शितलनी मला आवडलेल्या दूरदर्शन संचावरील जाहिराती हा धागा सुरु केला. त्याचबरोबर अशाही काही जाहिराती असतात ज्या अगदी डोक्यात जातात. समोरचा प्रेक्षक मुर्ख आहे, त्याला काही समजत नाही हे गृहीत धरून केलेल्या जाहिराती. मी मला आठवणार्या अशा जाहिराती सांगतो; तुम्ही पण तुमच्या डोक्यात जाणार्या जाहिराती सांगा.
१) हार्पिकः अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून (एवढं पिवळं होऊस्तोवर कोण ठेवेल तसच) डोकं फिरवतात. नेमकी ती जाहिरात जेव्हा जेवायला बसलेलो असतो तेव्हाच लागते
२) विसा पॉवर: शंकर-एहेसान-लॉयनी केलेली अतिशय टुकार जाहिरात.
३) बीएसएनएलः प्रीती झिंटाला पहायला मुलाकडचे आलेले असतात. सगळं विचारुन झाल्यावर मुलीकडचे मुलाकडच्यांना फोन नंबर मागतात. तेव्हा मुलाचे वडील मोबाईल नंबर सांगायला सांगतात. तेव्हा प्रिती म्हणते की ते तुम्हाला लॅंडलाईन नंबर मागतायत. आमच्याकडे लॅंडलाईन नाही असं म्हटल्यावर ती उचकते आणि मुलाकडच्यांना ठणकावून सांगते "जिस घर मे बीएसएनएल लॅंडलाईन नही उस घर में मै शादी नही करुंगी"..
४) एमडीएचः ह्या जाहिरातीत त्या कंपनीचा अध्यक्ष चालत येताना दाखवला आहे. म्हातारा, मिशा वाढवलेला असा. त्यांना कोणी दुसरा बरा मॉडेल नाही का मिळाला? त्याच्याकडे पाहून कोण हे मसाले विकत घेणार आहे?
प्रतिक्रिया
27 Sep 2008 - 10:46 am | जैनाचं कार्ट (not verified)
जाहिरातीत त्या कंपनीचा अध्यक्ष चालत येताना दाखवला आहे. म्हातारा, मिशा वाढवलेला असा. त्यांना कोणी दुसरा बरा मॉडेल नाही का मिळाला?
तो म्हतारा रियल लाईफ रोल मॉडल आहे ... नकली नाही त्या महाशयांचे नाव चुन्नीलाल !
१९२० पासून त्यांचे घराणे मसाला धंद्यात आहे व हे महाशय आहेत धर्मपाल, ह्यांनी हा मसाला त्यावेळी सायकल वरुन फिरुन फिरुन विकला व शुन्यातून विश्व निर्माण केले..., आज जगभरात त्यांचे प्रोडक्ट विकले जातात !
Mahashay Chuni Lal Charitable Trust ह्या नावाने त्यांनी २५० बेड चे हॉस्पीटल व चार मुफ्त शाळा दिल्ली मध्ये चालवत आहेत तसेच संदेश नावाचे मासिक देखील ते विनामुल्य काढतात ज्यामध्ये भारतीय संयुक्त परिवाराची माहीती व महती दिलेली असते !
http://www.indianspices.com/
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
27 Sep 2008 - 10:51 am | सुचेल तसं
कंपनीचा अध्यक्ष म्हणून ग्रेट असेल.. पण जाहिरातीत त्याला दाखवण्याचं प्रयोजन काय? तो काही रतन टाटा किंवा धीरुभाई अंबानी नाही की सगळ्या भारताला माहिती असेल.
कल्पकता-शुन्य जाहिरातींनी त्या वस्तुच्या विक्रीवर निश्चितच वाईट परिणाम होतो.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
27 Sep 2008 - 10:55 am | जैनाचं कार्ट (not verified)
ह्या बाबतीत सहमत.
मी फक्त माहीती द्यावी ह्या उद्देशाने वरील प्रतिसाद लिहला आहे !
