प्रिय विद्या बालन हिस

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
14 Jan 2014 - 2:23 pm

प्रिय विद्या बालन हिस,

काल तुझी खूप खूप आठवण झाली आणि तुला खूप मिस केले. तुला ‘देड’ या शब्दाचा नेमका अर्थ ठाऊक होता का गं? बंबैय्या भाषेत ‘देड’ ह्या शब्दाच्या अर्थाला एक वेगळीच छटा आहे, ती ही तुला माहिती होती का गं? असावीच, नक्की माहिती असावी कारण तसे नसते तर तू ‘देड इश्किया’ मध्येही दिसली असतीस. पडद्यामागच्या खबरी काही मला माहिती नाहीत; त्यामुळे तू देड इश्किया नाकारलास की तुला देड इश्कियासाठी नाकारले गेले ते काही नेमके माहिती नाही, पण ‘जो होता है वो अच्छे के लिये होता है’ असे म्हणतात ते एकदम सत्यात उतरले आहे. ‘देड इश्किया’ मध्ये जो काही ‘देड’ पणा केला गेला आहे त्यात तू नसल्याने एकदम हायसे वाटत आहे! “का? असे काय झाले?”, असा प्रश्न तुला पडणारच...

तर, काल मी देड इश्किया पाहिला, विशाल भारद्वाजच्या सिनेमांच्या भव्य कॅन्व्हासच्या प्रेमात मी पडलेलो असल्याने. आठव ओमकारा, त्यातला उत्तरेकडचा, मातकट, चंबळचाप्रभाव असलेला, राजकारणात मुरलेल्या प्रदेशाचा कॅन्व्हास. इश्किया मधला नक्षलप्रभावित प्रदेशाचा कॅन्व्हास. सात खून माफ आणि कमीने मधली प्रयोगशीलता. त्यामुळे तू चित्रपटात नव्हतीस तरीही विशालसाठी हा सिनेमा बघितला आणि तुला मिस केले...

इश्किया मध्ये एका साध्या सुती साडीतली तू साकारलेली कृष्णा एकदम पटली होती. आपला ‘उल्लू सिधा’ करण्यासाठी तू एकटीने, एकहाती एका नजाकतीने आणि चातुर्याने खालूजान आणि बब्बनला एकाच वेळी खेळवले होतेस. इथे ‘देड इश्किया’ मध्ये माधुरी आणि हुमा कुरेशी अशा दोघी असूनही त्या दोघींनी मिळूनही तो इंपॅक्ट साधता आलेला नाहीयेय. कथानकाची आणि कथेतल्या वातावरणाची गरज म्हणून माधुरी चित्रपटात भरजरी कपड्यांमध्ये वावरली आहे पण साध्या सुती साडीतली तुझी कृष्णाच उजवी वाटते. माधुरी फक्त तिच्या एंट्रीच्या सीनमध्ये प्रचंड सुंदर दिसून एकदम भावते पण जसजसा चित्रपट पुढे सरकतो तसतशी ती शोभेची बाहुली होत, भयंकर मेकअप करून उतू जाणारे वय लपविण्याच्या प्रयत्नात निष्प्रभ होत जाते. कथेचे सेंट्रल कॅरॅक्टर असलेली आणि अनेकविध कंगोरे असलेली बेगम पारा रंगवताना अभिनयाची कमाल करण्याची मोठी संधी चक्क घालवताना माधुरीला बघितले आणि तुला मिस केले...

नसरूचाचांनी साकारलेला खालूजान जेवढा इश्कियामध्ये प्रभावी होता त्याच्या कैक पटीने देड इश्किया मधला नवाब बनलेला खालूजान प्रभावी आहे. पण बब्बन देड इश्कियामध्ये हरवल्यासारखा वाटतो. इश्किया मध्ये तुझी आणि बब्बनची अभिनयाची जी जुगलबंदी झाली होती तशी देड इश्कियामध्ये बब्बन आणि हुमा कुरेशी मध्ये घडतच नाही. हुमा कुरेशी अजूनही वासेपुरातच असल्यासारखी चित्रपटभर वावरली आहे, तिला ती मुहम्मदाबादमध्ये आहे ते कळलेच नाही असे वाटत राहते. माधुरीबरोबर नाचण्याचा मूर्खपणा आपण करणार आहोत हे कळल्यावर तरी नाचण्यात थोडा ग्रेस आणण्याचा प्रयत्न हुमाने करायला हवा होता; ‘स्टेज’चा अनुभव असलेली अभिनेत्री असा उदोउदो तिच्याबाबतीत झाला असल्याने तशी अपेक्षा करणे गैरलागू नाही पण हुमा त्यात कमी पडते. इश्किया मध्ये जेव्हा तू ‘च्युत्यम सल्फेट’ शब्द वापरतेस तेव्हा त्यामगचा जिव्हारी लागावी असा वार अगदी काळजापर्यंत पोहोचतो. तो भाव हुमाला डायरेक्ट च्युतिया हा शब्द वापरून एक सहस्त्रांशानेही जमलेला नाही हे पाहिले आणि तुला मिस केले...

