कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे
असे म्हटले जाते की
कलियुगा मध्ये अशी
वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी
कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल
तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील.
त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल
पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली, तो अवतार झाल्यावर कल्की अवतार येतील
जे लोक बदलले नाही त्या लोकांना शिक्षा करेल कल्की अवतार या millenium मधे होईल.
तो भारतात जन्म घेईल.
भविष्यवाणीनुसार कल्की अवतार संपूर्ण जगाचा राजा असेल
संपूर्ण पापनाश केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर न्यायाची स्थापना करेल
तो वाईट लोकांना शिक्षा देईल
पापी लोकावर तो दया करणार नाही.
कल्की अवतार एक सुवर्णयुग स्थापन करेल
कलियुगा आधी, हे कृष्णाने रणांगणात अर्जुनाला सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर,
कलि युग सुरूवातीस होईल. तो
5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात
कलि युग आत सुवर्णयुग येतील.
चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
प्रतिक्रिया
22 Feb 2014 - 3:48 pm | बॅटमॅन
तरी त्यांचे पाशवीपण सरायला काही तयार नाही.
बाकी सहमत आहेच. पण
आमच्या मते ते अंदाजे १०,१०१ वर्षांनंतर स्थापन होईल.
बाकी जाणकारांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
22 Feb 2014 - 3:59 pm | सस्नेह
खरंच येणार असेल तर अजून कशाची वाट पाहत आहे कोण जाणे !
22 Feb 2014 - 4:00 pm | कवितानागेश
अजून वेळ आहे ना?
चला, हवा तितका पाशवीपणा करुन घेउ. ;)
22 Feb 2014 - 10:33 pm | अजया
आओ कुछ पाशवी करते है ;)
22 Feb 2014 - 4:05 pm | निलरंजन
नक्कीच तुम्हाला कल्कीच्या हातून मोक्षप्राप्तीची ईच्छा दिसतेय
22 Feb 2014 - 4:13 pm | कवितानागेश
अर्थातच! =))
विरोधी भक्तीच जास्त तीव्र असते. माहित नाही का?
22 Feb 2014 - 4:41 pm | बॅटमॅन
त्यात परत कल्की कोचलीन असेल तर तिच्यापुढे लीन होण्याची मजा औरच!
22 Feb 2014 - 4:47 pm | प्रचेतस
ईईईईईईईईइ
तुला आवडते ती? =))
22 Feb 2014 - 5:09 pm | सूड
>>ईईईईईईईईइ
तुला आवडते ती?
काय वाईट आहे त्या बिचारीत?
24 Feb 2014 - 12:26 am | बॅटमॅन
हा ना राव. चांगली तर आहे.
24 Feb 2014 - 1:42 am | अभ्या..
हां ना राव. चांगली आहे बिचारी.
मला मिपावर आले की तिचीच आठवण येते. माझा एक लै चांगला मित्र सेम तिच्यासारखा दिसतो अन हसतो. ;-)
24 Feb 2014 - 1:59 am | बॅटमॅन
खरे तर ईशान नंदकिशोर अवस्थी अन कल्की हे भैणभौ आहेत ;)
24 Feb 2014 - 2:09 am | आदूबाळ
आणि कीरन पोलार्ड त्या दोघांचा चुलतभाऊ आहे.
24 Feb 2014 - 12:38 pm | बॅटमॅन
अगदी अगदी ;)
22 Feb 2014 - 5:41 pm | अमोल मेंढे
अहो त्यांनाच काय...मलापण आवडते ती
22 Feb 2014 - 10:55 pm | खटपट्या
मलापण !!!
28 Feb 2014 - 10:03 am | वेताळ
पहिल्या पिक्चर मध्ये अभय देओल बरोबर एकदम झक्कास काम केले आहे. ति हिरोबरोबर बोलत असताना तिच्या चेहर्यावर कॅमेरा आल्यावर हमखास किस करावा लागणार असे तिचा चेहर्यावर कायम भाव असतो अन ते खरे हि असते.
28 Feb 2014 - 3:51 pm | आत्मशून्य
पण हिच जोडी जेंव्हा ZNMD मधे किस करु लागली तेंव्हा लस्ट टोटल मिसेंग होता..! एक्स्ट्रीम मेचॅनिकल किस.
22 Feb 2014 - 4:32 pm | तिमा
कलि युग सुरूवातीस होईल. तो
5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात
कलि युग आत सुवर्णयुग येतील.
चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
वरील वाक्यांचा अर्थ कळला नाही. कलियुग आत सुवर्णयुग येईल म्हणजे कलियुगाच्या आंतच सुवर्णयुग येईल असे म्हणायचे आहे का ?
चालेल जे कलियुग सुवर्णयुग नंतर याचा काय अर्थ? म्हणजे सुवर्णयुगानंतर पुन्हा कलियुग येणार आहे का ?
कृपया मार्गदर्शन करावे.
जाताजाता:- ह्या धाग्यावर तर २०२५ सालीच असेंडिंग कलियुग संपेल असे लिहिले आहे. त्यानंतर असेंडिंग द्वापारयुग चालू होणार म्हणे. खरे खोटे तो कल्कीच जाणे.
http://www.grahamhancock.com/forum/DMisraB6.php
काही म्हणा, माझ्या स्वाक्षरीने इतके लोक प्रभावित होतील हे माहित नव्हते.
22 Feb 2014 - 4:36 pm | आत्मशून्य
नास्ट्रोडम्स ? येवडा मनावर घेतला ?
LoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoLLoL
25 Feb 2014 - 9:49 am | प्रसाद गोडबोले
येवडा ?
"र" राहिला का ह्यात ?
22 Feb 2014 - 4:45 pm | अनुप ढेरे
अरविंद केजरिवाल आहे बहुदा कल्की. पंतप्रधान झाला की शपथग्रहणाच्या वेळेला गौप्यस्फोट करणार आहे तो.
22 Feb 2014 - 4:55 pm | तिमा
तो आपले नांव 'अरे विन कल्कीवाल' असे लावणार आहे.
22 Feb 2014 - 5:49 pm | विकास
राहूल गांधी जास्त योग्य ठरतील.
22 Feb 2014 - 4:45 pm | निलरंजन
कल्कीच्या जन्मानंतर पाशवी लोकांचा नाश होईल
आणि त्यानंतर सुवर्ण युग असेल
आणि पुन्हा उलट गिनती सुरू होईन
म्हणजे परत सत्य| कृत| ञेता| द्वापार युगांचा खेळ सुरूच राहिल
22 Feb 2014 - 4:56 pm | प्रचेतस
उलट गिनती सुलट लिहिलेली आणि त्यात सत्य आणि कृत असे उल्लेख पाहून=))
22 Feb 2014 - 4:54 pm | इरसाल
कल्की हसी मुक्कालात के लिए आआआआआआआज रात के लिए हम्तुम खुदा हो जाते है अच्छा चलो खो जाते है !
