ग्रंथ परिचय –
विज्ञान अणि चमत्कार
भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान?
या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे?
बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतशास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?
विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ कसा बसवावा? परामानसशास्त्राने केलेल्या संशोधनाची ओळख व महत्व काय? अशा अनेक कूट प्रश्नांच्या उत्तरांचे समग्र भांडार म्हणजे ‘विज्ञान अणि चमत्कार’ हा ग्रंथ आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या आधीच्या ‘विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’, ‘विज्ञान आणि बुद्धिवाद’ या ग्रंथाच्या विश्लेषणातून निर्माण होणाऱा हा ‘ग्रंथराज’ आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
६६४ पानांच्या या भारी ग्रंथाच्या प्रस्तावनेत या ग्रंथाच्या उद्देशाबाबात त्यांनी म्हटले आहे की भौतिकवादी विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार असत्य (किंवा अशक्य) ठरतात... कारण ते त्या शास्त्राच्या मर्यादेत कदाचित घडत नसतील पण त्या शास्त्राच्या मर्यादेबाहेर घडतात की नाही हे त्या मर्यादेत राहून कसे कळणार? किंवा ठरवणार? त्यासाठी ती मर्यादा ओलांडून बाहेर आले पाहिजे. कारण त्या शास्त्राच्या बाहेर काम करणारी अनेक शास्त्रे आहेत. भौतिकवादी शास्त्रज्ञ भौतिकशास्त्राबाहेर जगच अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाहीत. त्यांनी तसे म्हणणे म्हणजे एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जग अस्तित्वातच नाही असे म्हटल्यासारखे आहे. हा ग्रंथ वाचकांना या संकुचित दृष्टीच्या बेडकांच्या विहिरीतून बाहेर काढून विशाल अतींद्रीय सागराचे दर्शन घडवतो. ते जग वाचकांनी कुतुहल व करमणूक म्हणून नव्हे तर गंभीरपणे शास्त्रीय, अभ्यासू वृत्तीने पाहावे अनुभवावे, यातून वाचकाला नवी वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाली तर लेखकाला या ग्रंथ लेखनाचे सार्थक झाल्याचे समाधान होईल.
ग्रंथाची शुद्ध विज्ञानवादी भूमिका -
शुद्ध विज्ञानात 'दैवी शक्तीला' किंवा 'परमेश्वर' या व्यक्तीरुपी संकल्पनेला अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुद्ध विज्ञान मानते व त्याची नैसर्गिक उपपत्ती शोधते. ते जसे अंधश्रद्धेवर प्रहार करते तसे जड़वादी तत्वज्ञानावरही प्रहार करते. असे ते दुधारी शस्त्र आहे. अतिंद्रिय घटनांनी भौत विज्ञानाचे नियम पाळलेच पाहिजेत असा दुराग्रह का धरावा? विश्वातली सर्व रहस्ये माहित नसताना जडवादी विचारवंतांनी आपली दुराग्रही मते पुन्हा तपासावीत, असा लेखकाचा उद्देश ग्रंथाचे संपूर्ण वाचन केले की लक्षात येतो.
भानामतीच्या विविध केसेसची प्रत्यक्ष भेट देऊन केलेली छाननी, घटनांची अर्थपू्र्ण फोड, आक्षेप व प्रतिआक्षेप - त्यांची तर्कपुर्ण तपासणी, विरोधी विचारांच्या व्यक्तींचे तोकडेपण आदि गोष्टी ग्रंथ वाचनाच्या वेळी प्रकर्षाने जाणवातत.
अभ्यासपुर्ण ओघवती भाषा व विज्ञाननिष्ठ विवेचन त्यामुळे लेखक आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत असा अनुभव येतो. ३५० पेक्षा जास्त संदर्भ व टिपणे यातून प्राचार्य गळतगे यांनी पाश्चात्य संशोधकांपासून ते भारतीय ऋषिमुनी, संत-महंतांचे दाखले ग्रंथाच्या पानोपानी दिले आहेत. इंग्रजी उताऱ्यांचे त्यांनी केलेले सोपे व अचुक भाषांतर वाचून थक्क व्हायला होते.
या ग्रंथराजाची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अंधश्रद्धेच्या उच्चाटनाची ढाल पुढे करून सश्रद्ध मनावर तलवार चालवून वैचारिक पंगू बनवण्याच्या नीतीची चाल या ग्रंथातून उघड केली आहे. वैज्ञानिक सिद्धांतांचा बुरखा घेऊन श्रद्धास्थानांना थोतांड म्हणवणाऱ्या स्वयंनिर्मित समाजसुधारकी संस्था व विचारकांची प्रा.गळतग्यांनी वैचारिक चिरफाडकरून त्यांचे खोटारडे व प्रसंगी विकृत रुप समाजापुढे आणले आहे. खोटे लिहायचे व बोलायचे, सरळ सरळ फसवणे शक्य नसेल तर खोटे सुचवायचे हे तंत्र या विचारकांचे महत्वाचे शस्त्र आहे. हे तंत्र फक्त मराठी भाषिकातील संस्था व व्यक्ती वापरत नाहीत तर जगभरातील सर्वच रॅशनॅलिस्ट संस्था व व्यक्ती कशा व किती टोकाच्या थराला जाऊन वापरतात याची उदाहरणे या ग्रंथात अनेकवेळा वाचायला मिळतात.
वैचारिक वाद घालताना प्रा. अद्वयानंदांचे नाव विकृतकरून लिहिणे, संतांचे चमत्कार खरे की खोटे यावर लिहिताना, रामऋष्ण परमहंसांची 'मिरगी झालेली व्यक्ती' अशी संभावना करणे, गळतग्यांची पुस्तके विकत घेणार नाही, वाचणार नाही पण त्यांनी आमची (प्रतिपक्षाची) पुस्तके विकत घेऊन वाचावीत आदि हुकूमशाही मनोवृत्तीची लक्षणे त्यांनी दाखवून दिलेली आहेत. अशा 'विवेकवादा'विरुद्ध गळतग्यांनी सादर केलेल्या पुराव्यांना तपासण्याचे नाकारणारे नागपूरच्या डॉ.नी.र. वऱ्हाडपांड्यांना विवेकवादी समजायचे कि हटवादी?
प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ग्रंथात 'नाडी ग्रंथ भविष्य' यास 'आकाश लेखनाचा निर्णायक पुरावा' असे म्हटले गेले आहे. त्यांनी स्वतः दक्षिण भारतात जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन नाडी ग्रंथ अदभूत चमत्कार ठरतात यात संशय नाही असे म्हटले आहे. आपल्या अपत्यांची नावे ठेवण्यास आपण स्वतंत्र आहेत असे आपण समजतो. परंतु ती नेमकी नावे नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्यात तंतोतंत येतात याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचे काय नाव असेल हे अगोदरच ठरून गेलेले आहे.असे लक्षात येते. अगस्त्य आणि अन्य नाडी ग्रंथकर्त्यां महर्षींनी ती नावे व व्यक्तीचे भविष्य 'आकाशरुपी कॅनव्हास' वर अगोदरच ठरवून लिहिलेले जीवननाट्यपट वाचून ती सांगितली. म्हणजेच अगोदर ठरवून लिहिलेल्या नाटकाच्या कथानकाचा तो एक भाग आहे असे म्हणावे लागते.
'नाडी ग्रंथ' - 'विश्व एक नाटक' असल्याचा तो सार्वजनिक पुरावा आहेत. त्यामुळे आकाश लेखनाच्या सत्यतेचा तो निर्णायक वैज्ञानिक पुरावा आहे, असे गळतगे यांचे प्रतिपादन आहे.
