विज्ञानाच्यादृष्टीकोनातून मरणोत्तर अस्तित्व - प्रकरण 4

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
10 Jul 2012 - 12:54 am

विज्ञानाच्यादृष्टीकोनातून मरणोत्तर अस्तित्व - प्रकरण 4

परामानसशास्त्र मरणोत्तर अस्तित्वाचे ही संशोधन करते आणि म्हणून परामानसशास्त्राच्या बुद्धिवादी विरोधकांना ओघानेच नाकारणे भाग पडते.... काही जण मात्र मरणोत्तर अस्तित्व नाकारण्यासाठी अती्ंद्रिय शक्तिचा आधार घेतात. म्हणजे हे लोक अतींद्रिय शक्तीच्या अस्तित्वामुळे मरणोत्तर अस्तित्वाच्या तथाकथित पुराव्याची उपपत्ती लावता येते व त्यामुळे मरणोत्तर अस्तित्व मानण्याची गरज नाही असे म्हणतात, अशा रितीने मरणोत्तर अस्तित्व नाकारण्यासाठी अतींद्रीय शक्तिचे अस्तित्व मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही हे या लोकांना मान्य करावे लागत असल्यामुळे त्यांना बुद्धिवादी म्हणता येत नाही तरीही ते स्वतःला विज्ञानवादी मात्र म्हणवून घेतात !....

....मनाचा उगम भौतिक असेल, तर मेंदूच्या कोणत्यातरी एका भागात जाणिवेचे केंद्र असावे असे मानणे अस्थानी ठरणार नाही पण जाणिवेचे असे केंद्र मेंदूत मज्जाशास्त्रज्ञांना सापडलेले नाही( देकार्त या फ्रेंच तत्ववेत्त्याने ‘पायनील ग्रंथी’ हे जाणीवेचे इंद्रिय मानले होते.)... स्वतंत्र स्मरण केंद्र ही मेंदूत सापडलेले नाही....

.... केनेडियन मज्जाशास्त्रज्ञ विल्डर पेनफिल्ड याने तीस वर्षांच्या मेंदूवर संशोधनानंतर पुढील निष्कर्ष काढला आहे - मेंदूतील मज्जापेशीतील प्रक्रियांच्या आधारावर मनाची उपपत्ती लावणे कधीच शक्य होणार नाही. मन हे स्वतंत्र तत्व मानणेच भाग आहे." -( It will always be impossible to explain the mind on the basis neuronal action within the brain... the mind must be viewed as a basic element in itself"....)

... मन मेंदूहून वेगळे नसल्याबद्दल जे युक्तिवाद (वर) दिले आहेत ते युक्तिवाद करणाऱ्यांना या मेंदूशास्त्रातील शोधांची कल्पना नाही काय? जरूर आहे, पण ते युक्तिवाद करताना एक तर त्या शोधांकडे ते पुर्णपणे दुर्लक्ष करतात किंवा यंत्रवाद खरा ठरवणारे शोध भविष्यात लागतील, अशी आशा बाळगतात. के. आर. पॉपर या विचारवंताने असा प्रकारच्या भौतिकवादी दृष्टीकोणाला Promissory Materialism (वचन देणारा भौतिकवाद) असे म्हटले आहे. (म्हणजे भविष्यकाळात सिद्ध करू असे वचन देणारा भौतिकवाद. किती वर्षांनी ही वचनपुर्ती ते करणार आहेत हे तेच जाणोत!) खरे तर याला आडमुठा भौतिकवाद हे नाव जास्त शोभेल. कारण शास्त्रीय दृष्टी बाळगणारा मनुष्य आपली आवडती मते बाजूला ठेवून शास्त्रीय पुरावे प्रांजळपणे मान्य करतो. स्वतः पेनफिल्ड हा मज्जाशास्त्रज्ञ आपले शोध लागण्यापुर्वी भौतिकवादीच होता. तसे हे लोक आपला दृष्टीकोण बदलत नाहीत, इतकेच नव्हे तर आपल्या भौतिकवादातील अडचणींचा विचार व त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्नही करत नाहीत. यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे परामानस शास्त्रातील शोध होय. या शोधाविषयीही ते वाळूत डोके खुपसताना आढळून येतात....