22 Feb 2014 - 5:01 pm | वेताळ
ऑफिशियली सुवर्णयुग चालु झाले आहे.
22 Feb 2014 - 5:11 pm | जेपी
बर झाल तुमी हा विषया घेतला . नायतर पुर्वीचे अवतारावर लयी
जंगी चर्च्या झाल्यात बगु याच काय होताय .
22 Feb 2014 - 5:24 pm | निलरंजन
असे म्हणतात की कल्कीचा जन्म दक्षिण भारतातला असेल
त्यांच्या कडे पांढरा अश्व असेल जो उडण्याची क्षमता ठेवेल
असे ही सांगितले जाते की युगानयुगे जिवंत असलेले हनुमान त्यांच्या कामात मदत करतील आणि शेवटी जीवन त्यागतील
22 Feb 2014 - 5:36 pm | वेताळ
पाढंरा उडणारा घोडा पाळणारे दक्षिण भारतात दोनच लोक आहेत
१.विजयमल्ल्या
२.श्रीनिवासन
बघु ह्यातले कल्की कोण होतात ते.
22 Feb 2014 - 5:53 pm | निलरंजन
त्या दोन नालायकांचे नाव सुद्धा घेऊ नका
दोघे अप्पलपोटी स्वार्थी
देवा चा कणभरहि लवलेश नाहीये त्यांच्या कडे
आणि बाय द वे हयाआधी उडणारे घोडे अस्तित्वात होते
त्यांना उडण्यासाठी पक्षासारखे पंख होते
उत्काती मधे ते नामशेष झाले त
हरकत नाही हा संशोधनाचा विषय असेल
22 Feb 2014 - 11:38 pm | शैलेन्द्र
पण त्यांना घोडे म्हणायचे का?
22 Feb 2014 - 11:42 pm | प्रचेतस
हे पहा ते पंखवाले उडणार घोडे-पेगॅसस =))
23 Feb 2014 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे तर काहीच नाही !
३०० वर्षांपूर्वीपर्यंत मादागास्करमध्ये हत्ती-पक्षी (एलेफंट बर्ड्स) होते. फ्रेंच वसाहतवद्यांनी त्यांना शिकार करून नामशेष केले. आता मिळालेल्या त्यांच्या अंड्यांच्या अवशेषातून डि एन ए वेगळा करून त्यांना परत जिवीत करण्याचे प्रयत्न चालू आहेत !
24 Feb 2014 - 8:58 pm | प्रचेतस
रोचक दुवा आहे.
22 Feb 2014 - 5:37 pm | वेताळ
हवेत सैर करणारा घोडा असे घ्यावे.
22 Feb 2014 - 5:56 pm | वेताळ
चक्क जिवंत आहोत. परत एकदा उडणारे घोडे म्हनजे युनीकॉर्न आम्हाला बघायला ( हॅरी प्लॉटर नंतर) मिळतील.
22 Feb 2014 - 6:13 pm | सुहास..
(१२) अत्त - वर्ग :
उत्तना व कतं पापं अत्तना संकिलिस्सति ।
अत्तना अकतं पाप अत्तना व विसुत्र्झाति ।
सुद्धि असुद्धी पच्चतं नात्र्यमत्र्य विसोधये ।।
अर्थ : आपण केलेले अकुशल कर्मच (पाप) आपल्याला मलीन करते व अकुशल कर्म (पाप कर्म) न करणे, कुशल कर्म करणे आपल्याला शुद्ध करते. अशा तऱ्हेने मानवाची शुद्धी - अशुद्धी स्वत:वरच अवलंबून आहे.
विवेचन : तथागत बुद्ध आपल्या कोणत्याच संदेशात 'कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका' असे सांगत नाहीत. उलट केलेल्या कर्मास निच्छितच तुंम्ही स्वत: पात्र आहात. बुद्धाच्या शिकवणीचा सार विचारात घेतल्यास निष्क्रिय व आळसावलेला मानव हा एखाद्या भंगारात पडलेल्या इंजिनसारखा भूमीला ओझे वाटतो. परंतु कर्म कसे असावे, त्याबाबत मात्र बुद्धाने समर्पकता मांडली आहे. कर्म हे कुशल कर्म (सत्कर्म) असावे. ज्याने तुमची उन्नती होईल. इतरांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. स्वत:चा उत्कर्ष बुद्धाला मुळीच नको नव्हता परंतु आपल्या उत्कर्षाने इतरांचे अकल्याण, नुकसान मात्र झालेले नसावे. तुमच्या कर्माने जेंव्हा इतरांना शून्यवत सुद्धा हानी पोहचत नसते, तेंव्हा तुमचे कर्म शुद्ध व योग्य असे पात्र ठरते. या प्रकारे तुमचे कर्म घडत नसेल तर पापास लायक ठरते. असे पाप झाले तर ईश्वरवादी धर्म हे पाप धुवून काढण्यासाठी शुद्धता प्राप्त करून घेण्यासाठी अग्नी, होम करतात. असे होम करून पापाचे डाग किती धुतले जातात हे ईश्वरवाद्यांनाच माहित. परंतु बुद्ध मात्र अशाप्रकारचा कोणताही शुद्धतेचा उपाय सुचवत नाहीत. बुद्ध म्हणतात एकदा झालेले अकुशल कर्म (पाप कर्म) पुन्हा केव्हाही न करणे हेच खरे प्रायश्चित ठरावे. परंतु ही वेळ मानवावर यावी तरी का ? असा बुद्धाच्या शिकवणीतून अर्थ निघतो. त्याचा विचार केल्यास मन अशुद्ध विचारांशी वश होत गेल्यास मानवावर अशी वेळ येवून ठेपते. त्यामुळे मन व मनातील विचार नेहमी शुद्ध ठेवावे आणि हे आपल्या अगदी आवाक्यात असते, असे तथागत बुद्धाचे मत आहे. थोडक्यात मानव स्वत:ला स्वत:च घडवू शकतो. आपणच स्वत: स्वत:चे कुंभार आहोत दुसरा कुणीही नाही.
बाही तुमची मर्जी .....