विश्व हे एक नाटक वा चित्रपट असेल तर मानवाच्या इच्छा स्वात्रंत्र्याचा अर्थ कसा लावायचा? आकाश लेखन हे निर्णायक सत्य असेल तर 'मानवाला इच्छा स्वातंत्र्य नाही' हे खरे नसून मानवाचे इच्छा स्वातंत्र्य हे मानवाचे नसून त्याला निर्माण करणाऱ्या ईश्वराचे -विश्व नाटककाराचे - आहे असे ठरते, असे लेखकानी ठासून म्हटले आहे. 'बंधन व स्वातंत्र्य' या किंवा 'प्रयत्नवाद व नियतीवाद' या तथाकथित समस्येचा उलगडा करताना प्रा. गळतगे म्हणतात, 'ज्या लोकांचा पुण्य कृत्य करण्याकडे ओढा आहे, ते लोक ज्याला सामान्य लोक 'बंधन' समजतात ते ईश्र्वराचे इच्छा स्वातंत्र्य सिद्ध करतात. ज्या लोकांचा पाप कृत्यांकडे ओढा आहे, ते लोग ईश्वरेच्छा स्वातंत्र्य नाकारून त्या इच्छा स्वातंत्र्याचा संकोच करतात.
म्हणजेच ज्याला सामान्य लोक 'स्वातंत्र्य' समजतात त्या ईश्वरी मायेच्या 'बंधनात' पडतात म्हणजेच आपले ईश्वरीय स्वातंत्र्य गमाऊन बसतात. अशा रीतीने पुण्य करण्याचे तथाकथित बंधन हे खरे अध्यात्मक 'स्वातंत्र्य' आहे. पाप करण्याचे तथाकथित सैतानाचे 'स्वातंत्र्य' हे खरे मायेचे 'बंधन' आहे.
संत रामदास स्वामींचे प्रयत्नवादाचे वचन -
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ।
यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे।।
आणि संत तुकारामांचे नियतीवादाचे वचन
जे जे संचिती। ते न चुके कल्पांती।
होणार ते ते होऊन जाय । व्यर्थ बोलोनिया काय ।।
लाभ अथवा हानी । घरा येता चासोनी।
तुका म्हणे स्वस्थ मन । करा विठ्ठल चिंतन।।
येथे दोन्ही सत दोन परस्पर विरोध दृष्टीकोनाचे आहेत असे वरवर दिसत असले तरी दोघांनीही त्यासाठी ईश्वराची साक्ष काढली असल्याने तो विरोध वरवरता आहे हे स्पष्ट होते. कारण ईश्वराच्या ठिकाणी सर्व विरोध मावळतो.
मागल्या जन्मी केलेल्या 'कर्माला' (प्रयत्नांना) या जन्मात 'दैव' म्हणतात म्हणून प्रयत्न केल्याशिवाय 'दैव' कधीच सिद्ध होत नाही कर्म एकच, एका बाजूने त्याला 'प्रयत्न' म्हणतात, तर दुसऱ्याबाजूने 'दैव'! हे या ग्रंथात मार्मिकपणे सांगितले आहे. पुनर्जन्मसिंद्धांतामुळे प्रयत्न व दैववाद हा खोटा ठरतो.
संत ज्ञानेश्वरांच्या १२ व्या अध्यायातील ओवीचा दाखला देताना प्रा. गळतगे म्हणतात, 'जे मनाने, वाचेने, देहाने, कर्म होईल ते मी करत आहे असे मानू नकोस कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालत आहे तोच कोणती गोष्ट करणे अथवा न करणे निर्धारित करतो. या सत्याचा ब्रह्मविज्ञानामुळे उलगडा होतो.
विश्व हे गारुडाचा खेळ नसून ते खरे आहे हे समजले की 'चमत्कार' हे खरे आहेत हे कळते. (चमत्कार हे एकाच वेळी खरे व खोटे कसे? पोट मथळा पृष्ठ- ३९९) विश्व हे नाटक आहे हे कळले की मानवाला ईश्वराहून वेगळे इच्छा स्वातंत्र्य आहे हे खोटे हे कळते. विश्व हे नाट्य आहे हे ज्याला माहित नाही किंवा मान्य नाही अशा बुद्धिवादी लोकांच्या दृष्टीला स्वतःला वेगळे इच्छा स्वातंत्र्य आहे हे खरे वाटते. मग त्यांना चमत्काराच्या नियमभंगाच्या उपपत्तीची समस्या सोडवता येत नाही व त्यामुळे चमत्कार नाकारायचा म्हणजेच ते खोटे म्हणण्याचा अर्थहीन आडमुठेपणा करावा लागतो.
टोलनाक्यावर कर चुकवण्यासाठी रात्रभर अन्य मार्ग हुडकून फिरत पहाटे परत टोलनाक्यावरच येणाऱ्या गाडीवानासारखी अवस्था ब्रह्म विज्ञानाच्या कर्मर्सिद्धांतांची ओळख नसल्याने पाश्चात्य शास्त्रज्ञांची झाली आहे. अशा आडरानातील अंधाऱ्या रस्त्याने फिरणाऱ्या शास्त्रज्ञांचा प्रतिनिधी म्हणून लेडरमन यांचा उल्लेख करता येईल असे गळतगे प्रतिपादन करून पुढे म्हणतात, त्याच्या God Particle(1993) ग्रंथात त्यांनी अंतिम भौतिक कण हाच ईश्वर मानला जावा अशी त्यांची धारणा होते! या शिवाय जॉन पोकलिंग हॉर्न यांचे Beyond Science(1996), आर पन रोज यांचे Emperor's New Mind(1987) ब्रायन एपलयार्ड यांचे Understanding the Present (1992) असे अनेक दाखले प्रा. गळतगे यांनी वानगी दाखल दिले आहेत.
क्वांटम सिद्धांत पाश्चात्य विज्ञानाचा रुढ दृष्टीकोन मुळातच अपुरा असल्याचे दाखवून देतो. रूढ विज्ञानातून कार्यकारण भावाची कायमची हकालपट्टी करण्याची गरज सिद्ध करतो. डेव्हीड बोहम म्हणतात, अणुचे जेंव्हा कोणीही निरीक्षण करत नाही तेंव्हा त्याला कोणतेही गुणधर्म नसतात. म्हणजेच कोणाचेतरी पहाणे, पाहणारा किंवा त्याचे मन (Consciousness) प्रत्यक्षात अणू भौतिक रुपाने अस्तित्वात आणते. तात्पर्य अणुला 'वस्तुनिष्ठ' अस्तित्व नसून 'व्यक्तीनिष्ठ' अस्त्वित्व असते.
अणु जड भौतिक नाही किंवा खरा नाही असा याचा अर्थ नसून अणूचा जडपणा (गुणधर्म )किंवा खरेपणा (अस्तित्व) हे मानवाच्या त्याला पहाण्याच्या मनामुळे प्राप्त होते असे क्वांटम सिद्धांता वरून सिद्ध होते. त्यामुळए भानामती, UFO, आदींना मानवी मनामुळे खरेपणा, अस्तित्व प्राप्त होते. ही उपपत्ती क्वांटम सिद्धांत ही उचलून धरतो.
समारोप -
जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे. ज्याप्रमाणे एखादा अंधळा आपल्याला दिसत नाही म्हणून प्रकाशच अस्तित्वात नाही असे म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे अतींद्रीय दृष्टी नसलेला मनुष्य – भले तो मोठा शास्त्रज्ञ असेल – लिंगदेह, मनोदेह, बुद्धिदेह, आत्मा हे डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून अस्तित्वातच नाहीत असे म्हणू शकणार नाहीत. तसे म्हणणाऱ्यांना अदृष्य पातळीवरील त्या देहाचे भौतिक जगात सुद्धा कसे दृश्य़ परिणाम घडून येतात, अनुभवायला मिळतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आंधळ्या भौतिकवादी शास्त्रज्ञांना सुद्धा मान्य करावे लागते.
