४-२ गुणांनी मागे पडलेल्या आनंदसाठी अत्यंत कळीचा डाव! आज त्याला जिंकायलाच हवे. ड्रॉ होणारा प्रत्येक डाव कार्लसनला विजयाच्या जवळ नेतोय अर्ध्या गुणानी.
कोणते ओपनिंग? कोणती स्ट्रॅटॅजी? २० कोटी लोक जगभरातून हा गेम फॉलो करताहेत. कदाचित क्रिकेट्पेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे!
चला गेम बघूयात.
Play Online Chess[Event "FWCM 2013"][Site "Chennai"][Date "2013.11.18"][Round "7"][White "Anand, Viswanathan"][Black "Carlsen, Magnus"][Result "1/2-1/2"][WhiteELO "2775"][BlackELO "2870"]%Created by Caissa's Web PGN Editor1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. d3 Bc5 5. Bxc6 dxc6 6. Nbd2 Bg4 7. h3 Bh58. Nf1 Nd7 9. Ng3 Bxf3 10. Qxf3 g6 11. Be3 Qe7 12. O-O-O O-O-O 13. Ne2 Rhe814. Kb1 b6 15. h4 Kb7 16. h5 Bxe3 17. Qxe3 Nc5 18. hxg6 hxg6 19. g3 a5 20.Rh7 Rh8 21. Rdh1 Rxh7 22. Rxh7 Qf6 23. f4 Rh8 24. Rxh8 Qxh8 25. fxe5 Qxe5 26.Qf3 f5 27. exf5 gxf5 28. c3 Ne6 29. Kc2 Ng5 30. Qf2 Ne6 31. Qf3 Ng5 32. Qf2Ne6 1/2-1/2document.getElementById("cwvpd_1384842384").value=document.getElementById("cwvpg_1384842384").innerHTML;document.getElementById("cwvfm_1384842384").submit();
प्रतिक्रिया
18 Nov 2013 - 5:09 pm | भडकमकर मास्तर
चला आता करमणूक ( पप) सुरू... दु:खी मनावर क्रीडापत्रकारांची खेळकर फुंकर...
18 Nov 2013 - 5:11 pm | चतुरंग
अगदी अगदी!! सुंदर सुंदर प्रश्न विचारतील ते आता!! ;)
18 Nov 2013 - 5:13 pm | रमताराम
त्या नेहमीच्या सांऽबर-बाऽत वाल्याकडून 'स्सार, डू यू येक्स्पेक्ट द्येम टू कान्फर बारतरत्न टू यू आफ्टर दिस चाम्पियनशिप म्याच?'
18 Nov 2013 - 5:19 pm | चतुरंग
त्या 'रत्ना'लाच मग चौदावे रत्न दाखवावे लागेल!! ;)
18 Nov 2013 - 5:12 pm | मोहन
कोणीतरी बूस्ट पाजारे आमच्या आनंदाला !
18 Nov 2013 - 5:20 pm | चतुरंग
तो तसा रिकामाच असेल आता!! :)
18 Nov 2013 - 5:13 pm | चतुरंग
आनंद प्रेस कॉन्फरन्स मधे बराच रिलॅक्स्ड वाटतोय. नक्कीच काळ्या मोहोर्यांकडून प्लॅन आहे. त्यामुळे त्याने आज एनर्जी वाया घालवली नाही!
18 Nov 2013 - 5:15 pm | संजय क्षीरसागर
आनंदची जराशी चूक आणि कार्लसन संधी घेईल कारण प्याद्यांच्या एंडगेमवर राजाच्या मदतीनं खेळण्यात त्याचं कमालीचं कसब आहे (सहावा गेम!). ड्रॉ झाला तर आनंदचं नशिब (म्हणजे वजीरावजीरी करुन). नाही तर कार्लसन सहजासहजी ड्रॉ सुद्धा होऊ देत नाही असा मागच्या सर्व गेम्सचा अनुभव आहे.
18 Nov 2013 - 5:21 pm | संजय क्षीरसागर
ड्रॉ!
18 Nov 2013 - 5:19 pm | भडकमकर मास्तर
सायकॉलॉगी ओफ चेस्स .... खिखि
18 Nov 2013 - 5:21 pm | चतुरंग
हा पत्रकारपरिषदेचा कार्यक्र्म म्हणजे एकदम फुल टू असतो राव, टेन्स गेमनंतर रिलॅक्सेशन आहे खेळाडूंना सुद्धा!! ;)
18 Nov 2013 - 5:23 pm | भडकमकर मास्तर
व्हाट इज द प्ल्यान फार टुमारो? अग्गागागा काय प्रश्न आहे...
18 Nov 2013 - 5:24 pm | चतुरंग
खाऊन झोपेन म्हणतो!! ;)
18 Nov 2013 - 5:25 pm | रमताराम
कुणीतरी विचारलं मॅग्नसला 'या टूर्नामेंटमधला तुमचा सर्वात 'टेन्स मोमेंट' कुठला ते सांगा(च!)'. उत्तर एकदम मासलेवाईक 'इट इज वेरी ऑप्टिमिस्टिक ऑफ यू.' ये ब्बात.
18 Nov 2013 - 5:28 pm | चतुरंग
कार्लसन हा कास्पारोवचा थोडा सॉफिस्टेकेटेड अवतार आहे त्याबाबतीत!! :)
18 Nov 2013 - 5:35 pm | जेपी
तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणी आभार . आणखीन एक छान समालोचन .
आता पुढील डावासाठी आनंदला आणी सर्वांना शुभेच्छा
18 Nov 2013 - 5:35 pm | भडकमकर मास्तर
मला वाटतं आनंद आणि कार्ल्याचे ठरले आहे, या असल्या भंपक लोकांना अशी रूड एकशब्दी उत्तरे द्यायची... पण हे लोक थांबणार नाहीत... एन्तरटेन्मेन्ट कन्टिन्यूज :) :)
18 Nov 2013 - 5:39 pm | ऋषिकेश
:(
असो
18 Nov 2013 - 5:41 pm | प्रसाद गोडबोले
हायला
ह्या पत्रकारांना उत्तर द्यायला कॅस्पारोव्हच पाहिजे ....त्यानं आई बहीण एक केली असती