कवी लिखाळ ह्यांच्या काव्यप्रतिभेला सर्वपित्रीच्या रात्री आलेला भेसूर बहर वाचून मी थिजून गेलो :S आणी माझ्या गोठलेल्या तनातून विडंबनाची एक थंडगार लहर सरसरत गेली! :O
वाचता भयानक ओळी
थिजलो गोठून गात्री
क्षणात गमले मजला
'लिखाळ' हा, ना कवियत्री
भयाण-भेसूर कडवी
यमक वृत्तही नाही
थरथरता मुक्तछंद अन्
वाचकाला झोप नाही
जालावरील मुंजा
लिहितो भेसूर तेव्हा
तळमळत्या मनांचा
अभिशाप स्पष्ट होई
थकला अखेर जेव्हा
'चतुरंग' सर्व गात्री
फाडून आता बघ त्याने
कवितेची लक्तरे उरली ...
चतुरंग
विवाद
आमच्याच विडंबनाचे तिर्हाईतपणे समिक्षण करून आम्ही त्याचे मर्मभेदी गांभीर्य आणि वैचित्र्यपूर्ण सौंदर्य नष्ट करु इच्छित नाही. जिज्ञासूंनी आपापल्या जबाबदारीवर समीक्षा करावी.
प्रतिक्रिया
30 Sep 2008 - 8:40 pm | प्राजु
आई शपथ्थ...
जोरदार...
जालावरील मुंजा
लिहितो भेसूर तेव्हा
तळमळत्या मनांचा
अभिशाप स्पष्ट होई
हाहाहा.... लई हसले.
या विडंबनाचे मर्म लक्षात घेऊन याचे रसग्रहण करण्याचे उद्योग मी तरी करणार नाही.. ;)
आवांतर : लिखाळ रावांनीच करावे याचे रसग्रहण.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Sep 2008 - 8:44 pm | लिखाळ
>आवांतर : लिखाळ रावांनीच करावे याचे रसग्रहण.. <
याला भिषण जबाबदारी म्हणतात का ?
एक नेहमीचे वाक्य - ही जबाबदारी माझी लेखणी समर्थपणे पेलू शकेल असे वाटत नाही म्हणून मी नम्रपणे ... वगैरे...
--लिखाळ.
30 Sep 2008 - 8:41 pm | लिखाळ
जोरदार !!! अतिशय मजेदार :)
>थरथरता मुक्तछंद अन्
वाचकाला झोप नाही<
वाहवा.. सुंदर..अगदी कवितेच्या झाडाखाली बसल्या सारखे वाटले.
एकूण एक कडवे माझ्याकडे पाहून भेसूर हसत आहे असे वाटले.
>जालावरील मुंजा<
हा एक नवा आयडी वाटला ;)
समिक्षा न करण्याचा विचित्र निर्णय सुद्धा दाद देण्यासारखा. कवीपेक्षा समिक्षक आणि विडंबकांची प्रतिभा जास्त साक्षेपी (हा एक उगीच मोठा शब्द) असते असेच आता वाटते आहे.
आता एक नेहमीचे वाक्य - 'खरेतर आपली कविता ही स्वतंत्र रचनाच वाटते. (किंवा फारतर आधारित म्हणूया)' ;)
-- (झोप उडालेला) लिखाळ.
30 Sep 2008 - 8:48 pm | मेघना भुस्कुटे
भन्नाट!
30 Sep 2008 - 8:52 pm | मुक्तसुनीत
पब्लिक येडं झालंय इथे ! ;-)
30 Sep 2008 - 8:56 pm | लिखाळ
अहो ! हे साहित्याचे वेड बरे ! अश्यानेच तर प्रतिभेला नवे नवे अंकुर फुटतात. (जुनी मराठी सिने-पात्रे म्हणतील अश्या स्टायलीत)
--(येडा) लिखाळ.