पदार्थविज्ञान (फिजिक्स), भूत-भानामती, परामनोविज्ञान (दैवतशास्त्र), ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान (स्पिरिचुअल सायन्स) या तिन्हींचा वरवर पाहता परस्परांशी संबंध नाही. नव्हे ती एकमेकांना धिक्कारताना दिसतात परंतु या तीनही शास्त्रांना एकत्र आणण्याचा चमत्कार प्रस्तूत ग्रंथात विज्ञानामुळेच शक्य झाला आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी या शास्त्राची नाळ परस्परांशी निसर्गतःच जोडली गेली आहे गेलेली आहे हे सिद्ध केले आहे.
ग्रंथपरिचय – विंग कमांडर शशिकांत ओक
लेखक – प्राचार्य अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३. फोन ०८३३८-२९३३९९. मो - ०९९०२००२५८६ .वेदांत विवेक प्रकाशन. पृष्ठे - ६६४. किंमत – रु.४००.
प्रतिक्रिया
27 Nov 2013 - 8:59 am | चौकटराजा
दिसते तेच खरे हे नाही खरे. ऐकू येते तेवढेच ध्ननित हेही नाही खरे. पण या सगळ्याचे अस्तित्व काही इतर सामग्रीच्या
साह्याने किती तरी प्रमाणात व्यक्ति निरपेक्ष करता येते. उदा.एखाद्या लॅबमधे सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे ( एरवी डोळा ज्याला
नाकारतो) असे अस्तित्व अनेकाना अनुभवायला देता येते. असे काही भूते , देव यांच्या बाबतीत उपकरण आहे काय? नसेल तर एखाद्याला आलेला अनुभव खरा असला तरी तो त्याला झालेला एक भ्रम आहे असेही म्हणता येते.
यू कॅन फूल वन फॉर एव्हर बट नॉट ऑल फॉर एव्हर !
9 Dec 2013 - 12:35 pm | शशिकांत ओक
'दिसते तेच खरे' म्हणताना 'शरीराच्या इंद्रियांना जोडून जी यंत्र व्यवस्था उपयोगात आणली जाते त्यातून जे सर्वांना दिसते वा अनुभवाला येते' असे लेखकाला अभिप्रेत असेल म्हणून संबोधले गेले असेल तर?
परीक्षणात लेखकांच्या विचारांचा रोख काय याची सामान्य माहिती करून देण्याचा उद्देश असतो. इतकेच ..गळतगे सरांचा समग्र ग्रंथ वाचून आपल्या शंकांचे समाधान होईल ...
27 Nov 2013 - 9:30 am | विटेकर
ग्रंथ मुळातून वाचायला हवा. ही सारी सृष्टी भ्रमच आहे आणि अज्ञानाच्या पडद्याने त्याचे सत्य स्वरुप कळत नाही हे तर सार्याच संतांचे सांगणे आहे. किंबहुना वेद ही तेच सांगतात. सत्य स्वरुपाचे ओळख हाच मोक्ष आणि तीच मानवी जीवनाची इतिकर्त्व्यता होय.
मागल्या जन्मी केलेल्या 'कर्माला' (प्रयत्नांना) या जन्मात 'दैव' म्हणतात म्हणून प्रयत्न केल्याशिवाय 'दैव' कधीच सिद्ध होत नाही कर्म एकच, एका बाजूने त्याला 'प्रयत्न' म्हणतात, तर दुसऱ्याबाजूने 'दैव'! हे या ग्रंथात मार्मिकपणे सांगितले आहे. पुनर्जन्मसिंद्धांतामुळे प्रयत्न व दैववाद हा खोटा ठरतो.
मी यावर लगेच काही भाष्य करत नाही पण समर्थांचे सांगणे असे की , अगोदर प्रयत्न , दैव नंतर ! नेमक्या ओव्या आता आठवत नाहीत . त्याचबरोबर गीतेतील कर्मानुसार बुद्धी आणि बुद्धीनुसार कर्म या दोन संकल्पना नीट समजवून घ्यायला हव्यात !
बाकी अंधश्रद्धेबद्दल सर्वच संतानी प्रहार केले आहेत. समर्थांचा भ्रम निरुपण ( दशक १० समास ६ ) समास मूळातूनच वाचण्यासारखा आहे.
दुश्चिन्हें अथवा अपशकुन| मिथ्या वार्तेनें भंगे मन |वचके पदार्थ देखोन| या नांव भ्रम ||२०||
वृक्ष काष्ठ देखिलें| मनांत वाटें भूत आलें |कांहींच नस्तां हडबडिलें| या नांव भ्रम २१||
काच देखोन उदकांत पडे| कां सभा देखोन दर्पणीं पवाडे |द्वार चुकोन भलतीकडें जाणें या नांव भ्रम ||२२||
येक अस्तां येक वाटे| येक सांगतां येक निवटे |येक दिसतां येक उठे| या नांव भ्रम ||२३||
आतां जें जें देइजेतें| तें तें पुढें पाविजेतें |मेलें माणुस भोजना येतें| या नांव भ्रम ||२४||
ये जन्मींचें पुढिले जन्मीं| कांहीं येक पावेन मी |प्रीतीगुंतली मनुष्याचे नामीं| या नांव भ्रम ||२५||
मेलें मनुष्य स्वप्ना आलें| तेणें कांहीं मागितलें |मनीं अखंड बैसलें| यानांव भ्रम ||२६||
27 Nov 2013 - 10:21 am | चौकटराजा
अगोदर प्रयत्न , दैव नंतर ! हे मान्य. कारण आमच्या मते Luck in nothing else but a resultant of all other factors not controlled by you. and action is a resultant of factors controlled essentially by you.
बाकी सारी सृष्टी भ्रम आहे या निष्कषाप्रति आता शास्त्रज्ञ देखील आले आहेत. वाचा 'विज्ञानातील क्रांत्या' लेखक डॉ.वसंत चिपळोणकर. एकाच भ्रमाचे उदाहरण देतो. अवकाश अनंत व सर्व बाजूनी अनंत असेल तर पूर्व पश्चिम वर खाली अशा दिशा
हा एक भ्रम आहे.व त्याचा पाया म्हणून स्वीकारलेले वस्तू शास्त्र ही.
27 Nov 2013 - 10:22 am | चौकटराजा
वरील शेवटच्या वाक्यात वास्तू शास्त्र असे वाचावे.
18 Mar 2019 - 2:28 am | चामुंडराय
पूर्व पश्चिम वर खाली अशा दिशा या पृथ्वीसापेक्ष आहेत.
एकदा अंतराळात गेलो कि पूर्व नाही, पश्चिम नाही, वर नाही कि खाली नाही.
29 Nov 2013 - 3:06 pm | शशिकांत ओक
गळतगे सर प्रयत्न व दैव या दोन बाजू आहेत. असे म्हणतात. आपण प्रयत्न आधी, नंतर दैव अशी जोडणी करू शकत इच्छिता.
29 Nov 2013 - 4:12 pm | विटेकर
माझे म्हणणे , प्रयत्नच दैवापेक्षा श्रेष्ठ आहेत.
जीवसृष्टी जाली उत्पत्ती संहार |प्रारब्ध व्यवहार ऐलिकडे ||८९||
ऐलिकडे कर्म मूळीचा तो प्रयत्न |श्रोती सावधान विवरावे ||९०||
विवरावे आधी प्रेत्न की प्रारब्ध्|शास्त्रांतरी भेद ऐसा आहे ||९१||
आहे निराकार निर्मळ निश्चळ |तेथून चंचळ प्रेत्न जाला ||९२||
प्रेत्न जाला आधी म्हणोनिया थोर |प्रारब्ध विचार ऐलिकडे ||९३||
- समर्थ रामदास , ओवीशतक १२ वे.