(बुध्द हा अवतार होता असा विनोदी विचार मांडणे आणि संपादकानी त्याकडे दुर्लक्ष करणे , दरवेळी त्याला दुजोरा देणे हे वा त्यावर गप्प बसणे हे संस्थळ व निर्दयी संपादक प्रगल्भ झाल्याचे लक्षण का मानु नये ?? )
25 Feb 2014 - 9:56 am | प्रसाद गोडबोले
तुमच्याशी एकदा बौध्द तत्त्वज्ञानावर वादविवाद करायला नक्की आवडेल ... (त्या निमित्ताने आमचाही अभ्यास होईल वैदिक धर्माचा ... आचार्यांच्या साहित्याचा )
फक्त आपण नुसता वाद विवाद करायला नको ... तुम्ही मते पटली तर स्विकारणार का ? की अॅग्री टू डिसअॅग्री असे म्हणुन सोडुन देणार ???
25 Feb 2014 - 8:07 pm | सुहास..
तुमच्याशी एकदा बौध्द तत्त्वज्ञानावर वादविवाद करायला नक्की आवडेल ... (त्या निमित्ताने आमचाही अभ्यास होईल वैदिक धर्माचा ... आचार्यांच्या साहित्याचा ) >>
तुम्हाला संवाद असे म्हणायचे असावे.
फक्त आपण नुसता वाद विवाद करायला नको ... तुम्ही मते पटली तर स्विकारणार का ? की अॅग्री टू डिसअॅग्री असे म्हणुन सोडुन देणार ??? >>
तुम्ही स्विकाराल ? जस मंदीरात जाता तसे विहारात जावुन हात जोडणार का ? (अवतार मानता ना ? )
25 Feb 2014 - 8:33 pm | प्रसाद गोडबोले
वाद म्हणजे संवादच म्हणायचे होते ..
हो मी आत्ताही बुध्दाला हात जोडतोच ... आणि त्याचे तत्त्वज्ञान पटले तर का नाही स्विकारणार ?
हां , फक्त एक आहे की बुध्द धर्मात जातिव्यवस्था नव्हती म्हणुन बुध्द धर्म ग्रेट असे काही मुद्दे मांडणार असाल तर चर्चा नको .
चर्चेला खालील तत्त्व ठेवुयात
चालेल ?
25 Feb 2014 - 8:41 pm | प्रसाद गोडबोले
ह्याच्यावरुन आणखी एक आठवले ... तुम्ही नक्की कोणत्या बौध्दमताचा अभ्यासकरुन पॉईंट मांडणार ? हीनयान ? महायान ? वज्रयान ? की अजुन कोणत्या ?
मला स्वतःला वैदिक मतातील वेदान्त आणि सांख्यमताचा अभ्यास करुन कळाले तेवढे मत मांडायला आवडेल
25 Feb 2014 - 11:01 pm | धन्या
मी धम्मपद, बर्यापैकी जातककथा वाचल्या आहेत. बुद्धाची शिकवण अवडली, पटली.
पुढे योगायोगाने टिक न्हात हान या सध्या फ्रान्समध्ये वास्तव्य असलेल्या व्हिएतनामी बौद्ध भिक्खूने लिहिलेली रिकन्सिलिएशन - हीलिंग दी इनर चाईल्ड आणि अँगर ही दोन पुस्तके वाचली. लेखकाने पुस्तकांमध्ये जे काही लिहिलं आहे त्याला तो बौद्ध मानसशास्त्र (बुद्धीस्ट सायकॉलॉजी) म्हणतो.
या दोन पुस्तकांनी अक्षरशः मनाचा तळ गाठला. जे काल परवापर्यंत केवळ "ईंटेलिजन्सच्या" पातळीवर होतं ते या पुस्तकांनी जाणिवेच्या पातळीवर आणलं.
27 Feb 2014 - 12:06 am | आत्मशून्य
बघू तरी माहिती ज्ञानात परावर्तित झाल्यावर माणुस कसा बनतो ते. एकदम बिंधास्त बनतो की झुंडिने शिकार करू लागतो ते.
27 Feb 2014 - 7:38 pm | सुहास..
ह्याच्यावरुन आणखी एक आठवले ... तुम्ही नक्की कोणत्या बौध्दमताचा अभ्यासकरुन पॉईंट मांडणार ? हीनयान ? महायान ? वज्रयान ? की अजुन कोणत्या ? >>
माझा प्रश्न सरळ आहे , आणि शिंपल ही ......उगा वेटोळे कशाला ? तुम्हाला जर बुध्द हा कितवा सा अवतार वाटत असेल तर तुम्ही इतर बौध्दजनांसारखं विहारात वन्दना का करत नाही ....
@ धन्या ...तु तोच आहेस ना " बुध्दाला जर त्याचा वडिलांनी सोशलाईज केले असते तर बुध्द झाला असता का " अशी अपर्णाच्या एका वाक्याची कॉपी सहीत घेणारा ...
मग बोलणे खुंटले .....लेखन सीमा
27 Feb 2014 - 8:15 pm | धन्या
होय. मी तोच आहे.
गौतमाला त्याच्या वडीलांनी जर सोशलाईज्ड केलं असतं तर तो तत्कालिन इतर राजकुमारांप्रमाणे युद्धविदयेत प्रविण झाला असता, राज्यकारभार कसा हाकावा हे शिकला असता आणि पुढे जाऊन सम्राट गौतम बनला असता. एक राजा म्हणून आयुष्य जगला असता. मात्र त्याच्या वडीलांनी त्याच्या भविष्याचा धसका घेऊन त्याला कुठल्याही दु:खाची जाणिव होणार नाही याची काळजी घेतली.
मात्र जेव्हा दु:ख अचानकपणे समोर आले तेव्हा तो धक्का गौतम सहन करु शकला नाही. जगात दु:ख आहे याची त्याला पहिल्यांदा जाणिव झाली. त्याने दु:खाच्या कारणांचा शोध सुरु केला. आणि गौतमाचा गौतम बुद्ध झाले.
त्या सहीतील वाक्याचा मतितार्थ हाच तर होता. :)
27 Feb 2014 - 8:21 pm | सुहास..
त्या सहीतील वाक्याचा मतितार्थ हाच तर होता. >>
छान ..मतितार्थावरून आठवल ..कुठेतरी वाद घालत होतो ...मित्र मुस्लीम होता ..शेवटच वाक्यावर मला प्रतिवाद करता आला नाही .. : हनुमान पण आमचाच रे !! जस सलमान, सुलेमान, रेहमान ..तसंच हनुमान !! :
संभ्रम
27 Feb 2014 - 10:54 pm | प्रसाद गोडबोले
कारण बुध्द अवतार असला तरी त्याचे तत्त्वज्ञान मुळातच खंडीत आहे .... तर्कशुध्द नाही ...हे कुमारिलभट्ट ह्यांनी मीमांसेच्या आधारे आणि श्रीमदाद्यशंकाराचार्यांनी वेदांताच्या आधारे सातव्या शतकाच सप्रमाण सिध्द केले आहे !!
