सक्काळच्यान दादू कावलावता. तंबाकू नाय का च्या नाय.
कळकाच्या पाटया वळू वळून बोटं पाक सोलवटली व्हती.
पाटलाच्या वाड्यावनं सांगावा आलावता. उद्याच्याला येरवाळी वाजान्त्री पायजेल.
आता मानसं हाताशी नायती तर कोन वाजीवनार? गाडवं?
मायला . . गाडाव म्हनल्यावर ध्येनात आलं. . हौसा कुटाय?
मास्तरच्या घरला इटा लगीच पायजील हाईत. गाडवं मोकळी हुबी र्हाऊन जमंल व्हय ?
यो म्हादा बी आयकंना झालाय.. हितं बा कामानं मरतुया आन ह्यो साळंत जातुया !
भेटला की गुर्जीला इचार्तूच आता. बाबारं, पोरगं प्वाट भरनार का शिक्शान करनार ?
--------
म्हादा आला. बाला बगून हाराकलाच.
दादा . . म्या सातवी पास झालो!
'' झालास न्हवं ? झ्याक! आता शाळा बास.
उद्यापस्नं सुदरा, गाडवं संबळा ! ''
म्हादाचं त्वांड चिमनीयवडं झालं !
प्रतिक्रिया
26 Dec 2013 - 10:26 pm | यसवायजी
बिचारा म्हादा..
पण दोष ना कुणाचा.. हातावरचं पोट.. चालायचंच. :(
कथा छान झालीय.
26 Dec 2013 - 10:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
याला जीवन ऐसे नाव ! दुर्दैवी पण सत्य !!
26 Dec 2013 - 10:33 pm | आतिवास
सहमत.
10 Apr 2015 - 4:14 pm | पॉइंट ब्लँक
असं म्हणून कसं चालंल? हे बदलायला पाहिजे. चक्र कुठ तरी थांबायला नको का?
27 Dec 2013 - 1:55 am | अभ्या..
मस्त जमलीय.
शुभेच्छा.
27 Dec 2013 - 11:24 am | जेपी
मस्त .
10 Apr 2015 - 2:54 pm | एक एकटा एकटाच
दुर्दैवी.....
6 Jun 2015 - 10:29 am | ganeshpavale
याला जीवन ऐसे नाव !
6 Jun 2015 - 12:25 pm | अभिरुप
माणसाच्या दुर्दैवाचं विदारक आणि परिणामकारक चित्रण......
पण हे चित्र सुद्धा बदलेल हे निश्चित कारण काळ कधीच सारखा नसतो.
6 Jun 2015 - 12:43 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर आणि मनाला थेट भिडणारी शतशब्द कथा. आवडली. भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरीही ही परिस्थिती पाहून विशेष वाईट वाटते.