉफीचे प्रकार काय आहेत, काय फरक आहे त्यांच्यात? मग थोडा शोध घेणे सुरू केले...

चला तर मग, ह्या नमनानंतर बघूयात गाथा कॉफीची!


कॉफीची व्यावसायिक लागवड करण्यासाठी लागते कसदार जमीन, उबदार हवामान, भरपूर पाऊस आणि दमट व ढगाळ वातावरण. ह्या सर्व पोषक गोष्टी विषुववृत्ताच्या साधारण २०-२५ डीग्री वर-खाली उपलब्ध असतात, त्यामुळे बाजुच्या चित्रात दाखवलेल्या प्र-देशांत कॉफी तयार केली जाते.
जगात दरवर्षी साधारण ५,०००,००० टन कॉफी तयार केली जाते आणि ह्यात सिंहाचा वाटा एकट्या ब्राझीलचा असतो. त्या खालोखाल कोलंबियाचा नंबर लागतो. भारताचाही नंबर टॉप १० देशांमध्ये येतो. भारतात तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक ह्या राज्यांमध्ये कॉफीची लागवड मोठ्याप्रमाणावर केली जाते.

कॉफीच्या बर्‍याच प्रजाती आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी वाढतात. पण व्यावसायिकरित्या लागवड केल्या जाणार्‍या आणि प्यायल्या जाणार्‍या मुख्य प्रजाती दोनच.

१. अरेबिका (Arabica)
२. रोबस्ता (Robusta)

अरेबिका

रोबस्ता

ही कॉफी, उच्च दर्जाची कॉफी समजली जाते. कॉफीत असलेला मादक घटक 'कॅफीन', ह्याचे प्रमाण ह्या कॉफीत कमी असते (रोबस्ताच्या मानाने).
अरेकिबा कॉफीच्या फुलांचे परागीकरण स्व-परागीकरण (Self Pollination) प्रकाराने होते.
रोबस्ता ही प्रजात कॉफीच्या झाडावर पडणार्‍या रोगावर प्रतिकार करण्यास अरेबिकापेक्षा जास्त सक्षम असते.
अरेकिबा कॉफीच्या फुलांचे परागीकरण पर-परागीकरण (Cross Pollination) प्रकाराने होते.
बहुतेक कॅन्ड आणि इंस्टंट कॉफी बनवण्याकरिता अरेबिका आणि रोबस्ता ह्यांचा ब्लेंड वापरला जातो.


कॉफीची हिरवी फळे लाल झाल्यावर, म्हणजेच पिकल्यावर कॉफीच्या सुगीचा हंगाम सुरु होतो. ही लाल झालेली फळे यांत्रिक पद्धतीने तसेच मनुष्यांकरवी झाडांवरून काढली जातात. अर्थातच माणसांकडून काढले गेलेल्या पद्धतीत अफाट श्रम लागत असल्यामुळे (त्याने कॉफीच्या फळांना कमी क्षती पोहोचते) त्या कॉफीचा भाव हा चढा असतो.

कॉफीचे पिकलेले फळ :


(सर्व चित्रे आंजावरून साभार)

(क्रमशः)

प्रतिक्रिया

काय राव सोकाजी?
या भागात भला मोठ्ठा मग भरुन एक्सप्रेसो पाजण्याचा आनंद दिलात
आणि मध्‍येच क्रमश: ??
दम धरवत नाहीय हो ;-)

गणपा's picture

2 May 2012 - 7:41 pm | गणपा

झक्कास. :)

पुढील लेखनाची वाट पाहते.
लेखमालेची सुरुवात आवडली.