***
स्वगतः मला तरी कोठे ती जाहिरात आवडते !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
27 Sep 2008 - 10:57 am | सुचेल तसं
>>मी फक्त माहीती द्यावी ह्या उद्देशाने वरील प्रतिसाद लिहला आहे !
धन्यवाद
>>स्वगतः मला तरी कोठे ती जाहिरात आवडते !
:-)
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
28 Sep 2008 - 1:06 am | भडकमकर मास्तर
पण मला आवडते बरंका ती जाहिरात,...
मला तर त्याचे कौतुक वाटते...एम्डीएच एम्डीएच......
स्वतःच जाहिरातीत दिसून कोणीही न केलेली गोष्ट तो करतो.शिवाय त्यात कोणताही आक्षेपार्ह संवाद / हावभावसुद्धा नाही.....त्यामुळे साहजिकच त्या मसाल्याचे नाव लक्षात राहते... जाहिरातीसाठी अजून काय पाहिजे??आणि एखादी दुसरी नाही, त्याच्या अनेक जाहिराती केलेल्या आहेत त्याने...
...
आणि जैनांच्या कार्ट्याच्या माहितीने अजून मजा आणली... आपल्याला तर तो मिशावाला कर्तृत्त्ववान म्हातारा आवडायलाच लागलाय...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
1 Oct 2008 - 3:37 pm | विजुभाऊ
अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून (एवढं पिवळं होऊस्तोवर कोण ठेवेल तसच)
कदाचित जहिरातीसाठी मुद्दाम तयार करुन घेतले असेल अथवा कोण्या प्रेमात पडलेल्या चे टॉयलेट असेल(संदर्भः गटणे याची प्रेमात पडण्याची लक्षणे:फ्लश करायला विसरणे.ई.)
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
1 Oct 2008 - 8:34 pm | शेखस्पिअर
कोण्या प्रेमात पडलेल्या चे टॉयलेट असेल
हम छोडेगा नही जी...
ह. ह. प.
27 Sep 2008 - 11:02 am | टारझन
आपल्या क्रिकेटर्सच्या जाहीराती डोक्यात जातात, एस्पेशली तेंव्हा.... जेंव्हा ते निर्लज्जा सारखे शुन्यावर आउट होउन जातात आणि नेक्स्ट त्यांचीच ऍड फ्लॅश होते.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
27 Sep 2008 - 11:11 am | वारकरि रशियात
मुक्तसंगः अनहंवादि
अवांतरः या महाशयांनी ठरवलेले आहे की ते आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीत (पाहुणे कलाकार म्हणून) झळकतील.
माझी त्यांची सुमारे ४ वर्षांपूर्वी उत्तरकाशी (उत्तरांचल - ह्रुषिकेश - गंगोत्री मार्गावरील क्षेत्र) येथे भेट झाली होती. तेथील कैलास आश्रमात.
त्यावेळी त्यांनी एक भजनही म्हटले होते!
बाकी न आवडणार्या जाहिरातींची संख्या अगणित आहे! पण त्याविषयी जर्मनी (फ्रांकफूर्ट) येथून परतल्यावर. - उद्याच तेथे पोचत आहे.
27 Sep 2008 - 12:09 pm | भोचक
याच विषयावर इथे एक छान लेख वाचायला मिळाला.
http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/0809/16/108...
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
27 Sep 2008 - 4:47 pm | झकासराव
हार्पिकः अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून >>>>>>
१००% सहमत हो.
मनात ती ऍड बनवणार्याच्या नावाने उदो करुन रिकामा होतो मी.
ती बी एस एन एल ची देखील टुकारच आहे जाहिरात.
च्यायला ही ऍड करायला त्याना प्रीती कशाला पायजेल?
अजुन काही आहेत आठवेल तस लिहिन.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
27 Sep 2008 - 11:11 pm | शितल
मला शाहरूख खानच्या अनेक जाहिराती डोक्यात जातात.
आणि सनी देओलची कोणत्या तरी बनियन ची ऍड करतो ती.
आठवतील तशा सांगते.