30 Sep 2008 - 9:05 pm | प्रियाली
समीक्षणाचा नारळ फोडते. (नारळा कधी "फोडतात" हे सांगायला नकोच...वाचक सूज्ञ आहेत ;) )
विडंबकाचे मनोगत
(आला आला हा शब्द शीर्षकात पुन्हा आला...धोपटा रे त्या समीक्षकांना धरून)
तर मंडळी, जालावरील कवींची काय गत होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे विडंबन. कविता कशीही असो, आनंदी, दु:खी, शृंगाररसाने युक्त, प्रेमकाव्य विडंबकांना त्याची तमा नाही. चांगली ताला सुरातील गेय गाणी विडंबनाच्या कात्रीतून सुटलेली नाहीत. सुरातील तर सुरातील, बेसूर काव्याचाही पिच्छा हे विडंबक पुरवतात पण झालं असं की भेसूरकाव्य मात्र विडंबकांना यापूर्वी मिळालं नव्हतं. तेव्हा आता विडंबकाचे मनोगत -
भेसूर काव्याच्या ओळी नजरेस पडताच विडंबक जागच्या जागी थिजले, साफ गोठून गेले. त्यांना दुसरं काहीच सुचेना - विडंबकांचे हे नेहमीचेच. कविता दिसली की यांची सर्व गात्रे गोठून जातात. ती सैल व्हायला एकच उपाय - विडंबन. हे विडंबन प्रसवेपर्यंत हे आपले गोठलेल्या अवस्थेत. ;) आता या गोठलेल्या अवस्थेत जाण्यापूर्वी एक गोष्ट त्यांच्या लक्षात नेमकी आली की ही काही कोणा नेहमीच्या कवयित्रीची कविता नाही. हा तर आपला लिखाळ. (बरा बकरा सापडला. रोज रोज या ताया-बायांच्या कविता उचलाव्या लागतात.)
आता विडंबन करायला घेतले खरे पण इतकी भयाण-भेसूर कडवी, ना यमक ना वृत्त. बिचार्या विडंबकाला प्रेरणा मिळण्यासारखं काहीच नाही. मुक्तछंद म्हणावं तर तोही धड नाही उगीच डुगडुगत उभा केलेला. याचं विडंबन पाडावं तर कसं पाडावं आणि नाही पाडलं तर वाचकाला (कवितांचा खरा वाचक विडंबकच हो, बाकी सगळे माना डोलवणारे) झोप कशी यावी?
आता मात्र विडंबक कवीवरून स्वतःवर आला. आपण जालावर मुंज्याप्रमाणे कवी बळी शोधत फिरत असतो आणि कवितेचे विडंबन पाडले की कविच्या मनातील तळमळ शापांतून व्यक्त होतेच असे अनेकदा निदर्शनास आले आहे. पण म्हणून शिव्याशाप खाऊन गप्प बसेल तर तो विडंबक कसला? भेसूर विडंबने लोकांना जास्त आवडतात पण या लिखाळाने भेसूर काव्य करून पंचाईत करून टाकली. आता लिखाळाला सोडून कसं चालेल...पारावर कविता आली आता ती मुंज्याची झाली.
असे अनेक विचार करून चतुरंग दमले. या भेसूर काव्याचं अतिभेसूर विडंबन करायचे झाले तर हवी तिथे कात्री चालवून कवितेची चीरफाड करायला हवीच. सुखी,दु:खी, प्रेमकाव्य, गझला, मुक्तछंद सर्वांचं हेच होतं, त्यात आज भेसूर काव्याचीही लक्तरे झाली. ;)
डिश्क्लेमरः समीक्षकांना दुस्पष्ट बोलल्याशिवाय जमत नाही म्हणे. समिक्षकाचा बुरखा काढल्यावर मात्र प्रियालीताई विडंबनाची वाहवा करतात.
विडंबन भेसूर काव्याला साजेसे. आवडले. ;)
(न आवडून सांगायचं कोणाला?)
30 Sep 2008 - 9:19 pm | लिखाळ
भेसूर समिक्षण आवडले. मनोगताशिवाय चैन पडत नाही हेच खरे. नारळही फुटला. आता साखर द्या..वड्या करु !
>पारावर कविता आली आता ती मुंज्याची झाली.<
मस्त ! :)
>कवितेचे विडंबन पाडले की कविच्या मनातील तळमळ शापांतून व्यक्त होतेच असे अनेकदा निदर्शनास आले आहे<
आणि पहिला प्रतिसाद मात्र कवीलाच द्यावा लागतो. कवीतेला एकही प्रतिसाद आला नाही तरी विडंबनाला एक नक्की येतोच..मुळ कवीचा :(
वर, विडंबन सुंदर आहे वगैरे म्हणावे लागते. अनेकदा तर 'अरे आपण चंद्र-सूर्य, तारे-वारे, ओघळलेल्या प्राजक्तामध्ये अडकलो आणि याच्या कडे पाहा किती नव्या नव्या कल्पना आहेत' असेही कवीला वाटून जात असेल..कल्पना नाही :) (ह.घ्या.)