.... आता अभौतिक मन भौतिक मेंदूपासून व शरीरामार्फत कसे कार्य करते बरे? हा प्रश्न आहे. कार्यकारणभावाच्या नियमाला - एकाच पातळीवर चालणारी ती प्रक्रिया आहे या समजुतीला - त्यामुळे बाधा येत नाही काय?....
.... आता मन अभौतिक असेल तर व मनाला इच्छाशक्तीने शरीराची हालचाल होत असेल तर शक्तीच्या अविनाशित्वाच्या तत्वाला बाधा येत नाही काय?...

... समजा या दोन मितीच्या जगातील प्राण्यांना असे आढळून आले की, त्यांच्या पैकी काहीं व्यक्तींना भविष्यज्ञान होऊ शकते, तर ते आपला दृष्टीकोण बदलतील व भविष्य कालाचे ज्ञान हे अतींद्रिय ज्ञान असूनही अतींद्रिय ज्ञानवस्तू वस्तूतः भविष्यकालात नसून वर्तमान कालातच आहे, पण आपल्या दोन मितीच्या जगातील ती नसून तीन-मितीच्या जगातील वर्तमानकालात आहे, असा सिद्धांत ते मांडतील. हे तीन मितीचे जग जाणण्यासाठी आम्हाला आपले दोन मितीचे जग ओलांडून जावे लागेल म्हणजेच मरावे लागेल, असे ते म्हणतील. म्हणजेच मरणोत्तर तीन मितीच्या जगाच्या अस्तित्वाचा सिद्धांत ते अतीद्रिय भविष्य-ज्ञानाच्या आधारावर मांडतील.

दोन मितीच्या जगातील प्राण्यांच्या जागी तीन मितीच्या जगातील आम्ही आहोत अशी कल्पना केली व आमच्यातील काही व्यक्तींना भविष्य ज्ञान होऊ शकते असे आम्हाला आढळून आले, तर आम्हाला असाच सिद्धांत मांडावा लागेल. आणि प्रत्यक्षात मनुष्याला भविष्य ज्ञान होऊ शकते, असे प्रयोगांती आढळून आले आहे. आणि त्याच्या आधारावर चार (अगर जास्त) मितीचे मरणोत्तर जग असल्याचा सिद्धांत तात्विकदृष्ट्या आम्हाला स्वीकारावा लागेल. ...

टीप 1 - मरणोत्तर अस्तित्वाची चर्चा पाश्च्यात्य देशात माध्यमांच्या संदर्भात जास्त करण्यात आलेली असून लेखनमर्यादेमुळे ती चर्चा येथे टाळली आहे. मरणोत्तर अस्तित्वाचे वैज्ञानिक दृष्टीकोणातून, संशोधन करण्यासाठी इंग्लंडमधे स्थापन झालेल्या अतींद्रिय विज्ञान संघाचे (S.P.R.) संस्थापक शास्त्रज्ञ मृत्यु पावल्यानंतर माध्यमांच्यामार्फत त्यांनी आपले मरणोत्त अस्तित्व, सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यासाठी एक आगळे तंत्र त्यांनी अवलंबिले असून ते Cross Correspondence या नावाने प्रसिद्ध आहे. यात मायर्स हे प्रमुख होते. हॉजसन व गुर्नी यांनीही हा प्रयत्न केला. शास्त्रज्ञांनी Cross Correspondence चे प्रकरण खोलात जाऊन तपासले, तर त्यांची स्वतः मायर्सच मरणोत्तर जगातून संदेश पाठवत असल्याची खात्री पटल्याशिवाय राहाणार नाही इतके ते पुरावे निर्देशक (Evidential) आहेत.
गार्डनर मर्फी यांनी मरणोत्तर अस्तित्वाचे तीन निकष ठरवले आहेत. ते निकष म्हणजे स्मरण, व्यक्तिमत्व, आणि सहेतुकता. या तीनही निकषांवर Cross Correspondence चा पुरावा उतरतो. वुइल्यम जेम्स सारख्या काही शास्त्रज्ञांनी अगोदर कोण मरेल त्याने त्याने आपले मरणोत्तर अस्तित दुसऱ्याला सिद्ध करून दाखवायचे असे आपापसात ठरवले व त्यासाठी काही सांकेतिक खुणा ही ठरवल्या. या पद्धतीने जेम्स हिस्लॉपला अगोदर मेलेल्या वुइल्यम जेम्सने आपले मरणोत्तर अस्तित्व दाखवून दिले. व हिस्लॉपला ते पटलेही. अतींद्रिय शक्ती खोटी म्हणून माध्यमांवर लबाडीचा आरोप व हल्ला आपल्या हयातभर करणाऱ्या हुडिनी या जादुगारानेही आपल्या पत्नीशी असा एक करार केला होता व त्याच्या पत्नीला त्याचे मरणोत्तर अस्तित्व व पटलेही होते.
या शिवाय इथे वाचा