मानवी नात्यांमधले कंगोरे, त्यातली गुंतागुंत आणि त्यातून पुढे येणारा आणि अंगावर येणारा कथेमधला ट्विस्ट ही विशालची खासियत. देड इश्किया मध्ये हा ट्विस्ट तितकासा अनपेक्षित राहत नाही. पण त्यातला अजून एक आतला ट्विस्ट मात्र खासच आहे, अगदी नावीन्यपूर्ण. पण तो काहीसा घाईघाईत मांडल्यासारखा वाटतो, सेंसॉरला घाबरून उरकल्यासारखा. देड इश्कियामध्ये नसरुद्दिन शहा सोडून कोणीही नात्यांमधले कंगोरे, त्यातली गुंतागुंत प्रभावीपणे मांडताना दिसत नाही. फक्त खुसखुशीत आणि चपखल बसणारे संवाद हीच काय ती जमेची बाजू. इश्कियामध्ये प्रत्येक पात्र त्याची कथेतली गरज ठसवून जाते. देड इश्किया मध्ये तसे होता नाही. जरी स्टारकास्ट तगडी असली तरीही सगळे आपापली कामे नेमून दिल्यासारखी पार पाडतात. चित्रपटातला व्हिलनही ओके-ओकेच, उप-व्हिलन (इटलवी नावाचे पात्र) शेवटी अजिबात पटत नाही. इश्कियामध्ये जसे तुझ्या अस्तित्वाने सगळ्यांचेच अभिनय खुलून आले होते तसे देड इश्कियामध्ये होत नाही असे जाणवले आणि तुला मिस केले...

पण तुला काही ठिकाणी विसरायला झाले ते विशालने उभा केलेला नवाबी कॅन्व्हास बघताना. पूर्ण लखनवी थाटाचा, नवाबी आणि उर्दू शेरो-शायरीचा एक कैफभरा माहौल विशालने अगदी भन्नाट उभा केला आहे. त्या अनुषंगाने सिनेमात येणारे संगीत ठीक-ठाक. मध्ये मध्ये जुन्या गाण्यांचे काही तुकडे काही सीन्समध्ये ऐकायला मिळतात ते मात्र एकदमच खास! मुशायर्‍यामधली शेरोशायरी ही मस्तच.

तर, हा विशालचा भव्य कॅन्व्हास असलेला पण कथेत शेवटी किंचित कमी झालेला, तगडी स्टारकास्ट असूनही काहीतरी कमी राहिलेला, माधुरीची जादू ओसरली का? असे वाटायला लावणारा आणि ह्या सगळ्यामुळे शेवटी इश्किया बरोबर तुलना करण्यावाचून न राहवला जाणारा देड इश्किया काल पाहिला आणि तुझी खूप खूप आठवण झाली आणि तुला खूप मिस केले...

तुझा,
-(चाहता आणि देड इश्कियावर उतारा म्हणून लगेच इश्किया बघून टाकलेला) सोकाजी

मौजमजाचित्रपटप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

14 Jan 2014 - 3:00 pm | चाणक्य

क्या बात. हे लिखाण आवडले. बाकी मत देड ईश्किया पाहून झाल्यावर सांगत येईल.

(विशाल भारद्वाज चा चहेता) चाणक्य

ब़जरबट्टू's picture

14 Jan 2014 - 3:34 pm | ब़जरबट्टू

असेच म्हणतो...

स्वाती दिनेश's picture

14 Jan 2014 - 3:44 pm | स्वाती दिनेश

पत्र आवडले..

स्वाती

गरजेची खाज मिट्वणारा इश्किया मधे तु किस देउनंही हिस्स करावेसे वाटले न्हवते त्यामुळेे देड इश्कियालाच मिस केले. परंतु हे उघडे पत्र वाचून आता चित्रपट बघावासा वाटत असल्याने बरे झाले तु देड इश्कियाला मिस केलेस. कळावे - तुझ्या लस्ट लेस अभिनयाचा पंखा

रेवती's picture

14 Jan 2014 - 7:01 pm | रेवती

अच्छा! असा आहे तर शिनेमा! नोंद घेतल्या गेली आहे. माधुरी आता थोराड वाटते. तिने वेगळे काम करावे पण हिरवीन म्हणून शोभत नाही आणि ते तिलाही कळतेय हे आपल्याला समजते. असो. मला विद्या जेवढी आवडायला हवी तेवढी आवडते.

