आनंद - कार्लसन डाव ८

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
19 Nov 2013 - 3:01 pm

शेवटल्या पाच डावात आनंद काय चमत्कार करणार?
पहिली मूव मॅग्नुसची मूव काय असेल?
कॅन आनंद क्रॅक कोड मॅग्नुस?

चला बघूयात गेम ८.

Play Online Chess[Event "FWCM 2013"][Site "Chennai"][Date "2013.11.19"][Round "8"][White "Carlsen, Magnus"][Black "Anand, Viswanathan"][Result "1/2-1/2"][WhiteELO "2870"][BlackELO "2775"]%Created by Caissa's Web PGN Editor1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. O-O Nxe4 5. Re1 Nd6 6. Nxe5 Be7 7. Bf1 Nxe58. Rxe5 O-O 9. d4 Bf6 10. Re1 Re8 11. c3 Rxe1 12. Qxe1 Ne8 13. Bf4 d5 14. Bd3g6 15. Nd2 Ng7 16. Qe2 c6 17. Re1 Bf5 18. Bxf5 Nxf5 19. Nf3 Ng7 20. Be5 Ne621. Bxf6 Qxf6 22. Ne5 Re8 23. Ng4 Qd8 24. Qe5 Ng7 25. Qxe8+ Nxe8 26. Rxe8+Qxe8 27. Nf6+ Kf8 28. Nxe8 Kxe8 29. f4 f5 30. Kf2 b5 31. b4 Kf7 32. h3 h6 33.h4 h5 34. ½-½ 1/2-1/2document.getElementById("cwvpd_1384926438").value=document.getElementById("cwvpg_1384926438").innerHTML;document.getElementById("cwvfm_1384926438").submit();

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:03 pm | चतुरंग

ई५, एफ६, सी ६ उंट बी ५ बर्लिन अगेन!!
आनंद काय करतो आहे? इतक्या डावात आधी बर्लिन झालाय.

आतिवास's picture

19 Nov 2013 - 3:07 pm | आतिवास

इकडं 'बर्लिन वॉल' अजून कोसळायची बाकी आहे :-)

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:06 pm | चतुरंग

डावाच्या मध्यात मॅग्नुसचा हत्ती आणि प्यादे आलेय. आता बी ६ प्यादे घेऊन कर्णात उंट काढणार का आनंद? का काळा उंट लगेच हाकलून लावेल? तसेच झाले, हत्ती मागे गेला.

पहिल्या ५-७ डावातच दोघांचे घोडे गेले....रपारप खेळतायत आज दोघंही.....

अग्निकोल्हा's picture

19 Nov 2013 - 3:08 pm | अग्निकोल्हा

चालु आहे, असेच चालु राहिले तर तास दिडतासात काम तमाम

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:10 pm | चतुरंग

तो आक्रमकपणा दिसत नाहीये जो आता खरंतर दिसायला हवा, कारण आता नाही तर तो कधी आक्रमक होणार?
तसाही तो दोन गुण मागे आहे, हीच संधी आहे आक्रमणाची. अन्यथा सामना गेल्यासारखाच म्हणावा लागेल!

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:15 pm | चतुरंग

जितकी मोहोरी पटावरुन जातील तितका डाव मॅग्नुसला सोपा हे समीकरण आहेच.
घोडा ई१ म्हणजे आता डी५ असे प्यादे टाकायचा विचार आहे. उंट एफ ४ आलाय. मॅग्नुस चटाचट खेळतोय.
आणि आनंदचे प्रेशर वाढवतोय. दोघांसाठी ही स्थिती पहिल्यांदाच आलीये बोर्डावर.