समिक्षण आवडले.. भीति वाटली :)
--लिखाळ.
1 Oct 2008 - 12:33 am | विसोबा खेचर
आयला!
भयालीदेवी आजकाल फुल फॉर्मात आहेत! "मनोगत" हे नाव देखील सारखं सारखं उच्चारत आहेत! ;)
हम्म! बहुधा दिवाळी अंकाच्या संपादक पदावर घेतलेलं दिसतंय! किंवा मालकाने संपूर्ण चोखामेळा आंतरजालावर आणायची जबाबदारी सोपवलेली दिसते आहे!
हम्म!
आपला,
पोष्ट्यातात्या वेलणकर. :)
1 Oct 2008 - 12:44 am | प्रियाली
हाहा! नाही हो. एवढं मोठं कुठलं भाग्य आमचं!
हा फक्त योगायोग होता. भेसूर काव्य बंद झाली की माझी मनोगतंही बंद!
1 Oct 2008 - 12:57 am | चतुरंग
भयानक समीक्षेबद्दल भयंकर आभारी आहे! ;)
(न आवडून सांगायचं कोणाला?)
ह्म्म्म्... हे मात्र अंमळ खरं! शेवटी विडंबकाचा दरारा म्हणतात तो हाच! :SS
(खुद के साथ बातां : रंग्या, अरे ही समीक्षा इतकी स्फूर्तिदायक आहे की आता नजिकच्या काळात ज्या (भय)कविता आसपास दिसतील त्यांचे काही खरे नाही! ;) )
चतुरंग
1 Oct 2008 - 9:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
चतुरंग यांचं काव्य आणि भ्याली भयालीदेवींचं समीक्षण एक नंबर आहे. आता असं वाटायला लागलं आहे जसं भूतं झाडं पकडतात तसं या (भय)कवींनी मिपाकरांना पकडलेलं आहे!
हहपुवा.
अदिती
30 Sep 2008 - 9:05 pm | शाल्मली
चतुरंग,
विडंबनाची थंडगार लहर जोरदार सरसरली आहे.
भन्नाट विडंबन !
--शाल्मली.
30 Sep 2008 - 9:08 pm | स्वाती राजेश
विडंबन भारीच!!!!!!!
30 Sep 2008 - 9:12 pm | मुक्तसुनीत
>>> अहो ! हे साहित्याचे वेड बरे ! अश्यानेच तर प्रतिभेला नवे नवे अंकुर फुटतात. (जुनी मराठी सिने-पात्रे म्हणतील अश्या स्टायलीत)
पात्रे ओळखा पाहू !
१. आता गं बया ! हे मिसळपावापायी काय येडं का खुळं झालायसा ! आं ?
२. (जड आवाजात , तांबारलेल्या डोळ्यांनी) मास्तर ! मिसळपावाचे वेड काय औरच हाये !
३. (मोठे मोठे पॉझ घेत) हम्म .... मिसळपावचे वेड ....परमेश्वराला रिटायर करा आता !
४. मिसळपावाला वेडेबिडे म्हण्टले तर विधानसभेसमोर चपलेने मारेन , चपलेने !
५. तुला शिकवीन चांगलाच धडा, मिसळपावाला म्हणतो वेडा ...
;-)
30 Sep 2008 - 9:23 pm | लिखाळ
मस्त !
>तुला शिकवीन चांगलाच धडा, मिसळपावाला म्हणतो वेडा ...<
फुलराणी. होय तीच ती !
अरे सोड यार त्या कविता बिविता.. अरे मोठ्यांचे काम ते ! आपण आपली विडंबने वाचावित..काय मजा असतो यार !
आता कोण म्हणाले ही लाट येणार की काय?
--लिखाळ.
30 Sep 2008 - 9:25 pm | मुक्तसुनीत
>>>अरे सोड यार त्या कविता बिविता.. अरे मोठ्यांचे काम ते ! आपण आपली विडंबने वाचावित..काय मजा असतो यार !