"एकेहाती दन्तु | जो स्वभावता खंडीतु | तो बौध्दमत संकेतु | वर्तिकांचा ||"
श्लोक क्र. बारा ज्ञानेश्वरी अध्याय पहिला
असे माऊलींनीही म्हणुन ठेवले आहे ...
अवांतर : आपले मःपुर्वक आभार ! आपण खरेच वाद संवाद करुयात , निव्वळ प्रतिसाद द्यायचा साठी आज कित्येक दिवसांनी ज्ञानेश्वरी उघडली ... चर्चा सुरु झाल्यावर खरेच अजुन अभ्यास होईल . जय जय रामकृष्णहरी !!
27 Feb 2014 - 11:41 pm | सुहास..
हसायला देखील आले नाही त्या श्लोकामुळे ..कुमारभट्टील काय आणि शकराचार्याच्या कालखंडाची पार वाट लावलीत ( तुम्ही शंका राचार्य लिहीले आहे, चुकीचे वाचले त्याबद्दल आम्ही स्वता ला माफ केले ! ) मग माउलींचा संदर्भ काय ?? अहो माझ्या सारख्या कालगणनेतच निराधारी असलेल्या माणसाला किमान मराठी दिनी आणि शिवशंकराची ' महाशिवरात्री दत्ताच्या गुरुवारी कशी आली याचाच घोळ समजेना ..त्यात तुम्ही असे महा-अवघड प्रतिसाद ताकल्यावर कसे व्हायचे आमचे .
तुम्ही जिंकलात .....धन्यवाद ...पण जाता जाता ........
१३) लोक - वर्ग :
अन्धभुतो अय लोको तानुकेत्य विपस्सात ।
सकुन्तो जाल मुत्तो व अप्पो सग्गाय गच्छामि ।।।
अर्थ : हे जग आंधळे आहे. हे थोडेच लोक पाहू शकतात आणि जाळ्यातून मुक्त झालेल्या पक्षाप्रमाणे स्वर्गाला घिरट्या घालतात.
विवेचन : स्वर्ग म्हणजे ईश्वरवादी धर्मातील देवांचे राजमहालांचे ठिकाण नव्हे. तर बुद्ध धम्मात स्वर्गाचा अर्थ विकारी विचारांचा खालसा असा लागतो. जिथे व्यथा विवंचना लोभ मोह माया अशा असंख्य विकारी विचारांपासून मुक्तता असते ती अवस्था. अशा अवस्थेला सद्विचारी माणूस पोहचू शकतो. असो . परंतु जग डोळस आहे. अंध व अंधकाराच्या काटेरी कुंपणात खितपत पडलेले आहे. तिथे आपली सुद्धा जागा आहेच. ज्याप्रमाणे व्यक्ती त्याच्या अनेक प्रकृती असतात त्या प्रमाणे जे दिसते तसे असतेच असे नसते. परंतु हे पारखून पहाण्यासाठी आपल्याकडे बुद्धी असते ही बुद्धी आपल्यासारखी इतरांनाही असतेच असते. अगदी आपण ज्याला मूर्ख म्हणतो त्या मुर्खाला मूर्ख होण्याइतपत बुद्धी असते ते नाकारता येत नाही. तिच्या वापराच्या पद्धतीवरून इतर व आपण यात नेमका फरक पडतो. ज्याला आपण दूरदृष्टी असे म्हणतो. परंतु दूरदृष्टीत सुद्धा योग्यता अयोग्यता म्हणजेच सत्यता असत्यता येतेच येते. जो बुद्धीचा वापर सत्यविचारातून करत असतो. तोच मानव विश्वातील अंधकाराला थेटपणे ओळखू शकतो व तो या काटेरी कुंपणातून स्वत: भरारी घेतो. परंतु इतरांना सुद्धा तो बळ पाठी ठेवून जातो. जो सदाचार आणि सद्विचारांशी इमान राखतो. त्याचे जीवन प्रफुल्लीत होते.......
वाश्या ....शेवटी वाश्याच !!
28 Feb 2014 - 1:29 am | प्रसाद गोडबोले
चर्चा , धम्माचा अभ्यास , एकेकाळी राजधम्म असलेला धम्म भारतातुन जवळपास नामशेष का झाला ह्याची कारणे वगैरे चर्चा हे मस्त टाळलेत ... गूड !
आता तुम्ही श्लोक टाकला मग मीही एक श्लोक टाकतो :P
असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः।
ताँस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः॥३॥
असो .
ज्ञानेश्वरमाऊलीं तुमच्यावर कृपा करो अशी प्रार्थना करुन ही अनुत्पादक चर्चा थांबतो ! राम कृष्ण हरी !!
28 Feb 2014 - 7:37 am | सुहास..
तुम्ही सर्वात आधी अवतार म्हणणे थांबवा गोडबोले , अन्यथा चर्चेला काही अर्थ रहाणार नाही , मुळात ज्या कुठल्याही गोष्टीला आधार नाही, त्या गोष्टीवर मी तरी मान्य करणार नाही आणि कितीक सा वेळ लागेल वरचा स्क्रीन शॉट घेवुन त्रिरत्न संघाकडे जायला ?
आता जरा नामशेष होण्याविषयी, जगभर पसरलेला आहे धम्म ! , बाकी वेद, वेदांत, शंकराचार्य ही , गोडबोले, कुलकर्णी , देशपांडे , कर्णिक, यांच्यामध्य्रे सिमीत असल्याची कारचे शोधा आधी , हा आमचा फुकट्चा सल्ला
28 Feb 2014 - 9:12 am | प्रचेतस
बुद्ध धर्माच्या वाढत्या प्रभावामुळे राम, कृष्ण यांना विष्णूचे अवतार प्रचलित करण्याबरोबरच बुद्धालाही हिंदू धर्मात सामावून घेतले गेले.
बाकी भारतातून बौद्ध धर्म नामशेष होण्याची अनेक कारणे आहेत. इस्लामिक आक्रमण, बौद्धांचा धर्मप्रचार हाच एक प्रमुख धर्म बनून राहणे, पुराणांद्वारे केले गेलेले दैवतीकरण, हिंदू धर्मात अहिंसेची मूळे रुजवणे, शंकराचार्यांचे तत्वज्ञान, तत्कालीन राजांनी बांधलेली अतिशय भव्य, नेत्रदिपक अशी शैव वैष्णव मंदिरे.