प्रसाद१९७१'s picture

14 Jan 2014 - 7:02 pm | प्रसाद१९७१

ना धड विनोदी ना धड चित्रपट परिक्षण , असे काहीतरी झाले आहे.

ह्यात कसला विनोद अपेक्षित होता? :O

-(धडधडीत) सोकाजी

ची मापं विद्याच्या आडून काढ्ताय असे वाटले.

त्याचं काय आहे की विद्या बालन वर पत्र लिहण्या इतके फ़िदा कोणी होत नाही. ती एक सुरेख परंतु लस्ट लेस अभिनेत्री आहे ना.... आता पिच्चर्च डर्टी असेल तर गोष्ट निराळी असते.... इतर वेळी

प्रसाद१९७१'s picture

14 Jan 2014 - 7:12 pm | प्रसाद१९७१

अरे बापरे!! मला वाटले तुम्ही विनोदी लेख लिहायचा प्रयत्न केलाय.
माझेच चुकले तुमचे गंभीर परिक्षण मला थोडे थोडे विनोदी वाटले.

अर्धवटराव's picture

14 Jan 2014 - 7:30 pm | अर्धवटराव

अगदी वास्तव परीक्षण.

>>अभिनयाची कमाल करण्याची मोठी संधी चक्क घालवताना माधुरीला बघितले
- अगदी मोजके चित्रपट सोडल्यास तसंही माधुरी बाईंनी अभिनयाच्या क्षेत्रात फार काहि उत्तुंग केल्याचं बघण्यात नाहि. एक विशिष्ट प्रकारचं सौंदर्य आणि नृत्य याच काय त्या जमेच्या बाजु.

जानभाई आवडला बाकी आपल्याला. तसा तो अभिनेता कधीच निराश करत नाहि म्हणा. शेरोशायरी देखील लाजवाब. 'आपको पेहेले कहि देखा है' ला खालुचं उत्तर तर अगदी जीवघेणं.

'आपको पेहेले कहि देखा है' ला खालुचं उत्तर तर अगदी जीवघेणं.

आणि ते उत्तर देताना लावलेला आवाजातला खर्ज तर त्याहून जीवघेणा!

- (नसरूचाचांचा फॅन) सोकाजी

अगदी मोजके चित्रपट सोडल्यास तसंही माधुरी बाईंनी अभिनयाच्या क्षेत्रात फार काहि उत्तुंग केल्याचं बघण्यात नाहि. एक विशिष्ट प्रकारचं सौंदर्य आणि नृत्य याच काय त्या जमेच्या बाजु.

अगदी सहमत!!!!

बर्फाळलांडगा's picture

15 Jan 2014 - 12:58 pm | बर्फाळलांडगा

पण माधुरी समोर अदा करतअसतानाअभिनय याचा विचार करणे म्हणजे सौदर्य स्पर्धेत स्त्रियांचे बुध्दिमाप करणे इतकेच गैर नाही काय?

चूक. तसे तर मग सुंदर हिरॉईन दिसली की बाकी काही बघूच नये की काय? सन्नी लिऑनसुद्धा कमी सुंदर नाहीये तसे पाहिले तर मग.

बर्फाळलांडगा's picture

15 Jan 2014 - 10:52 pm | बर्फाळलांडगा

सन्नी लिऑनसुद्धा कमी सुंदर नाहीये तसे पाहिले तर मग. ..?

मग करत बसा तुमी तिचे बुध्दिमापन , अन इतरांना तिच्या सौदर्या सोबत खेळुद्या
.. हा.का. ना. का. इतरांना कशाला डोक्याला शॉट , ते पण लिओने साठी?

बॅटमॅन's picture

16 Jan 2014 - 1:11 pm | बॅटमॅन

मुद्दा काय अन बोलताव काय. नुस्ते सौंदर्य पुरेसे नाही असे सांगायचे होते.

दिनेश सायगल's picture

16 Jan 2014 - 1:35 pm | दिनेश सायगल

जाउ द्या हो, लांडग्याला काय गुळाचि चव.

बर्फाळलांडगा's picture

16 Jan 2014 - 1:55 pm | बर्फाळलांडगा

ते वाचा म्हणजे कळेल मी काय बोललो ते. बाकी "अदा" असा शब्द मी वापरला आहे त्याची संदर्भ व्याप्ती आपण लक्षात घेतली नासलेस माझा काय दोष ?