  • यंत्रवाद युक्तिवादांना उत्तर
  • यंत्रवाद आणि अतीद्रियवाद
  • नेचर नियतकालिकाने 81साली जाळण्याच्या लायकीचे पुस्तक अशी संभावना केलेल्या शेल्ड्रेक यांच्या A New Scoence of Life लेखनाची सत्यता तपासायसाठी न्यू सायंटिस्ट नियतकालिकाने स्पर्धा आयोजित केली त्यात 1986 साली शेल्ड्रेकचा सिद्धांत बरोबर असल्याचे काही प्रयोगांनी सिद्ध झाले.
मांडणीविचारआस्वाद

प्रतिक्रिया

कुणा (कुणा) चे मरणोत्तर अस्तित्व म्हणता ?
फक्त मानव प्राण्याबद्दल हा धागा आहे की झाडे, पाने, फळे, फुले, शेवाळे, बुरशी, अमीबा, बेडके, कोळी, वटवाघुळे, मांजरे, पक्षी, गाई-म्हशी, डायनोसार, गेंडे, खेकडे, प्रवाळ, मासे, डास, माश्या, मुंग्या, साप, मुंग्या, झुरळ, पाली, रातकिडे, डेकूण, वाळवी, उंट,तरस, कासवे ..................वगैरे लाखो प्रकारच्या सजीवांच्या मरणोत्तर अस्तित्वाबद्दल?

तसेच मरणोत्तर अस्तित्व हे शरिराचे, मनाचे, आत्म्याचे, की आणखी कशाचे ? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास काही चर्चा होउ शकते.

आनंदी गोपाळ's picture

12 Jul 2012 - 10:46 pm | आनंदी गोपाळ

की झाडे, पाने, फळे, फुले, शेवाळे, बुरशी, अमीबा, बेडके, कोळी, वटवाघुळे, मांजरे, पक्षी, गाई-म्हशी, डायनोसार, गेंडे, खेकडे, प्रवाळ, मासे, डास, माश्या, मुंग्या, साप

बेडूक चे अनेकवचन अनेक बेडूक असेच होईल असे वाटते. बेडके चा जरा वेगळा अर्थ होतो मराठी मध्ये :)

मराठमोळा's picture

10 Jul 2012 - 5:41 am | मराठमोळा

मला वाटते की तुम्ही आता मरणोत्तर (म्हंजे डु-आयडी काढून नव्हे) इथे लेख लिहुन मगच तुमचे अस्तित्व सिद्ध करावे मगच आम्हाला तुमचे सगळे या लेखासहित ईतर सर्व लेख पटतील. :) काय म्हणता?
तो पर्यंत काहीच लिहु नका. म्हणजे तुमच्या बोलण्यावर/लिहिण्यावर सर्वांना विश्वास बसेल.

वीणा३'s picture

10 Jul 2012 - 7:35 am | वीणा३

कसली झोप लागली हो हा लेख वाचून. शक्तीच्या अविनाशित्वाच्या तत्वाला बाधा नंतरच काहीच आठवत नाही.
असो, उद्या जर मला कोणी रिकामं ताट देऊन सांगितलं कि ते पंचपक्वनानी भरलंय जेवायला सुरवात कर, तर मी तरी नाही जेवू शकणार, मग भले मला आडमुठी म्हटलं तरी चालेल :)

चित्रगुप्त's picture

10 Jul 2012 - 10:06 am | चित्रगुप्त

(वृत्तः मरणवेदना ... चालः अजुनी जिवंत आहे... मात्रा: एकशेसव्वीस)

तिच्या मच्छरदाणीत घुसलेले
मोजून एकशेसव्वीस डास
रात्रभर जागून मारले
तरी कोण डसत होतं
याचं रहस्य आता उमगलं
ते त्या एकशे सव्वीसांचं
मरणोत्तर अस्तित्व होतं

तिच्या म्हणजे कुणाच्या म्हणाल
तर ते आमचं गुपित आहे
म.अ. चा पुरावा मात्र
आता आमच्या हाती आहे

डास गेले वर
धागा आला वर.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2012 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा

ते त्या एकशे सव्वीसांचं
मरणोत्तर अस्तित्व होतं

तत्वत: बरोबर आहे हो.. पण या मितीतून त्यामितीत जाणे अतएव मरणे या प्रक्रियेचा जबरदस्त धोंडा मधे येत असल्याने या मितीत बसून त्या मितीचं जिवंतपणी काही सिद्ध करता येण्याचा प्रश्नच येत नाही. अशा वेळी फक्त असं काही असण्याची तात्विक शक्यता आहे असं म्हणण्याच्या वर काहीच करता येत नाही..

कितीही "उदार" ,"सर्वसमावेशक","मोकळाढाकळा" किंवा कसाही दृष्टिकोन ठेवला तरी .. कारण दृष्टिकोन कितीही मोठा केला तरी सध्या लागू असलेली मिती ओलांडून अन्य मितीत जाण्याइतका मोठा तो बसल्याजागी होऊ शकत नाही.

तिघाजणांनी एकमेकांनाच मरणोत्तर अस्तित्व दाखवून देण्यात काय पॉईंट आहे? मी, विमे आणि प्रास यांनी एकमेकांत ठरवलं की जो आधी मरेल त्याने इतर दोघांना संदेश पाठवायचे, तरी अशा प्रयोगात काही दम नाही. मी, विमे आणि प्रास यांनी असं ठरवलं की जो कोणी मरेल त्याने हा सर्व प्लॅन माहीत नसलेल्या स्पा ला घाबरवून दाखवायचं आणि इतर दोघांनी ते पाहून खात्री करुन घ्यायची, तर काहीतरी अर्थ आहे..

ऑन अ सीरियस नोट. मला वाटतं की काही गोष्टींचा शोध न घेतलेलाच बरा असतो.. शून्याला भागत बसणे किंवा दातात काडी चावत बसणे किंवा आपल्याच शेपटाचा पाठलाग करत गोलगोल फिरुन आपण फार पुढे आलो असं समजणे या सर्वांपेक्षा तातडीचा फायदा देणारं संशोधन बरं.. :)

संकुचित आधुनिक विज्ञानाचा वापर करुन या भासमान त्रिमितीय जगात विमाने, मोबाईल, कॅमेरे, कृत्रिम अवयव, उत्तमोत्तम खाद्यपदार्थ, लाईफसेव्हिंग ड्रग्ज वगैरे अशा नव्यानव्या "उपयोगी" वस्तू शोधण्याकडे लक्ष घालण्यात मतलब आहे.. कारण जगायचं इथेच आहे.. त्यात मजा आणूया.. :)

मेल्यावर चार किंवा क्ष मितीय विश्वात गेलो तर जाऊ तेव्हाच तिथलं तिथे पाहू म्हणे... !!

मूळ लेखापेक्षा प्रतिसाद सार्थक असतो म्हणतात तो असाच.

गविंशी तंतोतंत सहमत आहोत ब्वॉ आपण.....

गोंधळी's picture

10 Jul 2012 - 1:22 pm | गोंधळी

ऑन अ सीरियस नोट. मला वाटतं की काही गोष्टींचा शोध न घेतलेलाच बरा असतो.. शून्याला भागत बसणे किंवा दातात काडी चावत बसणे किंवा आपल्याच शेपटाचा पाठलाग करत गोलगोल फिरुन आपण फार पुढे आलो असं समजणे या सर्वांपेक्षा तातडीचा फायदा देणारं संशोधन बरं.

अगदी सहमत.