29 Nov 2013 - 4:16 pm | बॅटमॅन
योगवासिष्ठाच्या पहिल्या खंडात वसिष्ठ ऋषी फ्रस्ट झालेल्या तरण्या रामाला असेच सांगतात. प्रारब्ध वैग्रे पिछले जनम का खेल है, या जन्मात ते कसेही असले तरी वाढणार नै की कमी होणार नै. सबब आपल्या प्रयत्नांनी या जन्मात आपण त्यावर मात करू शकतो.
हे वाचलं आणि जी ट्यूबलाईट पेटली म्हणता!! मजा आ गया. अंगभूत आळस कितीही झोपवत असला तरी एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद या शिकवणीत आहे. मान गये _/\_
29 Nov 2013 - 4:55 pm | शशिकांत ओक
गळतगे सर प्रयत्न व दैव या दोन बाजू आहेत. असे म्हणतात. आपण प्रयत्न आधी, नंतर दैव अशी जोडणी करू शकत इच्छिता.
2 Dec 2013 - 5:19 pm | विटेकर
आम्ही आमचे म्हणणे पुरेश्या स्प्ष्ट्पणे सांगितले आहे. प्रयत्न हेच अगोदर आणि प्रारब्ध / दैव / नशीब / प्राक्तन / संचित हे सग्ळ स्ग्ळ नंतर आणि स्प्ष्ट्च सांगायचे तर गौण ही ! वरती समर्थ काय म्हणतात हे सांगितले आहेच आता कुसुमाग्रज काय म्हणतात पहा:
ग्रहांचे साह्य शूराला , यशश्री पायची दासी ,,.. !
मागे एकदा म्हट्ल्याप्रमाणे .. बुद्धीनुसार कर्म आणि कर्मानुसार बुद्धी हे एकदा जमल्यास समजावून घ्या.
29 Nov 2013 - 5:40 pm | शशिकांत ओक
गळतगे सर प्रयत्न व दैव या दोन बाजू आहेत. असे म्हणतात. आपण प्रयत्न आधी, नंतर दैव अशी जोडणी करू शकता. पुर्व(जन्मातील) प्रयत्न - दैव - व सध्याच्या(जन्मातील)प्रयत्न यात सध्याच्या जन्मातील प्रयत्न जास्त प्रभावशाली असले पाहिजेत असा विचार आपला असल्याचे दिसते. मला मान्य आहे. मात्र आपण ग्रंथ वाचून पहायला काय हरकत आहे?
9 Dec 2013 - 12:39 pm | शशिकांत ओक
विटेकर सर व अन्य मित्रांनो, ग्रंथराज वाचून पहायची इच्छा आहे म्हणता, त्याची सुरवात झाली काय? ...
16 Dec 2013 - 8:43 pm | शशिकांत ओक
मित्रा, आपण गळतगे सरांच्या ग्रंथ परिचयावरून संपुर्ण ग्रंथ वाचून पहायला हवा म्हणून प्रतिसाद दिला होता. आपल्या वाचनानंतर आपल्या विचारांना पुरक सरांची विचारसरणी वाटली काय विचारावेसे वाटले म्हणून हा प्रतिसाद...
27 Nov 2013 - 10:02 am | रिम झिम
बाकी नाडी पट्टीचा अनुभव चांगला आलाय.
माझे नाव , आई आणि वडीलांचे नाव मी न सांगता अचुक सांगितले गेले...
27 Nov 2013 - 10:02 am | प्रकाश घाटपांडे
गोफ जन्मांतरीचे हे डॉ सुलभा ब्रह्मनाळकर यांचे जनुकीय क्रांतीवरील पुस्तक वाचले की निसर्ग हाच किती मोठा चमत्कार आहे असे वाटण्याला पुष्टी मिळते.
27 Nov 2013 - 4:58 pm | शशिकांत ओक
इतकी प्रचंड आहे की वरील विचारकांचे प्रतिसाद त्यांच्या जागी ठीक वाटले तरी गळतग्यांच्या लेखनाच्या विचार प्रवाहात पूर्वग्रह बाजूला ठेवून मनसोक्त विहार करून मग आपल्या आवडत्या मतांतील/ त्यांच्या विचारातील त्रुटी व असहमति जरूर मांडाव्यात ही विनंती.
27 Nov 2013 - 5:12 pm | ऋषिकेश
बर्याच दिवसांनी अवतरला आहात.
मिपावरही बरेच नवे ताज्या दमाचे खेळाडू/बकरे मिळतील.. सगळ्यांनाच शुभेच्छा!
27 Nov 2013 - 11:58 pm | शशिकांत ओक
नव्या मित्रांनो, गळतग्यांच्या लेखनाबाबतीत प्रतिसाद वाचायला आवडेल. जुन्यांची विचारधारा ऐकून झाली. पूर्वग्रह सोडून विचारांना सामोरे जाऊया.
28 Nov 2013 - 2:43 am | रामपुरी
त्या दहा एक अब्ज लोकांच्या नाड्या (तेच ते नाडीपट्ट्या..आकाश लेखनाच्या सत्यतेचा तो निर्णायक वैज्ञानिक पुरावा)कुठे ठेवल्या आहेत याचा काही खुलासा केला आहे काय या पुस्तकात? अन्यथा त्याला पाच रूपये किलो पेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची खात्री बाळगा.
खुलाश्याची अपेक्षा नाही. तो होत नसतो हा पूर्वानुभव
28 Nov 2013 - 11:15 pm | अग्निकोल्हा
आधी याचा विरोध करायचो पण काळाने माज़ा विरोध खोटा ठरवला. होय नाडी ग्रंथ व भविष्य अतिशय वास्तव आहेत याचा अनुभव मी घेतलाय
29 Nov 2013 - 3:13 pm | बॅटमॅन
काय अनुभव आहे? डीटेलवारी सांगा की ओ जरा.
अन त्या तमिऴ लिपीचा इतका बाऊ करतात हे नाडीवाले, भेंडी काय एलियन लिपी आहे का आँ? तमिऴ कळणे जरा अवघड असले तरी लिपी कळणे एकदम चिंधी प्रकार आहे. रेग्युलर तमिऴ काय नि ग्रंथ तमिऴ काय एकदम सुतागत साध्या सरळ लिप्या आहेत. किमान त्यावर नाव खरेच लिहिले आहे की नाही एवढे चेक करणे लै सोपे आहे. तेवढी ट्रान्स्परन्सी असेल तर ठीक, पण पैसे काढायचा धंदा असल्याने नाडीवाले गप्प बसतात.
29 Nov 2013 - 4:23 pm | अग्निकोल्हा
ओक काकांनी आधीच दिलेली असल्याचे त्यांचे पूर्व लेखन चाळता लक्षात आले.
मी तदन्य नाही, वकील नाही, तुमच्या इतका हुशार नाही नाडिप्रसाराचे कार्यही हाती नाही. म्हणून मी माज़ा अनुभव व्यक्त केला यापलिकडे मीआपणास काय लिहावे मला समजत नाही
29 Nov 2013 - 4:27 pm | बॅटमॅन
ते लेखन चाळले आहे तरी त्यातून प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. असो, त्या नाडीला हात घालायची इच्छा नाही इथे तरी किमान.
अर्थातच. बाकी तुम्हीच काय, अन्य कोणीही माझ्याइतके हुशार नाही अन कधी होणारही नाही.
.
.
.
.
.
.
एक तर माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त हुशार असतील नैतर माझ्यापेक्षा मठ्ठ तरी असतील. पण नेमके माझ्याइतके हुशार आजवर कोणी झालेले नाही आणि कधी होणारही नाही ;)
29 Nov 2013 - 5:01 pm | अग्निकोल्हा
आपण समोर केलेल्या नेमक्या प्रश्नांची उत्त्तरे त्यात सोदा रहन दिली आहे.