1 Oct 2008 - 3:19 pm | टारझन
तुला नक्की ते दोघे चोचे डोक्यात जातात का त्यांच्या जाहिराती ?
माला बाकी शाहरूक काय आणि तो सन्नी काय ... जाहिरात , कार्यक्रम , पिक्चर्स ... डॉक्यात जातात भो .............
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
28 Sep 2008 - 12:21 am | विसोबा खेचर
डोक्यात जाणार्या जाहिराती
ब र्या च आ हे त...!!
तात्या.
28 Sep 2008 - 12:44 am | प्राजु
वा सुनिल बाबू... नया घर, नयी गाडी नयी दुल्हन... बढिया है...
मूर्खपणाचा कळस आहे ही ऍड.
सगळ्या क्रिकेटियर्स च्या ऍडस...
इतक्या आहेत न आवडणार्या की त्याला गणतीच नाही..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Sep 2008 - 12:14 pm | देवदत्त
मिरिंडा-> मुलगी सासरी जाताना पित्याशी गंमत करते.
तशा बर्याच आहेत. आठवतील तशा सांगतो.
ह्यावरून एक मुद्दा आठवला. जाहिराती बनविणार्यांच्या मनात बहुधा असेही असते की, एखादी जाहिरात आवडली नाही तरी चालेल. पण त्या वाईट जाहिरातीच्या निमित्तानेही त्यांचे उत्पादन लोकांच्या लक्षात राहिले पाहिजे. :)
1 Oct 2008 - 3:01 pm | विजुभाऊ
ये तो बडा टॉईन्ग है.
माकड चड्डी घालते ती जहिरात. त्या अगोदर याच कम्पनीची एक बाई मन लावुन कपडे धुवत असते ती जहिरात भन्गार होती
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
1 Oct 2008 - 3:14 pm | इनोबा म्हणे
ही जाहिरात खरंच डोक्यात जाते.
'अमूल माचो'ची जाहिरात होती ती.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
1 Oct 2008 - 4:03 pm | ऋचा
ये तो बडा टॉईन्ग है.
माकड चड्डी घालते ती जहिरात. त्या अगोदर याच कम्पनीची एक बाई मन लावुन कपडे धुवत असते ती जहिरात भन्गार होती
सहमत !!
ही अतोनात भयानक टुकार भिक्कार जाहीरात आहे @)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
1 Oct 2008 - 8:37 pm | ब्रिटिश
ईजूभौ, माकराची जायरात भंगार,
पन त्या बाय ची जायरात आवरी आवल्डी , आवरी आवल्डी क त्या दीसापासन नीस्ती
'माचो' वापरनारा
त्या जायरातीचा फॅन
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
1 Oct 2008 - 3:14 pm | llपुण्याचे पेशवेll
न आवडणार्या जाहीराती बर्याच आहेत आणि त्यातही 'उन दिनों' वाल्या जाहीराती तर डोक्यातच जातात. (अवांतरः पण बर्याचदा अशा जाहीरातीतल्या मॉडेल्स मात्र छान असतात)
:)
बरेचदा साबणांच्या जाहीराती पण अतिशयोक्त असतात त्याही डोक्यात जातात.
पुण्याचे पेशवे
1 Oct 2008 - 4:48 pm | अभिजीत मोटे
ही जाहीरात तर अतिशयोक्तीचा कळसच आहे. हल्लीच्या त्यांच्या जाहिराती पाहून तर यांनी निर्लज्यपणाची पातळीच ठेवली नाही असे वाटते. (पातळीच नाही तर ओलांडणार काय?)
............अभिजीत मोटे.
1 Oct 2008 - 5:03 pm | मनस्वी
१. याद है ना शिमला 297 - रिलायन्स
२. अभिषेक बच्चनची IDEA
मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
1 Oct 2008 - 8:26 pm | शिप्रा
एक खुप जुनी जाहिरात्..जी कायमच डोके सरकवायची..
काय झाले? बाळ रड्त होते वुडवर्स द्यायला सांग तिला तु लहान असताना तुलाहि मी हेच देत होते...