मी मध्यंतरी सोलापुरला जाउन आलो.
तिथे फिरायला जाण्यासारख एकच ठिकाण आहे. ते म्हणजे सिद्धेश्वर मंदीर.
ह्या मंदीराची खासियत म्हणजे हे एका तलावाच्या मध्येच आहे. :)
चारी बाजुनी पाणी आणि मध्येच मंदीर. एकदम मस्त वाटत.
ही मी काढलेली तिथली काही प्रकाशचित्रे.
हा त्या तलावाचा एक व्ह्यु. ह्या तलावात आधी मासे देखील दिसायचे बरेच.
आता दिसत नाहीत. बहुद्धा जाळ टाकुन पकडतात. :(
हा त्या मंदीरात जायचा रस्ता. दोन्ही बाजुने पाणी असत.
हा त्या मंदिराच्या आवारातुन दिसणारा एक भुइकोट किल्ला. ह्याच रुपांतर आता एका बगीच्यात केल आहे.
हे मुख्य मंदिर. मंदिराच आवार मोठ आहे. चारी बाजुनी पाणी असल्याने मस्त आल्हाददायक हवा असते. शिवाय तिथे बसण्याची सोय देखील आहे.
हे त्यावेळी तिथुन दिसलेल इन्द्रधनुष्य. तितकस शार्प नव्हत. थोडस पुसट होत.
ही सोलापुर महानगर पालिकेची जुनी इमारत. आता बाजुलाच एक नवीन इमारत आहे त्यात सगळ कामकाज चालत.
म्हणुन ही इमारत मुळचीच देखणी अजुनही देखणी राहिली आहे. ही त्या सिद्धेश्वर मन्दिराच्या जवळच आहे.
खरतर ह्या इमारतीचे अजुन काही ऍन्गल मध्ये फोटो काढले पाहिजेत. पण ते शक्य नाही झाल.
माझ्या पहिल्याच सोलापुर वारी नंतर मी माझ्या मित्रमैत्रिणीना बोललो होतो. तुमच्या अख्ख्या सोलापुरात मला दोनच गोष्टी आवडल्या.
आणि त्या दोन्ही पळवुन कोल्हापुरात न्याव्याशा वाटल्या.
एक सिद्धेश्वर मंदिर आणि दुसरी महानगरपालिकेची देखणी वास्तु. :)
अजुन काही फोटो आहेत. ते खालील दुव्यावर पहा.
http://picasaweb.google.com/zakasrao/SolapurSiddheshvarTemple?authkey=-R...
दुवा बदलुन दिला आहे.
अवांतर :
ह्या मंदिराची अजुन माहिती सोलापुरवासी मिपाकर श्री सचीनजी किंवा डॉन हे देतील.
प्रतिक्रिया
25 Sep 2008 - 10:04 pm | सखाराम_गटणे™
मस्त आहे,
मी नक्कीच सोलापुरला जाईन.
मला भटकायची हौस आहे.
मंदीराचे नक्षीकाम विषेश सुरेख आहे.
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
25 Sep 2008 - 10:12 pm | विसोबा खेचर
सोलापूरची सुंदर सचित्र सफर...
धन्यवाद रे झकासराव!
आपला,
(थंडीत सोलापुरी चादरी पांघरणारा) तात्या.
25 Sep 2008 - 11:07 pm | प्राजु
सोलापूरी शेंगदाण्याच्या चटणीचा फोटो नाही का हो मिळाला??
मस्त असते एकदम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Sep 2008 - 11:27 pm | भाग्यश्री
वा काय सुंदर फोटो आहेत..मनपाची इमारत तर अशक्य सुंदर दिसतीय!
बर झालं झकास सांगितलंस, मला या दोन्ही गोष्टी माहीत नव्हत्या..
(फक्त एक काम कर ना, त्या कॅप्शन्स फोटोच्या वर देत जा.. खाली लिहील्या की कन्फ्युजन होतं,नक्की कुठल्या फोटोसाठी आहे.. असं मला वाटलं.. )
25 Sep 2008 - 11:39 pm | प्रियाली
फोटो खूप आवडले. विशेषतः तलाव स्वच्छ वाटला त्यामुळे अधिकच आवडला.
सोलापूरला माडाची एवढी झाडं आहेत हे वाटले नव्हते. माझ्यामते माड फक्त कोकणात. ;)
असो, आणखी फोटो पहायचे होते पण दुवा चालत नाही असे वाटते.
25 Sep 2008 - 11:45 pm | झकासराव
दुवा बदलुन दिला आहे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
26 Sep 2008 - 12:13 am | प्रियाली
आता फोटो दिसले. मोठ्या स्वरूपात आणखी चांगले दिसतात.
काही प्रश्न -
१. मंदिरातील समाधी कोणाची?
२. मंदिर किती जुने आहे? सिद्धेश्वर म्हणजे शंकराचे आहे का?