ह्याच विषयावर एस एल भैरप्पा यांची 'सार्थ' नामक अतिशय सुंदर कादंबरी आहे. तत्कालीन बदलत जाणार्या कालखंडाचा अतिशय सुरेख आढावा त्यांनी ह्या कादंबरीत घेतलाय.
बाकी हा बघा शंख, चक्रयुक्त विष्णूचा बुद्धावतार.

28 Feb 2014 - 9:47 am | प्रसाद गोडबोले
त्रिरत्न संघ ? हे काय प्रकरण आहे ?
पण भारत सोडुन कारण शंकराचार्यांनी फक्त भारतातच प्रवास करुन बौध्द्मतातील लॉजिकल प्रॉब्लेम्स दाखवुन देले ! जगभर फिरायला त्यांच्याकडे काय फक्त ते एकच काम नव्हते !!
आणि राहता राहिला प्रश्न अवताराबद्दल .... अहो इथे हिंदु प्रत्येकालाच अव्यक्त ब्रह्म मानतात त्यामुळे बुध्दच काय तर तुम्ही आणि मी सुध्दा अवतारच आहोत :P
28 Feb 2014 - 3:02 pm | प्रसाद गोडबोले
चर्चा संपवायच्या आधी त्रिरत्न संघ हे काय प्रकरण आहे हे क्लीयर कराच
कारण
ह्या वाक्यातुन त्रिरत्नसंघ हे कोणीतरी मुतव्वा टाईप लोक आहेत आणि तुम्ही माझी तक्रार त्यांच्याकडे घेवुन जाणार असा काहीसा सुर येतोय.
तुम्ही काय मला धमकी वगैरे देत तर नव्हता ना ...तेही ओपन फोरमवर ? :P
28 Feb 2014 - 4:03 pm | आत्मशून्य
विष्णुचा ?
28 Feb 2014 - 5:10 pm | आत्मशून्य
एक शकां आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या ओव्यांमधे एक वाक्य आहे जो जे वांछिल तो ते लाभो प्राणिजात. मीच या मताचे खंडन करतो. हे घडणेच शक्य नाही किंबहुना, जगाच्या ज्ञात आणी अज्ञात इतिहासात हे अर्थातच कधीही घडलेले नाही. घडणार नाही . इट अल्टीमेटली मिन्स एंड ऑफ युनिवर्स!
28 Feb 2014 - 7:20 pm | सुहास..
आणि राहता राहिला प्रश्न अवताराबद्दल .... अहो इथे हिंदु प्रत्येकालाच अव्यक्त ब्रह्म मानतात त्यामुळे बुध्दच काय तर तुम्ही आणि मी सुध्दा अवतारच आहोत >>>
पुन्हा हिंदु ? असो विनोदाच्या पातळीवर घेतलं हे वाक्य मी , तात्पुरत म्हणायला ठिक आहे दारू पिवुन बायकोला मारहाण करणार्यामध्ये रामाचा अवतार शोधावा का मग ? किंवा बलात्कार करणार्या वर तु कृष्ण म्हणुन अवतार घेतला आहे बाबा , असं करू नकोस ते ...
त्रिरत्न संघ ....सांगावेसे वाटेन तेव्हा सांगेन , थोडा अभ्यास वाढवा असे म्हणेन मी !!
तिसरी गोष्ट ओपन फोरम आहे म्हणुन च साम्गतो आहे , एका विशीष्ट समुदायाचे असताना, दुसर्या समुदायावर चुकीचे आरोप करणे थांबवा ...कोणताही बौध्दजन हे मानत नाही की "बुध्द हा अवतार होता " आणि तुम्ही, गोडबोले , ओपन फोरम वरच लिहीता आहात , फोरम ओपन आहे पण कल्की विषयी लिहीताना कल्की विषयीच लिहाव माणसाने , उद्या त्या समुदायाने आक्षेप घेतला तर ? समजुतदार दिसता, सुशिक्षीत ही , मग थोडी ओपन फोरम ची जाण ठेवायला काय हरकत आहे ??
मध्यंतरी याच मिपापर घडलेल्या असल्या जातीवाच़क घडामोडींमुळे मालकाने त्या विषयावर लिहायला बंदी घातली होती, अगदी मेन बोर्डावर डिसक्लेमर टाकावे लागले ..
राहिली माझी गोष्ट , तुम्हाला धमकी द्यावी लागेल इतका छोटा माणुस नाहीये मी :) , दुसरं म्हणजे मी मुळात विष्णुच मानत नाही, तर बुध्द ( मी आणि तुम्ही तर लांबच राहिलात) हा त्याचा अवतार होता हे कधी मानायचो...
(संपादित)
28 Feb 2014 - 7:57 pm | प्रसाद गोडबोले
सर्व सश्रध्द हिंदुंच्यामते बुध्द हा विष्णुचा अवतारच आहे ... ह्यात काहीही चुकीचा आरोप नाही ... हा ज्याच्या त्याचा श्रध्देचा भाग आहे .
तुम्हाला अगदीच त्रास होत असेल तर सुप्रिम कोर्टात जनहित याचिका दाखल करुन "बुध्दाला विष्णुअवतार मानणे हे कायद्याने गुन्हा आहे" असे डीक्लीयर करुन घ्या . बघुया कोर्ट काय म्हणते ते !
बाकी तुम्ही जातीयतेचा मुद्दा का काढलात हे कळाले नाही . चर्चा बुध्द आणि वैदिक हिंदु धर्म अशी चालु होती , शिवाय मी कोणाच्याच जातीचा उल्लेख केलेला नाहीये ( उलट तुम्हीच २ -३ वेळा माझ्या जातीचा उल्लेख केला आहे ) शिवाय एकदा बुध्द झाल्यावर जातीयतेचा प्रश्न येतोच कुठे ? बुध्द कोणा विशिष्ठ जातीजमातींची मक्तेदारी नाही .
बुध्द जितका तुमचा आहे तितकाच आमचाही आहे !
असो , तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही , तुमची गाडी वैदिक बौध्द तत्वज्ञान सोडुन इतरत्रच घसरत आहे ... त्यामुळे हा पुर्णविराम घ्या . मी कोणा तरी सेन्सिबल 'बुध्दा'कडुन बौध्द तत्वज्ञान समजुन घेईन !