रमताराम's picture

19 Nov 2013 - 3:17 pm | रमताराम

या आनंदला हाणा रे कुणीतरी. बाहेर काढून घोडा परत पहिल्या फळीत मागे नेला पठ्ठ्याने. जवळ जवळ प्रत्येक गेममधे असं झालंय. एकुणच त्याच्या प्रवासाचं निदर्शक मानायचं की काय? :)

रमताराम's picture

19 Nov 2013 - 3:17 pm | रमताराम

या आनंदला हाणा रे कुणीतरी. बाहेर काढून घोडा परत पहिल्या फळीत मागे नेला पठ्ठ्याने. जवळ जवळ प्रत्येक गेममधे असं झालंय. एकुणच त्याच्या प्रवासाचं निदर्शक मानायचं की काय? :)

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:19 pm | चतुरंग

एरवी घोडी इतका उत्तम नाचवणारा आनंद यावेळी रिकिबीत पाय ठरत नाहीयेत त्याचे! ;)

संजय क्षीरसागर's picture

19 Nov 2013 - 3:17 pm | संजय क्षीरसागर

त्यामुळे त्याच्या खेळाला जास्त ऑप्शन्स निर्माण झालेत

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:18 pm | चतुरंग

आता पुढच्या खेळीत पांढरे उंट एक्सचेंज होणार का? घोडा डी२. मॅग्नुसने १५ खेळ्यांना फक्त ३ मिनिटे घेतलीत आणि आनंदने १५.

संजय क्षीरसागर's picture

19 Nov 2013 - 3:21 pm | संजय क्षीरसागर

कार्लसन आता राज्याच्या बाजूला हल्ला करुन त्या प्लँक्स खिळखिळ्या करेल

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:25 pm | चतुरंग

म्हणजे एफ, जी, एच प्यादी रेटणार म्हणाकी!

संजय क्षीरसागर's picture

19 Nov 2013 - 3:25 pm | संजय क्षीरसागर

आणि Qe2 ही अत्यंत भेदक खेळी आहे.

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:24 pm | चतुरंग

डबल करणार काय मॅग्नुस वजिराच्या पट्टीत? आनंद आज वेळ घेतोय खेळ्यांना. त्याच्या चेहेर्‍याकडे बघून डाव त्याला हवा तसा डेवलप झालाय की नाही हे समजत नाहीये. पोकर फेस!

ही हॅज अनलिमीटेड ऑप्शन्स टू अ‍ॅटॅक

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:28 pm | चतुरंग

बघूयात आनंदचा डिफेन्स काय करतो ते.

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:27 pm | चतुरंग

हत्ती + वजीर मॅग्नुसने. पहिली वेगळी खेळी. आनंदच्या पांढर्‍या उंटाला आता चांगली जागा हुडकावी लागेल कारण बी एफ ५ झाले तर थेट मारामारी करणार कार्लसन असे दिसते.

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:29 pm | चतुरंग

कॉम्बिनेशनने बॅकरँक मेट आहे!!

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:35 pm | चतुरंग

मागे जाऊन परत खेलून बघा!

संजय क्षीरसागर's picture

19 Nov 2013 - 3:32 pm | संजय क्षीरसागर

कार्लसनची सगळी मोहोरी आनंदच्या राज्याकडे रोखलीयेत आणि आनंदची मात्र अडकून पडलीयेत किंवा दिशाहिन दिसतायंत

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:34 pm | चतुरंग

आता घोडी डावाच्य मधे आलीत. मॅग्नुसची घरची तयारी जोरात झालीये. तो खेळायला अजिबात वेळ घेत नाहीये. फक्त ६ मिनिटात त्याने १९ खेळ्या केल्यात! अमेझिंग!

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:37 pm | चतुरंग

अरे आनंदा असे काय चालले आहे? आजही ग्राईंडिंग लाँग गेम किंवा ड्रॉ असे भविष्य वर्तवावे का?

निशांत५'s picture

19 Nov 2013 - 3:37 pm | निशांत५

थोडा वेळ द्या आन्द्याला , करेल कहितरि तो लवकर

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:40 pm | चतुरंग

अपेक्षित होतीच खेळी. कारण आता तो अजून एक उंट डावातून काढून टाकायला बघतोय. सरळ आहे ड्रॉ चालतोय त्याला.

रमताराम's picture

19 Nov 2013 - 3:44 pm | रमताराम

मला वाटतंय की २ पॉईंट लीड हा तसा खूप मोठा आहे. मॅग्नस अजून एक दोन ड्रॉ घेईन फटाफट आणि नंतर शेवटचे दोन तीन डाव एकदम आक्रमक खेळून आनंदला पुरता भुईसपाट करण्याचा प्रयत्न करेल. आनंदला नव्या खेळ्या शोधण्यात सातत्याने अपयश येते आहे. मॅग्नस अगदी आरामात आणि ताबडतोब प्रत्युत्तर देतो आहे.

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 4:07 pm | चतुरंग

तो भलताच अनप्रेडिक्टेबल आहे हे नक्की! संपूर्णपणे गेम ऑफ इंट्यूशन आहे.

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2013 - 3:41 pm | प्रसाद गोडबोले

आज काहीतरी कर रे बाबा ..
.....की १० , ११ आणि १२ व्या गेमात फिल्मी शेवट करायच ठरवलय्स तु आनंदा ??

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:44 pm | चतुरंग

सोडून सोडा, नॉट अगेन्स्ट मॅग्नुस! ही इज टोटली डिफरंट क्लास!!

संजय क्षीरसागर's picture

19 Nov 2013 - 3:41 pm | संजय क्षीरसागर

हा कार्लसन जिनियस आहे. त्याला फक्त f6 ओपन करायचंय की झालं काम!

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:43 pm | चतुरंग

तर मॅग्नुसचा घोडा मस्त डावाच्या मधे ठाण मांडून बसतोय! त्याला उंट कुठेच हलवता येत नाहीये आहे तिथेच ठेवयचा नाहीतर एक्सचेंज.

संजय क्षीरसागर's picture

19 Nov 2013 - 3:44 pm | संजय क्षीरसागर

सरळ आहे ड्रॉ चालतोय त्याला.

नेव्हर! आतापर्यंतच्या अनुभवावरनं ही ऑलवेज हेडस फॉर अ वीन.

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:46 pm | चतुरंग

आहेच. झाले उंट गेले. आनंदचा वजीर आणि घोडा डावाच्या मधे आलेत. आणि कालूचा घोडा ई५ असा मस्त येऊन बसलाय.

संजय क्षीरसागर's picture

19 Nov 2013 - 3:47 pm | संजय क्षीरसागर

लिहून घ्या.

मग वजीर एफ ५ आणि एफ ६ असे प्यादे रेटून घोड्याला मागे रेटायला हवा!
अन्यथा ते घोडं नुइसन्स ठरणार.

ऋषिकेश's picture

19 Nov 2013 - 3:50 pm | ऋषिकेश

:( हा गेम आनंद जिंकेलसं वाटत नाहिये :(
ड्रॉ मिळाला तरी पुरे

And he has made a lovely break through

खरंतर सांदीपन चंदा हा बराचसा मॅग्नुससारखा खेळतो असं म्हणतात म्हणून आनंदने त्याला टीममधे घेतला.
परंतु टीम कार्लसनने आत्तापर्यंत आनंदचे सगळे प्लॅन्स हाणून पाडलेत. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये!

निशांत५'s picture

19 Nov 2013 - 3:57 pm | निशांत५

प्लिज कौमेन्त्रि चालु ठेवा

रमताराम's picture

19 Nov 2013 - 3:58 pm | रमताराम

कार्ल्या असा काही तंगड्या पसरून बसतो की असं वाटतं आत्ता म्हणेल 'अरे काय टाईमपास लावलाय, जरा पटपट खेळ की.'

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 3:59 pm | चतुरंग

सर्वर बोबलला काय? मॅच दिसेनाशी झाली! :(

संजय क्षीरसागर's picture

19 Nov 2013 - 4:00 pm | संजय क्षीरसागर

आनंद ३९ मिनीटं मागे पडलाय का?

अग्निकोल्हा's picture

19 Nov 2013 - 4:03 pm | अग्निकोल्हा

आनंद आक्रमक बनतोय

संजय क्षीरसागर's picture

19 Nov 2013 - 4:06 pm | संजय क्षीरसागर

आता कार्लसन h4 खेळणार!

सुहासदवन's picture

19 Nov 2013 - 4:11 pm | सुहासदवन

काय?

रमताराम's picture

19 Nov 2013 - 4:13 pm | रमताराम

पॉन ऑन्ली एन्ड गेम. आता खरा हिरो दिसेल, दिसला पाहिजे.

चला मी आता झोपायला तरी जातो!

संजय क्षीरसागर's picture

19 Nov 2013 - 4:14 pm | संजय क्षीरसागर

वॉट अ जिनिअस प्लॅन कार्लसन!

वजीराने हत्ती मारुन वजीर घालवाचे कारणच काय म्हणतो मी कार्ल्या!

चला झाले मॅग्नुसला अजून अर्धा गुण मिळाला. आता तो फक्त दीड गुण मागे आहे अजिंक्यपदापासून.

रमताराम's picture

19 Nov 2013 - 4:15 pm | रमताराम

डेड एन्ड आल्रेडी. पॉन-कोन्स राजा भेदूच शकत नाही. हा ड्रॉच.

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 4:16 pm | चतुरंग

टीम आत्तापर्यंतरई पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे. कोणताही थरारक काउंटरप्ले ते जनरेट करु शकले नाहीत!
वी अलमोस्ट हॅव अ न्यू चँपिअन!!

रमताराम's picture

19 Nov 2013 - 4:18 pm | रमताराम

त्याची बॉडी-लॅंग्वेज आणि खेळातील रिस्क घेण्याबाबत अनिच्छा पाहता पुढे फार फरक पडेल असे म्हणणे फारच धाडसाचे ठरेल.

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2013 - 4:25 pm | प्रसाद गोडबोले

खरंच :(

आता इथुन पुढे जर आनंदने कम्बॅक केले अन च्यॅम्पीयनशीप राखली तर ते एक ग्रेट मिरअ‍ॅकल असेल !!

संजय क्षीरसागर's picture

19 Nov 2013 - 4:24 pm | संजय क्षीरसागर

येस! बॉबी फिशरनं म्हटलंय चेस इज नॉट अ लाँग ड्रॉन डिप थॉट गेम. यू जस्ट नीड टू हॅव अ थ्री-फोर मूव्हज शॉर्ट अँड फ्लॉलेस प्लान. विन दिज स्मॉल फाईटस अँड दॅट अल्टिमेटली विन्स द बॅटल!

मन१'s picture

19 Nov 2013 - 11:18 pm | मन१

व्ही व्ही एस लक्ष्मण -राहुल द्रविड ह्यांच्या भागीदारीसारखं काहीतरी होउन फॉलोऑन मिळालेला सामनाही आनंदनं जिंकून घ्यावा असं अजूनही वाटतय.
काही तरी चमत्कार व्हावा राव आता.

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 4:17 pm | चतुरंग

चेन्नैत सामना घेणे हे आनंदच्या पथ्यावर पडण्याऐवजी त्याला अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकणारे ठरले!!
आनंद त्याच्या शेलमधून बाहेर येऊ शकत नाहीये. ही इज टू डिफेन्सिव, वेरी अननॅचरल ऑफ हिम! :(

अग्निकोल्हा's picture

19 Nov 2013 - 4:18 pm | अग्निकोल्हा

खतरनाक!

मोहन's picture

19 Nov 2013 - 4:18 pm | मोहन

ड्रॉ !

निशांत५'s picture

19 Nov 2013 - 4:22 pm | निशांत५

ड्रॉ !