३. तळ्यातील पक्षी कोणता? बदकासारखा असला तरी बदकासारखी चोच दिसली नाही. (ह्याचे उत्तर कोणा पक्षीप्रेम्याला ;) माहित असेल तरी उत्तम)
26 Sep 2008 - 1:17 pm | महेश हतोळकर
हा आहे कूट (Coot). हा बदकाच्या वर्गातला पक्षी आपल्या कडे भरपूर सापडतो.
26 Sep 2008 - 1:20 pm | महेश हतोळकर
हा आहे कूट (Coot). हा बदकाच्या वर्गातला पक्षी आपल्या कडे भरपूर सापडतो.
26 Sep 2008 - 11:29 am | ऋषिकेश
असेच म्हणतो
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
26 Sep 2008 - 6:29 am | गणा मास्तर
सोलापुरला पाणीपुरी पण वेगळीच बनवतात कांद्याची पात टाकुन
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
26 Sep 2008 - 6:35 am | मुक्तसुनीत
..सोलापूरची दाण्याची चटणी खाल्ली का नाही ? :-)
26 Sep 2008 - 7:03 am | शितल
झकासराव,
फोटो आवडले
:)
अजुन सोलापुरला गेले नाही. :(
पण गेल्यावर सिध्देश्वर मंदीरात नक्की जाईन :)
26 Sep 2008 - 7:50 am | अनिरुध्द
काय राव! फोटू लईच झकास. पन सोलापूरची शेंगाचटणी कुटं बी दिसली न्हाय व्हय तुमास्नी. क्यामेरा मारला आसता चटणीवर तर लई छान झालं आसतं बगा. तेवडंच बगीतल्याचं समाधान झालं आस्तं. मी बी ह्ये सम्दं बगीतलं हाये.
देऊळ तर खूपच छान आहे.
26 Sep 2008 - 8:05 am | एकलव्य
आणि
मजा करा लेको!
सोलापूर चित्रे आवडली. येथील रेल्वेस्टेशनही स्वच्छ आणि छान आहे बरं का!
26 Sep 2008 - 10:14 am | भाग्यश्री
=P~ =P~
26 Sep 2008 - 9:07 am | जैनाचं कार्ट (not verified)
झकासराव फोटो आवडले !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
26 Sep 2008 - 11:23 am | विसुनाना
छान फोटो. सोलापूरवारीची आठवण झाली.
सोलापूरची 'भय्याची भेळ'ही भलतीच प्रसिद्ध आणि सोलापूरकरांच्या अभिमानाचा विषय आहे हो...
अगदी असेच काही फोटो माझ्या संग्रही आहेत -
हे किल्ल्यातले एक गवाक्ष -
सोलापूर किल्ल्याचे पॅनोरामिक प्रकाशचित्र
26 Sep 2008 - 11:36 am | मनस्वी
मी सिद्धेश्वर मंदिर पाहिलं आहे. खूपच सुंदर आहे.
सगळे फोटो मस्त आले आहेत.
धन्यवाद झकासराव.
मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
26 Sep 2008 - 12:35 pm | स्वाती दिनेश
फोटो आवडले, अनेक अनेक वर्षांपूर्वी सोलापूरला गेले होते त्या आठवणी ताज्या झाल्या.
स्वाती
26 Sep 2008 - 3:31 pm | जयमोल
सोलापूरला , मकर सन्क्रान्ती च्या आधी १० दिवस एक जत्रा असते. तिला गड्ड्याची जत्रा म्हणतात. सुखद थन्डी , चवदार हुरडा आणी जत्रेचा माहोल एकदम झकास.
प्रियालीजी , सिद्धेश्वर म्हणजे शन्करच. सोलापुरात लिन्गायत समाजाचे खूप लोक आहेत , त्यान्चे दैवत. या लिन्गायत समाजाने सोलापूरच्या आर्थिक , सामजिक आणी औद्योगिक प्रगतीला दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे.
एकलव्यसाहेबान्नी धाड्लेली चटणी पाहूनच हिरड्यान्तून पाव लिटर लाळ पाझरली. सोलापूर रेल्वे स्टेशन हे गेली अनेक वर्षे मध्य रेल्वे चा स्वच्छ स्थानक पुरस्कार पटकावतेय. दक्शिणेहून आलेल्या अनेक लाम्ब पल्ल्याच्या गाड्यान्चे डबे देखील दहा , पन्धरा मिनिटान्च्या अवधीत फलटावरच ( यार्डात न नेता) चकाचक करण्याची सोय ही या स्टेशनात आहे
सोलापूर हून जवळच नळदुर्ग नामे एक भुईकोट किल्लाही पहाण्या सारखा आहे. माळढोक पक्ष्यान्चे अभयरण्य , तुळजपूर , गाणगापूर अशी ३/४ दिवसान्ची सहल करण्यासाठी सोलापूर हा अत्यन्त सोयीचा " बेस-क्याम्प" आहे. जाते वेळी ( अथवा परततान) कुर्डुवाडी ठेस्नास वाट वाकडी करून पन्ढरीच्या विठूराया चे " रूप पाहता लोचनी " करता येते ."पुलगम" च्या चादरी , सतरन्ज्या आणी टॉवेल / न्यापकीन सर्वत्र प्रसिद्ध आहेत.