इष्टुर फाकडा's picture

2 May 2012 - 8:19 pm | इष्टुर फाकडा

विंटरेष्टींग वाटतंय :)

स्मिता.'s picture

2 May 2012 - 8:20 pm | स्मिता.

अहो सोत्रि, मस्त कॉफिचा मादक सुगंध नाकात भरून घेत त्याची मजा घेवून मग तो कप तोंडाशी आणतांना कोणीतरी अचानक हिसकून काढून घ्यावा असं झालं ना ते 'क्रमशः' बघून :(

मेघवेडा's picture

4 May 2012 - 1:45 pm | मेघवेडा

अगदी.. शुरु होते ही खतम.. जरा मोठे भाग येऊ द्या मालक.. :)

निशदे's picture

2 May 2012 - 8:32 pm | निशदे

सोत्रि,
सुरुवातीला कॉफीवर तुम्ही काय लिहिणार याचाच डाऊट आला होता.........पण मस्तच लिहिले आहे आता पटकन पुढचा भाग टाका बर...... (इतर धाग्यांवरच्या उनाडक्या कमी करा जरा हवे तर....... ;))

पैसा's picture

2 May 2012 - 8:52 pm | पैसा

वाईन असो, किंवा कॉफी, पिण्याच्या वस्तूंचा अभ्यास जबरदस्तच करतोस सोत्र्या!

मदनबाण's picture

2 May 2012 - 10:28 pm | मदनबाण

त्यालाही एकदम उत्तेजित झाल्यासारखे वाटून 'लाडात' यावेसे वाटले. पण त्याचे घर दूर असल्यामुळे त्याने त्या उर्जितावस्थेत फक्त नाच करण्यावरच समाधान मानून घेतले.
खी.खी..खी... ;)

क्रमशः फारच लवकर वाटलं बाँ... पुढचा भाग लवकर टंका.
कॉफीच्या फळाचा मोठा फोटो पाहुन क्षणभर कोकमाचा (रातांब्याचा) फोटो आहे की काय ? अस वाटुन गेले.
सध्या कोकम आगळाचा आस्वाद घेत असल्याने तसे वाटले असावे ! ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 May 2012 - 10:51 pm | निनाद मुक्काम प...

कॉलेजात असे रजंक रीत्या कोणी समजून सांगितले नाही. आम्हीं रट्टे मारून पास झालो.
भारतात कोस्टा आणी स्टारबग्स आले आहे ( ह्या बग्स नी टाटा शी करार केला आहे.)
भारतात दुकाने उघडली का ?
जगातील बहूतेक सर्व प्रकारची कॉफी चाखून मला मात्र आपली फिल्टर आवडते.
मागे जेष्ठ मिपाकर केशवकुमार आणी स्वाती दिनेश व दिनेशदा सोबत नववर्ष रात्री निमित जमलेल्या मैफिलीत कुशवकुमार ह्यांचे ब्राझील मधील कॉफी बद्दलचे चे अनुभव कानावर पडले होते त्याची आठवण झाली.

मुक्त विहारि's picture

2 May 2012 - 11:04 pm | मुक्त विहारि

"कॉलेजात असे रजंक रीत्या कोणी समजून सांगितले नाही. आम्हीं रट्टे मारून पास झालो."

असे जर समजावुन सांगायला लागले तर आपला देश पुढे नाही का जाणार? आणि मग इतर देशातिल माणसे इथे शिकायला येवुन परत आपल्याच लोकांना बेकारीचा सामना करायला लागेल.आपले सरकार फार पुढचा विचार करते.माझा तरी आपल्या शिक्षण खात्यावर खूप विश्वास आहे...

मुक्त विहारि's picture

2 May 2012 - 10:59 pm | मुक्त विहारि

मस्त आणि नविन माहिती देणारा लेख....

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2012 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा

@शेवटी त्या फळाला उकळवून बनलेले पेय प्यायल्यावर येणार्‍या उत्तेजित अवस्थेमुळे, भल्या पहाटेच्या प्रार्थनेला नेहमी येणारी झोपेची पेंग येत नाही आणि प्रार्थना मनःपूर्वक करता येते हे त्याच्या लक्षात आले. >>> ये बहोत खुब बात बताई सोकाजी... अता पहाटेच्या कार्यक्रमा आधी कॉफी लावण्यात...आपलं ते हे...घेण्यात...घेण्यात येइल..