अर्धवटराव आणि बॅटॅच्या ह्या प्रतिसादामुळे हे आठवले. :)

-(भरातल्या माधुरीचा पंखा) सोकाजी

बॅटमॅन's picture

15 Jan 2014 - 2:33 pm | बॅटमॅन

:)

अर्धवटराव's picture

15 Jan 2014 - 8:34 pm | अर्धवटराव

:)

किसन शिंदे's picture

15 Jan 2014 - 10:33 am | किसन शिंदे

मी इश्कियाही पाहीला नाही आणि मी देड इश्कियाही पाहणार नाही. त्या थेरड्या माधुरीला हिरोईनच्या भुमिका करताना काय पाहायचं? ते तर ती अशीही दिसतेच की टिव्हीवर बत्तिश्या दाखवत, झलकमध्ये स्वत:चा शोऑफ करत.

मला तर त्या महागुरू आणि या माधुरीमध्ये आता बरंच साम्य दिसायला लागलंय्...वागण्याच्या बाततीत!

असो. सोकाजीनाना परिक्षण आवडलं. ओमकारा, कमीनेमुळे विशाल भारद्वाज आपला आवडता दिग्दर्शक झालाय.

ओ किसनदादा माधुरी अजून थेरडी वगैरे झालेली नाही हा….

बर्फाळलांडगा's picture

15 Jan 2014 - 11:03 am | बर्फाळलांडगा

आणि एव्हडा द्वेश निर्माण व्हावा इतकीही काही ती वाईट वागत नाही.

किस्ना...आमच्या माधुरीला असे म्हणतोस? अतितीव्र निशेध.. त्रिवार निशेध.. पुन्हापुन्हा निशेध.

अरे एका आख्ख्या पिढीची स्वप्नसुंदरी आहे ती.. अजूनही ती सुंदरच दिसते... एजिंग ग्रेसफुली..

माझीही शॅम्पेन's picture

15 Jan 2014 - 11:18 am | माझीही शॅम्पेन

"अरे एका आख्ख्या पिढीची स्वप्नसुंदरी आहे ती.. अजूनही ती सुंदरच दिसते... एजिंग ग्रेसफुली.."

अगदी +111111111 हेच बोलतो , माधुरी म्हणजे जातिवंत सौदर्य !!!

प्यारे१'s picture

15 Jan 2014 - 12:36 pm | प्यारे१

अरेरे, किसना तू?
माधुरी दिक्षित ने तुझा प्रेमभंग तर केला नाही ना? तिचं वय झालं असेल, ती भांडी घासण्याच्या साबणाची जाहीरात करीत असेल, आणखी काही कारणाने चर्चेत मुद्दाम राहत असेल पण म्हणून थेट 'थेरडी'???

सज्जन माणसा! का उखडला आहेस बरे? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2014 - 3:11 pm | अत्रुप्त आत्मा

@सज्जन माणसा! का उखडला आहेस बरे? >>> असेच म्हणतो! ;)