जगाच्या पाठीवर इतरत्र कोठेही न मिळणारा, दोसाई , आम्बोळी, उतप्पा ह्यान्च्या सारखा , तरीही ह्या सर्वान पेक्शा वेगळा " द्वाशी " नावाचा एक पदार्थ ही देखिल या शहराची खासियत.
अवान्तर - किल्ल्यासमोरच्या बागेत एक चट्णी पाव नामे (भाग्यश्रीन्च्या शब्दात . . ) अशक्य चवीचा पदार्थ मिळतो. कुणी खाल्लय का तो ?
26 Sep 2008 - 3:48 pm | लिखाळ
सोलापूरचे दर्शन छान वाटले. प्रतिसादांतूनही माहिती मिळाली.
(असे निळे आकाश आणि पांढरे ढग पाहिले की बरे वाटते.)
--लिखाळ.
26 Sep 2008 - 4:04 pm | अनिल हटेला
वाह झकास राव !!
मंदीराचे अजुनही फोटो टाकायला हवे होते अस वाटतये !!
कारण मी देखिल गेलोये सिद्धेश्वरा च्या दर्शनाला !!
कुणाही मित्राच लांबच लग्न कधी सोडत नव्हतो !!
कारण तेवढीच भटकंती आणी नवे नवे डाव बघायची ऑफीशीयल जागा !!
असो !!!
म न पा ची देखणी इमारत नव्हती पाह्यली ..
पण खरच सुंदर आहे !!
धन्यवाद !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
26 Sep 2008 - 4:12 pm | आनंद
धन्यवाद झकासराव आमच्या गावाचे सुंदर फोटु टाकल्याबद्द्ल.
आनंद
(पुणेकर पन वरिजनल सोलापुर्कर)
26 Sep 2008 - 6:08 pm | झकासराव
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी.
बैलोबा अरे त्या मंदीराच्या जवळच्या चौकातच ती इमारत आहे. त्या इमारतीच्या अलिकडेच नाट्यगृह आहे.
(तिथे चांगल नाटक लागल असेल तर अख्ख्या सोलापुरातल्या सुन्दर सुन्दर पोरीं तिथे पहायला मिळतील :))
जयमोलने माहिती लिहिली ते बरच केल.
ती समाधी आहे एका गुरुंची ज्यानी सोलापुरात शिवलिन्गांची स्थापना केली आहे.
अजुन जास्त माहिती मला देखील नाही. म्हणुनच डॉन किंवा सचीन जी याना माहिती लिहा अस मी लेखातच लिहीलय. :)
सोलापूर हून जवळच नळदुर्ग नामे एक भुईकोट किल्लाही पहाण्या सारखा आहे>>>
हा किल्ला पहायला जायचा विचार होता पण तिथे अद्याप धबधबा सुरु झाला नाही आणि त्यामुळेच आता जाण्यात मजा नाही अशी बातमी आपले मिपाकर सचीनजी यानी दिल्याने तो प्लॅन कॅन्सल केला.
ह्या सर्वान पेक्शा वेगळा " द्वाशी " नावाचा एक पदार्थ ही देखिल या शहराची खासियत>>>> हो काही दुकानात हे नाव वाचल मी. पण अजुन खाल्ल नाही की.
किल्ल्यासमोरच्या बागेत एक चट्णी पाव >>>>>> आयला, त्या दिवशी गेलो होतो तिकडे. तिथली पावभाजी चांगली आहे म्हणून बायको घेवुन गेली.
पण एकच घास खाल्ल्यावर मात्र नकोशी वाटली पावभाजी. विसुनानानी उल्लेखलेली भय्याची भेळ पाहिली. स्वातंत्र्यपुर्व काळापासुन आहे का ती??
त्यानी काहितरी साल लिहिल आहे आता विसरलो.
पाणी पुरी खाल्ली किल्ला बगीच्या जवळ. भारी होती एकदम. :)
विसुनाना तुम्ही टाकलेले फोटो मस्तच आहेत.
येतानाच शेंगदाण्याची चटणी घेवुन आलोच आहे. एक किलो आणली होती.
पुढच्या वेळी पोतभर आणावी लागेल अशी खल्लास चव आहे.
एकलव्य यानी फोटु टाकलेच आहेत. =P~
मी त्या पक्ष्याच नाव काळा बदक ठेवल होत माझ्यापुरत. :)
मी यानी नाव सांगितल म्हणून बर झाल की.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao