‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)
पार्श्वभूमी:
Crabby ह्या शब्दाचा Crabbie असा अपभ्रंश करून, मात्र त्याचा अर्थ तोच घेऊन, हे कॉकटेल बनले आहे. खरेतर मी घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतून Mixology मधला काहीतरी प्रयोग करायला गेलो आणि त्या प्रयोगाचे कॉकटेल ऑलरेडी अस्तित्वात होते हे आंजावर शोध घेता कळले, तेच हे क्रॅबी कॉकटेल.
मालिबू रम हा ह्या कॉकटेलचा आत्मा आहे. मालिबू रमचे अंग म्हणजे 'एक मखमली' टेक्स्चर आणि चवही तितकीच भन्नाट! तिचे अननसाच्या रसाबरोबर जुळणारे सूत हे कॉकटेला एक वेगळीच 'उंची' देऊन जाते.
प्रकार
व्हाइट रम आणि मालिबू बेस्ड कॉकटेल
साहित्य
व्हाइट रम
१ औस (३० मिली)
मालिबू
२ औस (६० मिली)
संत्र्याचा रस
१ औस (३० मिली)
अननसाचा रस
१ औस (३० मिली)
बर्फ
ग्लास
मॉकटेल ग्लास
कृती:
कॉकटेल शेकरमध्ये बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, संत्र्याचा रस, मालिबू आणि अननसाचा रस ओतून घ्या. सर्व घटक एकजीव होतील असे शेकर मध्ये शेक करुन घ्या. कॉकटेल शेकरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे. शेक केलेले मिश्रण मॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.
झक्कास आणि क्रॅबी चवीचे 'क्रॅबी कॉकटेल' तयार आहे :)
प्रतिक्रिया
27 Dec 2013 - 3:14 pm | गणपा
समस्त धर्मांतरांवर, कट्ट्यांतरांवर जालीम उपाय.
चियर्स सोक्या.
हॅप्पी न्यु ईयर.
27 Dec 2013 - 3:23 pm | सोत्रि
हे ह्या विकांतासाठीचे कॉकटेल आहे. न्यु इयर पेश्शल मंगळवारी टाकणार आहे. :D
- (साकिया) सोकाजी
27 Dec 2013 - 3:39 pm | गणपा
सोन्याहुन पिवळं. :D
31 Dec 2013 - 4:27 pm | वसईचे किल्लेदार
ते पेश्शल कॉकटेल ...
27 Dec 2013 - 3:29 pm | अत्रुप्त आत्मा
काय काय मिक्सिंग सुचतात सोकू अण्णांना! :)

कॉकटेल सम्राट सोकूनाना की जय...की जय... की जय...! :)
27 Dec 2013 - 3:52 pm | मदनबाण
शेवटचा फोटु पाहुन अंमळ चढावी असे वाटु लागले आहे. ;)
27 Dec 2013 - 6:27 pm | वेताळ
आता गणपाशेठ तुमचा पण उप्वास सुटला असेल तर एकादी न्युईयर पाकृ येवु दे.
27 Dec 2013 - 6:33 pm | मुक्त विहारि
नॉट स्टर्ड..
काय बरोबरना, सोत्रि गुर्जी....
बाय द वे, मंगळवारची आतुरतेने वाट बघत आहे....
(व्हिस्कीचे एखादे कॉकटेल असेल तर उत्तम...)
27 Dec 2013 - 8:19 pm | जेपी
मुवी शी सहमत . व्हिस्कीच टाकल तर पार्टी मधे परवडल .
27 Dec 2013 - 9:02 pm | मुक्त विहारि
बियर उत्तम,
वाईन सर्वोत्तम
27 Dec 2013 - 8:12 pm | विनोद१८
............*new_russian* \m/ \M/........*drinks* *DRINK* :drink:.....
विनोद१८
27 Dec 2013 - 8:16 pm | जेपी
ट्राय करतो .
27 Dec 2013 - 8:31 pm | आनंदी गोपाळ
मालिबूमधे व्हाईट रम टाकून फॉर्टीफाय करायची आयडिया छानेय.
बाकी मग संत्र्/अन्नसाला फाटा दिला तरी चालून जाईल ;)
बाकी ३१ तार्खेला प्यायला बसाल तर शक्यतो आपल्याच घरी बसा. पिऊन गाडी चालवू नका. आन सर्वात म्हत्वाचे, आपल्या लाडक्या दारू दुकानदाराकडून १ दिवसाचे प्यायचे लायसन काढून घ्या. म्हंजी पोलिसाने पकडून फुगा फुगवाया लावलाच, तरी प्राब्लेम येनार न्हाई.
म्हारास्ट्र सर्कारी क्रूपेने देशीदारू साठी रु २ व विदेशीसाठी रुपये ५ खर्चून दारू पिण्याचे १ दिवसाचे परमिट मिळते.
27 Dec 2013 - 9:00 pm | मुक्त विहारि
कायद्याची माहिती असली म्हणजे, काय द्यायची माहिती नसली तरी चालले...
27 Dec 2013 - 10:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
कायद्याची माहिती असली म्हणजे, काय द्यायची माहिती नसली तरी चालले...
लै झ्याक ! :)27 Dec 2013 - 10:15 pm | वाटाड्या...
सोत्रीशेठ..
व्हाईटाऐवजी रेड रम टाकल्यास चालेल का? हे बनवल्यावर उसाचा रस समजुन कुणी पिऊ नये म्हणजे झालं *fool* :-| :| =| :-|
28 Dec 2013 - 9:09 am | सोत्रि
हो चालेल, चवीत किंचीत फरक पडेल पण चालेल.
- (साकिया) सोकाजी
27 Dec 2013 - 10:52 pm | रेवती
छान सोनेरी पेय दिसते आहे.
28 Dec 2013 - 6:57 am | अमेय६३७७
झकास कॉकटेल. आता न्यू इयर पेशलच्या प्रतीक्षेत.
28 Dec 2013 - 11:56 am | भटक्य आणि उनाड
हेच म्हणतो...
28 Dec 2013 - 12:05 pm | भटक्य आणि उनाड
बेलीज आयरीश क्रीम वापरली तर चालेल?
28 Dec 2013 - 12:44 pm | सोत्रि
अननस आणि ऑरेंज ज्युस असल्याने आयरीश क्रीम चालणार नाही.
- (साकिया) सोकाजी
31 Dec 2013 - 3:55 pm | सुहास..
खल्लास्स!!
आज ?
1 Jan 2014 - 8:37 am | कैलासवासी सोन्याबापु
सोकाजी नानांची कॉकटेल्स!!!! वल्लाह!!!!