लेख नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण व ऊत्तम :-)

यात एक धोकाही होता.भल्या पहाटे जर सगळेच ऊर्जितावस्थेत गेले असते तर?कदाचित जातही असतील . म्हणून दंगामस्ती न करता मनापासून पार्थना करत असावेत.तेवढाच लवकर घरी जायला मिळेल.

"त्यालाही एकदम उत्तेजित झाल्यासारखे वाटून 'लाडात' यावेसे वाटले. पण त्याचे घर दूर असल्यामुळे त्याने त्या उर्जितावस्थेत फक्त नाच करण्यावरच समाधान मानून घेतले. " ..... ये लगा छका और गेंद स्टेडियम के बाहर
cofee

प्रभाकर पेठकर's picture

3 May 2012 - 2:22 am | प्रभाकर पेठकर

अरबी कॉफीला आखातात अजूनही 'काहवा'च म्हणतात. पण 'काहवा' मध्ये दूध घालत नाहीत. 'काहवा'च्या सौम्य आणि उग्र अशा दोन प्रकारच्या बिया मिळतात. शक्यतो त्या दोन्ही समप्रमाणात मिसळून दळतात. ज्यांना जास्त कडवट चव आवडते ते नुसत्या उग्र बिया दळून 'काहवा' बनवितात.
बिया दळताना त्यात वेलची, केशर मिसळले जाते त्याने 'काहवा' ची लज्जत वाढते.
'काहवा'चे कप बिन कानाचे आणि आपल्या सर्वसामान्य कपापेक्षा १/४ आकाराचे असतात. कुणाही अरबाच्या घरी गेलं प्रथम 'काहवा' दिला जातो. तुमच्या कपात 'काहवा' ओतून यजमान थांबतो. तुम्ही तो 'काहवा' पिऊन कप खाली ठेवला की तो लगेच भरतो. (भरला की प्यावा लागतो). तुम्हाला 'काहवा' पिऊन झाल्यावर अजून नको असेल तर तो रिकामा कप किंचित हलवून (देवासमोर आपण घंटा वाजवतो तसा) खाली ठेवायचा म्हणजे यजमान पुन्हा 'काहवा' भरत नाही. तोंडाने 'बस झालं','आता मला नको' असं म्हणायचं नाही. ह्या बिन दूधाच्या 'काहवा'ची चव फार भारी लागते.

सुनील's picture

3 May 2012 - 3:32 am | सुनील

वाचता वाचता मधेच क्रमशः आल्यामुळे चांगली चवदार कॉफी घोट घेता घेता मधेच संपावी असे झाले!!

छान माहिती. पुढील लेख लवकर येऊदे.

माझी वैयक्तिक आवड म्हणजे, एका कपात नेसकॅफेचा एक चमचा घेऊन त्यावर उकळते पाणी घालणे. साखर, दुध न घालता तसेच पिणे.

अवांतर - इजिप्त हे अरबस्थानच्या दक्षिणेला आहे ही वेगळीच माहिती पुरवल्याबद्दलही धन्यवाद! :)

सोत्रि's picture

3 May 2012 - 7:56 am | सोत्रि

योग्य तो बदल केला आहे, धन्यवाद! :)

- (धांदरट) सोकाजी

५० फक्त's picture

3 May 2012 - 7:37 am | ५० फक्त

लई भारी, पिण्याचा क्षेत्रातल्या माझ्यासारख्या व्हेज माणसांची सोय लक्षात ठेवल्याबद्दल धन्यवाद हो सोकाजी.