बाकी आपल्या बुध्दिमत्ते वरील आपण दिलेले विवेचन फार रोचक आहे. पण ते इतरांचे मत आहे का आपण स्वत:च स्वत:ला असे मानता ?
29 Nov 2013 - 5:22 pm | बॅटमॅन
हे स्पष्टीकरण वाचले की सगळ्याचा उलगडा होईल. :) हे मत कोणी अमान्य करेल असे वाटत नाही. अन हे मत मलाच नव्हे, तुम्हालाही किंबहुना सगळ्यांना तितकेच लागू पडते.
30 Nov 2013 - 12:30 am | अग्निकोल्हा
मी मात्र मला तुमच्या इतपत हुशार मानत नाही त्यामुले शंका समाधान शक्य नाही. परंतु ओकांचे समग्र लिखाण वाचले तर सदरिल प्रश्न कर्ते आपण पहिलेच न्हवे यासोबतच आपल्या प्रश्नांची उत्त्तरेहि स्पष्ट होतील. तथापी आधीच उत्तरे दिलेल्या जुन्या प्रश्नांना वर आणून आपण त्यांच्या सारख्या निर्मळ व्यक्तिम्त्वास स्तावू नये ही आपल्याला हात जोडून विनंती आहे _/\_
2 Dec 2013 - 5:27 pm | विटेकर
अन्य कोणीही माझ्याइतके हुशार नाही अन कधी होणारही नाही.
सुप्पर लाईक करण्यात आले आहे. यावर एक फ्लेक्स बनवावा काय ? होऊ दे खर्च !
2 Dec 2013 - 5:39 pm | बॅटमॅन
=))
अहो खालचे स्पष्टीकरण तरी वाचावेत विटेकरजी! हे एकच वाक्य पाहिले तर लै चुकीचा संदेश जातो.
3 Dec 2013 - 11:37 am | विटेकर
संपूर्ण वाचले .. शेवट पर्यंत..
समूळ ग्रंथ पाहिल्यवीण | उगाच देई दूषण .. तो एक पढतमूर्ख हे आम्हाला माहीत आहे..
हिथ तुम्चा कोन फ्लेक्स बनवाय्लेय ? असं काय कर्तुयास मर्दा..
ते क्याप्शन लै भारी हाय आनि हिथ लै तालेवार मान्स हायत , तेंचा फ्लेक्स या क्यापशन चा बनयायला पाय्जेल..
आपुन नावान्ची यादी करायला घ्या....
तसेच इच्चुकांनी सम्परक करावा.
3 Dec 2013 - 12:27 pm | बॅटमॅन
हाहाहा येस्सार!!! बनवू फलेक्स लौकरच ;)
29 Nov 2013 - 5:58 pm | शशिकांत ओक
बॅटमन आणि अन्य मित्रांनो,
तमिळ भाषेच्या संबंधित आपले विचार वाचले. आपणांस तमिळमधून केलेले लेखन वाचायला व लिहायला येत असेल तर आपल्या सारख्या व्यक्तिची आम्हाला गरज आहे. आपल्या सहकार्याने मिपावरील सदस्यांना नाडी ग्रंथ ताडपत्रावरील लेखनावर प्रकाश टाकायला मदत मिळेल. 'आपल्या सारख्या फक्त आपणच' व्यक्तीने माझी विनंती झिडकारणार नाही अशी अपेक्षा करतो.
29 Nov 2013 - 6:11 pm | बॅटमॅन
जर एखाद्या नाडीपट्टीचा पुरेसा स्पष्ट असा स्कॅन्ड फोटो मिळत असेल तर वाचायचा काही प्रयत्न करता येईल. मला माहिती असलेल्या तमिऴ जाणकारांना दाखवून खातरजमा करता येईल. यासाठी कुठलाही खर्च करायची अर्थातच इच्छा नाही.
29 Nov 2013 - 6:12 pm | शशिकांत ओक
आपल्या सहकार्याची मिपावरील सदस्यांच्यावतीने केलेली माझी विनंती 'आपल्या सारख्या आपणच' म्हणणाऱ्याने नाही म्हणणार नाही अशी अपेक्षा करतो.
29 Nov 2013 - 6:14 pm | बॅटमॅन
ओक सर, वरचा प्रतिसाद कृपया पहावा ही विनंती.
29 Nov 2013 - 6:18 pm | शशिकांत ओक
खर्चात कशाला पडता,तमिळ भाषेच्या लेखनाचा मासला पडताळून पहायला आपण तयार आहात काय?
29 Nov 2013 - 6:27 pm | बॅटमॅन
हो तयार आहे. फक्त नक्की दावा काय आहे हे अगोदर स्पष्ट असावे म्हणजे तपासायला बरे.
2 Dec 2013 - 4:53 pm | ऋषिकेश
विचार कर रे बॅट्या
त्या नाडीपट्ट्यांवरील मजकूर आपोआप बदलतोही म्हणे!
2 Dec 2013 - 8:12 pm | प्रकाश घाटपांडे
:)
9 Dec 2013 - 12:44 pm | शशिकांत ओक
मित्रा,
नाडी पट्टीतील नावाचा मजकूर शोधायच्या बाबत आपली प्रगती कुठवर आली आहे? मी काही मदत करू शकतो काय?
29 Nov 2013 - 7:45 pm | अत्रुप्त आत्मा
29 Nov 2013 - 7:55 pm | शशिकांत ओक
सध्याच्या तमिळ लिपीमध्ये ताडपत्रावरील लेखन एका वहीत लिहून मिळते.(ते तसे खरेच असते का? याचा ही शोध नंतर तुम्हाला घेता येईल.) तुम्हाला मान्य असेल तर वहीतील लिहिलेले वाचायला सोपे म्हणून सुरुवात करता येईल. तमिळ भाषेचे व काव्याच्या अंगाने अभ्यासक असाल तर फार उत्तम. कामचलाऊ तमिळ येत असेल तर तसे सांगा. इतरांकडून वाचायला देऊन शोधकार्य करणाऱ्यांचा उत्साह लगेच संपतो असा अनुभव येतो. ज्यांचा नाडी ग्रंथात काहीच तमिळमधे लेखन केलेले नसते. आपल्याकडून माहिती काढून तीच नाडी पट्टीतून येत आभास तयार केला जातो असा 'दावा' नाडी ग्रंथांचा अनुभव न घेता, तमिळ भाषेच्या लेखनाचा अभ्यास न करता केला जातो. तो बरोबर आहे याची खात्री करून दिली जाईल इतकेच... पण चिकाटीने हे काम करायला आपण हो म्हणून तयार आहात असे मानावे काय? तसे असेल तर पुढे विचार करता येईल. अन्यथा जमणार नाही असे सुरवातीला म्हणालात तरी मला वाईट वाटणार नाही. कारण असेच अनुभव आत्ता पर्यंत आलेत. तुमच्या सारखे तुम्हीच आहात म्हणून प्रस्ताव मांडला. आपण पुण्याचे असाल तर प्रत्यक्ष भेटता येईल. मान्य असल्याचे कळवावे ही विनंती.
29 Nov 2013 - 8:16 pm | बॅटमॅन
तमिऴ लिपी वाचायला अडचण नाही. भाषेचे म्हणाल तर अंमळ कामचलाऊ ज्ञान आहे. काही अडले तर सांगणारे मित्र आहेत अन पुस्तकेही आहेत.
