मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज) : बे रूज (Baie Rouge)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
12 Apr 2013 - 3:15 pm

‘मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज)’ मालिकेतील आजचे मॉकटेल आहे 'बे रूज'

पार्श्वभूमी:

बे रूज हा एक फ्रेंच शब्द आहे. त्या अर्थ Red Bay. मोनिन ह्या प्रख्यात फळांचे सिरप बनवणार्‍या फ्रेंच कंपनीचे सिरप रिलायंस मॉल मधे शोधाशोध करताना मिळाले. हे मॉकटेल 'ब्लॅक करंट' ह्या फळाच्या सिरप पासून बनले आहे. त्या बाटलीवर एक कॉकटेल आणि एक मॉकटेल अशी रेसिपी असते. ही रेसीपी त्या सिरपच्या बाटलीवरच मिळाली :)

फारच सोपी रेसिपी आहे ही, साहित्यही एकदम लिमीटेड.

साहित्य:

मोनिन ब्लॅक करंट सिरप
१० मिली

क्रॅनबेरी ज्युस
२ औस (६० मिली)

सोडा

बर्फ

स्ट्रॉ

लिंबाची चकती सजावटीसाठी

ग्लास
मॉकटेल ग्लास

कृती:

सर्व साहित्य (सोडा सोडून) शेकर मध्ये बर्फ टाकून व्यवस्थित शेक करून घ्या. शेकरला घाम फुटला की मॉकटेल झाले असे समजावे.

आता ग्लासच्या रीमला लिंबाचा काप लावून मॉकटेल सजवा.

लालसर रंगाचे 'बे रूज' तयार आहे :)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 Apr 2013 - 3:22 pm | प्रचेतस

वाह!!!!!!

उन्हाळ्यात अगदी गारेग्गार वाटलं, कृती पण एकदम सोपी.

मी_देव's picture

12 Apr 2013 - 3:31 pm | मी_देव

वा! पण सोडा कधी सोडायचा?

सूड's picture

12 Apr 2013 - 4:34 pm | सूड

सोडा कधी सोडाय्चा?

मॉकटेल असल्याने बरं वाटलं पण सोड्याचा सदुपयोग कधी करायचा? क्रॅनबेरी ज्यूसमुळे रंग कोकसारखा आलाय. हे जरा बालकांचं पेय वाटलं.

पक पक पक's picture

13 Apr 2013 - 5:54 pm | पक पक पक

हे जरा बालकांचं पेय वाटलं.

पालकांसाठी ३० एम एल ,६० एम एल टाकुन शेक करायच हाय काय अन नाय काय.. ;)

गणपा's picture

12 Apr 2013 - 6:48 pm | गणपा

सिरप रस बर्फ शेकरमध्ये शेक करून मग सोडा वरून सोडायचा असेलं.
उत्सुक मंडळींनी सोडा टाकून शेकर हलवावा. ;)

उत्सुक मंडळींनी सोडा टाकून शेकर हलवावा.

अन नंतर... ? ;)

मुक्त विहारि's picture

12 Apr 2013 - 7:07 pm | मुक्त विहारि

झक्कास..

यात चिमुटभर काळंमीठ टाकलं तर लज्जत अजुन वाढेल नै का सोत्रि?

तर्री's picture

12 Apr 2013 - 7:20 pm | तर्री

मस्त -सोपे आहे.
दिसते मात्र कालाखट्टा नावाच्या प्लास्टिक पेप्सी प्रमाणे दिसते आहे.
प्लास्टिक पेप्सी ह गाव-ब्रान्ड आता बंद झाला आहे. अमेरिकेतील पेप्सी ने हे नव चोरले व बाटलीत बंद केले.

पक पक पक's picture

13 Apr 2013 - 5:52 pm | पक पक पक

एक्दम मस्त झालय.. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Apr 2013 - 11:03 pm | निनाद मुक्काम प...

झकास मॉकटेल
उन्हाळ्याच्या दिवसात खासच
ह्यात सोड्याच्या ऐवजी रेडबुल टाकले तर
धमाल येईल.
प्रयोग शाळेत जेवढे प्रयोग होत नसतील तेवढे मधुशाळेत होतात.
रेड्बुल हे 'ब्लॅक करंट' सिरप सोबत फर्मास लागते. असा आमचा अनुभव आहे.

प्यारे१'s picture

14 Apr 2013 - 2:36 pm | प्यारे१

गाआआआआआर!

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Apr 2013 - 3:43 pm | श्री गावसेना प्रमुख

1
चले गारेगार खटटा मिठा गारेगार