नितिन थत्ते's picture

10 Jul 2012 - 2:19 pm | नितिन थत्ते

>>कितीही "उदार" ,"सर्वसमावेशक","मोकळाढाकळा" किंवा कसाही दृष्टिकोन ठेवला तरी .. कारण दृष्टिकोन कितीही मोठा केला तरी सध्या लागू असलेली मिती ओलांडून अन्य मितीत जाण्याइतका मोठा तो बसल्याजागी होऊ शकत नाही.

मन इतके खुले असू नये की मेंदू बाहेर सांडून जाईल. :)

जिवंतपणी (मरणोत्तर अस्तित्व) काही सिद्ध करता येण्याचा प्रश्नच येत नाही.

खरे आहे. तरीही परामानसशास्त्राचे विचारक काही असे प्रयोग करून पहात असतात.त्यांच्या कार्याची झलक लेखात आहे.

विनीत संखे's picture

10 Jul 2012 - 11:01 am | विनीत संखे

एलियन जीवसृष्टी आणि मृत्यूपश्चात पृथ्वी सोडून गेलेल्या जीवांनी पृथ्वीशी केलेला संपर्क ह्या कल्पनेचा गाभा घेऊन बनवलेली हॉलिवूडची एक उत्तम विज्ञानकथा ...


सौजन्यः http://www.imdb.com/title/tt0118884/

सौजन्यः यूट्युब.

आळश्यांचा राजा's picture

17 Jul 2012 - 7:02 pm | आळश्यांचा राजा

एलियन जीवसृष्टी आणि मृत्यूपश्चात पृथ्वी सोडून गेलेल्या जीवांनी पृथ्वीशी केलेला संपर्क ह्या कल्पनेचा गाभा

सिनेमा छानच आहे. पण कल्पना अशी नाही. ज्या पर जीवांनी (एलियन्स) एली ला यानातून पृथ्वीबाहेर नेलेले असते, त्यांनी एलीशी संपर्क करण्यासाठी तिच्या मृत वडीलांचे रुप (फॉर्म) घेतलेले असते. हे रुप त्यांनी एलीच्या मेंदूतील स्मृती वाचून घेतलेले असते. (त्यामुळे त्या रुपात काही उणीव असल्यास एलीला ती समजली नसती; पण एलीच्या आईला नक्कीच समजली असती, कारण तिच्या स्मृतीतील एलीचे वडील वेगळे असणार.)

शशिकांत ओक's picture

12 Jul 2012 - 10:44 am | शशिकांत ओक

मित्रांनो,
एके ठिकाणी गेरंट थिंकर नामक व्यक्तिने म्हटले आहे...

...मनाचा उगम भौतिक असेल, तर मेंदूच्या कोणत्यातरी एका भागात जाणिवेचे केंद्र असावे असे मानणे अस्थानी ठरणार नाही पण जाणिवेचे असेकेंद्र मेंदूत मज्जाशास्त्रज्ञांना सापडलेले नाही( देकार्त या फ्रेंच तत्ववेत्त्याने ‘पायनील ग्रंथी’ हे जाणीवेचे इंद्रिय मानले होते.)... स्वतंत्र स्मरण केंद्र ही मेंदूत सापडलेले नाही...>>>>> consciousness explained हे डॅनियल डेनेट यांचे पुस्तक वाचा. भौतिक प्रक्रियेतुन जाणिव कशी जन्माला याचे त्यांनी विवेचन केले आहे.
जाणिव हा Emmergent phenomenon आहे तिथे reductionist view वापरुन फायदा नाही.उदा:- एखाद्या कारचे सुटे भाग स्टेरिंग, चाके, गिअर, इंजिन एखाद्या ठिकाणी वेगवेगळे करुन ठेवले तर त्याचा प्रवासासाठी काहीच उपयोग होणार नाही, परंतु सर्व सुटे भाग एका विशिष्ट रचनेत(pattern)जोडले तर वाहन तयार होते. थोडक्यात "whole "whole is greater than its parts " is greater than its parts "हे तत्व मेंदूच्या बाबतीत लागु होते. एखाददुसर्या न्युरॉनमध्ये जाणिव कधीच सापडणार नाही.परंतु अब्जावधी न्युरॉन्स आणि सिनॅप्सेस जेव्हा patternमध्ये कार्यरत होतात तेव्हा जाणिवेचा उगम होतो.
emmergent materialism ची थोडी माहिती करुन घेणे गरजेचे आहे.

