२०१३ च्या सरत्या संध्याकाळी २०१४ ह्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे बुलफ्रॉग (Bullfrog)
पार्श्वभूमी:
३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी एक पोटंट आणि तितकेच दिलखेचक व आकर्षक असलेले हे बुलफ्रॉग नावावरून 'बैलाचा आव आणलेली बेडकी' असे वाटणे सहाजिक आहे; पण दिसते तसे नसते ह्या उक्तीला सार्थ करणारे हे कॉकटेल आहे, साहित्यावरून ते किती जहाल असावे ह्याची कल्पना येईल.
ह्या वर्षाची आजची शेवटची रात्र एकदम मादक होऊन येणारे इंग्रजी नववर्ष आपणा सर्वांना समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही इश्वरचरणी प्रार्थना.
प्रकार
रेड-बुल बेस्ड कॉकटेल
साहित्य
व्हाइट रम
१ औस (३० मिली)
वोडका
१ औस (३० मिली)
जीन
१ औस (३० मिली)
टकीला
१ औस (३० मिली)
ब्लु कुरास्सो
१ औस (३० मिली)
रेड बुल
टॉप-अप करण्यासाठी
मोसंबी रस (ऑप्शनल)
१० मिली
बर्फ
ग्लास
टम्बलर किंवा मॉकटेल ग्लास
कृती:
ग्लासमध्ये 2/3 बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, वोडका, जीन आणि टकीला ओतून घ्या.
आता बारस्पूनने सर्व घटक एकजीव होतील असे स्टर्र करुन घ्या. आता त्यात ब्लु कुरास्सो हळूवारपणे ओतून घ्या.
आता रेड-बुल ओतून ग्लास टॉप-अप करून घ्या.
आता सजावटीसाठी ग्लासवर लिंबाचा काप लावून घ्या.
नववर्षाच्या स्वागतासाठी जहाल आणि मादक 'बुलफ्रॉग' तयार आहे :)
सर्वाँना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
31 Dec 2013 - 5:25 pm | मुक्त विहारि
वाटच पहात होतो.
दिल्या वचनाला जागलांत.
आता मी सुखाने कॉकटेल वाचतो.
31 Dec 2013 - 5:29 pm | जेपी
एवढ जहाल कॉकटेल . ईमान उडाल तर पुढच्या वर्षीच खाली येईल . :-)
रेडबुलच्या ऐवजी पाणी ट्राय केल तर चालेल का ?
(सोत्री फॅन ) तथास्तु
31 Dec 2013 - 5:38 pm | वसईचे किल्लेदार
व्हाइट रम, वोडका, जीन, टकीला, ब्लु कुरास्सो ... चला आता एव्ह्ढं सग्ग्ळं शोधणं आलं.
तुम्हालाहि इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
1 Jan 2014 - 12:08 am | प्रचेतस
जबरी.
काय देखणी दिसतेय कलाकृती.
1 Jan 2014 - 12:30 am | गणपा
सोकाजी आता असं लांबनं लांबनं पहाणं नको.
एकदा आपला कट्टा झालाच पाहिजे.
हॅप्पी न्यु ईयर.
1 Jan 2014 - 12:59 am | अत्रुप्त आत्मा
बुल२०१४फ्रॉग
1 Jan 2014 - 1:39 am | रेवती
पेयाचे नाव विचित्र असले तरी रंग छान आहे. यातील साहित्य भारी आहे. ;)
1 Jan 2014 - 9:00 am | अमेय६३७७
भन्नाट. नववर्ष शुभेच्छा
1 Jan 2014 - 7:50 pm | सुहास..
सोक्या$$$$$$$$$$
1 Jan 2014 - 9:00 pm | भटक्य आणि उनाड
इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
साहित्य भारी आहे.. जहाल कॉकटेल दिसतय...
3 Jan 2014 - 1:48 am | विनोद१८
नवीन वर्षाच्या शुभेछा नाना.
गणप्याशी सहमत.. निदान एक तरी कट्टा झालाच पाहिजे.
(सुराभुषण सो.नाना पन्खा) विनोद१८
3 Jan 2014 - 2:49 pm | सूड
आता मराठी नववर्षाच्या सुरुवातीला एक मॉकटेल येऊ द्या!!
11 Jan 2014 - 4:56 pm | पैसा
केवळ फोटो बघण्यासाठी धागा उघडला! नेहमीप्रमाणे लै भारी फोटो!
11 Jan 2014 - 4:59 pm | प्यारे१
आमी काय म्हन्लो का???????
बळंच?
सोकाजीनाना, एक मॉकटेल टाका वो आमच्या सार्क्यांसाटी!
(आमी बी 'गप' आस्तो हल्ली)