तात्या अभ्यंकर ! ;-)
30 Sep 2008 - 9:30 pm | लिखाळ
असेल असेल .. मी 'तुझं आहे तुजपाशी' पाहिलं नाहिये ;)
-- (श्याम) लिखाळ.
1 Oct 2008 - 12:28 am | विसोबा खेचर
मुक्तराव,
एक वाक्य विसरलास रे!
"जमेल, झेपेल तितके दिवस चालवीन नायतर बंद करून टाकीन. गेलं सालं बाझवत..! :)
तात्या.
30 Sep 2008 - 9:16 pm | स्वाती राजेश
१. आता गं बया ! हे मिसळपावापायी काय येडं का खुळं झालायसा ! आं ?
गणपत पाटील
(जड आवाजात , तांबारलेल्या डोळ्यांनी) मास्तर ! मिसळपावाचे वेड काय औरच हाये !
निळू फुले
(मोठे मोठे पॉझ घेत) हम्म .... मिसळपावचे वेड ....परमेश्वराला रिटायर करा आता !
डॉ.श्रीराम लागू
30 Sep 2008 - 9:23 pm | संदीप चित्रे
>> ५. तुला शिकवीन...
भक्ती बर्वे !
30 Sep 2008 - 10:05 pm | बिपिन कार्यकर्ते
डिकास्टा...
४. मिसळपावाला वेडेबिडे म्हण्टले तर विधानसभेसमोर चपलेने मारेन , चपलेने !
सतिश दुभाषी... डिकास्टा, सिंहासन.
30 Sep 2008 - 10:07 pm | बिपिन कार्यकर्ते
भन्नाट...
बिपिन.
1 Oct 2008 - 12:36 am | विसोबा खेचर
रंगा,
विडंबन भयानक, भीषण, भेसूर सुंदर रे! :)
स्वगत : हा रंग्यादेखील अंमळ वेडझवाच दिसतो..! :)
आपला,
(भयानक भेसूर) तात्या.
1 Oct 2008 - 12:51 am | टग्या (not verified)
याचे 'भिजलं कुत्रं' म्हणून फर्मास विडंबन होऊ शकेल.
इथल्या स्थायिक विडंबकांसाठी चांगलं खाद्य आहे.
1 Oct 2008 - 12:58 am | मुक्तसुनीत
... हे रेसिडेंट ईव्हल चे भाषांतर असावे काय ? ;-)
हघ्याहेसांनल
1 Oct 2008 - 1:56 am | धनंजय
प्रिय सर प्रिय सर शिणली गात्रे
खरोखरी प्रिय सरला पित्रे...
या अत्यंत लयबद्ध वात्रट कवितेने "...त्रं" हे यमक (माझ्यापुरते) आरक्षित केलेले आहे. माझ्याकडून "...त्रं" हे यमक असलेले दुसरे, तेही लय-नसलेले, विडंबन लिहिणे शक्य नाही.
1 Oct 2008 - 11:14 am | ऋषिकेश
=)) =))
लिखाळाचे एक चांगली साथ आणल्याबद्दल आणि रंगरावांचे, प्रिभयाली ताईच्या त्या साथीला बळी पडल्याबद्दल आभार
=))
-(पुन्हा आजही =)) ) ऋषिकेश
1 Oct 2008 - 11:17 am | सहज
लिखाळ, रंगराव, भयालीदेवी यांनी जबरी मजा आणली.
1 Oct 2008 - 7:47 pm | स्वाती दिनेश
विडंबन झकासच झालं आहे..आणि वरचे प्रतिसादही लय भारी..
स्वाती
2 Oct 2008 - 1:50 am | खादाड_बोका
भयालीदेवीचे....हे भारी प्रतीसाद कोणी सुलभ व सोप्या मराठीत सांगेल काय... ;) ;)
माझा मेंदु ताणल्या गेला आहे. ...... =)) =))
मला तर स्वप्नातही भुक लागते....
6 Oct 2010 - 11:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे पण पुन्हा वाचायला मजा आली.
6 Oct 2010 - 11:15 pm | प्रियाली
;)
6 Oct 2010 - 11:15 pm | पैसा
"भीषण" कवितेचे "भेसूर" विडंबण! ;)