किसनदेव उखडले..त्यांना अता लोणी (खायला) लावा! ;)
image/jpeg;base64,/9j/4AAQSkZJRgABAQAAAQABAAD/2wCEAAkGBhQSERQUExMWFRUVFxcaFBcVFRoVFBQYFxUXFRgUExMXGyYeFx4jGRQUHy8gJCcpLCwsFR49NTA2NSYrLCkBCQoKDgwOGg8PGiwkHyQpLSwsKiwsLCwsLywpLCksLCksLCwqLCwsLSwtLCksLCksLCwsLCksLCw0LCwsLCkpKf/AABEIAJAAeAMBIgACEQEDEQH/xAAcAAABBAMBAAAAAAAAAAAAAAAEAgMFBgABBwj/xAA7EAACAQIEAwYEAgoCAwEAAAABAgMAEQQSITEFQVEGEyJhcYEHMpGhscEUIzNCcpLR4fDxUmJDotIW/8QAGgEAAwEBAQEAAAAAAAAAAAAAAAIDAQQGBf/EADARAAIBAgUCAQsFAAAAAAAAAAABAgMRBBIhMUFRoTIFExQiUmGBkdHh8CNCcbHx/9oADAMBAAIRAxEAPwDk83EFVrRJmNz4n8V/4RSRiJH1aTL5DUnyFtqlccGDl+4TW5BAzk+VgBamcLPiHvdXCi2ioVH0GppIsjKSSuNz4hkIAQs5G52A9P8AVGdnZ3jlRne5zq1zysCp9rE0jB4oRTxtPhTLFc50zZGccyMp8JFwRfeu9cA7GcOzR4qHCpdgGRiCbXFwQGNgadMIxzK5ReJ9nMbOzvDhJcjxouZiq5mDlmIVmBAtbeoLE4eWExwzxPGzS2tILBizJ4Vb5W35E16IMpJOlD4qdCCr2I6EAj6Gse1hvNrg4ti+NySvNJKpU4dUQB3zeNnZgR0GZU+lRUmJaKOLLowyt1a4Ikv63aK38NWP4ncEWJojBGEhxMgExQaLIBlBI5AqWPrHVR4rj7FGtpfUaaKQWN77izKPYVCNNR04t+d2wlnd7bln4mIZMOMS65g+Ij/Scjslo792ZIgPEEZXOYdVFQPa+Yyzu+Tu47kwqDe3hRCdNriNCR6VEydoWVWiVginwslgL3O5J1PWi1wuJnD2jDRQqCXGmUNZfEOZJvz2U1OEXCzf50K1XJ5cnTX3v3fEEyMQ29rK29738LW/9DRM+ZxaRjlPyG+oVPC2VRt8y+tAqpUWa6DOyPtdXF1yWJ/5D6A0lJiuJjRtmj5bePp7j71drkJu4ZipCqKS2shjBsSR+rJF7+d61ITaIgjkDsN2Aset600Z7kDbupLA8iFcAgfb6U0v7WOxuWKADzzGw+tqzgFZSDeHY9YpZXgJBdmUg2ZwGbUeL5RWVI8b+G78PU4hnWUiQd6qgpljdvmQkkvYnXasrKOIo1FeMc3F7dOtzjrYOq5XUvm/oVTFxjxB5XWx3U6C50B8qGw+DG/6SreRYj8TRsUuYqqgICLNe5AyiwBHO96jcVcftMOGHVDY+xF/uKZX2OjcfcZmWNXiVnIUEsSLk2BZ7WUa7616dwaCFUjGyKq6C3yi1/LavPHwz7IjG45CoLQwMsk4cAWAuUUnZszDboDXomYg35VsnYrSgrMlInBGlM4uAEaj160Jgp9TejpiGFMmpK5kouLI3iHB454Xgk1RxYnmvRh0IOvtXmrtdw2eLEmGXwvGANrK3Rk6qRtvbWvUKqT6iub/ABT7J4rFFJsMokKRtHkFu8Jdr5wWsLD1504j1ZxmTCszJsWNlKEBmZtlFhbcem1XjgXC8W4mw4jZXGQ4kHEdyTHqCmXKyNmBbxcutWr/APAcQxKojCDDQxxskaKTnsQAVbJtmKgk3NrUxgfhbxKKZpe8w8pZStnZ/lNhoSDyuPeuaaqSi7JfcrBQT3/w5vxZnLTd4QJc3itsZB4WYepUm/n50JxCWxjZRbwWGnMEMDfyq9cS+DfEF8aLE2liscpL6aAguADy0vyqlcRwUkDrDiYnjYFgVkFjYgeNQNGAtuCedXS2EUm9ySkFhiFAyg5HFuevK9BzqGlAuRoCCDYix3FqIguWQMRcwgEjXRDY267imxh/16K2ufwb6rdgL676GprQ2D2Ljxj4iQ8ThSOzQSq3jUnMrgD9xhbML8iBWqhcf2bThzZe8Ld8gIMi5e7yOACSORLWv5VlRo4eKh+jsTlSzScpNp9P4KjhHdQy5iNSbHlrrb1H0rZ4e00wjgaRpH+WNWzE2F7Ak66A0vAcIxOIB7uCR1vowGVPXO1gTvV8+G/w6nONinl7oR4ZrkBszM+U5E00BBs2/Kui8b2vqOqc7ZradjpXw+7NtgcBHBIbyktJJbkzm5Uemg9qnXhvT0gpsXoZVabDLREC9E4ScHQ0kmmzHalXqvQ1+stSRaLS/PlQrnUGlQ4sjzFPSQBhcfSrJkWjP0noKQcX5UOc17dKUdOdYYPCceYpniWAjxCGOaNJUP7rAHfp0rFF6XkHWg04t217AnAOskF2wpzqSfE8GcDwMTqyllFm9jVW4Tj1TEQzEXEbK7Lb5gASQG5E2r0lPgxKjRyKGRgVYHYg7g1wLi3w4xmAkxGSN5oERnSYW+QaAML3zgbgVjimn7zErO6AuN9opcRKZcQqq0raRltUjFsqpYeLQg+rVlRGB4kYpo3gylogBGW8Vi+lwvXXespVJwSjFKw6Tlqi84/HySaO7MDyv4f5RpVg+GHEWWSWALdGHeDTVWFlb6jL/LVckA150/w3jc2FzGEqC4AYlMzaG4A18zp5182lNRkmz1WKpOpRcYo7Fcdda0ag+C8UdktiYxDIFQ3ZgFfNfVQTcHTUHqKl4ZAx0YGx1sQbHobV9K9zyzVnYcyUsR3FOZBSu7rbBcYRaScWFO5H4e9KxDgaCgCKzYNwiFrkjf3ouHCjyoSAc6OjanEZsoNgKUMLS81bMtqAFZLU3L8rDqK2ZhzuKamfQH1rTCm8U+HGHkPeJEmZSLAixPlnHXoayrNhpb/WtVJ0k+X8zojiJR4T+COOxI8jZY0Z2vsq5jqbC/T3q9dlewLRSJiMQ3iXVIlFwp5M7cyNdBpVi7N8HjhiyKArX/WFSTmb+I62vewO16k5hYE3uBU6eHjHV7nZivKM6t4Q0XdlZ7Y9nP0uLKAmYG6s4vl62PK/5VAdjeBY3DTtGsQEBb9aSBkfw6NGfmuRYX1Ghroy+LlpSu/yi1qq6acs3JxwxE403T4f5cajw7dLWpcug3plsQx56UlI6exARJhcx3NIXBAHbbrRia0txWZUbcFWG1PoKy162FtWiihWzSRSgaAGpG5GhZZQB/mlEvF0qNxiE2A60AkOYVL69aygZcYy+Eb/API7fSt0XRTIw/A4tCGNwGzEML6kg/59aNxYYp4LE3Gh0uOYvVN7Ek4lpp5N1bultcKxADGS3PwlRr0NXSQ6W8qWLzK41WKhOyBcPjWe/KxseoI0pxn019vOo5InUCzDXy111oqFbb6/50oFdgkMApJFjSYMQCtyaGxKX02vWRocoHKmFsiRjApUpvQsIyjqKJjkB50CiUpVqxRS7b0AMttSYzatrWwtAGNQ80OhooGkPHQBU85EhElr3uBfS19COtZU/Phg24GnUX05/UVlGUsqpA/DWYtgs7AKWll0H8ZBPvarRPINaqHY/jEOHgWGQkEFvFk8JuxOupINjVjTFRyAd26v6G9TpVITSsylejOE3mTWoPBxEhshG2inqKOE/T7UBjsKCd7Pyt19KbjxttHFm2/0ae9txMqewVM7X608q9aFExvT0ZJNaI0Fte2lKsNL00JwBvTJx6ltNfStFs2HA2HWtJjbm1Btibc6xZwNt6AsHKpFOFaEGMsNTSYeJXOm1FjA1VJrJdBvUdiePIv7w05L4j9qi8V2vIGiAf8AZ/8A5X8yKlKpCO7LQw9Sp4UTMhNxb/PasqhcR7aqPmcN/wBVIA/lH5msqfpMeEdS8nVOWiqRcTkB3Db/ADD86Ji7QqPni+9/pfWo9pfFYjT71soORBr5eVco9M2iwQdpkYWLldrBibexqVi7Sm4OeNwNr2zD7iqHJh9b/SmDH/n96pFyXhbIzoU5bxOqw9oyNcgPox/oaeXtaoGsX0f+q1yK5GxI9CRSlx0g2kf+Y1XztX2uxyvA0HvH+/qdWk7VRH5o29Mwt+FbbtNHl8MZt/EPyFcp/TZD/wCR7etad5SP2r/zGtVSrzLsK8FQW0X8/udQi7SBjog8vET+ArT9obb2X1/uRXLCr83Y+rGmjhgTe32v970Zqnt9jPRaS/Z3OlYjtnH+9KPYgfheorFduIuWZvrb76VTRGBsKSGF9qLN+JtlFShHwqxYZu2sjXCoB5k3+wtURi+Ju5OZvXL4fwoWwve1azXOgrbJcDpWH4pwNv61lMBhesoMsiUkIPS9/rTMUxU2PT29ulQMfaBgbSqSL/Mo191/pUnDxIONCGH1I/OiVJrcSniYVNE/gS6oDzpqXDkUGZr7G3SkJipAbknz6e1LkKqbXISYNLge9IMVYcde+9qHfEXPWjKzVPqOMlqwN5020x6H8vpSml8qyw+ZGmrQesZutIb1p0hW0LvSGcU0bj/VMvKaZRJSqJBRkptpDQkmJtvoPOgZOJg6Lc+diB/enjTbOepiYRJXvtfesqOglJIv100rKuqXU5vSm9j/2Q==

प्यारे१'s picture

15 Jan 2014 - 3:45 pm | प्यारे१

ताक घुसळून झालं काय? ;)
चला तर मग!
बसा किसनाच्या बाजूला, तुम्हाला पण (खायला)लावूया. =))

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2014 - 7:25 am | अत्रुप्त आत्मा

:p

मराठे's picture

15 Jan 2014 - 10:58 pm | मराठे

>> त्या थेरड्या माधुरीला

आई ग्गं ! वाचवलं नाही पुढे.

शिद's picture

16 Jan 2014 - 2:04 am | शिद

. त्या थेरड्या माधुरीला हिरोईनच्या भुमिका करताना काय पाहाय

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2014 - 10:57 am | ज्ञानोबाचे पैजार

माधुरी बद्दल असलं काही खपवुन घेतल जाणार नाही. मुडद्यांच्या राशी लागतील रक्ताचे पाट वहातील.
त्यातही माधुरी आणि महागुरुंची तुलना म्हणजे उचलला की बोर्ड आणि टंकला प्रतिसाद असे वाटले.

डेढ इष्कीया मधे सुध्दा सुंदर दिसण्याचे काम माधुरीने चोख केले आहे. आदाकारीत तर तिचा हात धरणारी दुसरी कोणी नाही. नसिररुद्दीन शहाला जेव्हा ती "इफ्तीकार" म्हणुन हाक मारते तेव्हा आपल्या अंगावरुनही मोरपिस फिरते.

"आपको पहेले कही देखा है" असे म्हणताना तिचे डोळे सगळे बोलून जातात. त्यावर नसिर चे उत्तरही लाजवाब आहे. पूढे काय होणार याची कल्पना या एका संवादातून येते. नसीर बद्दल तर काही बोलायला नकोच तो उत्तम अभिनेता आहे.

सिनेमातली गाणी पण चांगली आहेत. "हमरी अटरीया पे आजा रे सावरीया" चित्रीकरण सुरेख आहे.

"जबां जले है" मधे नसीर भाव खाउन जातो. राहत फते अली खान ने गाणे फारच सुरेख गायले आहे.

सबटायटल सकट बघायला मिळाला तर एकदा तरी जरुर बघावा असा सिनेमा आहे. सबटायटल अशा साठी की काहि उर्दु शब्द डोक्यावरुन जातात. "आप बादा पानी के साथ लोगे या सोडे के साथ" हा डायलॉग एक सेकंद उशीरा समजला.

पण त्यातला अजून एक आतला ट्विस्ट मात्र खासच आहे, अगदी नावीन्यपूर्ण. पण तो काहीसा घाईघाईत मांडल्यासारखा वाटतो, सेंसॉरला घाबरून उरकल्यासारखा.

याच्याशी शंभरटक्के सहमत.

(विद्या आणि माधुरी दोघी जबरदस्त आवडणारा,)

पैसा's picture

15 Jan 2014 - 1:29 pm | पैसा

चित्रपटाशी संबंधित नावांसाठी एकदा बघायला हरकत नाही असं वाटतंय. माधुरीला नायिका म्हणून घेण्याबाबत तुम्हा लोकांचा आक्षेप दिसतोय, पण नासिरुद्दिनबरोबर नायिका म्हणून आणखी कोणाचा विचार करणार होता? मध्यमवयीन बेगमच्या भूमिकेसाठी हिंदीत सध्या तरी आणखी कोणी आहे असं वाटत नाही.

माधुरीला थेरडी म्हणणं अजिबात पटलं नाही. तिच्या अभिनयावर टीका केली तर प्रॉब्लेम नाही. पण कोणत्याही नटाचा पडद्यावरचा गेट अप्/दिसणं हे त्याच्या/तिच्या हातात असत नाही. दिग्दर्शक, मेकअप करणारा आणि फोटोग्राफर यांनी माधुरीसारखी नायिका उपलब्ध असताना सोन्यासारखी संधी वाया दवडली असं म्हणा हवं तर.

तिने टीव्ही कार्यक्रमांमधे काम करण्याबद्दलही आक्षेप कळला नाही. ती सचिन (महागुरूप्रमाणे) कोणत्याही कार्यक्रमाची निर्माती असल्याचं ऐकलं नाही. लोकांना आवडतं म्हणून चॅनेलवाले/जाहिरातदार तिला बोलावतात. ज्यांचे पैसे जातात ते काहीतरी अभ्यास केल्याशिवाय नुसत्या नावासाठी कोणाला बोलावतील हे शक्य वाटत नाही.

तुमचा अभिषेक's picture

15 Jan 2014 - 10:55 pm | तुमचा अभिषेक

माधुरी हि काही स्मिता पाटील नव्हे जे तिच्याकडून अभिनयक्षेत्रात अवाजवी अपेक्षा ठेवल्या जाव्यात. चित्रपट पाहिला नाही, पण फारशी इच्छाही नाही कारण हेच स्टारकास्ट. माधुरी असल्या चित्रपटांत अन असल्या भुमिकेत बघवणार नाही हे प्रामाणिक मत.. मात्र हम आपके है कौन सारख्या चित्रपटांत तिला तोड नाही या बाबत दुमत नसावे..