पण इथे एक मेख दिसते. मला नाडीपट्टीतला ओरिजिनल मजकूर पहायचा आहे. त्यातले लिहिलेले तमिळ काय मराठीत लिहिले तरी फायदा नाही. ती हस्तलिखित नाडीपट्टी समोर पाहिजे तर आणि तरच काही बोलता येईल. त्या हस्तलिखिताचा फोटो पाहिजे. तो फोटो घेऊन मग तुमचा जो काही तर्जुमा असेल तो त्याच्याशी ताडून पाहता आला पाहिजे.
मला जर पट्टी प्रत्यक्ष पाहता येत नसेल तर चर्चा फिजूल आहे.
आणि अर्थातच, मला माझे भविष्य पाहण्याची इच्छा नाही. सबब तुम्ही तुमच्या संग्रहातला एखादा फोटो पाठवला तरी चालेल. त्यासोबत तर्जुमा जोडून पाठवला तर अजून उत्तम.
29 Nov 2013 - 8:20 pm | अत्रुप्त आत्मा
@मला जर पट्टी प्रत्यक्ष पाहता येत नसेल तर चर्चा फिजूल आहे. >>> ज्जे बात...!
आता वाट पहायची! :)
6 Dec 2013 - 1:16 am | शशिकांत ओक
मित्रा,
नाडीग्रंथ ताडपत्राचा फोटो सादर केला आहे. आता आपणाकडून काय प्रगती आहे कळवावे. आपणास मजकुर वाचायला जमला असेल नाही तर, किंवा अडले तर तमिळजाणकार मित्रांकडून व तमिळभाषेच्या पुस्तकावरून त्यातील तमिळ लेखनाचा अभ्यास करून त्यातील मजकूर आपण मिपावर सादर करणार आहात अशी अपेक्षा करत आहे.
तसे न झाल्यास प्राचार्य गळतगे यांचे म्हणणे - जे लोक ही (पुरावे तपासण्याची) आवश्यकता उघडपणे मान्य करतात पण प्रत्यक्षात ती तपासणी न करताच ... (विज्ञान आणि चमत्कार) - आपल्याला मान्य आहे असा निष्कर्ष मिपाकरांनी काढावा काय
30 Nov 2013 - 8:28 pm | शशिकांत ओक
थोडक्यात आपले तमिळ कामचलाऊ आहे म्हणजे हे काम तिऱ्हाईतांकरवी करणार असे दिसते. मी पट्टी चा फोटो दिला की तुम्ही कुवतीप्रमाणे तो त्या लोकांकडे देऊन वाचवून घेणार. त्या नंतर 'बस झाले शोध कार्य ' असे मला म्हणणार असे दिसते. कारण डॉ. जयंत नारळीकरांसारख्या मान्यवरानी त्यांच्या माहितीच्या तमिळ लोकांना पट्टीतून नाव वाचता आले नाही म्हणून पत्राने कळवून शोध कार्य संपवले. तसे तुमच्या तमिळाला वाचता आलेले नाही ही सबब तुम्ही पुढे करून नाडीग्रंथांना खोटे ठरवले असे तुम्ही करणारे नसावेत अशी अपेक्षा करतो. कारण हे काम हाती घेतले की एकामागे एक वाढत जाते असा अनुभव आहे. म्हणून एका वहीत लिहून मिळते.(ते तसे खरेच असते का? याचा ही शोध नंतर तुम्हाला घेता येईल.) तुम्हाला मान्य असेल तर वहीतील लिहिलेले वाचून सुरवात करता येईल. आपल्या कडून माहिती काढून तीच नाडी पट्टीतून येत आभास तयार केला जातो असा 'दावा' नाडी ग्रंथांचा अनुभव न घेता, तमिळ भाषेचा, लेखनाचा अभ्यास न करता केला जातो. तो बरोबर आहे की चूक याची खात्री करून दिली जाईल पर्यंत तुमच्या तमिळ मित्रांच्या चिकाटीने मागे लागून हे काम करायला आपण हो म्हणून तयार आहात असे मानावे काय? तसे असेल तर पुढे विचार करता येईल. अन्यथा जमणार नाही असे सुरवातीला म्हणालात तरी मला वाईट वाटणार नाही. हे सर्व शोधकार्य करायचे मान्य असल्याचे कळवावे . फोटो लगेच चढवता येईल . म्हणून पुन्हा ही विनंती.
1 Dec 2013 - 3:54 pm | बॅटमॅन
हर्कत नाही. मागे लागायला तयार आहेच. फोटोचं जमलं तर बघा.
30 Nov 2013 - 9:27 pm | ग्रेटथिन्कर
वा वा छान छान
1 Dec 2013 - 7:56 pm | रमताराम
सेकंड इनिंग चालू वाटतं. तो पालथा घातलेला घडाही नवीन दिसतोय. छान छान.
1 Dec 2013 - 9:46 pm | अत्रुप्त आत्मा
@ तो पालथा घातलेला घडाही नवीन दिसतोय. छान छान.>>> =)) क्या मारा है| =))
आणी तरीही,,,पाणि'च पडणार...हे नक्की! :)
1 Dec 2013 - 10:13 pm | बॅटमॅन
च ऐवजी एक "हेच्च" जास्त पडला काऽयं म्हणतो मी रमताराम सार ??
1 Dec 2013 - 10:37 pm | काळा पहाड
ओक साहेब,
१. भौतिक शास्त्राच्या मर्यादा म्हणजे काय हे मला कळलेले नाही. भौतिक शास्त्र हे पदार्थ आणि उर्जेचे विज्ञान आहे. कुठल्याही गोष्टीला या दोन गोष्टींच्या मर्यादेतच असणे भाग आहे. किंबहुना पदार्थ हेच उर्जे चे एक रूप आहे. शास्त्राच्या ज्या काही कसोट्या आहेत, त्यावर कुठलेही शास्त्र उतरणे आवश्यक असते. भौतिक शास्त्र हे मूळ शास्त्र (fundamental science) असल्या मुळे त्याला कोणतीही गोष्ट वर्जित नाही. एखादी लहर (wave) सापडली नसेल तर ती आस्तित्वात नाहीच असे भौतिक शास्त्र म्हणणार नाही. पण त्याचे आस्तित्व सापडे पर्यंत ती मान्य सुद्धा करणार नाही. करू शकत नाही. हिग्ज बोसॉन सारखा मूलकण गणिताने फार पूर्वीच शोधला होता. पण जो पर्यंत तो सिध्द होत नाही तो पर्यंत विज्ञान तो शोधत रहाणार आणि त्याचे आस्तित्व तात्विक पातळीवरच मान्य केले जाईल. शास्त्रज्ञांना "विहिरीतील बेडूक" म्हणणे म्हणजे त्यांचा विनाकारण अपमान आहे.
२. तुमच्या लेखनात मला सुसंगती आढळत नाही.
उदाहरणार्थ,
तुम्हाला काय म्हणायचं आहे? क्वांटम सिद्धांत या गोष्टी अधोरेखीत करतो? हे हास्यास्पद आहे. क्वांटम सिद्धांताचे मूळ आहे की "कुठलीही गोष्ट पुंज पातळीला (quantum level) unpredictable असते". कर्मफल, विधिलिखित इत्यादी बाबतीत तो कसा वापरता येईल? असो. मला बरच लिहायचं होतं पण मराठी लिहायचा कंटाळा म्हणून सध्या एवढंच.
2 Dec 2013 - 12:02 am | शशिकांत ओक
त्यांच्या ग्रंथातील काही भागांवर आपणास वेगळे विचार मांडलायचे असतील तर जरूर मांडा. शिवाय दुसऱ्या याची विषयावरच्या धाग्याखालील सरांची मांडणी वाचा. पूर्ण ग्रंथ वाचा. ही विनंती.