सोकाजी, सोलापुरातलं लकी चौकातलं दुकान आठवलं का रे चहाचं ? कुकरेजा स्पोर्टस्च्या बाजुचं, शाळेतुन येताना त्या दोन्ही दुकानांसमोर उभं राहुन खुप स्वप्नं पाहिलीत. तो ताज्या दळलेल्या कॉफीचा वास अंन कुकरेजा मधले काचेतले लालचुटुक लेदर बॉल, क्रिम कलरच्या पॉलिशड बॅट आणि मागच्या बाजुला ठेवलेले काळे कुळकुळीत डंबेल्स.

प्रचेतस's picture

3 May 2012 - 10:06 am | प्रचेतस

मद्याचार्य सोकाजी आता कॉफीबाजही झाल्याचे बघून आनंद झाला.
बाकी लेख नेहमीप्रमाणेच उत्तम आणि अभ्यासपूर्ण.

प्यारे१'s picture

3 May 2012 - 10:31 am | प्यारे१

आम्ही 'बाद' झालो ते झालो.
आता तूही 'असल्या नशा' करायला लागलास सोत्रि????

बाकी माहिती रंजक मांडली आहेस त्याबद्दल भारीच आभारी आहोत म्हणा.... ;)
हापिसातली चाय पिता पिता कॉफीचा वृत्तांत वाचला. :(
दुपारी 'कापी' पिता पिता परत वाचणार!

इरसाल's picture

3 May 2012 - 10:15 am | इरसाल

आपल्याला हे लै भारी वाटल एकदम जबराट माहिती

अपेयपान न करणारा-इरसाल

प्रीत-मोहर's picture

3 May 2012 - 10:24 am | प्रीत-मोहर

विमेंनी योग्य सल्ला दिला वता सोत्रि तुम्हाला. कोई गल नय. आमची एक मैत्रिण कालच चेन्नै फोरेवरसाठी सोडुन पुण्यनगरी आलेली हाये. येताना काफी पण घेउन आलीये :)

सोत्रि's picture

3 May 2012 - 7:06 pm | सोत्रि

आमची एक मैत्रिण कालच चेन्नै फोरेवरसाठी सोडुन पुण्यनगरी आलेली हाये

:( प्रीमो, तु दुष्ट आहेस.

- (दुष्ट प्रीमोवर कावलेला) सोकाजी

मृत्युन्जय's picture

3 May 2012 - 10:25 am | मृत्युन्जय

मस्त माहिती. पुढच्या भागाची वाट बघतो आहे.

स्पा's picture

3 May 2012 - 10:41 am | स्पा

जबर्या लेख सोत्री
चायला ते क्रमश: कशाला मध्ये टाकलात...

सोकाजी साहेब, लय भारी लेख झाला आहे.
भले शाब्बास . मस्त अचुक व सटिक माहीती आहे कॉफीची.

सुहास झेले's picture

3 May 2012 - 6:19 pm | सुहास झेले

धम्माल... पुढचा भाग कधी ??? :) :)

ब्लॅक रशियनची चव कॉफी सारखी असते का हो ??

सोत्रि's picture

5 May 2012 - 10:45 pm | सोत्रि

कपिलमुनी, क्या पकडा है!
पण थांबा जरा, सगळे येणार आहे पुढच्या भागांमध्ये! :)

- (कपर) सोकाजी

अमोल केळकर's picture

5 May 2012 - 2:28 pm | अमोल केळकर

सुपर माहिती

धन्यवाद :)

अमोल केळकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2012 - 2:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेख आहे. आवडला.

-दिलीप बिरुटे

हर्षद खुस्पे's picture

6 May 2012 - 3:07 pm | हर्षद खुस्पे

ईन्डोनेशियामध्ये एक प्राणी जो भारतामध्ये पण सापडतो तो कॉफीची बी पण खातो. ' An Asian Palm Civet' ह्याच्याविष्ठेमधुन काही बिया बाहेर पडतात त्यापासुन पण कॉफी बनवली जाते जी सर्वात महाग असते. दुवा . जाणकार ह्याबाबतीमध्ये अधिक प्रकाश टाकतील.