झाला का?

ऋषिकेश's picture

19 Nov 2013 - 4:31 pm | ऋषिकेश

चला .. नव्या जगज्जेत्याचं स्वागत करायच्या तयारीला लागायला हवं
:(

>>वेरी अननॅचरल ऑफ आनंद >> +१०००००००

रमताराम's picture

19 Nov 2013 - 4:36 pm | रमताराम

आमचा लाडका सांऽबर बाऽत आला. :)

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 4:40 pm | चतुरंग

ती चुकवायला नको! ;)

जेपी's picture

19 Nov 2013 - 4:51 pm | जेपी

आर्रर्र आलो तोपर्यंत संपलीपण मॅच . बायदहायवे ,
धन्यवाद समालोचनासाठी .

भडकमकर मास्तर's picture

19 Nov 2013 - 5:01 pm | भडकमकर मास्तर

ते डोपिन्ग कन्ट्रोल काय प्रकर्ण आहे?

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 10:12 pm | चतुरंग

या सामन्यासाठी केली आहे की नाही माहीत नाही.

चतुरंग's picture

20 Nov 2013 - 11:08 am | चतुरंग

ऑलिंपिक संघटनेशी सलग्न आहे त्यामुळे बुद्धीबळातही उत्तेजक द्रव्य चाचणी अनिवार्य झाली आहे.
आज आनंद आणि मॅग्नुस दोघांचे युरीन सँपल घेतले गेले. अर्थात हे आजच नाही तर २००६ पासूनच्या सग़ळ्या मोठ्या सामन्यात केले जाते आहे.

उन्मेष दिक्षीत's picture

19 Nov 2013 - 5:10 pm | उन्मेष दिक्षीत

नी सेकंड्स ची नावं डिस्क्लोज केल्यामूळं कार्ल्सन ला थोडा अंदाज आला असेल तो काय खेळु शकतो ते. त्याचाही त्याला थोडा फायदा झाला असेल असं वाटतं.
पण आता जर २ गेम्स हरलेतच तर थोडीशी रिस्क घेउन खेळायला काय हरकत आहे ? कि या लेवलला काउंटर प्ले जनरेट करणं तेव्हढं सोपं नाही आहे अँड दॅट वीन लॉस इक्वेशन कॅन अफेक्ट द प्राइज मनी अ‍ॅज वेल ?

आनंदनं डिस्क्लिज केलीत तशी कार्लसननं नै केली का?

उन्मेष दिक्षीत's picture

19 Nov 2013 - 6:23 pm | उन्मेष दिक्षीत

प्रेस कॉन्फरन्स मधे तो म्हणाला " I appreciate the openness of anand to disclose his team but i am not going to return the favour " :)

बॅटमॅन's picture

19 Nov 2013 - 6:33 pm | बॅटमॅन

ओह अच्छा, धन्यवाद!

सुहासदवन's picture

19 Nov 2013 - 9:34 pm | सुहासदवन

इट इज कॉल्ड एटिट्युड एण्ड प्रोफेश्नलिज्म.

मी आधीच म्हणालो होतो की पटाबाहेरच्या ह्या खेळात कार्लसनने आधीच बाजी मारली आहे.

कार्लसनला सुरुवातीपासूनच आनंदची टिम ओळखू शकली नाही.

हा असा अभ्यास असतो आपला आपल्या विरोधी पक्षाचा, ह्याच नाही तर इतर साऱ्याच खेळांमध्ये.
आपल्या भारतीयांना आपल्या शत्रूविषयी देखील खूप काळजी असते आणि तीच नडते आपल्याला.

जेव्हा आपण आपले पत्ते बाहेर काढले तेव्हा तो आपले पत्ते शो ऑफ करणार की नाही हे देखील कळले नाही.
त्याने पूर्ण टूर्नामेंट पोकर फेसने काढली. समोरच्याला आपल्या खेळाचा थांगपत्ताच लागू दिला नाही.