2 Dec 2013 - 12:21 am | विनोद१८
विनोद१८
2 Dec 2013 - 3:18 am | शशिकांत ओक
बॅटमन आणि अन्य तमाम तमिळ जाणकार मित्रांनो,
सोबतच्या फोटोमधे व्यक्तिचे नाव कोरलेले आहे. काही महत्वपूर्ण मजकूर हायलाईट करताना काळपट झाला आहे. कृपया आपण किंवा आपल्या तमिळ भाषेच्या जाणकार व्यक्ति कडून ताडपत्रावरील लेखनावर अभ्यास करून नाव अन्य मजकूर वाचून सादर करावा ही विनंती. आपण तत्परतेने सादर केलेल्या पुराव्यांना तपासण्यासाठी ज्याची ती पट्टी आहे याची साक्षी मिळेल याची खात्री बाळगावी. आता ही नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्टी खरी कशावरून? तमिळ लिपीमध्ये काही लिहिलेलेच नाही! कार्डीओग्राम सारख्या दिसणाऱ्या रेषांच्या मुळे लिपी तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून वाटत नाही! वगैरे फाटे फोडून काहीही लिहिलेले सापडले नाही, नाडी भविष्यातील ताडपत्रावरील मजकूर बनवाबनवी 'असावी' हा आमचा दावा आता शास्त्रीय पायावर सिद्ध झाला आहे. सबब या पुढील अभ्यास कार्यात रस उरलेला नाही असे आपण म्हणून अंग काढणार नाही असे जाहीर आश्वासन देऊन मागे फिरू नका. या अभ्यास कार्याला किती दिवसांचा अवधी लागेल ते तमिळ भाषेच्या संबंधित तज्ञांना विचारून सादर करावे. आपल्या तमिळ तज्ज्ञ सहकाऱयाची नावे व अन्य ओळख आपण द्यावी.
ही माझ्या दृष्टिकोनातून एकमेकांशी केलेली स्पर्धा, कुश्ती, आव्हान देऊन हारवण्याची चाल नाही. या पुढील अभ्यास कार्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य हवे आहे. ही प्राचीन विद्या - विविध महर्षींचे ज्ञान आपल्या भारतीयांचे आहे हा दंभ नको पण अभिमान वाटायला काय हरकत आहे? नाडी ग्रंथांचा द्वेष वा तिरस्कार करून त्याला हीन ठरवणे योग्य आहे का याचा विचार व्हावा. नाडी ग्रंथ वाचन एक विशेष कला आहे. ते सचोटीने वाचून योग्य त्यांच्याकडे पोहोचवणे ही त्या नाडी ग्रंथ केंद्र चालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती त्यानी पाळून व्यवसाय म्हणून कुटुंबासह मानधन कमाईचे साधन म्हणून वापरावे असे नाडी ग्रंथ महर्षींच्या कथनातून सांगितले जाते. सध्याच्या काळात अतिवरिष्ठांची सचोटी व साधनशुचिता किती खालावलेली आहे याची जाणीव सर्वांना आहे. नाडी केंद्रावर याचा परिणाम झाला तर नवल नाही. पण म्हणून सर्व नाडी केंद्रांची वर्तणूक वाईट असते असे मानणे गैर आहे. प्रश्न ओकांची व्यक्ती गत निंदा नालस्ती करून समाधान मिळवायचे की आपण उराशी मान्य म्हणून ठरवलेल्या विचारधारेशी बेईमानी करायची हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग आहे. आपल्या मिपावरील सहकार्याने एकत्रितरीतिने काम करायची संधी मिळाली याचे समधान आहे... असो.
2 Dec 2013 - 3:47 am | प्यारे१
___/\___
ही तर खरंच नाडी निघाली. (स्पावड्या, जिलेबीसदृश एकही आकार नाही की रे चित्रात! लेखाबद्दल तू बोलशीलच. )
थोडी धुवून वाळवून इस्त्री करुन वापरावी लागेल पण हरकत नाही.
तुमच्यासाठी काय पण!
आता थोडं सिरियसः
भूतकाळाविषयी माहिती मिळाली. तंतोतंत. ओके. मान्य! पण तो गेलाय. आता बदलणार आहे? नाही.
वर्तमानाचं काय सांगणार? तिथे तुम्ही नाडीपट्टीसमोर बसला आहात. काहीतरी तात्कालिक अडचण आहे म्हणून गेलेला आहात. वर्तमान संपला.
भविष्याचा वेध घ्यायचा म्हणताय.
काय सांगणार आहात? कधी मरणार हे? आजारी पडणार हे? की कधी म्हातारं होणार हे? होणारं चुकवणार आहात का?
बरं चुकवून साध्य काय करणार? लांबणीवर टाकणार? त्यानं काय होईल? उद्याच्या विवंचना आज जाणून घेणार की एखादी गोष्ट झाली नाही तर त्याला कारणमीमांसा शोधणार? तात्कालिक अडचणींसाठी असे टेकू शोधू लागलो तर अवघडच की!
अत्यंत सुंदर भारतीय तत्त्वज्ञान अशा प्रकारच्या विसंगत दैववादी स्वार्थी नि संधीसाधू इन्टरप्रिटेशनमुळं आधीच बदनाम झालंय. आणखी बदनाम का करतोय आपण ह्याचा विचार व्हायला हवा. होणार नाहीये हे ठाऊक आहे. तरीही लिहीतोय. असो.
- इलास्टीकचा बर्म्युडा वापरणारा प्यारे.
2 Dec 2013 - 2:35 pm | अग्निकोल्हा
पण बाकीचे इतके महान नाहित. गुरुकृपेने आपला पाया पक्का आहे तसा प्रत्येकाचा असेलच असे नाही म्हणुनच या धकाधकीच्या जीवनात कमकुवत व सैरभैर मनाला असे चार शब्दही जादूची कांडी ठरतात हे विसरु नये.
2 Dec 2013 - 4:23 pm | प्यारे१
प्यारे यु आर ग्रेट!
हायला! कधी ठरलं हे? (उपहास मानवत नाही हो! =)) )
>>> कमकुवत व सैरभैर मनाला असे चार शब्दही जादूची कांडी ठरतात
मान्य.
पण मग असं कधीपर्यंत सैरभैर नि कमकुवत राहू या?
ज्या चिकाटीनं ओकसाहेब हे लिहीत आहेत त्याचा थोडास्सा जरी भाग एखाद्यानं मन कणखर करण्यासाठी केला तर खूप उपयोग होईल असं वैयक्तिक मत आहे. (इथे ओक सरांच्या चिकाटीचं कौतुक वाटतंय एवढंच)
बाकी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा स्वातंत्र्याच्या अखत्यारीतला विषय आहे म्हणा! ;)
2 Dec 2013 - 5:23 pm | विटेकर
प्यारे यु आर ग्रेट!
आणुमोद्ण !
2 Dec 2013 - 6:04 pm | अग्निकोल्हा
जोपर्यंत जन्म मृत्यु अस्तित्वात आहेत तोपर्यंत विविध जाती धर्म वयोगट लिंगाच्या व्यक्ति वेग्वेग्ळ्या काल खंडात सैर भैर असत राहणार.... जो महान आहे त्याने स्वत: यातून अंग काढून घेतलेले असावे अन्यथा उपदेशामृत योग्य नाही याची जाण पूर्ववत करावी
2 Dec 2013 - 6:30 pm | प्यारे१
खरंय! त्रास न करुन घेता सांगावं, स्वतःपाशी ठेवून घेऊ नये.
ग्यान हमेशा बाँटना चाहिये ;)
अवांतर बास्स्स ना?
2 Dec 2013 - 8:51 pm | अग्निकोल्हा
इतरांच्या(माननीय ओक काका यांच्या) गुरुंची इच्छा म्हणून करत असलेल्या कार्याला खोडा घालू नये. मुख्य मुद्दा समजुन घ्या वा म्हणजे असे अवांतर होणार नाही.