__________________________________________________________________
28 Feb 2014 - 8:23 pm | सुहास..
मी कोणा तरी सेन्सिबल 'बुध्दा'कडुन बौध्द तत्वज्ञान समजुन घेईन ! >> म्हणजे साधं तत्वज्ञान माहीत नसताना , तो अवतार च होता हे म्हणणे कसे काय पटते ब्वा तुम्हाला स्वतःला ? समजुतदार समजत होतो मी ......हे म्हणजे उगा चार बुक वाचुन दुसर्याला शहाणपणा शिकविण्यासारखे आहे .....अनुभवशुन्यता म्हणतात याला माझ्या भाषेत
आणि ते कोर्टा-बिर्टाचे चॅलेज काय ? आणि कुठे करताय ? ते कळतय का तुम्हाला ? मी ओपन फोरमची साधी व्याख्या सांगतोय आणि तुम्ही पार कोर्टाच्या व्याख्या करताय, गोडबोले , आवरा च !! अवतारच आहात ब्बाबा तुम्ही ...
पुर्णविराम
28 Feb 2014 - 8:36 pm | प्रसाद गोडबोले
कसे का होईना , शेवटी तुम्हीही मान्य केलेतच की ...मगाशी वर तर नाही म्हणत होता =))))
असो आता अवतार आहोत ना आम्ही मग त्या अधिकाराने तुम्हाला आशिर्वाद देतो हे घ्या " अत्त दीप भव | "
28 Feb 2014 - 8:41 pm | सुहास..
बहुधा गोडबोले हे विसरलात की एखाद्याला आपण " हा काय अवतार केला आहेस , काही घेत का नाहीस " तो अवतार ......
विनोदबुध्दी ?
28 Feb 2014 - 8:53 pm | प्रसाद गोडबोले
विनोद तर विनोद ही सही ... तुम्ही बोललात ह्यातच आले !
अहो उरफाट्यानामासाठी | वाल्मिक तरला उठाउठी ||
तुम्ही कसेही म्हणा ... आम्ही आशीर्वादच देणार :)
अत्त दीप भव !
बुध्द बना बौध्द नको !
28 Feb 2014 - 9:15 pm | सुहास..
अत्त दीप भव ! >> हे नंतर उगा काढलेले ...हे ओरिजनल ...
" सब्बे सत्ता सुखि भवन्तु "
असो ..चष्मा काढला असता तर छान चर्चा झाली असती ...
( च्यायला पब्लिक बी ...अंडरवेयरची जाहिरात बुरखा घालुन करतीया )
28 Feb 2014 - 8:20 pm | मुक्ती
>>>कितीक सा वेळ लागेल वरचा स्क्रीन शॉट घेवुन त्रिरत्न संघाकडे जायला ? >>>
हे वाक्य ब्रिगेडी पद्धतीचे वाटले आहे. ही बुद्धाने शिकवलेली सहिष्णुता नव्हे.
>>> बाकी वेद, वेदांत, शंकराचार्य ही , गोडबोले, कुलकर्णी , देशपांडे , कर्णिक, यांच्यामध्य्रे सिमीत असल्याची कारचे शोधा आधी , >>>
हे वाक्यही काही जातीच्या रोखाने टाकलेले आहे. गोडबोलेंनी तर कोणाचे नाव घेतलेले न्हवते.
28 Feb 2014 - 8:37 pm | सुहास..
माझा उल्लेख स्पष्ट आहे आणि प्रश्न ही , त्या प्रश्नाचे उत्तर नसेलच...अजुन दिले गेलेले नाही.. ( मी अजुनी तोच प्रश्न विचारतो ? ) जर नामशेष होण्याची कारणे विचारता आहात तर मला देखील हक्क आहे प्रश्न विचारण्याचा ( मिपा काय कोणा एका समुदायाचे नाही ) ...शिवाय नामशेष होण्याची कारणे माझ्या आधीच वल्ली ने दिलेली आहेत ...
आणि जातीचा उल्लेख न करता, डायरेक्ट बुध्दाला हात घातल्या गेला आहे याची नोंद घ्यावी. ( उद्या ..उद्या कशाला...अजच म्हणतो ... मी एखाद्या धाग्यात कृष्ण स्त्री - लंपट होता किंवा गणपती लेखनिक होता असे म्हटले तर ?? )......हे आजच्या समाजात वावरणारा कोणीही सांगेल की " बौध्दजन बुध्दाला अवतार मानत नाही " मग उगा चिघळ्त जाणारा विषय कशाला ?? मी ताशेरे ओढताना सपादकांवर ओढले आहेत , त्यावर संपादकानी उत्तर दिले असते तर वेगळी गोष्ट ! किमान धागकर्ती ने ...उगा त्यात नाक खुपसायची गरज नव्हती ..हे म्हणजे गीता वाचायची आणि त्यात अर्थ मात्र स्वता:चा घालायचा ? ...
28 Feb 2014 - 9:32 pm | आत्मशून्य
राम खरा विलन व रावण हीरो , तुकाराम महाराजांचा खून केला गेला, जसे ज्याला वाटते त्याने तस सप्रमाण म्हणावे. व मुळ संहितेतिल मताचे वयक्तिक पातळीवर खंडन सुधा करावे यात गैर नाही.
पण जेव्हा तत्वज्ञानाच्या दोन शाखा एकाच व्यक्ती बाबत(बुध्द) दोन अधिकृत परंतु भिन्न मते व्यक्त करतात तेंव्हा संपादक त्यात कोनाचिच बाजू न घेता निपक्ष राहणे पसंत करत असावेत.
28 Feb 2014 - 10:33 pm | मुक्ती
>>>> डायरेक्ट बुध्दाला हात घातल्या गेला आहे >>>>>
इथल्या कोणत्याही प्रतिक्रियेत भगवान गौतम बुद्धाला तुम्ही म्हटल्यासारखी स्त्री-लंपट / लेखनिक इ. विशेषणे लावून अपमान केल्याचे दिसले नाही. उलट त्याला अवतार म्हणजे सामान्य माणसापेक्षा खूप श्रेष्ठ असे देवत्व दिले जात आहे.
>>>> उगा त्यात नाक खुपसायची गरज नव्हती .. >>>>
इथे परत तुमचेच वाक्य उद्धृत करणे आवश्यक आहे.