Whole is greater than its parts
प्रा. गळतगे यांचे चिंतन असेच सुचवते. त्याचे विवेचन पुढील लेखातून येईल.

आनंदी गोपाळ's picture

12 Jul 2012 - 10:51 pm | आनंदी गोपाळ

जे क्रेडिट देताहात, कमीतकमी तितके तरी त्या 'ग्रेटथिंकर' या मायबोली आयडीला नीट द्या. तुमच्या याच जिलबीवरचा तिथला हा प्रतिसाद तुम्ही इथे डकवला आहात. त्यांनी तुम्हाला सहमती दाखवलेली नाहिये माबो च्या धाग्यावर.

श्रावण मोडक's picture

12 Jul 2012 - 1:14 pm | श्रावण मोडक

तुम्ही लिहित रहा, ओक. या स्वरूपाच्या लेखनावर याआधीच मी मेलो. त्यानंतरही इथं प्रतिसाद देतोय म्हणजे माझं मरणोत्तर अस्तित्त्व आहे हे इथल्या 'मूर्खां'ना कळत नाही. तुम्ही लिहित रहा.
हे गळतग्यांनाही कळवा. त्यांना म्हणावं, त्यांच्या सिद्धांताचा पुरावा आहे. तो मी! माझ्याशी ते चर्चा करू शकतील. कारण तसंही माझं मरणोत्तर अस्तित्त्व आहेच. तुम्ही लिहित रहा.
मी अगदी सदेह अस्तित्त्वात आहे. तेव्हा त्याविषयी कोणाही विज्ञानवाद्याला शंका घेण्याचं कारण नाही. मी मेलो आहे हेही वास्तव आहे. तेही मी लिहून ठेवलं आहे याच संस्थळावर काही ठिकाणी. माझं मरणोत्तर अस्तित्त्व आहे. गळतग्यांचा सिद्धांत खरा आहे हो. तुम्ही लिहित रहा.

शशिकांत ओक's picture

12 Jul 2012 - 9:51 pm | शशिकांत ओक

चिठ्ठी आय़ी है, आयी है - परलोक से....
बडे दिनों के बाद ... हमसब को कर के याद....
चिठठी आयी है.... सावन से...

दोघाही प्रतिसादांना -१

चित्रगुप्त's picture

14 Jul 2012 - 2:10 am | चित्रगुप्त

माझे दोन्ही प्रातिसाद वरकरणी विनोदी वाटले, तरी मला तसे अभिप्रेत नाही.

वैद्यकशास्त्राच्या प्रयोगांसाठी जसा गिनिपिग इ. प्राण्यांचा उपयोग केला जातो, तसे मरणोत्तर अस्तित्वाबद्दल प्रयोग बंदिस्त जागेत/प्रयोग शाळेत केले जाऊ शकतात.. अर्थात तसे केले जात असतील तर त्याची माहिती ओक/गळतगे यांनी द्यावी.

माझ्या पहिल्या प्रतिसादातील प्रश्नाचे उत्तर ओकांनी कृपया द्यावे.

शशिकांत ओक's picture

14 Jul 2012 - 9:47 pm | शशिकांत ओक

चित्रगुप्त व मित्र हो ,
पहिल्या प्रतिसादाचे उत्तर लेखात आहे - स्मरण, व्यक्तिमत्व, आणि सहेतुकता.
प्रयोगाबाबत - जे मानवी प्रयोग केले गेले ते टीप १ मधे आहेत.
गॅरी श्वार्ट्झ नामक व्यक्तीने माध्यामांकडून अनेक प्रयोग करून मृत व्यक्तींशी संपर्क करून दिले जातात त्यांच्यावर प्रयोग केले. याशिवाय आणि कोणी अन्य योनीकरता केले असल्यास त्यांनी भर घालावी.
त्यांनी तेथे जे म्हटले आहे की....
“I’m not hopeful that the super-sceptics will accept any degree of data, but I’m not doing research for them. We’re just doing the work. We want to know if it is true. Our project is called Veritas (Latin for truth) for a reason.”