2 Dec 2013 - 9:04 pm | प्यारे१
>>>खोडा घालू नये.
खोडा घाटला तरी ओक काका मणावर घेत न्हाईत हे ठावं हाये आमाला!
3 Dec 2013 - 10:25 am | अग्निकोल्हा
एखाद्या शांत धीरगंभीर हत्ती सारखे आहेत.....
.
मी वैयक्तिक स्तरावर आपल्या खोडा घालाय्च्य्या प्रवृत्तीला अनुमोद्नच देइन पण ते करताना मिपास्माजाला उपदेशड़ोस पाजायचा आपला बेगडी अट्टहास तिरस्कारणियच आहे
3 Dec 2013 - 10:50 am | अत्रुप्त आत्मा
3 Dec 2013 - 11:43 am | स्पंदना
3 Dec 2013 - 12:42 pm | अग्निकोल्हा
असला भयानक उपदेशपाजू एकांगी प्रतिसाद इथे अजुन टिकून आहे याचेच सखेद आश्चर्य वाटते :(
3 Dec 2013 - 5:54 pm | प्यारे१
अरेच्चा!
स्वारी शक्तीमान. :)
2 Dec 2013 - 12:25 pm | बॅटमॅन
वा! तत्परतेने फटू दिल्याबद्दल धन्यवाद.
ही नेहमीची तमिऴ किंवा ग्रंथ तमिऴ लिपी तरी नक्कीच नाहीये. असो, ओळखीच्या तमिऴ जाणकारांना विचारून पाहतो. काय ते उत्तर नक्की देईन इतके बाकी खरे.
9 Dec 2013 - 1:07 pm | अर्धवटराव
माझ्या एका तामीळ मित्राला हि पट्टी दाखवली... सोनीया गांधींनी संस्कृतात ब्रह्मसूत्र वाचावे तसं त्याने मिपाचं भविष्य घडाघडा वाचुन दाखवले या पट्टीत.
28 Mar 2014 - 1:14 am | शशिकांत ओक
टाळ्यापिटूंसाठी दहा मिनिटांची मजा.
ओक नाडीत फसले तर वावा, नाही फसले तरी वावा...
ज्यांनी हा नाडीपट्टीच्या फोटोचा फेर धरला ते तर केंव्हाच पसार झालेत... आता कोणाची प्रतीक्षा करतायत ओक, कोण जाणे....
18 Mar 2019 - 2:34 am | चामुंडराय
.
2 Dec 2013 - 11:29 am | शशिकांत ओक
मित्रांनो,
ज्याना भविष्यातील घटनांची चिंता नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. तसाच काहींना नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी जावेसे वाटते.
जोवर वेळ येणार नाही तोपर्यंत कोणीही ग्रंथ अवलोकन करायला जात नाही.
आता अन्य गोष्टीना घोळवतात मुख्य मुद्द्याला कात्रज केली जाणारी खेळी होईल.
2 Dec 2013 - 3:40 pm | होबासराव
ओक साहेब
मला माझे नाडी नाडी ग्रंथ भविष्य बघायचे आहे, पण मला त्याबाबतित काहिहि माहिति नाहि आहे. आपण मला सहकार्य कराल का? पुण्यात मला हया बाबतीत कुठे मदत मीळेल? मि आपल्याला आपल्या मो. क्र - 0९८८१९०१०४९
वर सम्पर्क करु शकतो का?
2 Dec 2013 - 4:44 pm | शशिकांत ओक
होबासराव आणि अन्य मित्रांनो,
नाडीग्रंथांच्या बाबत प्राथमिक माहितीसाठी कृपया आपण रात्री ९ नंतर संपर्क करावा. ही विनंती.
3 Dec 2013 - 11:41 am | स्पंदना
हतिशय ह्योग्य ह्व्यक्ती!!
2 Dec 2013 - 4:26 pm | ग्रेटथिन्कर
छान
2 Dec 2013 - 5:06 pm | विनायक प्रभू
९ नंतर का? अगदी योग्य वेळ नाडी समुपदेशनासाठी?
2 Dec 2013 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा
एकेकाची वेळ असते हो! =))
3 Dec 2013 - 11:45 am | अनिरुद्ध प
आपली रात्री बारा नन्तरची बरोबर ना आत्माराम?(असे आपणच एका धाग्यावर उध्रुत केले होते)
3 Dec 2013 - 1:18 pm | अत्रुप्त आत्मा
त्या लोकगंगेत तरंगणाय्रा गोष्टी कधीकधी आत्मा'मत म्हणून उध्रुत कराव्या लागतात रे... कोल्ह्या! ;) तू तुझा अग्नी जरा शांत ठेव पाहू! :p
3 Dec 2013 - 5:38 pm | साती
ही वरची पट्टी मला कुणी ईसीजी म्हणून आणुन दिली असती तर
'अॅट्रीयल फिब्रिलेशन विथ ए- वी डिसोसिएशन' असा याचा अर्थं मी काढला असता.
'जातक "वर" जायच्या मार्गावर आहे' असे भविष्यकथन केले असते.
;)
लिपी तामिळ वाटत नाही.
।
3 Dec 2013 - 6:08 pm | प्रकाश घाटपांडे
:)
6 Dec 2013 - 1:49 am | शशिकांत ओक
मित्रा,
नाडीग्रंथ ताडपत्राचा एक फोटो सादर केला आहे. पुर्वी आपण म्हणाला होतात, (आपण स्वतः व कै. रिसबूड )
आता आपल्याला तेंव्हा अशक्य असलेली गुरूकिल्लीची बाब मिपावरील सदस्याने त्या नाडीग्र्ंथाच्या पट्टीतील मजकूर वाचायला त्याची तयारी असल्याचे मान्य केल्याने साध्य होणार आहेत. तेंव्हा आपण त्यांच्याकडून पट्टीतील मजकूर किंवा आपण म्हटल्याप्रमाणे फक्त नावाची शहानिशा करायला त्यांना प्रेरणा द्यावी ही विनंती.
या धाग्यावरील एका वेगळ्या प्रतिसादात मी त्यांना म्हटले आहे -
आता आपणाकडून काय प्रगती आहे कळवावे.
आपणास मजकुर वाचायला जमला असेलच नाही तर, किंवा अडले तर तमिळजाणकार मित्रांकडून व तमिळभाषेच्या पुस्तकावरून त्यातील तमिळ लेखनाचा अभ्यास करून त्यातील मजकूर आपण मिपावर सादर करणार आहात अशी अपेक्षा करत आहे.
16 Dec 2013 - 8:54 pm | शशिकांत ओक
मित्रा, वरीलसाठी काही लिखाण प्रतिसादात केले गेले. त्यातील काही मजकूर आपल्या माहितीचा असावा. असे वाटले म्हणून विचारणा.
5 Jan 2014 - 9:03 pm | शशिकांत ओक
आपले उत्तराच्या प्रतीक्षेत...
6 Jan 2014 - 1:56 am | बर्फाळलांडगा
अन प्रतिक्षेतही बघून मौज वाटली. आज सूर्य पश्चिमेला उगवला असावा
8 Jan 2014 - 7:56 pm | टवाळ कार्टा
मी पण
9 Jan 2014 - 12:51 am | शशिकांत ओक
टाळ्यापिटूंसाठी दहा मिनिटांची मजा.
ओक नाडीत फसले तर वावा, नाही फसले तरी वावा...
ज्यांनी हा नाडीपट्टीच्या फोटोचा फेर धरला ते तर केंव्हाच पसार झालेत... आता कोणाची प्रतीक्षा करतायत ओक, कोण जाणे....
9 Jan 2014 - 1:23 am | बर्फाळलांडगा
टिका कारान्ना छटी का दूध याद दिला दिया आपण.... सुरेख_/\_