>>> हा ओपन फोरम आहे. >>>>
28 Feb 2014 - 10:56 pm | सुहास..
इथल्या कोणत्याही प्रतिक्रियेत भगवान गौतम बुद्धाला तुम्ही म्हटल्यासारखी स्त्री-लंपट / लेखनिक इ. विशेषणे लावून अपमान केल्याचे दिसले नाही. उलट त्याला अवतार म्हणजे सामान्य माणसापेक्षा खूप श्रेष्ठ असे देवत्व दिले जात आहे. >>
नाही !!! माझा अवतार ला च विरोध आहे ......सामान्य माणुस हा अवतार असायला , परीटाची सामान्य टिपणी ऐकुन , मातृत्वाची देणगी भेटलेल्या बायकोला बाहेर काढणार नाही , चोळी चोरून तमाशा बघणार्याला, रासलिला म्हणेल ( छाती बघायची अवताराला, दोन ठिकाणी दुध प्यायला !! ), किंवा डुकराच्या जन्मात , .....असो ...लिहायला बरेच काही आहे ...........याची बायको त्याला मिळावी म्हणुन सरळ खुन करणारा ( नथ्थु रामाचे आपण ही फॅन आहोत...पण खुन ?? ..नकोच ) .........त्यापेक्षा त्याला सामान्य माणुस च राहु दे ब्वा .........
माझी ही सरळ सोट अपेक्षा .....सामान्य माणुसच .....उगा एखाद्याला अवतार कशाला ? दोन क्षणापुर्वी आम्हाला बी अवतार केले ( अरे किमान बी हॉनेस्ट , अवतार तर स्साला पिच्चर पण आहे ........) आणि येव्हढा अवतार मानत असाल तर उद्यापासुन सरळ विहारात जायच आणि वन्दना करायची , मेणबत्या जाळायच्या , ........
बुध्दंम शरणम गच्छामि , धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि " म्हणायच ............( पांढरे कपडे घालुन या , दिक्षा देतो हवे तर ) .......हा पण अवतार ना .......मग या की !! ऑलवेज वेलकम ..........
28 Feb 2014 - 11:13 pm | मुक्ती
मात्र एक गोष्ट सहज लक्षात आली. इतर कोणी भगवान गौतम बुद्धाला किंवा इतर कोणालाही फक्त आदर दिला आहे पण तुम्ही मात्र सातत्याने इतर देव/अवतार यांच्याबद्दल अनादराने बोलत अहात.
28 Feb 2014 - 11:45 pm | सुहास..
ते जे सांगताहेत ना , दुर्लक्ष कर ई. ई.. ई.
त्यांना हे ही सांगा अनादर कसला ? हेच लिहिले आहे ना .....काय त्या रामायण महाभारतात ....मी तर एक पैलु दाखवितो आहे .......अजुन बरेच आहेत मुक्ती ताई .....अजुन लिहिले तर वाट लागेल या महा काव्यांची !
( अभ्यास फक्त एक विशीष्ट समाज करत नाही )
28 Feb 2014 - 11:47 pm | सुहास..
भगवान गौतम बुध्द ??
नो भगवान .......सामान्य माणुस ,,,फार तर तत्ववेता !!
1 Mar 2014 - 2:25 am | बॅटमॅन
रामायण-महाभारताचे अनेक पैलू आहेत. जो म्हणाल तो पैलू इथे हजर आहे.
तसेच बोलायचे झाले तर मग सांसारिक जबाबदारी सोडून रानावनात भटकायचे कारणही बुद्धाला नव्हते. एक मेलेला माणूस काय पाहिला आणि घर सोडून पळून गेला वगैरे बरेच बोलता येते. राळच उडवायची असेल तर कुणावरही कशीही उडवता येते.
स्वमताच्या आग्रहासाठी 'विरुद्ध' पक्षावर राळ उडवण्यात कितपत हशील आहे ते मात्र मला माहिती नाही.
बौद्ध तत्वज्ञान आणि त्याचे शंकराचार्यांनी केलेले खंडन हा तसा फेमस विषय आहे, पण वैयक्तिकरीत्या आचार्यांचे ते मुख्य योगदान आहे असे मला वाटत नाही. असो, तो विषय नंतर कधीतरी.
अन अद्वैत वेदांत आचरणारे जसे अत्यल्प होते तसेच बौद्ध धर्माची तत्त्वे आचरणात आणणारेही थोडेच होते. कुठल्याही धर्माबद्दल असेच म्हणता येईल. अन उच्चनीचतेबद्दल बोलायचे झाले तर मग ते महायान-हीनयान वैग्रे भानगडी कशाला आल्या मग बौद्ध धर्मात? धर्माची मूळ तत्त्वे अन आचरणात फरक हा नेहमीच असतो. तो एकाच बाजूकडचा फरक अधोरेखित करण्यात काही अर्थ नाही. असो.
1 Mar 2014 - 9:58 am | मुक्ती
सुहासदादा, धर्म मानणे, ना मानणे; कोणाला देव अथवा अवतार मानणे, ना मानणे या पूर्णपणे वैयक्तिक गोष्टी आहेत. "बौद्ध धम्मात बुद्धाला अवतार मानत नाहीत" किंवा "मी बुद्धाला अवतार मानत नाही." येवढेच लिहून थांबला असतात तर सर्वांनीच त्याबद्दल कौतुक केले असते, काहींनी अॅग्री टू डिसअॅग्री म्हणत पुढे काही बोलले गेले नसते. परंतु, तुम्ही त्याबरोबर कित्येक अनावश्यक विधाने केलीत. त्रिरत्न संघाकडे स्क्रीनशॉट पाठवणे काय, अवतार म्हणणे थांबवा काय, अन मी लहान माणूस नाही म्हणणे काय; हे सगळे एखाद्या मुतव्वाच्या फतव्यात शोभून दिसते. ओपन फोरमवर न्हवे. तुमच्या श्रद्धास्थानावर कोणीही चिखलफेक केलेली नाही आणि तरीही "त्याने केली तर मीही करेन" असे म्हणणे हे तथागताची शिकवण तुमच्यापर्यंत पोचली नाही हेच ठळकपणे दाखवून देते.
सर्वसामान्य हिंदू माणूस बुद्ध किंवा बौद्ध यांना स्वतःपासून वेगळे समजत नाही. नसलेले भेद उभे करून वातावरण बिघडवायचा प्रयत्न कोणीच करू नये. तुम्ही बुद्धाला अवतार मानत नसाल तर त्या भावनेचा आदर आहे, तसाच आणखी कोणी अवतार मानत असेल तर त्याचाही आदर आहे. कारण भगवान गौतम बुद्धासारख्या महामानवाला "आमचा-तुमचा" अशा संबोधनात जखडून ठेवता येणे शक्य नाही. ते तर सगळ्या जगाचे असतात.