माझा आनंदच्या खेळावर पूर्ण विश्वास आहे. जरी तो अडचणीत आला असला तरी फाईटर आहे.
सो लेट्स होप फॉर द बेस्ट.

त्यात फारसे गुपित राखण्याजोगे काही नव्हते.
त्यामुळे कार्लसनला त्याचा वेगळा फायदा झाला असे वाटत नाही.
मॅग्नुसचा खेळ हा आनंद टीमने जोखला त्याहीपेक्षा वेगळा निघाला हे मात्र खरे.

उन्मेष दिक्षीत's picture

20 Nov 2013 - 1:25 pm | उन्मेष दिक्षीत

आनंद ने डिक्लेअर केली टीम तेव्हा कार्ल्सनचा चेहरा बघण्यासारखा होता. (आनंदनी पीटर लेकोचं नाव घेतलं तेव्हा पाहा) त्यानी एक्स्पेक्ट नव्हतं केलं की आनंद उत्तर देइल म्हणून. ही वॉज टोटली सरप्राइज्ड. तेव्हा त्याला अंदाज आला असेल व्हॉट टू एक्स्पेक्ट.

उन्मेष दिक्षीत's picture

20 Nov 2013 - 1:09 am | उन्मेष दिक्षीत

जेव्हा आनंदने टीम डिक्लेअर केली तेव्हा अगदी आनंदने डावाच्या आधीच "सायकोलॉजीकल बॅटल" सुरु केलंय वगैरे रिपोर्ट्स ! झालं उलटच.
सगळे म्हणत होते कार्ल्सन ला मॅच प्ले चा एक्स्पीरीअन्स नाही त्यामुळे त्याला अवघड जाइल वगैरे वगैरे.
तो झोप आल्यासारखा चेहरा करुन बसतो अगदी आरामात. कळत देखील नाही त्याला टेन्शन आहे की नाही ते :)

संजय क्षीरसागर's picture

20 Nov 2013 - 11:41 am | संजय क्षीरसागर

माझ्या मते कार्लसननं
25. Qxe8+
या जबरदस्त चालीनं, आनंदला निर्विवादपणे ड्रॉ करायला भाग पाडलं. याविषयी तुम्हाला काय वाटतं?

अग्निकोल्हा's picture

20 Nov 2013 - 2:26 pm | अग्निकोल्हा

ड्रो कार्लसन करत नाही फक्त आनंद करतो, कारण त्याला कसे जिंकावे हेच अजुन उमजले नाहिये!

बघुया आज काय होतय. बाकी तुमच्या विरुध्द एक बुध्दिबळाचा डाव खेळायची तीव्र इच्छा आहे येताय का ऑनलाइन ? कारण तुम्हाला सगले फक्त ऑनलाइन पसंत असते म्हणून विचारले

संजय क्षीरसागर's picture

20 Nov 2013 - 4:13 pm | संजय क्षीरसागर

What a joke! वरचा प्रतिसाद वाचा!
आतापर्यंतच्या अनुभवावरनं ही ऑलवेज हेडस फॉर अ वीन.

अग्निकोल्हा's picture

20 Nov 2013 - 4:47 pm | अग्निकोल्हा

ड्रो कार्लसन करत नाही फक्त आनंद करतो, कारण
त्याला कसे जिंकावे हेच अजुन उमजले नाहिये!

कार्लसन त्याला ड्रो करायला भाग पाडत नाही कारण आनंद कार्लसनला मुळात धोक्यातच आणत नाही.... तर तो आनंदला ड्रो करायला भाग पाडायच्या फंदात पडेल कशाला ?

अग्निकोल्हा's picture

20 Nov 2013 - 4:54 pm | अग्निकोल्हा

विजय मिळवण्या पासून रोखणे अथवा पराभव टाळणे पासून रोखणे या अर्थाने वापरले जाते. you seriously lack more than....