विद्या बालन बद्दल बोलायचे झाल्यास परीणीता मध्ये ती खूप सुंदर दिसली हे बर्‍याच मध्यमवयीन बायकांचे मत आहे, मला मात्र ती मुन्नाभाई मध्ये काही दृष्यांत जास्त आवडली. पण आपली अगदीच हॉट फेवरेट अश्यातला भाग नाही..

लेखाबद्दल बोलायचे झाल्यास विद्या बालनच्या प्रेमातून आला असेल तर आवडला, माधुरीद्वेषातून आला असेल (शक्यता कमीय) तर नावडला :)

माधुरीद्वेषातून आला असेल (शक्यता कमीय) तर नावडला

छे छे, द्वेष आणि माधुरीचा? नक्कीच नाही. :)

- (भरातल्या माधुरीचा पंखा) सोकाजी

अर्धवटराव's picture

16 Jan 2014 - 1:34 am | अर्धवटराव

>>(भरातल्या माधुरीचा पंखा)
-- हे काय चाललय =))

प्यारे१'s picture

16 Jan 2014 - 2:00 am | प्यारे१

त्यांना कॉकटेल असो की इतर काही 'भरलेलं' आवडत असावं.

बॅटमॅन's picture

16 Jan 2014 - 1:12 pm | बॅटमॅन

भरातल्या माधुरीचा पंखा

आमीपण आमीपण!!!!

'देड इश्किया'चं काही माहिती नाही, पण सोत्रिबुवांचं पत्र तुफान आवडलं.
विद्या बालनच्या सौंदर्याचं काही माहिती नाही, पण 'एक कहानी' इ. चित्रपटांतून तिने जी अभिव्यक्ती केलीय, त्याला जवाब नाही !
माधुरीच्या अभिनयक्षमतेचं काही माहिती नाही, पण माधुरीनं वयाच्या पॅरलल दिसण्याचा प्रयत्न केल्यास अजूनही आकर्षक दिसते....!

पिलीयन रायडर's picture

16 Jan 2014 - 1:31 pm | पिलीयन रायडर

पिक्चर कसा का असेना.. मला "दे ढिश्क्यांऊ" बघायची भयंकर इच्छा आहे.. का ते माहित नाही..

मोग्याम्बो's picture

17 Jan 2014 - 6:04 pm | मोग्याम्बो

विशाल भारद्वाज हा या चित्रपटाचा दिग्दर्शक नाही. अभिषेक चौबे हा इसम दिग्दर्शक आहे.

सुहास..'s picture

18 Jan 2014 - 11:07 am | सुहास..

लेख आवडला !!

ईष्किया पाहिला होता, सरप्राईज ट्युनिंगमुळे आणि विद्या च्या अभिनयामुळे आवडला होता ..

माधुरी दिक्षीत तेव्हा ही काही आवडत नव्हती तर आता पार वय झाल्यावर काय आवडणार !!

पहिल्यापासुन श्रीदेवी चा फॅन

व्हय व्हय. वाश्या एकदम राइट्ट बोलरैला है.
श्रीदेवी भारीच. म्य़ा पण फ्यान हाय.
तिच्यापुढे दीक्षित एकदम बोगस. मोठे बच्चन म्हणा नाय तर माधुरी एककाळ असेल गाजवला पण सध्याचा त्यांचा कायम लाइमलाइटचा हव्यास आवडेना झालाय. :-(.
.
.
माधुरीच्या चाहत्यानी हां प्रतिसाद मनावर घेउ नये. आम्हाला कीर्ति रेड्डी, रिचा पल्लोद, रिया सेन असल्या हिरविनी बी आवडल्यात. ;-)

माधुरी केवळ वय वाढलाय म्हणून नाही तर तिने खरच अभिनयाच्या क्षेत्रात काही फार केलं नाहीये म्हणून मला आवडत नाही. तिचे without makeup चे फोटो बघा . काय दिसते. ईईईईई . भरमसाठ makeup करून कृत्रिम smile चेहऱ्यावर आणून ती अभिनय करत असते. नृत्याच्या बाबतीतही choreographer ने सांगितलाय तेवढाच करते. तिचा स्वतच असं काही कर्तुत्व नाही त्यात.... विद्या बालन समोर तर ती एकदमच फिकी वाटते .

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2014 - 7:59 pm | टवाळ कार्टा

नृत्याच्या बाबतीतही choreographer ने सांगितलाय तेवढाच करते. तिचा स्वतच असं काही कर्तुत्व नाही त्यात

आयला...डांस मधे माधुरी = गोविंदा + ह्रितिक आहे