1 Mar 2014 - 11:18 am | सुहास..
मी अजुन ही म्हणतो , अपप्रचार करू नका की बुध्द हा अवतार होता !! आणि स्क्रीन शॉट बद्दल ...ओपन फोरम बद्दल उत्तर देवुन केव्हाच झाले आहे. वाचा नेमके काय लिहीले आहे ते, समजले नसेल तर पुन्हा सांगेन ...... ज्यांना आस्था असते ते मनात प्रिज्युडाईस ( विष्णुचा अवतार म्हणे ) ठेवुन येत नाहीत .बेसीक्स मध्येच गडबड असली तर कन्सेप्ट काय कप्पाळ समजणार !!
लहान मी देखील नाही, ज्या संकल्पनेने १००० वर्षे समाजाचा चुथडा केला, त्या संकल्पनेला धरून रहाण्याइतपत तर नक्कीच नाही
22 Feb 2014 - 6:17 pm | अवतार
छोडो कल्की बाते कल्की बात पुरानी
नये धागे पे खरडेंगे हम मिलकर नयी कहानी
हम मिपास्थानी हम मिपास्थानी !
22 Feb 2014 - 6:32 pm | विकास
24 Feb 2014 - 12:50 am | अत्रुप्त आत्मा
+++१११ टू अवतारबाबा!
@छोडो कल्की बाते कल्की बात पुरानी
नये धागे पे खरडेंगे हम मिलकर नयी कहानी
हम मिपास्थानी हम मिपास्थानी ! >>>
22 Feb 2014 - 6:28 pm | जेपी
मिपा वरचे डु आयडी वाल्या पाप्यांना आवरण्यासाठी कोणता कल्की कामाला येईल .
22 Feb 2014 - 7:10 pm | विनायक प्रभू
@बॅट्या बेटा
चल आपली बिट लागली, १०००००००० रुपयाची
तू ३०० वर्शाने चुकला आहेस.
24 Feb 2014 - 12:29 am | बॅटमॅन
तुम्ही २९९ वर्षांनी चुकला आहात.
22 Feb 2014 - 7:57 pm | भाते
धाग्याचे शिर्षक वाचुन कल्की कोचलीन संबंधी काहीतरी असेल या अपेक्षेने धागा ऊघडला होता.
पण हा धागा तर भलताच निघाला! जाऊ द्या, हा माझा विषय नाही.
बाकी तुमचे चालु द्या.
22 Feb 2014 - 10:48 pm | मनीषा
कल्की जन्मल्याबरोबर तो 'अवतार' आहे हे कळणार?, की ते तो मोठा झाल्यावर समजेल?
तुमचे लेखन वाचल्यापासून, कल्कीचा बालपणापासूनचा इतिहास कसा जतन करता येईल याची चिंता मला लागली आहे.
22 Feb 2014 - 11:18 pm | मुक्ती
पुढे युगे सुरू राहतील, त्यात वाईट लोक असणार नाहीत का? म्हणजे आणखी अवतार का येणार नाहीत म्हणे?
22 Feb 2014 - 11:30 pm | प्रचेतस
कल्की प्रतिमा
22 Feb 2014 - 11:51 pm | धन्या
आज स्वयंचलित वाहनांच्या युगात उडण्याची क्षमता असलेला पांढरा घोडा हे कल्कीचे वाहन असेल असे म्हणणे खुळचटपणाचे आहे.
ज्या कुणाच्या सुपिक डोक्यातून हजार दोन हजार वर्षांपूर्वी ही अवताराची कल्पना निघाली असेल त्याला अर्थातच पुढे दोन तीन हजार वर्षांनी येणार्या यंत्रयुगाची कल्पना नसेल. म्हणून त्याने तेव्हा आपल्या तेव्हाच्या कुवतीनुसार उडणारा पांढरा घोडा ही कल्पना रंगवली.
23 Feb 2014 - 12:12 am | आत्मशून्य
त्याने नक्कइच यंत्र युग पाहिले असणार हो, तुमि लिहून घ्या... पण सालं त्या वेळच्या इतराना ते पट्वाय्चा प्रयत्न करणे आज लोकांना मंत्र शक्तीचे अनुभव विषद करणे इतकच कठिन असणार म्हणुन तो धोका पत्करला नसावा. कसं आहे की त्यावेळी मुर्ख लोक डायरेक कापाकापी करायचे. बुध्द अध्यात्मात होता अन महात्मा गांधिचाहि जन्म झाला न्हवता.
23 Feb 2014 - 4:01 am | आयुर्हित
साभार: इस्रो
हा घोडा उडवणारे कस्तुरी रंगन कि अब्दुल कलाम?
हा कल्की अवतार आपल्या पुढच्या पीढीला सुरक्षितपणे पृथ्वीवरून दूर कोठल्या परग्रहावर घेऊन जाणारा तर नसेल?
23 Feb 2014 - 8:02 am | निलरंजन
माझ्या मते आपण वैज्ञानिक द्रुष्टीने जगापेक्षा प्रगत होतो
उत्तरेकडून होणारे सततची परकीय आक्रमण आणि नंतरचे इंग्रज यामुळे कुठे तरी आपण आपले ज्ञान विसरून गेलोय
गंमत पहा रामायण काळात आपल्या कडे पुष्पक विमान होते
पण आपल्याला विमान कळाले राईट बंधू नी पेटंट घेतल्यावर
ऋग्वेद सामवेद सारखे वेदांमधे हे ज्ञान लपून आहे
त्याला संस्कृत आणि विज्ञान याची जोड देऊन बरेचसे आणखी शोध लागू शकतात
बाकी ज्यांना अवताराचा ईतिहास लिहावे असे वाटते त्याने योग साधनेने अंतर्ज्ञानी व्हावे
कारण अस कुणास भगवंत दश॔न होत नाही
23 Feb 2014 - 8:21 am | आत्मशून्य
हिंट्स देउ नयेत !
बाकि हो, होते पुश्पक विमान आपल्या पुर्वजांकडे ? पण त्याचा सामान्यांना काय उपयोग ? त्याचा सामान्यांना उपयोग करणे तेंव्हाच शक्य झाले जेंव्हा राइट बंधुनी पेटंट घेतले. हिच गोश्ट बहुतांश पेंटंटची आहे. उगा आपल्याकडे यांव होते त्यांव होते च्या गमज्या नकोतच जर त्या सुविधांचा सामान्य जनतेकडुन वापर होत नसेल तर. सिलीकॉन वेलीचे खरे मुल्य याच कारणामुळे आहे.